भारतीय राष्ट्रीय लष्करात मुसलमानांचा सहबाग -
- अख्तर अली - जन्म कपुरथाळा, पंजाब, कपुरथाळा पायदळात सुभेदार , भारतीय राष्ट्रीय लष्करात दुसर्या गुरीला पलटणीत कॅप्टन म्हणून प्रवेश युद्धात कामी आले.
- अल्लाहुदिन - तलाव, जी. रोहटक , हरियाणा येथे जन्म, मोतीबक्ष चा मुलगा, जाट पलटणीत सैनिक, भारतीय राष्ट्रीय लष्करात तिसर्या गुरीला पलटणीत सैनिक महणून प्रवेश, युद्धात शहीद झाले.
- अल्ताफ हुसेन - जन्म रायपुर खुर्द, जी. अमृतसर, पंजाब येथे. भारतीय सैन्यात सैनिक होते. नंतर भारतीय राष्ट्रीय लष्करात बहादूर गटात सैनिक म्हणून प्रवेश, ब्र्हम्देशातील युद्धात शहीद.
- बशीर अहमद - जन्म बहाली, जी. रोहटक हरयाणा, भारतीय लष्करात जाट पलटणीत हवालदार, भारतीय राष्ट्रीय लष्करात तिसऱ्या गुरीला पलटणीत लेफ्टनंट म्हणून प्रवेश, कलेवा युद्धात शहीद.
- चिराग दिन - जन्म बडेंधे , जी. लुधियाना, पंजाब, ब्रह्मदेशात भारतीय लष्करात प्रवेश, युद्धात शहीद.
- चिराग खान - जन्म कहना, जी.कपूरथळा, पंजाब मलायात भारतीय राष्ट्रीय लष्करात प्रवेश, युद्धात शहीद.
- फतेह खान - जन्म रोहटक , हरियाणा भारतीय लष्करात जाट पलटणीत सैनिक, भारतीय राष्ट्रीय लष्करात सिंगापूर येथे सामील. तिसऱ्या गुरीला पलटणीत सेवा. ब्रिटीश सेनेशी युद्ध, जीगरकाचा येथील युद्धात शहीद.
- फतेह मोहम्मद - जन्म शेरपूर जी. होशियारपूर , पंजाब भारतीय लष्करात हवालदार कारकून, मलायातील भारतीय राष्ट्रीय लष्करात सामील, युद्धात शहीद
- गुलामनबी - जन्म हरमाबाद, जी. गुरुदासपूर, पंजाब, ब्र्हम्देशातील भारतीय राष्ट्रीय लष्करात प्रवेश, ब्रीटीशांकडून अटक. बिहारी कॅम्प मध्ये तुरुंगवास, फेब्रुवारी १९४४ मध्ये मृत्यु.
- इरशाद अली - जन्म बिगाणा , जी. रोहटक हरियाणा. भारतीय लष्करात सैनिक. भारतीय राष्ट्रीय लष्कराच्या पहिल्या गुरीला पलटणीत सैनिक म्हणून प्रवेश युद्धात शहीद.
- जमालउद्दीन - जन्म मैनवन जी. कपूरथळा, पंजाब. कपूरथळापायदळात सैनिक, भारतीय राष्ट्रीय लष्कराच्या दुसऱ्या गुरीला रेजिमेंट मध्ये नाईक म्हणून प्रवेश इंफाळजवळील युद्धात शहीद.
- फातमअली - जन्म पट्टण , जी. हिस्सार, हरियाणा फरीदखान मुलगा, ब्र्हम्देशात भारतीय राष्ट्रीय लष्कराच्या शामील. तिसऱ्या गुरीला पलटणीत नाईक म्हणून सेवा. युद्धात शहीद.
- ख़ुशी महमद - जन्म भंद्री, जी.लुधियाना, पंजाब. शांघाय प्लीस (चीन) मध्ये पोलीस,भारतीय राष्ट्रीय लष्कराच्या एस.एस.गटात सामील. ब्र्हम्देश सरहद्दीवरील युद्धात शहीद.
- लालखान - जन्म माघल, जी. झेलम, पंजाब. मलयात भारतीय राष्ट्रीय लष्कराच्या सामील, युद्धात शहीद.
- मोहंमद अन्वर - जन्म नुरपूर, जी. झेलम, पंजाब भारतीय राष्ट्रीय लष्करात शीख पलटणीत हवालदार, १९४२ ला सिंगापूरला १९४५ मध्ये ब्रह्मदेशातील अराकन टेकड्यांवरील युद्धात शहीद.
- मोहंमद बनारस- जन्म बसाली जी. रावळपिंडी , पंजाब मलायात भारतीय लष्करात सामील, दुसऱ्या गुरीला पलटणीत लेफ्टनंट म्हणून सेवा. युद्धात शहीद.
- मोहंमद शफी - जन्म पुट्टी जी.लाहोर, पंजाब मलायातील भारतीय राष्ट्रीय लष्कराच्या सामील दुसर्या गुरीला पलटणीत हवलदार म्हणून सेवा, इंफाळ जवळ युद्धात शहीद.
- मोहंमद दोन - जन्म काला कालन, जी. सियालकोट, पंजाब मलायात भारतीय लष्करात शामिल. युद्धात शहीद.
- मोहंमद उमरखान - जन्म निगाना , जी. रोह्टक , हरियाणा. नजर मोहंमदचा मुलगा. भारतीय लष्करातील जाट पलटणीत सैनिक, सिंगापूरच्या भारतीय राष्ट्रीय लष्करात प्रवेश, तिसऱ्या गुरीला पलटणीत हवालदार म्हणून सेवा युद्धात शहीद.
- मोहंमद याकुब - जन्म कासीर जी. हजारा , वायव्य सरहद प्रांत मलायात भारतीय राष्ट्रीय लष्करात शामील. युद्धात शहीद.
- मोहंमद युसुफ - जन्म इब्राहीम जैर जी. कोहट. वायव्य सरहद प्रांत भारतीय राष्ट्रीय लष्करात सैनिक. १९४२ मध्ये भारतीय राष्ट्रीय लष्करात शामील. पहिल्या बहादूर गटात सेवा, इंफाळ नजीकच्या युद्धात वीरगती.
- नबी बक्ष - जन्म मैनवेन, जी. कपूरथाळा, पंजाब कपूर था ळा पायदळात नाईक, १९४२ साली मलायात भारतीय राष्ट्रीय लष्करात शामिल. दुसऱ्या गुरीला पलटणीत सेवा, इंफाळ जवळील युद्धात वीरगती.
- नूर हुसेन - जन्म कानी, कॅबेल्पूर पंजाब १९४२ साली भारतीय राष्ट्रीय लष्करात मलायात प्रवेश, नोव्हेंबर १९४४ ला सिंगापूर येथे युद्धात शहीद.
- ताज मोहंमद - जन्म गोजरगड नुरकेल जी. मर्दन, वायव्य सरहद प्रांत भारतीय लष्करात हवालदार. १९४२ साली सिंगापूर भारतीय राष्ट्रीय लष्करात सामील. पहिल्या बहादूर गटात सेकंद लेफ्टनंट म्हणून सेवा. ब्रिटिशांनी कैद करून भारतात आणला. लखनौला १९४६ साली मृत्यू.
- जहूर अहमद - जन्म जहूर मुखलिअन जी. शेखुपुरा, पंजाब मलायात भारतीय राष्ट्रीय लष्करात प्रवेश. ब्र्हम्देसतील सार्हद्द्तील ब्रिटीश फौजांशी युद्ध. १९४३ मध्ये ब्रिटिशांनी पकडून भारतात आणला. लष्करी खटला देहांताची शिक्षा, २३ ऑगस्ट १९४३ ला फाशी.
स्त्रोत :
मखदूम उर्दू - स्वातंत्र्य चाळवलीतील मुस्लीम हुतात्म्यांचे अपूर्ण यादी.
सेडिशन कमिटी रिपोर्ट
रोल ऑफ ऑनर - के सी घोष
हुज हु ऑफ इंडिया मात्रीअर्स खंड १,२,३ संपादक - डॉ पी एन चोप्रा
HISTORY OF FREEDOM FOGHTER MOVEMENT OF CARE - T V KRUSHNAN
THE RIN STRIKE - A GROUP OF VITIMISED RATING
नव विद्रोह कॅप्टन बी.दत्ता
COMMUNIST MARTOURS - COMMITTE OF COMMUNIST PARTY OF INDIA
SUNIL BENARGEE, ABDUL RAZZAK KHAN AND ABDUL BADUD WRITTEN ARTICLES
वाचा -
मौलाना मुहम्मद अली ज़ौहर - Indian Freedom Fighter....
लव जिहाद पर उच्च न्यायालय का निर्णय -love jihad...
बाबरी मस्जिद शहादत- Babri masjid by Firoz Shaikh...
Guru Nanak : पैगम्बर मुहम्मद ﷺ साहब के बारे में, गुरु नानक जी के सुनहरे विचार....
No comments:
Post a Comment