अपात्र शिधापत्रिका शोध मोहीम वार्यावर - Ration cards checking


 

          केंद्र शासनाकडून यापूर्वी प्राप्त झालेल्या निर्देशानुसार अपात्र शिधापत्रिकाचा शोध घेवून अशा शिधापत्रिका रद्द करण्याच्या सुचना सर्व क्षेत्रीय कार्यालयांना वेळोवेळी देण्यात आल्या आहेत. तसेच सार्वजनिक वितरण व्यवस्था नियंत्रण आदेश २०१५ मधील तरतुदीनुसार शिधापत्रिका तपासणी ही निरंतर प्रक्रिया आहे. त्यामुळे अपात्र शिधापत्रिका शोधून रद्द करण्याकरिता खास मोहीम राबविणे आवश्यक आहे. राज्यातील कार्यरत बी पी एल. अंत्योदय अन्नपूर्णा केशरी शुभ्र व आस्थापना कार्ड. या सर्व प्रकारच्या शिधापत्रिकांची तपासणी करणेसाठी शोध मोहीम दि. १/२/२०२१ ते ३/४/२०२१ या कालावधीत पूर्ण करावयाची होती. पण अजून कोणताही सर्वे नाही कोणताही पत्रव्यवहार नाही रेशन दुकानदार यांचेकडून काही माहिती नाही 

(१) सध्याच्या शिधापत्रिका धारकाकडून कोणती माहिती घेणे गरजेचे आहे

* शहरातील प्रत्त्येक शिधापत्रिका धारकांचया शिधापत्रिकांची तपासणी व्हावी

* वरील तपासणी करण्यासाठी त्या त्या विभागातील / कार्यालयातील रास्त भाव / अधिकृत शिधावाटप दुकानातून शासकीय कर्मचारी / तलाठी यांचे मार्फत ठरवून दिलेल्या वेळेत नमुना फाॅरम वाटप करण्यात येतील

* शासकीय कर्मचारी/ तलाठी यांनी संबंधित रास्त भाव दुकानास जोडलेल्या शिधापत्रिका धारकांकडून माहिती भरून दिलेले फाॅरम स्विकृत करून अर्जदारास स्वाक्षरी व दिनांक सहित पोहच देण्यात यावी

* कागदपत्रे भरून देताना सोबत अर्ज शिधापत्रिका धारक ज्या भागात राहत आहे त्याचा पुरावा. म्हणून. उदा. भाडेपावती. / निवासस्थानाच्या मालकिचा पुरावा / एल पी जी जोडणी क्रमांक / बॅक पासबुक / विज बिल / टेलिफोन / मोबाईल देयक / वाहन चालक परवाना लायसन्स / ओळख पत्र / आधार कार्ड / इत्यादी प्रती घेता येतील हा सर्व कागदोपत्री पुरावा एका वर्षांपेक्षा जास्त जुना नसावा

* अर्ज परिपूर्ण माहिती भरुन घेऊन व आवश्यक जुनी कागदपत्रे जोडून घेवून सर्व अर्ज यादीसह संबंधित शासकीय कर्मचारी /तलाठी यांनी क्षेत्रीय कार्यालयाकडे जमा करावेत

*वरील कारवाई एका महिन्यात पूर्ण करावी ही कारवाई करण्यासाठी उचित प्रसिध्दी माध्यमांचा उपयोग करावा व जनतेस या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन करावे

(२) आलेल्या माहीतीचा तपशील तयार करणे

* वरील प्रमाणे कार्यालयात जमा झालेल्या नमुन्यांची त्या सोबतच्या कागदपत्रांची तपासणी पुरवठा क्षेत्रीय कार्यालयाने करावी

* वरील छाननी केल्यानंतर पुरेसा पुरावा असलेल्यांची यादी. "गट अ "म्हणून करावी तर "गट ब मध्ये पुरावा न देणारे यांची यादी करावी

* "गट अ " यादीतील शिधापत्रिका धारकांची शिधापत्रिका पुरववत चालू / कार्यरत राहील 

* " गट ब यादीतील शिधापत्रिका त्वरित निलंबित करण्यात याव्यात. अशा शिधापत्रिकेवर शिधा वस्तू रेशन अन्न देणें त्वरित थांबवावे व त्यानुसार दुकानदारास देण्यात येणार्या नियतनात कपात करण्यात यावी

* वरील १ ते ४ प्रमाणे एका महिन्यात पूर्ण करण्यात यावी

* "गट ब " यादीतील निलंबित केलेल्या शिधापत्रिका धारकांना आणखी १५ दिवसांनी मुदत घेवून त्या कालावधीत ते त्या भागात राहत असल्याबाबत सबळ पुरावा देण्यास सांगावे. आवश्यकतेनुसार पुरावा देण्यास मुदतवाढ देण्याचा विचार करावा त्यानंतरही पुरावा न दिल्यास पुरावा देऊ न शकलेल्या शिधापत्रिका रद्द करण्यात याव्यात ही कारवाई एका महिन्यात पूर्ण करावयाची आहे

(३) वरील (अ) व ( ब) प्रमाणे कार्यवाही करताना घ्यावयाची दक्षता

* शिधापत्रिका तपासणी करताना एका कुटुंबाला व एका पत्त्यावर दोन शिधापत्रिका दिल्या जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी. अपवादात्मक परिस्थितीत दोन वेगवेगळ्या शिधापत्रिका देणे आवश्यक असल्यास तसा निर्णय आवश्यक ती खातरजमा करून संबंधित तहसीलदार अथवा तहसील दर्जाच्या अधिकाऱ्यांनी/ शिधा वाटप अधिकारी यांनी घ्यावा

* एकाच पत्त्यावर दोन शिधापत्रिका विभक्त कुटुंबांमध्ये देताना दोन्हीही शिधापत्रिका बी पी एल अथवा अंत्योदय अन्न योजनेच्या असणार नाहीत

* वरील "गट अ" व "गट ब " मधील जनतेस व प्रसिद्धी माध्यमांस देण्यास प्रत्यवाय राहणार नाही

*. पुराव्यांची छाननी करताना संसयासपद वाटणार्या शिधापत्रिकांचया पुरावयाबाबत पोलिसांकडून तपासणी करण्यात यावी

* विदेशी नागरिकांना एकही शिधापत्रिका दिलेली असणारं नाही याची काटेकोर पणे दक्षता घ्यावी

(४) उत्पन्न निकष

* वरील प्रमाणे शिधापत्रिकांची तपासणी करताना ज्या शासकीय / निमशासकीय कार्यालयातील / खाजगी कंपन्या मधील कर्मचारी / कामगार यांचें ज्ञात वार्षिक उत्पन्न १ लाखांपेक्षा जास्त असेल अशा कर्मचारी यांच्या शिधापत्रिका तात्काळ अपात्र ठरवून त्या रद्द करण्यात याव्यात व त्यांच्या मागणीनुसार त्यांना अन्य अनुज्ञेय शिधापत्रिका देण्याची कार्यवाही करावी

* शोध मोहीमेत विशेषतः शहरी भागात विदेशी नागरिकांच्या शिधापत्रिका शोधून त्या रद्द करण्याची कारवाई करण्यात यावी. विदेशी नागरिकांच्या शिधापत्रिका शोध घेताना आवश्यकतेनुसार पोलिस यंत्रणेची मदत घ्यावी. त्याचप्रमाणे दुबार. असतीतवात नसलेल्या व्यक्ती स्थलांतरित व्यक्ती. मयत व्यक्ति या लाभार्थ्यांना वगळण्यात यावे

*. शिधापत्रिका तपासणी आढावा घेऊन तपासणीची कार्यपद्धती व इतर बाबींसाठी जिल्हाधिकारी तसेच मुंबई /ठाणे शिधावाटप क्षेत्रासाठी नियंत्रक शिधावाटप. संचालक. नागरी पुरवठा. मुंबई यांचे अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात यावी. या समितीमध्ये पुढीलप्रमाणे सदस्य असावेत

* जिल्हाधिकारी. / नियंत्रक शिधावाटप संचालक नागरी पुरवठा मुंबई / आयुक्त महापालिका. / पोलिस आयुक्त /पोलिस अधीक्षक / मुख्य कार्यकारी अधिकारी /अप्पर जिल्हाधिकारी /मुख्याधिकारी अ वर्ग नगरपालिका / जिल्हा पुरवठा अधिकारी / उप नियंत्रक शिधावाटप

*. शिधापत्रिका चुकीच्या पध्दतीने वितरित केली असेल व त्यास शासकीय अधिकारी कर्मचारी जबाबदार असल्यास संबंधितांविरुद्ध नियमानुसार कारवाई करण्यात यावी व त्याबाबतची माहिती शासनास सादर करावी

*. जिल्हा पुरवठा अधिकारी / अन्न धान्य वितरण अधिकारी / यांनी प्राप्त झालेले अर्ज व त्यांनी त्यांच्या अधिनिसत कार्यालयात वितरित केलेलें अर्ज तसेच शिधापत्रिका धारकांना वितरण केलेलें अर्ज व शिधापत्रिका धारकांकडून माहिती भरून प्राप्त झालेले अर्ज यांचा ताळमेळ ठेवावा

*. वरील प्रमाणे राज्यात अपात्र शिधापत्रिका शोध मोहीम राबविण्यात यावी. या मोहिमेअंतर्गत अपात्र आढळून येणाऱ्या शिधापत्रिका रद्द करण्यात याव्यात व त्याप्रमाणे रास्त भाव दुकानाकडील कोटा कमी करण्यात यावा. अपात्र शिधापत्रिका मोहीमेबाबत अहवाल दिनांक. १५ मे २०२१ पर्यंत शासनाकडे पाठविणे आवश्यक होते 

                   २००५ ला जसा रेशन कार्ड संबंधित सर्वे झाला होता दारिद्र्य रेषेखालील सर्वे सुध्दा झाला होता पण कोणताही अधिकारी आपल्या दारात आला नव्हता जाग्यावर बसून तुमचे आमचें निकष तयार केले होते. आज सुध्दा तसाच प्रकार होणारं आहे. ज्याला गरज नाही तो अन्न सुरक्षा योजनेत जाणार आणि खरोखरच ज्याला गरज आहे तो योजनेच्या बाहेर जाणार. आत्ता विचार करण्याची गरज आहे नाही तर आपल्यावर अन्याय होणार शंभर टक्के 

          समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार जाहिरात प्रसिद्ध वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

योज्यानेचा लाभ न देणाऱ्या रुग्णालयाकडून दहा पटीने दंड वसुली करा - डॉ परवेज अशरफी

 



  अहमदनगर - मार्च २०२० पासून भारताची विशेषता महाराष्ट्राची कोरोना महामारीने थैमान घातले आहे. सरकारी रुणालय सोबत खासगी रुग्णालयात कोविड चे रुग्ण दाखल करून त्यांच्यावर उपचार केले जात आहे. सरकार ने राज्यात काही रुग्णालयाला महात्मा फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत आरोग्य योजने अंतर्गत उपचार कण्याची परवानगी दिली असल्याने कोरोना आजारही या योजने अंतर्गत उपचार करण्याचे आदेश दिले होते. परंतु राज्यात फक्त ५ हजार रुग्णांना उपचाराचा लाभ मिळाला. याचाच अर्थ की ज्या रुग्णालयात योजना आहे त्यांनी लाभार्थी ला लाभ दिला नाही व त्यांची दिशाभूल करून अवाजवी रक्कम उकळली. सदर प्रकरणाची चौकशी होणे गरजेचे आहे असे निवेदनाचे पत्र एम आय एम जिल्हा अध्यक्ष यांनी मा .मुख्य मंत्री साहेब व अहमदनगर जिल्हा अधिकारी साहेबांना पाठवले आहे.   


निवेदनात पुढे लिहिले आहे की अहमदनगर जिल्ह्यातही अशे प्रकार घडले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अहमदनगर येथील काही रुगणालयात तर योजनेचे कार्यालय बंद असून काही ठिकाणी डॉक्टरने सांगितले तरच योजनेचा लाभ दिला जातो, काही ठिकाणी वरीष्ट अधिकाऱ्यांचे फोन आल्यानंतर योजनेचे लाभ मिळतात, तर काही ठिकाणी आजार योजनेत असतांना रुग्णाच्या नातेवाईकाला आजार बसत नाही पूर्ण पैसे भरावे लागेल असे उत्तर देण्यात येतात, या सर्व पाहता संबंधित रुग्णालय योजनेचा लाभ न देता जास्त पैसे रुग्णां कडून वसूल करीत असावे. सरकारने कोरोना रुग्नांचे किती दर अकरावे हे ठरून दिले असता, खासगी रुग्णालय मनाला वाटेल ते दर लाऊन पैसे उकळत असल्याचे दिसते, विचारणा केली असता तुम्हाला बेड दिले हे महत्वाचे, बिल आहे ते भरून आपले रुग्ण घेऊन जावे. भरारी पथकाला संपर्क करून सांगितले तर त्यांच्या कडून असे उत्तर येते कि तुम्ही आहे ती रक्कम भरून आमच्या कडे तक्रार करा आम्ही त्याची चौकशी करून कार्यवाही करू अशे गंभीर आरोप एम आय एम तर्फे करण्यात आले आहे. औरंगाबाद खंडपीठाने दिलेले आदेशात नागरिकांना मा.जिल्हा अधिकारी साहेबांना रीतसर तक्रार करण्याचे सांगितले आहे. परंतु त्याच बरोबर ज्या रुग्णालयात महात्मा फुले आणी आयुष्मान भारत योजना आहे त्यांनी अत्ता पर्यंत किती रुग्णांना लाभ दिला याची उलट तपासणी करणे गरजेचे आहे. कारण जर रुग्णालयाने योजनेत बसणाऱ्या रुग्णांना योजनेचा लाभ न देता त्यांची दिशाभुल करून पैसे उकळत असेल तर त्या रुग्णालय कडून १० पटीने रक्कम वसूल करण्याचे आदेश सरकारने द्यावे. जेणे करून भविष्यात अशे कृत्य होणार नाही. आणी जो अधिकारी किंवा कर्मचारी या प्रकरणाला पाठीशी घालत असेल त्यांच्यावरही योग्य निलंबनाची कार्यवाही करण्याचे आदेश द्यावे, अशे निवेदनात लिहिले आहे

निवेदनात एम आय एम जिल्हा अध्यक्ष डॉ परवेज अशरफी,जिल्हा महासचीव जावेद शेख,मास चे जिल्हा उपाध्यक्ष मुफ्ती अल्ताफ अहमदनगरी, नगरसेवक असिफ सुलतान, विध्यार्थी जिल्हा अध्यक्ष शहनवाज तांबोळी, युवा शहर अध्यक्ष अमीर खान, ऑल इंडिया युथ फेडरेशन शहर अध्यक्ष फिरोज शेख,शहेबाज शेख,सलमान खान,आरिफ सय्यद आदिंचे सह्या आहेत.


                     

चिमुकल्यांचे कोरोनामुक्त देशासाठी साठी अल्लाह कडे साकडे -Eid Mubarak


 

                   मोहम्मद सय्यद (वय ०८ वर्षे) व अहमद सय्यद (वय ०६ वर्षे) या दोन चिमुकल्या भावंडांनी पवित्र रमजान महिन्यात 30 दिवसाचे रोजे (उपवास) पूर्ण केले आहे. भारत देश कोरोना मुक्त होण्यासाठी तसेच देशावर आलेले संकट टळून पुन्हा एकदा भारताला सुजलाम सुफलाम कर असे अल्लाह कडे दुआच्या माध्यमातून या चिमुकल्यांनी साकडे घातले आहे.


                  दोन्ही भावंडांनी सध्याचे तापमान व रखरखत्या उन्हाळ्यात रोजाच्या नियमांनुसार पहाटेपासून 14 ते 15 तास म्हणजे संध्याकाळपर्यंत पाणी व अन्न काहीही न घेता पवित्र रोजे केले आहेत. या चिमुकल्यांनी प्रचंड कडक उन्हाळा असतानाही यशस्वीरित्या महिनाभर रोजे संपन्न केले आहेत. याबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.


दोन्हीही भावंडे मोहम्मद हा इयत्ता दुसरित व अहमद हा यूकेजी मध्ये शिकत असून अभ्यासातही हुशार आहेत.


              जनसेवक सामाजिक कार्यकर्ते सलीमभाई जरीवाले यांचे हे दोघे नातू आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष युवा नेते अलतमश जरीवाला यांचे भाचे आहेत. आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना, पिरशाहखुट यंग पार्टी-ट्रस्ट, अहमदनगर युवा फाउंडेशन, चाँद तारा यंग पार्टी, धरती चौक तरुण मंडळ व सर्व मित्र परिवारानी त्यांचे अभिनंदन केले आहे.


सही- अंगठा- Signature



               वरील शब्द एक हिंदी भाषेतील आहे. आणि एक मराठी भाषेत आहे. मात्र याचा अर्थ एकसारखाच आहे. सही म्हणजे बरोबर असा अर्थ होतो. पूर्वी लोक अडाणी अशिक्षित रानटी होती. कुठल शिक्षण कुठले कोण बरे वाईट सांगणारे. गावागावात यांना लुटण्यासाठी सावरकर आ वासून उभे होते. आपण बर्याच वेळा असे पाहिले आहे की कोरया कागदावर अंगठा घेऊन या चोरांनी लोकांच्या जमीन घर लिहून घेतली. लिहायला वाचायला येत नाही काय लिहिलंय कळत नाही त्यामुळे अशा लोकांची लुटच केली जात होती. सावकारांनी या अशा अडणी गरजू लोकांच्या बायका सुध्दा व्याजापोठी ओलिस घेतल्याचे प्रकार घटना आपण वाचतो बघतो. पण आपण काहीच करू शकत नाही.कारण याला अडव येतं ते म्हणजे त्यावेळचे अशिक्षित पण कायतरी करायला पाहिजे. अशी धारणा मनात घेवून. समाजसेवक. समाजहिताचिंतक लोकांनी आपले विचार लोकांच्या पुढं मांडायला सुरुवात केली. शिक्षण नसल्यामुळे होणारे तोटे त्यांना समजावून सांगितले. आणि लोकांना स्वता व आपल्या मुलांना मुलींना महिलांना शिक्षण घेण्यास प्रवृत्त केले. आणि एक वेळ समाजाला जाग आली आणि समाज शिक्षणाकडे वळला. समाजातील शंभर पैकी आठ दहा लोक साक्षर झाली. ते इतरांना शिक्षण देवू लागली. यातच हळूहळू इंग्रजी माध्यमाचा वापर शिक्षणात होऊ लागला. लोक लिहायला वाचायला शिकली. अंगठा निशाणी केल्यामुळे काय आपले नुकसान होते हे ध्यानात यायला लागले. मी काही ठिकाणी पाहीले आहे मृत्यू व्यक्तिचा सुध्दा अंगठा उठवून त्याची घर जमीन काबिज केल्याचे प्रकार पहायला मिळतात याला त्या त्या शेत्रातील शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना हाताशी धरून हे सर्व साध्य केले जाते. काळ बदलला तंत्रज्ञान सुधारले टपालाची जागा मोबाईल फोन याने घेतलीं. आणि मग अंगठा बांधनी नियम अमलात आला. शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्यासमोर अंगठा करणे बंधनकारक करण्यात आले.  

   शिक्षण घेतल्यामुळे व्यक्ति पहिली सही मोडी लिपी मध्ये करण्यास सुरुवात केली. काहीजण आपले पूर्ण नाव सहीसाठी वापरायला लागले. काहीजण इंग्रजी मध्ये सही करायले लागलें. मुलाला शाळेत दाखला घेताना सहीचा वापर होण्यास सुरुवात झाली. बक्षिसपत्र. अॅपेडिवहिट. जमीन वारस हक्क खरेदी विक्री. जातीचा दाखला. रहिवासी दाखला. पोलिस ठाण्यात जामीन बॅकेस जामीन साक्षीदार मध्यस्थी असे एक नाही विविध शासकीय दाखल्यावर असणार्या त्या त्या शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या सहीला एक वेगळंच महत्व आहे. 

             सहीला एक वेगळंच महत्व आहे कारण अधिकार व कर्मचारी निवडी. पोलिस भरतीपूर्व. ग्रामपंचायत. पंचायत समिती. जिल्हा परिषद.घरकुल योजना. महसुली विभागाच्या विविध योजना. अपंग योजना. जिल्हाधिकारी कार्यालय. यांच्या अंतर्गत येणारे विविध विभाग यांच्यातील पदाधिकारी निवडीसाठी संबंधित विभागाच्या अधिकारी यांची सही याला प्रथम स्थान दिले जाते. आपणं दवाखान्यात. शालेय शिक्षण. व्यवसायिक शिक्षण. नोकरी ठिकाणी वशिलेबाजी शाळेत प्रवेश मिळविण्यासाठी. शिफारस करण्यासाठी एखाद्या सामाजिक संघटना सेवा भावि संस्था. नामांकित व्यक्ती यांच्याकडून येणारे शिफारस पत्र यांवर असणारी सही याला एक अनन्य साधारण महत्व आहे.

          निवडणूक चालू झाली की अर्ज भरताना सही. मतदार यांना पैसे वाटताना घेतलीं जाणारी मतदारांची सही. निवडून आल्यावर मी माझ्या कर्तव्य पूर्ण पणे क्षमतेने पार पाडीन म्हणून शपथ घेताना केली जाणारी सही. आपण निवडून आल्यावर आपल्या कामासाठी काढलेला जाहिरनामा त्यावर असणारी सही. एखाद्या वेळी देशांवर आपत्कालीन परिस्थितीत आणीबाणी जाहीर करण्यासाठी राष्ट्रपती यांनी केलेली सही. आपल्या गावात तालुका जिल्हा राज्य देश यामध्ये कोणताही निर्णय घेताना जनमत विचार न घेता नेते पुढारी यांनी संबंधित भागात जमावबंदी. टाळेबंदी. संचारबंदी. असे विविध निर्बंध लावण्यासाठी एका सहीवर तो गाव तालुका जिल्हा बंद करण्याचा अधिकार या सही मुळे येतो. संबंध जिल्ह्याचे पालकमंत्री जिल्हाधिकारी यांनी कोणताही आदेश जारी करताना करण्यात येणारी सही. बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज यावर संबंधित विभागांचे अधिकारी व कर्मचारी यांनी ते पत्र स्विकारताना सही करणे अनिवार्य आहे. त्या पत्राचे कोणतेही संबंधितांना उत्तर देणे बंधनकारक आहे पण ते अमलात आणले जात नाही फक्त आपली जबाबदारी म्हणून पत्र स्विकारायच आणि सही करायची  

              सहीची चांगली बाजू आपण बघितली आत्ता वाईट बाजू एखाद्या आॅफिस कडून. टेंडर. निलाव प्रकिया. सर्वच बांधकाम विभाग यामध्ये मोठी मोठी रस्ते. पुल बोगदे. धरणे. कालवे. बंधारे. अशी विविध. कोट्यावधी रुपयांची कामे बोगस टेंडर भरुन कंत्राटदार ठेकेदार. संबंधित विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांच्यावर राजकीय दबाव आणून एका सहीने मंजूर करून घेताना आपणं बघतो. अधिकारी व कर्मचारी सरळ आपल्या पटात बसणारा असेल तर ठिक आहे नाहीतर त्याला. शिवीगाळ करणे. जीवे मारण्याची धमकी देणे. अंगावर गाड्या घालणे. अपहरण करणे. त्यांच्या मुलांचे अपहरण करणे. आणि एवढे करूनही नाही जमलं तर त्या अधिकार व कर्मचारी यांचा खून केलेल्या बातम्या आपणं बघतो वाचतो. म्हणजे एका सहीने एखाद्याचे नशिब बदलतं आणि त्याच सहीने त्याचे जीवन व नशिब नष्ट होते ‌

               सर्वात मोठा भ्रष्टाचार हा एका सहीने होतो. उदा. सांगायचे झाले तर बांधकाम कामगार नोंदणी करण्यासाठी संबंधित जिल्ह्याचे शाॅप इन्स्पेक्टर यांची सही लागते पण आज बोगस कामगार नोंदणी मग होतें कशी. अशा बोगस कामगार नोंदणी साठी जो अधिकार व कर्मचारी यांच्या सह्या होत असतील तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे अशा अधिकार व कर्मचारी यांच्यामुळे बोगस कामगार नोंदणी होत आहे. "तुम्ही खा आम्ही खातो " असं ब्रिद वाक्य असू शकत काय. शासनाने ज्या अधिकार व कर्मचारी यांना सहीचा अधिकार दिला आहे त्यांनी तो सक्षमपणे राबविला पाहिजे. संबंधित विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांच्या एका सहीसाठी दिवसभर कार्यालयाच्या बाहेर लोकांच्या रांगा मी पाहिल्या आहेत. भरतीला उतरलेल्या मुलांना सुध्दा संबंधित विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून हीन वागणूक दिली जाते. एका सहीसाठी त्यांच्याकडे एक विशिष्ट रक्कमेची मागणी केली जाते. 

          म्हणजे इंग्रजी भाषेतच सही करावी असा कायदा नाही. मातृभाषा अगोदर आणि मग इतर काही. एक सही काय करू शकते मोठी ताकद आहे यात. पदांवर असणारा अधिकार व कर्मचारी काना आंधळा बहिरा अपंग आहे किंवा अन्य काही त्याला महत्व नाही त्यांच्या हातात असणारी सत्ता सही करण्याची ताकद बघा. म्हणजे एकंदरीत एखाद्याला सत्तेवर आणण्यासाठी किंवा नोकरी देण्यासाठी किंवा त्या पदावरून नोकरी हून काढून किंवा पदोन्नतीसाठी सही किती गरजेची आहे 

     समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार जाहिरात प्रसिद्ध वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९ 

       आमचा गाव तालुका जिल्हा राज्य देश आत्ता पुन्हा एखादा स्वतंत्र करून घेण्याची गरज आहे. घराणेशाही. हुकूमशाही. दहशतवाद. टोळीयुद्ध. बेरोजगारांची समस्या. वाढती तरुण बेरोजगार. वाढती व्यसनाधीनता. वैद्यकीय शैक्षणिक सामाजिक आर्थिक लुबाडणूक यातून आपणांस आपल्याचया कडूनच आपले स्वतंत्र पुन्हा मिळविण्यासाठी पुन्हा एकदा. चलेजाव चळवळ. १८५७ बंड. असे विविध माध्यमातून उठाव करावा लागणार

संघटनांच्या बुरख्याआड. "दुकानदारी तेजीत "...

इस्लाम जगत व शिकवण: नजीर शेख Islamic Teaching.....

नागरिकांची सनद .- Citizen's charter...

सर्व खासगी रुग्णालयात महात्मा फुले योजना अंतर्गत मोफत उपचार करण्याचे आदेश द्या - डॉ परवेज अशरफी AIMIM Ahmednagar...

महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई या मंडळाचे कोट्यवधी रुपये पाण्यात


 

असंघटित कामगारांसाठी दि 1 मे 2011 साली महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई हे मंडळ असंघटित कामगार म्हणजे बांधकाम व्यावसायिकांच्या कामांवर मजूरीसाठी जाणारे जे अडाणी गरजू व्यसनी असतात मिळणार या पगाराच्या पैसयातुन कसाबसा उदरनिर्वाह चालवत आहेत हे सर्व शासनाने लक्षात घेऊन बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ स्थापन केले त्यात कामगार हितासाठी विविध 19. कल्याणकारी योजना राबविण्यात येतात नोंदणी साठी वय वर्षे 18 ते 60. निश्चित करण्यात आले आहे यामध्ये कामगार लग्नापासून ते त्यांच्या बायकोसाठी आरोग्य योजना मुलांच्या शिक्षणासाठी विविध शिष्यवृत्ती योजना व स्वता कामगारांसाठी विमा आरोग्य अशा विविध योजना राबविण्यात येतात 

  परवा शासनाने वेळोवेळी कामगार कामावर असताना विविध प्रकारचे अपघात होताना शासनाच्या निदर्शनास आले या सर्व परस्थिती चां आडावा घेऊन कामगारांना अपघात पासुन वाचविण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून सुरक्षा संच देण्याचे ठरविले त्यांचे वाटप सुध्दा मंडळाच्या अटि शर्ती नुसार करण्यात आले आपल्या सांगली जिल्ह्यात असे कितीतरी सुरक्षा संच आले असतिल त्याचा आकडा मला सांगता येणार नाही 

    मंडळाने कोट्यवधी रुपये खर्च करून योजना आणली संच वाटप झाले की मंडळांची जबाबदारी संपली काय आज सुरक्षा संच वाटप तर झाले पण कोठेही सुरक्षा संच कामावर कामगार वापरत नाही मंडळाकडे आमची मागणी आहे अधिकारी कर्मचारी यांनी सुरक्षा संच ज्या भागात झाले आहेत तेथे महिन्यातून एक वेळ सर्वे करण्यात यावा जो कामगार सुरक्षा संच वापरत नाही त्या कडून तो मागे घेण्यात यावा अन्यथा मंडळाची फसवणूक केली या कारणांमुळे त्यांच्या वर कायदेशीर कारवाई करण्यात यावी

   जिल्ह्यात पुरुष कामगारापेक्षा महिलांना सुरक्षा संचांचे काय उपयोग नसताना कोणत्या कारणाने वाटप झाले व कल्याणकारी मंडळांचे कोट्यवधी रुपये पाण्यात गेले याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित केला जात आहे

सुरक्षा संचामध्ये. हेल्मेट हंडणगोलज सतरंजी सुरक्षा बेल्ट बॅटरी बुट मोठी पत्र्याच्या पेटी जेवनाचा डबा असे बरेच साहित्य आहे 

अधिकारी व कर्मचारी यांच्या हालगरजी पणामुळे कल्याणकारी मंडळाला कोट्यवधी रुपयांचा फटका बसला आहे सुरक्षा संच वापराचा सर्वे हा झालाच पाहिजे

          २२/२३ मार्च ला टाळेबंदी जारी करण्यात आली होती. बांधकाम व्यावसाय व बांधकाम कामगार यांना कामावर जाण्यासाठी व येण्यासाठी शासनाने परवानगी दिली होती. कलम १४४ जारी असल्यामुळे रस्त्यावर जागोजागी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कामांवर जाताना कामगार असल्याचा पुरावा मागितला जात होता. जर कामगाराकडे कोणताच पुरावा नसेल तरी मंडळाकडून वितरण करण्यात आलेल्या सुरक्षा संचामध्ये सुरक्षा जॅकेट. बुट होते मंडळाचे नोंदणी पुस्तक हा सुद्धा मोठा पुरावा असु शकतो. पण खरोखर कामगार आहेत त्यांना सुरक्षा संच मिळालाच नाही मग तो काय पुरावा देणार. मग सुरक्षा संच हजारांत वाटप झाले मला अजून सुध्दा एकही कामगारांच्या अंगावर सुरक्षा किट दिसलें नाही अडचणीत काम करताना कामगार मी बघितले आहेत कारण मी सुद्धा एक कामगार आहे त्यामुळे कामगारांची दररोज भेट होते मी असं पाहिलं आहे बोगस नोंदणी करून एका घरामध्ये चार चार सुरक्षा संच पेट्या गेल्या आहेत त्यासुद्धा न कामगार असणार्या लोकांना म्हणजे "आंधळ दळतय आणि कुत्र पिठ खातय. " असा प्रकार चालू आहे. 

            आॅनलाइन नोंदणी संदर्भात विविध ठिकाणी मोबाईल वरुन झुम मिटींगा घेतल्या जात आहेत पण एक मोठ कोड असे आहे. की. आॅनलाइन नोंदणी करून सहा महिने उलटून गेले तरी कामगारांना सहाय्यक कामगार आयुक्त भवन यांचेकडून मॅसेज येत नाही. मग त्या कामगारांनी काय करायचे. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई यांचेकडून राबविलेला आॅनलाइन नोंदणी प्रक्रिया बोगस कामगार नोंदणी रोखण्यासाठी आहे हे कळतंय पण त्यामुळे खरोखरच कामगार असणारे हे सुद्धा आॅफिस चया गलथान कारभारामुळे अडचणीत येत आहेत. मंडळाने यावर सुध्दा लवकरात लवकर निर्णय घेणे गरजेचे आहे. नाही तर ज्या बांधकाम कामगार यांनी आॅनलाइन नोंदणी केली आहे ती नोंदणी ग्राह्य धरून त्यांना सुध्दा कामगार कल्याण मंडळाच्या योजनांचा लाभ द्यावा. कोरोना काळात बांधकाम कामगार कोरोनाने मृत्यू झाल्यास २ लाख रुपये अनुदान मंडळाने द्यावे. आपणाकडे जीवीत नोंदणी असणारे बांधकाम कामगार यांचा सापेक्ष सर्वे करून त्यांचा दारिद्र्य रेषेखाली समावेश करण्यात यावा. 

        शासनाचे आभार कारणं परवा कोरोना काळात १५०० रुपये सानुग्रह अनुदान कामगारांच्या खात्यात जमा झाले. मी विनंती करतो बांधकाम कामगार यांना त्यांनी लवकरात लवकर आपलीं नोंदणी आॅनलाइन पध्दतीने करून घ्या. आणि मंडळाच्या विविध योजनांचा लाभ घ्या. 

         अजून एक वेळ सांगतो आपल्या सांगली जिल्ह्यातील वाटप करण्यात आलेल्या सुरक्षा संचाचा सर्वे करून जो बांधकाम कामगार नाही त्याने चुकीची माहिती मंडळाला देऊन शासनाला फसविले आहे या अंतर्गत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी

     समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

नागरिकांची सनद .- Citizen's charter...

हिंगोलीतील निराधार मातेला मानवसेवा प्रकल्पाचा आधार- Manavseva project...

संघटनांच्या बुरख्याआड. "दुकानदारी तेजीत "...

समाजवादी पक्षाने केली जिल्हा अधिकारी साहेबांना ही मागणी - Ahmednagar Samajwadi party...

हिंगोलीतील निराधार मातेला मानवसेवा प्रकल्पाचा आधार- Manavseva project


 

औढा नागनाथ या गावातच दिवस अन् रात्र रस्त्यावर आयुष्य जगणारी एक २७ वर्षाची तरुणी फिरायची आणि तेथेच कचराकुंडीतील उष्टे अन्न शोधून खात असायची. रस्त्यावर निराधारपणे फिरणाऱ्या या मनोरुग्ण मातेच्या असहाय्यतेचा गैरफायदा काही वासनांध पुरुषांकडून घेतला जात होता. हिंगोलीच्या महिला सामाजिक कार्यकर्त्या वैशाली राठोड यांच्या निदर्शनास येताच त्यांनी अतिशय तळमळीने या मातेला सुरक्षिततेसाठी स्थानिक पातळीवर ग्रामपंचायत, लोकप्रतिनिधी यांचेकडे मदतीसाठी धाव घेतली. मात्र या निराधार मातेला स्थानिक पातळीवर मदत मिळाली नाही. वैशाली राठोड यांनी अहमदनगर येथील श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाच्या "मानवसेवा" प्रकल्पाचे दिलीप गुंजाळ यांच्याशी या निराधार मातेच्या सुरक्षिततेबाबत चर्चा केली. एकीकडे कोविड १९ चे संकट आणि त्यामुळे सुरु असलेला लॉकडाऊन या परिस्थितीला तोंड देत संस्थेचे दिलीप गुंजाळ आणि स्वयंसेवकांनी या निराधार मातेला दि.०४/०५/२०२१ रोजी *"मानवसेवा"* प्रकल्पात आधार दिला. या मातेवर संस्थेच्या मानवसेवा प्रकल्पात मानसोपचार तज्ञ डॉ. अनय क्षीरसागर आणि डॉ. सुरेश घोलप यांच्या मार्गदर्शनाने उपचार सुरु केले आहेत.

*मानवसेवा हीच, ईश्वर सेवा*

••••••••••••••••••••••••••••

*मानवसेवा प्रकल्प*

(मन व घर हरवलेल्या मानसांच हक्काच घर)

द्वारा- श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळ

📱९०११७७२२३३

सर्व खासगी रुग्णालयात महात्मा फुले योजना अंतर्गत मोफत उपचार करण्याचे आदेश द्या - डॉ परवेज अशरफी AIMIM Ahmednagar...

संघटनांच्या बुरख्याआड. "दुकानदारी तेजीत "...

इस्लाम जगत व शिकवण: नजीर शेख Islamic Teaching..

.

नागरिकांची सनद .- Citizen's charter....

संघटनांच्या बुरख्याआड. "दुकानदारी तेजीत "


 

             सांगली जिल्ह्यात व वाळवा तालुक्यातील खेड्यापाड्यात सुध्दा काही सामाजिक संस्था यांचा आधार घेत कामगारांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांचेकडून असंघटित गरिब गरजू बांधकाम कामगार यांच्यासाठी विविध कल्याणकारी योजना (१९) राबविल्या जातात त्या बांधकाम कामगारांना मिळवून देण्याच्या नावाखाली काही कामगार संघटनांची दुकानदारी तेजीत आहे. तर काहींनी पुर्वीचा गुन्हेगारी आलेख पुसण्यासाठी सामाजिक संघटना व राजकीय संघटनाचा आधार घेतला आहे. सामाजिक संघटनांचा बुरखा पांघरत काहींनी तर शासकीय कार्यालये व कार्यालयाचा परिसर एजंटांचा बिल्ला लावत सर्वसामान्य बांधकाम कामगार यांचेकडून पैसे उकळयाचा धंदा मांडला आहे. तर आर्थिक फसवणूकीचा आळ असलेले लोकांच्या. अन्न वस्त्र निवारा औषध शिक्षणासाठी टाहो फोडताना चे चित्र पहावयास मिळत आहे.  

             वाळवा तालुका व अशा विविध तालुक्यात अनेक तथाकथित सामाजिक संघटनांचे पेव फुटले आहे. विविध सामाजिक संघटना व राजकीय संघटना लेबल लावून गुन्हेगारीत वावरणाऱ्या काहींचे पोस्टर डिजिटल अधूनमधून त्या त्या तालुक्यात झळकत आहेत. कामगारांचे कोणास सोयरसुतक नाही. असे कामगार शुभचिंतक रोज तयार होत आहेत. किती लाभ मिळवून दिल्यावर किती पैसे उकळायचे याचे सुध्दा दर ठरलेले असतात. काही ठिकाणी असे पाहण्यात आले आहे कामगारांना लाभ मिळाला की संघटनांचा कार्यकर्ता कामगाराबरोबर बॅंकेत जाऊन पैसे मिळेपर्यंत त्याची पाठ सोडत नाहीत. 

        शासकीय कार्यालयात एजंटगिरी करणारे सामाजिक संघटना आधार घेऊन व्हाईट कॉलर दुकानदारी रासरोस पणे चालविताना दिसत आहेत. एका बाजूला शासकीय कार्यालयात दलाली करून एखाद्या बांधकाम कामगार यांना मिळणार या लाभातून हजारो रुपये लाटायचे आणि दुसरीकडे सामाजिक संघटनेच्या डिजिटल याचा आधार घेत मिरवायचे असाही काहींचा दिनक्रम आहे असे चित्र आपणास पहावयास मिळते कार्यकर्त्यांच्या अशा संघटनांमध्ये मोठा भरणा असल्याचे चित्र आहे. तालुक्यातील काही संघटना कामगार हितासाठी विविध सामाजिक. मदत करण्याचे काम करतं असतात त्यांना सहाय्यक कामगार आयुक्त भवन येथे होणा-या मिटींगासाठी बोलाविले सुध्दा जात नाही. कोणताही पत्र व्यवहार केला जात नाही. त्यांना आॅफिस कडून व्यवस्थित वागणूक दिली जात नाही. त्यांच्या कामगारांचे नोंदणी अर्ज जाणूनबुजून प्रलबिंत पाडले जातात. याचा अर्थ असा होतो का सहाय्यक कामगार आयुक्त भवन मधील अधिकार व कर्मचारी यांचा अशा संघटनांना पाठीशी घालण्याचा फंडा वापरला जातो आहे. म्हणजे जिथे अधिकार व कर्मचारी यांच्याकडून कामगार व कामगार हितासाठी काम करणाऱ्या संघटनांना हिन वागणूक दिली जात आहे या संघटना अशा वागणूकी मुळे संपत आल्या आहेत 

            अशा काही सामाजिक संस्थांचा अपवाद वगळता काहींच्या संघटना डिजिटल पुरत्या व कामगारांना आर्थिक लुबाडणूक करण्या पुरत्या मर्यादित आहेत. हे सर्व संघटनाच नाही तर काही पुढारी नेते विविध योजनांचे गाजर दाखवून बांधकाम कामगार यांचा आंदोलन व फक्त घोषणा बाजी करून कामगारांना फसवतात मध्यंतरी एका संघटनेच्या तथाकथित नेत्यांच्या सामाजिकतेचा बुरखा काही महिलांच्या धाडसामुळे फाटला होता. समाजिकतेची झालर पांघरूण असे उपद्व्याप करणारे आणखी काही महाभाग असल्याची चर्चा वरचेवर तालुक्यात सुरू असते सामाजिक संघटना बिललयावर समाजातील गोरगरीबांचे आर्थिक व मानसिक शोषण वेळ पडल्यास धमकी. गुंडगिरी. रोखण्याऐवजी त्यांचेच शोषण झालेले आपण असे प्रकार अधूनमधून चर्चिला जातो 

            आर्थिक व मानसिक प्रकरणात यापूर्वी फसवणुकीचा आळ आलेल्या काहींना पुर्वीचा गुन्हेगारी आलेख पुसण्यासाठी सामाजिक संघटना आधार घेतल्याची अनेक उदाहरणे समाजासमोर आहेत. वेळोवेळी कामगार आपल्यावर झालेल्या अन्यायाचा न्याय मागण्यासाठी विविध आंदोलने उपोषणे करतो मागच्या वर्षात सांगली जिल्हा अधिकारी आॅफिस पुढे एक महिलेने आंदोलन केले होते त्याला कोणताही प्रतिसाद कोणत्याही संघटना पुढारी किंवा सहाय्यक कामगार आयुक्त भवन मधील अधिकार व कर्मचारी यांनी दिला नाही उलट त्या महिलेचे होणारे लाभाचे काम अडविले एका बाजूला आर्थिक फसवणूकीत फौजदारी पोलिस कारवाई जरी झाली तरी सुद्धा न्याय मिळत नाही. कारणं अशा संघटना राजकीय वरदहस्त लाभलेला असतो त्यामुळे बांधकाम कामगार वार्यावर आहे. त्यातून काही एकदा मुद्दा मोठा झाला तर आम्ही बांधकाम कामगार यांच्यासाठी काहीतरी करित असल्याचे चित्र आपल्यासमोर उभे केले जाते जसे कर्मचारी यांना तात्पुरते निलंबित करणे 

            परंतु यापूर्वीच्या फसवणूक प्रकरणातील अनेकांचे प्रश्न तथाकथित सामाजिक कार्यकर्त्यांना सोडविता आलेले नाहीत मग आत्ता सामाजिक काम करण्याचा आव आणून काय साध्य होणार असाही प्रश्न आत्ता सर्वसामान्य बांधकाम कामगार यांच्या मनात घर करुन बसला आहे 

              अशा होणा-या आर्थिक मानसिक त्रासाला स्वताला कामगार जबाबदार आहे कारणं मंडळाकडून येणारा लाभ हा तुमच्या बॅंक खात्यात येतो त्यातील ठराविक वाटा एखाद्या कामगार संघटना किंवा एकदा एजंट याला स्वताच्या हाताने तुम्ही देताय म्हणजे तुम्ही देताय म्हणून हे घेत आहेत. तुम्ही एकही रूपया अशा कोणासही देऊ नका. तुमचे आॅफिसचे असणारे काम तुम्ही स्वताच्या बळावर अनुभवांवर करून घ्या नाही झाले तर मा जिल्हाधिकारी यांचेकडे तक्रार दाखल करू शकता दिवसभर कामांवर घाम गाळून आपले व आपल्या कुटुंबांचे पालनपोषण करणार्या असंघटित कामगारांच्या मुलांना शिक्षण वैद्यकीय सेवा विमा पेन्शन योजना अशा विविध योजना कामगारांसाठी आहेत पण आज परस्थिती उलट आहे खरा कामगार लाभापासून वंचित आहे आणि ज्यांचा बांधकाम कशाला म्हणतात बांधकाम म्हणजे काय बांधकाम करताना काय काय वापरतात हे माहीत नसणारे आज महाराष्ट्रात इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांचेकडून राबविला जाणारा लाभ घेण्यासाठी रांगेत उभे आहेत असे कामगार आपणास दिसल्यास त्वरित पुराव्यासह सहाय्यक कामगार आयुक्त भवन येथे तक्रार नोंदवा

                आज आॅनलाइन नोंदणी प्रकियेत कामगाराला नाहक त्रास सहन करावा लागत आहे तो म्हणजे आॅनलाइन नोंदणी केल्यावर सहा महिने उलटून गेले तरी मॅसेज नाही त्यांनी काय करायचे जर आॅनलाइन मिटिंग आयोजित केली तर त्यात कामगारांना बोलण्याचा अधिकार द्या आणि मग बघा बाहेर काय चाललंय परवा माहिती मिळाली पण आम्हाला सुध्दा मत मांडण्याची संधी मिळाली पाहिजे असे मत मी बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई यांचे सचिव यांचेकडे मांडतो आहे विनंती वर विचार करा जिल्ह्यात काय चाललंय त्याचा आढावा तुम्हाला त्यात कळेल काय वागणूक सहाय्यक कामगार आयुक्त भवन मधील अधिकार व कर्मचारी आम्हाला देतात कामगारांच्या काय अडचणी आहेत

       समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार जाहिरात प्रसिद्ध वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

आपण व पोलीसांची भूमिका - We and Police..

समाजवादी पक्षाने केली जिल्हा अधिकारी साहेबांना ही मागणी - Ahmednagar Samajwadi party...

नागरिकांची सनद .- Citizen's charter...

सरकारने पत्रकारांना तातडीने फ्रंट लाईन वर्करचा दर्जा दयावा - हाजी इर्शादभाई...

समाजवादी पक्षाने केली जिल्हा अधिकारी साहेबांना ही मागणी - Ahmednagar Samajwadi party


 समाजवादी पार्टीचे जिल्हाधिकारी यांना निवेदन. रमज़ान ईद व अक्षयतृतीया निम्मित अत्यावश्यक सेवेतील दुकानांना सकाळी 7 ते 12 परवानगी देण्यात यावी - अजीम राजे. 


 अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र हा सध्या कोरोना च्या दुसऱ्या लाटेतील भयंकर परिस्थितितुन जात असून अश्या परिस्थितीतून जात आहे व अहमदनगर जिल्ह्यातही कोरोनाच्या उद्रेक पायला मिळत आहे या परिस्थिति मध्ये मुस्लिम समाजाचा पवित्र रमज़ान महीना संपन्न होत असून शेवट चे 4 दिवस उरले आहे येत्या 14 तारखेला रमज़ान ईद व अक्षयतृतीया ह्या सणा निम्मित प्रशासनाच्या नियमाचे पालन करीत अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी 7 ते 12 चालु ठेवण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी व महानगरपालिकेचे आयुक्त यांना देण्यात आले यावेळी समाजवादी पार्टीचे जिल्हा अध्यक्ष अजीम राजे समवेत राजु जहागिरदार, राजेंद्र गायकवाड, मुन्ना भाई, जहीर सय्यद, मोहम्मद हुसैन, शफी खान, तौसिफ शेख आदि उपस्थित होते रमज़ान ईदला शीरखुर्मा साठी लागणाऱ्या किराना सामान व अन्य वस्तु साठी प्रशासनाने काही प्रमाणात अत्यावश्यक दुकानाना सूट द्यावी जेणे करुण नागरिकांना ईद व अक्षय तृतीया साठी लागणाऱ्या किराना खरेदी करता येईल व उत्साह ने रमज़ान ईद व अक्षयतृतीया दोन्ही सण घरच्या घरी साजरी करता येईल 

मागच्या वर्षी कोरोनाच्या महामारीत मुस्लिम बांधवानी साध्या पद्धतीने घरी ईद साजरी केली होती तसेच यावर्षीही घरी ईद साजरी करण्यात येत असून परंतु ईद साठी लागणाऱ्या डायफ्रूट व किराना सामानसाठी अत्यावश्यक दुकाने सकाळी 7 ते 12 चालू ठेवण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. 

इस्लाम जगत व शिकवण: नजीर शेख Islamic Teaching....

सरकारने पत्रकारांना तातडीने फ्रंट लाईन वर्करचा दर्जा दयावा - हाजी इर्शादभाई...

सर्व खासगी रुग्णालयात महात्मा फुले योजना अंतर्गत मोफत उपचार करण्याचे आदेश द्या - डॉ परवेज अशरफी AIMIM Ahmednagar...

आपण व पोलीसांची भूमिका - We and Police...

इस्लाम जगत व शिकवण: नजीर शेख Islamic Teaching


 


कॉम्रेड एम.एन रॉय यांनी आपल्या Historical Role of lslam( इस्लामचे ऐतिहासिक योगदान )या ग्रंथाच्या माध्यमातून द्वंद्वात्मक भौतिकवादी दृष्टिकोनातून इस्लामच्या राजकीय पैलूंवर प्रकाश टाकणारे विवेचन केले आहे. इस्लाम हे धर्म वेड्या व हिंसक लोकांची एक चळवळ होती व यातून त्यांना यश मिळाले असे भाष्य केले जाते व इस्लाम हा तलवारीच्या जोरावर लादला गेला आहे. असे विचार रूढ़ झाले आहेत. या मतांचे व या लबाडीचे खंडन करून इस्लामच्या वाढीसाठी कोणते घटक करणींभुत होते याची मीमांसा केली आहे. रॉय मते इस्लाम वाढी साठी समतावादी प्रेरणा कारणीभुत आहे ज्यामुळे इस्लाम जगभर पसरला आहे. 

 रॉय यांचे मूळ ग्रंथ इंग्रजीत आहेत व आपल्याकडे हे वाचले जात नाही. अलीकडे प्राध्यापक सुभाष भिंगे यांनी याचे अनुवाद केले व आज हे वाचकांना उपलब्ध आहे. रॉय हे कम्युनिस्ट व भिंगे हे ख्यातनाम लेखक यांनी हे ग्रंथ संपादित केला आहे यावरून विषयाचे गांभीर्य लक्षात येईल.रॉय यांनी हा ग्रंथ 1936 मध्ये तुरुंगात असताना लिहिला आहे मार्क्सवादी व्यक्तीने इस्लामवर लिहिणे हे अनेकांना नवल वाटेल परंतु तत्कालीन खोट्या समजुतींचा पर्दाफाश करण्यासाठी हे लिखाण लिहिणे भाग होते.

आजही इस्लाम बाबत इतर धर्मीयात गैरसमजुती आहेत ते या पुस्तकाच्या वाचनातून नक्कीच कमी होतील.

 त्याचा उद्देश इस्लामचे गोडवे गाणे नव्हे भारतीय मार्क्सवादाचे जनक असणारे एम एन रॉय यांना कोणत्या धर्माचे गुणगान करण्याची आवश्यकता नव्हती परंतु वास्तव व सत्य मांडने हे त्यांनी आपले आद्य कर्तव्य मानले व या ग्रंथाचे लेखन केले.

 

इस्लामच्या वाढीसाठी कारणीभूत इस्लामच्या वाढीच्या कारणांची चर्चा करताना ते म्हणतात की " इतरांना सामावून घेण्याची, वृत्ती विश्वव्यापक प्रेरणा, लोकशाही प्रणाली आणि इस्लामचा एकेश्वरवाद हे विचार अरबांच्या भौगोलिक परिस्थिती ने दिलेली देणगी आहे."(७५)

इस्लामच्या अनुयायांनी विजयानंतर रक्तपात व इतर धर्मियांचे धार्मिक अधिकार हिरावून घेतले व त्यांना धर्म स्वीकारला किंवा मृत्यु असे दोनच पर्याय ठेवून क्रुरतचे दर्शन दिले असे जे बोलले जाते व आजही समाजात हे विचार रुजले आहे व हे विचार खूप द्वेषाशाचे रूप धारण करते. परंतु वास्तविक असे नाही इस्लामच्या उदयाचा काळ आम्ही लक्षात घेतला असता तो काळ प्राचीन काळाचा शेवटचा भाग होतात लढाया होणे साहजिक आहे परंतु कशासाठी? व का? झाली यावर हे लक्ष देणे भाग असते.

 विजया नंतर पराभुतांना,शरणागतांना तुम्ही कोणती वागणूक देता यावरून शिकवणीचे सार लक्षात येते

 "जेरूसलम ने शरणागती पत्करल्यानंतर उमर खलिफाने पराभूत नगरवासयांची मालमत्ता पूर्ववत त्यांच्या ताब्यात दिली. त्यांना त्यांच्या उपासनेचे पूर्ण स्वातंत्र्य दिले"(८३)

 या उलट ख्रिश्चनांनी ताबा मिळवला त्यात त्यांनी कत्तल केली आहे

गिबन या जगप्रसिद्ध इतिहासकारांनी असे म्हणटले नाहीतर पुराव्यानिशी सिद्ध केले आहे की हजरत मोहम्मद पैगंबर(स) यांनी ख्रिश्चनांना व्यक्तिगत संरक्षण पुरवले होते. त्यांच्या व्यापाऱ्यांच्या संपत्तीचे संरक्षण केले त्यांना आपापल्या धर्मानुसार उपासना करण्याचे स्वातंत्र्य दिले होते.पैगंबरांचे आचरण व त्यांची शिकवण ही सबंध मानवजातीसाठी उपयुक्त होती व आहे तरी आज काल काही द्वेषपूर्ण आक्षेप घेऊन चरित्र मलीन करण्याचा प्रयत्न करीत आहेत.या प्रवृत्तिच्या लोकांना आपल्या लिखाणातून रॉय चांगलीच चपराक दिली आहे.


मी प्रेषितांना सर्वप्रथम सुधारक म्हणून पाहतो सामाजिक सुधारणेच्या दृष्टिकोनातून पाहता अशी कोणतीच कुप्रथा नाही ज्याचा विरोध केला नाही. विरोध दर्शवला नाही तर त्या प्रथेचे उच्चाटन केले. या यासंबंधी एक लेख वेगळा लिहावे लागेल. इस्लाम मध्ये केवळ धार्मिक शिकवणी नाहीं फक्त धार्मिक गोष्टींना महत्त्व दिले नसून इहलोकी व पारलौकिक जीवन यांचा अभ्यास करण्याचीही मुभा दिली आहे. आम्हाला इस्लाम मध्ये खगोलशास्त्रज्ञ व यावर चिंतन करणारेही निर्माण झाले याचा विसर आम्हाला पडू नये. आम्हा केवळ पारलौकिक स्वर्ग-नर्क धर्मग्रंथ याचाच अभ्यास करावा असे सांगत नाही. इस्लामी इहलौकीक व पारलौकिक या दोन्ही पातळीवर मानवी जीवनाची वाटचाल व्हावी असे सांगतो.इस्लामिक परंपरेत विद्वानांना व त्यांच्या विद्वत्तेला तोटा नाही. परंतु या प्रेरणा घेतल्या जात नाही आज धर्म व विज्ञान यापासून व्यक्ती दुरावला आहे. एकतर खुप अभिमान किंवा न्युंनगड आहे. 


 या जगात कुठेही जाऊन अभ्यास करावा या बुद्धीच्या व तर्काच्या आधारे निसर्गातील नवनवीन गोष्टींचा अभ्यास करावा. एकंदरीत तर्क,चिकित्सा या आधारे मानवी जीवन सफल बनवावे. प्रेषित सर्व प्रथम येथे शिक्षण घेण्यासाठी पुढे या म्हणतात. प्रेषितांनी सर्व प्रथम शिक्षणाचा संदेश दिला.

 "ग्रीकांच्या वैभवसंपन्न ज्ञानाचा वारसा अरबांनी चालवला आहे . "वैज्ञानिक संशोधनाचा पितामह रॉजर बेकन हा अरबांचा शिष्य होता, होमबॉल्ट मते अरब हेच भौतिकशास्त्राचे खरेखुरे संस्थापक होत."(११०)

इस्लामी परंपरेत तत्त्वज्ञानाची एक दीर्घ परंपरा होती. अलकाजी,अलहसन,अवेसीना,अलफराबी, अबुबकर,अलगजाली असे शेकडो नावे सांगता येतील हे तत्त्ववेते बुद्धीप्रमाण्यावादी होते त्यांनी इस्लामी परंपरेत महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आहे. इस्लामिक परंपरेत ज्ञानाच्या सर्व कक्षा खुल्या होत्या. विद्वानांना महत्त्व प्राप्त होते विद्वानांचे ही धर्म कधी विचारले जात नसेत. "मायदेशातून पलायन करून आश्रयासाठी भटकणाऱ्या     

परकीय ग्रीक विद्वानां बगदादच्या खलिफाने स्वीकार केले. त्यांच्या अश्रद्ध ज्ञानाने आणि प्रतिभेने खलिफा इतका प्रभावित झाला होता.की त्याने ना कुरान पर्याय ठेवला ना तलवारीचा. त्यांने केवळ संरक्षण नाही तर विद्वत्तेची कदर केली त्याशिवाय अनेक विद्वानांचे तत्वज्ञान अरबी भाषेत भाषांतरीत केले. बहुतांश विद्वान नास्तिक होते तरीपण त्यांनी आपला धर्म लादला नाही."( ११२)

"आधुनिक युरोपने अरबांकडून वैद्यक शास्त्र व गणिताचे ज्ञान तर घेतले सोबत निसर्गाचे ज्ञान नियम उलगडून दाखवणारे व मनुष्याची दृष्टी विशाल बनवणारे खगोलशास्त्राचे ज्ञान ही उत्साहाने निर्माण केले होते"(११९)


  गणितीय सिद्धांतांना जे मोल प्राप्त झाले त्याचे स्त्रोत अरबस्तान होते परंतु अरबांनी स्वतः होऊन त्याचे श्रेय विनम्रतापूर्वक ग्रीक तत्त्ववेताना दिले. इस्लामी परंपरेचे इतिहासात एक महत्त्वपूर्ण योगदान राहिलेले काळाच्या ओघात मुस्लिम समाजला याचा विसर पडला आहे।


---संदर्भ _इस्लामचे ऐतिहासिक योगदान

लेखक:कॉम्रेड एम.एन रॉय 

अनुवाद:प्रा.सुभाष भिंगे

    

प्रेषितांची शिकवण यावर उद्या एक दिर्घ लेख किंवा दोन लेख पोस्ट करेन आपल्या काहि सुचना असल्या कमेंट करा किंवा खालील नंबर वर फोन करा. नक्कीच विचार करेन.


©समाज साथी

Najir Shaikh         

Nanded

9561991736

आपण व पोलीसांची भूमिका - We and Police...

गिधाडे...

भूक भूक भूक -Humger Hunger...

शेख सरांचे रुपात मला विठ्ठलाचे दर्शन झाले. - संदीप दंडवते Oxygen shortage...

आम्ही भारताचे लोक We the people of India

 

              आपल्या स्वातंत्र्य चळवळीच्या काळात अनेक लहान मोठे प्रश्न निर्माण झाले हा झगडा विशिष्ट मूलयासाठीच होता केवळ इंग्रज देशाबाहेर घालविण्यासाठी चे नाही हे आपल्या ध्यानात आले ही मूल्ये समाजाच्या सर्व अंगांना (सामाजिक. आर्थिक. राजकीय ) स्पर्श करणारी होती त्याचा लाभ समाजातील सर्व. हिंदू. अनुसूचित जाती जमाती भटक्या विमुक्त जाती व नवबौद्ध अशा सर्व घटकांना होणार होता यासाठी त्यांना आपण आदर्श रुप मानले ती मूल्य आपल्या कृतीत उतरविण्याची गरज आणि संकल्प करणे आज गरजेचे आहे या सर्वांचा शब्दबध्द आविष्कार म्हणजे घटनेचा सरनामा यातून जसे आपल्या स्वातंत्र्य चळवळीचे मर्म आपणास समजते तसे आपल्या घटनेने पुढील वाटचालीसाठी कोणती दिशा राजकारणास घालून दिली आहे हे सुद्धा दिसून येते यासाठी जरी सरनामा हा न्यायालयीन बजावणी योग्य भाग नसला तरी तो महत्वाचा आहे घटनेतील तरतुदीचा नेमका अर्थ त्याचा संदर्भ लावता येतो

              घटना समिती स्थापन झाले नंतर सर्वात प्रथम ही घटना कशासाठी. ? तिची उद्दिष्टे कोणती ? यासंबंधीचा ठराव २२/ जानेवारी १९४७ रोजी करण्यात आला तो ठराव त्यावेळचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंनी समितीत मांडला होता त्या ठरावातील अनेक भाग शब्दशः सरनामयात समाविष्ट झालेले दिसतात घटनेच्या सरनामयासाठी. " घटनेची प्रसताविका " असा शब्द प्रयोग केला जातो 

           भारताचे संविधान

            प्रसताविका

आम्ही भारताचे लोक. भारताचे एक सार्वभौम

समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य

घडविण्याच्या व त्याच्या सर्व नागरिकांस

सामाजिक. आर्थिक. व राजनैतिक न्याय. विचार. अभिव्यक्ती. विश्वास. श्रध्दा ‌

     व उपासना याचे स्वातंत्र्य

    दर्जाची व संधीची समानता

निश्चित पणे प्राप्त करुन देण्याचा

आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तिची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचें आश्वासन देणारी बंधुता. प्रवरधित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून

आमच्या संविधान सभेत

आज दि २३/ नोव्हेंबर १९४९ रोजी यानुसार हे संविधान अंगिकृत आणि अधिनियमात करून स्वतःता प्रत अर्पण करण्यात आले 

                भारताची राज्यघटना भारताच्या लोकांनी स्वतासाठी केलेलीं आहे आपली घटना ही देशातील लोकांच्या व्यक्त इच्छेनुसार व्हावी ही कल्पना १९२२ मध्ये काही नेत्यांनी बोलून दाखवली राजयप्रशासनाची चौकट कशी असावी हे ठरविण्यासाठी इंग्रजांनी सायमन कमिशन नेमले होते त्यासाठी इंग्लंड मध्ये गोलमेज परिषद भरवण्यात आली त्यातील चर्चेच्या आधारे इंग्लंडच्या संसदेने १९३५ मध्ये घटनात्मक कायदा तयार केला परंतु हे सर्व आपल्या चळवळीच्या मूलतत्त्वाला धरून नव्हता आपली घटना ही पौढ मतदार पध्दतीनुसार निवडलेल्या प्रतिनिधी कडून मुक्तपणे केलेलीं असावी आपल्या फैजापूर. त्रिपुरी. व हरीपुरा. येथील अधिवेशनात याचा पुनरुच्चार करण्यात आला अनेक प्रांतिक कायदे मंडळानी व मध्यवर्ती कायदे मंडळाचे त्यास दुजोरा दिला या आग्राहास क्रिपस योजनेत १९४२ प्रथम इंग्रजांनी मान्यता दिली त्यासंबंधी तपशीलवार योजना कॅबिनेट मिशन अहवालात मांडली गेली त्यानुसार. १९४६ मध्ये घटना समितीच्या सदस्यांनी निवड कायदे मंडळाकडून झाली कोणतीही घटना स्वीकारण्याची सक्ती आपण भारतावर करणारं नाही हे इंग्लंडच्या सरकारने स्पष्ट केले १९४६ मध्ये त्यामुळे मुस्लिम लीगचे सदस्य नाराज झाले त्यांनी घटना कामकाजावर बहिष्कार टाकला नंतर देशांची फाळणी करण्याचे ठरले तेव्हा घटना समितीचे विभाजन झाले भारताच्या वाट्याला आलेल्या भौगोलिक परदेशातून निवडून आलेल्या व त्यात सामील झालेल्या संस्थानाच्या प्रतिनीधीची ही सभा झाली अशा या घटना समितीने आपलीं घटना तयार केली

              अनेकदा असा प्रश्न पडतो की ज्याच्या नावे घटना उदघोषित केलेली आहे ते. " आम्ही भारतीय लोक "म्हणजे नेमके कोण ? हेच शब्द का वापरले जात आहेत ? त्याचे एक कारण असे सांगता येईल की स्वातंत्र्याचा लढा हा प्रामुख्याने इंग्रजी अंमलाखालील प्रांतांत लढला गेला घटना समितीत संस्थानातील प्रतिनिधी नव्हते. जे होते ते संस्थानिकांनी नियुक्ती केलेलें होते असे असले तरी या घटने मागील शक्ति आणि ती घडविण्याचे श्रेय प्रांतातील व संस्थानातील सामान्य लोकांचे आहे संस्थानिकांचे व मुठभर नेत्यांचे नाही. हे त्यातून ध्वनित होते. दुसरे म्हणजे चळवळीच्या काळात मुसलमान. शीख. दलित. ब्राम्हण. अशा लोकसमुहाचया प्रत्येकाच्या हितासाठी लढणारया विविध संघटना एका बाजूला व सर्वच जनतेचे प्रतिनिधित्व करण्याचा दावा सांगणारे नेते दुसर्या बाजूला असा एकच संवाद सतत चाललेला आपणास दिसतो. भारतीय घटना ही देशभरातील सर्वच लोकांचे एकत्रित हित पाहणारी त्यांच्यातील भारतीयत्वाचा समान धागा पकडणारी व्यवस्था आहे असे आपणास जाणवतो प्रत्त्येक समुहाला स्वतंत्र स्थान देणारी व्यवस्था नाही लोकांसाठीचा वापरलेला इंग्रजी शब्द एकवचनी आहे बहुवचनी नाही लोक. या शब्दाने वेगवेगळ्या भाषिक. वांशिक. राष्ट्राचे लोक असा अर्थ नसून एकात्म राष्ट्र होऊ पाहणारे सर्वच भारतीय असा होतो

              इतिहासाकडे वळून पाहिले असता आपल्या लक्षात येते की आपल्या स्वातंत्र्य लढ्यासाठी या सर्व उद्दिष्टाने बांधलेला होता परंतु चळवळीच्या काळात यातील काही उद्दिष्टे सर्वानुमते ठरली आहेत तर काहींच्या बाबतीत संदिग्धता होती निदान एकवाक्यता तरी नव्हती स्वातंत्र्य चळवळीच्या सुरवातीला जरी ब्रिटिश साम्राज्य अंतर्गत वसाहतींचे स्वराज्य मिळविणे एकढेच उद्दिष्टे समोर ठेवले असते तर १९३० संपूर्ण स्वराज्य मिळविणे हे उद्दिष्ट बनले असते १९४७ नंतर भारताने राष्ट्रकुलात राहण्याचे स्विकारले कारण राष्ट्रकुलाचे स्वरूप तो पर्यंत बदललेले होते

              आज आपण लोकशाही राज्यात आहोत का असा प्रश्न पडतो कारणं. आपल्या जनमताचा. कोणीही विचार करत नाही खेडेगावापासून आपण बघतो पूर्वी पारावर. पंचायत व्हायची. एखादा मुद्दा मग तो यात्रा. रोगराई. संबंधित सर्व लोकांचा विचार जनमत घेवूनच एकादा जनहिताचा निर्णय घेतला जात असतो त्यावेळी कोणताही आदेश शासन निर्णय नव्हता नंतर तालुक्याच्या ठिकाणी तहसिलदार प्रांत. गटविकास अधिकारी. मंडल अधिकारी. नगरपालिका महानगरपालिका यांचे आयुक्त नगरसेवक. नेते. मंत्री व त्यांचे हितचिंतक. असे रात्री बारा वाजता एकदा निर्णय घेतात आणि एका सहिने गाव तालुका जाग्यावर थांबतो आत्ता जिल्हा खाली चाललेला आढावा घेऊन जिल्हा अधिकारी निर्णय घेतात अमुक कारणांमुळे जनजीवीतास धोका आहे म्हणून या तारखे पासून या तारखे पर्यंत जिल्हा बंद जमाव बंदी. संचार बंदी. टाळेबंदी असे विविध निर्बंध लावले जातात आमची तुम्हाला काळजी आहे हे आम्हाला पटते पण फक्त एका जिल्ह्यचा विचार केला तर त्या जिल्ह्याला असणारे तालुके व त्या तालुक्यात असणारी खेडेगावे त्यात असणार्या ग्रामपंचायती यांचेकडून एखाद्या तरी मुद्द्यांबाबत पत्र केला जातो का. यांचेकडून जनमत मागितले जात नाही ? एखादा वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी यांचेकडून घेण्यात आलेला निर्णय आणि त्याबद्दल सर्वसामान्य जनता यांचा विचार म्हणजे जनमत घ्यावे तुम्ही जारी केलेला निर्णय योग्य आहे किंवा नाही त्यापासून काय फायदा व तोटा होणार हे कळण्यासाठी जनमत घेणे गरजेचे आहे 

            आज कोणीही जनमत घेत नाही मनात आले की गाव तालुका जिल्हा एका सहिने बंद आणि आपण लोकशाही राज्यात आहोत

    समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार जाहिरात प्रसिद्ध वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

नागरिकांची सनद .- Citizen's charter....

सर्व खासगी रुग्णालयात महात्मा फुले योजना अंतर्गत मोफत उपचार करण्याचे आदेश द्या - डॉ परवेज अशरफी AIMIM Ahmednagar...

कलम १४४ व राजकीय कार्यावरील निर्बंध - Section 144...

आपण व पोलीसांची भूमिका - We and Police...

नागरिकांची सनद .- Citizen's charter


 


 शासन परिपत्रक सामान्य प्रशासन विभाग क्र - 1019/ प्र क्र 39/99/18 अ.

      दि- 08/03/2000 अन्वये नागरिकांची सनद अंमलात आणली व त्यासाठी शासन आदेश निर्गमित केले.

    सनद भाग 6 प्रमाणे कामगार आयुक्त कार्यालय यांचेकडे एकूण 24/कामगार कायदे प्रशासन व कार्य अन्वये सुपूर्द केलेले आहेत . या 24 पैकी 19 कायदे कामगार कायदे असुन उर्वरित 6. कायदे हे राज्य कामगार कायदे आहेत . केंद्रीय कामगार कायदे व राज्य कामगार कायदे पुढिल प्रमाणे आहेत .


    * कामगार आयुक्त महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे आधिपत्याखाली पुढील प्रमाणे विविध कामगार कायद्याचे प्रशासन अंमलबजावणी करण्यात येते.


    * केंद्रीय कायदे *

1) औधोगिक विवाद अधिनियम 1947 .


2 ) बोनस प्रदान अधिनियम 1965.


3 ) कंत्राटी कामगार अधिनियम व निर्मुलन अधिनियम 1970 .


4 ) किमान वेतन अधिनियम 1948 .


5 ) मोटार परिवहन कामगार अधिनियम 1961.


6 ) वेतन प्रदान अधिनियम 1936.


7 )बिडी व सिगारेट कामगार नोकरी विषयक अटि अधिनियम 1966 .


8 )श्रमिक पत्रकार आणि पत्रकारेतर सेवाशर्ती संकीर्ण अधिनियम 1955.


9 )औधोगिक सेवायोजना स्थायी आदेश अधिनियम 1946.


10 ) सांख्यिकी संकलन अधिनियम 1953.


11 ) श्रमिक संघ अधिनियम 1926.


12 ) प्रसुती लाभ अधिनियम 1961.


13 ) समान वेतन अधिनियम 1976.


14 ) वेठबिगार पध्दत निर्मुलन अधिनियम 1976.


15 ) विक्री संवर्धन कामगार सेवाशर्ती अधिनियम 1976.


16 ) उपदान प्रदान अधिनियम 1972.


17 ) आंतरराष्ट्रीय स्थलांतरित कामगार रोजगार नियमन आणि सेवाशर्ती अधिनियम 1979 .


18 ) बाल मजुरी प्रतिबंध व नियमन अधिनियम 1986 .


19 ) इमारत व इतर बांधकाम कामगार रोजगार व सेवाशर्ती नियम अधिनियम 1996.


      

       * राज्य कामगार कायदे*

1) मुंबई औधोगिक संबंध अधिनियम 1946.


2) मुंबई दुकाने व संस्था अधिनियम 1948.


3) महाराष्ट्र माथाडी हमाल व इतर श्रमजीवी कामगार नोकरीचे नियमन व कल्याण अधिनियम 1969.


4) महाराष्ट्र कामगार संघटना मान्यता आणि कामगार अनुचित प्रथा प्रतिबंध आधीनियम 1979.


5) महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक नोकरीचे नियमन व कल्याण अधिनियम 1981.


6) महाराष्ट्र कामगार किमान घरभाडे भत्ता अधिनियम 1983.


            वरिल प्रमाणे कामगार हितासाठी शासनाने विविध कामगार कायद्याचे नियोजन केले आहे . त्यातच सर्वात महत्त्वाचा कायदा म्हणजे कामगारांचे कामांवर काम करत असताना होणारे अपघात व त्यात कामगारांना अपंगत्व, अन्यथा मृत्यू , ओढवलयास कामगाराचै सर्व कुटुंब निराधार होते. त्यासाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई यांचे कडून, राबविण्यात येणाऱ्या 19 योजना आहेत . त्यात प्रामुख्याने योजना क्र - 12 नुसार नोंदीत बांधकाम कामगार कामांवर असताना मृत्यू झाल्यास, मंडळाकडून कायदेशीर वारसाला 5 लाख एवढे अर्थ साहाय्य कल्याणकारी मंडळाकडून देण्यात येते . परंतु हा लाभ मिळवण्यासाठी बांधकाम कामगार मंडळाकडे नोंदणी असणे गरजेचे आहे . कामगार एक वर्षी कोणताही लाभ न मिळाल्यास नोंदणी व नुतनीकरण करत नाहीत . त्यामुळे त्यांची कल्याणकारी मंडळाची नोंदणी रद्द होते .

      त्यानुसार त्यांना कोणताही लाभ मिळत नाही . मग अपघात झाला की मंडळाला दोषी ठरवले जाते . कामगारांना कळकळीची विनंती आहे , लाभ मिळो अथवा न मिळो पण नोंदणी व नुतनीकरण करणे गरजेचे आहे . त्याच बरोबर कामगारांना काम करत असताना सुरक्षा मिळावी म्हणून मंडळाकडून सुरक्षा संच व अति सुरक्षा संच दिले जातात . त्यामध्ये सुरक्षा जॅकेट , सुरक्षा बेल्ट , बॅटरी , बुट, सतरंजी , डबा , हेल्मेट, या वस्तू दिल्या जातात . अपघात झाल्यास कामगारांच्या अंगावर हेल्मेट सुरक्षा जॅकेट , सुरक्षा बेल्ट , पायात बुट , अशी सुरक्षेसाठी मंडळाकडून देण्यात आलेल्या साधनांचा वापर केला नसेल , आणि अपघात झाला. तर योजना क्र - 12 चा असणारा 5 लाखाचा अपघाती विमा कामगाराला मिळणार नाही . याची कामगारांनी दखल घ्यावी .           

       सोबत पोलिस केस , पोलिस पंचनामा , P.M. रिपोर्ट , असणे गरजेचे आहे . P.M. रिपोर्ट मध्ये अल्कोहोल आढळल्यास विमा लाभ दिला जात नाही . त्यामुळे दारु पिऊन कामांवर जाऊ नका , शक्य असेलतर व्यसन सोडा , 

बाकी माहिती उद्या .


   बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

संस्थापक अध्यक्ष :- अहमद मुंडे

9890825859

त्या विवस्र अवस्थेत फिरणा-या मातेला मानवसेवेचा आधार - manav seva...

सरकारने पत्रकारांना तातडीने फ्रंट लाईन वर्करचा दर्जा दयावा - हाजी इर्शादभाई....

सर्व खासगी रुग्णालयात महात्मा फुले योजना अंतर्गत मोफत उपचार करण्याचे आदेश द्या - डॉ परवेज अशरफी AIMIM Ahmednagar...

आपण व पोलीसांची भूमिका - We and Police...

सरकारने पत्रकारांना तातडीने फ्रंट लाईन वर्करचा दर्जा दयावा - हाजी इर्शादभाई


 

          महाराष्ट्र सरकारने राज्यातील सर्वच पत्रकारांना फ्रंट लाईन वर्कर चा दर्जा देऊन तातडीने त्यांचे लसीकरण करून घेऊन कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर त्यांना पन्नास लाख रूपयांचे विमा संरक्षण देण्यात यावे अशी मागणी अखिल भारतीय पत्रकार सुरक्षा समिती चे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष हाजी इर्शादभाई यांनी महाराष्ट्र शासनाकडे केली आहे. 

         गेल्या वर्षभरापासुन अतिशय प्रतिकूल परिस्थितीत असताना देखील पोलीस, डॉक्टर, प्रशासन व सर्व अत्यावश्यक सेवेतील घटकां बरोबरीने स्वतःच्या व परिवाराच्या जिवाची पर्वा न करता पत्रकार बांधव सरकारला दिशा दाखविण्याचे व जनतेला जाग्रुत करण्याचे महत्वाचे काम करीत असतात.अशी माहिती हाजी इर्शादभाई यांनी दिली. 

            महाराष्ट्र सरकारने तमिलनाडु, ओडिशा, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश या राज्यां प्रमाणे महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा माहिती अधिकारी यांच्या कडे नोंद असलेल्या सर्वच वृत्तपत्र, वृत्तवाहिन्यांच्या व डिजिटल मीडियात काम करणाऱ्या पत्रकारांना तातडीने फ्रंट लाईन वर्कर्स चा दर्जा देवून त्यांचे लसीकरण करून त्यांना पन्नास लाख रूपयांचा विमा संरक्षण देण्यात यावे अशी मागणी हाजी इर्शादभाई यांनी महाराष्ट्र सरकार कडे केली आहे.

सरकारने पत्रकारांना तातडीने फ्रंट लाईन वर्करचा दर्जा दयावा - हाजी इर्शादभाई...

सर्व खासगी रुग्णालयात महात्मा फुले योजना अंतर्गत मोफत उपचार करण्याचे आदेश द्या - डॉ परवेज अशरफी AIMIM Ahmednagar...

कलम १४४ व राजकीय कार्यावरील निर्बंध - Section 144..

.

त्या विवस्र अवस्थेत फिरणा-या मातेला मानवसेवेचा आधार - manav seva...

सर्व खासगी रुग्णालयात महात्मा फुले योजना अंतर्गत मोफत उपचार करण्याचे आदेश द्या - डॉ परवेज अशरफी AIMIM Ahmednagar


अहमदनगर - भारताची, विशेषता महाराष्ट्राची परीस्तीती खूप गंभीर होत चालली असून कोरोना ने आपल्या राज्यात इतका थैमान घातले आहे की जवळ जवळ प्रत्यक कुटुंबातील कोणी ना कोणी कोरोनाच्या संसर्गाने आजारी तरी आहे. काहींना आपल्या जिवलग व्यक्ती सोडून गेलेत. आपल्या राज्यत असे कोणी नसेल ज्याचे नातेवाईक पैकी कोणी कोरोना ने आजारी नाहीत. मागील वर्षीचा कोरोना विषाणू आणी आजचा कोरोना विशानुत खूप फरक आहे. सध्याचा विषाणू हा खूपच भयंकर आहे. रुग्णाला अचानक श्वास घेण्याचे त्रास होऊन आजार वाढत आहे. त्यामुळे रुग्णाला तातडीने रुग्णालयात हलवणे व लवकरात लवकर उपचार करण्यासाठी प्रयत्न करावे लागते. पूर्ण जगासह भारताने मागील वर्षी लॉकडाऊनची घोषणा करून सामान्य जनतेला घरी राहण्याचे आव्हान केले. तेव्हा पासून सामान्य जनतेची आर्थिक परीस्तीती खूप बिकट आहे. महाराष्ट्र राज्यात कोरोना रुग्ण झपाट्याने वाढत असल्याने पूर्ण महाराष्ट्रत परत लॉकडाऊन करण्यात आले. सध्या सामान्य जनतेची आर्थिक परीस्तीत खूप खालावली आहे. त्यात कोरोनाने आजारी रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्या अगोदर पैसे भरण्यास भाग पाढले जात आहे . खासगी रुग्णालय शासनाच्या नियमाप्रमाणे शुल्क आकारत नाही. विचारणा केली असता तुम्हाला बेड व सर्व सुविधा दिली हेच तुमच्या साठी खूप आहे, बिल दिले ते भरून जावे.

लॉकडाऊन मुळे सामान्य जनता आर्थिक खूप मागासली असून त्यांचे उपचार होणे खूप गरजेचे आहे. ज्यांचे कडे लाखो रुपये भरण्यास नाही ते घराबाहेर पढण्यास तयार नाही, कारण पैसे आणणार कुठून. आपल्या कडे आहे ती पुंजी लॉकडाऊन  मध्ये संपली आहे किंवा संपायला आली. त्यात रुनालायाचे खर्च कसे झेपणार. या सर्व बाबींचा एकच अर्थ निघतो की सामान्य जनतेकडे सध्या स्वताच्या उपचारासाठी पैसे नाहीत. जे उपचार करीत असतील एक तर आपले सर्व काही विकून किंवा कर्ज घेऊन करीत असतील असे एम आय एम जिल्हा अध्यक्ष डॉ परवेज अशरफी यांनी मुख्यमंत्री यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.


निवेदनात पुढे विनंती केली आहे की जर महाराष्ट्र सरकारने सर्व खासगी रुग्णालयाला महात्मा जोतीबा फुले योजनेत तातडीने समाविष्ट करून त्यांना प्रत्यक रुग्णाला योजने अंतर्गत उपचार करण्याचे आदेश दिलेतर महाराष्ट्रातील सर्व जनतेला योग्य आणी मोफत उपचार मिळेल.जी जनता पैसे नसल्याने घरात बसून आहे त्यांना पण उपचार घेण्याची संधी मिळेल. आणी सर्वात मोठी गोष्ट की  रुग्णालयात दाखल झाल्यानंतर नागरिक हा विचार करणार नाही की त्याच्याकडे पैसे आहे कि नाही तो फक्त महाराष्ट्र सरकारचा जय जय कार करीत रुग्नालयात दाखल होऊन उपचार घेऊन घरी येईल.खासगी रुग्णालय ही सरकार कडून पैसे येत असल्याने समाधानी होऊन रुग्णाचे उपचार करतील.असे निवेदणाचे पत्र एम आय एम तर्फे मुख्य मंत्री यांना देण्यात आले आहे. त्यात एम आय एम जिल्हा अध्यक्ष डॉ परवेज अशरफी,जिल्हा महासचीव जावेद शेख,मुफ्ती अल्ताफ,असिफ सुलतान,विध्यार्थी जिल्हा अध्यक्ष शहनवाज तांबोळी,युवा शहर अध्यक्ष अमीर खान,ऑल इंडिया युथ फेडरेशन शहर अध्यक्ष फिरोज शेख,शहेबाज शेख,सलमान खान,आरिफ सय्यद आदी. सह्या आहेत.

अहमदनगर येथील ऑक्सिजन प्लांटला लिक्वीड पुरवण्यासाठी एम आय एम चे मुख्य मंत्रीना पत्र - डॉ परवेज अशरफी AIMIM Ahmednagar...

त्या विवस्र अवस्थेत फिरणा-या मातेला मानवसेवेचा आधार - manav seva....

गिधाडे...

शेख सरांचे रुपात मला विठ्ठलाचे दर्शन झाले. - संदीप दंडवते Oxygen shortage....

सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा

  सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा            अनुसूचित जाती जमाती. इतर मागासवर्गीय जाती जमाती. भटक्या विमुक्त...

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या