समाजपयोगी विद्यार्थी घडवणारा प्राध्यापक डॉ साईनाथ शेटोड:

 



मी नरहर कुरूंदकर वाचत होतो एकदम मला विचार आला की आज इतक्या स्वार्थी जगात कुरूंदकरा सारखे व्यक्तीमत्व असेल का? 

तर माझ्या समोर सरांचा चेहरा आला मी प्रश्न केला का? तर आज माझ्या पाहण्यात इतका विद्वान कदाचितच असेल.

धर्मशास्त्रा पासून अर्थशास्त्रा पर्यंत भाषे पासून नितीशास्त्रा प्रयत्न जे भाष्य करतात अर्थात त्यांचा अभ्यास प्रचंड आहे विचार माडंण्याची त्यांची विशिष्ट शैली आहे. 

सतत समाजसूधारणेचा ध्यास असणारे विद्यार्थि प्रिय म्हणुन त्यांचा नाव लौकीक आहे. 

अनेक लोक कर्तव्यदश नसतात व त्यांच्या कड़े समाजालच काय विद्यार्थियाना देण्यासारखे काही नसते केवल वशिल्याच्या आधारे त्याची उच्च पदि वर्णी लागते.

परतूं अशातं खरें वैचारिक वारसदार दुर्लक्षीत होवू नये.

सर उत्कृष्ट लेखक असून ते सत्य मांडीत असतात सरांची सुत्रसंचालन करण्याची कला ही अद्भुत आहे

मुलाना आपला कल कोणत्या श्रेत्रात आहे हे सर लक्षात आणुत देत असत.

  निवडणूक नंतर सरांनी आम्हाला प्रश्न केले आपण काय सागुं शकता? तेव्हा एकाने उत्तर दीले की सत्ता बदलत आहे पण विचार व माणसे तीच आहे.

तेव्हा सर म्हणले तू उत्तम पत्रकार होशील हे खरें झाले तो आज पत्रकारिता करीत आहे.

सर नेहमी मला म्हणतात की आपण जेवनं देवून कुनाची एका वेलची भुक भागवू शकतो परतूं शिक्षणातून आपन त्याच्या आयुष्य भराचां पोटाचा प्रश्न सोडवु शकतो

सरानी आम्हाला जगावे कशे हे शिकवले आणखी काय पाहिजे त्यानी विद्यार्थियानां नेहमी नितीमत्तेचे धड़े दिले

शिक्षकीय पेशा कलंकीत होत असताना सर आदर्श शिक्षक म्हणुन कामगीरी बजावता.व आपल्या विद्यार्थियाना ते वास्तविक जीवनशैलीशी निगडीत शिक्षण देतात

इतिहास लेखनात ते उपेक्षित लोकाचा इतिहास लिहतात संरानी इतिहासकार म्हणुन कामगीरी बजावत असताना सत्याची बाजू माडंली म्हणुन ते आदर्श आहेत 

अत्यंत हालाखीच्या परिस्थितितून आपले नवें विश्व निर्माण करणारे आमचे गुरू आदर्श आदरणीय dr.

प्रा. साईनाथ शेटोड सर जे सतत गरीब लोकाच्या मुलाना आपल्या विचारातुन घडवित असतात 

सर हे इतिहास विषयाचे प्राध्यापक असून ते इतिहासच नाही तर मुलात वैज्ञानिक विचार ही रुजवतात

मराठ्याचा इतिहास या विषयावर ph.d झाली मराठवाड़ातील एक नामवंत विचारवंत म्हणून सरांचा लौकीक आहे 

इतिहास, राज्य,समाज, हे विषयतर आहेच सोबत तत्वज्ञान,भाषा, भौतिक, नितीशास्त्र ह्या विषयावर ही ते मुलाना सांगतात आश्चर्यजनक काहीच नाही मी संराचा विद्यार्थि आहे मला जे शिकवले ते सांगतोय

सरांना मी गेल्यां अनेक वर्षा पासून पहातो माझ्या अडचणी सांगतो कारण सरांना गरीबीची जाण आहै


मी सराकडून छत्रपति शिवाजी महाराजांचा इतिहास शिकलो सरानी महाराजांचा इतिहास शिकवला व शिकवत आहेत तसे इतर कोणी शिकवणार नाही म्हणून महाराजाच्या जयंतीला सराचे व्याख्यान ठेवले,मी सराकडून महात्मा फुले,शाहू आंबेडकर शिकलो गांधी शिकलो, महादेव गोविंद रानडे शिकलो


मी मार्क्स , लेनिन, भगतसिंह शिकलो त्यांच्या शिकवंण्याचा इतका प्रभाव होता की त्यांचे अनेक विद्यार्थी पुरोगामी विचारधारेचे आहेत व विवेकी विचार आत्मसात करून मांडतात.

सरांचा व्यासंग खुप आहे संरानी आपले विचार अनेक पुस्तकात मांडले सरांचे इतिहास व उद्योग विषयक अनेक पुस्तकें प्रकाशित झाले 

  सरानी आदर्श समाजाची कल्पना केली ही खुप महत्वपूर्ण आहे कारण ते वास्तविक लेखन करीत असतात परंतु वास्तव खुप भयानक आहे हे बदलण्या साठी सर आपल्या विद्यार्थियाना उपदेश करतात

खरेच आदर्श शिक्षक कसा असावा याचे मुर्तीमंत उदाहरण सर आहेत


सर गांधीवादी आहेत लोकशाही वर नितांत श्रद्धा

 आहे सरांचा मला उपदेश असतो की विचार कोणते हे महत्वपूर्ण नाही कार्य महत्वपूर्ण आहे आपण समाजाचे काही देणे असते ते द्यावें 

सरांनी मला गरीब लोकाच्या समस्या सोडवण्या साठी प्रेरित केले व मी ते काम करतोय


सराची ही दोन पुस्तकें प्रकाशित झाली आहेत संबंधित पुस्तकें ज्ञानाचा भडांर आहे ज्यातून प्रत्येक व्यक्तिला खुप काही शिकतायेईल.

   

शेख नजीर

नांदेड़.

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा

  सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा            अनुसूचित जाती जमाती. इतर मागासवर्गीय जाती जमाती. भटक्या विमुक्त...

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या