Showing posts with label कलाकार. Show all posts
Showing posts with label कलाकार. Show all posts

कलाकारांची दिवाळी कडू

 


कलाकारांची दिवाळी कडू

              कलेला आकार देणारा कलाकार मातीला आकार देणारा कुंभार शिल्पास आकार देणारा शिल्पकार. लोखंड वितळून त्याला आकार देणारा लोहार मातीला आकार देणारा कुंभार समाजात आपल्या कले द्वारे समाज प्रबोधन संबोधन. करमणूक जनजागृती जाहिरात करणारे एकमेव नाव आहे ते म्हणजे कलाकार असे विविध कलाकार आपण बघतो काही ध्यानात राहतात. आणि काही विसरून काळाच्या पडद्याआड जातात.  

         बॅण्ड वाले. बॅनजोवाले. तमाशगिर. गोपाळ गोलहा. दांगट. नंदिबैलवाले. मदारी. साप गारुडी. वासुदेव. भविष्य कथन करणारे. मनकवडी. कुडमोडे जोशी. डमरू वाले. भिक्षेकरी. विविध रुप घेणारे सोंगाडे. लोकनाट्य. गोंधळी. बहुरूपी. जागरण. आरकेसटरा. पोपटवाले. डोंबारी. पांगूळ. डवरी. अस्वलाचे खेळ करणारे. भजन कीर्तन द्वारे जनजागृती करणारे. लग्नात विविध कला सादर. करणारे. असे एक नाही अनेक कलाकार आपल्या नशिबाला पुजलेली गरिबी पोटासाठी मिळेल त्या सुपारीवर आपली कला सादर करणारे कलाकार. जवळपास ढोबळ मानाने या अशा कलाकारांचा सर्वे केला तर असे निदर्शनास आले की भारतात ११ कोटी पेक्षा जास्त कलाकार संख्या आहे त्यातील महाराष्ट्रात ७३ लाख संख्या आहे हे सर्व जण पोटासाठी आज हे गाव उद्या ते गाव असा प्रवास असतो. भीक कोण देत नाही. शेती नाही. कायमचा निवारा नाही. शिक्षण नाही. हव तस हाताला काम नाही रोज सकाळी दान पावल म्हणणारा वासुदेव. पाऊसाचे भाकित करणारा नंदीबैल वाला. पोटासाठी नाचते मी पर्वा कुणाची म्हणणारी ती नृतकी. भविष्य कथन. ठराविक अंतरावर उभे राहून आपली कला सादर करणारे मनकवडी. नाचतो गा डोंबारी म्हणत दोरीवर उड्या मारणारे. दांडपट्टा घोडेस्वारी छातीवर दगड फोडणे असे मैदानी खेळ करणारे. असे विविध कलाकार पोटाच्या आकांताने ओरडत असतो आणि आपण टाळ्या वाजवत असतो स्वता खरोखरच रडणारा कलाकार याचा तो अभिनय आहे म्हणून आपण त्याचा आनंद घेत असतो. सगळ व्यवस्थित चालला होत कलाकार आणि मुल बायका. म्हातारे आई वडील यांना कसेबसे दोन वेळचे जेवण मिळत होत पण जास्त काळ ही प्रस्थिती राहिली नाही. 

            २२/२३ मार्च ला कोरोना सारखे महाभयंकर महामारी संकट आले आणि शासनाने लोकांच्या संपर्कामुळे गर्दि यामुळे कोरोना सारखी महामारी वाढण्याचा धोका शासनाच्या ध्यानात आला त्यामुळे शासनाने मार्च २०२० मध्ये. वाडी वस्ती गाव तालुका जिल्हा राज्य देश यामध्ये टाळेबंदी जारी केली. आणि जगण्यासाठी पैसा मिळविणारा जीव वाचवण्यासाठी घरातच बसून राहीला. शासनाने विविध सामाजिक कार्यक्रम. लग्न. मुंजी. वाढदिवस. जंयती. पुण्यतिथी. असे विविध कार्यक्रम रद्द करण्यात आले त्यातच जत्रा. यात्रा. रद्द करण्यात आल्या त्यामुळे. या सर्व कार्यक्रमात वाजाप काम करणारे कलाकार यांच्या हाताला काही कामच राहिलं नाही. कलाकारांच्या हाताला काहीच काम नाही त्यामुळे हातात पैसा नाही त्यामुळे त्यांच्या वर व त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली काही कलाकारांना ही उपासमारीची वेळ बघणे अवघड झाले एकवेळ लोकांच्या सहवासात राहून वाहवाह मिळविलेल्या कलाकाराने आत्महत्या सारखें मार्ग निवडले आणि आपली जीवनयात्रा संपवली किती वाईट आहे बघा 

            कलाकारांच्या विविध अडचणींवर. प्रश्नावर आवाज उठविण्यासाठी. सांगली मधून कलाकार महासंघ यांनी ग्रामपंचायती पासून मंत्रालयापर्यंत मार्च २०२० ते २०२१ पर्यंत कलाकारांना काम नाही त्यांचे सर्व कार्यक्रम कोरोनामुळे रद्द झाले यांना शासनाने या टाळेबंदी काळात कोणतीही मदत दिली नाही. यासाठी पत्र व्यवहार करून. जागोजागी बंद आंदोलन मोर्चा रस्ता रोको आंदोलन. बोंब मारो आंदोलन. हायवे आंदोलन. अशी वेगवेगळी आंदोलने १४ महिन्यात करण्यात आली. पण शासनाला या कलाकारांची दया आली नाही. शेवटी मुख्यमंत्री यांनी तिस-या कोरोना लाटेच्या पार्श्वभूमीवर ११ आक्टेबर २०२१ रोजी. कार्यक्रमावर लावणेत आलेले निर्बंध हटविण्यात आले आणि कार्यक्रम करण्यास मार्ग मोकळा झाला पण सर्व काही पूर्व नियोजित आणि पहिल्या सारखें होण्यास बराच वेळ लागणार आहे. शासनाने कोरोना काळात कलाकारांचे झालेले नुकसान भरपाई म्हणून एकही रूपया कलाकारांना दिला नाही. 

            ६०/६५ वयोवृद्ध गटातील अ ब क गटानुसार मानधन देणें निर्णय आहे त्यानुसार शासनाने ५६ हजार वयोवृद्ध कलाकारांना २८ कोटींचे पॅकेज जाहीर केले पॅकेज जाहीर करून बरेच दिवस झाले पण खरोखरच कलाकारांना आत्ता दोन महिन्यांचे मानधन अनुदान आत्ता मिळाले म्हणजे जाहीर झाले कधी मिळालं कधी यांचा काही मेळ आहे का ? कोरोना काळातील दोन वर्षांची नुकसान भरपाई. व शासनाकडून देण्यात येणारे अनुदान मानधन वेळेत मिळाले असतें तर आज सर्वांच्या घरांत दिवाळी साजरी होत आहे. प्रत्येक जणांचे तोंड गोड होणार आणि आमचा कलाकार तोंड कडू करून बसला आहे. म्हणजे संस्कृती व आपले संबोधन प्रबोधन प्रचार प्रसार करणारे कलाकार यांच काय ? 

             टाळेबंदी जारी करण्यात आली तेव्हा कलाकार यांनी हाताला मिळेल ते काम मिळेल त्या मजूरीवर केलें 

                शासनाकडून निर्णय जाहीर झाला पण त्याची अंमलबजावणी कलाकार जीवंत आहे तोपर्यंत करणे गरजेचे आहे शासनाने विविध क्षेत्रातील लोकांच्या साठी विविध आर्थिक विकास महामंडळ स्थापन केली आहेत पण आपल्या तरूणाईच्या काळात कलाकार वयोवृद्ध होत आहेत. त्यावेळी त्यांच्यावर येणारी वेळ अतिशय वाईट आहे शासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे पटटिचा कलाकार रस्त्यावर भिक मागताना दिसत आहे. चहा तंबाखू द्या. घरच्यांची मदत नाही. मुल पोसत नाहीत. शासनाच्या शासन त्यांच्या नोकरी प्रमाणेच थोडी का होईना पेन्शन देत असतें म्हणजे ६० वर्षात सेवानिवृत्त झाल्यावर. त्यांचे पुढचे आयुष्य सुखकर व्हावे यासाठी शासनाचा उपक्रम आहे पण कलाकार कशातच नाही. मग कलाकारांना पेन्शन योजना सुरू होणार का ? त्यांची अंमलबजावणी होणार का ? कलाकार जगला पाहिजे नाहीतर गोष्टींच्या रूपात कला व कलाकार आपल्या मुलांना सांगावें लागतील 

              समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

कलाकार महासंघ महाराष्ट्र राज्य संघटनेचा उदघाटन सोहोळा

 



कलाकार महासंघ महाराष्ट्र राज्य संघटनेच्या ठाणापुडे तालुका वाळवा जिल्हा सांगली या शाखेचा उदघाटन सोहळा संपन्न झाला या उद्घाटनप्रसंगी कलाकार महासंघ महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा अनिल मोरे चिकुर्डे जिल्हा परिषद सदस्य मा अभिजित पाटील आबा ,असंघटीत कामगार संघटना पश्चिम महाराष्ट्र प्रमुख रविंद्र पाटील वाळवा तालुका संघटक नाना कांबळे कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष उमेशजी अवघडे भ्रष्टाचार जन आक्रोश संघटना कोल्हापूर जिल्हा अध्यक्षा. सौ सुरेखा पाटील पन्हाळा तालुका अध्यक्षा सौ अम्रपाली गायकवाड ठाणापुडे गावचे सरपंच सौ मनिषा पाटील ग्रामपंचायत सदस्य जयसिंगराव पाटील ग्रामपंचायत सदस्य सुभाष शिंदे मोहन पाटील आण्णा राजू अवघडे पत्रकार शाखेचे आधार स्तंभ सुनिल पाटील शाखा अध्यक्ष आकाश कांबळे शाखा उपाध्यक्ष संदिप महापूरे शाखा सरचिटणीस राहुल तोंदले शाखा कोषाध्यक्ष अनिकेत शिंदे शाखा संघटक यशवंत समुद्रे सुनिल कांबळे आनंदा कांबळे हणमंत पाटील रोहीनी कांबळे सह महिला पुरुष कलाकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कलाकार महासंघ महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा अनिल मोरे साहेब यांच्या हस्ते बोर्ड चे फित कापून उद्घाटन झाले व श्रीफळ जिल्हा परिषद सदस्य मा अभिजित पाटील आबा यांनी वाढवून केले . याप्रसंगी संदिप महापूरे आकाश कांबळे ,मोहन पाटील आण्णा तसेच अभिजित पाटील आबा यांची भाषणे झाली. शेवटी अध्यक्षीय भाषणातून अनिल मोरे साहेब यांनी उपस्थित सर्वांचे स्वागत केले व गेल्या पंधरा वर्षांत संघटनेने केलेल्या कामाचा आढावा बोलून दाखवला अखंड महाराष्ट्रात कोरोणा काळात कलाकारांचे तसेच आॅर्केष्ट्रा सोंगी भजन बॅन्ड बेंजो तसेच प्रत्येक कलाकारांचे आणि मालक लोकांची झालेली नुकसान भरपाई म्हणून शासनाने एक वेगळं पॅकेज जाहीर करावं तसेच कलाकारांच्यासाठी विकास महामंडळ स्थापन करण्यात यावं तसेच कलाकारांचे विविध प्रश्न घेऊन शासनस्तरावर लढणारी महाराष्ट्रातील संघटना म्हणून कलाकार महासंघ महाराष्ट्र राज्य हीच एकमेव संघटना आहे हे सांगायला विसरले नाहीत. माझ्या जिवात जीव असेपर्यंत कलाकारांच्या साठी शासन दरबारी न्याय मागून त्यांना तो न्याय मिळवून देईन अशी ग्वाही अनिल मोरे यांनी दिली. कार्यक्रमाची सुरुवात शिव,शाहू, फुले आंबेडकर आण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजनाने करण्यात आली. शेवटी आभार शाखा उप अध्यक्ष संदिप महापूरे यांनी मांडले

कलाकार -

 कलाकार कलाकार



             नावात मोठे रहस्य दडलेले आहे. मातीला आकार देणारा कुंभार. शिल्पाला आकार देणारा शिल्पकार. लोहाला आकार देणारा लोहार. शैक्षणिक प्रसार करणारे शिक्षण महर्षी. समाजात संबोधन प्रबोधन प्रचार आणि प्रसार करणारे समाजसेवक. असे विविध विभागात काम करणारे कार्यकर्ते लोक आपण बघतो. काही ध्यानात राहतात काही विसरून जातात. कारणं आपल्याला चांगले पचत नाही रूचत नाही मग विचार खुडणयाचे काम आपणच करतो कारण समोर असणारा आपल्या ध्यानात राहतो पण पडद्याच्या मागे असणारे काळाच्या ओघात गायब होतात कारणं त्यांचे कार्य चांगले असते आज पुरस्कार प्रमाणपत्र याचे वाटप त्यांचे कार्य न बघता तो कोणाचा कार्यकर्ता आहे हे प्रामुख्याने बघितले जाते किती वाईट आहे बघा ? 

                  आपल्या पूर्वीच्या काळात कलाकार हे फक्त पोट भरण्यासाठी व समाजांत प्रबोधन समाजहिताची आपली जबाबदारी आहे अशी भावना मनात घेवून कार्य करत होते गोपाळ गोलहा. / दांगट / नंदिबैलवाले. / मदारी / सापगारूडी / वासुदेव. / भविष्य कथन करणारे / मनकवडी. / कुडमुडे जोशी. / डमरूवाले / भिक्षेकरी / सोंग घेवून मनोरंजन करणारे / औषध उपचार करणारे / तमाशा / लोकनाट्य. /गोंधळी/बहुरुपी/ जागरण/ पोपटवाले / डोंबारी /पांगूळ/ डवरी / असवलाचा खेळ करणारे / भजन कीर्तन /लग्नात नाचणारे / वरातीपुढे बत्ती डोक्यावर घेऊन / भारुडे. / अशा अनेक जातींचे जमाती मनोरंजन व कला यामाध्यमातून जनजागृती करत होते हे सर्व लोक मागास प्रवर्ग अनुसूचित जाती जमाती भटक्या विमुक्त जाती याची परस्थिती बेताची असायची गरिबी नशीबाला पुजलेली. पोट भरल तरी बस असा विचार करणारी महाराष्ट्र मध्ये भटक्या विमुक्त जाती २८ भटक्या तर १४ विमुक्त जाती नोंद आढळते भारतात ११ कोटी पेक्षा जास्त भटक्या जमाती आहेत काही कागदावर आल्या काहींची नोंद झाली नाही महाराष्ट्रात भटक्या विमुकताची लोकसंख्या ७३ लाखांच्या आसपास जाते अशा भटक्या विमुक्त जमातींचे स्वरुप प्रस्थापित समाजापेक्षा फार वेगळे आहे भटकंती हेच त्यांचे जीवन आहे अर्थार्जनासाठी नव्हे तर पोट भरण्यासाठी त्यांना हे गाव ते गाव मनोरंजन कला सादर करत फिरावे लागते देशाला स्वातंत्र्य मिळाले तरी पारंपारिक जातपंचायतीला त्यांना सामोरे जावे लागते रुढी प्रथा पारंपारिक व्यवसाय यातच अडकलेले आहे पूर्वग्रह काम मिळत नाही. भीक कोण देत नाही. शेती नाही. गाव नाही. कायमचा निवारा नाही. शिक्षण अभाव. समाजव्यवस्थेत हे घटक उदरनिर्वाह साठी भटकू लागले या भटकणारया घटकांचे किंवा समूहाचे गटांचे अध्यात्मिक भटके मनोरंजन करणारे भटके आणि जनावरांच्या पालनपोषणासाठी भटकणारे भटके असं वर्गीकरण झाले स्थिर समाजाची अध्यात्मिक गरज भागविण्यासाठी काही समूह गट भटकंती करत होते अध्यात्मिक गरज भागवून पसा कुडचा धान्यावर आपला उदरनिर्वाह करणारे कलाकार 

            गेल्या काळात गावात जत्रा यात्रा असायच्या. भाकरी घाला तमाशा करणारे कलाकार आपण बघितले आहेत त्यांचा उद्देश फक्त पोट भरण्यासाठी नव्हता तर समाजाला अनमोल संदेश येणार्या काळातील धोके यापासून सावध करणे हा होता. पहाटे पहाटे दाण पावलं दाण पावलं असा संदेश देणारे वासुदेव पिंगळे. हे कलाकार यांचा यामागचा उद्देश होता की पहाटे लवकर उठा निरोगी स्वच्छ हवा घ्या आणि आरोग्य सुदृढ ठेवा हे होते कलाकार. शिवाजी महाराज काळात गोंधळी ही एक कलाकार जमात होती त्यांची कला सादर करण्यामागे वेळोवेळी होणारे हल्ले कोणाकडून केव्हा हल्ला होणार हे गोंधळ सादर करणारे हाडांचे कलाकार आम्ही पाहिले आहेत. पाऊसाचे भविष्य सांगणारे नंदिबैलवाले. येणारा पाऊस केव्हा पडेल आपण विश्वास किती ठेवायचा हे आपण ठरवू सापांचे खेळ करून आपल्याला सापाबधदल समज गैरसमज सांगणारे सापांना मारू नका सांगणारे सापगारुडी हे होय. पोपटवाले. याया भविष्य सांगतो हे सांगणारे भविष्य वाले तर कोणी प्राण्यांपासून भविष्य कथन करणारे. दुरवर उभे राहून एकाच्या बोटांच्या हालचाली वर शब्द ओळखणे याला मनकवडी असे संबोधले जाते. वाचतो गा डोंबारी असे म्हणत दोरीवर उड्या मारणारे. दांडपट्टा घोडेस्वारी तलवारबाजी असे मैदानी खेळ करणारे कलाकार हे आपल्यातच होते. माकड उड्या या माध्यमातून लहान मुले यांचें व मोठया माणसांचे मनोरंजन करणारे कलाकार. अस्वलाच्या खेळ करणारे कलाकार. 



              आपल्याला स्वातंत्र्य मिळाले आणि मग आपल्यात व आपल्या समाजव्यवस्थेत क्रांतीकारक बदल झाले शिक्षणाचा प्रसार झपाट्याने झाला ज्ञान विज्ञान तंत्रज्ञान कक्षा नववीन शोध लावले गेले जसे. टेलिफोन / टेलिव्हिजन. / मोबाईल. /सिनेमा थिएटर /बॅन्ड/ डाॅलबि / झांज पथक / लग्नात विधुत रोशनाई / लॅपटॉप / नाटक थिएटर / चित्रपट / असे अनेक कृत्रिम मनोरंजन करणारी सेवा अंमलात आली त्याचवेळी या पोटासाठी जनहितासाठी जनप्रबोधन करणार्या भटक्या विमुक्त जातीचा पारंपरिक व्यवसाय मारला गेला विज्ञान क्रांतिमुळे नशिबाचा किंवा भाग्याचा संबंध नाहिसा झाला ती कल्पना भ्रामक आहे भटक्या जमातीनी मात्र आपला पारंपरिक मनोरंजन व्यवसाय घालवावा स्थिर समाजाची गरज भागविणारे कलाकार उघड्यावर पडले समाजाच्या दया बुध्दी वर भीक मागून जुनी कापडे गोळा करणे मोलमजुरी कष्टाची कामे शोधने. असे व्यवसाय कलाकारांना निकृष्ट जीवन जगण्याची वेळ आली जनावरांच्या चराईसाठी भटकणाऱ्या जमातींची अवस्था याहिपेक्षा दयनीय झाली जनावरें चरण्यासाठी कुरणे बाकिच नाहीत जागोजागी सिमेंट जंगले तयार झाली त्यामुळे जनावरांचे खेळ करून आपला उदरनिर्वाह करणारे यांना जगणे कठीण झाले त्यांनी पोटाची खळगी भरण्यासाठी खडी फोडणे. रस्ते तयार करणे. अशी अंगमेहनतीची कामे शोधायलाच सुरूवात केली रोजगार कमतरता यामुळे ग्रामीण भागात राहणे अवघड झाले मग यांनी शहराकडे स्थलांतर करायला सुरुवात केली शहरात राहण्याचा मोठा प्रश्न मग झोपडी बांधून राहण्यास सुरुवात केली त्यातूनच शहरात झोपडपट्टी वास्तव्य. काळाबाजार. दारु. गुंडगिरी. तयार झालीं आठराविशव दारिद्र्य शिक्षण लाचार. भिकार यांचे. जीवन जगणे त्यामुळे या कलाकार व त्यांची मुल गुन्हेगारी क्षेत्राकडे वळली आणि एक गुन्हेगार विश्व तयार झाले याला आपण कारणीभूत आहोत आज जुने पारंपारिक मनोरंजन बघायला मिळत नाही ही वास्तविकता अगदी वाईट आहे



                २२/२३ /२०२० रोजी आपल्याकडे कोरोना सारख्या महाभयंकर महामारी संकटाने आपल्या गावात तालुका जिल्हा राज्य देशात यात प्रवेश केला आणि चालू गाडीला घुणा लागावं तसं धावपळ करणारी जगण्यासाठी मिळविणारी सर्वसामान्य जनता टाळेबंदी मुळे घरातच अडकून पडली काम नाही त्यामुळे हातात पैसा नाही त्यामुळे त्यांच्या वर व त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली होती त्यात लग्न जावळ मुंजी. व अन्य सण संभारभ यांचेवर अवलंबून असणारे कलाकार मांडववाले. भांडी वाले. लग्न कार्यालय. लग्नात विधुत रोशनाई करणारे व अन्य या व्यवसायावर अवलंबून असणारे कामगार मालक त्यांचेवर व त्यांचे कुटुंबावर उपासमारीची वेळ आली होती कलाकार कामगार मालक हे अक्षरशः रस्त्यावर आले होते आपली व आपल्या कुटुंबाची उपासमारीची वेळ बघून काहीजणांनी आत्महत्या सारखें मार्ग निवडले 

                 शासनाने सर्व क्षेत्रातील लोकांसाठी विविध मंडळे स्थापन केली आहेत पण आपल्या तरुणाईच्या काळात सर्वांचे मनोरंजन करणारे कलाकार ज्यावेळी वयोवृद्ध होतात त्यावेळी त्यांचेवर येणारी वेळ अतिशय वाईट आहे एक वेळ पट्टीचा कलाकार रस्त्यावर भीक मागताना चहा द्या तंबाखूला दोन रुपये द्या. घरच्यांची मदत नाही घराची मुल जबाबदारी घेण्यास तयार नाहीत शासनाच्या नियमानुसार ६०/ वर्षात एकदा अधिकारी व कर्मचारी निवृत्त होतो त्याला पुढचे आयुष्य जगता यावे यासाठी शासन थोडीकाहोईना पेन्शन देते तसी तरतूद कलाकारांच्या बाबतीत करता येणार नाही का ? ६० वर्षाचा व्यक्ति सर्व शासकीय योजनेतून बाद होत असेल तर त्याला मतदानाचा अधिकार कशासाठी त्यांचे मतदार यादीतून नाव वगळून टाका. कलाकार जगला पाहिजे नाहीतर कला व कलाकार गोष्टींच्या रूपाने सांगावें लागतील. 

          आत्ता जादा लिहित नाही लिहताना कोणाच्या आत्मसन्मानाला काही अगाध झाला असेल तर माफी असावी

            समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

वाचा 

आपण जाब विचारु शकतो का ?...

बिगर शेती करणे. बांधकाम परवानगी पध्दती...

कुळकायदा कुळकायदा - Land...

बॅंक खाजगीकरण - Bank privatiazation ...

सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा

  सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा            अनुसूचित जाती जमाती. इतर मागासवर्गीय जाती जमाती. भटक्या विमुक्त...

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या