Showing posts with label भारत. Show all posts
Showing posts with label भारत. Show all posts

भविष्यात काय होणार ? लोकशाही टिकणार का ?



भविष्यात काय होणार ?
लोकशाही टिकणार का ?

             भारतीय लोकशाहीला आजपर्यंत ७३ वर्षांचा इतिहास आहे. दुसर्या महायुद्धानंतर इंग्लंडचे जगभरातील साम्राज्य लयाला गेले. आपल्यातील आशिया खंडातील भारत हा ब्रिटिश साम्राज्याचा सर्वात मोठा हिस्सा होता. भारतीयांना ब्रिटिश राजवटीत लोकशाही विचारसरणी ओळख झाली. ब्रिटिश खिळखिळे होण्यापूर्वीच म्हणजेच १९३० सालीच लाहोर काँग्रेसने भारतात प्रजासत्ताक लोकशाहीचा प्रयोग राबवायचा हे निश्चित केले. राष्ट्रीय सभेच्या बहुतेक नाही नेत्यांनी हया भूमिकेचा पुरस्कार केला. त्यानुसार देश स्वतंत्र होतांच लोकशाही व्यवस्थेचा प्रयोग सुरू झाला. १९५० मध्ये देशांचा कारभार राज्यघटनेनुसार सुरू झाला. १९५० चे आसपास जे देश स्वातंत्र्य झाले त्यांनीही लोकशाही व्यवस्थेचा प्रयोग स्विकारला. ही राष्ट्रे तिस-या जगातील अविकसित किंवा विकसनशील राष्ट्रे म्हणून ओळखली जातात. त्यात प्रामुख्याने पाकिस्तान. बांगलादेश. श्रीलंका. इराण. इराक. ब्रम्हदेश. इत्यादी राष्ट्राचा समावेश आहे. 

          प्रभावशाली नेते राष्ट्रीय पातळीवरच्या पूरक नेतृत्व म्हणजे प्रादेशिक किंवा राज्य स्तराचे नेतृत्व होय. स्वातंत्र्य नंतर आपल्या राजकीय प्रक्रियेत प्रादेशिक नेत्यांचा उल्लेख करता येईल. त्यात प्रामुख्याने डॉ बाबासाहेब आंबेडकर. महात्मा ज्योतिबा फुले. छत्रपती शाहू महाराज. सावित्रीबाई फुले. फातिमा शेख. मौलाना आझाद. सरदार वल्लभभाई पटेल. ज्योती बसू. वसंतदादा पाटील. वसंतराव नाईक. बिजू पटनाईक. मोहनलाल सुखडिया. माधवराव सोळंकी. चिमनभाई पटेल. करूणाकरण. एन टी रामाराव. रामकृष्ण हेगडे. नारायण दत्त तिवारी. डॉ जगन्नाथ मिश्रा. डॉ चेनना रेड्डी. विजय भास्कर. डॉ प्रकाशसिंह बादल. सुरजितसिंग बर्नाला. शेख अब्दुल्ला. डॉ फारूख अब्दुल्ला. इत्यादी नेत्यांचा समावेश करतां येईल. प्रादेशिक नेतृत्वामधये दोन उपसतर करता येतील. एक म्हणजे प्रादेशिक असमितेतून उभारलेले नेतृत्व व दुसरे म्हणजे राजयसतरावरून राष्ट्रीय स्तरावर उभारून आलेले नेतृत्व एम जी रामचंद्रन रामा राव बाळासाहेब ठाकरे. इत्यादी नेत्यांचा समावेश करतां येईल. राज्यस्तरावरून राष्ट्रीय स्तरावर उभारून आलेल्या नेतृत्वाला. नीलम संजीव रेड्डी. यशवंतराव चव्हाण. ह्यांसारख्या नेत्यांचा उल्लेख प्रामुख्याने करता येईल. 

        राष्ट्रांमधील लोकशाही व्यवस्था व आपल्या देशातील लोकशाही व्यवस्था ह्याची तुलना करतां आपली लोकशाही व्यवस्था पुष्कळच यशस्वीपणे चालू आहे. आपली लोकशाही जिवंत आहे हे स्पष्ट होईल. पाकिस्तान मध्ये लोकशाहीचा खुन लष्करशाही मुळे झाला. तेथे अधूनमधून लषकाराचे खेळणे म्हणून लोकशाही येते. १९७१ मध्ये स्वतंत्र झालेल्या बांगला देशात आत्ता पर्यंत तीन चार लष्करी राजवटी झाल्या. श्रीलंकेत अध्यक्षीय राजवट आहे. परंतु तेथेही लष्कराच्या बळावरच लोकशाही प्रयोग चालू केला आहे. ब्रह्मदेशात तर लष्कराने १९६१ मध्ये सत्ता मिळविली व बंदुकीच्या धाकावर राज्य चालवून त्याला लोकशाही राज्य म्हणून घोषित केले. ह्या पार्श्वभूमीवर भारतातील विविधता धर्म. जाती. वंश. वर्ण. प्रादेशिक विलगता. सांस्कृतिक भिननता. हे विचार घेऊन आपल्या लोकशाही व्यवस्थेविषयी विचार करण्यात आला आहे. सर्व थरात प्रचंड भिननता असूनही आपल्या लोकशाही राजवटीचा प्रयोग चालू आहे. पण मतदार जागृक नाही. पैसा हे मतांचे भांडवल आहे. गुंडगिरी बेकायदा. मतांसाठी दहशतवादी वातावरण. साम दाम दंड भेद या तत्वाचा वापर नेते निवडून येण्यासाठी करताना आपल्या लोकशाही प्रक्रियेत करताना दिसत आहेत. आणि वेगळा विषय म्हणजे काही काही पक्ष नेते लोकप्रियते लाटेवर वरून निवडून येताना दिसत आहेत. आणि लाट ओसरल्यावर वाहत जातात. हे खरं असले तरी आत्तापर्यंत भारतीय मतदारांनी दोन वेळा आपली जागृकता दर्शवली आहे. आणीबाणी विरुद्ध मतदान करून संपूर्ण जगाला आश्चर्याचा धक्का दिला आहे. हे सर्व विचारात घेता आपल्या लोकशाहीचा प्रयोग पुष्कळ यशस्वीपणे चालू आहे असे आपणांस फक्त वाटतें. लोकशाही यशस्वीपणे हे समाधान पाश्चिमात्य देशांमधील राज्यांशी तुलना करतां कमी वाटण्याची शक्यता आहे. ह्याचे कारण प्रगत लोकशाही देश व अविकसित लोकशाही देश ह्यांच्यात सर्वच बाबतीत प्रचंड भिन्नता आहे. प्रगत लोकशाही देशात लोकशाहीची प्रयोग गेली अनेक शतकं चालू आहे. त्यांना ह्या परंपरेचा प्रदीर्घ वारसा आहे. तेथील मतदार बहुतांश प्रमाणात शिक्षित व जागरूक आहे. त्यामुळे भारतासारख्या विकसनशील राष्ट्रांतील लोकशाहीचा प्रयोग व प्रगत राष्ट्रांतील लोकशाहीचा प्रयोग ह्याची तुलना करता हे समाधान कमी करण्याची शक्यता आहे. तरीही आज प्रगत लोकशाही देशापुढे आव्हाने उभी नाहीत असं नाही त्यांच्यापुढे दहशतवाद मूल्यांची घसरण भ्रष्टाचार. समाजाचे गुन्हेगारी. चारित्र्याचा आभाव इत्यादी प्रश्न आज आ वासून उभे आहेत.  

          राजकीय प्रक्रियेचे मूल्यमापन करीत असताना आपल्या लोकशाही व्यवस्थेला कोणत्या घटकांमुळे ग्रहण लागले आहे ह्याचा विचार आपण कधी केला आहे का आणि त्यामुळे आपली लोकशाही व्यवस्था पूर्णपणे पोखरली गेली आहे आज आपल्याला आपले मत मांडण्याचा अधिकार असेल पण त्यांच्यासाठी न्याय मागण्याचा आणि तो मिळेल याची खात्री नाही. शासकीय निमशासकीय कार्यालयात आपण दाखल केलेल्या कोणत्याही पत्राची लेखी पोच लेखाजोखा कोणी देत नाही तशी तरतूद सुध्दा आहे पण लोकशाही राज्यात आपल्या मताला शासनाच्या आदेशाला कोणतेही महत्व नाही. नागरि अन्न पुरवठा विभाग यामधून गोरगरीब जनतेला स्वस्त दरात धान्य उपलब्ध व्हावे यासाठी. शासनाने स्वस्त धान्य दुकान ही संकल्पना अमलात आणली पण आज पुरवठा विभागातील अधिकारी व कर्मचारी यांना हाताला धरून हेच जनतेला लुटत आहेत लोकशाही कुठ आहे ? रेशन दुकान वितरण प्रणाली विविध माध्यमातून केली जाते पण रेशन दुकान मिळविण्यासाठी गोरगरीब चालत नाही. अन्न धान्य रेशन दुकानात वितरण करण्यासाठी वाहन पुरवठा विभाग अधिकारी व कर्मचारी यांच्या सगेसोयरे यांचेच आहेत. रेशन दुकान एकच एका व्यक्तीला देणे बंधनकारक आहे पण आज एकाच्या नावावर चार चार दुकान आहेत आम्ही बांधकाम कामगार यांच्यासाठी रेशन दुकान मागितलं तर अजून रेशन दुकान साठी निविदा नाही. निविदा कधी निघाली माहिती नाही रेशन दुकान वितरण कधी झाल माहिती नाही मग लोकशाही कुठ आहे ? बॅंकेत गोरगरीब जनतेला स्वयंरोजगार करण्यासाठी कर्ज नाही पण नेते पुढारी आमदार खासदार मंत्री यांना कोट्यवधी कर्ज दिलं जात त्यांची वसुली नाही मग लोकशाही आहे का? अनुसूचित जाती जमाती व भटक्या विमुक्त जाती व इतर मागासवर्गीय जमाती यांच्या मतांवर निवडून येणारा नेता लोकशाही भाषणांत बोलतो पण मदत करत नाही मग लोकशाही आहे का ? दवाखान्यात लुट दवाखाने नेत्यांचे. 

          ज्या दिवशी प्रशासन राजकारणी यांची गुलामी करणे सोडील त्यादिवशी लोकशाही अमलात येईल अस मला वाटत ? 

            समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

चाळीस वर्षांचा आढावा

 

चाळीस वर्षांचा आढावा

                    देशात गेली चाळीस वर्षे लोकशाहीचा प्रयोग चालू केला आहे. देशात १९५२ पासून दहा सार्वत्रिक निवडणुका झाल्या स्वातंत्र्यानंतर पहिली सतरा वर्षे देशांची धुरा पंडित नेहरू यांनी समर्थपणे सांभाळली. त्यांच्या काळात देशाच्या आधुनिक विकासाचा पाया घातला गेला.  पहिल्या तीन पंचवार्षिक योजना त्यांच्याच काळात तयार झाल्या व त्या राबविल्या गेल्या. देशात अनेक योजना बहुउद्देशीय प्रकल्प सुरू झाले. विज्ञान तंत्रज्ञान आणि औद्योगिक करण ह्याबाबत देशाने प्रगतीची पावले टाकण्यास सुरुवात केली. किंबहुना देशाला आधुनिकीकरणाकडे नेण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली. १९४८ मध्ये महात्मा गांधी यांची हत्या झाल्यानंतर देशांचे एकमुख नेतृत्व त्याच्याकडेच राहिले.  स्वातंत्र्य लढयास मुशीत तावून सुलाखून निघालेल्या त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला अफाट लोकप्रियता लाभली.  सरदार वल्लभभाई पटेल यांच्या निधनानंतर नेहरूंनी कांॅग्रेसमधमे. कोणी प्रतिस्पर्धी राहीला नाही.  काॅग्रेस व देशाच्या राजकारणावर त्यांची शेवटपर्यंत मजबूत पकड राहीली.  त्यांच्या उत्तुंग नेतृत्वापुढे एकही असामान्य नेता उभा राहिला नाही. १९४८ मध्येच जयप्रकाश नारायण. डॉ राममनोहर लोहिया.  आदि समाजवादी नेते काॅग्रेसमधून बाहेर पडले.  समाजवाद्यांनी पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत पंडित नेहरू यांच्या नेतृत्वास आव्हान देण्याचा प्रयत्न केला. परंतु तो पूर्ण अयशस्वी ठरला. पहिल्या निवडणुकीत समाजवादी पक्ष पराभूत झाला. पुढं जयप्रकाश नारायण यांनी सर्वोदय पक्षात प्रवेश केला आणि समाजवादी पक्षातच फूट झाल्याने त्यांची शक्ति क्षीण झाली मुंबई कलकत्ता अशा कामगार प्रदान शहरांत कम्युनिस्ट पक्ष कार्यरत होता.  कामगार व मध्यमवर्गीय यांच्या पलिकडे त्यांची मजल जाऊ शकली नाही. संघटित वरगापुरते त्यांचं नेतृत्व मर्यादित राहिले. १९९३ घ्या भारत चीन युद्धानंतर मध्यमवर्गीय यामधील कम्युनिस्ट लोकप्रियता कमी होत गेली. ह्यामुळे पंडित नेहरू संपूर्ण कारकिर्दीत देशांवर काॅग्रेस पक्षांची घट्ट पकड राहीली

          पंडित नेहरूंचे १९६४ साली निधन झाल्यानंतर लालबहादूर शास्त्री ह्यांची अल्पजीवी राजवट वगळता देशाच्या राजकारणावर श्रीमती इंदिरा गांधी ह्यांचा ठसा सर्वसामान्यांपणे राहीला. बॅंका खाजगीकरण.  संस्थानिकांचे तनखे रद्द.  गरिबी हटाव.  अशा घोषणा व उपक्रमांनी श्रीमती इंदिरा गांधींचे नेतृत्व वर्धमान होत गेले.  १९७१ चे युध्दात त्यांनी पाकिस्तानचा पराभव करून बांगलादेश मुक्त केला आणि आंतरराष्ट्रीय राजकारणावर पोलादी स्त्री म्हणून इंदिरा गांधी यांचा प्रभाव पाडला.  काॅग्रेसमधील सिंडिकेट गटाला १९६९ सालीच त्यांनी वेगळे काढून पक्षातील सर्व विरोधकांना नामोहरम केले होते. इंदिरा गांधी काळापासून देशाच्या राजकारणात नव्या प्रथा पडल्या नवे राजकीय आचार विचार. रूढी परंपरा सुरू झाल्या व्यक्तिसतोम. एकमुखी नेतृत्व. जनतेला भुलविणारया घोषणा अशा प्रथाचा पाया १९७१ मध्ये घातला गेला. सत्तेचे केंद्रीकरण करून पक्षाच्या नेतृत्वावर त्यांनी पकड ठेवली होती.  संघराज्य असलेल्या भारत देशात. दिल्लीवरून. मुख्यमंत्री लादण्याची प्रथा त्यांच्याच काळापासून सुरू झाली.  लोकशाही साठी आवश्यक असणार्या सामुदायिक नेतृत्वा ऐवजी.  पंतप्रधानांची इच्छा.  श्रेष्ठ ठरली.  १९७५ मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाने समाजवादी नेते राजनारायण ह्यांनी दाखल केलेल्या निवडणूक खटल्यात इंदिरा गांधींची १९७१ मध्ये रायबरेली मधून झालेली लोकसभेवरील निवड रद्द ठरवली. ह्याच काळात भारतीय राजकारणात बोकाळलेला प्रश्न म्हणजे भ्रष्टाचार विरूद्ध साधयासाठी.  साधनशुचितेला तिलांजली देण्याच्या प्रवृत्ती विरूद्ध भारतीय जनमानसात प्रचंड असंतोष खदखदत होता.  भ्रष्ट नेतृतवाविरूधद जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली नवनिर्माण आंदोलन आकार घेत होते.  गुजरातमध्ये भ्रष्ट सरकार विद्यार्थी यांनी उलथून पाडले होते व बिहारमध्ये आंदोलन वेग घेत होते. इंदिरा गांधी यांनी न्यायालयाचा आदेश धुडकावून संपूर्ण देशात आणीबाणी लागू केली.  राज्यघटनेने नागरिकांना दिलेल्या मुलभूत हक्काचा संकोच करून वृपत्रे बंधने घालून आपले स्थान कायम ठेवण्याचा मार्ग यांनी अनुसरला.  जयप्रकाश नारायण.  मोरारजी देसाई.  चरणसिंग.  आदि विरोधी नेत्यांना त्यांनी तुरूंगात डांबले आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांचा आवाज बंद केला.  १९७७ मध्ये त्यांनी अचानक निवडणूका जाहीर करून विरोधी पक्षाना आश्चर्यचकित करण्याचा प्रयत्न केला परंतु हा त्यांचा प्रयत्न फसला.  १९७७ साली प्रथमच देशात काॅग्रेस सरकार पराभूत झाले.  खुद इंदिरा गांधींचा पराभव झाल्याने काॅग्रेस पक्षाला सत्ता सोडावी लागली.  विरोधी पक्षापैकी. संघटना काॅग्रेस. भालोद.  ( भारतीय लोकशाही दल ) जनसंघ व समाजवादी ह्या पक्षानी जयप्रकाश नारायण व आचार्य कृपलानी यांच्या प्रेरणेतून जनता पक्षाची स्थापना केली. व हा पक्ष सत्तेवर आला.  आपापसातील भांडणे. लाथाळ्या पुढारी महातवकांक्षा. मूळ घटकांचा परसपरावरील अविश्वास ह्यामुळे मोरारजी देसाई ह्यांच्या नेतृत्वाखाली जनता पक्षाचे सरकार अवघ्या ३० महिन्यातच कोसळले सहा महिने.चरणसिंह काळजीवाहू पंतप्रधान म्हणून कार्य करीत राहिलें. १९८० मध्ये देशात मध्यावधी निवडणूका झाल्या. ह्या निवडणूकीत इंदिरा गांधी यांना घवघवीत यश मिळवून. इंदिरा काँग्रेस पक्ष हा पक्ष सत्तेवर आला. कारणं १९६९ साली फुटून शिल्लक राहिलेली काॅग्रेंस  १९७८ साली पुन्हा फुटली होती. त्यातून श्रीमती इंदिरा गांधी ह्यांनी इंदिरा काँग्रेस पक्षाची स्थापना केली. १९८० नंतर इंदिरा गांधी यांची राजवट पंजाब व आसाम सारखें राष्ट्रीय एकात्मतेला आव्हान देणारे प्रश्न निर्माण झाले. पंजाबात जरलसिंग. भिंद्रनवाले ह्यांच्या रूपाने दहशतवादाचा भीषण भस्मासुर उभा राहिला. आपल्या राजकीय सोयीसाठी वापरणाऱ्यांना तो फार महाग पडला त्याने निष्पाप नागरिकांच्या हत्याकांडाचा मार्ग अवलंबून हजारों लोकाची हत्या केली.  पंजाब. हरियाणा.  दिल्ली आणि उत्तरप्रदेश. व आसपासच्या भागात दहशतवादाचे थैमान घातले.  हया परिस्थितीतच आॅपरेशन ब्ल्यू सटारमधमे भिंद्रनवाले मारले गेले.  नंतर इंदिरा गांधीजी शरिर रक्षकाकडून हत्या झाल्याने राजीव गांधी ह्यांच्या नेतृत्वाचा उदय झाला.  तो १९८४ चया अखेरीस राजीव गांधींची कारकीर्द ही बोफोर्स तोफा. स्वीस बॅक खाती हया प्रकरणांनी खूप गाजली. १९८४ मध्ये देशातील सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस पक्षाला तीन चतुर्थांश पेक्षा जास्त जागा मिळाल्या होत्या.  पण एवढे अभूतपूर्व यश मिळूनही त्यांच्या काळात काँग्रेस पक्ष झपाट्याने अप्रियतेकडे झुकला. विश्वनाथ प्रताप सिंग.  ह्यांनी संरक्षणमंत्री पदांचा राजीनामा देऊन बोफोर्स तोफा खरेदी प्रकरणातील भ्रष्टाचाराचा प्रश्न उभा करून १९८९ मध्ये राष्ट्रीय आघाडीच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाला पराभूत केले.  डावे पक्ष व भारतीय जनता पक्ष यांच्या पाठिंब्यावर राष्ट्रीय आघाडीचे सरकार सत्तेवर आले. मंडल आयोगाच्या.  चया व मंदिर मशीद चया विवादावरून हे सरकार पक्षांतर्गत फूट आणि भारतीय जनता पक्षाने पाठिंबा काढून घेतल्याने पराभूत झाले जून १९९१ मध्ये झालेल्या मध्यावधी निवडणुकीत काँग्रेस पक्ष सत्तेवर आला हया सरकारचे नेतृत्व पी व्हि नरसिंह राव ह्यांच्याकडे गेले. ह्या सरकारला लोकसभेत सवताचे स्पष्ट बहुमत नाही.  अल्पमतातील हे सरकार काही प्रादेशिक पक्ष व अपक्ष सदस्यांच्या पाठिंब्यावर अवलंबून आहे

      देशाच्या संपूर्ण वाटचालीत पंडित नेहरू ते इंदिरा गांधी ते राजीव गांधी. व पी व्हि नरसिंह राव. असे नेतृत्व संक्रमित होत आले आहे. हया वाटचालीत देशात अनेक प्रश्न उभे राहीले आहेत. त्यापैकी काही प्रश्नांनी लोकशाही व्यवस्था पोखरून काढली आहे.

         २६ जानेवारी १९५० पासून राज्यघटनेची अंमलबजावणी सुरू झाली आशा एका व्यापक इतिहासाच्या पार्श्वभूमीवर भारताने लोकशाही राज्याचा प्रयोग सुरू केलेला आहे त्याला आत्ता चाळीस वर्षे उलटून गेली आहेत आज आपण परकयाचया गुलामगिरीत नाही आज आपण आपल्याच आपण निवडून दिलेले नेत पुढारी आमदार खासदार मंत्री यांच्याच गुलामगिरीत आहोत

           समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

आम्हाला कधीच वाटले नाही

 


आम्हाला कधीच वाटले नाही

            आपल्या शासनव्यवस्थेचे विविध कार्यालये शासकीय निमशासकीय कार्यालये स्थापन करण्यात आली आहे त्यात प्रामुख्याने. ग्रामपंचायत राज. नगरपालिका महानगरपालिका. पंचायत समिती. अशी विविध कार्यालये. स्थापन करण्यात आली आहेत. यामाध्यमातून विविध विकास व कल्याणकारी योजना राबविल्या जातात. त्या गोरगरीब आणि गरजूंना मिळवून घेण्यासाठी विविध जाचक कागदपत्रांची अट. अधिकारी व कर्मचारी दलाल एजंट यांच्याकडून अगदी हिण वागणूक दिली जाते. 

   ग्रामपंचायत ग्रामिण भागातील मिनी मंत्रालय आहे यामधून खेड्यापाड्यात विविध योजना राबविण्यात येतात त्यात प्रामुख्याने. रस्ते. गटर बगीचे स्मशानभूमी समाजभूमी रस्ते विकास. घरकुल योजना. वयोवृद्ध. महिला निराधार विधवा अनुदान यासाठी गोरगरीब लोक ग्रामपंचायती मध्ये अर्ज दाखल करतात आणि मग त्या त्या विभागातील अधिकारी व कर्मचारी यांची इनामदारी. जोरात असते. वर्षे नु वर्ष. लाभाचे गोरगरीब जनतेचे अर्ज आज सुध्दा धुळखात पडले आहेत कोणीही अधिकारी व कर्मचारी यांना कोणताही पत्रव्यवहार करून कळविले सुध्दा नाही. म्हणजे या अधिकारी व कर्मचारी यांना कधीच वाटली नाही गोरगरीब यांना छळताना पंचायत समिती हे तर सर्वात मोठें करपशन आहे योजना मोठया पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांच्या माध्यमातून नेते पुढारी आमदार खासदार मंत्री पुढारी यांचें बगलबच्चे यांनाच मिळवून देत आहे. तरि सुध्दा या अधिकारी व कर्मचारी यांना कधीच वाटली नाही

          बांधकाम कामगार नोंदणी हे सर्वात मोठें भ्रष्टाचार केंद्र आहे बांधकाम कामगार व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई यांचेकडून बांधकाम कामगार यांचेसाठी 19 कल्याणकारी योजना राबविण्यात येतात त्या मिळवून घेण्यासाठी काही जाचक अटी शर्ती. व कामगार हितचिंतक संघटना दलाल आणि एजंट फुटाला निर्माण झाले आहेत पूर्ण जिल्हा भ्रष्टाचार युक्त झाला आहे. संघटना कामगार हितचिंतक यांनी बांधकाम कामगार यांना शारीरिक मानसिक आर्थिक लुट सुरू केली आहे. त्यांना सहकार्य सहाय्य कामगार आयुक्त भवन मधील अधिकारी व कर्मचारी. यांच्याशी हातमिळवणी करून तुम्ही खा आणि आम्ही खातो असा फंडा अमलात आणला जातो. सर्वात मोठा कामगारांचा अपमान याच सहाय्यक कामगार आयुक्त भवन मधील अधिकारी व कर्मचारी करतात तुम्ही कोणाकडून आला. तुमची संघटना कुठली. कुणाला किती लाभाचे पैसे जमा झाले हे कामगारा आगोदर संघटना वाल्यांना सांगणारे हेच आॅफिस मधील अधिकारी व कर्मचारी आहेत. आम्हाला किती पैसे देणारा. अशी विचारणा करणार्या अधिकारी व कर्मचारी यांना आपल्या पदांवर राहण्याचा अधिकार नाही. आज हजारो कामगार लाभाची प्रकरणे अशा गलथान कारभारामुळे धुळखा पडले आहेत. म्हणजे या अधिकारी व कर्मचारी यांना कधीच वाटली नाही आणि वाटणारं नाही 

              माहिती अधिकार. अधिनियम २००५ सर्व गोरगरीब जनतेला शासकीय निमशासकीय कार्यालयात चालणारे कामकाज तपासणी पडताळणी करण्याचा अधिकार देण्याचा मोठा प्रयत्न आहे पण आज सर्वसामान्य जनतेला गोरगरीब लोकांना एकादी माहिती पाहिजे असेलतर माहिती अधिकार दाखल करण्याची सुध्दा पध्दत माहिती नाही. आणि जाणकार लोक विशिष्ट फी दिल्याशिवाय शिकवत नाहीत म्हणजे सर्वात अगोदर यांना वाटली पाहिजे. माहिती अधिकारांची माहिती देताना माहीती देता येत नाही. सदोष कारण दिले जात नाही. सुनावणी असुन सुद्धा अधिकारी व कर्मचारी हजर राहत नाही. असे एक नाही अनेक नपटणारे कारणें देवून. माहिती अधिकार कायद्यात सजा व दंड तरतूद असुन सुद्धा त्याकडे डोळेझाक करणारे अधिकारी व कर्मचारी यांना जरा सुद्धा वाटली नाही 

            प्रत्येक तालुक्यात असणारे तहसिलदार कार्यालय हे लहान जिल्हाधिकारी कार्यालय माणले जाते त्यामध्ये. महसूल. संजय गांधी निराधार. श्रावणबाळ योजना. इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन. सर्व पत्र व्यवहार. अपंग विकासासाठी योजना. पुरवठा विभाग. स्टॅम्प. निवडणूक आयोग कार्यालय अशी विविध विभागांचे काम करण्यासाठी विविध विभाग नेमले आहेत. त्यात सर्वात मोठा भ्रष्टाचार म्हणजे महसूल. वर्षानुवर्षे धुळखात पडलेले जमीन संबंधित प्रकरणे. वयोवृद्ध महिला पुरुष निराधार विधवा यांच्यासाठी विविध पेन्शन योजना. यासाठी तहसिलदार कार्यालय मध्ये दाखल केलेले पत्र व्यवहार कोण बघत सुध्दा नाही वयोवृद्ध व अपंग लोकांसाठी असणार्या योजना त्यासाठी लागणारे कागदपत्रे अपंगाला. वयोवृद्ध व्यक्ती आॅफिसला जाता येईना. कोणताही अधिकारी व कर्मचारी यांना एसी रुम सोडू वाटेना. रस्त्याने येणार्या जाणारया लोकांकडे केविलवाणी नजर करून पाहणारे अपंग आणि वयोवृद्ध मी बघितले आहेत पण अधिकार जर आपले आॅफिस सोडून खाली आला तर कमी बापाचा होणार आहे कां ? पण शासनाने ज्याच्या सेवेसाठी यांची निवड केली आहे तयाची सुध्दा यांना कधीच वाटली नाही रेशन दुकानदार आणि शासकीय अधिकारी व कर्मचारी यांचे संगनमताने चालणारा सावळागोंधळ आपण बघतो. ज्यांचे दारिद्र्य रेषेखालील नाव आहे त्याला रेशनकार्ड नाही. ज्याला दारिद्र्य रेषेखालील प्रमाणात आहे त्याचे दारिद्र्य रेषेखालील रेशनकार्ड नाही दुकान दारची दमदाटी. अधिकारी व कर्मचारी यांचे पैसै खाऊन काम. लाभार्थी वार्यावर. सदन व्यक्ती मुबलक धान्य. नाव कमी करणे नावं वाढविणे. अन्न धान्य सुरू करणे. मयत व्यक्तिची नावे कमी करणे. नविन रेशनकार्ड काढणे यासाठी किती पैसे देताय. मगच काम होतंय. आॅफिसला कर्मचारी कमी ठेकेदार पध्दतीने भरली जाणारी यांचें पगार कमी मग यांना कुराण मोकळ लुटायला अधिकारी व कर्मचारी यांच्या संगनमताने. म्हणून म्हणतो या अशा कामचुकार अधिकारी व कर्मचारी यांना कधीच वाटली नाही. 

              वैद्यकीय सेवा हीच ईश्वर सेवा. मनांत भावना आहे आणि समोर दिसतो तो फक्त पैसा. औषधांचा दर उपचार खर्च मनमानी पद्धतीने आकारली जाणारी फी. गोरगरीब लोकांना कोणत्या दवाखान्यात कोणते उपचार मोफत होतात कोणता दवाखाना कोणत्या योजनेअंतर्गत मोफत वैद्यकीय सेवा देतो हे समजलंच नाही आणि आपणं करूनच दिलें नाहीं म्हणून म्हणतो या सर्व वैद्यकीय बाजार करणारे यांना कधीच वाटली नाही

             शेतकरी आत्महत्या कर्जबाजारी पणा. बेरोजगारी. एस टी संप. पूरग्रस्त अनुदान. बोगस पंचनामे. घरांचे. गोठे. जनावरं. मयत व्यक्ति यांचें बोगस व पैसै खाऊन बोगस पंचनामे करणारे अधिकारी व कर्मचारी. खरोखरच नुकसान झालेले वार्यावर आणि ज्यांचे कांहीच नुकसान झाले नाही अशा लोकांना शासनाची मदत मग पैसा अन्न धान्य याप्रमाणे. म्हणजे खरोखरच या अधिकारी व कर्मचारी यांना कधीच वाटली नाही. प्रकल्प ग्रस्त लोकाची जमीन संपादन करणे. त्यांची परस्पर विक्री करणारे. असे भ्रष्ट अधिकारी व कर्मचारी यांना कधीच वाटली नाही

      आज भरती आहे उद्या भरती तारिख जाहीर होईल या आशेने सकाळ संध्याकाळ. मिळेल ते काम करून अर्धपोटी उपाशी राहून आपले व आपल्या कुटुंबाला हातभार लावणे तरुण आज मोठ्या संकटात सापडलेल्या आहेत. सरकार भरती काढत नाही मुलाची वय संपली लग्न होत नाही म्हणून मनांत झूरणारे आई वडील सगळा प्रकार अगदी भयानक आहे. म्हणूनच सरकारला सुध्दा कधीच वाटली नाही

       समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

वैयक्तिक स्वातंत्र्य

वैयक्तिक स्वातंत्र्य

            व्यक्तिजीवनाचा विकास. व्यक्तिच्या गुणांचा विकास करण्याचे स्वातंत्र्य व संधी समाजव्यवस्था व राष्ट्राच्या स्थैर्याचया दृष्टीने आवश्यक आहे. हा खरया लोकशाही व मानवी हक्क व अधिकार समाता आणि स्वातंत्र्य हक्कामुळे व्यक्तिला किमान सभ्य आणि सुरक्षित जीवन जगण्याला आवश्यक असे वातावरण मिळते. परंतु एवढ्या मुळे व्यक्तिचे प्रश्न सुटणार नाहीत व्यक्तिचे जीवन अधिक अर्थपूर्ण व सुसंस्कृत होण्यासाठी आचार विचार उच्चार या स्वातंत्र्याबरोबर श्रध्दा विश्वास यांसारख्या मानसिक क्रिया बाबत स्वातंत्र्य आपल्या संस्कृतीच्या संवर्धनला अनुकूल वातावरण व वैयक्तिक प्रगतीसाठी शिक्षणाच्या समान संधी या सर्वांची आवशयकता आसते आणि हे सर्व कागदोपत्री देऊनही व्यक्ती त्याचा उपभोग घेण्यासाठी आर्थिक दृष्टीने सक्षम नसेल. तिचे जर समाजातील अन्य व्यक्ती किंवा गट आपल्या स्वार्थासाठी गोरगरीब जनता.  महिला. मुल. यांच जर शोषण करत असतील तर त्या शोषणाविरुद्ध लढण्याचा अधिकार हक्क व्यक्तिला आवश्यक आहे. यामुळे व्यक्ती अनेक प्रकारच्या आर्थिक व मानसिक परावलंबनातून मुक्त होऊ शकेल सुसंस्कृत जीवन जगण्यासाठी आवश्यक असणार्या हक्काचा आपण विचार अवलंब केला पाहिजे
                    स्वातंत्र्याच्या हक्कात व्यक्तिच्या वैयक्तिक स्वातंत्र्याचा स्पष्ट उल्लेख केला आहे. यात प्रामुख्याने शारीरिक व मानसिक संदर्भात विचार केलेला आहे.  कोणत्याही व्यक्तिच्या शारीरिक हालचालींवर बंधने पडली की तिच्या व्यक्तिगत स्वातंत्र्याला मुळातच बाधा येते.  शारीरिक हालचालींवर कठोर मर्यादा पडल्या की उर्वरित वैयक्तिक स्वातंत्र्यावर आपोआप अधिक बंधने येतात.  उदा. पोलिसांनी आपल्याला काही कारणास्तव पकडले काही आरोपाखाली कोठडीत बंद करून ठेवले तर व्यक्तिशः आपल्या हालचालींना प्रतिबंध होतो.  आपण काहीच करू शकत नाही. याचाच दुसरा अर्थ असा होतो की वैयक्तिक स्वातंत्र्याच्या संकोचाची सुरवात तेथूनच होते हे सर्व लक्षात घेऊन या वस्तुस्थितीची दखल घेऊन संविधान व्यक्तिगत स्वातंत्र्याबद्दल मांडणी केली आहे. हे हक्क सर्वांना आहेत
            वेळप्रसंगी राज्याला मरयादाभंग करणारे गुन्हेगार दहशतवादी नक्षलवादी असे वर्तन करणार्या व्यक्तिंना प्रतिबंध करावा लागतो. त्यासाठी त्याला अटक केली जाते. तर त्याबद्दल आपणांस कितपत माहिती आहे. येथूनच आपले वैयक्तिक स्वातंत्र्य याला सुरुंग लागतो म्हणजे. एखाद्या व्यक्तिला अटक झाली म्हणजे तो गुन्हेगार सिध्द होत नाही. न्यायालयात त्या व्यक्तिचा गुन्हा सिद्ध होईपर्यंत त्या व्यक्तिला निरापराध मानले पाहिजे. म्हणून अटकेतील व्यक्तिला सुध्दा काही अधिकार संविधानात दिले आहेत.  बेकायदेशीर अटकेला विरोध करणे. केंव्हाही कोणताही पोलिस तुम्हाला विनाकारण अटक करू शकत नाही. अटक करण्यापूर्वी अटकेचे कारणं सांगणे अनिवार्य आहे.  अटक झालेल्या व्यक्तिला स्वताचा बचाव करण्यासाठी वकील नेमण्याचा अधिकार आहे.  अटक झाल्यापासून चोवीस तासांच्या आत आरोपींला जवळच्या न्यायदंडाधिकारी समोर हजर करणे आवश्यक आहे.  चौकशी किंवा अन्य कारणांसाठी अधिक काळ व्यक्तिला अटकेत ठेवणें आवश्यक असेल. तर पोलिसांना न्यायदंडाधिकारी यांची परवानगी घेणे आवश्यक आहे.  या संदर्भात नयायमंडळाची भूमिका अर्थपूर्ण आहे. कारणं पोलिस किंवा शासनकर्ती व्यक्ति यांच्यावर कांहीच बंधने नसतील तर ते अटकेतील व्यक्तिला शारीरिक व मानसिक अपाय किंवा इजा करु शकतील. जुलूम जबरदस्तीने तिचा कबूली जबाब घेऊ शकतील म्हणून अटकेत असतानासुद्धा व्यक्तिला शारीरिक व मानसिक इजा होणार नाही याची दक्षता संविधानाने घेतलेली आहे. व्यक्तिच्या स्वातंत्र्यावर राजकारणी लोकांकडून अतिक्रमण विरूद्ध व्यक्तिला संरक्षण दिलेले आहे 
            अटकेत असलेल्या व्यक्तिबाबत काही हक्क दिलेले आहेत त्याचप्रमाणे गुन्हा सिद्ध झाला आणि व्यक्ती गुन्हेगार ठरली तरी तिला व्यक्ती म्हणून कायद्याने काही सरक्षणे मान्य केली आहेत. उदा. गुनहयाबाबत व्यक्तिला गुन्हा घडला तेव्हा अस्तित्वात असलेल्या कायद्यानुसार शिक्षा झाली पाहिजे. कायद्यात सांगितलेल्या शिक्षेपेक्षा अधिक शिक्षा देऊ नये. विरोधी जबाब किंवा विरोधी साक्ष देण्यास सक्ती करु नये. कोणाही व्यक्तीला जिवंत राहण्याचा हक्क व अधिकार हिरावून घेतला जाणार नाही इत्यादी राजकारणी लोकांचें हेवेदावे सुडापोटी लहरी द्वेष बुध्दी आकस किंवा सुडापोटी एखाद्या व्यक्तिचा बळी दिला जाऊ नये यासाठी हे सर्व व्यवस्था केली आहे. अर्थात प्रतिबंधक स्थानबद्ध ते खाली अटक केलेल्या व्यक्तिंना यातून वगळलेले आहे. परंतु तो अपवाद आहे. प्रतिबंधक सथानबधदता वेगळे नियम आहेत व ते राजकारणी लोकांवर बंधनकारक आहेत
        वैयक्तिक स्वातंत्र्याचा विविध अनाठायी कारणें लावून खून केला जात आहे. संविधानाने आपल्याला मुक्त संचार करण्याचें स्वातंत्र्य दिले आहे.  व्यवसाय करण्याचे तेही कोणीही व्यक्ती कोठेही आपला व्यवसाय सुरू करू शकतो.  सर्वांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण मिळाले पाहिजे.  शालेय शिक्षणाबरोबरच मुलांना तरुणांना व्यवसायिक शिक्षण देणे आवश्यक आहे.  स्थलांतरित कामगार यांना हक्काचे काम समान वेतन किमान वेतन कायद्यानुसार वेतन व संरक्षण मिळाले पाहिजे.  महिलांना कामाच्या ठिकाणी सन्मानाची वागणूक मिळाली पाहिजे डिलिव्हरी काळात पगारी तीन महिने रजा मिळाली पाहिजे.  सर्वांना कुशल अकुशल कामांवर शासकीय योजनाचा लाभ निष्पक्षपणे मिळाला पाहिजे.  मुलांची बालमजुरी बंद झाली पाहिजे त्यांना शाळेत जाण्यास प्रवृत्त करणे गरजेचे आहे.  ग्रामपंचायत नगरपालिका महानगरपालिका यामधून येणारा मिळकत कर घरपट्टी पाणीपट्टी यांच्या मनमानी कारभार पध्दतीवर सर्वांना आवाज उठवण्याचे स्वातंत्र्य आहे.  आपली संस्कृती आपला धर्म नितिमूलय. आचार विचार यांचे आचरण करण्याचा सर्वांना हक्क व अधिकार आहे.  सार्वजनिक ठिकाणी येणे जाणे यांवर कोणीही बंधन घालू शकत नाही.शासकिय निमशासकीय कार्यालयात चालणारे कामकाज तपासणी पडताळणी करण्याचा संविधान अधिकार आपणांस आहे.   
      मूलभूत हक्क व अधिकार हे नकारात्मक व सकारात्मक अशा दोन्ही स्वरूपाचे असतात. सकारात्मक स्वरूपात मूलभूत हक्क व अधिकार व्यक्तिचे स्वातंत्र्य सुरक्षित करतात आणि त्याचा व्यक्तिगत विकासाचा मार्ग प्रशस्त करतात दुसर्याच्या बाजूला हे हक्क शासनाच्या विविध घटकांवर अधिकारावर बंधने घालतात राज्याने काय करावे काय करू नये याचे आदेश त्यातच असतांत त्यामुळे व्यक्तिच्या स्वातंत्र्याचा संकोच करण्याचा राज्याच्या प्रयत्नात प्रतिबंध होतो 
              समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी
बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर
रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा
रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा
मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा
माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा
संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे
९८९०८२५८५९ 
माहिती अधिकार दाखल केल्यावर तुम्हाला माहिती मिळाली नाही तर ३० दिवसांनंतर अपिल दाखल करू शकता
रेशन संबंधित अन्न सुरक्षा योजनेत सहभागी होणेसाठी आजच अन्न सुरक्षा योजनेचा अर्ज भरा आणि संबंधित पुरवठा विभागात दाखल करा
  बांधकाम कामगार नोंदणी आॅनलाइन पध्दतीने करताना आपणाकडे कोण जादा पैसे मागत असेल तर आजच तक्रार करा अन्यथा आपल्या घरातील शिकलेली व्यक्ती सोबत घेवून जवळच्या नेट कॅफे मध्ये समोर कामगार नोंदणी अर्ज भरा

भडका भडका

 

भडका भडका 

          भारतीय जनतेच्या आशा आकांक्षाचे प्रतिबिंब आपण रोजच आपल्या चेहर्यावर बघतो. संविधान सभेने संविधान तयार करताना राज्यशासनासाठी एक यंत्र निर्माण करण्याचे एवढेच ध्येय ठेवले नव्हते. ते शासन कोणत्या ध्येयासाठी व साधण्यासाठी मानवी हक्क व अधिकार. संरक्षण निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील असले पाहिजे. व त्या शासनाचा मूलभूत पाया कशयावर आधारलेला आहे. भारतीय जनतेला काही महत्वाचे हकक अधिकार देण्यासाठी व ते अमलात आणण्यासाठी वचनबद्ध राहण्यासाठी हे संविधान संमत केले आहे. संविधानाने सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य निर्माण केले आहे. समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही ही या गणराजयाची मूलभूत तत्वे आहेत. व या गणराज्यातील सर्व नागरिकांना सामाजिक. आर्थिक. व राजनैतिक. शैक्षणिक. धार्मिक. न्याय विचार अभिव्यक्ती. विश्वास श्रद्धा उपासना. यांचें स्वातंत्र्य व दर्जा आणि संधी समानता निश्चित प्राप्त करून देणे हे गणराजयाचे परम कर्तव्य आहे. एक दिव्य असे ध्येय राष्ट्रात पुढे ठेवले आहे. वरील प्रमाणे शब्दाला एक अनन्य साधारण महत्व आहे. मानवी जीवन समृद्ध करून मानवाला सांस्कृतिक व आध्यात्मिक दृष्ट्या प्रगती स्वच्छतेने करता यावे यासाठी जी समाजव्यवस्था व अर्थव्यवस्था आवश्यक असेल ती निर्माण करण्याची मानवाला माणूस म्हणून जगण्याचा हक्क व अधिकार असे वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी शासनावर आहे. असे मानले तर वावगे ठरणार नाही. त्याचबरोबर व एकात्मता देणारी बंधुता प्रवरधीत करण्याची जबाबदारी शासनावर आहे. याचा अर्थ असा की शासनाने विषमता दूर करून विचार उपासना या क्षेत्रातील व्यक्तिस्वातंत्र्य उपभोगता येईल याची खबरदारी घेणे गरजेचे आहे नागरिकांना विविध स्वातंत्र्य. मूलभूत हक्क व अधिकार राष्ट्राची एकता एकात्मता. राखली जाणे लोकशाही राज्यात महत्वाची घटना असेल 

              आपला देश हा सार्वभौम धर्मनिरपेक्ष गणराज्य आहे. समाजवादी म्हणजे आर्थिक नयायावरील आधारित समाजव्यवस्था राज्याच्या पुढाकाराने अस्तित्वात येणे आधिक साधनसंपत्ती वाटपात राज्याची प्रमुख भूमिका असणे. धर्मनिरपेक्ष म्हणजे कोणत्याही एका धर्मास पाठिंबा न देणारे कोणा एका समाजाला पाठिंबा न देणारे राज्य सर्वांना अभिप्रेत आहे आपल्या देशात सार्वभौम आहे. देशाचा राजयप्रमुख त्यांच्याकडून निवडला जावा राज्य लोकांच्या प्रतिनिधी चालवावे. स्वातंत्र्य समता बंधुता समता न्याय महागाई. भ्रष्टाचार बेरोजगारी. कुपोषण. बालकामगार वापर. अधिकारी व कर्मचारी मनमानी. असे विविध प्रश्न आ वासून उभे आहेत. 

                पेट्रोल डिझेल गॅस विज बिल. हा सर्वात मोठा प्रश्न आज सर्वसामान्य जनतेपुढे आ वासून उभा आहे. आज रोजच्या रोज पेट्रोल डिझेल यांचें दर वाढत आहेत. याचा फटका आपल्याला सुध्दा बसत आहे. पण आपण अगदी शुल्क असणारी बाब कधी नोटीस केली आहे का. परवा पुरग्रसत भागाचा दौरा. तसेच २०१४/२०१९. चे पूर. अवेळी अवकाळी झालेला पाऊस त्यात झालेले नुकसान पाहणी दौरा. विविध उद्घाटन सोहळे. विविध शासकीय निमशासकीय कार्यालये यांना भेटी. अशावेळी आपले विविध मंत्री आमदार खासदार पुढारी. यांचें वेळोवेळी समाजहिताच्या नावाखाली होणारे दौरे व त्यांच्या दौऱ्याच्या वेळी त्यांच्या ताफ्यात असणारे गाड्यांचे थवे. यांना प्रवासाला देण्यात येणारे तेल कोण देत ? खासदार मंत्री पुढारी नेते आमदार. सभेला आले उतरून सभा होईपर्यंत बाहेर असणारी यांची गाडी चालूच असतें त्यावेळी येणारा पेट्रोल डिझेल याचा खर्च कोण उचलत. ? एवढेच काय यांच दौरा काळात राहणे जेवन. व बाकिचा होणारा खर्च कोण करत ? म्हणजे तेल वाचवा देश वाचवा. ? हे फक्त सर्वसामान्य माणसावरच आहे का ? नियम अटी ह्या आपल्यासाठीच आहेत का ? आज वाढते तेलाचे दर याच कारण सरकार विविध योजना आखून आपत्ती काळात जनतेला मदत करतय त्यासाठी लागणारा पैसा येतो कुठून ? नोव्हेंबर पर्यंत मोफत अन्न धान्य. बांधकाम कामगार कोरोना काळात सानुग्रह अनुदान. रिक्षा चालक. फळें विक्री करणारे यांना कोरोना काळात सानुग्रह अनुदान. हे शासन कोणत्या पैशातून देत काय माहित आहे का? 

                    आज पेट्रोल डिझेल दरवाढ भरमसाठ आहे पण एका बाजूला विचार केला तर मग गाड्यांची खरेदी थांबली पाहिजे होती. पण आज उलट झाल आहे की विविध शोरूममध्ये गाड्या खरेदी साठी अजून वेटींग लागत आहे म्हणजे सरकारला कळल आहे की अजून जरी पेट्रोल डिझेल दर वाढले तरी जनतेला चालतय. जनतेने एक विचार निर्धार करण्याची आज गरज आहे गाड्या चालवणे बंद करा मग तेलच नाही खपल तर दर वाढीचा विषय येतो कुठ ? आणि बारिक विचार करा आज आपल्या भागात तालुक्यात जिल्ह्यात. जागोजागी असणारे पेट्रोल डिझेल पंप कुणाचे आहेत ? ‌नेते पुढारी आमदार खासदार मंत्री यांचेच आहेत म्हणजे सर्व जनतेचा पैसा कोणत्याही मार्गाने यांच्याच तिजोरीत जातो ? ‌वेळोवेळी पेट्रोल डिझेल दरवाढ बद्दल # तु कर मारलयागत मी करतो रडलयागत # आत्ता होणारी आंदोलने अशी आहेत फक्त जनतेला वाटव आमचा नेता पुढारी आमदार खासदार मंत्री यांना आपली किती काळजी आहे हे फक्त दाखविण्यासाठी आंदोलने केली जातात. जर तुम्हाला खरच जनतेची काळजी आहे तर कराकी तुमचेच पेट्रोल डिझेल विक्री करणारे पंप बघा जमतंय का ? 

                सर्वात जास्त वापर होतो तो म्हणजे डिझेल मालवाहतूक करणारे वाहने. प्रवाशी वाहतूक. करणारी वाहने. आज पेट्रोल बरोबर डिझेल दरवाढ भरमसाठ झाली आहे त्यामुळे आगोदरच टाळेबंदी काळात सर्वच बंद असल्याने व बॅंक. फायनान्स कंपन्या. व्याजाने पैसे काढून. ज्यांनी वाहन घेतली. आणि आत्ता कुठंतरी सगळ सुरू झाल पण वाहनाच भाड काही वाढल नाही पण तेलाचे दर डबल झाले त्यामुळे वाहन विकावी तर बॅंकेचे पैसे भरायचे कुठून ? वाहन विकाव तर कुटुंब अन्न पाण्यासाठी रस्त्यावर येणार ? या सर्व प्रकाराला कारणीभूत आहे तो म्हणजे पेट्रोल डिझेल दरवाढ

                 गॅस घरगुती गॅस कनेक्शन सर्वांना देणे यांच्यामागे असणारे शासन धोरण म्हणजे जळणासाठी तोडली जाणारी झाड तोड थांबवावी. चूल व औधोगिक क्षेत्रातील कारखाने यांच्या धुराडयातून बाहेर पडणारा धूर यामुळे वातावरण प्रदूषित होणे थांबवावे. चूल वापरामुळे विविध आजार रोखणे. अशा विविध लोकांच्या हितासाठी घरगुती गॅस कनेक्शन संकल्पना अमलात आणली. त्यातच व्यवसायिक वापरासाठी सुध्दा गॅस कनेक्शन सिलेंडर आहे. १९९०/१९९३ पर्यंत गॅस सिलिंडर दर ३५० होता. तोच आज ९०० रूपये वर गेला आहे म्हणजे आज सर्वसामान्य जनतेसाठी संजिवनी असणारा घरगुती गॅस आज भरमसाठ दर वाढ झाल्याने आज खेड्यातील महिलांनी गॅस सिलिंडर बाजूला ठेवून पुन्हा चूल सुरू केली आहे म्हणजे दरवाढी मुळे जनता पहिल्या जागेवरच आली 

          जीवनावश्यक वस्तू गहू तांदूळ ज्वारी बाजरी मका चणा डाळ गोडतेल. यांच्या दरांत सुध्दा भरमसाठ वाढ झाली आहे 

     म्हणजे चारी बाजूंनी महागाई भडका उडाला आहे आणि त्यात जनता भाजून निघत आहे लवकरच जनतेने निर्णय घेण्याची गरज आहे

           समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

जनमत जनमत १९५१ चा जनप्रतिनिधीत्त्वाचा कायदा

 

जनमत जनमत 
१९५१ चा जनप्रतिनिधीत्त्वाचा कायदा 

        आपल्या व्यवस्थेत निवडणूका घेण्यासाठी घटनेनुसार. निवडणूक आयोगाची स्थापना झाली आहे. निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांना प्रचार कसा करावा. निवडणूकीवर खर्च किती करावा. ह्याचीही काही आचारसंहिता घालून दिलेली आहेच त्या जोडीला १९५१ चा प्रतिनिधित्त्वाचा कायदा. आहेच. पण आचारसंहिता पायदळी तुडविणयात राजकीय पक्ष मग्न झाले आहेत. निवडणूक आयोग हा एक स्वायत्त आयोग आहे या आयोगाची स्वायत्तता टिकविणे आवश्यक आहे परंतु आयोगाच्या आयुक्तपदी आपल्याच प्रभावातील व्यक्तिची नियुक्ती करण्याचा पायंडा सत्तेवर आलेल्या सर्वच राजकीय पक्षांनी पाडला आहे. ह्यामुळे आयोगाच्या कामात राजकीय हस्तक्षेप वाढलेला आहे मध्यंतरी ऐन निवडणुकीच्या तोंडावर एका निर्वाचन आयुकताऐवजी निर्वाचन आयुक्तांचे त्रिकुट नेमण्याचा प्रयोग करण्यात आला देशात भ्रष्टांच्या मुळात निवडणूका हाच प्रभावी घटक दिसून येतो आपली लोकशाही व्यवस्था पोखरून काढण्यास ह्या घटकाने हातभार लावला आहे. हे आपल्याला दैनंदिन राजकीय. आर्थिक गैरव्यवहाराच्या घटनांवरून स्पष्ट होईल भ्रष्टाचार आणि राजकारणाचे गुन्हेगारीकरण ह्या जागतिक पटलावरील घटना आहेत. असा बचाव मांडून त्यांना झटकून टाकता येणार नाही. संघटित निर्भिड व जागरूक लोकमतच ह्या गोष्टीचा प्रभाव कमी करू शकते. 

        भारतीय राजकारणातील प्रकिया आणि आपले खाजगी विश्व कोणते कुटुंब. जात. धर्म. ह्याचा राजकारणाशी घनिष्ठ संबंध आहे. त्यांची आपल्या सार्वजनिक जीवनात उमटणारी प्रतिबिंबे आपण वेळोवेळी समजावून घेतली पाहिजेत. आपली राजकीय संस्कृती तसेच भारतीय राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्वे मूलभूत हक्क. राजकीय मानसिकतेचा पोत. पक्ष पध्दती वैशिष्ट्य प्रमुख पक्ष व त्याची धोरणे ह्याचाही माहिती आपणांस असणे गरजेचे. आपल्या देशात पंचेचाळीस वर्षांहून अधिक काळ लोकशाहीचा प्रयोग चालू आहे. १९५२ पासून देशात दहा वेळा सार्वत्रिक निवडणुका झाल्या आहेत स्वातंत्र्यानंतर सलग तीन वर्षे कांग्रेस पक्षाकडे सत्ता होती. १९७७ मध्ये जनता पक्ष व १९८९ मध्ये जनता दलाला सरकार बनविण्याची संधी मिळाली होती. ह्या दोन्ही पक्षांना संधी देऊन भारतीय मतदारांनी कांग्रेस पक्षास पर्याय वापरून पहिला परंतु ही दोन्ही सरकारे अल्पजीवी ठरली ह्या दोन्ही सरकारांची अल्पजीवी राजवट वगळता देशाच्या एकूण राजकारणावर कांग्रेस पक्षाचीच पकड दिसून आली. गेली ७१ वर्षे आपली लोकशाही व्यवस्था टिकून आहे. परंतु ह्या काळात देशाच्या एकात्मतेला आव्हान देणारे प्रश्न आजही उभे राहिले आहेत पंजाब काश्मीर आसाम. बोडो. नागा. इत्यादी प्रश्नांनी देशाच्या एकात्मतेला ग्रहन लावले आहे. फुटीरता दहशतवादी. भ्रष्टाचार. सत्तेचे विकेंद्रीकरण. राजकारणाचे गुन्हेगारी करण. धर्मांधता. पुराणमतवादाचे पुनर्जीवन. पक्षांतर. नातीगोती संबंध. विकलांग विरोधी. भ्रष्ट आणि खरचीक निवडणूका. पैशांचा वापर. गुंडगिरी. आर्थिक संबंध. सामाजिक समस्या. समान नागरी कायदा अभाव. हिंदू जातीयवाद. मुस्लिम जातीयवाद. अनुसूचित जाती जमाती व भटक्या विमुक्त जाती व इतर मागासलेल्या वर्गातील जाती. वैधानिक व प्रशासकीय संबंध. वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी यांच्यामार्फत नियंत्रण. पंचायत राज प्रयोग. विविध पक्षाचे जाळे. गटबाजी. अशी विविध माध्यमातून आपल्या लोकशाहीचा गळा घोटून निवडणूका घेतल्या जातात 

            भारतात लोकशाहीला भविष्य आहे का ? असा प्रश्न अनेक राजकीय विचारवंत उपस्थित करतात परंतु भारतात निश्चित लोकांच्या मुळे भविष्य आणि भवितव्य आहे हुकूमशाही व ठोकशाही यांच्यापासून आपल्या लोकशाहीला शाबूत ठेवायचे असेल तर आजपर्यंत झालेल्या सर्व घटनांचे. परिशिलन करून भविष्यासयासंबधी. सावध व जागरूक राहणे आवश्यक लोकांच्या सहभागाशिवाय लोकशाही कधीही यशस्वी होऊ शकत नाही. म्हणून तर लोकशाही पुढे सातत्याने उभी राहणारी आव्हाने समजावून घेऊन ती पेलणयाचे सामर्थ्य आपल्या मध्ये निर्माण करणे गरजेचे आहे. भूतकाळात मूल्यमापन करून वर्तमान व भविष्यातील मार्ग कसा आखता येईल ह्याचा आपण आत्ताच विचार करणे गरजेचे आहे अगदी गांभिर्याने विचार केला पाहिजे

              आज सर्वत्र निवडणूका बिगूल वाजायला सुरुवात झाली. ग्रामपंचायत. पंचायत समिती. जिल्हा परिषद. नगरपालिका. महानगरपालिका. व विविध सोसायट्या. बॅका निवडणूका. एवढेच काय पण काॅलेज मधील निवडणूका. विद्यालय महाविद्यालय येथील चेअरमन निवडणूका. अशा विविध ठिकाणी निवडणूक प्रक्रियेला आपणांस सामोरे जावे लागते. राज्य घटनेने वय वर्षे १८ मतदान अधिकार बजाविणयासाठी. निश्चित केले आहे. निवडणूक याचा अर्थ असा होतो की आपल्यातील आपले दुःख सुख सामाजिक आर्थिक मानसिक शैक्षणिक अशा विविध ठिकाणी आपणांस मदत करणारा आपल म्हणणारा एकादा व्यक्ती संबंधीत आॅफिस कार्यालय असावा यासाठी निवडणूक ह्या जनमताचा वापर करून जनमताच्या कौलाने निवडला जाणारा लोकनिवडीतून निवडला जाणारा आपला हक्काचा माणूस म्हणजे. आपला सरपंच. उपसरपंच. नगरसेवक. अशी विविध पदांची निवड ही आपल्या मतांमुळे होते. थोड्या अमिषापोटी. जेवन दारु पार्टी. पैसा. दबाव. दहशत. गुंडगिरी. बॅंक पतसंस्था कर्जाच्या बोजा खाली आपण आपले अनमोल मत विकतो. आणि चुकीच्या निवडी करतो त्याचा आपणांस पाच वर्ष नाही तर बरेच वर्ष त्रास सहन करावा लागतो.  

              परवाचा करोना सारखा महाभयंकर महामारी संकटापासून आपण व सर्वसामान्य माणूस. शासनाने गाव वाडी वस्ती. तालुका जिल्हा राज्य देश यामध्ये टाळेबंदी जारी करण्यात आली होती तीन महिने सर्व जनता घरातच अडकून पडली होती. अशा बिकट परिस्थितीत आपण आपल्या मताने निवडणून दिलेला सरपंच उपसरपंच नगरसेवक. आपल्या दरवाज्यात आला होता का ? तुम्ही घरातच आहात उपाशी आहात का ? तुमचे कुटुंब लहान मुले म्हातारी लोक यांना वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिली कां ? कोरोना काळात रोगाचा प्रसार प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपल्या वार्डात रोगप्रतिकारक औषध फवारणी झाली का ? आपल्याला मिळणार या सर्व सेवा सोयी. मिळण्यासाठी निस्वार्थी पणे काम केले कां ? आपण एखादे काम घेऊन गेला तर ते वेळेत होत का ? नगरसेवक सरपंच उपसरपंच यांच्याकडे काम घेऊन गेल्यावर आरोपी सारखें उभं राहाव लागत कां ? गरजवंताला घरकुल योजना. संडास योजना. गरज आणि सापेक्ष पणे. दारिद्र्य रेषेखालील लोकांना ग्रामपंचायत नगरपालिका महानगरपालिका येथून येणारे अनुदान मिळते का ? ग्रामसभा. नगरपालिका महानगरपालिका बैठका मिटिंगमध्ये लोकांना सामिल केल जात का ? रेशन संबंधित अनेक अडचणी यांच्यासाठी सर्वे करताना माझा तुझा असा भेदभाव केला जातो का ? घरपट्टी पाणीपट्टी विज बिल. व अनेक कर यामधील सर्व अडचणी वेळी खरोखरच मदत केली जाते का? आपल्या गावाबद्दल. प्रभागातील सुख सोयी बाबत पत्र व्यवहार करण्याचा तुम्हाला अधिकार आहे का ? माहिती अधिकार कार्यकर्ते. समाजसेवक. यांना चांगली वागणूक दिली जाते कां ? महिलांना बचत गट हे महिला उध्दार करण्यासाठी गठीत केली जातात का राजकीय मतांसाठी केले जातात हे आपणांस कोणी सांगत का ? ग्रामपंचायत नगरपालिका महानगरपालिका येथे गोळा होणारा वार्षिक गोळा झालेला कर व खर्च तुमहाला माहीत आहे का ? आपल्या गावातील. शहरातील शासकीय संस्था यांच्या मालकीची मिळकत कोणती त्यापासून संबंधित विभागाला किती निधी गोळा होतो आपणास माहीत आहे का ? आपल्या गावातील शहरातील दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांचा सर्वे कधी आणि कसा झाला हे आपणास माहीत आहे का ? आपल्या गावात शहरांत शासकीय संस्थांकडून निघणारी विविध विकास कामे त्यात. गटर. रस्ते. बगिचे. स्मशानभूमी. समाजमंदिर. दलित वस्ती सुधार. यामधील सर्व कामांचे ठेके. संबंधित सरपंच उपसरपंच नगरसेवक त्यांनाच का दिले जातात आपण कधी चौकशी केली का ? आपण निवडून दिलेले सरपंच उपसरपंच नगरसेवक दाबण्याचे राजकारण. कुजक राजकारण करतात का ? ग्रामविकास व शहरी विकासासाठी वार्षिक किती निधी शासन देते. त्यातला आपल्या प्रभागासाठी किती निधी. आला आपणास माहीत आहे का ? अपंगांसाठी खर्च करण्यात येणारा निधी खरोखरच नैसर्गिक अपंगावरच खर्च केला जातो का तात्पुरत्ये अपंगत्व ही संकल्पना चुकिची आहे. त्यासाठी आपण कधी आवाज उठवला आहे का ? असे विविध प्रश्नाने आज सर्वजण व्यापले आहेत. आणि हे सर्व आपल्या नशिबाला येते ते म्हणजे आपण आपले मत विकले आणि चुकिचे लोक निवडली आपल्या डोक्यावर पाच वर्षे नाचायला. 

              खरोखरच आपण लोकशाही राज्यात आहोंत हे जर सिध्द करायच असेल तर. ज्या गावात तालुका जिल्हा राज्य देश शहर यामध्ये निवडणूका घ्यावयाच्या असल्यास. संबंधित विभागाकडून एक परिपत्रक जारी करण्यात यावे या परिपत्रकानुसार गावातील शहरातील लागू करण्यात आलेल्या निवडणूका व आत्ता त्या गांवात शहरात असणारे सरपंच उपसरपंच नगरसेवक यांच्या कामांचा व त्यांच्या कार्याचा अभिप्राय मागवा. आणि मग बघा जनतेला असा अधिकार आहे पण तो तुम्ही द्या आणि मग बघा किती जणांच्या बद्दल जनतेच्या मनात राग आहे हे तुम्हाला कळले. सरळ सरळ जनता निवडणुकीला विरोध करेल. आणि जनतेच्या मतांवर निवडून आलेले सरपंच उपसरपंच नगरसेवक पांढरे बगळे. यांची किंमत कळेल. आज एकादा सरपंच उपसरपंच नगरसेवक झाला की गाडी बंगले. स्थावर मालमत्ता अशी बेमाफी बेनामी संपत्ती गोळा करणारे यांना लगाम बसेल. खरोखरच लोकशाही असेल तर जनमत घया. परवा कोरोना काळात शासन कोणतेही जनमत न घेता टाळेबंदी जारी करत होते जर त्यावेळी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती यांना मा जिल्हाधिकारी साहेब यांनी परिपत्रक काढणे गरजेचे होते म्हणजे ग्रामस्थांना. व शहरातील जनतेला कळवा आम्ही आपत्कालीन परिस्थितीत यावेळी. या कारणासाठी बंद जमावबंदी करणारं आहोत त्याबद्दल जनमत काय येथे त्यावर निर्णय घेणे गरजेचे होते. म्हणजे कोणाचें मत सकारात्मक आहे कोणाचें मत नकारात्मक आहे याची पडताळणी करून निर्णय घेणे यालाच लोकशाही जीवंत ठेवणे असे म्हणलं पाहिजे नाहीतर हुकूमशाही परवडली 

            समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

काय आहे भारतीय संविधानाचे अनुच्छेद.१६२



काय आहे भारतीय संविधानाचे अनुच्छेद.१६२ 
शालेय शुल्क १५ टक्के कपात झाले का ?

          महाराष्ट्र शैक्षणिक संस्थांमधील सन २०२० ते २०२१ या शैक्षणिक वर्षांमधील शालेय शुल्कामध्ये १५ टक्के कपात करण्याचा शासन निर्णय फोल ठरला आहे. 

             राज्यात मार्च २०२० रोजी कोरोना सारख्या महाभयंकर महामारी संकटामुळे राज्यात टाळेबंदी जारी करण्यात आली सर्व शासकीय निमशासकीय कार्यालये. जिल्हा परिषद शाळा. हायस्कूल. काॅलेज महाविद्यालय विद्यालय. अॅकेडमी वर्ग. विविध शिकवणी वर्ग. आत्तापर्यंत पूर्ण बंद करण्यात आली. कारणं कोरोना संसर्ग वाढू नये लोकांचे व मुलांचे आरोग्य सुरक्षित राहावे. मुलांना कोरोना संसर्ग होऊ नये यासाठी. सर्व राज्यांत कडक टाळेबंदी जारी करण्यात आली होती. लोक टाळेबंदी मुळे घरातच अडकून पडली. लोकांना कामधंदा नाही हाताला काम नाही त्यामुळे हातात पैसा नाही त्यामुळे त्यांच्या वर व त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली त्यातच विविध बांधकाम कामगार. घरेलु कामगार. पापड लोणची चटण्या तयार करणारे उद्योग. धुनी भांडी करणार्या महिला. वाहन चालक मालक. अशा विविध घटकांवर उपासमारीची वेळ आली. एस टी कामगार यांना कामावरुन काढून टाकण्यात आले. त्यावेळी काही कामगार मिळेल ते काम करायला लागले. कोरोना टाळेबंदी काळात एकच व्यवसाय फुल्ल चालला तो म्हणजे भाजीपाला विक्री दुध अंडी अशा विविध जीवनावश्यक वस्तू विक्री करणारे लोक. किराणा दुकानदार यांनी कोरोना टाळेबंदी वेळेचे सोन केल दर वाढवून वस्तू विकल्या आणि पैसाच छापला. एकंदरीत कोरोना काळात जीवनावश्यक वस्तू विक्री करणारे. यांनी संकटात सापडलेल्या जनतेचा गैरफायदा घेतला शासन आदेश होता कोणी टाळेबंदी काळात जादा दराने विक्री करील त्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. पण ऐकतो कोण कारण दुकानदार आणि शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच साटंलोटं होतं. 

              वरील सर्व कोरोना काळात निर्माण झालेल्या परस्थितीचा परिणाम मुलांच्या शिक्षणावर झाला शाळा कॉलेज विद्यालये महाविद्यालये अॅकेडमी असे विविध शैक्षणिक संस्था बंद ठेवण्यात आल्या. त्यामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होण्यास सुरुवात झाली विविध शैक्षणिक संस्थांनी जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात वर्षांची शालेय फी भरून घेतली आणि मार्च पासून शाळा बंद करण्यात आल्या म्हणजे शैक्षणिक संस्थांना माहिती होत काय मार्च मध्ये टाळेबंदी लागणार आहे. म्हणजे एकंदरीत शाळा फायद्यात. शैक्षणिक संस्थांनी शिक्षणाचा पर्याय शोधला तो म्हणजे आॅनलाइन शिक्षण घेण्याचा. मग काय कोणाकडे गरिबी मुळे स्मार्ट फोन नाही. काही ठिकाणी आॅनलाइन शिक्षण घेण्यासाठी मोबाईल रेंज नाही. यामुळे अधिकच नुकसान झाले. मोबाईलसाठी काही मुलांनी आग्रह आपल्या आई वडील यांचेकडे धरला आणि मोबाईल परस्थिती मुळे मिळाला म्हणून आत्महत्या केल्या कोण जबाबदार आहे का ?

            शासनाने अखेर विविध शैक्षणिक संस्था सर्व अटि नियमानुसार चालू करण्याचा निर्णय घेतला पण आगोदर एक वर्ष घरातच असणारी मुले लगेच शाळेकडे वळणार का ? त्यांची शैक्षणिक रुची पहिल्यासारखी दिसणार कां ? असे एक नाही अनेक प्रश्न आ वासून उभे राहिले. त्यातच टाळेबंदी मुळे पालकांची बिघडलेली आर्थिक स्थिती वाहन कर्ज. घर कर्ज. व्यवसाय कर्ज. बॅंक कर्ज. भिसी कट्टा भिसी. सावकारी पाश. विविध फायनान्स कंपन्या. अशा विविध आर्थिक संस्थांचे कर्ज यामुळे लोकांचे कंबरडं मोडल आहे त्यातच विविध शैक्षणिक संस्थांची मनमानी पद्धतीने आकारली जाणारी फी. गेल्या वर्षापासून थकित असणारी शालेय फी. ही हजारांच्या घरात होती. शाळा चालू झाली पण विविध शालेय संस्थांनी दोन वर्षांची फी भरल्याशिवाय मुलांना शाळेत प्रवेश देण्यास नकार दिला. मनमानी कारभार. हीन वागणूक व्याज लावून वसुली सुरू झाली 

              शाळांच बाजूला ठेवा आपल्या गावातील ग्रामपंचायत नगरपालिका महानगरपालिका या क्षेत्रातील मिळकत धारकांना घरपट्टी पाणीपट्टी थकबाकी माफ करण्याची गरज होती पण गजब कारभार बघा माफ करायच राहिल असणार्या घरपट्टी पाणीपट्टी व विविध करावर दंड आकारण्यात आला आणि त्या दंडावर व्याज घेतलं हा सर्वात मोठा तुम्हाला आम्हाला फसविण्याचा फंडा आहे 

        मुलांची शिक्षणाची ही गैरसोय व शाळांचा मनमानी कारभार. बेकायदेशीर फी वसुली याचा सर्वात मोठा प्रश्न उभा राहिला यांवर तोडगा म्हणून शासनाने १२/ आॅगसट २०२१ रोजी शालेय शुल्कामध्ये १५/ टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला कोविड १९ या महामारी पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात २४/ मार्च पासून टाळेबंदी लागू करण्यात आल्यामुळे. त्याचा सामाजिक व आर्थिक पातळीवर मोठा प्रतिकूल परिणाम झाला आहे. या मुळे सर्व अर्थव्यवस्था मोडकळीस आली असून अनेक पालक त्यांच्या स्वयम् अर्थ सहहय खाजगी शाळेत शिक्षण घेणा-या पाल्याच्या फी भरण्याच्या स्थितीत नाहीत त्यामुळे या असाधारण परस्थिती शाळची फी. कमी करण्याबाबत / माफ करण्याबाबत अनेक पालक. सामाजिक संस्था. यांनी निवेदने शासनास दाखल केली होती 

      शैक्षणिक वर्ष २०२०/२१ विद्यार्थ्यांच्या पालकांनी या अधिनियमान्वये मान्यता दिलेल्या शाळेच्या शुल्क संरचनेनुसार. शुल्क प्रदान केलेलें आहे. तथापि राज्यात दि २४ मार्च २०२० पासून कोविड १९ या सार्वत्रिक साथरोगाचया प्रादुर्भावामुळे आणि या साथरोगाचे नियंत्रण ठेवण्यासाठी शासनाने टाळेबंदी घोषणा केल्यामुळे बहुतांश कालावधीसाठी शाळा बंद होत्या तसेच प्रवासावर किंवा येणयाजाणयावर देखील निर्बंध होते. परिणामी या सार्वत्रिक साथरोगामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे विद्यार्थांना प्रत्यक्षपणे. शाळेत उपस्थित राहता येऊ शकले नाही आणि ज्या विवक्षित शैक्षणिक सुविधांसाठी शुल्क आकारले गेले होते आणि काही प्रकरणांत असे शुल्क प्रदान केले होते. त्या शैक्षणिक सुविधांचा वापर झाला नाही शाळांनी वर्ग देखील आॅनलाइन किंवा आभासी अध्ययन किंवा ई अध्ययन पध्दतीने. घेतलें होतें. शैक्षणिक सुविधांचा लाभ घेणे किंवा वापर करणे विद्यार्थ्यांना शक्य नसताना शुल्क आकारने ही बाब शिक्षणाच्या नफेखोरी मध्ये किंवा व्यापारी करणात मोडत असून सुप्रसथापित. कायद्याने त्यास स्पष्टपणे मनाई केलेली आहे

            दुसरया बाजूला कोविड १९ महामारिचया पार्श्वभूमीवर अनेकांना आपले रोजगार गमावावे लागले आहेत व मोठ्या प्रमाणात व्यवसायावर देखील प्रतिकूल परिणाम झालेला आहे या सर्व परस्थिती मुळे पालकांची आर्थिक स्थिती खराब झाली असून अनेक पालक शाळांची संपूर्ण फी १००/ टक्के भरण्याच्या परिस्थितीत नाही त्यामुळे ज्या शैक्षणिक सोयी सुविधांचा वापर करण्यात आलेला नाही त्यासाठी घेण्यात येणारे शुल्क कमी अथवा माफ करण्यासाठी शासन निर्णय जारी करण्यात आला आहे किंवा त्या शुल्कामध्ये ५०/ टक्के सवलत देण्यात आली पाहिजे याबाबत सर्व शैक्षणिक संस्थांना कळविले आहे

      कोविड १९ सार्वत्रिक साथरोग प्रादुर्भाव अजूनही सुरू आहे आणि शाळांनी अद्याप नेहमीच्या प्रत्यक्ष पध्दतीने कामकाज सुरू केलेलें नाही तसेच अनेक शाळांमध्ये कार्यकारी समित्या गठीत करण्यात आलेल्या. नाहीत. राज्यातील खाजगी. शाळांची मोठी संख्या विचारात घेता शाळा निहाय न वापरलेल्या शैक्षणिक सोयी सुविधा करिता प्रत्येक शाळेची किती बचत झाली आहे याची गणना करणे व्यवहारिक दृष्ट्या शक्य नसलेमुळे तसेच यासाठी बराच कालावधी लागण्याची शक्यता विचारात घेता प्राप्त परिस्थितीत पालकांना तातडीने काही प्रमाणात शैक्षणिक शुलकाबाबत दिलासा देणें गरजेचे आहे त्यामुळे एकवेळ ची बाब म्हणून मा सर्वोच्च न्यायालयाने फि कपातीबाबत घेतलेल्या निर्णयाचा आधार घेऊन शैक्षणिक वर्ष २०२१ ते २०२२ या शैक्षणिक वर्षात एकूण निश्चित करण्यात आलेल्या फी चया १५ टक्के फी कपात किंवा माफ करण्याचा निर्णय घेतला आहे

            भारतीय संविधानाच्या अनुच्छेद १६२ नुसार ज्या बाबतीत राज्य विधीमंडळास कायदे करण्याचा अधिकार आहे अशा बाबतीत राज्य शासनास कार्यकारी आदेश काढण्याचा अधिकार आहे

                 सन २०२१ व २०२२ या शैक्षणिक वर्षासाठी एकवेळची बाब म्हणून सर्व मंडळाच्या व सर्व माध्यमाच्या शाळांना खालील प्रमाणे निर्देश देण्यात येत आहेत

(१) सन २०२१ व ‌ २०२२ या शैक्षणिक वर्षासाठी निश्चित करण्यात आलेल्या एकूण फी मध्ये १५ टक्के कपात किंवा माफी करण्यात यावी

(२) यापूर्वी ज्या पालकांनी पूर्ण फी भरलेली आहे अशी अतिरिक्त फी पुढील महिन्यात किंवा तिमाही हप्त्यात किंवा पुढील वर्षी शाळा व्यवस्थापनाने समायोजित करावी किंवा याप्रमाणे फी समायोजित करणे शक्य नसल्यास फी परत करावी

(३) कपात किंवा माफी करण्यात आलेल्या फी बाबत विवाद निर्माण झाल्यास असा विवाद यथासथिती संबंधित विभागीय शुल्क नियामक समीतीकडे किंवा शासन निर्णय क्र तक्रार २०२०प्रक्र ५० एस डी -४ दिनांक २६ फेब्रुवारी २०२० अन्वये गठित विभागीय तक्रार निवारण समीतीकडे दाखल करण्यात यावा व याबाबत विभागीय शुल्क नियामक समीतीने किंवा विभागीय तक्रार निवारण समीतीने घेतलेला निर्णय अंतिम राहील

(४) कोविड १९ महामारी काळात विद्यार्थ्याने शाळेची फी थकित फी भरली नाही म्हणून शाळा व्यवस्थापन अशा कोणत्याही विद्यार्थ्याला प्रत्यक्ष अथवा आॅनलाइन पध्दतीने शिक्षण घेण्यास किंवा परिक्षेल बसण्यास प्रतिबंध करता येणार नाही किंवा अशा कोणत्याही विद्यार्थ्यांचा निकाल रोखता येणार नाही 

(५) वरिल आदेश सर्व शासकीय निमशासकीय सर्व शैक्षणिक माध्यमांना शाळांना लागू राहतील

(६) हे सर्व शासन आदेश तात्काळ अमलात आणणे आवश्यक व बंधनकारक आहे

           आत्ता शाळा चालू झाल्या आहेत कोणतीही शैक्षणिक संस्था फी साठी मुलांची अडवणूक करत असेल तर आजच संबंधित जिल्हाधिकारी यांचेकडे लेखी तक्रार करा आणि सर्व शैक्षणिक संस्था यांनी शिक्षणा सारख्या पुण्य कर्माचा बाजार मांडू नका

          समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार जाहिरात प्रसिद्ध वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

आपली भाषा. आणि आपले मत

 


आपली भाषा आणि आपले मत

                लिखित भाषा कथित भाषा. सांकेतिक भाषा असे भाषेचे ज्ञान आहे. नेपाळी. असमिया. बंगाली. गुजराती. बोडो. डोंगरी. कन्नड. काश्मीरी. मराठी. उडिया. संस्कृत. तमिळ तेलुगू मल्याळी. सिंधी. सामान्य भाषा. बोली भाषा. विभाषा. राष्ट्रभाषा. राजभाषा. साहित्याची भाषा. कृत्रिम भाषा. संपर्क भाषा. अश्या विविध माध्यमातून आपण आपल्या मायबोली भाषेचा वापर करत असतो 

  भाषा हे इतरांशी संपर्क साधण्याचे व आपले विचार व्यक्त करण्याचे साधन आहे. पण आपली भाषा ही आपल्या व्यक्तीमत्त्वाचाच म्हणून म्हणतो तसं जणू एक भाग असते. आपण लहाणपणापासून आपल्या भाषेच्या सहवासात राहतो. वाढतो त्यामुळे सवभाषेशी आपल्या मनाचे अतूट नाते निर्माण होते. कारणं आपण आपल्या सवभाषेतून आपले विचार आपण प्रभावी पणे मांडू शकतो. त्या भाषेतील प्रतिमा शब्दप्रयोग हे सहजपणे आपल्या पचनी पडलेले असतात. एक साहित्यिक आणि सांस्कृतिक प्रपंच त्या भाषेशी जोडली गेलेली असते. म्हणूनच आपल्या भाषेबद्दल आपल्याला नैसर्गिक जवळिक वाटते. सवभाषेबधदल आपल्या मनात खोलवर निष्ठा असते. परभाषिक प्रदेशात राहतात. वावरताना आपले सवभाषाप्रेम जास्त पक्के बनते. आपण आपली भाषा बोलणारी मंडळी शोधू लागतो. त्यांच्या सहवासात राहतो. एकत्र अणि एकाच वसाहतीत राहतो. सवभाषिक व्यक्ति भेटली की व परभाषिका देखील आपण चटकन आपल्या भाषेत बोलतो. सवभाषेबधदलचे प्रेम इतर मार्गांनी व्यक्त होते. उदा. आपण सहसा इतर भारतीय भाषा शिकत नाही. अगदी परप्रांतात राहवे लागले तरी कामापुरती आपण तेथील भाषा शिकतो पण आपली भाषा मायबोली विसरत नाही. हा आपल्या भाषेबद्दल आपला अभिमान असतो. अन्यथा मात्र मराठी माणूस तमिळ शिकला किंवा कन्नड. आसामी शिकला अशी उदाहरणे विरळच. इतर भाषेचे स्वरूप त्यांची लिपी त्या भाषेमधील साहित्यिक यांच्याबद्दल आपल्याला काही माहिती नसते. आणि त्याची माहिती असावी असे आपणांस वाटत नाही खरेतर आपला सवभाषिमान हा इतर भाषाबधदल आपल्या पूर्वग्रह अज्ञानावर आधारित असतात

              विशिष्ट भाषा ही आपण विशिष्ट धर्मियांशी जोडून टाकतो. उर्दू ही मुस्लिम भाषा किंवा पंजाबी ही शिख लोकांची भाषा असे आपले समिकरण असते. किंवा उत्तरेकडील सर्व लोक हिंदी भाषिक असतांत असाही समज असतो. आपली भाषा सोडून इतर भाषा मागासलेल्याच आहेत असेही आपण मांनतो. मराठी माणूस हिंदीची ही टवाळी करतो आणि दक्षिणात्य भाषाविषयी त्याला पूर्वग्रह असतो. गुजराती. मारवाडी. या भाषा आपण नुसत्याच व्यापारी भाषा समजतो. असे सर्वच भाषिकांचे होते. दक्षिण भाषेमध्ये आपसात जणू काहीच फरक नाही असे धरून आपण त्याची टिंगल करतो. परभाषेविषयी सुप्त आक्रस काही वेळा या पूर्वग्रहाचया पाठीशी असतो. तसेच भाषेबरोबर येणारा प्रांतिक अभिमान हेसुद्धा परभाषा द्वेषाचे कारणं असते. तामिळ लोकांबद्दल किंवा मल्याळी लोकांबद्दल असणार्या रागामुळे आपण त्यांच्या भाषा निकालात काढतो. परप्रांतीया बद्दल. दुरावरावयामुळे. आणि स्पर्धेमुळे त्यांच्या भाषाविषयी आपल्याला सहानुभूती वाटत नाही

      भारतीय भाषा बद्दल असा दुरावा असला तरी इंग्रजी भाषेला आपण वेगळं माप लावतो. ती परकी भाषा आहे असे आपण फारसं मानत नाही. पण उर्दू भाषा परकी आहे ती मुस्लिम धर्माची आहे तर त्याबद्दल आपल्या मनात एवढा राग का ? आपण इंग्रजी सारख्या परक्या भाषेला जागतिक भाषा किंवा ज्ञानभाषेचा दर्जा देतो एकंदरीत इंग्रजी भाषेबद्दल आपल्या मनांत भावना मोठ्या गंमतीचया असतात. या भाषेबद्दल काय भुमिका घ्यावी याबाबत आपला नेहमी गोंधळ उडतो. परकी भाषा म्हणून तिची हकालपट्टी करावी की स्पर्धेत टिकून राहण्यासाठी ती भाषा आत्मसात करावी याबद्दल आपली भूमिका द्विधा असते. मात्र आपल्या समाजात इंग्रजी भाषेला प्रतिष्ठा आहे. देशी भाषापेक्षा इंग्रजी साहित्य. वर्तमानपत्राते. इत्यादी अधिक दर्जेदार आहेत. अशी आपली समजूत असते. इंग्रजी येणार्याला. बरेच काही समजत असणार असे आपण गृहीत धरून चालतो. त्यामुळे कटाक्षाने इंग्रजी शिकणारा. इंग्रजी बोलणारा. इंग्रजी वाचणारा. असा वर्ग आपल्या समाजात निर्माण झालेला दिसतो. इंग्रजी मुळे या वर्गामध्ये आत्मविश्वास आणि अहंगंड निर्माण झाला आहे. या वर्गातील लोक गप्पाही इंग्रजी भाषेतच मारतात. आणि आपल्या भावनाही इंग्रजी भाषेत व्यक्त करतात. घरात कुटुंबियांनी एकामेकाशी इंग्रजीत बोलणे हा या वर्गाचा एक मुख्य गुणधर्म असतो. त्यांच्या दुसर्या टोकाला इंग्रजी नीट न येणारा मोठा जनसमुदाय असतो. पण त्यालाही हे आंगलभाषावरचसव. मान्य असल्यामुळे आपल्याला इंग्रजी येत नाही म्हणून तो नयुनगंडाने पछाडलेला असतो. इंग्रजी न येणे तोही कमीपणाचं मानतो. मग तोडकमोडक इंग्रजी बोलन वाचन. किंवा इंग्रजी शब्द वापरण्याची सवयी लावून या नयुनगंडाची भरपाई करण्याचा प्रयत्न केला जातो. कित्येक वेळा इंग्रजी विषयीचे प्रेम सवभाषाविषयीचे. सवभाषाप्रेम मात करते किंवा खरे तर अनेक जण इंग्रजी भाषेला आपली भाषा मानतात

          भाषेप्रमाणे आपल्याला आपल्या प्रदेशांचा अभिमान असतो. त्या त्या प्रदेशांचा निसर्ग तिथली संस्कृती. प्रादेशिक इतिहास. कला विज्ञान. हे सर्वच आपल्या अभियानाचा विषय असतात. म्हणूनच आपली महाराष्ट्रीय किंवा उडिया किंवा बंगाली अशी खास प्रतिमा तयार होते. बहुतेक वेळा हि प्रादेशिक अस्मिता भाषेवरील निष्ठेची सलगनता असतें. भाषेखेरीज या प्रादेशिक अस्मितेचे प्रगटीकरण होते ते आपल्या इतिहासातून आपल्या प्रदेशात वीरश्री. स्वातंत्र्य प्रेम. धाडस. कल्पकता. यासारखे गुण कसे आढळतात हे आपण ऐतिहासिक दाखलयानिशी दाखवून देत असतो. या इतिहासाचा तपशिल आपल्याला फारसा ज्ञात नसतो. पण इतिहासाच्या ढोबळ प्रतिमा आपला प्रदेशभिमान घडविण्यास पुरेशा असतात. मुघल सत्तेशी आपणच टक्कर दिली असा अभिमान मराठी माणूस बाळगतो त्यातूनच मग त्या त्या भागातील ऐतिहासिक व्यक्ती या प्रादेशिक अस्मितेची प्रतिके बनतात महाराष्ट्र म्हणलं की शिवाजी महाराज हा आपल्या प्रदेश अभिमानाचा अविभाज्य घटक आहे भाग आहे. तीच गोष्ट महाराणा प्रताप बाबतींत किंवा इतर वीरपुरुष संत समाजसुधारक या सर्वांच्या बाबतीत घडते या प्रादेशिक अस्मिते मध्येही इतर प्रदेशापेक्षा आपण श्रेष्ठ आहोत अशी धारणा आपणा मध्ये घर करून बसली आहे

          समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना

 


महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना

                शहरांमधील वाढती लोकसंख्या यामुळे तेथे उपलब्ध असणाऱ्या लोकांना पुरेसा रोजगार उपलब्ध होत नाही त्यातच शहराकडे रोजगाराच्या शोधात ग्रामीण भागातील लोकांचा लोंढा. यामुळे राहण्यासाठी पुरेशी जागा नाही त्यामुळे वाढती झोपडपट्टी. वाढती गुन्हेगारी. यात होणारी वाढ व लोकांचे कष्टमय जीवन याचा विचार शासनाने करून ज्या त्या भागातील लोकाना त्याच भागात पुरेसा रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामीण भागातील लोकांच्या हितासाठी व त्यांना पुरेसा रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी # महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना # या नावाने योजना राबविण्यात आली. 

              # हरघर गोठे. घरघर गोठे. पाणंद रस्ते. खडीकरण योजना. अशा विविध योजना राबविण्यात येतात त्या माध्यमातून सर्व लोकाना ग्रामीण विकास योजना आणि लोकांच्या हाताला रोजगार हे तत्व आहे. यासाठी शासनाने ( दि ०९ आक्टेबर २०१०)( दि ०१ आक्टेबर २०१६)( दि ०५ नोव्हेंबर २०१८)(दि ०५/०८/२०२०)( दि ०२/०९/२०२०) असे वेळोवेळी शासन जारी केले आहेत त्यानुसार महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण मजूरांना रोजगाराची शाश्वती हमी मिळावी व त्या माध्यमातून भत्ता निर्मिती व्हावी या उद्देशाने महाराष्ट्र रोजगार हमी अधिनियम १९७७ अन्वये महाराष्ट्रात रोजगार हमी योजना कार्यान्वित करण्यात आली आहे तदनंतर # महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना # अधिनियम २००५ अंतर्गत राज्यांमध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना टप्याटप्याने सुरू करण्यात आली असून दि ०१ एप्रिल २००८ पासून संपूर्ण राज्यात कार्यान्वित करण्यात आली आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेशी संबंधित सुचना. / निर्देश संदर्भित शासन परिपत्रक अन्वये नियोजन विभागाकडून देण्यात आलेले आहेत

          महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचा मुलभूत उद्देश ग्रामीण भागातील पौढ व्यक्तिंना अकुशल कामांची मागणी केल्यानंतर कामे उपलब्ध करून देणे हा आहे. त्याचबरोबर कायमस्वरूपी मालमत्ता निर्माण करून सामाजिक पायाभूत सोई सुविधा उपलब्ध करून देणे हा ही या योजनेचा उद्देश आहे. सधसथिती राज्यांमध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत विविध प्रकारची कामे घेण्यात येत असून या माध्यमातून सामाजिक सार्वजनिक व वैयक्तिक मालमत्तेचे निर्माण करण्यात येत आहे

     सदर योजनेअंतर्गत अनुज्ञेय असलेली कामे ही ग्रामीण भागात रोजगार निर्मिती व शाश्रवत विकासाच्या दृष्टीने सहहयभूत ठरली आहे. सधसथिती सुरू असलेल्या कोविड १९ महामारीचया पार्श्वभूमीवर सदर योजना अधिक प्रभावीपणे राबवून रोजगार निर्मिती करणे त्याचबरोबर शेतकरी यांचे आर्थिक उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करणे नितांत गरजेचे आहे.

      पुणे जिल्हा आणि कोल्हापूर जिल्हा परिषद यांनी हरघर गोठा घरघर गोठा हा उपक्रम अगदी सापेक्ष पणे व यशस्वी रित्या राबविला आहे. तसेच कोल्हापूर जिल्हा परिषद यांनी पाणंद रस्ते व इतर रस्ते खडीकरण करणे. दलित वस्ती सुधार. प्रास्तावित केले आहेत. सदर उपक्रम शेतकरयासाठी वैयक्तिक भत्ते निर्माण करण्याबरोबर रोजगार निर्मिती होणार आहे सदर उपक्रम अंतर्गत 

(१) गाय म्हैस यांचेसाठी पक्के गोठे. गवहाण आणि शेण मलमूत्र संचय वेगळी सोय

(२) बचत गटाच्या जनावरांसाठी सामुहिक गोठे बांधणे

(३) कुक्कुटपालन शेड ( निवारा ) बांधणे

(४) शेळी पालन निवारा

       इत्यादी मालमत्तेची निर्मिती करणे सदर कामामध्ये केंद्र शासनाच्या निकषाप्रमाणे अकुशल कुशल प्रमाण योग्य प्रमाणात राखण्यासाठी प्रतयेक लाभार्थ्यांना गोठ्याच्या कामाबरोबरच बांधावर किंवा क्षेत्रावर कमीत कमी २०/२५ फळझाडे / वृक्ष लागवड करणेसाठी मनरेगा अंतर्गत अतिरिक्त काम करावे लागते. तसेच गावांमध्ये रस्ते खडीकरण कामे हाती यावीत सदर कामाबरोबरच मृद व जलसंधारण गाळमुकत धरणांची कामे घरोघरी शोष खड्डे व घरकुल बांधणे इत्यादी कामेसुद्धा जलसंधारण. इत्यादी कामे या योजनेनुसार हाती घ्यावी

              संदर्भ क्रमांक ५ अन्वये दिनांक २ सप्टेंबर २०२० या शासन परिपत्रकातील परिशिष्ट ९ मध्ये म ग्रा रो ह यो अंतर्गत घेण्यात येणार्या महत्वाचा एकूण ९० कामाची मजुरी कुशल खर्च निहाय यादी देण्यात आलेली आहे. सदर यादीतील अनुक्रमांक ७२ मध्ये रस्ता खडीकरण विशेषतः पाणंद रस्ते तयार करणे.या कामाचा समावेश करण्यात आलेला आहे उपरोक्त नमूद कामे घेतल्यास कुशल अकुशल खर्चाचे प्रमाण राखण्यास मदत होते

              सदर योजनेअंतर्गत अभिनव उपक्रमांद्वारे मागेल त्याला काम मिळेल लोकांचे स्थलांतर थांबविले जाईल कुटुंबाचा आर्थिक स्तर उंचावेल शेतकरी स्वावलंबी होईल आणि गावे समृद्धी कडे वाटचाल करतील तसेच सदरची कामे घेतल्यास वैयक्तिक कामाबरोबर सामुहिक कामे घेवून गावांचा विकास साधला जाईल कुशल अकुशल (६०/४०) प्रमाण राखले जाईल

         आजच आपल्या ग्रामीण भागातील ग्रामपंचायत कार्यालय येथे भेट देऊन आपल्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत आजच आपले ग्रामसेवक यांनी भेटून आपले जाॅब कार्ड तयार करा आणि आपल्या हक्काचे काम मिळवा. महिन्यात पंधरा दिवस काम शासन किंवा ग्रामपंचायत देवू शकत नसेल तर तुम्हाला बेरोजगारी भत्ता देणे बंधनकारक आहे आपल्या ग्रामीण भागात गावात कोणी बोगस जाॅब कार्ड काढून शासनास खोटी माहिती देऊन शासनाची फसवणूक करत असेल तर त्याची तक्रार पोलीस ठाण्यात करा आणि आपले कर्तव्य पार पाडा

      समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९ 

माहिती अधिकार दाखल केला असेल तर त्याचे सापेक्ष उत्तर देताना संबंधित आॅफिस चे लेटरहेड वर देणे बंधनकारक आहे

सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा

  सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा            अनुसूचित जाती जमाती. इतर मागासवर्गीय जाती जमाती. भटक्या विमुक्त...

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या