Showing posts with label NCP. Show all posts
Showing posts with label NCP. Show all posts

कार्यकर्त्यांचे वाईट दिवस ?

 


वाईट दिवस कार्यकर्त्यांचे 

          जन्माला आला की त्याला स्वातंत्र्य व सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळतो आणि तो संविधानाने आपणास बहाल केला आहे जात. धर्म लिंग रंग वंश. अशा सगळ्या भेदाचया पलिकडे जाऊन समता पूर्ण वातावरण आनंदानें जगण्यासाठी पोषक सभोवताल मिळणे हा सुद्धा आपला परम अधिकार आहे. तो आपणांस जन्मजात मिळतो. व्यक्ती जन्माला आल्यानंतर त्याला बालवयात सर्व सुविधा मिळण्याचा व अधिकार मिळतोच आणि मिळालेला असतोच. शिक्षणाचा अधिकार. रोजगार अधिकार. विकासाच्या अधिकार. व्यवसायाचा अधिकार मतदानाचा अधिकार. मुक्तपणे भ्रमण संचार अधिकार. मालमत्ता व साधनें बाळगण्याचा अधिकार. आरोग्यपूर्ण जीवन जगण्याचा अधिकार. शोषणापासून मुक्त राहण्याचा अधिकार. राजकीय दबाव. शासकीय अधिकारी व कर्मचारी यांचेकडून मागणी मागण्याचा अधिकार. असे एक नाही अनेक अधिकार जन्मातच माणसाला मिळतता. सर्वसामान्य आणि लोकशाही देशातील नागरिक म्हणून पुढे त्याला बोलण्याचा लिहिण्याचा अधिकार. व विविध माध्यमातून अभिव्यक्ती होण्याचा. संघटित होण्याचा. अन्यायाविरुद्ध आवाज उठविणे. अहिंसक मार्गाने आपले म्हणने मांडण्याचा अधिकार मिळालेलाच असतो हे सर्व अधिकार आपणांस सभ्य नागरि समाजांत आपोआप बहाल झालेले असतात. तरीही आपल्यापैकी अनेकांना वरील अधिकारांचा पूरेपूर लाभ मिळत नाही आणि आपण तो मिळविण्यासाठी प्रयत्न सुध्दा करत नाही. अनेकांना समतेचा अधिकार असून सुद्धा. जात धर्म. अशा भेंदाना बळी पडावे लागते. शिक्षणाचा अधिकार असून सुद्धा आज कित्येक मुलं. लाखांच्या घरात मुल आज शासनाच्या विविध शैक्षणिक संस्था सेवा सुविधा असून सुद्धा बालकांना गरिबी मुळे शाळा किंवा विद्या मिळत नाही. हसण्या बागडणयाचया वयांत कोवळ्या वयात मुलांना अवैध धंदे. व इतर ठिकाणी कामगार म्हणून वेठबिगारी करावी लागते त्यासारखे वाईट नाही. बालिक आणि महिला यांचा कामाच्या ठिकाणी उच्च पदावरील अधिकारी व कर्मचारी यांचेकडून होणरया शोषणाला बळी पडत आहेत आपण रोज वृतमानपत्रात वाचतो आणि विसरून जातो. सामान्य नागरिकांना काय पाहिजे असतं. दोन वेळचे अन्न. अंगभर कपडे. डोक्यावर आपल सवताच आणि हक्काचं घर. आज अशा सर्वसामान्य जनता वंचित आहे. शेतीतून निर्माण संपत्तीचे शोषण. होत रहावी अशी पध्दतशीर व्यवस्था. असल्याने ग्रामीण भारतातील शेतमजूर लोक शहरांत स्थलांतरित होऊन झोपडपट्टीत नरकयातना भोगत आहेत इतके खराब जीवन जगत आहेत त्यांची आपण कल्पना सुध्दा करू शकत नाही त्याचबरोबर आदिवासी भटके विमुक्त आणि अल्पसंख्याक लोकांना मुळ सामाजिक प्रवाहात कसलेही स्थान नाही. जातीय व धार्मिक हिंसाचार अतिरेकी हल्ले यात मोठा राजकीय नेते पुढारी कधीं भरडले आहेत का नाही सर्वसामान्य माणूसच यात भरडला जात आहे. मग आंदोलन मोर्चा वेळी होणारी पोलिस कारवाई कार्यकर्ते यांचेवर होते आणि कार्यकर्ते असतांत ते म्हणजे सर्वसामान्य. यामुळे राजकीय व संघटना सेवाभावी संस्था युनियन व इतर पक्षाचे गट यांच्यामुळे सामाजिक सुरक्षितता हा मानवीय अधिकार पायदळी तूडवला जात आहे 

                  मग आपणांस असा प्रश्न पडतो की इतके भरपूर मानवी अधिकार कार्यकर्त्यांना असताना आमच्या समाजात इतका मोठ्या प्रमाणात अन्याय आणि अत्याचार का ? मनाला अस्वस्थ करणारी ही विसंगती का आहे ? या आमच्या प्रश्नाला अनेक कंगोरे व अनेक पदर आहेत. परंतु मूळ प्रश्न असा गंभीर आहे त्याचा विचार सर्व पक्ष. संघटना. सेवाभावी संस्था. युनियन. सामाजिक संघटना. इतर गट. अपक्ष नेते यांच्या संघटनेना. सत्ताधारी लोकांच्या संघटना यामध्ये मृगजळामागे धावणारे कार्यकर्ते व आम्ही अधिकारांची भाषा भरपूर करतो परंतु आम्ही आमचें कर्तव्य विसरतो आणि पदाला बळी पडतो आणि स्वताच्या स्वाभिमान विकून एखाद्याच्या ताटाखालचे मांजर म्हणजे कार्यकर्ते होतो भारतीय राज्यघटनेने. माणसाला माणसा प्रमाणे वागणूक व अधिकार कर्तव्य आम्हास सांगितली आहेत ती आपण व आपल्या डोक्यावर थैमान घालणारे राजकीय व अन्य लोक पाळतता का ? जो कार्यकर्ता किंवा समाज आपले हक्क व अधिकार विसरतो त्या समाजास कार्यकर्त्यांना आपले हक्क व अधिकार सहजासहजी मिळत नाहीत हा सर्व दोष आपलाच आहे कारणं गाफिल आणि झोपलेल्या व्यक्तिच्या घरात चोरी होते तो सतत जागरूक असतो व सावध असतो. त्यांच्या घरात चोरी करण्याचे धाडस चोर करत नाहीत याचा साधा आणि सोपा अर्थ असा होतो की आपणांस कोणाचेही कार्यकर्ते होण्यासाठी समाजांत आपल्या आजूबाजूला असे चोर फिरत असतात. तुमच काम चांगल आहे. पैशांचे बळ आहे. माणसांचे बळ आहे. गुंडगिरी बेकायदा मालमत्ता. घरची परिस्थिती बेताची आहे. आहे यांच्यावर अशा चोरांचे लक्ष असते. म्हणून आपण गाफिल न रहाता सतर्क राहण्याची गरज आहे या उलट या चोरांना आत्ता रान मोकळे झाले आहे कारण आमचा समाज जागरूक नाही. धर्म. जाती. पंथ. संप्रदाय. प्रांत. भाषिक. शैक्षणिक सांस्कृतिक जातीयवाद निरक्षरता. फुटिरता. अशा विषमतेच्या विषाने जो मुरचित झालेला आहे म्हणजे कार्यकर्ते होताना. जेवन दारु काही थोडे आर्थिक अमिष. यामुळे तो भुललेला आहे. संविधानातील समतेच्या मुलयाचया नेहमीचं येथे व आपल्या दलबदलू वागण्यामुळे अनादर झाला आहे. आपण जागरूक नसल्याने समाजांचे आर्थिक. राजकीय. सामाजिक शोषण होताना आपण बघतो गरीबांचे अज्ञान व हतबलता व मध्यमवर्गीय आत्मकेंद्रित वृत्ती यामुळे मानवीय अधिकारांचे रक्षण करणारे सकारात्मक दबावगट राहिलेले नाहीत. ज्याप्रमाणे अंधार्या रात्री सुसाट वाहत असताना हातांची ओंजळ करून दिवा त्याला वारा लागू नये दिवा विजू नये यासाठी आपणच प्रयत्न करणे गरजेचे आहे. नाहीतर भविष्यात आपण आणि आपली येणारी पिढी अंधारात चाचपडत राहणार आहे. आज वादळात सापडलेल्या दिल्यासारखी परस्थिती कार्यकर्त्यांची झाली आहे. हा दिवा विजू नये म्हणून कर्तव्याशील ओंजळी म्हणजे या रस्ता भटकलेलया कार्यकर्त्यांना रस्त्यावर आणण्यासाठी ओजळी रुपी मार्गदर्शन करणे गरजेचे तरच कार्यकर्ता रूपी दिवा वाचणार आहे 

                  कार्यकर्ता म्हणजे सर्व आणि सांगेल तसे म्हणजे हजुरी करण्यासारखे काम करणारा म्हणजे कार्यकर्ता. काही ठिकाणी आपण बघतो काही कार्यकर्ते परस्थिती मुळे कार्यकर्ते याला बळी पडले आहेत. तर काही पक्षाचे नेते पुढारी यांच्या भुरभुलया आश्वासनांना बळी पडतात. तर काही जण फक्त फक्त पदासाठी आणि खोटा आव आणण्यासाठी कार्यकर्ते होतात मग काय आपल्या गाडीवर अमुक कार्यकर्ता. टि शर्ट. विविध ग्रुप तयार होतात. आंदोलन मोर्चा दंगेधोपे जाळपोळ यासाठी अशा कार्यकर्त्यांचा वापर केला जातो. त्यावेळी त्यात शिक्षण पूर्ण झालेले तरूण यांच्यावर पोलिस केस दाखल होते भविष्यात कोठेही नोकरी नाही जनसामान्यांच्या मनात प्रतिष्ठा खराब त्यामुळे लग्न नाही मग. व्यसनाधीनता. गुंडगिरी अवैध धंदे. अशा विविध मार्गाला असे तरूण लागतात. त्यावेळी ज्या नेत्यांचा पक्षाचा संघटनेचा सेवाभावी संस्था युनियन यांचा तो कार्यकर्ता आहे तो प्रमुख बघायला सुध्दा कोर्टात पोलिस स्टेशनला जात नाही त्यावेळी सवताची जमीन गहाण ठेवून विकून आपल्या मुलांना कचेरीतून सोडवून आणणारे आई वडील मी बघितले आहेत. मग आत्ता कुठं गेल या कार्यकर्त्यांचे नेते ? विचार करण्याची गरज आहे. डिजिटल वर नाव आल की कार्यकर्ता स्वताला नेता समजतो आई वडील रोजगार करतात. मग पोरग कोणाचीतरी कार्यकर्ता झाला व्याजाने कर्ज काढून गाडी घेवून देतात मग गाडी प्रमाणे कपडे बुट सोबत असणारे कार्यकर्ते यांचा खर्च मग काय सहा महिने ते एक वर्षात शेती घर विकलेले मी कार्यकर्ते बघितले आहेत. आत्ता कुठ आहे नेता तुमचा ? प्रश्न मनाला करा उत्तर निश्चित मिळेल? 

                  आजच पक्का निर्धार करा निवडणूक आली आहे प्रत्येक जण तुम्हाला आपल समजायला लागलंय. पण कोणत्याही भुलभुलयाला बळी पडू नका जर कोणी म्हणत असेल तुमच सामाजिक कार्य चांगल आहे तुम्ही आमच्याकडे या. तर तुम्ही त्यांना विचारा की तुम्ही आमच्यासाठी काय करणारं ? पद नको ? पदातून नोटा पडत नाहीत ? आमच्या हाताला काम द्या एकादा सक्षम व जगण्याचा पकका रोजगार धया. एकादा उधोग उभा करून आम्हाला चार पैसे मिळविण्याचे साधन तयार करून द्या ? मग बघा जो तुम्हाला कार्यकर्ता म्हणतो किंवा आमच्या पक्षात सेवाभावी संस्था युनियन मध्ये या म्हणणारा म्हणील मी तुम्हाला फोन करून कळवतो त्याचा फोन तुमहाला भविष्यात येणार नाही. 

        ‌. कार्यकर्ता सक्षम असेल तरच तुमचा नेता पुढारी संघटना अध्यक्ष व इतर कोणीही असो तो सक्षम होणार आहे नाही तर जो कार्यकर्त्यांना सक्षम करू शकत नाही त्याने कार्यकर्त्यांना खोट आश्वासन देवू नये कारण स्वता फाटका असणारा. वेळोवेळी दलबदलू असणारा कार्यकर्त्यांचे भले करू शकत नाही सवताचे चप्पल फाटक असणारा दुस-याला काय नवीन चप्पल घेवून देणारं. विचार करा ? एखाद्याचा कार्यकर्ता ताटाखालचे मांजर होण्यापेक्षा कष्ट करून जगा मानाने जगणार तुम्ही तुम्हाला संविधानाने भरपूर हकक अधिकार दिले आहेत त्यांचा वापर करा कायदा सर्वांसाठी समान आहे त्याचा सुध्दा वापर करून बघा यश निश्चित मिळेल

          समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

सरकारने पत्रकारांना तातडीने फ्रंट लाईन वर्करचा दर्जा दयावा - हाजी इर्शादभाई


 

          महाराष्ट्र सरकारने राज्यातील सर्वच पत्रकारांना फ्रंट लाईन वर्कर चा दर्जा देऊन तातडीने त्यांचे लसीकरण करून घेऊन कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर त्यांना पन्नास लाख रूपयांचे विमा संरक्षण देण्यात यावे अशी मागणी अखिल भारतीय पत्रकार सुरक्षा समिती चे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष हाजी इर्शादभाई यांनी महाराष्ट्र शासनाकडे केली आहे. 

         गेल्या वर्षभरापासुन अतिशय प्रतिकूल परिस्थितीत असताना देखील पोलीस, डॉक्टर, प्रशासन व सर्व अत्यावश्यक सेवेतील घटकां बरोबरीने स्वतःच्या व परिवाराच्या जिवाची पर्वा न करता पत्रकार बांधव सरकारला दिशा दाखविण्याचे व जनतेला जाग्रुत करण्याचे महत्वाचे काम करीत असतात.अशी माहिती हाजी इर्शादभाई यांनी दिली. 

            महाराष्ट्र सरकारने तमिलनाडु, ओडिशा, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश या राज्यां प्रमाणे महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा माहिती अधिकारी यांच्या कडे नोंद असलेल्या सर्वच वृत्तपत्र, वृत्तवाहिन्यांच्या व डिजिटल मीडियात काम करणाऱ्या पत्रकारांना तातडीने फ्रंट लाईन वर्कर्स चा दर्जा देवून त्यांचे लसीकरण करून त्यांना पन्नास लाख रूपयांचा विमा संरक्षण देण्यात यावे अशी मागणी हाजी इर्शादभाई यांनी महाराष्ट्र सरकार कडे केली आहे.

सरकारने पत्रकारांना तातडीने फ्रंट लाईन वर्करचा दर्जा दयावा - हाजी इर्शादभाई...

सर्व खासगी रुग्णालयात महात्मा फुले योजना अंतर्गत मोफत उपचार करण्याचे आदेश द्या - डॉ परवेज अशरफी AIMIM Ahmednagar...

कलम १४४ व राजकीय कार्यावरील निर्बंध - Section 144..

.

त्या विवस्र अवस्थेत फिरणा-या मातेला मानवसेवेचा आधार - manav seva...

मानवाधिकरांचे हनन म्हणजेच संविधानद्रोह - अलिम वजिर पटेल

मानवाधिकरांचे हनन म्हणजेच संविधानद्रोह - अलिम वजिर पटेल



      संविधान विरोधी घडणाऱ्या प्रत्येक घटनेला नागरिकांनी वाचा फोडली पाहिजे. ते प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. हाजी इर्शादभाई यांनी आपल्या पदाची पर्वा न करता लोकशाही व जात पंचायत प्रवृत्ती विरोधी घेतलेल्या भूमिकेस नागरिकांनी पाठिंबा दयावा असे आव्हान संविधान साक्षरता अभियान भारत चे अध्यक्ष अलीम वजीर पटेल यांनी केले आहे. 

       नुकताच राजुरी ,ता. जुन्नर, जि. पुणे येथे एका वक़्फ़ नोंदणीकृत धार्मिक संस्थेतर्फे घेण्यात आलेल्या संविधान व लोकशाही विरोधी जात पंचायत भूमिके संदर्भात हाजी इर्शादभाई यांनी घेतलेल्या भूमिके बद्दल श्री. अलीम वजीर पटेल बोलत होते. 

महाराष्ट्र हे एक पुरोगामी राज्य म्हणून देशात प्रसिद्ध आणि त्यात पश्चिम महाराष्ट्र हा भाग प्रामुख्याने पुरोगामी भाग म्हणून ओळखला जातो, आणि याच भागात मानवाधिकारांचे हनन करणाऱ्या जातपंचायती सारखे प्रकार जर घडत असतील तर राज्यातील नागरिकांचे दुर्दैव आहे, प्रत्येक नागरिकाने संविधान विरोधी घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीला वाचा फोडलीच पाहिजे, आणि हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. तरच देशात लोकशाही पर्यायाने राज्यात नागरिकांचे हक्क सुरक्षित राहू शकतील. 

संविधानविरोधी व मानवाधिकारांचे उल्लंघन करणाऱ्या जातपंचायती सारखा प्रकार राजूरी ता: जून्नर जि: पुणे येथे घडला आणि या प्रकरणाला वाचा फोडली ती हाजी इर्शाद अशरफी साहेबांनी ते जरी सत्ताधारी पक्षाचे प्रदेश कार्यकारिणीचे नेते असतील तरी त्यांनी प्रथम नागरिक म्हणून अशा दृषकृत्याविरोधात आवाज उठवला.

प्रकरण असे कि, मुसलमान जमात राजुरी, ता. जुन्नर ही वक़्फ़ नोंदणीकृत धार्मिक संस्था आहे. नुकतीच ग्रामपंचायत निवडणुकीत सदर धार्मिक संस्थेने कोणतेही अधिकार नसताना बेकायदेशीरपणे संस्थेच्या अध्यक्षाचे नावे उमेदवारी अर्ज मागवून घेऊन, उमेदवार निवड समिती स्थापण करुन सदर उमेदवार निवड समितीस ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवार निवडण्याचे व नाकारण्याचे अधिकार दिले. व सदर उमेदवार निवड समितीच्या निर्णया विरूद्ध जाणाऱ्या उमेदवारास जमाती मार्फत कारवाई करण्याची धमकी देण्यात आली. या संदर्भात हाजी इर्शादभाई यांनी तक्रारी अर्ज दाखल केला आहे. 

 सदर संस्था वक़्फ़ नोंदणीकृत धार्मिक संस्था असून संबंधित कृत्य पूर्णपणे असंविधानिक, बेकायदेशीर, भारतीय संविधानाला व लोकशाहीला आव्हान देणारे असून आपल्या अधिकाराचा गैरवापर करून जातपंचायती नुसार धमकी देणारे आहे. सदर कृत्य हे संविधानाने दिलेल्या मूलभूत अधिकारांचे हनन असून लोकशाही प्रक्रियेला कमजोर करणारे आहे. 

  सदर तक्रारीची महाराष्ट्र शासनाने सहानुभूतिपूर्वक व गांभीर्याने विचार करून योग्य चौकशी होऊन संबंधित व्यक्तिंविरोधात मानवाधिकारांचे हनन केल्या प्रकरणी,संविधानास आव्हान देऊन राष्ट्रद्रोह केल्या प्रकरणी व जातपंचायत अंतर्गत धमकी दिल्या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात येऊन योग्य ती कारवाई करण्यात यावी. अशी मागणी अलीम पटेल यांनी केली आहे. सोबत हाजी इर्शादभाई यांनी सदर विषया संदर्भात घेतलेल्या भूमिकेस आम्ही समर्थन करीत असुन त्यांस पाठिंबा देत आहे. त्यांना न्याय मिळून देण्यासाठी आम्ही तर सोबत आहोतच, महाराष्ट्र सरकारने या प्रकरणाला गांभीर्याने घेऊन संबंधितांवर कारवाई करावी, आणि असे दुष्कृत्य पुन्हा होऊ नये यासाठी या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी.  अशी मागणी त्यांनी केली. 

अलिम वजिर पटेल

संस्थापक अध्यक्ष संविधान साक्षरता अभियान भारत.

संस्थापक उपाध्यक्ष युवा स्वराज्य भारत.

राष्ट्रीय समन्वयक, We Make Change International Organization.

राज्य अध्यक्ष युवा महाक्रांती सेना भारत.




वाचा -

एम आय एम ची अहमदनगर जिल्ह्यात शानदार एंट्री - AIMIM AHMEDNAGAR MAHARASHTRA....

शिष्यवृत्ती आणि विद्यार्थी - अहमद मुंडे....

संविधान व लोकशाही विरोधी कृत्य सहन करणार नाही - हाजी इर्शादभाई , Pune...

डॉ बाबासाहेब आंबेडकरांची जीवन घटनाक्रम आणि कार्यकर्तृत्व - Dr Babasaheb Ambedkar...

चुकीची माहिती देऊ नका - खासदार इम्तियाज जलील AIMIM MP IMTIYAZ JALIL

https://shooterconsultationcart.com/azp33ctwgz?key=f5e461ccbeb850c3df0b07f34593b0c2https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=8918e3ebc1d8b81261ae6dde0667357d

 

देश -

एम आय एम महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी महाराष्ट्राचे उप मुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना उद्देशून ट्विट केले आहे की आपण नागरिकांना चुकीची माहिती देऊ नका. उप-मुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या ट्विटर वरून पोस्ट केले आहे की पुणे शहरातील एम आय एम पक्षाचे अनेक कार्यकर्ते राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केले आहे. या पोस्ट बरोबर एक फोटो द्या काही लोक राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करताना दाखवले आहे. या पोस्ट वरुन एम आय एम प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी आपल्या ट्विटर वर उत्तर देत लिहिले की श्री अजित पवार साहेब आपण नागरिकांना चुकीची माहिती देऊ नका ज्या व्यक्ती आपण उल्लेख करत आहे त्या व्यक्तीला एमआयएम पक्षाने चार वर्षापूर्वीच पक्षातून बाहेर काढले आहे आणि अशाच लोकांना तुमच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये स्वीकारले जात आहे. ज्या व्यक्तीचा उल्लेख या पोस्टमध्ये एम आय एम नेते म्हणून केला जात आहे तो व्यक्ती एकेकाळी एम आय एम पुणे शहर अध्यक्ष या पदावर होता. परंतु मागील पुणे महानगरपालिका निवडणुकी नंतर संबंधित व्यक्तीला पदमुक्त करून पक्षातून काढण्यात आले होते. संबंधित व्यक्ती त्यानंतर वंचित बहुजन आघाडीच्या पदावर कार्यरत होता व काही दिवसापूर्वी वंचित बहुजन आघाडी पदाचा व सदस्यत्वाचा राजीनामा देऊन सध्या कोणत्याही पक्षासोबत जवळीक नव्हती. त्या व्यक्तीला एमआय एम पुणे शहर नेते उद्देशन असे दाखवायचे प्रयत्न होत आहे की एम आय एम चे नेते राष्ट्रवादी मध्ये प्रवेश करत आहे.

सध्या एम आय एम पक्ष हैदराबाद नंतर महाराष्ट्र आणि बिहार मध्ये आपले यश संपादन केले आहे. भविष्यात राष्ट्रीय अध्यक्ष खासदार बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण देशामध्ये आपलं पक्ष मजबूत करण्याची तयारी करत आहे. यानुषंगाने बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश वारंवार दौरे करत आहे. तर खासदार इम्तियाज जलील यांना महाराष्ट्र सोबत गुजरातची जबाबदारी देण्यात आली आहे. एम आय एम प्रत्येक राज्यात समविचारी पक्षांना सोबत घेऊन प्रत्येक निवडणूक लढण्याची तयारी करत आहे. एम आय एम पक्षामुळे भाजपला फायदा होत असल्याचे आरोप नेहमी होत असले तरी सामान्य जनतेकडून मिळणारा प्रतिसाद हे स्वतःला सेक्युलर म्हणणारे पक्षांची डोकेदुखी बनली आहे. 



वाचा - 






सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा

  सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा            अनुसूचित जाती जमाती. इतर मागासवर्गीय जाती जमाती. भटक्या विमुक्त...

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या