Showing posts with label INDIAN CONSTITUTION. Show all posts
Showing posts with label INDIAN CONSTITUTION. Show all posts

जनमत जनमत १९५१ चा जनप्रतिनिधीत्त्वाचा कायदा

 

जनमत जनमत 
१९५१ चा जनप्रतिनिधीत्त्वाचा कायदा 

        आपल्या व्यवस्थेत निवडणूका घेण्यासाठी घटनेनुसार. निवडणूक आयोगाची स्थापना झाली आहे. निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांना प्रचार कसा करावा. निवडणूकीवर खर्च किती करावा. ह्याचीही काही आचारसंहिता घालून दिलेली आहेच त्या जोडीला १९५१ चा प्रतिनिधित्त्वाचा कायदा. आहेच. पण आचारसंहिता पायदळी तुडविणयात राजकीय पक्ष मग्न झाले आहेत. निवडणूक आयोग हा एक स्वायत्त आयोग आहे या आयोगाची स्वायत्तता टिकविणे आवश्यक आहे परंतु आयोगाच्या आयुक्तपदी आपल्याच प्रभावातील व्यक्तिची नियुक्ती करण्याचा पायंडा सत्तेवर आलेल्या सर्वच राजकीय पक्षांनी पाडला आहे. ह्यामुळे आयोगाच्या कामात राजकीय हस्तक्षेप वाढलेला आहे मध्यंतरी ऐन निवडणुकीच्या तोंडावर एका निर्वाचन आयुकताऐवजी निर्वाचन आयुक्तांचे त्रिकुट नेमण्याचा प्रयोग करण्यात आला देशात भ्रष्टांच्या मुळात निवडणूका हाच प्रभावी घटक दिसून येतो आपली लोकशाही व्यवस्था पोखरून काढण्यास ह्या घटकाने हातभार लावला आहे. हे आपल्याला दैनंदिन राजकीय. आर्थिक गैरव्यवहाराच्या घटनांवरून स्पष्ट होईल भ्रष्टाचार आणि राजकारणाचे गुन्हेगारीकरण ह्या जागतिक पटलावरील घटना आहेत. असा बचाव मांडून त्यांना झटकून टाकता येणार नाही. संघटित निर्भिड व जागरूक लोकमतच ह्या गोष्टीचा प्रभाव कमी करू शकते. 

        भारतीय राजकारणातील प्रकिया आणि आपले खाजगी विश्व कोणते कुटुंब. जात. धर्म. ह्याचा राजकारणाशी घनिष्ठ संबंध आहे. त्यांची आपल्या सार्वजनिक जीवनात उमटणारी प्रतिबिंबे आपण वेळोवेळी समजावून घेतली पाहिजेत. आपली राजकीय संस्कृती तसेच भारतीय राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्वे मूलभूत हक्क. राजकीय मानसिकतेचा पोत. पक्ष पध्दती वैशिष्ट्य प्रमुख पक्ष व त्याची धोरणे ह्याचाही माहिती आपणांस असणे गरजेचे. आपल्या देशात पंचेचाळीस वर्षांहून अधिक काळ लोकशाहीचा प्रयोग चालू आहे. १९५२ पासून देशात दहा वेळा सार्वत्रिक निवडणुका झाल्या आहेत स्वातंत्र्यानंतर सलग तीन वर्षे कांग्रेस पक्षाकडे सत्ता होती. १९७७ मध्ये जनता पक्ष व १९८९ मध्ये जनता दलाला सरकार बनविण्याची संधी मिळाली होती. ह्या दोन्ही पक्षांना संधी देऊन भारतीय मतदारांनी कांग्रेस पक्षास पर्याय वापरून पहिला परंतु ही दोन्ही सरकारे अल्पजीवी ठरली ह्या दोन्ही सरकारांची अल्पजीवी राजवट वगळता देशाच्या एकूण राजकारणावर कांग्रेस पक्षाचीच पकड दिसून आली. गेली ७१ वर्षे आपली लोकशाही व्यवस्था टिकून आहे. परंतु ह्या काळात देशाच्या एकात्मतेला आव्हान देणारे प्रश्न आजही उभे राहिले आहेत पंजाब काश्मीर आसाम. बोडो. नागा. इत्यादी प्रश्नांनी देशाच्या एकात्मतेला ग्रहन लावले आहे. फुटीरता दहशतवादी. भ्रष्टाचार. सत्तेचे विकेंद्रीकरण. राजकारणाचे गुन्हेगारी करण. धर्मांधता. पुराणमतवादाचे पुनर्जीवन. पक्षांतर. नातीगोती संबंध. विकलांग विरोधी. भ्रष्ट आणि खरचीक निवडणूका. पैशांचा वापर. गुंडगिरी. आर्थिक संबंध. सामाजिक समस्या. समान नागरी कायदा अभाव. हिंदू जातीयवाद. मुस्लिम जातीयवाद. अनुसूचित जाती जमाती व भटक्या विमुक्त जाती व इतर मागासलेल्या वर्गातील जाती. वैधानिक व प्रशासकीय संबंध. वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी यांच्यामार्फत नियंत्रण. पंचायत राज प्रयोग. विविध पक्षाचे जाळे. गटबाजी. अशी विविध माध्यमातून आपल्या लोकशाहीचा गळा घोटून निवडणूका घेतल्या जातात 

            भारतात लोकशाहीला भविष्य आहे का ? असा प्रश्न अनेक राजकीय विचारवंत उपस्थित करतात परंतु भारतात निश्चित लोकांच्या मुळे भविष्य आणि भवितव्य आहे हुकूमशाही व ठोकशाही यांच्यापासून आपल्या लोकशाहीला शाबूत ठेवायचे असेल तर आजपर्यंत झालेल्या सर्व घटनांचे. परिशिलन करून भविष्यासयासंबधी. सावध व जागरूक राहणे आवश्यक लोकांच्या सहभागाशिवाय लोकशाही कधीही यशस्वी होऊ शकत नाही. म्हणून तर लोकशाही पुढे सातत्याने उभी राहणारी आव्हाने समजावून घेऊन ती पेलणयाचे सामर्थ्य आपल्या मध्ये निर्माण करणे गरजेचे आहे. भूतकाळात मूल्यमापन करून वर्तमान व भविष्यातील मार्ग कसा आखता येईल ह्याचा आपण आत्ताच विचार करणे गरजेचे आहे अगदी गांभिर्याने विचार केला पाहिजे

              आज सर्वत्र निवडणूका बिगूल वाजायला सुरुवात झाली. ग्रामपंचायत. पंचायत समिती. जिल्हा परिषद. नगरपालिका. महानगरपालिका. व विविध सोसायट्या. बॅका निवडणूका. एवढेच काय पण काॅलेज मधील निवडणूका. विद्यालय महाविद्यालय येथील चेअरमन निवडणूका. अशा विविध ठिकाणी निवडणूक प्रक्रियेला आपणांस सामोरे जावे लागते. राज्य घटनेने वय वर्षे १८ मतदान अधिकार बजाविणयासाठी. निश्चित केले आहे. निवडणूक याचा अर्थ असा होतो की आपल्यातील आपले दुःख सुख सामाजिक आर्थिक मानसिक शैक्षणिक अशा विविध ठिकाणी आपणांस मदत करणारा आपल म्हणणारा एकादा व्यक्ती संबंधीत आॅफिस कार्यालय असावा यासाठी निवडणूक ह्या जनमताचा वापर करून जनमताच्या कौलाने निवडला जाणारा लोकनिवडीतून निवडला जाणारा आपला हक्काचा माणूस म्हणजे. आपला सरपंच. उपसरपंच. नगरसेवक. अशी विविध पदांची निवड ही आपल्या मतांमुळे होते. थोड्या अमिषापोटी. जेवन दारु पार्टी. पैसा. दबाव. दहशत. गुंडगिरी. बॅंक पतसंस्था कर्जाच्या बोजा खाली आपण आपले अनमोल मत विकतो. आणि चुकीच्या निवडी करतो त्याचा आपणांस पाच वर्ष नाही तर बरेच वर्ष त्रास सहन करावा लागतो.  

              परवाचा करोना सारखा महाभयंकर महामारी संकटापासून आपण व सर्वसामान्य माणूस. शासनाने गाव वाडी वस्ती. तालुका जिल्हा राज्य देश यामध्ये टाळेबंदी जारी करण्यात आली होती तीन महिने सर्व जनता घरातच अडकून पडली होती. अशा बिकट परिस्थितीत आपण आपल्या मताने निवडणून दिलेला सरपंच उपसरपंच नगरसेवक. आपल्या दरवाज्यात आला होता का ? तुम्ही घरातच आहात उपाशी आहात का ? तुमचे कुटुंब लहान मुले म्हातारी लोक यांना वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिली कां ? कोरोना काळात रोगाचा प्रसार प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपल्या वार्डात रोगप्रतिकारक औषध फवारणी झाली का ? आपल्याला मिळणार या सर्व सेवा सोयी. मिळण्यासाठी निस्वार्थी पणे काम केले कां ? आपण एखादे काम घेऊन गेला तर ते वेळेत होत का ? नगरसेवक सरपंच उपसरपंच यांच्याकडे काम घेऊन गेल्यावर आरोपी सारखें उभं राहाव लागत कां ? गरजवंताला घरकुल योजना. संडास योजना. गरज आणि सापेक्ष पणे. दारिद्र्य रेषेखालील लोकांना ग्रामपंचायत नगरपालिका महानगरपालिका येथून येणारे अनुदान मिळते का ? ग्रामसभा. नगरपालिका महानगरपालिका बैठका मिटिंगमध्ये लोकांना सामिल केल जात का ? रेशन संबंधित अनेक अडचणी यांच्यासाठी सर्वे करताना माझा तुझा असा भेदभाव केला जातो का ? घरपट्टी पाणीपट्टी विज बिल. व अनेक कर यामधील सर्व अडचणी वेळी खरोखरच मदत केली जाते का? आपल्या गावाबद्दल. प्रभागातील सुख सोयी बाबत पत्र व्यवहार करण्याचा तुम्हाला अधिकार आहे का ? माहिती अधिकार कार्यकर्ते. समाजसेवक. यांना चांगली वागणूक दिली जाते कां ? महिलांना बचत गट हे महिला उध्दार करण्यासाठी गठीत केली जातात का राजकीय मतांसाठी केले जातात हे आपणांस कोणी सांगत का ? ग्रामपंचायत नगरपालिका महानगरपालिका येथे गोळा होणारा वार्षिक गोळा झालेला कर व खर्च तुमहाला माहीत आहे का ? आपल्या गावातील. शहरातील शासकीय संस्था यांच्या मालकीची मिळकत कोणती त्यापासून संबंधित विभागाला किती निधी गोळा होतो आपणास माहीत आहे का ? आपल्या गावातील शहरातील दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांचा सर्वे कधी आणि कसा झाला हे आपणास माहीत आहे का ? आपल्या गावात शहरांत शासकीय संस्थांकडून निघणारी विविध विकास कामे त्यात. गटर. रस्ते. बगिचे. स्मशानभूमी. समाजमंदिर. दलित वस्ती सुधार. यामधील सर्व कामांचे ठेके. संबंधित सरपंच उपसरपंच नगरसेवक त्यांनाच का दिले जातात आपण कधी चौकशी केली का ? आपण निवडून दिलेले सरपंच उपसरपंच नगरसेवक दाबण्याचे राजकारण. कुजक राजकारण करतात का ? ग्रामविकास व शहरी विकासासाठी वार्षिक किती निधी शासन देते. त्यातला आपल्या प्रभागासाठी किती निधी. आला आपणास माहीत आहे का ? अपंगांसाठी खर्च करण्यात येणारा निधी खरोखरच नैसर्गिक अपंगावरच खर्च केला जातो का तात्पुरत्ये अपंगत्व ही संकल्पना चुकिची आहे. त्यासाठी आपण कधी आवाज उठवला आहे का ? असे विविध प्रश्नाने आज सर्वजण व्यापले आहेत. आणि हे सर्व आपल्या नशिबाला येते ते म्हणजे आपण आपले मत विकले आणि चुकिचे लोक निवडली आपल्या डोक्यावर पाच वर्षे नाचायला. 

              खरोखरच आपण लोकशाही राज्यात आहोंत हे जर सिध्द करायच असेल तर. ज्या गावात तालुका जिल्हा राज्य देश शहर यामध्ये निवडणूका घ्यावयाच्या असल्यास. संबंधित विभागाकडून एक परिपत्रक जारी करण्यात यावे या परिपत्रकानुसार गावातील शहरातील लागू करण्यात आलेल्या निवडणूका व आत्ता त्या गांवात शहरात असणारे सरपंच उपसरपंच नगरसेवक यांच्या कामांचा व त्यांच्या कार्याचा अभिप्राय मागवा. आणि मग बघा जनतेला असा अधिकार आहे पण तो तुम्ही द्या आणि मग बघा किती जणांच्या बद्दल जनतेच्या मनात राग आहे हे तुम्हाला कळले. सरळ सरळ जनता निवडणुकीला विरोध करेल. आणि जनतेच्या मतांवर निवडून आलेले सरपंच उपसरपंच नगरसेवक पांढरे बगळे. यांची किंमत कळेल. आज एकादा सरपंच उपसरपंच नगरसेवक झाला की गाडी बंगले. स्थावर मालमत्ता अशी बेमाफी बेनामी संपत्ती गोळा करणारे यांना लगाम बसेल. खरोखरच लोकशाही असेल तर जनमत घया. परवा कोरोना काळात शासन कोणतेही जनमत न घेता टाळेबंदी जारी करत होते जर त्यावेळी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती यांना मा जिल्हाधिकारी साहेब यांनी परिपत्रक काढणे गरजेचे होते म्हणजे ग्रामस्थांना. व शहरातील जनतेला कळवा आम्ही आपत्कालीन परिस्थितीत यावेळी. या कारणासाठी बंद जमावबंदी करणारं आहोत त्याबद्दल जनमत काय येथे त्यावर निर्णय घेणे गरजेचे होते. म्हणजे कोणाचें मत सकारात्मक आहे कोणाचें मत नकारात्मक आहे याची पडताळणी करून निर्णय घेणे यालाच लोकशाही जीवंत ठेवणे असे म्हणलं पाहिजे नाहीतर हुकूमशाही परवडली 

            समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

काय आहे भारतीय संविधानाचे अनुच्छेद.१६२



काय आहे भारतीय संविधानाचे अनुच्छेद.१६२ 
शालेय शुल्क १५ टक्के कपात झाले का ?

          महाराष्ट्र शैक्षणिक संस्थांमधील सन २०२० ते २०२१ या शैक्षणिक वर्षांमधील शालेय शुल्कामध्ये १५ टक्के कपात करण्याचा शासन निर्णय फोल ठरला आहे. 

             राज्यात मार्च २०२० रोजी कोरोना सारख्या महाभयंकर महामारी संकटामुळे राज्यात टाळेबंदी जारी करण्यात आली सर्व शासकीय निमशासकीय कार्यालये. जिल्हा परिषद शाळा. हायस्कूल. काॅलेज महाविद्यालय विद्यालय. अॅकेडमी वर्ग. विविध शिकवणी वर्ग. आत्तापर्यंत पूर्ण बंद करण्यात आली. कारणं कोरोना संसर्ग वाढू नये लोकांचे व मुलांचे आरोग्य सुरक्षित राहावे. मुलांना कोरोना संसर्ग होऊ नये यासाठी. सर्व राज्यांत कडक टाळेबंदी जारी करण्यात आली होती. लोक टाळेबंदी मुळे घरातच अडकून पडली. लोकांना कामधंदा नाही हाताला काम नाही त्यामुळे हातात पैसा नाही त्यामुळे त्यांच्या वर व त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली त्यातच विविध बांधकाम कामगार. घरेलु कामगार. पापड लोणची चटण्या तयार करणारे उद्योग. धुनी भांडी करणार्या महिला. वाहन चालक मालक. अशा विविध घटकांवर उपासमारीची वेळ आली. एस टी कामगार यांना कामावरुन काढून टाकण्यात आले. त्यावेळी काही कामगार मिळेल ते काम करायला लागले. कोरोना टाळेबंदी काळात एकच व्यवसाय फुल्ल चालला तो म्हणजे भाजीपाला विक्री दुध अंडी अशा विविध जीवनावश्यक वस्तू विक्री करणारे लोक. किराणा दुकानदार यांनी कोरोना टाळेबंदी वेळेचे सोन केल दर वाढवून वस्तू विकल्या आणि पैसाच छापला. एकंदरीत कोरोना काळात जीवनावश्यक वस्तू विक्री करणारे. यांनी संकटात सापडलेल्या जनतेचा गैरफायदा घेतला शासन आदेश होता कोणी टाळेबंदी काळात जादा दराने विक्री करील त्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. पण ऐकतो कोण कारण दुकानदार आणि शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच साटंलोटं होतं. 

              वरील सर्व कोरोना काळात निर्माण झालेल्या परस्थितीचा परिणाम मुलांच्या शिक्षणावर झाला शाळा कॉलेज विद्यालये महाविद्यालये अॅकेडमी असे विविध शैक्षणिक संस्था बंद ठेवण्यात आल्या. त्यामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होण्यास सुरुवात झाली विविध शैक्षणिक संस्थांनी जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात वर्षांची शालेय फी भरून घेतली आणि मार्च पासून शाळा बंद करण्यात आल्या म्हणजे शैक्षणिक संस्थांना माहिती होत काय मार्च मध्ये टाळेबंदी लागणार आहे. म्हणजे एकंदरीत शाळा फायद्यात. शैक्षणिक संस्थांनी शिक्षणाचा पर्याय शोधला तो म्हणजे आॅनलाइन शिक्षण घेण्याचा. मग काय कोणाकडे गरिबी मुळे स्मार्ट फोन नाही. काही ठिकाणी आॅनलाइन शिक्षण घेण्यासाठी मोबाईल रेंज नाही. यामुळे अधिकच नुकसान झाले. मोबाईलसाठी काही मुलांनी आग्रह आपल्या आई वडील यांचेकडे धरला आणि मोबाईल परस्थिती मुळे मिळाला म्हणून आत्महत्या केल्या कोण जबाबदार आहे का ?

            शासनाने अखेर विविध शैक्षणिक संस्था सर्व अटि नियमानुसार चालू करण्याचा निर्णय घेतला पण आगोदर एक वर्ष घरातच असणारी मुले लगेच शाळेकडे वळणार का ? त्यांची शैक्षणिक रुची पहिल्यासारखी दिसणार कां ? असे एक नाही अनेक प्रश्न आ वासून उभे राहिले. त्यातच टाळेबंदी मुळे पालकांची बिघडलेली आर्थिक स्थिती वाहन कर्ज. घर कर्ज. व्यवसाय कर्ज. बॅंक कर्ज. भिसी कट्टा भिसी. सावकारी पाश. विविध फायनान्स कंपन्या. अशा विविध आर्थिक संस्थांचे कर्ज यामुळे लोकांचे कंबरडं मोडल आहे त्यातच विविध शैक्षणिक संस्थांची मनमानी पद्धतीने आकारली जाणारी फी. गेल्या वर्षापासून थकित असणारी शालेय फी. ही हजारांच्या घरात होती. शाळा चालू झाली पण विविध शालेय संस्थांनी दोन वर्षांची फी भरल्याशिवाय मुलांना शाळेत प्रवेश देण्यास नकार दिला. मनमानी कारभार. हीन वागणूक व्याज लावून वसुली सुरू झाली 

              शाळांच बाजूला ठेवा आपल्या गावातील ग्रामपंचायत नगरपालिका महानगरपालिका या क्षेत्रातील मिळकत धारकांना घरपट्टी पाणीपट्टी थकबाकी माफ करण्याची गरज होती पण गजब कारभार बघा माफ करायच राहिल असणार्या घरपट्टी पाणीपट्टी व विविध करावर दंड आकारण्यात आला आणि त्या दंडावर व्याज घेतलं हा सर्वात मोठा तुम्हाला आम्हाला फसविण्याचा फंडा आहे 

        मुलांची शिक्षणाची ही गैरसोय व शाळांचा मनमानी कारभार. बेकायदेशीर फी वसुली याचा सर्वात मोठा प्रश्न उभा राहिला यांवर तोडगा म्हणून शासनाने १२/ आॅगसट २०२१ रोजी शालेय शुल्कामध्ये १५/ टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला कोविड १९ या महामारी पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात २४/ मार्च पासून टाळेबंदी लागू करण्यात आल्यामुळे. त्याचा सामाजिक व आर्थिक पातळीवर मोठा प्रतिकूल परिणाम झाला आहे. या मुळे सर्व अर्थव्यवस्था मोडकळीस आली असून अनेक पालक त्यांच्या स्वयम् अर्थ सहहय खाजगी शाळेत शिक्षण घेणा-या पाल्याच्या फी भरण्याच्या स्थितीत नाहीत त्यामुळे या असाधारण परस्थिती शाळची फी. कमी करण्याबाबत / माफ करण्याबाबत अनेक पालक. सामाजिक संस्था. यांनी निवेदने शासनास दाखल केली होती 

      शैक्षणिक वर्ष २०२०/२१ विद्यार्थ्यांच्या पालकांनी या अधिनियमान्वये मान्यता दिलेल्या शाळेच्या शुल्क संरचनेनुसार. शुल्क प्रदान केलेलें आहे. तथापि राज्यात दि २४ मार्च २०२० पासून कोविड १९ या सार्वत्रिक साथरोगाचया प्रादुर्भावामुळे आणि या साथरोगाचे नियंत्रण ठेवण्यासाठी शासनाने टाळेबंदी घोषणा केल्यामुळे बहुतांश कालावधीसाठी शाळा बंद होत्या तसेच प्रवासावर किंवा येणयाजाणयावर देखील निर्बंध होते. परिणामी या सार्वत्रिक साथरोगामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे विद्यार्थांना प्रत्यक्षपणे. शाळेत उपस्थित राहता येऊ शकले नाही आणि ज्या विवक्षित शैक्षणिक सुविधांसाठी शुल्क आकारले गेले होते आणि काही प्रकरणांत असे शुल्क प्रदान केले होते. त्या शैक्षणिक सुविधांचा वापर झाला नाही शाळांनी वर्ग देखील आॅनलाइन किंवा आभासी अध्ययन किंवा ई अध्ययन पध्दतीने. घेतलें होतें. शैक्षणिक सुविधांचा लाभ घेणे किंवा वापर करणे विद्यार्थ्यांना शक्य नसताना शुल्क आकारने ही बाब शिक्षणाच्या नफेखोरी मध्ये किंवा व्यापारी करणात मोडत असून सुप्रसथापित. कायद्याने त्यास स्पष्टपणे मनाई केलेली आहे

            दुसरया बाजूला कोविड १९ महामारिचया पार्श्वभूमीवर अनेकांना आपले रोजगार गमावावे लागले आहेत व मोठ्या प्रमाणात व्यवसायावर देखील प्रतिकूल परिणाम झालेला आहे या सर्व परस्थिती मुळे पालकांची आर्थिक स्थिती खराब झाली असून अनेक पालक शाळांची संपूर्ण फी १००/ टक्के भरण्याच्या परिस्थितीत नाही त्यामुळे ज्या शैक्षणिक सोयी सुविधांचा वापर करण्यात आलेला नाही त्यासाठी घेण्यात येणारे शुल्क कमी अथवा माफ करण्यासाठी शासन निर्णय जारी करण्यात आला आहे किंवा त्या शुल्कामध्ये ५०/ टक्के सवलत देण्यात आली पाहिजे याबाबत सर्व शैक्षणिक संस्थांना कळविले आहे

      कोविड १९ सार्वत्रिक साथरोग प्रादुर्भाव अजूनही सुरू आहे आणि शाळांनी अद्याप नेहमीच्या प्रत्यक्ष पध्दतीने कामकाज सुरू केलेलें नाही तसेच अनेक शाळांमध्ये कार्यकारी समित्या गठीत करण्यात आलेल्या. नाहीत. राज्यातील खाजगी. शाळांची मोठी संख्या विचारात घेता शाळा निहाय न वापरलेल्या शैक्षणिक सोयी सुविधा करिता प्रत्येक शाळेची किती बचत झाली आहे याची गणना करणे व्यवहारिक दृष्ट्या शक्य नसलेमुळे तसेच यासाठी बराच कालावधी लागण्याची शक्यता विचारात घेता प्राप्त परिस्थितीत पालकांना तातडीने काही प्रमाणात शैक्षणिक शुलकाबाबत दिलासा देणें गरजेचे आहे त्यामुळे एकवेळ ची बाब म्हणून मा सर्वोच्च न्यायालयाने फि कपातीबाबत घेतलेल्या निर्णयाचा आधार घेऊन शैक्षणिक वर्ष २०२१ ते २०२२ या शैक्षणिक वर्षात एकूण निश्चित करण्यात आलेल्या फी चया १५ टक्के फी कपात किंवा माफ करण्याचा निर्णय घेतला आहे

            भारतीय संविधानाच्या अनुच्छेद १६२ नुसार ज्या बाबतीत राज्य विधीमंडळास कायदे करण्याचा अधिकार आहे अशा बाबतीत राज्य शासनास कार्यकारी आदेश काढण्याचा अधिकार आहे

                 सन २०२१ व २०२२ या शैक्षणिक वर्षासाठी एकवेळची बाब म्हणून सर्व मंडळाच्या व सर्व माध्यमाच्या शाळांना खालील प्रमाणे निर्देश देण्यात येत आहेत

(१) सन २०२१ व ‌ २०२२ या शैक्षणिक वर्षासाठी निश्चित करण्यात आलेल्या एकूण फी मध्ये १५ टक्के कपात किंवा माफी करण्यात यावी

(२) यापूर्वी ज्या पालकांनी पूर्ण फी भरलेली आहे अशी अतिरिक्त फी पुढील महिन्यात किंवा तिमाही हप्त्यात किंवा पुढील वर्षी शाळा व्यवस्थापनाने समायोजित करावी किंवा याप्रमाणे फी समायोजित करणे शक्य नसल्यास फी परत करावी

(३) कपात किंवा माफी करण्यात आलेल्या फी बाबत विवाद निर्माण झाल्यास असा विवाद यथासथिती संबंधित विभागीय शुल्क नियामक समीतीकडे किंवा शासन निर्णय क्र तक्रार २०२०प्रक्र ५० एस डी -४ दिनांक २६ फेब्रुवारी २०२० अन्वये गठित विभागीय तक्रार निवारण समीतीकडे दाखल करण्यात यावा व याबाबत विभागीय शुल्क नियामक समीतीने किंवा विभागीय तक्रार निवारण समीतीने घेतलेला निर्णय अंतिम राहील

(४) कोविड १९ महामारी काळात विद्यार्थ्याने शाळेची फी थकित फी भरली नाही म्हणून शाळा व्यवस्थापन अशा कोणत्याही विद्यार्थ्याला प्रत्यक्ष अथवा आॅनलाइन पध्दतीने शिक्षण घेण्यास किंवा परिक्षेल बसण्यास प्रतिबंध करता येणार नाही किंवा अशा कोणत्याही विद्यार्थ्यांचा निकाल रोखता येणार नाही 

(५) वरिल आदेश सर्व शासकीय निमशासकीय सर्व शैक्षणिक माध्यमांना शाळांना लागू राहतील

(६) हे सर्व शासन आदेश तात्काळ अमलात आणणे आवश्यक व बंधनकारक आहे

           आत्ता शाळा चालू झाल्या आहेत कोणतीही शैक्षणिक संस्था फी साठी मुलांची अडवणूक करत असेल तर आजच संबंधित जिल्हाधिकारी यांचेकडे लेखी तक्रार करा आणि सर्व शैक्षणिक संस्था यांनी शिक्षणा सारख्या पुण्य कर्माचा बाजार मांडू नका

          समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार जाहिरात प्रसिद्ध वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

कलम १६ कलम २१ काय आहे?

 


कलम १६ कलम २१ काय आहे?

            माणूस आहे म्हणजे तो आजारी पडणार आहे. रुग्ण सेवा ही ईश्वर सेवा मानली जात होती पण आज या वैद्यकीय क्षेत्राचा बाजार मांडला आहे जागोजागी बोगस डॉक्टर यांचा सुळसुळाट आपण बघतो. ज्याला कोणतीही डीग्री नाही कोणताही अनुभव नाही असे संधीसाधू डॉ आपणास पाहावयास मिळतात. अशा बोगस डॉक्टर यांनी आपल्या वैद्यकिय धर्माचा बाजार मांडला आहे कोणत्याही दवाखान्यात रुग्ण हक्काची सनद लावलेली दिसत नाही. कोणत्या उपचारासाठी किती खर्च येणारं किंवा किती पैसे भरावे लागणार. याचे कोणत्याही दवाखान्यात दरपत्रक लावलेले दिसत नाही. औषधांची किंमत रुग्णांच्या नातेवाइकांना सांगितली जात नाही धर्मादाय आयुक्त यांचेकडून आपल्या जिल्ह्यात किती दवाखाने आहेत. कोणता दवाखाना कोणत्या योजनेअंतर्गत मोफत उपचार करतो याची माहिती व त्यासंबंधी माहिती सांगणारे मदतनीस कोणत्याही दवाखान्यात दिसत नाहीत. 

आपल्या कडे येणाऱ्या रुग्णांना त्यांनी ठरवून दिलेल्या प्रयोगशाळेत विविध चाचण्या करण्यासाठी पाठविणे आपल्या ओळखीच्या मेडिकल मधून औषध खरेदी करण्यासाठी आग्रह धरणे किंवा जर एखाद्या रुगनाकडे डॉ यांनी सांगितलेले औषधं घेण्यासाठी पैसे नसतील तर तेच औषध त्याला त्याच्या गावांत सुध्दा उपलब्ध झाले पाहिजे आपल्या दवाखान्यात पेशंट बरा होत नाही असे सांगून एखाद्या तज्ञ किंवा डॉ पेशंट पाठविणे या पद्धतीवर म्हणजे डॉ कट प्रॅक्टिस वर बंदी येणार आहे याविषयी सविस्तर पुढीलप्रमाणे एक पेशंट उपचारांसाठी दवाखान्यात गेलेवर जो पर्यंत डॉ यांचा पैसयाचा कोटा भरत नाही तोपर्यंत त्या पेशंटला डिस्चार्ज केले जात नाही यासाठी शासनाने २०१८ रोजी अर्थ संकलपिय विधेयक मांडण्यात येणार होते 

त्यातील तरतुदी पुढील प्रमाणे

(१) २०१८ मध्ये विधिमंडळ अर्थ संकलपिय अधिवेशनात डॉ व प्रकटिस वर बंदी आणणारे विधीयक मांडण्यात येणार होते

(२) सध्या खाजगी व निमशासकीय आणि सरकारी रुग्णालयात अनेक डॉ आपल्या कडे येणाऱ्या रुग्णांना बाहेरच्या प्रयोगशाळेत विविध चाचण्या करण्यासाठी भाग पाडत आहेत विशिष्ट कंपनी चे औषध लिहून देणा-या डॉ यांना संबंधित कंपनी कडून भ मोठ्या प्रमाणात आर्थिक मोबदला दिला जातो रुग्णांच्या खिसयातून डॉ यांना कमिशन दिले जाते अशा सर्व प्रकारची गंभीर दखल घेण्याचा विचार करून या मध्ये दोन दवाखाने व दोन डाॅ आणि मेडिकल यांचें एक जिव्हाळ्याचे संबंध तयार झाले आहेत त्यामुळे पेशंटची बेमाफि लूट केली जात आहे       

    कोरोना काळात डॉ यांची. बरिच प्रकारणे आपले मन हालवून टाकणारी होती मयताचे अवयव यांचा व्यापार बेमाफी रुग्ण उपचारांचे बिल तर काही डॉ यांनी मयत असणारे पेशंट जीवंत आहेत म्हणून रुग्णांच्या नातेवाइकडून. बिलाची रक्कम वसूल केली. यांच्या वर कारवाई झाली तरी सुध्दा यांची दुकानें चालूच होती. काहीजण या दवाखान्याचे परवाने व डॉ यांच्यावर कारवाई करा या मागणीसाठी निवेदन उपोषण केली पण त्याचा उपयोग झाला नाही रुग्णांना मिळणारी वागणूक आपणं सर्वांनी बघितली आहे चेक अप नाही तपासणी नाही औषध अंगावर टाकणे. लांब उभे राहून बोला. हाडाचा प्राबलम असेलतर त्या रुग्णाला ताप थंडी यांचे औषध देणारे डॉ आपण बघितले आहेत. एकादा रुग्ण मरत असेल तरी डाॅ यांनी उपचार केला नाही आपल्या गावातील जिल्हा उप रुग्णालय मध्ये डॉ वेळेवर येत नाहीत. औषध बाहेरून आणायला सांगतात. साप कुत्रं चावल्यास लागणारी लस सदैव उप जिल्हा रुग्णालयात उपलब्ध असणे आवश्यक आहे. जे डॉ सरकारी दवाखान्यात कामास आहेत त्यांचे सवताचा दवाखाना आहे. सरकारी दवाखान्यातील औषध हे डॉ आपल्या क्लिनिक मध्ये वापरत नसतील कशावरून ? महिन्याला येणारा उप जिल्हा रुग्णालयासाठी औषधं साठा याचा सटाॅक रिपोर्ट आपणांस बघण्याचा अधिकार आहे. 

(३) विशिष्ट. प्रयोगशाळा. मेडिकल. स्टोअर्स लॅब. यांनी त्या डॉ चे नाव सांगणे वरिल प्रमाणे विविध आग्रह करणार्या डॉ विरोधात तक्रार करणे गरजेचे आहे असे कोठेही लिहून ठेवलेले नाही की जेथे दवाखाना आहे तेथे त्याच डॉ यांचे मेडिकल असते त्या डॉ कडे उपचार घेतला म्हणजे त्याचं औषध आपणांस बंधनकारक नाही कि येथेच घेतलें पाहिजे असा कोणताही डॉ आपणाकडे आग्रह किंवा तगादा लावत असेलतर जवळच्या पोलिस ठाण्यात तक्रार केल्यास गुन्हा दाखल केला जाईल गुन्हा सिद्ध झाल्यास १ वर्ष शिक्षा व ५० हजार रुपये दंड. जर याच डॉ कडून दुसऱ्यांदा गुन्हा झाल्यास २ वर्ष शिक्षा व १ लाख रुपये दंड शिवाय त्यांचा परवाना रद्द करण्यात येणार आहे अशी तरतूद या विधेयकात आहे

(४) हे विधेयक मंजूर झाल्यास अशा प्रकारे कायदा झाल्यामुळे सर्वसामान्य जनता गरिब गरजू लोकांना या डॉ कडून संरक्षण मिळण्यास मदत होणार आहे असा कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरणार आहे

डॉ यानी पेशंटला चांगली वागणूक दिली पाहिजे

डॉ यांनी पेशंटला उपचार पद्धती निवडण्याचा अधिकार द्यावा

डॉ यांनी आपल्या दवाखान्यात रुग्ण हक्क सनद लावणे बंधनकारक आहे

रुग्ण हक्क

रुग्ण आपल्या निवडलेल्या मेडिकल मध्ये औषध खरेदी करू शकतो

रुग्ण आपलीं उपाचार पध्दती निवडू शकतो

रुग्ण महात्मा फुले आरोग्य योजनेची

राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना या योजनेतून अनुदान व उपचार मिळणे बाबत हट करु शकता

        आपल्या भारतात अठरा पगड जातींचे लोक गुण्यागोविंदाने नांदत असतात. प्रत्येकाचे धर्म चालीरीती सणवार मंगल कार्य तसेच विविध धार्मिक कार्यक्रम प्रत्येकाच्या धर्माच्या रिती प्रमाणे होतात त्यातच सर्वात महत्त्वाचा आणि भावनिक विधी कोणता असेल तर तो म्हणजे अंत्यविधी करण्याची प्रत्येकाची प्रथा धर्माप्रमाणे असते. त्यात प्रामुख्याने मुस्लिम समाजात मृतदेह दफन करण्याची प्रथा आहे त्यात दफन विधी करताना धार्मिक विधी केला जातो. हिंदू समाजात दहन पध्दतीने मृत व्यक्तिला शेवटचा निरोप दिला जातो असे विविध समाज आपल्या आपल्या धर्माप्रमाणे अंत्यविधी करतात त्यात कोणीही मृतदेहाची. अवहेलना करु शकत नाही त्याला दहन दफन करण्यासाठी अडवू शकत नाही. हा कायद्याने गुन्हा आहे 

              अलिकडे आपण बघतो वाचतो की उघड्यावर मृतदेह टाकलें जातात. हे आपल्या धर्मानुसार अगदी खालच्या दर्जाचे कृत्य माणले जाते. संविधानात जिवंत माणसांच्या हितासाठी संरक्षणासाठी विविध कायदे कलम तयार करण्यात आले आहेत पण मला एक समजतं तोच व्यक्ती मृत झाल्यावर त्यांच्यासाठी काही तरतुद आहे का ? होय मृत्यू नंतर सुध्दा मृतदेहाला असे कायदेशीर अधिकार आहेत का ? पण जीवंत माणसाला असणारे विविध अधिकार कायदे कलम मृत्य व्यक्तिलाही लागू होतात का ? आपल्या कायदेसंहीता मध्ये मरणानंतर सुध्दा काही कायदेशीर तरतूद करण्यात आली आहे

       समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

डॉ बाबासाहेब आंबेडकर तुम्ही पुन्हा जन्माला या. Dr B.R Ambedkar



              महाड सत्याग्रह. काळाराम मंदिरात प्रवेश सत्याग्रह. दीक्षाविधी सोहळा. आणि दलित राजकीय प्रवाह गिरणी कामगार संप तेलंगणा अथवा बंगालमधील तेबाध लढा ( १९४७) या या घटनांशी जशी अस्मिता निगडित झाली आहे तशीच भारतातील दलित जातींची अस्मिता हि महाड येथील चवदार तळयावरील सत्याग्रह (१९२७) नाशिकचा काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह (१९३०) व नागपूर येथील दीक्षाविधी सोहळा या घटनांशी निगडीत झाल्याचे दिसून येते प्रचलित राजकारणाच्या संदर्भात सर्वच दलित नेते किंवा दलितांच्या वतीने राजकारणात उतरलेली मंडळी या तीन प्रेरक घटनांचा निर्देश आपापल्या राजकीय शक्तिचा बांधणीसाठी करताना दिसून येतो आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांनाही या घटना आणि दलित अस्मिता यांच्यातील परस्पर नाते पूर्णतः समजलेले असावेे >

         १९२७ साली बाबासाहेब आंबेडकरांनी महाडच्या चवदार तळ्याच्या सत्याग्रहाचे रणशिंग फुंकले आणि अस्पृश्य वर्गास स्वताच्या न्याय हक्कासाठी संघर्ष करण्याचा मंत्र दिला अस्पृश्याना सार्वजनिक. पाणवठे. विहीरी. तळी. खुली करण्यासंबंधीचा सी के बोले. यांचा ठराव मुंबई सरकारने मान्य केला होता पण तो अमलात येत नाही म्हणून बोले यांनी १९२६ साली त्या विषयांचा दुसरा प्रस्ताव पुन्हा मांडला दरम्यान १९२४ साली महाड नगरपालिकेने तेथील तळे अस्पृश्यांना खुले असल्याचे जाहीर केले होते तथापि अस्पृश्यानी आपला हक्क बजावला नव्हता त्यामुळे महाडला होणा-या बहिष्कृत. हितकारिणीसभेचया परिषदेच्या निमित्ताने बाबासाहेब आंबेडकरांनी समतेच्या लढ्याचे रणशिंग फुंकणयाचे ठरविले २०/ मार्च १९२७ रोजी त्यांच्याच नेतृत्वाखाली अनेक अस्पृश्य मिरवणुकीने चवदार तळ्यावर गेले व त्यांनी तेथे आपला पाणी वापराचा हक्क शाबीत केला पण या अस्पृश्य वर्गाच्या कृत्याने सवर्ण यांचीही माथी भडकली व त्यांनी महाड सत्याग्रही त्यांचेवर हल्ला केला दलित आणि सवर्ण यांच्यात दंगल उसळली दलित वर्गाच्या संघर्षात्मक राजकारणाची ही नांदी ठरली या सत्याग्रहाचा भावार्थ खुद्द बाबासाहेब यांनी स्पष्ट केला त्यांच्या मते महाडला चवदार तळ्यावर सत्याग्रही गेले ते केवळ पाणी पिण्यासाठी नव्हे इतरांप्रमाणे अस्पृश्य हाडामासाचे हिंदू आहेत हे त्यांना आग्रहाने मांडायचे होते म्हणून त्यांनी ही कृती केली होती म्हणजे मानवी हक्कांसाठी हा लढा होता त्यामुळे तो सत्याग्रह समतेची मुहूर्त मेढ ठरली या सत्याग्रहाने हिंदू समाजव्यवस्थेतील जाति जन्य विषमतेच्या मर्मावर बोट ठेवले व दलितांच्या मनुष्य तत्वांची प्रस्थापना केली दलित वर्गाच्या राजकीय जागृतीच्या संदर्भात या सत्याग्रहाचे मोल विशेष ठरले

            चवदार तळयापाठोपाठ १९३० साली नाशिक येथील काळाराम मंदिर प्रवेशाची चळवळही दलित अस्मितेच्या राजकारणाचे स्फूर्तिस्थान ठरल्याने दिसून १९२७ पाहूनच सार्वजनिक हिंदू देवालयात अस्पृश्य मानल्या जाणाऱ्या जातींच्या लोकांना सपृशयाइतकेच समान अधिकार असावेत अशा मागण्या करण्यात वारंवार येवू लागल्या होत्या त्यातून अस्पृश्यांना मंदिर प्रवेशाची चळवळी सुरू झाल्या बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली नाशिक येथील काळाराम मंदिरात प्रवेश करण्यासाठी २/ मार्च १९३० रोजी सत्याग्रह करण्याचे ठरले आणि तसा तो झालाही अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या लोकांमधील सवाभिमान जागवून त्यांना संघटित करण्याचे फार कार्य महाड आणि नाशिक येथील सत्याग्रहामुळे झाले या निमित्ताने सपृशयानी चालविलेल्या जुलमाविरूधद दंड थोपटून उभे राहण्याची हिंमत दलितांनी दाखवली अस्पृश्य स्त्रियाही या लढ्यात उतरल्या होत्या माणूस म्हणून जगण्याचा सर्वांचाच हक्क समान आहे हे तत्व अस्पृश्यांच्या या लढयानी स्पष्ट केले एक संघटित शक्ती म्हणून दलित वर्गाच्या उद्याची नांदीही याच लढयानी दिली

               १९५६ साली बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर येथे लाखो अस्पृश्य बांधवासमवेत हिंदू धर्माचा त्याग केला आणि बुद्ध धर्माची दीक्षा घेतली दलित राजकारण इतिहासातील ही एक फार मोठी घटना घडली हिंदू समाजातील विषमतेवर व अस्पृश्यांच्या अमानुष रुढीवर आंबेडकर यांनी केलेले घणाघाती आघात होता धर्मांतरामुळे हिंदू समाजाची असहिष्णुता व अपरिवर्तनीयता पुन्हा एकवार स्पष्ट झाली पण त्याच बरोबर दलित जातीना वेगळी अस्मिता प्राप्त झाली प्रज्ञा. करुणा. समतेवर आधारित बुद्ध धर्माचा अस्पृश्य वर्गाकडून झालेला स्विकार हा एक नव्या नैतिक व्यवस्थेकडे जाण्यासाठी महत्वाचे पाऊल ठरले दलित मुक्ती लढ्यात एक विश्वात्मक परिणाम प्राप्त झाले दलित मुक्तिचा संघर्ष हा मानवी मुक्तिचा यतनांची पूरवशरत असल्याची जाण या लढ्याच्या नेतृत्वाने आपालयाला दिला अशा रितीने महाड सत्याग्रह काळाराम मंदिर प्रवेश बुध्द धर्माचा सामूहिक स्विकार ह्या घटनांतून दलित अस्मिता प्रकट होते या तिन्ही घटनांच्या समृतीतून आपणास एका नव्या राजकीय प्रवाहाचया साक्षात्कार होतो आपल्या राजकीय मानसिकतेचा बराच मोठा भाग या घटनांनी व्यापला असल्याचे दिसून येते

              नजिकच्या इतिहासाकडे नजर टाकताच आणखीही अशा कितीतरी घटना पृथक राजकीय अस्मितेची निगडित झाल्याचे दिसून येईल उदा. गेल्या दशकातील अतिरेक्यांना विरुद्ध केलेलीं सुवर्ण मंदिरातील लष्करी कारवाई आॅपरेशन ब्लू स्टार ही घटना शीख अस्मितेच्या राजकारणाशी अशीच गेली आहे तसेच रामजन्मभूमीचा लढा हिंदूत्व वादी राजकारणाशी अतूट जोडलेला गेलेला आहे हिंदू अस्मिता जागी करण्याच्या संदर्भात या लढ्याचे महत्व वेगळे सांगायची गरज नाही संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतही हौतात्म्य पावलेल्या एकशेपाच मराठी माणसांची स्मृती महाराष्ट्राच्या प्रादेशिक अस्मितेशी अशीच निगडित झाली आहे तात्पर्य ऐतिहासिक घटना भिन्न भिन्न राजकीय अस्मितेचा परिपोष करीत असतात व त्याद्वारे आपलीं राजकीय मानसिकता घटविली जाते

           माणसाला माणूस म्हणून जगण्याचा हक्क देणारे. कामगार संघटित व असंघटित क्षेत्रातील कामगार यांच्यासाठी कायदेशीर भविष्य निर्वाह योजना. सामाजिक सुरक्षा कायदा. राजकीय प्रणाली. आर्थिक विकास नियोजन. महिलांना समान वेतन किमान वेतन सुरक्षा कायदा. सर्व शासकीय क्षेत्रातील कामकाज कसे करावे कसे चालावे. राज्य घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आपणांस अनमोल अशी शिकवण दिली आहे त्यावर आज आपण व आपला देश चालला आहे 

      आपले कुटुंब. जात. धर्म. भाषा. आणि वर्ग. यातून आपली सामाजिक पार्श्वभूमी सिध्द होतें ही पार्श्वभूमी आपले हितसंबंध निर्धारित करित असतें सहाजिकच भिन्न सामाजिक पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तिचे हितसंबंधही भिन्न असतात एकादी ऐतिहासिक घटना ज्या हितसंबंधांना मुखर करते ते आपल्या हितसंबंधासी मिळतेजुळते असतील तर त्या घटनेचे प्रेरकतव आपल्या लेखी अधिक असते याउलट संबंधित नसलेल्या घटना आपल्याला फारशा प्रेरणा देऊ शकत नाही मराठी भाषिक या नात्याने संयुक्त महाराष्ट्र चळवळ मराठी माणसाला जितकी प्रेरणा देईल. असे आपणास वाटते पण आज जात अनुसूचित जाती जमाती भटक्या विमुक्त जाती व नवबौद्ध अशी वर्गवारी यावर आज राजकारणाचा डोलारा उभा केला जातो प्रत्त्येक योजना जातीच्या वर्गवारीत अडकून पडली आहे म्हणजे जात आपल्या देशाच्या आई आहे 

     शिका संघटित व्हा संघर्ष करा 

शिकवन आज पुस्तकावर राहिली आहे कायदा कलम सुरक्षा खुंटीला अडकवण्यात आलीं आहे गुन्हेगार मोकळे फिरतात आणि निरपराध सजा शिक्षा भोगत आहे एका सहिने गाव वाडी गल्ली तालुका जिल्हा राज्य देश बंद होतों याचा अर्थ असा होतो की वाटचाल हुकूमशाही पद्धतीने चालू आहे 

      म्हणून म्हणतो डॉ बाबासाहेब आंबेडकर तुम्ही पुन्हा जन्माला या. 

        समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार जाहिरात प्रसिद्ध वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर


माहिती अधिकार कलम (२) - RTI section 2...

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

समाजपयोगी विद्यार्थी घडवणारा प्राध्यापक डॉ साईनाथ शेटोड: ...

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम २०१३...

कायदा माझ्या भारतीय घटनेचा -

कायदा माझ्या भारतीय घटनेचा



                राज्य घटनेने आपणास विविध स्वातंत्र्य हक्क व अधिकार दिले तसेच त्यासाठी कायदेशीर तरतूद सुध्दा करण्यात आली आहे

कलम (१) कायद्याचे नाव

कलम (२) भारतात केलेल्या अपराधास शिक्षा

कलम (३) भारताच्या बाहेरील हददित केलेलें अपराध

कलम (४) परमुलकी अपराधास हा कायदा लागू

कलम (५) अमुक कायद्यास हा अधिनियम लागू नाही

कलम (६) ह्या कायद्यातील लक्षणास अपवाद

कलम (७) अर्थ पूर्ण शब्द

कलम (८) लिंग

कलम (९) वचन

कलम (१०) पुरुष आणि स्त्री शब्दाचा अर्थ

कलम (११) मनुष्य

कलम (१२) साधारण सर्व लोक

कलम (१३) हुकुमशाही व राजेशाही रद्द

कलम (१४) शासकीय सेवक

कलम (१५) रद्द

कलम (१६) रद्द

कलम (१७) सरकार

कलम (१८) भारत

कलम (१९) न्यायाधीश

कलम (२०) न्यायाचे कोर्ट

कलम (२१) लोकसेवक

कलम (२२) जंगल मालमत्ता

कलम (२३) गैरलाभ /गैरहानी

कलम (२४) लबाडीने

कलम (२५) कपटाने

कलम (२६) समजण्यास कारण

कलम (२७) बायको

कलम (२८) नकली पदार्थ

कलम (२९) (अ) विदूत नोंदी

कलम (३०) मुलयवान रोखा

कलम (३१) मृत्यू लेख

कलम (३२) कृत्याचया करण्यास /वरजनास लागू

कलम (३३) कृती आकृती

कलम (३४) सामायिक इरादा

कलम (३५) गुन्हा करण्याच्या इराधान कृत्य

कलम (३६) अंशतः समजून कृत्य

कलम (३७) अपराध्यांना सामील होणे

कलम (३८) अपराधाचा दोष येणे

कलम (३९) अपारकशीने / इजापूरवक

कलम (४०) अपराध

कलम (४१) विशेष कायदा

कलम (४२) सथलविशेषाचा कायदा

कलम (४३) गैरफायदा कायद्याने करणे पात्र

कलम (४४) क्षती / हाणी

कलम (४५) जीव

कलम (४६) मरण

कलम (४७) प्राणी

कलम (४८) नाव

कलम (४९) वर्ष

कलम (५०) कलम

कलम (५१) शपथ

कलम (५२) इनामाने / शुध्द हेतूने 

कलम (५२) अ आसरा देणे आश्रय अपवाद 

कलम (७६) कायदेशीर बांधिलकी असलेल्या व्यक्तिने तथ्य विषयक चुकभुलीमुळे केलेले कृती

कलम (८२) सात वर्ष वयाखालील बालकाने केलेला गुन्हा कृती

कलम (८३) सात वर्षांच्या वरिल व बारा वर्षां खालील अपरिपक्व व समजशकति असलेल्या बालकाने केलेलीं कृती

कलम (८४) वेड्या मनुष्याने केलेले कृत्य

कलम (९०) भीतीमुळे दिलेली संमती

कलम (९६) खासगी रित्या बचाव करण्याचा ओघात

कलम (९७) शरिर व मालमत्तेचा खासगी रित्या बचाव करण्याचा हक्क

कलम (१००) शरिराचा खासगी रित्या बचाव करण्याचा हक्क हा मृत्यू घडवून आणणयाइतपत केंव्हा व्यापक असतो

कलम (१०१) असा हक्क मृत्यू हून अन्य अपाय करण्याइतपत केंव्हा व्यापक असतो

कलम (१०२) शरिराचा खासगी रित्या बचाव करण्याचा हक्क सुरू हेणे व चालू राहणे

   सहाय्य करण्याविषयी

कलम (१०७) एखादा गुन्हा करण्यासाठी सहाय्य करणे

कलम (१०८) अप्रेरक

कलम (१०९) अप्रेरकामुळे परिणामतः

कलम (११४) अपराधावेळी सहाय्य करणारा जवळ असणे

कलम (१४१) बेकायदेशीर जमाव

कलम (१४२) बेकायदेशीर जमावाचा घटक असणे

कलम (१४३) शिक्षा

कलम (१४४) प्राणघातक हतयारासह बेकादेशीर जमावात सामिल होणे

कलम (१४५) बेकायदेशीर जमावाला पांगविण्याचा आदेश झाल्याने माहिती असूनही सामील होणे

कलम (१४६) दंगा भरणे

कलम (१४७) दंगा करण्याबद्दल शिक्षा

कलम (१४९) विधिनियूकत जबाबदारी

कलम ((१५१) पाच किंवा अधिक व्यक्तिंना पांगविणयाचा आदेश मिळाल्यानंतर जाणिवपूर्वक थांबून राहणे

कलम (१५३) अ धर्म. वंश. जन्म. निवास. भाषा. ई 

         वरील सर्व कायदे कलम आपणासाठी घटनेत लिहून ठेवली आहेत तरि सुध्दा आज खून मारामाऱ्या. अपहरण बलात्कार. कौटुंबिक हिंसाचार. या घटनात वाढ होतच आहे

  संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

९८९०८२५८५९

वरील प्रमाणे समाजसेवा उठाव बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार व प्रसार वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी विविध गाव तालुका जिल्हा राज्य देश यातून पदाधिकारी नेमणे आहे तरी इच्छुक व्यक्ति तरुण यांनी खालील नंबरवर संपर्क साधावा

माहिती अधिकार

पत्र दाखल केल्यापासून ३० दिवसांच्या आत उत्तर देणे बंधनकारक आहे





वाचा - 

अन्न धान्य वितरण आणि कायदा - FOOD ...

लूट आणि फक्त लूट - अहमद मुंडे ...

खाद्य तेलावर अन्न प्रशासन ची धाड- FDA MUMBAI

दफ्तर दिरंगाई कायदा 2006 - ...

पूर्व सैनिक ने ISI को दी थीं भारतीय सेना की खुफिया सूचनाएं, टेरर फंडिग के मिले सबूत

 


लखनऊ

उत्तर प्रदेश एटीएस ने शुक्रवार को हापुड़ में छापा मारकर पाकिस्तान के लिए जासूसी करने वाले भारतीय सेना के एक पूर्व सैनिक सौरभ शर्मा और उसके सहयोगी अनस गितौली को गुजरात के गोधरा से गिरफ्तार किया है। इनके पास से एटीएस को टेरर फंडिंग का सबूत भी मिला है। एडीजी लॉ एंड आर्डर प्रशांत कुमार ने बताया कि सौरभ शर्मा के खिलाफ लखनऊ में केस दर्ज किया गया है। सौरभ 2013 में भारतीय सेना में भर्ती हुआ था। इसके बाद उसने मेडिकल कारणों से मई, 2020 में सेना छोड़ दिया था। इस दौरान उसके बैंक एकाउंट में विदेश से काफी रकम आई।

प्रशांत कुमार ने बताया कि अभी एटीएस की टीमें कई राज्यों में कार्रवाई कर रही हैं। हमारी हर संदिग्ध से पूछताछ के साथ ही हर जगह पर छापेमारी जारी रहेगी। सौरभ हापुड़ के बहादुर गढ़ थाना क्षेत्र के बिहुनी गांव का रहने वाला है। उसने पैसों के लिए सेना से जुड़ी गोपनीय जानकारियां पाकिस्तान की खुफिया एजेंसी आईएसआई को भेजी थीं। लखनऊ के एटीएस थाने में सौरभ शर्मा और अनस गितौली के खिलाफ ऑफिशियल सीक्रेट एक्ट के तहत रिपोर्ट दर्ज कर इनको गिरफ्तार किया गया है।

फेसबुक पर महिला के चक्कर में फंसा पूर्व सैनिक, पाकिस्तान के लिए करने लगा जासूसी

लड़की के चक्कर में साझा की गोपनीय जानकारी

हापुड़ से पकड़े गए सेना के पूर्व जवान सौरभ शर्मा की 2014 में फेसबुक के माध्यम से एक लड़की से दोस्ती हुई थी। लड़की से उसकी काफी दिनों तक बातचीत होती रही। लड़की ने खुद को सेना की रिपोर्टिंग करने वाली पत्रकार बताया था। वह लड़की के झांसे में आ गया और लड़की ने सौरभ से सेना की कई गोपनीय जानकारियां उससे मांगी और वो देता रहा। कुछ ही दिनों बाद सौरभ पाकिस्तान का जासूस बनकर काम करने लगा। इसके बदले उसे पैसे भी मिलते रहे।






लखनौ -

उत्तर प्रदेश एटीएसने शुक्रवारी हापूर येथे छापा टाकून भारतीय लष्कराचा माजी सैनिक सौरभ शर्मा आणि त्याचा सहकारी अनस गिटौली याला शुक्रवारी गुजरातच्या गोध्रा येथून अटक केली. त्यांच्याकडून दहशतवादाला वित्तपुरवठा केल्याचा पुरावा एटीएसलाही मिळाला आहे. एडीजी कायदा व सुव्यवस्था प्रशांत कुमार यांनी सांगितले की सौरभ शर्माविरोधात लखनऊ येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सौरभ 2013 मध्ये भारतीय सैन्यात दाखल झाला. त्यानंतर वैद्यकीय कारणास्तव मे 2020 मध्ये त्यांनी सैन्य सोडले. यावेळी परदेशातून त्याच्या बँक खात्यात बरीच रक्कम आली.
प्रशांत कुमार म्हणाले की, सध्या अनेक राज्यात एटीएसचे पथके कारवाई करीत आहेत. आमच्या प्रत्येक संशयिताच्या चौकशीसह सर्वत्र छापे सुरूच राहतील. सौरभ हापूरच्या बहादूरगड पोलिस स्टेशन परिसरातील बिहुनी गावचा आहे. या पैशांसाठी त्याने सैन्याशी संबंधित गोपनीय माहिती पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयकडे पाठविली होती. लखनौच्या एटीएस पोलिस स्टेशनमध्ये सौरभ शर्मा आणि अनस गितौली यांना अटक करण्यात आली आहे. फेसबुकवर महिलेच्या प्रेमात अडकलेल्या माजी सैनिकाने पाकिस्तानसाठी हेरगिरी सुरू केली
हापुरीतून पकडलेला माजी सैन्य सौरभ शर्मा याने २०१ मध्ये फेसबुकच्या माध्यमातून एका मुलीशी मैत्री केली होती. तो बराच वेळ मुलीशी बोलत राहिला. सैन्यात अहवाल देणारी पत्रकार म्हणून या मुलीने स्वत: चे वर्णन केले. तो मुलीच्या वेषात आला आणि त्या मुलीने सौरभला सैन्याबद्दल अनेक गोपनीय माहिती विचारल्या आणि देत राहिल्या. काही दिवसानंतर सौरभने पाकिस्तानचा हेर म्हणून काम करण्यास सुरवात केली. त्याऐवजी त्याला पैसे मिळतच राहिले.
मुलीच्या प्रेम प्रकरणात गोपनीय माहिती शेअर केली.


वाचा - 




१८५७ च्या उठावमध्ये भारतीय मुस्लीम स्त्रियांचा योगदान भाग ३ - Indian Muslim Freedom Fighter


 १८५७ च्या उठावमध्ये  भारतीय मुस्लीम  स्त्रियांचा योगदान



ब्रिटिशांनी चालविलेल्या या अन्याय शोषणाच्या विरोधात भारताच्या वेगवेगळ्या भागात ब्रिटिशविरोधी असंतोष वेळोवेळी सैनिक उठावाच्या रुपाने प्रकट होत गेला. 


वेल्लोर मधील उठाव १८०६

बराकपूर १८२४

फिरोजपुर १८२४

त्यापाठोपाठ झालेल्या सातव्या बंगाल घोड दलाचा ६४  रेजिमेंट चा उठाव, 

२२ व्ही एन आय १८४९

६६ वी एन आय १८५०

३८ व्ही एन आय १८५२

बरेली चा उठाव १८१६

कोळ्याचे बंड १८३१ -३२

कांगडा राज्याचा विरोध १८४८

संथालचा उठाव १८५५ - ५६

या सर्व असंतोषाच्या मागे राजकीय आर्थिक प्रशासकीय सामाजिक स्वरूपाची व्यापक करणे होती. खदखदत असलेल्या या असंतोषाचा स्फोट होऊन १८५७ चे वादळ निर्माण झाले ज्याने भारतातील ब्रिटिश साम्राज्याच्या मुळांना जबरदस्त धक्का दिला होता.
१८५७ पूर्वीची ही बंडे संख्येने कमी असली तरी त्यांचे परिणाम मर्यादित होते. उदासीन जनता व शस्त्रसामग्री मर्यादित असल्यामुळे हे उठाव यशस्वी झाले नाही. परंतु यश येवो न येवो त्यांची राजवट खपून घ्यायची नाही या वृत्तीतूनच ही बंडे घडून आलेली आपणास दिसून येतात. आपल्या मर्यादांची तुटपुंजा साधन सामुग्रीची व मनुष्यबळाची कल्पना असतानाही पुरुषांच्या बरोबरीने स्त्रियांनीही मर्दुमकी गाजविल. इतिहास घडविला. विविध स्वरूपाची व्यक्तिमत्वे असलेल्या या स्त्रिया आपल्या स्वराज्यासाठी संघर्ष करताना जिवाची बाजी लावताना आपणास दिसून येतात. पुरुषांप्रमाणेच स्त्रियांनीही या उठावात भाग घेऊन त्यांनी प्रामुख्याने संदेश पाठविणे फरारी घोषित झालेल्या क्रांतीकारकांना आश्रय देणे, जेवण पुरविणे जखमी क्रांतीकारांची शुश्रूषा करणे एवढेच नव्हे तर हातात शस्त्र घेऊन त्यांनी या उठावाचे नेतृत्व ही केल्याचे आपणास दिसून येते
पण यातील काही स्त्रियांची नावे काळाच्या ओघात दुर्लक्षित राहिली. या दुर्लक्षित स्त्रियांना इतिहासात पुन्हा प्रस्थापित करणे त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा शोध घेणे सध्याच्या परिस्थितीत आवश्यक आहे. या उठाव यातील स्त्रीयांचे योगदान निश्चित महत्वपूर्ण आहे म्हणूनच या स्त्रियांचे योगदान स्पष्ट करणे हा या लेखाचा उद्देश.

बेगम हजरत महल -

भारतीय स्वातंत्र्य संग्रामात जे नाव प्रामुख्याने पुढे येते ते म्हणजे बेगम हजरत महल यांचे. नवाब वाजिद अली शहा बरोबर विवाह करण्यापूर्वी ती एक नर्तकी होती. विवाहानंतर ती एक सन्मानित बेगम झाली. ती इतकी सुंदर आणि आकर्षक होती की नवाब तिला महकपरी असे संबोधित असे. या उठावातील त्यांचे कार्य हे वाखाणण्यासारखे आहे. अवधच्या नवाबाची ही पत्नी विलक्षण शमते वाली महिला होती जिने स्वातंत्र्यसंग्राम मध्ये खूपच अग्रगण्य अशी भूमिका निभावली. आपल्या अल्पवयीन पुत्र बिज्रिस कद्र याला प्रतिनिधी बनविले. त्याला आपल्या पतीचा उत्तराधिकारी घोषित केला. त्यांनी लखनऊच्या रक्षणासाठी सक्रिय सहभाग घेतला आणि सतत आपल्या सैनिकांमध्ये त्या सामील असत. जेव्हा इंग्रजांनी अवध वर पुन्हा विजय प्राप्त केला तेव्हा बेगम हजरत महल ने नेपाळमध्ये शरण घेतले आणि आपल्या मुलाचे अधिकार सोडण्यास नकार दिला. त्यांच्या या उठावयातील कार्याचे मूल्यमापन करताना अशा राणी व्होरा "महिला और स्वराज्य" या त्यांच्या ग्रंथात म्हणतात "बेगम हजरत महल निव्वळ बहादूर महिलांमध्ये एक होत्या ज्या आपल्या हुशारीने संघटक क्षमतेने आणि रनकुशलते मुळे आपल्या अंतिम श्वासापर्यंत इंग्रजांची डोकेदुखी बनल्या होत्या."

अझिझन -

अझिझान या कानपूरच्या एका कलावंतीन होत्या. त्यांच्या १८५७ च्या उठावातील सहभागा विषयी सर जॉर्ज ट्रेविलियन , नानासाहेब पेशव्यांचे चरित्रकार आनंद स्वरुप तसेच नानकचंद यांनी गौरव पर लिहिले आहे. बेगम आलियाने जसे स्त्रियांचे पथक उभारले होते तसेच अजिझन या कलावंतीन नेही स्त्रियांचे पथक तयार केले होते. पुरुष वेश धारण करून झाशीच्या राणी प्रमाणे करणे हि घोड्यावर स्वार होऊन समशेर चालवीत असे. तसेच त्यांनी घरोघर जाऊन अनेक स्त्रियांना या पथकात दाखल करून घेतले होते. डॉ सुंदर लाल हे इतिहासकार त्यांच्या भारत मे अंग्रेजी राज या ग्रंथ यांच्याबाबत म्हणतात की "शस्त्रसज्ज घोड्यावर स्वार होऊन शहराच्या रस्त्यावर आणि सैनिकांच्या छावणीमध्ये फिरत असत. कधी त्या रस्त्यावरील थकलेल्या आणि जखमी झालेल्या सैनिकांना दूध आणि भाकरी वाटत असेल आणि कधी इंग्रजांच्या किल्ल्याच्या बरोबर भिंतीखाली लढणाऱ्या लोकांना धीर देत असत."

बेगम जीनत महल -

दिल्लीच्या बादशहा बहादूरशहा जफर यांची जीनत महल ही आवडती बेगम होती. विद्रोही सैनिक ज्या वेळी दिल्लीत गेले त्यावेळी त्यांनी बहादूर शा सह क्रांतिकारी सैनिकांचे नेतृत्व स्वीकारण्याची विनंती केली. परंतु वृद्धावस्था आणि रिकाम्या खजिना यामुळे प्रारंभी यांनी नेतृत्व करण्यास नकार दिला पण याच वेळेस बेगम बोलली ही वेळ गझल गाऊन मन रमण्याची नाही. विठूर येथून निरोप घेऊन देशभक्त सैनिक आले आहेत. आज पूर्ण भारताचे लक्ष दिल्लीवर आणि आपल्यावर लागले आहे असे ठणकावून सांगितले होते. बेगम  जीनत महाल बरोबरच कवियत्री कन्या बस्ती बेगम ही उठावात सहभागी झाली होती.

बेगम आलिया -

१८५७ च्या उठावात राणी लक्ष्मीबाई खेरीज बेगम आलियाच्या नेतृत्वाखाली शस्त्रसज्ज स्त्रियांचे पथक होत. या स्त्रिया शत्रूच्या हालचालींची बातमी काढण्यात पटाईत होत्या. रणनीती आणि डावपेज याबाबत तिची समज जबरदस्त होती पण १८५७ च्या उठावात नेत्यांमधील मतभेदांमुळे पुढे जेव्हा विसंवाद निर्माण झाला आणि ते एक दिलाने लढेना झाले तेव्हाही बेगम आलिया चा अखेरपर्यंत लढण्याचा निर्धार अभंग राहिला. १८५७ च्या उठावाचे संबंधी अनेक इंग्रज इतिहासकारांनी ग्रंथ प्रसिद्ध केले आहेत त्यापैकी त्यांच्या ग्रंथाचा अहवाल अनेकदा दिला आहे. त्या मेलेसन ने म्हंटले आहे, "आयोध्या ने जितका निश्चयात्मक दीर्घकालीन लढा दिला तितका भारतातील दुसऱ्या कोणत्याही भागने दिला नाही, या दीर्घकाळ चाललेल्या झुंजीत पराभव होणार असे दिसू लागल्यावर ही ज्यांनी शरण जाण्यापेक्षा मरण पत्करले त्यामध्ये बेगम आलिया ही एक होती."



स्वातंत्र्य लढ्यातील मुस्लिमांचे योगदान - 
संकलन सोमनाथ रामचंद्र देशकर

संदर्भ - १८५७ च्या उठावातील स्त्रियांचा सहभाग
लेखक - डॉक्टर विनोद बोरसे 
कार्यकारी संपादक - डॉ अनिल कठारे
कंधारपूर - इतिहास संशोधन त्रेमासिक



वाचा -



भारतीय राष्ट्रीय लष्करात मुसलमानांचा सहबाग -भाग २ INDIAN MUSLIMS FREEDOM FIGHTER

भारतीय राष्ट्रीय लष्करात मुसलमानांचा सहबाग 

१९२१ असहकार आणि खिलाफत चळवळी



अब्दुल्लाह खलिफा - 

जन्म -                      १८८५ मालेगाव, जी नाशिक, महाराष्ट्र.  
वडिलांचे नाव -         खुदाबक्षचा मुलगा. 
शिक्षण           -          सातव्या इयत्ती पर्यंत, 
सहभाग  -                 विणकर खिलाफत चळवळ संघटित करणाऱ्या सैनिक नेत्यांपैकी एक, 
दारूच्या दुकानावरील पीकेटिंग मध्ये  भाग. त्यावेळी पोलिस हस्तक्षेप आणि लोकांनी हिंसाचार केला. 
एका पोलिसाचा मृत्यू, अटक, तीन वर्ष कारावास.  पोलिसांच्या अत्याचारामुळे ऑगस्ट १८२१ माध्य विसापूर अहमदनगर जेलमध्ये मृत्यू.


अब्दुल करीम गुलाम जिलानी - 

जन्म -                     हलगीचर धाका ( पूर्व बंगाल )आत्ता बांगलादेश येते २० ऑक्टोबर १९०४ रोजी जन्म, 
वडिलांचे नाव -     चौधरी गुलाम मोहम्मद चा मुलगा, 
सहभाग -              १९२१  च्या असहकार,  १९३०  च्या सविनय कायदेभंग चळवळी मध्ये सहभाग, 
अटक ढाका जेलमध्ये १० फेब्रुवारी १९३२ मध्ये मृत्यू.

अब्दुल गफूर मोहम्मद -

जन्म -                  मालेगाव जि. नाशिक, महाराष्ट्र १८८३ मध्ये जन्म, 
वडिलांचे नाव -     शकूर मोमिन चा मुलगा
शिक्षण -                 प्राथमिक शाळे पर्यंत शिक्षण, पैलवान
सहभाग -              १९२१  मध्ये असहकार चळवळ सहभाग खिलाफत चळवळ संघटित करणारे सैनिक    नेत्यांपैकी एक. दारूच्या गुत्त्यावर पिकेटिंग मध्ये सहभाग, पोलिसांचा हस्तक्षेप आणि गोळीबार त्यामुळे लोकांनी हिंसाचार केला. एक पोलीस ठार , अटक, दंगल व खून करणे अशा  आरोपाखाली मृत्युदंड १८ जानेवारी १९२३  फाशी.

इस्राईल अल्लारखा     -

जन्म -          मालेगाव जि.नाशिक महाराष्ट्र येथे १८९२ मध्ये जन्म,
शिक्षण -       प्राथमिक शाळेपर्यंत शिक्षण, नोकरी
सहभाग -      १९२१  असहकार चळवळ, खिलाफत चळवळ संघटित करणाऱ्या स्थानिक नेत्यांपैकी एक. दारूच्या गुत्त्यावर पिकेटिंग मध्ये सहभाग, पोलिसांचा हस्तक्षेप आणि गोळीबार त्यामुळे लोकांनी हिंसाचार केला. एक पोलीस ठार, अटक, दंगल व खून करणे अशा आरोपाखाली फाशीची शिक्षा पुण्याच्या येरवडा तुरुंगात ६ जुलै १९२२ ला फाशी.

मोहम्मद हुसेन हाजी मद्दू -

जन्म -                  मालेगाव जि. नाशिक महाराष्ट्र येथे जन्म १८८६ साली. 
वडिलांचे नाव -     मड्डू  शेठ चा मुलगा 
शिक्षण -              पाचवीपर्यंत शिक्षण, कापड व्यापारी
सहभाग -              १९२१  मध्ये खिलाफत चळवळीत भाग २५ एप्रिल १९२१ मध्ये अटक १९२२  मध्ये पोलीस अत्याचाराने ठाण्याच्या जन्ममृत्यू.

मोहम्मद भिकारी - 

जन्म -                 मालेगाव जि. नाशिक महाराष्ट्र येथे १८८९ साली जन्म, 
वडिलांचे नाव -  भिकारीचा मुलगा
शिक्षण -          सातवीपर्यंत शिक्षण
सहभाग -          १९२१ च्या असहकार चळवळीत कृतिशील सहभाग, दारूच्या गुत्त्यावर पिकेटिंग मध्ये भाग पोलिसांचा हस्तक्षेप गोळीबार त्यामुळे लोकांनी हिंसाचार केला,  एक पोलिस ठार, खून व दंगल या आरोपाखाली अटक फाशीची शिक्षा झाली येरवडा जेलमध्ये ६ जुलै १९२२ फाशी.

सुलेमान शाह - 

जन्म -                  मालेगाव जि. नाशिक महाराष्ट्र येथे १८७४ साली जन्म
वडिलांचे नाव -  रोजन मुलांनीचा  मुलगा
शिक्षण -              आठवीपर्यंत शिक्षण, हॉटेल मालक
सहभाग -              १९२१  च्या असहकार चळवळीत सहभाग मालेगाव खिलाफत चळवळ संघटित केले    दारूच्या गुत्त्यावर पिकेटिंग  मध्ये भाग पोलिसांचा हस्तक्षेप गोळीबार त्यामुळे लोकांनी  हिंसाचार केला एक पोलिस ठार, दंगल करणे या आरोपाखाली अटक फाशीची शिक्षा पुण्याच्या येरवडा जेलमध्ये ६ जुना १९२२ रोजी फाशी.

अब्दुल रसूल - 

जन्म -                  सोलापूर महाराष्ट्र येथे १९१० साली जन्म
वडिलांचे नाव -      कुरबान हुसेन चा मुलगा
सहभाग -             कामगार संघटनेतील कार्यकर्ता सनिवय कायदेभंग चळवळीत भाग, १९३०  ला पोलीस    ठाण्यावर झालेल्या हल्ल्यात सहभागी, दंगल व खून केल्याचा आरोप फाशीची शिक्षा पुण्याला १२ जनवरी १९३१ रोजी फाशी.

अहमद सरुर - 

जन्म -             बालगड जिल्हा होळी पश्चिम बंगाल
सहभाग -         १९३० सालच्या सनिवय  कायदेभंग चळवळीच्या वेळी सत्याग्रहात भाग, अटक,  तुरुंगवास व तुरुंगात मृत्यू


 स्त्रोत : 

मखदूम उर्दू - स्वातंत्र्य चाळवलीतील मुस्लीम हुतात्म्यांचे अपूर्ण यादी.  

 सेडिशन कमिटी रिपोर्ट 

रोल ऑफ ऑनर - के सी घोष

हुज हु ऑफ इंडिया मात्रीअर्स खंड १,२,३ संपादक - डॉ पी एन चोप्रा

HISTORY OF FREEDOM FOGHTER MOVEMENT OF CARE - T V KRUSHNAN

THE RIN STRIKE - A GROUP OF VITIMISED RATING

नव विद्रोह  कॅप्टन बी.दत्ता

COMMUNIST MARTOURS - COMMITTE OF COMMUNIST PARTY OF INDIA 

SUNIL BENARGEE, ABDUL RAZZAK KHAN AND ABDUL BADUD WRITTEN ARTICLES


वाचा - 




सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा

  सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा            अनुसूचित जाती जमाती. इतर मागासवर्गीय जाती जमाती. भटक्या विमुक्त...

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या