शोध शोषितांचा



 शोध शोषितांचा 

      गावात तालुका जिल्हा राज्य देश यामध्ये बरेच असे शोषित समाजाचे लोक आहेत आपण म्हणतो की आपण प्रगतशील आहोत पण आज सुध्दा काही कुटुंब अशी आहेत की त्यांच्यापर्यंत कोणतीही विकासाची योजना. जीवनावश्यक सुख सोयी पोहचल्या नाहीत. यासाठी आज शिराळा तालुक्यातील. सोनवडे या गावात. शोध शोषितांच्या ही अनोखी मोहीम हाती घेत. बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर चे संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे शिराळा तालुका अध्यक्ष. बाबर व शिराळा तालुका महिला अध्यक्ष हसिना आर मुल्ला. कार्याध्यक्ष अनिता धस. शिराळा तालुका उपाध्यक्ष संगिता बाबर. व गावातील महिला यांच्या उपस्थितीत शोध शोषिताचा या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला 

        संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे यांनी मोहीमेचे उद्दिष्ट मांडताना. बांधकाम कामगार. रुग्ण हक्क. रेशन अधिनियम. विविध आर्थिक विकास महामंडळ. माहिती अधिकार. या विषयाची कार्यशाळा व माहीती समजावून सांगितली. काही बांधकाम कामगार ग्रामीण भागात महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांचेकडून राबविण्यात येणारया विविध कल्याणकारी योजना यांची अजून ग्रामीण भागात प्रसार व प्रचार झाला नाही. ज्या ठिकाणी झाला आहे तेथे बोगस बेमाफी फी भरून घेवून नोंदणी केली जात आहे. यांत काही इंजिनिअर संघटना यांचे लागेबांधे आहेत. असे दिसतें. बांधकाम कामगार नोंदणी करण्यासाठी इंजिनिअर दाखल्याची कामगारांना अडचण येत असेल तर. गावातील २०१७ / २०१८/२०१९/ २०२१ चे शासन निर्णयानुसार बांधकाम कामगार नोंदणी साठी लागणारे दाखले गावातील ग्रामसेवक पंचायत समिती. गटविकास अधिकारी. वनविभाग. जलसंधारण विभाग विद्युत पारेषण विभाग. पाणीपुरवठा विभाग. स्वच्छता विभाग. नगरपालिका महानगरपालिका वार्ड आॅफिसर. अशा विविध विभागांतील उप बांधकाम अभियंता यांना मंडळाने नोंदणी अधिकारी म्हणून घोषित केले आहे यापैकी कोण नोंदणी दाखले देण्यासाठी नकार देत असेल तर आमच्याशी संपर्क साधा असे मत मांडले

        माणूस आहे म्हणजे आजार असणारच. # रुग्ण सेवा ही ईश्वर सेवा. # असे म्हणायला वाचायला बर वाटत पण खरोखरच ही वैद्यकीय सेवा त्याप्रमाणे काम करते का ? सांगली जिल्ह्यात २६ दवाखाने धर्मादाय आयुक्त यांचे अधिपत्याखाली विविध वैद्यकीय योजना नुसार उपचार करतात त्यात समाजातील आर्थिक दुर्बल घटक की ज्यांना उपचारांचा खर्च झेपत नाही अशी कुटुंब त्यांना एकही रूपया खर्च न करता उपचार मिळावा यासाठी अशा दवाखान्याची निर्मिती करण्यात आली आहे. महात्मा फुले जन आरोग्य योजना राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना. पंतप्रधान आयुष्मान आरोग्य योजना. अश्या विविध योजना रेशन कार्ड वर्गवारी रद्द करून राबविण्यात येतात पण आज सर्वात मोठे दुःख आहे ते म्हणजे समाजातील काही शोषित लोक आहेत की त्यांना दवाखानेच माहिती नाहीत कोणत्या उपचारांचा खर्च किती हे माहीत नाही. रुग्ण हक्काची सनद कोणती ती माहिती नाही. रुग्णाचे हक्क व अधिकार माहीत नाही.औषधाचे दर किती हे माहीत नाही. कारण अशा लोकांना खर कोण सांगत नाही. प्रत्येक गावात एक उप आरोग्य केंद्र आहे पण त्यात डॉ नर्स नाही कोणतेही औषध नाही. साप कुत्र्याची लस उपलब्ध नाही. अॅमबुलनस गाडी नाही. ते उप आरोग्य केंद्र कोणाच्या जागेत बांधले माहीत नाही. त्यांची माहिती करण्यासाठी जनसंबोधन जनप्रबोधन करण्यासाठी शोध शोषितांचा ही मोहीम प्रभावीपणे राबविणे गरजेचे आहे

              ६०/६५/ वर्षांनंतर विविध पेन्शन योजना लागू करण्यात आल्या आहेत. त्यात इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना. संजय गांधी निराधार अनुदान योजना. श्रावणबाळ पेन्शन योजना. महिला बचत गटांना विविध आर्थिक सहाय्य. बचत गटांना प्रत्येकी रेशन दुकानदेणे नागरि पुरवठा सनदेमधये नोद आहे. घरकुल योजना. स्वच्छता हंगणदारी मुक्त गाव. रस्ते गटर. अशा विविध सेवा सुविधा पासून आजही काही लोक. वंचित आणि शोषित आहेत. यांच शोषन कळत नकळत शासकीय अधिकारी व कर्मचारी करत असतात त्यासाठी जनसंबोधन. जनप्रबोधन. जनजागृती होणे गरजेचे आहे त्यासाठी शोध शोषितांचा ही मोहीम प्रभावीपणे राबविणे गरजेचे आहे

                रेशन सर्वात मोठा घोटाळा काहीजणांना शासन निर्णयानुसार रेशनकार्ड युनिट प्रमाणे अन्न धान्य वितरण केले जात नाही. रेशनला येणारे अन्न धान्य निवडक व स्वच्छ देणे बंधनकारक असताना आज काही ठिकाणी कुजके. किडे मुंग्या भुंगा. झालेले गहूं तांदूळ चणा. चणाडाळ. वाटप केले जाते. रेशन दुकानदार. रेशनकार्ड धारकांना. नाव दिसत नाही. थम उठत नाही. आधार लिंक नाही. तुमच अन्न धान्य आल नाही. मला मिळाल नाही जे मिळाले ते कमी मिळाले. अशी कोणताही अर्थ नसणारी उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. रेशनकार्ड वर बारकोड नंबर रेशन दुकानदार व पुरवठा विभाग लिहित नाहीत. आणि गोरगरीब जनतेचा हक्काचा घास हिसकावून घेतला जातो. नाव वाढविणे. नाव कमी करणे. नविन रेशनकार्ड काढणे. दुबार रेशनकार्ड काढणे. मयत व्यक्तिची नावे कमी करणे. अन्न सुरक्षा योजनेचं सहभागी. असे हजारों अर्ज प्रत्येक जिल्ह्यात पुरवठा विभागात कचरयाचया टोपलीत पडले आहेत कोणताही निर्णय झाला नाही कारणं उत्तर आहे इषटांक शिल्लक नाही त्यासाठी २००५ नुसार आर्थिक सबल आणि आर्थिक दुर्बल लोकांचा सर्वे करण्याची गरज आहे.पण आज १६ वर्षे झाली रेशनकार्ड दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांचा सर्वे झाला नाही कारणं आहे निवडणूक भांडवल. यासाठी आमच्या कार्यकर्त्यांनी शोध शोषितांचा ही मोहीम हाती घेतली आहे

              माहिती अधिकार कायदा २००५ सर्वसामान्य जनतेला मिळालेला वरदान म्हणजे कायदा माहिती अधिकाराचा. यामुळे सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयात चालणारे कामकाज याची विचारणा तपासणी पडताळणी करण्याचा अधिकार आपणाला आला आहे पण आज काही ठिकाणी माहिती अधिकार कायदा म्हणजे काय हे सुद्धा लोकांना माहिती नाही. माहीती अधिकार कोठे. कशासाठी. त्यांची कलम. त्यांची वापरण्याचे नियम. माहिती अधिकार उत्तर किती दिवसात आले पाहिजे. नाही आलेतर काय करायचे. अपिल म्हणजे काय. सुनावणी म्हणजे काय. खंडपीठ कोठे आहे खंडपीठाला सुनावणी कधी लागते. माहिती अधिकार कार्यकर्ते यांना कायदा संरक्षण आहे का. अशा विविध प्रश्नांची उत्तरे शोषितापुढे पडली होती. त्यांचे निरसन करून माहिती अधिकार कायद्याचे महत्व वापरायची पद्धत समजावून सांगितली. म्हणजे एखादे गाव त्यातील लोक प्रगत देशात शोषित आहेत हे लाजिरवाणे आहे म्हणूनच आज शोध शोषितांचा ही मोहीम प्रभावीपणे राबविणे हेच आमचें धेय आहे 

      अपंग एक समाजातील वंचित घटक आहे अपंग विकास महामंडळ स्थापन करण्यात आले त्यात अपंगांसाठी शिक्षण शिष्यवृत्ती. लग्न व्यवसाय. रोजगार. घरकुल आरक्षण. नोकरी आरक्षण. २०० चौरस फूट जागा मोफत. ५/टक्के ग्रामविकास. शहरविकास यासाठी येणारा विकास निधी यातून ५/ टक्के रक्कम अपंग कल्याणासाठी खर्च करणे बंधनकारक आहे. प्रवास सवलत. वैद्यकीय सेवा सवलत. अशा विविध योजना. अपंग विकासासाठी शासनाने राबविल्या आहेत. त्यातच अपंग २१ प्रकार चे वर्गीकरण करण्यात आले आहे. त्यातच अस्थिव्यंग. मनोरुग्ण. विकलांग. असे २१ प्रकार आहेत. अपंगांसाठी. युडी कार्ड. अशा विविध अपंग लोकांसाठी असणार्या योजनांची माहिती यावेळी देण्यात आली. आणि अजून सुद्धा काही शोषितांचे पुनर्वसन शिल्लक असेल तर त्यांना मदत सहकार्य करण्यासाठी शोध शोषितांचा ही मोहीम प्रभावीपणे राबविणे गरजेचे आहे असे मत मांडले

              हसिना आर मुल्ला महिला अध्यक्ष शिराळा तालुका यांनी आभार व सर्वांना शासकीय योजनांचा लाभ घेण्याचा सल्ला दिला सर्वोतोपरी मदत व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. संगिता बाबर महिला उपाध्यक्ष शिराळा तालुका. यांनी सर्वांचे आभार व सत्कार केला. मी पूर्ण प्रामाणिकपणे सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी सदैव प्रयत्न करीन राजकारण नाही फक्त समाजसेवा म्हणून लोकांचे संबोधन प्रबोधन करून त्यांना समाजाच्या प्रवाहात घेऊन येईन असे आश्र्वासन दिलें आणि सर्वांनी मिळून शोध शोषितांचा ही मोहीम प्रभावीपणे राबवू असे मत मांडले

कुठ होता ?

 

कुठ होता ?

             नशिबाने दिलेल्या पदांचा गैर वापर करू नका कोणालाही कमी लेखू नका. कोणाचाही अपमान करु नका. निंदा नालस्ती करु नका. तुम्ही शक्तिशाली असाल. पैसा सत्ता असेल. पण वेळ सर्वांपेक्षा शक्तिशाली आहे. कोणी कितीही महान झाला असेल पण निसर्ग कधीच कोणाला लायकीपेक्षा महान बनवत नाही आणि काही देत नाही. अहंकार विसरा परमेश्वराने तुमच्या माझ्यासारख्या किती जणांना मातीतून घडविले आहे आणि शेवटी मातीतच घालणार आहे हे सत्य आहे 

आपणाला वेळोवेळी प्रत्येक सुखात दुःखात पाडणारा व आपल्या मनांत काहूर माजवणारा शब्द आहे तो म्हणजे कुठ होता. सर्वांना प्रत्येकाच्या गरजेच्या वेळी आपले आणि आपल्या जवळच्या लोकांचा सहवास हवा असतो. समजा लहान वयात आईचं प्रेम मोठयापणात वडलांचे प्रेम. तरुणपणात. बहिण. भाऊ. सगेसोयरे यांचे प्रेम. लग्नानंतर पत्नी व मुलांचं प्रेम. हे सर्व निसर्ग निर्मित आहे. हे आपणास माहीत आहे. मोठयापणी पुस्तक पाहिजे. पैसा मिळविण्यासाठी नोकरी कामधंदा पाहिजे. सवाताच घर पाहीजे. आपल्यावर प्रेम करणारी माणस पाहिजेत हा निसर्ग नियम आहे

      रोगराई. पूर. अवेळी अवकाळी पाऊस. ओला दुष्काळ. कोरडा दुष्काळ. नोकरी. बेरोजगारी विविध घोटाळे. शासकीय निमशासकीय कार्यालय अशा विविध अडचणी आपणांस नविन नाहीत. आपण वेळोवेळी यांचा सामना केला आहे. पूर्वी काळात मलेरिया प्लेग पटकी. अशी महामारी रोग येत होते गाव छोटी छोटी होती. रोगाने गावच्या गावं संपत असत पण लोक एकामेकाला मदत करायचे सोडत नव्हते. त्यावेळी लाॅकडाऊन टाळेबंदी होती का ? नव्हती अस कोणत संकट आल की लोक गाव सोडून जात होती तोच खरा लाॅकडाऊन होता. मदत नव्हती पण विचारपूस करणारी माणस होती 

          २३ मार्च रोजी गाव वाडी वस्ती तालुका जिल्हा राज्य देश यामध्ये कोरोना सारख्या महाभयंकर महामारी संकटाने थैमान घातले होते. लोक रोगांपासून वाचावी त्यांचे संरक्षण व्हावे यासाठी शासनाने कडक टाळेबंदी जारी करण्यात आली होती. जगण्यासाठी कमविणारा जीव वाचवण्यासाठी घरातच अडकून पडला. हाताला काम नाही त्यामुळे हातात पैसा नाही त्यामुळे त्यांच्या वर व त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली. काहीजणांना हा सर्व प्रकार झेपला नाही त्यांनी या उपासमारीला कंटाळून आत्महत्या सारखें मार्ग निवडले आणि आपली जीवनयात्रा संपवली किती वाईट आहे बघा. शासनाने लोकांची उपासमारीची वेळ संपवण्यासाठी सर्व रेशनकार्ड धारकांना मोफत अन्न धान्य वितरण करण्यास सुरुवात झाली. पण शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी रेशन दुकानदार यांना हाताला धरून शासनाचा मोफत तांदूळ राईस मिल मध्ये विकला जिल्ह्यात जनता उपाशी मरत असताना जागोजागी रेशनचा मोफत तांदूळ सापडत होता. याला कोण जबाबदार आहे. विना रेशनकार्ड धारकांना मोफत तांदूळ मिळवून देण्याच्या शासनाच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी कोणताही अधिकारी व कर्मचारी रस्त्यावर आला नाही त्यावेळी आम्ही सवता फीरुन. २५०० लोकाची यादी करून पुरवठा विभागाला दिली होती. त्यात सुध्दा चणा कोणाला मिळाला कोणाला नाही बांधकाम कामगार यांना शासनाने १५०० रू सानुग्रह अनुदान जाहीर केले. ते सुद्धा नविन आणि जीवीत नोदणी असणार्या बांधकाम कामगार यांना मिळाले. हातगाडी वाले फळे फुले भाजीपाला विक्री करणारे यांना सुध्दा शासनाने अनुदान दिले आणि उपासमारीची वेळ थोडी काहोईना कमी झाली टाळेबंदी काळात. डॉ यांनी लोकांना अगदी हिन वागणूक दिली. तपासणी नाही. हाड दुखत असल्यास तापाचे आणि खोकल्याचे औषध दिले. फी डबल घेतलीं. यावेळी अशा डॉ वर कारवाई करण्याचा शासनाने घेतलेला निर्णय म्हणजे शासनाने सर्वसामान्य जनता गोरगरीब लोक जगविण्यासाठी विविध उपाययोजना केल्या. 

                  आपण आपल्या अनमोल मताने निवडणून दिलेले सरपंच उपसरपंच नगरसेवक हे यावेळी कोठेही रस्त्यावर सुध्दा दिसले नाहीत. आपल्या प्रभागातील लोक उपाशी आहेत का त्यांच्या घरात खायला काय आहे नाही याची विचारपूस सुध्दा केली नाही निवडणूक आली की सर्वजण एकत्र दिसायला सुरु झाले काही समाजसेवक यांनी अन्न धान्य वाटले ते सुद्धा दोन किलो. धड दळून आणता येईना. असुन फायदा आणि नसून खोळांबा. असा प्रकार झाला म्हणजे आपली नुसती चेष्टा केली या लोकांनी. आपण विसरला काय. ? ‌. या आणि अशा सर्व समाजहितचिंतक लोकाचा एक समज आहे की. ५००/ १००० रूपये मताला वाटले की जनता सर्व विसरणार आहे. हा गैरसमज मोडून काढण्याची आज गरज आहे. आज आपण लक्षात ठेवा जेव्हा आपण उपाशी होतो तेव्हा एकही आपणाकडे आला नाही. आणि आज मतदान आल की रात्री बारा वाजता दरवाजा वाजवून उद्या मतदान आहे हे सांगणारे कुठ होता तेव्हा लक्षात ठेवण्याची गरज आहे नेत्यांसाठी आंदोलन मोर्चा करताना आम्ही चालतो. सभा मिटिंगमध्ये जनसमुदाय दाखविण्यासाठी आम्ही चालतो. पोलिस स्टेशनला गुन्हे आमच्या मुलांच्या नावांवर हे सुद्धा आम्ही केल 

            समाजाचं देण लागतो ही भावना मनात घेऊन उपाशी लोकांना शिजविलेले व कोरड अन्न वाटप करण्यात संबंधित पोलिस स्टेशनचे ठाणेदार अधिकारी व कर्मचारी यांनी स्वता फिरून गरजूंना अन्न वाटप केले. जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप करण्यात आले तेही कमीत कमी एक कुटुंब पंधरा दिवस भागेल असे वाटप करणारे आमचें पोलिस बांधव होते. आपली व आपल्या कुटुंबाची काळजी न करता रांत्र दिवस रस्त्यावर पहारा देणारे पोलिस बांधवच होते ते विसरू नका. 

             समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार जाहिरात प्रसिद्ध वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कडक कार्यवाही करावी -अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे

 

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कडक कार्यवाही करावी   - अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे

मुंबई, दि. 21; सणासुदीच्या दिवसांमध्ये राज्यातील जनतेला सकस, निर्भेळ आणि भेसळमुक्त मिठाई व इतर अन्न पदार्थ मिळावेत यासाठी अन्न व औषध प्रशासनाच्या माध्यमातून कडक कार्यवाही करावी , असे निर्देश अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिले आहेत. अन्न व औषध प्रशासन विभागाचा आज त्यांनी बांद्रा येथील कार्यालयात आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला अन्न व औषध प्रशासन आयुक्त परिमल सिंग, सर्व सह आयुक्त प्रत्यक्ष व इतर जिल्हास्तरीय अधिकारी दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते.

  डॉ. शिंगणे पुढे म्हणाले, जिल्हा स्तरावरील अधिका-यांनी मिठाई व इतर खाद्य पदार्थांच्या उत्पादकांसोबत बैठक घ्यावी. त्यांना योग्य ते निर्देश द्यावेत. मिठाई व इतर पदार्थांवर तयार करण्याची आणि संपण्याची दिनांक टाकणे आवश्यक आहे, याबाबत जन जागृती करावी.त्याचबरोबर दुध व दुग्धजन्य पदार्थांमधील भेसळ तपासणी वाढवावी आणि त्याचा सविस्तर अहवाल सादर करण्यात यावा, असे निर्देश त्यांनी दिले.

 औषध प्रशासना तर्फे तपासणीत ज्या औषध विक्री दुकानात फार्मसिस्ट नाहीत असे आढळलेल्या दुकानांचे परवाने रद्द करणे, आयुर्वेद, ॲलोपॅथी व इतर औषध निर्मीतींचा दर्जा सातत्याने तपासला जाणे आणि विभागातील पदभरती इत्यादि विषयांचा यावेळी आढावा घेण्यात आला.

यावेळी 01.04.21 ते 30.09.21 या कालावधीत अन्न व औषध प्रशासनने केलेल्या कामाची माहिती सादरीकरणाच्या माध्यमातून आयुक्त श्री. सिंग यांनी दिली. या कालावधीत दुध या अन्न पदार्थाच्या कारवाईत रुपये 4,60791 किमतीचा माल जप्त करण्यात आला. दुग्धजन्य पदार्थाच्या कारवाईत रुपये 39,50,386 किमतीचा माल जप्त करण्यात आला. तर धाडी जप्तीत 526.10 लाख किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला. सणासुदीच्या तोंडावर घेण्यात आलेल्या मोहिमेत खवा, मावा, मिठाई, खाद्य तेल, तुप, रवा मैदा, बेसन मसाले अशा भेसळ युक्त वस्तुंचा रुपये 31,11,514 किमतीचा साठा जप्त करण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली.

***

कलाकार महासंघ महाराष्ट्र राज्य संघटनेचा उदघाटन सोहोळा

 



कलाकार महासंघ महाराष्ट्र राज्य संघटनेच्या ठाणापुडे तालुका वाळवा जिल्हा सांगली या शाखेचा उदघाटन सोहळा संपन्न झाला या उद्घाटनप्रसंगी कलाकार महासंघ महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा अनिल मोरे चिकुर्डे जिल्हा परिषद सदस्य मा अभिजित पाटील आबा ,असंघटीत कामगार संघटना पश्चिम महाराष्ट्र प्रमुख रविंद्र पाटील वाळवा तालुका संघटक नाना कांबळे कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष उमेशजी अवघडे भ्रष्टाचार जन आक्रोश संघटना कोल्हापूर जिल्हा अध्यक्षा. सौ सुरेखा पाटील पन्हाळा तालुका अध्यक्षा सौ अम्रपाली गायकवाड ठाणापुडे गावचे सरपंच सौ मनिषा पाटील ग्रामपंचायत सदस्य जयसिंगराव पाटील ग्रामपंचायत सदस्य सुभाष शिंदे मोहन पाटील आण्णा राजू अवघडे पत्रकार शाखेचे आधार स्तंभ सुनिल पाटील शाखा अध्यक्ष आकाश कांबळे शाखा उपाध्यक्ष संदिप महापूरे शाखा सरचिटणीस राहुल तोंदले शाखा कोषाध्यक्ष अनिकेत शिंदे शाखा संघटक यशवंत समुद्रे सुनिल कांबळे आनंदा कांबळे हणमंत पाटील रोहीनी कांबळे सह महिला पुरुष कलाकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कलाकार महासंघ महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा अनिल मोरे साहेब यांच्या हस्ते बोर्ड चे फित कापून उद्घाटन झाले व श्रीफळ जिल्हा परिषद सदस्य मा अभिजित पाटील आबा यांनी वाढवून केले . याप्रसंगी संदिप महापूरे आकाश कांबळे ,मोहन पाटील आण्णा तसेच अभिजित पाटील आबा यांची भाषणे झाली. शेवटी अध्यक्षीय भाषणातून अनिल मोरे साहेब यांनी उपस्थित सर्वांचे स्वागत केले व गेल्या पंधरा वर्षांत संघटनेने केलेल्या कामाचा आढावा बोलून दाखवला अखंड महाराष्ट्रात कोरोणा काळात कलाकारांचे तसेच आॅर्केष्ट्रा सोंगी भजन बॅन्ड बेंजो तसेच प्रत्येक कलाकारांचे आणि मालक लोकांची झालेली नुकसान भरपाई म्हणून शासनाने एक वेगळं पॅकेज जाहीर करावं तसेच कलाकारांच्यासाठी विकास महामंडळ स्थापन करण्यात यावं तसेच कलाकारांचे विविध प्रश्न घेऊन शासनस्तरावर लढणारी महाराष्ट्रातील संघटना म्हणून कलाकार महासंघ महाराष्ट्र राज्य हीच एकमेव संघटना आहे हे सांगायला विसरले नाहीत. माझ्या जिवात जीव असेपर्यंत कलाकारांच्या साठी शासन दरबारी न्याय मागून त्यांना तो न्याय मिळवून देईन अशी ग्वाही अनिल मोरे यांनी दिली. कार्यक्रमाची सुरुवात शिव,शाहू, फुले आंबेडकर आण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजनाने करण्यात आली. शेवटी आभार शाखा उप अध्यक्ष संदिप महापूरे यांनी मांडले

तफावत - सत्तेसाठी काहीपण

 

तफावत - सत्तेसाठी काहीपण

           आपल्या देशात सामाजिक व आर्थिक क्रांती घडून येण्यासाठी एकाबाजूला राज्याचे व्यक्ती स्वातंत्र्य जाचक निर्बंध कमी झाले पाहिजेत स्वताच्या विकास घडवून आणण्याची आपणाला मोकळीक पाहिजे हे जसे मूलभूत हक्काच्या प्रकरणावरुन आपणास दिसते आणि आपण आज ते अनुभवत आहे. कारण आज कोणाचाही कसलाही विकास नाही. कसलेही लोककल्याण नाही. 

            विसाव्या शतकात लोककलयाणाची वाढती जबाबदारी सरकारने उचलली पाहिजे हा विचार पुढे आला. आपल्या प्राचीन परंपरेतही राज्याची ही क्रियाशील भूमिका मांडलेली आहे आपल्या घटनेतील मार्गदर्शक तत्वांचा विचार हा या दोन्ही गोष्टी सुसंगत असाच आहे. परंतु हे निर्देश पूर्णतः सरकारने पाळले नाही तर याविरुद्ध आपणास न्यायालयात दाद मागता येत नाही. किंवा या तत्वांशी विसंगत असलेले कायदे अवैधही ठरत नाहीत. ही तत्वे अमलात आणण्यासाठी सरकारने कायदे करणे अपेक्षित आहे. त्याशिवाय ही तत्वे अमलात येऊ शकत नाहीत. आपल्या विकासाच्या मार्गात सरकारने अडथळे निर्माण करू नये. हे आपल्या मूलभूत हक्कांचे सूत्र आहे. असा विकास घडून येण्यासाठी आवश्यक संधी सरकारने उपलब्ध करून द्यावी हा विचार मार्गदर्शक ततवामागे आहे. संविधान मुद्दा घालण्यात आला आहे तो आमच्या मते लोकशाही कशी असावी याचा निर्देश आहे. आम्हाला निव्वळ प्रोढ मतदान देऊनच फक्त राजकीय लोकशाही साधायची नाही कोणत्याही पक्षाचे सरकार सत्तेवर असो त्याला भारताची एकंदर रचना कशी असावी याचे मार्गदर्शन या भागातून मिळेल. आर्थिक लोकशाहीसाठी काहीजण वयकतिविकास हा पाया मानतात तर काहींच्या आणि आपल्या मते समाजवादी साम्यवादी व्यवस्था हाच तिचा निकष असतो या विचारप्रणाली कोणत्याही मतांचा राजकीय पक्षाला आपल्याला तत्वानुसार भारताची रचना करण्यास वाव मिळावा अशा लवचिक पध्दतीने निदेशक देण्यात आले आहेत 

          ‌ समाजात काही लोक अतिश्रीमंत व बाकिचे अति दारिद्र्य काहींच्या हाती उत्पादनाची साधने. शेती. उधोग खनिज संपत्ती. भांडवल. व बाकीचे फक्त श्रमशक्तीचे धनी अशी तफावत निर्माण झाली आहे त्यातून सर्वसामान्य जनतेची पिळवणूक होणे. अपरिहार्य असते अशी परिस्थिती निर्माण होणार नाही अशी समाजव्यवस्था राज्याने निर्माण करणे गरजेचे आहे. संपत्तीचे केंद्रीकरण होणार नाही असे धोरण तयार करण्याची गरज आहे. समाजात साधनसंपत्ती वाटप जनसामान्यांच्या हिताच्या दृष्टीने व्हावे. उपजीविकेचे साधन मिळविण्याचा समान अधिकार महिला व पुरुष यांना समानच आहे. व्यक्ति व व्यक्ती समूहातील विषमता. जातीयवाद. किमान पातळीवर असावा किंवा अजिबात नसावा. उद्योग व्यवस्थापन यात कामगारांचा सहभाग असावा. जसे मजूर सोसायट्या. दिनदयाळ सूतगिरणी. अनुसूचित जमाती जमाती सूतगिरणी. मागासवर्गीय सूतगिरणी. पण यात कोणताही वंचित घटक नावाप्रमाणे बघायला सुध्दा मिळत नाही घटनेच्या कलम ३८/३९/ मध्ये राज्याला दिले आहेत या नुसार सामाजिक व आर्थिक न्याय साधला जाईल हे अपेक्षित आहे 

                आदर्श भारत कसा असावा ? भारतात सामाजिक व आर्थिक बदल घडवून आणण्यासाठी मोठी मोठी आंदोलने मोर्चे निदर्शने उपोषण चळवळी झाल्या परकियांना पळवून लावण्यासाठी आपल्या घरदार मुल बाळ पत्नी याची राखरांगोळी करणार्या क्रांतिकारक समाजसेवक यांना जन्माला घालणारी आपली भारत भुमी. आज महिला सुरक्षित नाही. कामगार यांना समान किमान वेतन कायद्यानुसार वेतन नाही. भ्रष्टाचार. बेरोजगारी. खेड्यातून शहराकडे रोजगाराच्या शोधात येणारे लोंढे कमी करण्यासाठी खेडी सबल झाली पाहिजेत. अपंग. निराधार विधवा वयोवृद्ध समाजातील वंचित घटक यांना राज्याचे साह्य मिळाले पाहिजे. मुलांना मोफत शिक्षण मिळाले पाहिजे. सर्वांना समान नागरी कायदा असावा. सर्व मजूरांना निर्वाह भत्ता बोनस पेन्शन वेळेवरच मिळावी. शासकीय योजना त्यामध्ये पशुसंवर्धन कुक्कुटपालन शास्त्रीय पध्दतीने होईल व पशुधन वाचविण्यासाठी जनावरांची कत्तल बंद करावी. पर्यावरण व वनसंपत्ती संरक्षण करणे. अधिकारी व कर्मचारी यांचा मनमानी कारभार बंद करावा लागेल. रेशन घोटाळा थांबवा गरजूंना अन्न धान्य द्या. रेशन दुकानदार यांची दादागिरी थांबवा. महसूल घोठाळा. आर्थिक लुट बंद करा. व्यसनमुक्ती केंद्र स्थापन करणे काळाची गरज. जनगणना काळाची गरज आहे. दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांचा सर्वे काळाची गरज आहे. महिलांना संरक्षण. तरूणांना रोजगार. शासकीय योजना प्रभावीपणे अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. आमली पदार्थ व मद्यपान बंदी करणे गरजेचे आहे. दुर्बलतेवर जनतेचे. विशेषत अनुसूचित जाती जमाती व इतर मागासवर्गीय जमाती भटक्या विमुक्त जाती यांना संरक्षण आरक्षण देऊन जमातींचे शोषण करण्यावर बंदी करणे गरजेचे आहे. वयकतिसमूह दर्जा. सुविधा व संधी याबाबतीत विषमता त्यांनी टाळावी. घटनासमिती नागरिकांचे अधिकार हे केवळ हे केवळ नकारात्मक राज्यावरील बंधने राहू नयेत ते सकारात्मक विकासाची संधी प्राप्त करून देणारे असे असावेत असा एक विचार प्रवाह होता. डॉ बाबासाहेब आंबेडकर. के टी शहा. अल्लादि कृषणसवामी अय्यर व बेनेगल नरसिंगराव. हे विचारांचे पुरस्कारते होते. कन्हैयालाल मुनशी. डॉ बाबासाहेब आंबेडकर व शहा यांसारख्या तर हे अधिकार मार्गदर्शक सरकारवर व न्यायालय वर बजावणी योग्य असावेत असे वाटत होते. परंतु राजयाजवळ साधनसंपत्ती कमतरता व घटना समितीतील जुन्या सदस्यांचा आभाव यामुळे तफावत व तडजोड म्हणून या अधिकारांचा समावेश मार्गदर्शक करण्यात आला. ही तत्वे केवळ शुभेच्छा असाच घ्यायचा काय ? ती पाळण्याचे सर्वांवर बंधन सरकारवर किती आहे याचा प्रश्न आपणांस आज निर्माण झाला आहे

      तत्वे अमलात आणण्यासाठी न्यायालये सरकारला आदेश देऊ शकत नसली तरी ती सरकारवर बंधनकारक आहेत आणि सार्वजनिक नीतीमततेचे रक्षण कायद्यापेक्षा जागृत लोकमतच चांगल्याप्रकारे करु शकते तेव्हा सरकार या तत्वांना बांधील कसे राहील याची काळजी समाजसेवक. वृत्तपत्र हितसंबंधी गट विचारवंत पक्षसंघटना यांनी जनमत तयार करण्याची गरज आहे ज्याप्रमाणे संघटना समर्थ व सुसंघटित असतील त्यांच्यातील मार्गदर्शक तत्वे सहमती असेल तेवढी ही तत्वे अमलात येण्याची शाश्वती अधिक राहील हे उघड आहे या संघटनाना निर्वेध पणे काम करू देण्याची हमी मूलभूत हक्काच्या प्रकरणातून त्या दृष्टीने मूलभूत हक्क व मार्गदर्शक तत्वे एकमेकांस पूरक असतील तर तफावत निर्माण होणार नाही भारत हा लोकशाही राज व्यवस्था असलेला देश आहे नियमित कालमर्यादेनंतर होणा-या निवडणुका हे लोकशाहीचे लक्षण सत्तारुढ पक्षाला अशा निवडणुकांच्या वेळी जनतेला सामोरे जावे लागते आपल्याला कारभाराचा जाब द्यावा लागतो. तेव्हा मार्गदर्शक ततवापासून ढळणारया पक्षाच्या विरोधी मतदान करून त्याचा पराभव करून जनता त्याला धडा शिकवू शकते. या बाबतीत विरोधी पक्षाची भूमिका महत्वाची असू शकते असे मत डॉ बाबासाहेब आंबेडकर अशा विरोधी मतदानाची भीती ही मार्गदर्शक ततवामागची मोठी दंड शक्ति आहे दोन निवडणुकी दरम्यान काळात सुध्दा सरकारला मार्गदर्शक तत्वात बांधील ठेवता येते त्यासाठी सातत्याने जनमताचा रेठा एकी असावी लागते. चळवळी मोर्चे सत्याग्रह बंद घेराव बहिष्कार इत्यादी मार्गाचा अवलंब करावा लागतो 

    ‌‌. समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी व जनजागृती जाहिरात प्रसिद्ध वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

भगदाड - सुशिक्षित बेरोजगारांचा प्रश्न?


भगदाड - सुशिक्षित बेरोजगारांचा प्रश्न?

                    आपल्या देशाचा सर्वात मोठा आणि जटिल प्रश्न आहे तो म्हणजे बेरोजगारी.  आणि त्यातच सुशिक्षित बेरोजगारांची वाढती संख्या यामुळे गुंडगिरी. दहशतवाद. व्यसन.  अवैध धंदे. कमी वेळात कमी श्रमात जास्त पैसा मिळविण्यासाठी कोणत्याही थराला जाणारी तरुण सुशिक्षित बेरोजगार तरूण यामुळे आपल्या देशांचे भविष्य धोक्यात आले आहे रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध करून देणे हा शासनाचा कार्यक्रम असतो. रोजगार निर्माण करावयाचे म्हणजे एक तर सरकारी आॅफिस मध्ये भरती काढणे गरजेचे आहे.  दुसरे म्हणजे स्वयंरोजगार संधी किंवा योजना छोटी छोटी कर्ज प्रकरण. अशा योजना आखणे गरजेचे आहे पण शासकीय खात्यात मुळातच अतिरिक्त भरती झालेली असते त्यामुळे नोकरी साठी वाव नसतो शिवाय राजकीय चोरांच्या मुळे स्वयंरोजगारासाठी अगोदरच भगदाड पडलेल्या सर्व आर्थिक विकास महामंडळ यांच्यावर ताण वाढतो ह्यामुळे या आणि अशा योजना आखलयातरी प्रतक्षात अंमलबजावणी वर बंधने आणली जातात.  तरिही बेकारी हटविणे हा एक सार्वत्रिक राजकीय कार्यक्रम असतो. त्यामुळे बेरोजगार भत्ता देणे शक्य आहे का ? मग महाराष्टातील रोजगार हमी योजना सारखी योजना आखता येईल का ? त्यातून सार्वजनिक उपयोगाची बांधकामे वैगरे करून घेता येतील पण सुशिक्षित आणि कमी अधिक कुशल बेरोजगारांना त्यात अकुशल अशी कामे करावी लागतील तसेच बोनस. पगारवाढ वैगरे मुद्यावर लढे उभे राहतात पण अंकुशल आणि असंघटित श्रमिकांच्या किमान वेतन समान वेतन. प्रशनाला कधीच महत्व मिळाले नाही 

      शासनाने व समाजातील काही समाजसेवक  समाजहितचिंक यांनी या गोष्टी शासनाच्या वेळोवेळी ध्यानात आणून दिल्या  आणि शासनाचे एक वेळ डोळे उघडले शासनाने प्रत्येक समाजातील  वंचित दुर्बल सदन अशा घटकांसाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतला 

(१) पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम

(२) बीज भांडवल योजना

(३) जिल्हा उद्योग केंद्र योजना

(४) वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ

(५) अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ

(६) मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ

(७) महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ

(८) महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्तीय आणि विकास महामंडळ

(९) महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळ

(१०) संत रोहिदास चर्मोद्योग आणि चर्मकार विकास महामंडळ

(११) आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ

(१२) मुद्रा बॅंक योजना

(१३) पशुसंवर्धन व दुग्धविकास कुक्कुटपालन विकास योजना

(१४) कृषी पूरक व्यवसाय

(१५) महिला समृद्धी योजना

(१६) थेट कर्ज सुक्षम कर्ज योजना 

          अशा विविध योजना राबविण्यात आल्या मोठे मोठे जनतेला गाजरं दाखविण्यासाठी बोर्ड लावण्यात आले. समाजातील सुशिक्षित बेरोजगारांची संख्या.  दुर्बल. दुर्लक्षित तरूण जे आपल्या घरच्या परिस्थितीवर मात करत मिळेल ते काम करून अर्धपोटी उपाशी राहून आपले शिक्षण पूर्ण करतात आणि मग नोकरी नाही नोकरीसाठी भरायला पैसा नाही कोणाचाही वशिला नाही त्यामुळे नोकरी मिळतच नाही मग तरूण शासनाने स्थापन केलेल्या विविध आर्थिक विकास महामंडळ यांचेकडे पाय वळतात आणि आर्थिक योजनेसाठी हवी असणारी कागदपत्रे जुळवाजुळव सुरू होतें सर्व कागदपत्रे राष्ट्रीय कृत बॅंकांना सादर केली जातात. आणि रोज देव पुजा चुकेल पण बॅंकांचे हेलपाटे चुकतं नाहीत चांगलं चार पाच महिने असे हेलपाटे चालतात. शेवटी बॅंक कर्मचारी व अधिकारी आपणास हे कर्ज प्रकरण देता येणार नाही.  तुम्हाला हे आर्थिक योजनेचे प्रकरण मिळावयाचे असेल तर बॅंक कर्मचारी व अधिकारी यांना टक्केवारी कमिशन द्यावे लागेल अशी मागणी शिपाई यापासून केली जाते काय वाईट प्रकार आहे बघा ? आणि हेलपाटे मारून वैतागलेला तरूण # भिक नको कुत्र संभाळ # असा प्रकार होतो. 

      एखाद्या राजकारणी व्यक्तिने कर्जासाठी शिफारस किंवा कर्ज मागणी केली तर त्याला कोणतीही बॅंक नकार देवू शकत नाही. उलट # नेते बॅंक तुमचीच आहे # अशी वागणूक दिली जाते

अशी सुध्दा काही प्रकरणे वृतमानपत्रात वाचतो. ऐकतो की आपल्या पदांचा. आपल्या सत्तेचा गैर वापर करून काही राजकीय लोकांनी अशा विविध आर्थिक विकास महामंडळातील कोट्यावधी रुपयांचा निधी हडप केला.  आणि ज्यांनी कर्ज स्वरुपात निधी उचलला त्यांनी एक रुपया सुध्दा मागं परतफेड केली नाही त्यामुळे आज काही आर्थिक विकास महामंडळात गरजू तरूणांना वाटप करण्यासाठी एकही रुपया शिल्लक नाही. एवढेच काय काही आर्थिक विकास महामंडळना कुलप लागली. आणि सर्वात मोठें कधी न भरून निघणारे भगदाड पडले याला जबाबदार कोण ? शासनाने खरोखरच जर आपल्या अधिकारांचा वापर करून बाकी कर्जाचा सर्वे नुसता केला तर गरजू तरूणांना पाहिजे तेवढे. बीजभांडवल. थेट कर्ज योजना अशी कर्जे देणे सहज शक्य आहे

                आपल्यात सुध्दा काही महाभाग असे आहेत की त्यांनी लहान लहान उद्योग सुरू करण्यासाठी शासकीय निमशासकीय महामंडळातून काहीनी ओरिजनल तर काहीजणांनी बोगस कागदपत्रे तर काहीजणांनी नेते पुढारी यांची शिफारस जोडून लाखो रूपयांची कर्जे आर्थिक विकास महामंडळाकडून काढली पण त्याचा कसलाही परतावा केला नाही याचा परिणाम खरोखरच गरजू असणारे तरूण यांना आज एक रुपया सुध्दा कर्ज मिळत नाही आणि मिळवायचे असेल तर राजकीय शिफारस पाहिजे ती कोण देत नाही  आणि घरची परिस्थिती बेताची असल्याने या सुशिक्षित तरुणांना गवंडी काम. फरशी काम. हमाली करावी लागत आहे.  असे विविध हलाखाची शारीरिक कष्टाची कामे करून आपल्या कुटुंबाला हातभार लावावा. अशी वेळ आली आहे 

              आपल्या संविधानानुसार सर्वांना काम पोटभर अन्न शिक्षण समान हकक. असे अधिकार दिले आहेत. 

      समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी व जनजागृती जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८८०८२५८५९

आरोग्य वाचवा. शासनाला जागवा.

आरोग्य वाचवा. शासनाला जागवा. 

                    गाव छोटी छोटी होती अशा आकांक्षा कमी होत्या कोणीही आजच्यासारखे रोजच बाहेरचं रस्त्यावर गाडीवर मिळणारे खाद्यपदार्थ खाण्यास जात नव्हते कारण तेवढे आपले चोचले नव्हते आज सर्वत्र गावात तालुका जिल्हा राज्य सर्वच ठिकाणी चौका चौकात वडापाव. चायनीज भेळ. दाबेली. बिर्याणी पाणीपूरी मटन चिकन दुकान. तेल व किराणा विक्री करणारे दुकानें. फिरून खाद्यपदार्थ विक्री करणारे. फळे फुले भाजीपाला विक्री करणारे. अशी एक नाही अनेक प्रकारचे खाद्यपदार्थ विक्री करणारे आज जागोजागी ठाण मांडून बसले आहेत त्यातच यांचेकडून ग्राहकाला मिळणारी वागणूक. मिळणारी स्वच्छता. तशा प्रकारची आहे. 

                आज आपणं वडापाव बद्दल बोलू आपल्या आसपासच काय पण ग्रामीण भागात किंवा शहरी भागात आज हातावरचे पोट असणारे. दिवसभर काम करणारे राहण्याचा ठिकाणा नाही. असे व दिवसभर वेड्यासारखे फिरणारे. भिक मागणारे. अशी बरीच जनता आणि यांचं एकमेव बजेट मधील खाण आहे ते म्हणजे वडापाव. स्वस्त परवडणारा असा एकच पदार्थ आहे. आपल्या महाराष्ट्रच केंद्र माणल जाणारी मुंबई येथे प्रथम खाद्यपदार्थ म्हणून वडापाव याचा सहभाग असतो

              वडापाव आणि स्वच्छता आणि वडापाव मध्ये वापरला जाणारा कच्चा माल त्याचा दर्जा. काम करणारे कामगार यांचे आरोग्य. याचा आपण कधीच विचार केला नाही आज मी तुम्हाला एका वडापाव गाडीवर घेऊन जातो. चौकाच्या एका कोपरयात गटारवर फरशी टाकून त्यावर गाडी उभी केलेली. सकाळी सर्व खाद्यपदार्थ विक्री करणारे गाडे चालू होतात. पिण्यासाठी बोअरचे पिण्यास अयोग्य असे पाणी. बाजारात कमी दरातील मिरची. सडलेली कोंथिबीर. सर्वात खराब झालेला काळ पडलेला बटाटा. कमीत कमी आठ दिवस न बदलेले खाद्यतेल. अस सर्व असत कामांवर असतो तो बालकामगार. त्याच्या अंगावर फाटलेली कपडे. वाढलेली केस नखे अशी सर्वच खाद्यपदार्थ विक्री करणार्या गाड्यांची परस्थिती आहे. असे सर्व लहान उद्योग सुरू करण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभाग अशा खाद्यपदार्थ विक्री करणार्या लोकांना नियम अटी घालून परवाने देतात पण सत्यता कोणताही नियम पाळला जात नाही. त्यामुळे खाद्यपदार्थ विक्री करणारे मोकाट झाले आहेत. हेच उधोग नाही तर. बार. हाॅटेल. धाबे. घरगुती खाणावळ. यांच्याबद्दल सुध्दा अन्न व औषध प्रशासन विभागाचे परवाना नियम अटी सारख्याच आहेत. पण सत्यता पालन होत नाही मटन चिकन विक्री करणारे दुकानें यांवर स्वच्छता नाही. कामांवर असणारा कामगार त्याचे आरोग्य. स्वच्छता अभाव. कापण्यात येणारे कोंबडी बकरी त्याचा दर्जा. काय. काही दुकानांवर निकृष्ट दर्जाचे मांस विकले जाते. आपण वृतमापत्रात वाचतो दूरदर्शन वर बघतो अन्न व औषध प्रशासन विभाग यांची मटन मार्केट मधील दुकानांवर छापा टाकला आणि अमुक अमुक किलो निकृष्ट दर्जाचे मांस जप्त केले जप्त केलेले मांस व अन्य पदार्थ कुठे गेले अधिकारी व कर्मचारी यांच्या पोटात. बघा छापा कश्यासाठी टाकला. तुमचे आमचे आरोग्य सांभाळण्यासाठी नाही 

          चायनीज एक मोठ खुळ आपल्या डोक्यात आहे घरातील सर्वजण एकत्र बसून चायनीज खातात पण ते कधी शिजवल जात. तेल कोणत आहे. चिकन कसल आहे. चायनीजला कलर लाल आला म्हणजे कोणत केमिकल त्यात वापरल आहे. ते आपल्या शरिरावर काय विपरीत परिणाम करिल याचा आपण कधी विचार करत नाही मग याचा विचार अन्न व औषध प्रशासन विभाग यांनी तरी केला आहे का ? 

 फळें विक्री करणारे नासकी कुजकी फळे विकली जातात. फळे पिकविण्यासाठी विविध औषध केमिकल वापरले जाते त्यामुळे मानवी आरोग्यास धोका निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे 

         गुटखा. खैनी सिगारेट विडी तंबाखू. अफू चरस गांजा नशेची औषधे. गोळया. पाऊडर. अशी विविध व्यसनाची सवय आपणास आपल्या चौकात चौकात आपल्या घराजवळच्या पानटपरी पासून लागते. शाळा कॉलेज विद्यालये महाविद्यालये यांच्या जवळ नशेचा कोणताही पदार्थ विक्री करण्यास शासनाने बंदी घातली आहे पण आज सर्वत्र सर्रास नशेच्या पदार्थांची विक्री केली जात आहे कोणताही रोख ठोक नाही यामुळे आपली तरुण पिढी धोक्यात आहे आतातरी अन्न व औषध प्रशासन विभाग कुठे आहे 

              दारूबंदी साठी शासन नुसता आदेश काढते पण त्यावर कोणतीही कारवाई होत नाही आज काही गावांत शाळेच्या भिंतीला लागून आज दारू दुकान आहे ज्या महिलांनी उलटी बाटली आंदोलन केली त्यांनी राजकारणात प्रवेश केला आणि राजकारणी लोकांनी आंदोलन खुडून काढली. कोणीही काहीही बोलत नाही कारणं ही दुकाने सत्ताधारी यांच्या बगलबच्चे यांचीच आहे याला कोण लगाम घालेल काय माहित नाही 

अन्न आणि औषधे यांचे

 प्रमाणीकरण करून, त्यांच्या निर्मितीवर व वाटपावर नियंत्रण ठेवणारी शासकीय यंत्रणा. १९३५ नंतर अन्नाची गरज खूप वाढली होती, परंतु उत्पादन मात्र कमी होत होते. अशा परिस्थितीत अन्नामध्ये इतर पदार्थांची भेसळ करण्याचे प्रमाण वाढले. अन्नभेसळीस प्रतिबंध घालण्यासाठी केंद्र शासनाने ‘अन्नभेसळ प्रतिबंधक कायदा-१९५४’, अंमलात आणला. इ.स. १९५५ पासून या कायद्यातील त्रुटी घालवून व योग्य त्या तरतुदी करून त्याची सर्व राज्यांत अंमलबजावणी करण्यात आली आहे. या कायद्यामुळे अन्नात व पेयात भेसळ करण्यास मनाई करण्यात आली. अन्नाची साठवण योग्य ठिकाणी व योग्य प्रकारे व्हावी; त्यावरील वेष्टन अन्नाला व औषधाला घातक नसावे; त्यावर निर्मितीची तारीख, कालावधी व साठविण्यासंबंधीच्या सूचना इ. सर्व बाबी स्पष्टपणे लिहिलेल्या असाव्यात, असे या कायद्यात नमूद करण्यात आले आहे.

अन्न आणि औषधे यांचे विश्लेषण करण्यासाठी प्रत्येक विभागात सर्व सुविधायुक्त प्रयोगशाळा शासनाकडून उभारल्या जातात. त्या ठिकाणी योग्य शिक्षण असलेले प्रशासक व तपासणी अधिकारी नेमले जातात. तपासणी अधिकारी अन्न वा औषधे खरेदी करून परीक्षणासाठी प्रयोगशाळेत पाठवितात. उत्पादनात भेसळ आढळल्यास संबंधित व्यक्तीवर किंवा उद्योगावर खटला भरण्याचा अधिकार त्यांना असतो. एखादा ग्राहकदेखील अन्नाची व औषधाची खरेदी करून परीक्षणासाठी ते प्रयोगशाळेत पाठवू शकतो. मात्र ग्राहकाने त्याचा हा उद्देश विक्रेत्याला अगोदर सांगावा लागतो. महानगरपालिका, नगरपालिका इत्यादी संस्थाही त्यांचे अधिकारी नेमू शकतात.


केंद्र शासनाच्या आरोग्य विभागामार्फत या प्रशासनाचे नियंत्रण केले जाते. आरोग्य सेवेचे महासंचालक हे प्रशासन विभागाचे अध्यक्ष असतात. इतरही सदस्य या समितीवर असतात. अन्न व औषध परीक्षण यांसाठी वेगवेगळ्या समित्या असतात. औषधे आणि सौंदर्यप्रसाधने यांविषयीचा कायदा १९४० मध्ये अंमलात आणला गेला. १९६२ मध्ये सर्व प्रकारची प्रसाधने या कायद्याखाली आली. अशा कायद्यामुळे संपूर्ण भारतात औषधे व प्रसाधने यांची निर्मिती, साठवण, वाटप व विक्री यांवर नियंत्रण आले. ग्राहकांना प्रमाणित औषधांचा पुरवठा योग्य तर्‍हेने व्हावा, हा यामागील मुख्य उद्देश असतो. इंटरनॅशनल कॉंग्रेस ऑफ हार्मोनायझेशन ही आंतरराष्ट्रीय संस्था या नियंत्रणासाठी मार्गदर्शक तत्त्वे ठरविते.

      ‌. आपले आरोग्य चांगले राहावे यासाठी शासनाने विविध विभाग नेमले आहेत त्यात प्रामुख्याने अन्न व औषध प्रशासन विभाग. अन्न सुरक्षा अधिनियम. असे विविध विभाग आपल्यासाठी आहेत यामध्ये आपणांस काही चुकीचे आपल्या आरोग्यास हानिकारक अपायकारक असे वाटत असेल तर आजच आवाज उठवा आणि त्याची तक्रार संबंधित ठिकाणी करा आरोग्य वाचवा शासनाला जागवा. 

         समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार जाहिरात प्रसिद्ध वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९ 

    बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर यांचेकडून शिराळा तालुक्यातील सार्थ निवड कामांची आवड सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणारे धडाडीचे नेतृत्व. श्रीमती सौ अनिता विजय धस यांची युनियनच्या. शिराळा तालुका कार्याध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली

धर्म - आपण कोणत्या जातीचे आहोत

 


         आपण कोणत्या जातीचे आहोत हे विचारलें आज प्रामुख्याने जाते पण कोणीही आपणांस तुम्ही कोणत्या धर्माचे आहात हे विचारत नाही आणि कोठेही जात प्रमाणपत्रासारखी. धर्माचे प्रमाणपत्र नाही हा सर्वात मोठा तेढ आहे. 

                  कार्य करणेच धर्म आहे. मानवतेपेक्षा कोणताच धर्म नाही. पण तरीही जेव्हा आपण आपल्या चारही बाजूंना अनेक प्रकारचें धर्म पाहतो. तेव्हा आपल्यालाही जाणीव होते की. मानवतेबरोबरच आता कुठल्या ना कुठल्या धर्माचे नाते जुळले आहे. यासाठी धर्माबाबत आपल्याला विचार करण्याची वेळ आली आहे. प्रत्त्येक माणूस जेव्हा धर्म बंधनात अडकलेला आहे तेव्हा त्यांना लोकांना धरमज्ञान देणे गरजेचे आहे. या ज्ञानाचया मदतीने आपण मानवतेचा धर्म सोबत घेऊन आपले जीवन सुधारु शकतो

        दान अध्ययन. आणि कर्म यांनी आपला दिवस सार्थक करावा. दान आणि ज्ञान दोन्हीही गोष्टी माणसासाठी जास्त महत्वाच्या आहेत हे दोन्ही केलें तर माणस चे मन लागेल त्याला आनंदी समाधानी राहता येईल. त्याचा वेळ व्यर्थ जाणार नाही. माणसाला धर्म. अर्थ. काम. मोक्ष या चार मधील कुठल्याही एकाच्या प्राप्तीसाठी जर प्रयत्न केला नाही आणि अशा प्रकारचें कार्य केले नाही. ज्यामुळे असे फळ मिळावे तर मानव जन्म व्यर्थ आहे. त्या माणसांचे या पृथ्वीवर येणे व्यर्थ आहे. असा पुरुष स्वतः स्वःतावर व या पृथ्वीवर ओझे ठरतो. जीवनाचा उपयोग वेळेच्या बाहेर चांगल्या कामांत लावून करता येईल चांगलें कार्यच जीवन महान करते. हे आपणास विसरून चालणार नाही. कि जीवन अस्थायी आहे. यासाठीच या जीवनाच्या प्रत्येक क्षणाचा उपयोग सत्कर्म करण्यात घालवावा. यासाठी या जन्माच्या प्रत्त्येक क्षणाचा उपयोग केला पाहिजे. मृत्यू आला तर मग काहीच राहणार नाही. न हे शरिर. न कल्पना. न अशा. प्रत्त्येक वस्तू मृत्यू सोबत संपून जातील

        सर्वात मोठी देवता आग आहे. देवता प्राण्यांच्या ह्रदयात निवास करतात. साधारण बुध्दी असणार्या साठी. या दगडाच्या मूर्ती देवीदेवता असतात. ते या मूर्ती मध्ये देवांचे दर्शन घेतात. परंतु हे कधीही विसरू नये की चांगला व्यवहार करणयारे व तीव्र बुध्दीच्या ज्ञानी लोकांसाठी या पृथ्वीवर धरतीच्या कणाकणात ईश्वर आहे यांच्यासाठी जगाच्या प्रत्त्येक ठिकाणांवर ईश्वरच ईश्वर आहे हे आपणांस धर्म सांगतो

             सत्य सर्वात मोठी गोष्ट आहे. सत्य जर सोडले तर बाकी सर्व मिथथा आहे. हे सत्य आहे की सूर्य व्याप्त आहे. हेही सत्य आहे की वायू सत्य सांगतो याचप्रमाणे या जगातील सर्व वस्तू फक्त सत्यावर अवलंबून आहेत. म्हणूनच प्राणयाने नेहमीच सत्याचे पालन करावे. फक्त याच एका आधारावर जीवनातील प्रत्येक क्षेत्रात आपणास विजय मिळतो. पुरुष सुरवातीपासूनच चंचल आहे. या जगात काही स्थायी नाही. लक्ष्मी चंचल आहे ती एका जागेवर थांबत एका जवळ राहत नाही ती रमणी आहे. पण ज्यांनी तीचा आदर केला त्याच्याजवळ लक्ष्मी कायम वास्तव्यास राहते हेही आपणस धर्म शिकवतो. आणि याचप्रकारे या जगातील प्रत्येक वस्तू आपला दिनक्रम करत असते. धन. नाते. गोते. सर्व चंचल आहे. यातील काहीही नेहमी कुणाची सोबत करित नाही. जोपर्यंत पैसा आणि संपत्ती आपणाजवळ आहे तोवरच सर्व आपल्या सोबत आहे. हे सुद्धा आपणांस धर्म शिकवतो

            फक्त धर्मच श्रेष्ठ आहे. तो अटळ सत्य आहे. आणि ते म्हणजे ज्ञानभंडार. ज्ञानच स्थायी आहे. ते कधीच प्राण्यांची सोबत सोडत नाही. माणसाची श्रवन शक्ति सर्वात महान असतें. ते ऐकून ज्ञान मिळते. ते ऐकून मोक्ष प्राप्त होतो. त्याचप्रमाणे प्राणी प्रत्त्येक चांगली वस्तु फक्त ऐकून ग्रहन करतो. तो चांगल्या वाईट दोन्ही गोष्टी ऐकतो. परंतु वाईटापासून दूर राहून त्यांने त्याने फक्त चांगल्या व ज्ञानाचया गोष्टी ऐकावयात. हे आपणास धर्म सांगतो. नियती सर्वात बलवान आहे. प्राणयासोबत जे काही होणार आहे होणार असेल त्यानुसार बुध्दी. व तसंच प्राण्यांचा व्यवहार होऊन जातो. नियतीचा प्रभाव त्यांच्या पूर्ण शरिरावर पडतो जे होणार आहे ते अटळ आहे. जे व्हायचे आहे ते होणारच. व्हायचे ते होतेच. मृत्युला जगात सर्वात मोठी शक्ती माणले जाते. आणि अटळ सुध्दा माणले जाते. कारण मृत्यू या जगात सर्वांना गरिब श्रीमंत लहान मोठा सर्वांना खाऊन टाकतो. संसार नष्ट झाल्यानंतर राज्य शिल्लक राहते मृत्यू कधी झोपत नाही. कायम जागृत असतो. यासाठी मृत्युला विसरून चालणार नाही. मृत्युला ध्यानात ठेवून नेहमीच. चांगली कामे. चांगला व्यवहार करावेत. जीवनाचे खरे लक्ष वाईट करणे नाही. चांगलें करणे आवश्यक आहे. आपण जे काम करतो जसे करतो तसे फळ मिळतें. यामुळे मानव या संसाराच्या मायाजाल मध्ये बांधला आहे. आणि जेव्हा मृत्यू येतो तेव्हा हे सगळे इथेच राहून जाते. इथले काहीही प्राणयासोबत जात नाही. त्यांच्याबरोबर जाते ते म्हणजे त्याने आपल्या पूर्ण आयुष्य भर केलेलें चांगलें वाईट कर्म हे सर्व ज्ञान आपणांस धर्म देतो

              संसारात फक्त कर्मच मुख्य आहे. करमाचेच फळ माणसाला मिळते. ही तर गोष्ट स्पष्ट आहे. माणसाला फक्त धर्माचे च. फळ मिळतें. तर मग प्राण्यांसाठी हे अत्यावश्यक आहे की नेहमी चांगलें काम करावे. इंद्रियांवर संयम आणि जीवांवर दया केल्याने बुध्दीची शुध्दी होते. कर्म प्राण्याला लहान किंवा मोठे करते. यासाठी नेहमी चांगलें कर्म करा. वाईटापासून दूर रहा. घृणा. क्रोध. लोभ माया. मोह. यांचा त्याग करा. ज्याप्रमाणे फुलात सुगंध. तिळात तेल. लाकडात आग. दुधात तूप. उसात साखर. या सर्व वस्तूंचा आपण बाहेरून त्यांच्या गुणांचा अंदाज लावू शकत नाही. आपण या सर्व गुणांचा फक्त आपण विचार करू शकतो. देव आत्मयात आहे. आपण आत्मा शरिरापासून वेगळ करू शकत नाही. माणसाच्या शरिरात आत्मा आहे हे आपण ओळखू शकत नाही. माणसाच्या विचारांवर आपण ओळखू शकतो. म्हणूनच प्राणयापेक्षा आत्मा श्रेष्ठ आहे. देव कुठे आहेत ? दगडात आहे का ? उंच उंच मंदिरात आहेत का ? देव फक्त आपल्या भावनेत आहेत. भावना श्रध्दा निर्माण करते. आपली जसी भावना आहे तसे देवांचे रूप. मग त्याची मूर्ती कशीही असो. हे सर्व आपणांस धर्म शिकवतो

                ज्या लोकांनी काम. क्रोध. लोभ. माया. अहंकार. यांवर विजय मिळविला ते महान झाले. प्रत्त्येक ठिकाणी प्रत्त्येक क्षेत्रात त्यांना विजय मिळाला. जग नेहमी अंचल राहत नाही. तर मग माणसं हा विचार का करतात? ते इथं नेहमीच राहणार आहेत पण मृत्यू तर एक दिवस येणार आहे. त्याला कधीच विसरू नका. यासाठी कधीच वाईट लोकांसोबत राहू नका. शक्य असेल तर पुण्य मार्गाने कार्य करा. यासाठी फक्त ज्ञानी आणि सज्जन लोकांसोबत रहा. या मार्गाने आपण आपल्या जीवनात सुख समाधान आनंद प्राप्त करु शकतो. सर्व प्राणी मात्रावर दया करा. निस्वार्थ पणाने कार्य करा. खोटे बोलू नका. महिला मुल कुमारी कन्या यांचा अपमान करू नका. हेच काय यापेक्षा अनेक कार्य आपण भगवी कफनी कपडे न घालता. माळ धारण न करता. चंदन लेप न लावता. लोकांना ज्ञान देतो तोच नेहमीचं साधू असतो. घाण कपडे घालणारे. घाण दात ठेवणारे. कायम प्रमाणापेक्षा जास्त जेवणारे. घाणेरडे शब्द बोलणारे. सुर्योदय सुर्यास्त होताना झोपणारे. यांना स्वता लक्ष्मी जरी धनवान बनविण्याचे ठरविले तरी हे गरिब आळशी राहतात. ते नेहमीच निर्धन राहतात. ज्ञान व शास्त्र अगणित आहे. विद्येची कुठली मर्यादा नाही. परंतु हे जीवन मर्यादित आहे. यात बर्याच अडचणी आहेत. म्हणूनच प्रत्त्येक प्राणयाने ज्ञान आत घ्यायला हवे. ज्ञानी लोक चांगली गोष्ट मनांत पचवितात. तेच महान होतात. त्यांचे जीवन महान होते. असे पुष्कळ लोक आहेत जे मोठें मोठं धर्मग्रंथ वाचूनही त्यांना ज्ञान प्राप्त होतं नाही. चांगलें जेवन जेवल्यानंतर चव कळत नाही. म्हणूनच धर्मग्रंथ वाचूनही काही उपयोग नाही. म्हणूनच धर्मग्रंथ वाचण्यापेक्षा त्यातील ज्ञान ग्रहन केलें तरच लाभ मिळतो हे सर्व ज्ञान आपणांस धर्म देतो शिकवितो

            चांगलें कर्म करणारे लोक त्यांनी काम. क्रोध. लोभ. माया. मोह. यापासून दूर रहाणे गरजेचे आहे आसे लोक मुक्ति प्राप्त करतात त्यांना मृत्यूनंतर स्वर्गात स्थान मिळते. फक्त भजन कीर्तन. पूजा विधी. नमाज. पडून मुक्ति मिळत नाही कर्म तर केलेच पाहिजे. कर्म यथार्थ आहे. धर्म आदर्श आहे. ज्ञान हा प्रश्न कुंज आहे. जो जीवनाच्या अंतापर्यंत रस्ता अलौकिक करित राहतो

              महाभारत. रामायण. कुराण. बायबल. असे विविध धर्म ग्रंथ आहेत पण त्या धर्मग्रंथात देण्यात आलेली शिकवन समान एकसारखी आहे. कोठेही रक्त सांडून शांती मिळणार नाही. म्हणूनच. आपण देवाला नवस करतो त्यात आपण माझी अमुक इच्छा पूर्ण होऊ दे मी तुला कोंबडा कोंबडी बकरे. कापतो असे म्हणतो पण आजपर्यंत कोणाच्या ऐकण्यात सुध्दा नाही की कोणी असं नवस केल की मी देवाला वाघ सिंह यांचा बळी देतो. का सांगा कारण गरिब दिनदूबळे यांचाच बळी दिला जातो 

              समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

ऊस तोडणी कामगारांच्या साठी मोठी बातमी

 


ऊस तोडणी कामगारांच्या साठी मोठी बातमी पोटासाठी आपलं गाव सोडून नगर बीड उस्मानाबाद अशा विविध ठिकाणचे ऊस तोडणी करण्यासाठी कामगार येतात. पण यांतच त्यांचे रहाणे आरोग्य मुलांचं शिक्षण. महिलांना आरोग्य सुविधा पुरविण्याचे. काम हे साखर कारखाने यांचे आहे 

              ऊस तोडणी कामगार हे कारखाना सुरू असेपर्यंत ऊस तोडणी करण्यासाठी उचल घेतात. आणि मग ऊस तोडणी टोळीचे म्होरके या उचली पेक्षा अनेक पटित या कामगारांकडून काम करून घेतात. महिलांना हीन वागणूक. मुलांना शिक्षण नाही आरोग्याची कमतरता. रहाण्यासाठी योग्य जागा नाही. सुरक्षितता अभाव. 

               ऊस तोडणी कामगारांसाठी. व महिला मुल वयोवृद्ध यांच्यासाठी प्रती महिन्याला आरोग्य शिबीर घेणे गरजेचे आहे. मुलांना अंगणवाडी वर्ग मुलांचे आरोग्य जोपासणे साठी सकस आहार या योजना करणे गरजेचे आहे

                  ऊस तोडणी कामगार काम करीत असताना होणारा अपघात. बैलांचा अपघात. याची भरपाई देण्याची जबाबदारी साखर कारखाने यांनी घेणे गरजेचे आहे कामगारांना होणारी गावगुंड यांचेकडून माराहान. पोलिस प्रकरणांत मदत. ऊस तोडणी कामगार यांचा विमा. बैलाचा विमा. विविध लसीकरण मोहीम. हंगाम चालू आहे तोपर्यंत या ऊस तोडणी कामगार यांची सर्वस्व जबाबदारी साखर कारखाने यांनी घेणे गरजेचे आहे अनेक वेळा ऊस तोडणी कामगार अपघात झाल्याचे आपण बघतो वाचतो पण त्यांना परगावाहून आल्यामुळे कोणीही मदत करत नाही  

             शासनाने या सर्व परस्थितीचा विचार करून ऊस तोडणी कामगार यांना न्याय मिळवून देण्यासाठी साखर कारखाने यांना कडक निर्देश दिले आहेत त्यानुसार त्यांची अंमलबजावणी होते कां नाही हे पाहण्यासाठी समिती नेमणे गरजेचे आहे 

राज्यातील 6/ लाख ऊस तोडणी कामगारांना मिळणार विमा कोरोणाचया पार्श्वभूमीवर राज्यातील 6/ लाख ऊस तोडणी कामगारांना मिळणार विमा तोडणी हंगाम संपताना कोरोणा प्रादुर्भाव निर्माण झाला त्यामुळे कामगारांना गावी जाताना अडचणी निर्माण झाली होती लस येण्यास उशीर लागणार असल्याने येत्या हंगामात तोडणी कामगारांना संरक्षण मिळाल्याशिवाय साखर कारखाने सुरू होणे शक्य नसल्याने विमा कवच योजना हाती घेतली जात आहे राज्यात 100 सहकारी व 87/ खासगी कारखाने असुन जवळजवळ 6 लाख कामगार हा व्यवसाय करतात नोव्हेंबर ते एप्रिल महिन्यापर्यंत कारखाने ऊस गाळप चालते सध्या कोरोणा महामारी मुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे ऊस तोडणी कामगार महामंडळ व सरकार व सहकारी कारखाने मिळून विमा रक्कम भरणार आहेत एका कामगारांना कमीत कमी 700 ते 1000 रुपये विमा हप्ता येणार आहे त्यातून कोरोणाने मृत्यू झालयास कामागारांचया कुटुंबीयांना 10 ते 15 लाख रुपये मिळाले पाहिजेत असी तरतूद करण्यात आली आहे व तसे प्रयत्न सुरू झाले आहेत बर्याच दिवसांनी या बेवारस परगावाहून पोट भरण्यासाठी येणाऱ्या ऊस तोडणी कामगारांना न्याय मिळाला

                समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा काढला उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार जाहिरात प्रसिद्ध वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

One;">९८९०८२५८५९

ग्रामसभा व चावडी वाचन

 


ग्रामसभा व चावडी वाचन

              पूर्वी गाव लहान लहान होती. त्यावेळी लोकांना आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचे कथन करण्यासाठी गावातील पारावर एक बैठक व्यवस्था असायची. त्यात थोड शिकलेली लोक पेपर वाचून दाखवत असत कारणं त्यावेळी शिक्षण व्यवस्था कमी होती. करमणूक वाचन. एकामेकाचे सुख दुःख सारे काही पारावर कळत होते. लोकांच्या मधील आपसी मतभेद. घरगुती भांडणे. चोरी. खून मारामाऱ्या. सारखी प्रकरणे या पारावर बसणारी मान्यवर मंडळी कोणताही भेद न करता सोडवत असतं. त्यामुळे गावातील सलोखा व शांतता राखण्यासाठी मदत होत होती. नंतर गावा गावात बदल झाला आणि पारावर बसणारी बैठक याचं रूपांतर गावात निवडणूका होऊन पारावर बसणारी निर्णायक बैठक व्यवस्था चार भिंतींच्या आत गेली.  त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य याची निवड झाली. आणि लोकांचे तंटे सोडविण्यासाठी तंटामुक्ती अभियान राबविण्यात आले. गावातील लोकांचे राहणीमान उंचावण्यासाठी शासनाने ग्रामीण भागातील लोकांच्या साठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यात आल्या त्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ग्रामपंचायत हे माध्यम ठरविण्यात आले. आणि येथूनच खरे ग्रामपंचायत राजकारण सुरू झाले 

              ग्रामसभा घेण्याचा शासन वेळोवेळी आदेश देत आहे. ग्रामसभा याचा अर्थ असा होतो की. गावांत घडलेली सर्व शासकीय कामे. रस्ते. गटर बगीचे स्मशानभूमी समाजभूमी. जिल्हा परिषद शाळा. गावातील विविध समाजहितासाठी योजना. आर्थिक सहाय्य योजना  विविध  जात वर्गवारी घरकुल   योजना. महसूल विभाग.  रेशन विभाग. गावातील सुधारित भविष्य धोरण. वृद्धांसाठी विविध योजना.  अशा विविध कामांचे प्रत्येक महिन्याला ग्रामसभा घेऊन त्यात. गावातील ग्रामस्थांना बोलावून समोरा समोर वाचन करणे शासन निर्णयानुसार बंधनकारक आहे पण आज कोठेही ग्रामसभा होत नाही. झाली तर सर्वसामान्य माणसाला या ग्रामसभेला बोलावले जातं नाही. याच कारण आहे की गावाच्या विकासासाठी येणारे शासकीय अनुदान किती आले कुठे किती खर्च झाले हे जर सर्वसामान्य माणसाला कळेल आणि त्याला ते कळले तर गावातील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य यांचे गावाच्या विकासातील पितळ उघडे पडेल म्हणून ग्रामसभा होत नाही. आणि झाली तर ग्रामस्थांना बोलवले जात नाही आज सुध्दा चावडी वाचन झाले पाहिजे. गावातील सुख सोयी. गावातील सर्व मजूर सोसायट्या. सर्व मागासवर्गीय सुतगीरण. अंत्योदय योजना लाभार्थी. सात बारा वाचन. निधी वाटप. बचत गट. यामध्ये नावाप्रमाणेच लाभार्थी आहेत कां ? नेते पुढारी यांचे सदन बगलबच्चे यात आहेत का ? 

              ग्रामपंचायत सभाबाबत महाराष्ट्र शासन परिपत्रक क्र पीआरसी १०७७/२७०/ सीआर दि ११/९/१९७८ व महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ मधील ग्रामपंचायत सभा ( ग्रामसभा ) नियम १९५९ (क १७६(२)!खंड (७) मधील नियम १ टिप १ मधील तरतदी या स्वयम् स्पष्ट आहेत. तसेच संदर्भातील क्र २ चया पत्रांनवये तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी.  जिल्हा परिषद. शासन नियमानुसार कार्यवाही करणेबाबत संबंधितांना आदेश देण्यात आले होते 

          पंचायत राज समितीच्या सन १९७६/७७ चया नवव्या अहवालातील परिच्छेद क्र २/१९/६/३२/८/१७/ आणि १२/९ नुसार ग्रामसभा व मासिक सभा नियमितपणे न घेण्याबाबत समितीने असमाधान व्यक्त केले आहे. या संदर्भात अनुक्रमे शासन परिपत्रक ग्राम विकास क्रमांक व्हिपीएम १३७५/३५५५/२३ दि १० फेब्रुवारी १९७६ चया परिपत्रकात असे स्पष्टिकरण देण्यात आले आहे की मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम ७ पोटकलम (१) व मुंबई ग्रामपंचायत ( ग्रामसभा बैठका ) नियम १९५९ चे नियम ३ पोट कलम (१) अन्वये सरपंच किंवा त्यांच्या अनुपस्थितीत उपसरपंच त्यांचेवर कमीत कमी दोन ग्रामसभा बैठका घेणे कायद्याने बंधनकारक आहे.  या शासन परिपत्रकात असे नमूद करण्यात आले आहे. ग्रामसभेच्या दोन बैठका घेण्यात कसूर केली तर ती व्यक्ती. सरपंच/उपसरपंच म्हणून काम करण्यास अनरह ठरते. तसेच दि ७ जानेवारी १९७७ चया परिपत्रकानुसार सर्व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सुध्दा आदेश देण्यात येत आहेत. की त्यांनी ग्रामसभा व मासिक सभा हया नियमितपणे घेता येतील याची दक्षता घ्यावी. व कसूर करणारे सरपंच उपसरपंच यांचे विरुद्ध कारवाई करण्यात यावी. असा शासन निर्णय सांगतो. असा शासन निर्णय असताना सुध्दा संबंधित अधिकारी यांच्या गलथापनामुळे उदासिन वृत्तीमुळे ग्रामसभा व मासिक सभा नियमितपणे घेण्यात येत नाहीत हा शासन निर्णणयाचा अवमान होत आहे असे वागणारे अधिकारी व कर्मचारी यांचेवर शासन निर्णयाचा अवमान केला म्हणून निलंबणाची कारवाई करण्यात यावी

            मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम ७(१) व मुंबई ग्रामपंचायत ( ग्रामसभा बैठका) नियम १९५९ चे नियम ३ पोटनियम (१) अन्वये प्रत्येक वित्तीय वर्षातील ग्रामसभेचीपहिली सभा ही त्या वर्षाच्या सुरुवातीनंतर दोन महिन्यांच्या आत भरविण्यात आली पाहिजे आणि दुसरी सभा ही प्रत्येक वर्षाच्या नोव्हेंबर महिन्यात भरविण्यात आली पाहिजे तसेच उपरोक्त नियमांचे पोटकलम (२) अन्वये आणखी दोन बैठका पहिली आॅगसट महिन्या मध्ये व दुसरी २६ जानेवारी रोजी घेतल्या पाहिजे नमुद केलेल्या अवधीत ग्रामसभेच्या बैठका घेणे सरपंचास त्यांच्या अनुपस्थितीत उपसरपंचास व ग्रामपंचायत सचिवास आवश्यक आहे असा नियम कायदा ग्रामसभा घेणेबाबत करण्यात आला आहे

            मुंबई ग्रामपंचायत अधिनियम चे कलम ७ मध्ये नमूद केलेल्या दोन ग्रामसभा पैकी कोणताही एक ग्राणसभा भरविणयास चुकला तर तो सरपंच व उपसरपंच म्हणून चालू राहण्यास किंवा पंचायत सदस्यांच्या उरलेल्या पदासाठी निवडला जाणार नाही. तसेच मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम ३६ अन्वये जर उपसरपंच व सरपंच पुरेसे कारण दिल्याशिवाय वित्तीय वर्षात पंचायती ग्रामसभा बोलविण्यास चुकेल तर तो सरपंच व उपसरपंच चालू राहणे साठी किंवा पंचायतीच्या सदस्यांच्या उरलेल्या पदासाठी उरलेल्या कालावधीसाठी सरपंच व उपसरपंच म्हणून निवडला जाऊ नये अशी कायदेशीर तरतूद करण्यात आली आहे अशी तरतूद असुन सुद्धा व वेळोवेळी शासन आदेश देऊन सुद्धा सरपंच व उपसरपंच सचिव यांच्या भोंगळ कारभारामुळे व ग्रामसभा घेण्यासाठी असणारे निरुत्साही वृत्तीमुळे या बैठका अनियमितपणे घेण्यात येत नाहीत हे पाहून खरोखरच शासनाला खेद वाटत आहे जिल्हा परिषद सर्व कार्यकारी अधिकारी व कर्मचारी यांना शासन आदेश देत आहे की त्यांनी त्यांच्या अधिकार क्षेत्रांतील पंचासमीचे सभासद. गटविकास अधिकारी. यांना ग्रामसभेच्या व मासिक सभेच्या बैठका वेळोवेळी व नियमाप्रमाणे घेण्यात येतात या बाबत दक्षता घेण्याबाबत भाग पाडावे. याबद्दल तपासणी करणारे अधिकारी व कर्मचारी किंवा सरपंच उपसरपंच यांचेकडून या बाबतीत. रोष किंवा उदासीनता झाली तर त्याची गंभीर दखल घेऊन अशा व्यक्ती विरूद्ध कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी. जिल्हा परिषद सर्व कार्यकारी अधिकारी यांना या परिपत्रकानुसार शासन विनंती करत आहे की त्यांनी गट विकास अधिकारी शक्य तितक्या ग्रामसभेचया व मासिक सभेला सर्व गावातील सर्वसामान्य माणसाला बैठकीस हजर राहून मार्गदर्शन करण्याबाबत सूचना देण्यात याव्या जिल्हा परिषद सर्व कार्यकारी अधिकारी यांना असा आदेश देण्यात येतो की त्यांनी गटविकास अधिकारी यांना ग्रामसभा घेण्यासाठी सूचना द्याव्यात त्यांनी ग्रामपंचायत सचिवांच्या मासिक सभेत. ग्रामसभेच्या बैठकीसाठी जास्ती जास्त लोक हजर राहतील यासाठी जास्तीत जास्त प्रसिद्धी द्यावी याबद्दल कोणती उपाययोजना आखण्यात यावी याबाबत त्यांनी योग्य तो निर्णय घ्यावा 

      समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

हाक - धोक्याची जाणीव

 

हाक - हाक  - धोक्याची जाणीव

धोक्याची जाणीव करून देण्यासाठी दिली जाते त्याला हाक म्हणलं जात. हाक हा शब्द खेडेगावातील आहे पण आज सर्व भागात या शब्दाची गरज भासली आहे. आज. विविध योजनांच्या नावाखाली होणारी लूट. विविध पेन्शन योजना मिळवून देण्यासाठी लुट. रेशनकार्ड काढून देण्यासाठी लुट. दवाखान्यात डॉ कडून रुग्णांची लुट. पेट्रोल डिझेल दरवाढ. घरगुती गॅस दरवाढ. भरमसाठ विज बिल. ग्रामपंचायत नगरपालिका महानगरपालिका यांचीही पठाणी पध्दतीने मालमत्ता कर वसुली. बॅका पतसंस्था यांचें मनमानी व्याज. गावातील शहरातील विकास कामे गटर बगीचे स्मशानभूमी समाजभूमी रस्ते. यामध्ये लाखो रूपयांचा अपहार. महिला सुरक्षा अभाव. महिलांना मिळणारी वागणूक. शाळा कॉलेज विद्यालये महाविद्यालये यामध्ये फी चे नावाखाली पालकांची लुट. बस सेवा प्रवाशांची लुट. घरकुल घोटाळा. अपंग कल्याण योजनांचा बाजार. सुशिक्षित बेरोजगारांची वाढती संख्या. वाढती गुन्हेगारी. आत्महत्या प्रमाण. राजकीय दबाव. विविध हक्कांना तिलांजली. अशा एक नाही अनेक प्रश्नांवर विचार करण्यासाठी व तुम्हाला जाग करण्यासाठी # हाक दिली आहे. # 

          भारतातील आरोग्याचा प्रश्न हा अनेक घटकांवर अवलंबून आहे. प्रामुख्याने. गरिबी. दारिद्र्य. बेरोजगारी. रेशन घोटाळा. रेशन दुकानदार आणि पुरवठा अधिकारी व कर्मचारी सगणमत. जागोजागी भ्रष्टाचार. पैशाची उकाळणी. लोकशाहीचा अभाव. अशा विविध घटकाशी निगडित आहे. अफाट दारिद्र्य आणि बेरोजगारी यांनी देशातील 60/टक्के पेक्षा अधिक लोकांना पोटभर एकावेळचे अन्न मिळत नाही. आणि ज्यांना मिळते त्यांचाही आहार. चौरस. संतुलित व पोषणमूल्य युक्त असत नाही. जीवनसतवाचा अभावी अनेक व्यक्तिंना कोणते ना कोणते तरि भयानक आजार असतताच. सर्वसामान्य भारतीय माणसाच्या आहारात प्रथिनाचा अभाव असतो. गोरगरीबांना दुध फळे सकस आहार मिळत नाही. त्यांच्या अन्नपदार्थांत पालेभाज्या व इतर भाज्यांचा समावेश नाही या कारणांमुळे सर्वसामान्य कुटुंबातील मुल कुपोषणाचे बळी होतात. शारीरिक मानसिक वाढ नाही. त्यांची कार्यशक्ती पूरेशी नाही. एवढेच काय काही ठिकाणी पिण्यास स्वच्छ व वर्षभर पाणी सुध्दा उपलब्ध नाही. यामुळे याभागात साथीचे आजार रोग झपाट्याने पसरतात आणि गावच्या गावं बाधित होतात. 

              आरोग्याची काळजी आणि औषधांचा वापर याबाबत भारतामध्ये पुरातन परंपरा आहे. ग्रामीण भागामध्ये रांनपाला वनस्पती आणि गावठी औषधांचा वापर केला जातो. व त्या विषयांचे ज्ञान एका पिढिकडून दुसऱ्या पिढीकडे येते. या ज्ञानाचे आत्ता आयुर्वेदिक औषधां मध्ये झालेलेच दिसते. पूर्वी राजदरबारी राजवैध असत आणि सामान्य लोकांसाठी इतर वैद्यांची मदत मिळत असे. मुघल साम्राज्याच्या उदयाबरोबर युनानी औषध उपचार पद्धती काही ठिकाणी लोकप्रिय झाली. अनेक ठिकाणी हकिम अशा प्रकारचीं औषधयोजना करीत असत. म्हणजे पूर्वी औषध उपचार समाजसेवा आणि रुग्ण सेवा ही ईश्वर सेवा म्हणून केली जात असे. माणूस वाचला पाहिजे पैशांची अशा नव्हती आज या वैद्यकीय पेशाचा पैसा मिळविण्यासाठी बाजार मांडला आहे. कोणताही नियम नाही. कोणतेही उपचार दर निश्चित नाही. औषधांचे दर निश्चित नाही.  

           ब्रिटिश आगमनानंतर ख्रिश्चन मिशनरयानी पाश्चात्य अॅलोपथी. चिकित्सक प्रसार सुरू केला व ही पध्दती लवकरच म्हणजे कमी वेळात लोकप्रिय झाली. त्यामुळे आयुर्वेदिक आणि युनानी चिकित्सा पद्धती मागे पडल्या. सामान्य आणि स्वस्त रितीने मिळणारी औषधांची सोय रितीने मागे पडली महात्मा गांधी याचे मर्म ओळखून निसर्गोपचार. योग आणि शाकाहारी यांचा प्रसार सुरू केला. म्हणजे ब्रिटिशांनी सुरवातीला आपणांस वेगवेगळ्या पध्दतीने लुटले आणि नंतर मुळालाच हात घातला तो म्हणजे वैद्यकीय साधने औषध नावाखाली लुटले त्यात अजून बदल झाला नाही ती लुट आज आपलेच परकियांच्या संगनमताने सर्वसामान्य जनतेला लुटत आहेत 

                ब्रिटिशांनी साधारणपणे जिल्ह्याच्या ठिकाणी नागरि रूग्णालयाची इस्पितळाची निर्मिती करून आरोग्याची सोय पहिल्यांदा केली. स्वातंत्र्यानंतर काळात ग्रामपातळी पर्यंत आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रे स्थापन करण्याची योजना आखण्यात आली. तरिही आज भारतात सर्वत्र सुलभ आणि गोरगरीब जनतेला परवडणारया खर्चात औषधोपचाराची सेवा उपलब्ध झालेली नाही त्याला कारणीभूत आहे ते म्हणजे आपल्यातील आरोग्य सेवेचा बाजार. शासकिय योजना विमा कंपन्या यांचेकडे वर्ग करणे. महात्मा फुले जन आरोग्य योजना. राजीव गांधी जीवनदायी आरोग्य. पंतप्रधान आयुष्मान आरोग्य योजना. या फक्त नावालाच आहेत त्यांची मक्तेदारी ठराविक राजकीय दवाखाने यांनाच देण्यात आली आहे. याबाबतची भारतातील परस्थिती अंत्यंत मागासलेल्या देशा सारखीच आहे. याचा अर्थ देशांमध्ये उत्तम वैद्यकीय तज्ञ. शल्यविशारद यांची कमतरता आहे असे नाही. केरळ किंवा पंजाब सारख्या देशात वैद्यकीय सेवा अधिक चांगल्या रितीने उपलब्ध आहेत तर उत्तर प्रदेश. बिहार. मध्य प्रदेश. राजस्थान या राज्यात वैद्यकीय सेवेचा दर्जा निकृष्ट आहे असे म्हणता येईल 1960 नंतर आरोग्य क्षेत्रात कार्य करणार्या स्वयंपूर्ण संघटनांची वाढ होऊ लागली. आज देशात सर्वसाधारण पणे 5000 स्वयंस्फूर्तीने काम करणार्या संघटना वैद्यकीय क्षेत्रात कार्य करीत आहेत. अनेकदा या संस्था युनियन संघटना वैद्यकीय उपचार किंवा आरोग्य सेवा शिबिरे. कान. नाक. घसा. तसेच नेत्रचिकितसा इत्यादी सर्वसामान्य जनतेसाठी गोरगरीब लोकांसाठी शिबिरे भरवली जातात. यांतच कुटुंब कल्याण शिबिरांचे आयोजन केले जाते. अलीकडेचया काळात काही डॉ संघटना याबाबतीत जाणीवपूर्वक सहभाग घ्यावयास सुरुवात केली आहे. धार्मिक तसेच सामाजिक संघटना या क्षेत्रात अविरतपणे काम करताना आपण बघतो. . 

            आरोग्य सेवेच्या क्षेत्रात अनेक संघटना जरी कार्य करीत असल्या तरी अजूनही त्या एकत्रित कार्य करू राजकीय दबावामुळे शकत नाहीत. त्यामुळे शासकीय धोरणांवर त्याचा पाहिजे त्या प्रमाणात परिणाम होत नाही. विविध विचार प्रणाली. विविध पक्षाचा दबाव. विचार मत भिननता. या क्षेत्रात कार्य करीत असल्याने त्यांच्यात एक वाकयता होणे कठीण आहे. केरला शास्त्र साहित्य परिषद नाव या संदर्भात अपवादात्मक म्हणून सांगता येईल. सामान्य माणसापर्यंत प्राथमिक स्वरुपाचे वैद्यकीय ज्ञान नेण्याचा संघटनेने जाणिवपूर्वक प्रयत्न केला आहे. मद्यपान. धूम्रपान. व इतर अमली पदार्थ याबाबतची वयसनता बाबतीतील व्यसनाधीनता भारतीय समाजात विशेषत युवकवरगामधये. आज वाढत आहे. काही संघटनांनी मोठ्या मोठ्या शहरांत व्यसन मुक्ती याबाबत मोहीम उघडली आहे. परंतु अखेरीला आरोग्य प्रश्न हा सामाजिक व आर्थिक न्यायाच्या प्रशनाशी निगडित असल्याची व्यापक जाणीव समाजामध्ये निर्माण झाल्याखेरीज या संघटना. सेवाभावी संस्था युनियन समाजसेवक यांच्या प्रयत्न अपुरे पडतील 

          समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा 2013 रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

9890825859

सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा

  सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा            अनुसूचित जाती जमाती. इतर मागासवर्गीय जाती जमाती. भटक्या विमुक्त...

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या