लोकशाहीचा अंत?

 


लोकशाहीचा अंत ?

               आपणास माहीत आहे का. लोकांनी लोकांच्या साठी निर्माण केलेलें राज्य म्हणजे लोकशाही म्हणायला किती बर वाटत पण खरोखरच आज शासकीय निमशासकीय. शासकीय अधिकारी व कर्मचारी. सर्व शासकीय योजना. मतदान सर्वसामान्य जनतेचा पत्रव्यवहार. पत्रकार यांच्यावर जीवघेणं हल्ले. माहिती अधिकार कार्यकर्ते यांना धमकी दम देणें. समाजात प्रबोधन करणारे समाजसेवक यांना मिळणारी वागणूक. गुंडगिरी. वाढता दहशतवाद. नक्षलवादी. बेरोजगारी. शैक्षणिक अभाव आपल्या ऐपतीप्रमाणे शिक्षण पध्दती. पेट्रोल डिझेल दरवाढ. पेट्रोल डिझेल पंपावर कर्मचारी यांची दादागिरी. गॅस मधून होणारी लूट. विविध जीवनावश्यक वस्तू खरेदी करताना फसव्या जाहिराती दाखवून होणारी लूट. आर्थिक कोंडी बॅंक कर्मचारी व अधिकारी यांची सवताचे पैसे काढायला गेल्यावर ग्राहकाला मिळणारी वागणूक. रेशन अधिनियम २०१३ नुसार गोरगरीब जनतेला स्वस्त व रास्त भावात अन्न धान्य मिळावे यासाठी रेशन दुकान संकल्पना पण आज सर्वात मोठा घोटाळा आहे तो म्हणजे रेशन घोटाळा. रेशन दुकानदार मनमानी कारभार. पुरवठा अधिकारी व कर्मचारी याचे त्याचा त्यांना आश्रय. यामध्ये सर्वसामान्य जनता गोरगरीब लोक भरडून गेलली आहेत. विविध निवृत्ती वेतन योजना मिळविण्यासाठी म्हातारी लोक तहसिलदार कार्यालयाची पायरी चढता येत नाही तरि प्रयत्न करत मरून गेली पण शासणाची श्रावण बाळ योजना. मिळालीच नाही विधवा महिलांसाठी इंदिरा गांधी आर्थिक पेन्शन योजना. संजय गांधी निराधार योजना. याचं अनुदान मिळविण्यासाठी घालण्यात आलेल्या अटी. कशा आहेत बघा. मुलगा संभाळत नाही असे पत्र द्या. २१ हजार उत्पन्न दाखला आणि तो मिळतच नाही. आणि मुलगा संभाळत नाही असे कोण लिहून देत नाही. महसूल सर्वात मोठे गोलमाल स्टॅम्प पेपर पासून. शिपाई. साहेब. यांच्याकडून आपले काम खर असणार काम करून घेण्यासाठी सर्वसामान्य माणसाला जागोजागी नोटा पेरावया लागतात. सातबारा नोंदी. फेरफार उतारे. नाव चढविणे. दस्त नोंदणी. अशा विविध महसूल नोंदणी साठी आज आपल्या महाराष्ट्रात ३६ जिल्हे म्हणजे ३६ जिल्हाधिकारी कार्यालय. व प्रत्येक जिल्ह्याला असणारे अनेक तालुके म्हणजे प्रत्येक तालुक्याला एक तहसिलदार कार्यालय म्हणजे एका स्टँप पेपर मागें जर 100+20=120. म्हणजे एका स्टँप माग जर 20 रूपये मिळवत असतील हे स्टँप विक्रेते तर रोज एका तहसिलदार कार्यालयात रोज लाखो रुपये दोन नंबरने मिळविले जातात मग आठवडाभर पुरतील एवढे स्टँप विक्री करणारे आपणाजवळ ठेवणें बंधनकारक असताना सुध्दा स्टँप माग वीस रुपये जादा का ? ग्रामपंचायत मध्ये मोठ राजकारण हा माझा तो माझा जळता जळन एवढं आहे तरी तो दारिद्र्य रेषेखालील यादीत. घरकुल योजना बंगला असणार्या लोकांना पशुपालन. शेळीपालन. कुक्कुटपालन. रोपवाटीका. विविध ग्रामविकास ठेके हे नेत्यांच्या बगलबच्चे यांना. 

              पाणीपुरवठा. स्वच्छता. असे विविध ठेके. नगरपालिका मध्ये एखाद्या मजूर सोसायट्या किंवा. यामध्ये सफाई कामगार यांवर अन्याय. सफाई कामगार महिलांना हीन वागणूक. नगरसेवक नगरपालिका अधिकारी व कर्मचारी यांच्या विरोधात बोलणारया व्यक्तीला घरफाळा पानपट्टी डबल. रस्ते रुंदीकरण मध्ये नगरसेवक किंवा बगलबच्चे यांच काही क्षेत्र गेल काय बघा अतिक्रमण काढण्यास सुरुवात गरिबांच्या संडास पाडणयापासून. तयाला लाभार्थी असून घरकुल नाही. दारिद्र्य रेषेखाली नाव नाही. अंत्योदय मधून असणारा बचत गट यांना आहे बघा. रेशन दुकान परवाना बचत गटाच्या नावांवर एकतरी महिला रेशन अन्न धान्य दुकानात आहे का. जिल्ह्यात सर्व तालुक्याची महत्वाची कार्यालये आहेत. जे काम तालुक्याला होत नाही त्यासाठी लोकांना मा जिल्हाधिकारी यांना निवेदन पत्र व्यवहार करावा लागतो पण आजपर्यंत माझ्या एकाही अर्जाच उत्तर मला मिळालं नाही. मग मी एकटा रोज पत्र व्यवहार करत नसेन पूर्ण तालुक्यातून हजारों पत्र व्यवहार रोज जिल्हाधिकारी कार्यालयात धुळ खात पडतात काय म्हणजे आपलं दुखन कोणापुढे मांडायच जिल्हाधिकारी सर्व तालुक्यांतील जनतेचा माय बाप आहे तिथच अस असेलतर मग काय आई भिक मागून देईना वडील जगून देईना असा प्रकार आहे. आपल्यातील व आपल्या देशातील सर्वात मोठी समस्या आहे ती म्हणजे बेरोजगारी आज हजारों मुलं उच्च शिक्षण घेऊन बेकार आहेत त्यांना नोकरी नाही. घरची परिस्थिती बेताची असल्याने सर्व काही जगणं अवघड आणि मरण सोप असा प्रकार आहे. त्यात राहिलीसाहीली कसर सरकारनं भरुन काढली ती म्हणजे भरती नाही. सर्व शासकीय विभाग मोठ्या मोठ्या उधोगपती यांच्या घशात खाजगीकरण करुन घातले. त्यामुळे मुलांच्या पुढं मोठ कोड निर्माण झाल आहे. काही मुलांना ही सर्व परिस्थिती व घराची हालत यामुळे आत्महत्या सारखें मार्ग निवडले आणि आपली जीवनयात्रा संपवली किती वाईट आहे बघा. काही मुलांचे भाग्य उजळले ते म्हणजे अशी बेकार असणारी मुल राजकीय नेते पुढारी यांच्या निशानावर असतांत मग काय त्यांना पद. अधक्ष उपाध्यक्ष सदस्य. अशी पदे देवून आपले गुलाम करण्यात यश आले आहे. त्यामुळे पोलिस केस झाली तर या अशा मुलांना तरुण तडफदार नेतृत्व म्हणून तुरुंगात पाठवले जाते. मग काय एकवेळ क्राइम रेकॉर्ड झाल की नोकरी नाही. आणि अशा यांच्या राहणीमान असल्यामुळे कोण मुलगी देत नाही त्यामुळे लग्न नाही. सर्वात मोठा विचार करण्याचा विषय आहे तो म्हणजे आजपर्यंत कोणी विचार केला आहे का. कोणत्या नेत्याने आपल्या मुलाला. गणपती मंडळचा अध्यक्ष केला आहे का. कुठेही यांच्या मुलांचे नाव आहे का म्हणजे नेते पुढारी यांची मुल स्टडी रूम मध्ये आणि आपली मुल कस्टडी रूम मध्ये. आणि आम्ही लोकशाही राज्यात आहोत आपल्याला म्हणायला काहीच कस वाटतं नाही. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई यांचेकडून बांधकाम कामगार यांचेसाठी १९ विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात त्यात प्रामुख्याने बांधकाम कामगार असणे गरजेचे आहे. पण आज उलट झाल आहे ते म्हणजे बांधकाम कामाशी कोणत्याही संबंध नसणारे लोक म्हणजे रिक्षा चालक. दुकानांत काम करणारे कामगार. फळे फुले भाजीपाला विक्री करणारे. घरकाम करणाऱ्या महिलां. शिकणारी मुले. अशी विविध प्रकारच्या लोकांनी बांधकाम कामगार यांच्या हक्काच्या लाभ परस्पर लंपास केला आहे. तो कसा. आपल्या जिल्ह्यात कामगार नेते कामगार शुभचिंतक यांचं पेव फुटले आहे. जागोजागी कामगार संघटना नावाखाली दुकान थाटली आहेत. कामगारांना विविध योजना लाभ मिळवून देण्यासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक लुट केली जात आहे. दलाल एजंट गावा गावात आहेत त्यांचा बोलविता धनी वेगळाच आहे त्यांनी तर कामगार नोंदणी दरपत्रक तयार केले आहे. काहीजण नेत्यांच्या नावाखाली दडले आहेत. यांना सहाय्यक कामगार आयुक्त भवन सांगली येथील अधिकारी व कर्मचारी हे तुम्ही खा आम्हाला द्या असा पवित्रा राबविला आहे. मग काय अधिकारी व कर्मचारी यांचा डोक्यावर हात असल्यावर कोणाची भिती. मोकाट सुटले आहेत सर्वजण. पण यात खरोखरच दोषी कोण असेल तर बांधकाम कामगार आहे हे सिद्ध करण्यासाठी लागणारे इंजिनिअर यांच दाखले. यामुळे कोणताही व्यक्तिला बांधकाम कामगार सिध्द करता येते. आज काही ठिकाणी काही संघटना व इंजिनिअर यांच साटंलोटं झाल आहे त्यामुळे आज नोंदणी करणार्या माणसाला अमुक एवढे पैसे द्या इंजिनिअर दाखला आमचा आम्ही घेतो म्हणजे बांधकाम कामगारांचा सेवक असणारा इंजिनिअर आज पैसे घेऊन दाखले देतो. किती किळसवाणा प्रकार आहे. आणि आपणं म्हणतो लोकशाही आहे 

              बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर चे संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे यांनी सांगली जिल्ह्यातील शासकीय गोदाम तपासणी व पडताळणी करण्याचा अधिकार नागरि सनद प्रमाणे तहसिलदार. प्रांत. जिल्हाधिकारी. अन्न व नागरी पुरवठा मंत्री. दि आर तांबे साहेब. अशा विविध ठिकाणी पत्रव्यवहार केला होता. त्यावेळी. अन्न व नागरी पुरवठा मंत्री येथून एक पत्र पाठविण्यात आले मला की शासन निर्णय २०१७ नुसार कोणत्याही समाजसेवक. किंवा संस्था यांना रेशन शासकीय गोदाम तपासणी पडताळणी करण्याचा अधिकार देता येत नाही. मी म्हणतो आम्ही कोणी नेत नाही. आम्हाला कोणताही पक्ष नाही. आमच्या माग कोण नाही. आहे ते फक्त लाचार जनता. ज्यांचे प्रत्येक तालुक्यात हजारों रेशन कार्ड संबंधित विविध अर्ज प्रलंबित आहेत. असे यांना शासनाचे अधिकारी व कर्मचारी हीन वागणूक देतात. रेशन अन्न धान्य शासकीय अधिकारी व कर्मचारी खात नाहीत आम्ही गोरगरीब जनता खातो मग आमहाला हे रेशन अन्न धान्य ठेवन साठवन व संरक्षण कसे केले जाते हे बघण्याचा पाहण्याचा अधिकार आहे का नाही. मग आम्हाला लोकशाही राज्यात असे उत्तर देणारे शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना राजकीय पाठबळ आहे काय. म्हणजे लोकशाही आहे का तीचा अंत झाला आहे तुम्ही विचार करा. 

              शासनाने अपंगांसाठी वेगळी मंडळ स्थापन केले आहे त्यानुसार अपंगांचे वेगवेगळे २१ प्रकार केलें आहेत त्यात शारीरिक अपंग. मानसिक अपंग. मनोविकलांग. कर्णबधिर. असे विविध भाग आहेत अपंगांसाठी शिक्षण. उच्च शिक्षण. लग्न योजना. नोकरी आरक्षण. सामाजिक. आर्थिक. उन्नतीसाठी विविध योजना. गावाच्या शहराच्या विकासासाठी येणारा विकासनिधी यामधून अंगावर विविध योजनांसाठी ५ टक्के निधी खर्च करावयाचा आहे. त्यात अपंगाला त्वरित वेगळी शिधापत्रिका द्या. अपंगाला २५० सवेअर फूट जागा विनामोबदला द्या. धंद्यासाठी अनुदान कमीत कमी कागदपत्रांवर द्या पण आज मी सांगतो अपंग कोणी माझा मॅसेज वाचत असेल तर मला दाखवा वरील कोणताही लाभ आपणास विना त्रास कमीत कमी वेळेत झाला आहे का ? आमचा एक अपंग मित्र आहे त्याला अजून घर किंवा घरासाठी ग्रामपंचायत नगरपालिका क्षेत्रात मिळाली नाही कशामुळे आपण सर्वजण एकत्र येतो आपल्या प्रश्नांसाठी पण आपल्यातच एक डोंबकावळा असतो तो आपले हे संघटन पदाच्या हावयासापोटी कोणत्यातरी नेत्यांच्या दावणीला बांधतो आणि तेथून आपली गुलामी सुरू होते आणि लोकशाहीचा अंत होतो 

          आज महिला घरात. प्रवासात. सार्वजनिक ठिकाणी. शाळा कॉलेज विद्यालये महाविद्यालये येथे आपली मुलगी सुरक्षित नाही. अॅसिड हल्ले. बलात्कार. सामाजिक मानसिक अत्याचार. आॅफिस मध्ये बाॅसचे दबाव. सार्वजनिक कामाच्या ठिकाणी महिलांना मिळणारी वागणूक. त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळाच असतो. विविध महिलांसाठी संरक्षण कायदे. विविध प्रकारच्या योजना. वेळेवर न मिळणे. आज सर्वच ठिकाणी महिला पुरुषांच्या बरोबरीने काम करत आहेत तरि सुध्दा त्यांना लोकशाही राज्यात हवी तसी वागणूक का मिळत नाही समाजाला नंतर बदलू आगोदर तुम्ही बदला तुमचा विचार बदला 

# जननी देवाहूनही थोर # परस्त्री मातेसमान माना. # 

             मला जे काय वाटल ते मी मांडले आहे

     समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

काय आहे भारतीय संविधानाचे अनुच्छेद.१६२



काय आहे भारतीय संविधानाचे अनुच्छेद.१६२ 
शालेय शुल्क १५ टक्के कपात झाले का ?

          महाराष्ट्र शैक्षणिक संस्थांमधील सन २०२० ते २०२१ या शैक्षणिक वर्षांमधील शालेय शुल्कामध्ये १५ टक्के कपात करण्याचा शासन निर्णय फोल ठरला आहे. 

             राज्यात मार्च २०२० रोजी कोरोना सारख्या महाभयंकर महामारी संकटामुळे राज्यात टाळेबंदी जारी करण्यात आली सर्व शासकीय निमशासकीय कार्यालये. जिल्हा परिषद शाळा. हायस्कूल. काॅलेज महाविद्यालय विद्यालय. अॅकेडमी वर्ग. विविध शिकवणी वर्ग. आत्तापर्यंत पूर्ण बंद करण्यात आली. कारणं कोरोना संसर्ग वाढू नये लोकांचे व मुलांचे आरोग्य सुरक्षित राहावे. मुलांना कोरोना संसर्ग होऊ नये यासाठी. सर्व राज्यांत कडक टाळेबंदी जारी करण्यात आली होती. लोक टाळेबंदी मुळे घरातच अडकून पडली. लोकांना कामधंदा नाही हाताला काम नाही त्यामुळे हातात पैसा नाही त्यामुळे त्यांच्या वर व त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली त्यातच विविध बांधकाम कामगार. घरेलु कामगार. पापड लोणची चटण्या तयार करणारे उद्योग. धुनी भांडी करणार्या महिला. वाहन चालक मालक. अशा विविध घटकांवर उपासमारीची वेळ आली. एस टी कामगार यांना कामावरुन काढून टाकण्यात आले. त्यावेळी काही कामगार मिळेल ते काम करायला लागले. कोरोना टाळेबंदी काळात एकच व्यवसाय फुल्ल चालला तो म्हणजे भाजीपाला विक्री दुध अंडी अशा विविध जीवनावश्यक वस्तू विक्री करणारे लोक. किराणा दुकानदार यांनी कोरोना टाळेबंदी वेळेचे सोन केल दर वाढवून वस्तू विकल्या आणि पैसाच छापला. एकंदरीत कोरोना काळात जीवनावश्यक वस्तू विक्री करणारे. यांनी संकटात सापडलेल्या जनतेचा गैरफायदा घेतला शासन आदेश होता कोणी टाळेबंदी काळात जादा दराने विक्री करील त्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. पण ऐकतो कोण कारण दुकानदार आणि शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच साटंलोटं होतं. 

              वरील सर्व कोरोना काळात निर्माण झालेल्या परस्थितीचा परिणाम मुलांच्या शिक्षणावर झाला शाळा कॉलेज विद्यालये महाविद्यालये अॅकेडमी असे विविध शैक्षणिक संस्था बंद ठेवण्यात आल्या. त्यामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होण्यास सुरुवात झाली विविध शैक्षणिक संस्थांनी जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात वर्षांची शालेय फी भरून घेतली आणि मार्च पासून शाळा बंद करण्यात आल्या म्हणजे शैक्षणिक संस्थांना माहिती होत काय मार्च मध्ये टाळेबंदी लागणार आहे. म्हणजे एकंदरीत शाळा फायद्यात. शैक्षणिक संस्थांनी शिक्षणाचा पर्याय शोधला तो म्हणजे आॅनलाइन शिक्षण घेण्याचा. मग काय कोणाकडे गरिबी मुळे स्मार्ट फोन नाही. काही ठिकाणी आॅनलाइन शिक्षण घेण्यासाठी मोबाईल रेंज नाही. यामुळे अधिकच नुकसान झाले. मोबाईलसाठी काही मुलांनी आग्रह आपल्या आई वडील यांचेकडे धरला आणि मोबाईल परस्थिती मुळे मिळाला म्हणून आत्महत्या केल्या कोण जबाबदार आहे का ?

            शासनाने अखेर विविध शैक्षणिक संस्था सर्व अटि नियमानुसार चालू करण्याचा निर्णय घेतला पण आगोदर एक वर्ष घरातच असणारी मुले लगेच शाळेकडे वळणार का ? त्यांची शैक्षणिक रुची पहिल्यासारखी दिसणार कां ? असे एक नाही अनेक प्रश्न आ वासून उभे राहिले. त्यातच टाळेबंदी मुळे पालकांची बिघडलेली आर्थिक स्थिती वाहन कर्ज. घर कर्ज. व्यवसाय कर्ज. बॅंक कर्ज. भिसी कट्टा भिसी. सावकारी पाश. विविध फायनान्स कंपन्या. अशा विविध आर्थिक संस्थांचे कर्ज यामुळे लोकांचे कंबरडं मोडल आहे त्यातच विविध शैक्षणिक संस्थांची मनमानी पद्धतीने आकारली जाणारी फी. गेल्या वर्षापासून थकित असणारी शालेय फी. ही हजारांच्या घरात होती. शाळा चालू झाली पण विविध शालेय संस्थांनी दोन वर्षांची फी भरल्याशिवाय मुलांना शाळेत प्रवेश देण्यास नकार दिला. मनमानी कारभार. हीन वागणूक व्याज लावून वसुली सुरू झाली 

              शाळांच बाजूला ठेवा आपल्या गावातील ग्रामपंचायत नगरपालिका महानगरपालिका या क्षेत्रातील मिळकत धारकांना घरपट्टी पाणीपट्टी थकबाकी माफ करण्याची गरज होती पण गजब कारभार बघा माफ करायच राहिल असणार्या घरपट्टी पाणीपट्टी व विविध करावर दंड आकारण्यात आला आणि त्या दंडावर व्याज घेतलं हा सर्वात मोठा तुम्हाला आम्हाला फसविण्याचा फंडा आहे 

        मुलांची शिक्षणाची ही गैरसोय व शाळांचा मनमानी कारभार. बेकायदेशीर फी वसुली याचा सर्वात मोठा प्रश्न उभा राहिला यांवर तोडगा म्हणून शासनाने १२/ आॅगसट २०२१ रोजी शालेय शुल्कामध्ये १५/ टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला कोविड १९ या महामारी पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात २४/ मार्च पासून टाळेबंदी लागू करण्यात आल्यामुळे. त्याचा सामाजिक व आर्थिक पातळीवर मोठा प्रतिकूल परिणाम झाला आहे. या मुळे सर्व अर्थव्यवस्था मोडकळीस आली असून अनेक पालक त्यांच्या स्वयम् अर्थ सहहय खाजगी शाळेत शिक्षण घेणा-या पाल्याच्या फी भरण्याच्या स्थितीत नाहीत त्यामुळे या असाधारण परस्थिती शाळची फी. कमी करण्याबाबत / माफ करण्याबाबत अनेक पालक. सामाजिक संस्था. यांनी निवेदने शासनास दाखल केली होती 

      शैक्षणिक वर्ष २०२०/२१ विद्यार्थ्यांच्या पालकांनी या अधिनियमान्वये मान्यता दिलेल्या शाळेच्या शुल्क संरचनेनुसार. शुल्क प्रदान केलेलें आहे. तथापि राज्यात दि २४ मार्च २०२० पासून कोविड १९ या सार्वत्रिक साथरोगाचया प्रादुर्भावामुळे आणि या साथरोगाचे नियंत्रण ठेवण्यासाठी शासनाने टाळेबंदी घोषणा केल्यामुळे बहुतांश कालावधीसाठी शाळा बंद होत्या तसेच प्रवासावर किंवा येणयाजाणयावर देखील निर्बंध होते. परिणामी या सार्वत्रिक साथरोगामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे विद्यार्थांना प्रत्यक्षपणे. शाळेत उपस्थित राहता येऊ शकले नाही आणि ज्या विवक्षित शैक्षणिक सुविधांसाठी शुल्क आकारले गेले होते आणि काही प्रकरणांत असे शुल्क प्रदान केले होते. त्या शैक्षणिक सुविधांचा वापर झाला नाही शाळांनी वर्ग देखील आॅनलाइन किंवा आभासी अध्ययन किंवा ई अध्ययन पध्दतीने. घेतलें होतें. शैक्षणिक सुविधांचा लाभ घेणे किंवा वापर करणे विद्यार्थ्यांना शक्य नसताना शुल्क आकारने ही बाब शिक्षणाच्या नफेखोरी मध्ये किंवा व्यापारी करणात मोडत असून सुप्रसथापित. कायद्याने त्यास स्पष्टपणे मनाई केलेली आहे

            दुसरया बाजूला कोविड १९ महामारिचया पार्श्वभूमीवर अनेकांना आपले रोजगार गमावावे लागले आहेत व मोठ्या प्रमाणात व्यवसायावर देखील प्रतिकूल परिणाम झालेला आहे या सर्व परस्थिती मुळे पालकांची आर्थिक स्थिती खराब झाली असून अनेक पालक शाळांची संपूर्ण फी १००/ टक्के भरण्याच्या परिस्थितीत नाही त्यामुळे ज्या शैक्षणिक सोयी सुविधांचा वापर करण्यात आलेला नाही त्यासाठी घेण्यात येणारे शुल्क कमी अथवा माफ करण्यासाठी शासन निर्णय जारी करण्यात आला आहे किंवा त्या शुल्कामध्ये ५०/ टक्के सवलत देण्यात आली पाहिजे याबाबत सर्व शैक्षणिक संस्थांना कळविले आहे

      कोविड १९ सार्वत्रिक साथरोग प्रादुर्भाव अजूनही सुरू आहे आणि शाळांनी अद्याप नेहमीच्या प्रत्यक्ष पध्दतीने कामकाज सुरू केलेलें नाही तसेच अनेक शाळांमध्ये कार्यकारी समित्या गठीत करण्यात आलेल्या. नाहीत. राज्यातील खाजगी. शाळांची मोठी संख्या विचारात घेता शाळा निहाय न वापरलेल्या शैक्षणिक सोयी सुविधा करिता प्रत्येक शाळेची किती बचत झाली आहे याची गणना करणे व्यवहारिक दृष्ट्या शक्य नसलेमुळे तसेच यासाठी बराच कालावधी लागण्याची शक्यता विचारात घेता प्राप्त परिस्थितीत पालकांना तातडीने काही प्रमाणात शैक्षणिक शुलकाबाबत दिलासा देणें गरजेचे आहे त्यामुळे एकवेळ ची बाब म्हणून मा सर्वोच्च न्यायालयाने फि कपातीबाबत घेतलेल्या निर्णयाचा आधार घेऊन शैक्षणिक वर्ष २०२१ ते २०२२ या शैक्षणिक वर्षात एकूण निश्चित करण्यात आलेल्या फी चया १५ टक्के फी कपात किंवा माफ करण्याचा निर्णय घेतला आहे

            भारतीय संविधानाच्या अनुच्छेद १६२ नुसार ज्या बाबतीत राज्य विधीमंडळास कायदे करण्याचा अधिकार आहे अशा बाबतीत राज्य शासनास कार्यकारी आदेश काढण्याचा अधिकार आहे

                 सन २०२१ व २०२२ या शैक्षणिक वर्षासाठी एकवेळची बाब म्हणून सर्व मंडळाच्या व सर्व माध्यमाच्या शाळांना खालील प्रमाणे निर्देश देण्यात येत आहेत

(१) सन २०२१ व ‌ २०२२ या शैक्षणिक वर्षासाठी निश्चित करण्यात आलेल्या एकूण फी मध्ये १५ टक्के कपात किंवा माफी करण्यात यावी

(२) यापूर्वी ज्या पालकांनी पूर्ण फी भरलेली आहे अशी अतिरिक्त फी पुढील महिन्यात किंवा तिमाही हप्त्यात किंवा पुढील वर्षी शाळा व्यवस्थापनाने समायोजित करावी किंवा याप्रमाणे फी समायोजित करणे शक्य नसल्यास फी परत करावी

(३) कपात किंवा माफी करण्यात आलेल्या फी बाबत विवाद निर्माण झाल्यास असा विवाद यथासथिती संबंधित विभागीय शुल्क नियामक समीतीकडे किंवा शासन निर्णय क्र तक्रार २०२०प्रक्र ५० एस डी -४ दिनांक २६ फेब्रुवारी २०२० अन्वये गठित विभागीय तक्रार निवारण समीतीकडे दाखल करण्यात यावा व याबाबत विभागीय शुल्क नियामक समीतीने किंवा विभागीय तक्रार निवारण समीतीने घेतलेला निर्णय अंतिम राहील

(४) कोविड १९ महामारी काळात विद्यार्थ्याने शाळेची फी थकित फी भरली नाही म्हणून शाळा व्यवस्थापन अशा कोणत्याही विद्यार्थ्याला प्रत्यक्ष अथवा आॅनलाइन पध्दतीने शिक्षण घेण्यास किंवा परिक्षेल बसण्यास प्रतिबंध करता येणार नाही किंवा अशा कोणत्याही विद्यार्थ्यांचा निकाल रोखता येणार नाही 

(५) वरिल आदेश सर्व शासकीय निमशासकीय सर्व शैक्षणिक माध्यमांना शाळांना लागू राहतील

(६) हे सर्व शासन आदेश तात्काळ अमलात आणणे आवश्यक व बंधनकारक आहे

           आत्ता शाळा चालू झाल्या आहेत कोणतीही शैक्षणिक संस्था फी साठी मुलांची अडवणूक करत असेल तर आजच संबंधित जिल्हाधिकारी यांचेकडे लेखी तक्रार करा आणि सर्व शैक्षणिक संस्था यांनी शिक्षणा सारख्या पुण्य कर्माचा बाजार मांडू नका

          समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार जाहिरात प्रसिद्ध वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

कन्या कन्या - महिलांचा सन्मान करणारी आपली संस्कृती

 


कन्या कन्या. 

              महिलांचा सन्मान करणारी आपली संस्कृती # मुलगी जन्माला आली लक्ष्मी आली # असं म्हणणारे आपण जेव्हा आपणं आपल्या शेजारी सगेसोयरे आपल्या घरांत मुलगी जन्माला येणे. म्हणजे भाग्याचे माणल जात माझी छकुली माझी लेक भाग्याची अशी आपली मनधारणा असतें मुलीच्या जन्माचे स्वागत करा असा शासन सल्ला देत आहे. त्यासाठी माझी मुलगी भाग्याची. व मुलींच्या जन्मावर एक विशिष्ट रक्कम मुदत ठेव ठेवली जाते. एक वेळ मुलींचा जन्मदर जास्त होता पण काळ बदलला आणि लिंग चाचणी सारखी सोय आली आणि लिंग चाचणी करून मुलीचा गर्भातच घात केला जाऊ लागला. वंशाचा दिवा फक्त मुलगा असतो या समजूतीने आपल्या मनात घर केले होते. त्यांची पोचपावती म्हणून एक वेळ अशी आली की आज मुलींचा जन्मदर कमी झाला आहे. आपण विसरलो की. छत्रपती शिवाजी महाराज. शाहू महाराज. ज्योतीबा फुले. बाबासाहेब आंबेडकर. महाराणा प्रताप. समाजसेवक. क्रांतिकारी अशी विविध विभूती माणसाला जगण्याचा. राहण्याचा आपल्या जन्माचा अर्थ सांगणारे. लोकांच्या हितात आपले हित बघणारे. आपल्याला मिळाले म्हणजे त्यांना जन्माला घालणारी एक स्त्री होती हे आपण विसरतो. राजमाता जिजाऊ. झाशीची राणी लक्ष्मीबाई. फातिमा शेख सावित्रीबाई फुले. मदर तेरेसा. अशा विविध महिलांनी नावलौकिक मिळविला आहे. या सुध्दा भारतीय नारी आहेत. जर मुलगी जन्माला आली नसती तर अशा पावन विभूतीना आपण मुकलो असतो 

                मुलगी जन्माला आली सोबत लक्ष्मी घेऊन आली. म्हणायला बर वाटत पण खरोखरच असं होत का नाही. लक्ष्मी वाढलेली आपणांस खपते पण मुलगी वाढल तसं आपल दडपण वाढतं मग ती शाळा कॉलेज विद्यालये महाविद्यालये. बाजार. प्रवास. सार्वजनिक विविध ठिकाणी. आज आपली कन्या कन्या अडचणीत आहे. कारणं आज आपण बाल लैंगिक शोषणाच्या घटना वेळोवेळी वृतमापत्रात. दूरचित्रवाणी. यांवर बघतो वाचतो आणि आरे आरे वाईट झाल एवढंच म्हणतो आणि विसरुन जातो. पण आज बाल लैंगिक शोषण करणारे हे विसरतात की त्यांना जन्माला घालणारी एक स्त्रिच आहे # पर स्त्री मातेसमान # हे सत्य आहे का ? सर्वात मोठा शाप आहे तो म्हणजे. अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि याच जास्त प्रमाण आहे ते म्हणजे. पुणा मुंबई या भागात बलात्काराचे प्रमाण जास्त आहे. त्यापेक्षा वाईट म्हणजे एखाद्या ठिकाणी बलात्कार घडलाच तर ती घटना दूरध्वनी दूरदर्शन यांवर ब्रेकिंग न्यूज म्हणून. पाठोपाठ दाखवून आपल्या न्युज लाइव्ह याचा टिआरपी वाढविणे एवढाच उद्देश असतो आणि बलात्कार करणार्या व्यक्तिला सारखें जनतेपुढे दाखविले जाते म्हणजे पिढता पेक्षा व्यक्तिची जाहीरात केली जाते. महाराष्ट्राला हलवून टाकणारे या घटना. काही दिवसांपूर्वी पुण्यात १३ वर्षाच्या एका चिमुकल्या मुलींवर बलात्काराची घटना घडली. ही बातमी ताजी असताना रेल्वे स्टेशन परिसरात रात्रीच्या वेळी फुटपाथवर झोपलेल्या एका सहा वर्षांच्या चिमुरड्यांवर बलात्कार झाल्याचे समोर आले. खेड तालुक्यातील एका १२ वर्षाच्या मुलींवर पाच नराधमांनी वेळोवेळी लैंगिक अत्याचार केलयाची फक्त नोद आहे. वसयीत १६ वर्षाच्या मतिमंद मुलीवर अतिप्रसंग करण्यात आला. पिपंरी येथे एका नराधमाने मी निवृत्त पोलिस असल्याचे सांगून एका महिला शिक्षेकेवर बलात्कार केला. अमरावती १७ वर्षाच्या मुलींवर बलात्कार झाला. मुंबई साकीनाका येथे एका महिलेवर बलात्कार झाला आणि उपचारादरम्यान तीचा मृत्यू झाला कोपरडी बलात्कार प्रकरण. ही घटना भयानक असतो आपणास त्यांच्याविरुद्ध आवाज उठविण्याचा आणि पिडीतांना न्याय मिळवून देणयाची गरज आहे त्यानुसार आपल्या संविधानाने आणि कायद्याने घटनात्मक संस्था. व्यवस्था यांच्या भूमिका स्पष्टपणे आपणास आखून दिलेल्या आहेत त्यानुसार पोलिसांची जबाबदारी कायदा सुव्यवस्था राखणे आणि बलात्कार सारख्या प्रकरणांचा तपास. फिर्याद नोंदविणे. आरोपींना गुन्हेगारांना पकडणे. इथवरच मर्यादित आहे. गुन्हा घडला आहे किंवा नाही त्यातील आरोपींना कोणती शिक्षा झाली पाहिजे आदी गोष्टी ठरविण्याचा अधिकार फक्त न्यायालयाला आहे बहुतेक अशा प्रकरणांमध्ये खरया गुन्हेगारांना पकडले आहे याची खात्री नसते. बरेचदा खरेखुरे आरोपी मोकाट फिरतात म्हणजे चुकीच्या लोकांना शिक्षा देऊन बलात्कार घटना थांबणार नाहीत आणि बलात्कार सारख्या घटना थांबणार नाहीत आरोपींना पकडून तुरुंगात डांबून ठेवणे त्यानंतर त्यांना जामिनावर मुक्तता करणे पैसा वशिलेबाजी. धमकी. दम. अशा माध्यमांचा वापर करणारे आरोपी यांना पोलिसांनी पकडून जनतेच्या ताब्यात द्या. म्हणजे. वाईट नजरेने बघितले तर डोळे काढा. बलात्कार असेल तर हात तोडा नाहीतर चौकात यांना फाशीची शिक्षा द्या. नाहीतर मरेपर्यंत चप्पल बूट सॅंडल यांने मारण्यात यावे यासाठी अशा आरोपींना जनतेच्या ताब्यात द्या जनता यांना शिक्षा देईल त्याशिवाय आरोपीच्या मनांत दहशत बसणार नाही कशासाठी यांना पकडायचे आणि त्यांना पोलिस स्टेशनमध्ये पोसायचे. 

                  १९६० मध्ये गुन्हेगारी कायदा यासंबंधीची सविस्तर माहिती आपणांस देतो विविध फौजदारी कायदे काही उप कलमे लावली आहेत त्यानुसार शारीरिक मानसिक छळ इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध. ३५४ अ महिलेला विवस्त्र होण्यास भाग पाडणे. या कृतयासाठी ३५४ ब लैंगिक समाधान मिळविण्याच्या विकृती ३५४ क आणि महिलेचा पाठलाग करणे आॅनलाइन छळ ३५४ ड अशा विविध महिलांसाठी संरक्षक कलमांचा समावेश करण्यात आला आहे राज्यात बलात्काराच्या घटना वाढू लागल्यामुळे पुन्हा एकदा कठोर कायदे करण्याची मागणी जनसामान्यांच्या मनात आली होती त्यानुसार काही महिला संघटना व महिलानी मागणी केली होती त्यानुसार#दिशा # कायद्याच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने शक्ति कायदा आणणारं आहे बलात्काराच्या अनेक खटल्यांमध्ये पिडिताचे शोषण होते आणि गुनहेगार मोकाट सुटतात त्यामुळे केवळ कायदाच नव्हे तर समाजाने सुध्दा आपली जबाबदारी म्हणून जिथे जिथे महिलेवर अत्याचाराची प्रकरणे घटना घडत असतील तर अशा पिडित महिलांना कायदेशीर संरक्षण द्या. बलात्कार घटना नंतर व्यक्त होणारा राग हा योग्य असला व्यक्ति त्यामुळे भावनिक होऊन किंवा केवळ दिखावा म्हणून किंवा विरोधकांकडून मागणी होतंय म्हणून निर्णय घेणे उचित ठरणार नाही. तसेच गुन्हे घडल्यानंतर प्रक्रियेविषयीचा विचार करत असताना ते घडणार नाही यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना कडे लक्ष दिले पाहिजे बलात्काराच्या दृष्टीने याचा विचारांत सेफ्टी संकल्पना अंमलबजावणी गरजेची आहे

              महिलांचे लैंगिक शोषण बलात्कार आणि हत्या अशा गंभीर गुन्ह्यांत वाढ झाली आहे प्रश्न पडतो की अशा घटना का घडतात? एक समाज म्हणून आणि यंत्रणा म्हणून आपल्या देशाला या आघाडीवर सातत्याने अपयश का येते आहे ? महिला आणि पुरुष समान नाहीत आणि त्यामुळेच पुरुषांप्रमाणे महिला सार्वजनिक ठिकाणी जाऊ नये. मनाप्रमाणे कपडे धारण करू नये. हसू नये. सजनेसवरणे. लैंगिक शोषण आणि बलात्कार हे एक आजारांचे लक्षण आहे असा आजार जडलेल्या व्यक्ति पुरुषांपेक्षा महिलेला कमी लेखतात. फक्त आणि फक्त भोग वस्तू म्हणून त्यांची गणना करण्यात येते हे वास्तव्य समजून घेतलं पाहिजे स्त्री भ्रूणहत्या आणि कौटुंबिक हिंसाचाराच्या गुन्ह्यांमागे हीच मानसिकता असते जे लोक पितृसत्ताक मानसिक मध्ये लहानाचे मोठे होतात आणि शिक्षणाच्या अधिक संधी प्राप्त करून घेतात ते सामान्यतः असे मानतात की आपण महिलेपेक्षा श्रेष्ठ आहोत आणि त्यामुळेच आपल्याला आपली इच्छा पूर्ण करण्याचा हक्क आहे महाराष्ट्र मध्ये गेल्या ४ ते ५ हजार महिला बलात्कार घटना घडल्या आहेत तर ७/८ हजार बालकांवर अत्याचार झालेले आहेत आणि आजही होत आहेत यापुढे होणारच कारण आपली शासन व्यवस्था आणि आपली मानसिकता याला कारणीभूत आहे सार्वजनिक ठिकाणी जाणारया महिलांवर. ४००/५००/हून अधिक महिलांवर अॅसिड हल्ले झाले ग्रामीण व शहरी भागातील पुणे मुंबई उपनगर यामध्ये एक हजाराहून अधिक महिला या अत्याचाराला बळी पडल्या आहेत महिलांवर बलात्कार आणि बालकांवर लैंगिक अत्याचार आणि अॅसिड हल्ले आणि अन्य घरेलु अत्याचार घटना झाल्या अशा पिडीत महिलांना सुरक्षा प्रधान करण्यासाठी शासनाने # मनोधैर्य # योजना २०१३ मध्ये सुरू झाली आणि २०१८ पर्यंत महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण कडे पुनर्वसनासाची जबाबदारी देण्यात आली 

              निरक्षरता. अठरा विश्व दारिद्र्य. गरिबी. बेरोजगारी. अश अनेक समस्या आज वेश्याव्यवसाय यासाठी महिलांना प्रवृत्त केले जाते आणि असे भयानक समस्या आपल्या देशाला भेडसावत आहेत इथली समाजव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी तितकेच मोठे परिश्रम घ्यावे लागतात. दुर्दैवाने चित्रपट किंवा अलीकडच्या माहिती तंत्रज्ञान समाजप्रवृती सदृढ करण्यापेक्षा त्यातल्या विकृतींनादेखील संरक्षण दिलयाचेच एकंदरीत दिसून येते. 

               नोव्हेंबर १९५३ मध्ये कांग्रेस पक्षाने आपली महिला आघाडी स्थापन केली त्यापूर्वीच १९३४ मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला समांतर अशा राषटसेविका समितीची स्थापना श्रीमती लक्ष्मीबाई केळकर यांनी केली होती. पूर्वीच्या जनसंघाला व आत्ताच्या भारतीय जनता पक्षाला या समितीमधून स्त्री कार्यकर्त्या मिळतातं. १९५५ मध्ये राष्ट्रीय सेवा दल व प्रजासमाजवादी पक्ष यांना जवळ असलेल्या समाजवादी विचारांच्या महिलांनी समाजवादी महिला सभेची स्थापना केली या सभेचे कार्यक्षेत्र प्रामुख्याने महाराष्ट्रापुरते आहे ही महिल सभा आंतरराष्ट्रीय लोकशाही समाजवादी सभेशी संलग्न आहे

             समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

दारिद्रय रेषेचा सर्वे काळाची गरज

 


दारिद्रय रेषेचा सर्वे काळाची गरज  

        आज कोरोना. महापूर. बेरोजगारी. यामुळे सर्वसामान्यांना गोरगरिबांना. हाताला काम नाही त्यामुळे हातात पैसा नाही त्यामुळे त्यांच्या वर व त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे शासन वेळोवेळी जनतेला जागविण्यासाठी विविध अन्न धान्य योजना राबवित आहे. पण काही अधिकारी व कर्मचारी यांच्या मनमानी. व कामात कसूर.  हालगरजी पणामुळे.  रेशन अन्न धान्य वितरण व्यवस्था कोलमडली आहे. गरिबांना धान्य मिळत नाही. सदन कोण गरिब कोण याचा तिढा सुटला नाही. त्यामुळे खरोखरच योजनेत सहभागी असणारे यांना धान्य मिळत नाही.  यासाठी. दारिद्रय रेषेखालील कुटुंबांचा सर्वे 2005 नंतर आजपर्यंत झालेला नाही त्यामुळे सदन व्यक्तिचा सर्वे झाल्याशिवाय दुर्बल घटकातील लोकांना अन्न सुरक्षा योजनेत सहभागी होता येणार नाही. त्यामुळे दारिद्र्य रेषेखाली लोकांचा सर्वे झालाच पाहिजे. 

राज्यातील दारिद्र्य रेषेखालील आणि दुर्गम भागातील पात्र कुटुंबाना निवडक जीवनावश्यक वस्तू सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यासाठी सार्वजनिक वितरण व्यवस्था हे एक सार्थ माध्यम आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्था ही केंद्र व राज्य सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने जबाबदारीने चालविली जाते. या योजनेची माहिती सर्व नागरिकांना असणे अत्यंत गरजेचे तर आहेच आणि त्या आधारे सदर योजना प्रभावीपणे व पारदर्शक पणे राबविण्यासाठी आपला म्हणजेच नागरिकांचा अंत्यंत मोलाचा सहभाग असणे गरजेचे आहे

                  या विभागामार्फत देण्यात येणाऱ्या विविध लोकापयोगी सेवा त्याचे निकष कालमर्यादा तसेच तक्रार निवारण पध्दत याबाबत माहिती नागरिकांना असणे गरजेचे आहे त्यासाठी नागरि सनद तयार करण्यात आली. त्यामुळे प्रशासन अधिक लोकाभिमुख पारदर्शी व बळकट होईल अशी अपेक्षा आहे.  जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा. ग्राहक संरक्षण व वजन मापे कायद्याची अंमलबजावणी शेतकरयांना त्यांच्या धान्याला योग्य हमीभाव मिळावा यासाठी आधारभूत योजनेखाली धान्य खरेदी ही प्रमुख कार्ये पार पाडतात त्यात नागरिकांना सहभाग मिळवून सदर कामाच्या अधिक प्रभावी व पारदर्शक अंमलबजावणी दृष्टीने या नंतर नागरि संनदेला माहिती निश्चित उपयुक्त ठरेल   

                आधुनिक तंत्रज्ञान वापर करून व संगणकीकरण माध्यमातून सार्वजनिक वितरण व्यवस्था अधिक प्रभावी. परिणामकारक व सक्षम करावयाची शासनाची तयारी आणि त्याला नागरि संसदेच्या माध्यमातून अधिक बळकटी करण्याच्या उद्देशाने नागरिकांच्या प्रत्यक्ष सहभागाची जोड देऊन सदर यंत्रणा ही लोकाभिमुख. प्रतिसादशील होऊन प्रशासनाची जनमानसातील प्रतिमा उंचविणयास त्याची मदत निश्चित होईल 

                   राज्य अन्न आयोग स्थापन करण्यामागे शासनाचा साध्य हेतू होता सर्वसामान्य जनता गोरगरीब लोक ज्यांचे हातावरचे पोट आहे अशी लोक त्यांना रास्त आणि स्वस्त दराने अन्न धान्य आपत्कालीन वेळ पडल्यास त्यांना मोफत सुध्दा अन्न धान्य देण्यासाठी राज्य सरकारने अन्न आयोगाची स्थापना केली होती

            दि. 11/एप्रिल 2017 चया तरतुदीनुसार राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम 2013/2013चा 20 मधील कलम 16/1 नुसार प्रदान करण्यात आलेल्या शक्तिचा वापर करून राज्य शासनाने राज्य अन्न आयोग गठीत केला असून. त्यावर अध्यक्ष व इतर 4 सदस्य नेमणूक करण्यात आली असून. दि. 2/मे 2017/ या अधिसूचनेनुसार राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम 2013 मधील कलम 16/2 मधील तरतुदीनुसार आयोगातील अनुसूचित जाती जमाती सदस्यांची नेमणूक करणे शासनाने बंधनकारक केले आहे

           राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम 2013 चे कलम 16/6 मध्ये नमूद केलेली कार्ये सदर अन्न आयोग पार पाडील. 

        कल्याणकारी संस्था. वसतिगृह. आश्रमशाळा. इत्यादी संस्थांना बी पी एल दराने धान्य वितरण करण्याची सुविधा

         राज्यातील कल्याणकारी संस्थांना प्रत्त्येक लाभार्थी दरमहा 15 किलो याप्रमाणे धान्याचे वितरण करण्यासाठी केंद्र शासन बी पी एल दराने अन्न धान्याचे /गहू व तांदूळ /अतिरिक्त नियतन मंजूर करते 

              राज्यात केंद्रिय अन्नपूर्णा योजनेची अंमलबजावणी दि 1 एप्रिल 2001 पासून सुरू करण्यात आलीया योजनेअंतर्गत 65 वर्षे किंवा त्यावरील विधवा.  अपंग. दुर्धर आजार.  एकट्या राहणाऱ्या विधवा महिलां सर्व आदिम जमाती.  भूमीहीन.  शेतमजूर. अल्पभूधारक. ग्रामीण कारागीर.  उदा. कुंभार.  चांभार. मोची. विणकर.  सुतार.  झोपडपट्टीतील रहिवासी.  विशिष्ट क्षेत्रातील रोजंदारी काम करणारे कामगार   हमाल.  मालवाहक. सायकल रिक्षा चालक.  हातगाडी ओढणारे.  फळें फुले भाजीपाला विक्री करणारे.  गारुडी. कचरा वेचन करणारे कामगार.  निराधार.  शहरी व ग्रामीण भागातील व्यक्तिची कुटुंब. एच आय व्हि /एड्स /कॅन्सर /कुष्ठरोगी. यांना दरमहा 10. किलो धान्य मोफत देण्यात येते. प्रामुख्याने ज्या व्यक्तिंना केंद्र व राज्य पुरस्कृत योजनेअंतर्गत निवृत्ती वेतन योजनेचा लाभ मिळत नाही अशी व्यक्ती या योजनेसाठी पात्र आहे 

              1/. अन्न सुरक्षा योजनेत सहभागी

2/ नाव कमी करणे

3/ नाव वाढविणे

4/ रेशनकार्ड फाटलेले.  खराब जिरण.  हारवणे. 

5/ रेशनकार्ड मधील मृत व्यक्तिची नांवे कमी करा

6/ नवीन रेशनकार्ड काढणे

 8/ रेशन मिळत नाही म्हणून दाखल विविध तक्रारी

      वरील प्रमाणे विविध मागणी अर्ज हजारोंच्या संख्येने धुळखात पुरवठा विभागात पडले आहेत. असे कोणाचें अर्ज सहा महिने किंवा त्यांच्यापुढे पुरवठा विभागाकडे दाखल असतील तर त्यांनी आमच्याशी संपर्क साधा आत्ता उठाव करावाच लागेल

          समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा 2013 रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

9890825859

किती सोसावं आम्ही ?

 


किती सोसावं आम्ही  ?

                          भारतीय समाजव्यवस्थेत मागासलेले समाज घटक म्हणून. अनुसूचित जाती.  अनुसूचित जमाती. विमुक्त जाती भटक्या जमाती.  विशेष मागासवर्गीय. इतर मागासवर्गीय. असे गट आपल्या सोयीनुसार सरकारने पाडले आहेत त्यामागचा उद्देश एवढाच आहे. मतदान मिळविणे. जातीयवाद दंगल. दंगेधोपे जाळपोळ करण्यासाठी आणि जातींमध्ये आपसी मतभेद निर्माण करणे हाच महत्वाचा उद्देश आहे. उपरोक्त मागासवर्गीय अनुसूचित जाती जमाती. विमुक्त जाती.  भटक्या जमाती या अवर्ण असून उर्वरित प्रवर्ग सवर्ण आहे. जातीव्यवस्था. गावरचनेत. प्रत्येक व्यक्तिच्या वयवसायानूसार जाती ठरविल्या जातात.  महार मांग चांभार. लोहार सुतार कुंभार मोची विणकर. रामोशी बेरड माकडवाला मांगगारुडी कंजारभाट. टकारी. पारधी. गोपाळ. गोलहा. दांगट. कोल्हाटी मदारी. साप गारुडी. चित्रकथी. कुडमोडे. जोशी. डमरू वाले. वासुदेव. रजपूत. भामटा. कैकाडी. बेसतर. वडार अशा एका नाही अनेक जाती जमाती आहेत की त्यांची जात वर्गवारी व्यवसायामुळे ठरली आहे.  अवर्ण जाती जमाती स्तर अनुसूचित जाती म्हणजेच पूर्वा स्पृश्य दलित जाती या गावाबाहेरील बहिष्कृत वस्त्यांमध्ये असून अनुसूचित जमाती म्हणजेच आदिवासी जाती वयवसथाक गावरचनेपासून विभक्त असलेल्या जंगल पाड्यांमध्ये वसलेले आहेत. भटक्या विमुक्त जमाती या गावरचनेबाहेर आहेत. परंतु त्या एक ठिकाणी वसती करून राहत नाहीत. त्यामुळे त्यांना सवताचे वा स्थानिक असे गाव नाही सवताची शेतजमीन वा निरवाहाचे कोणतेही साधन नसल्याने त्यांना गाव गाडयवरच अवलंबून राहावे लागते 

        डॉ बाबासाहेब आंबेडकर अस्पृश्य जाती आदिवासी व भटक्या जमाती यांच्यातील भेदरेषा अधोरेखित केल्या आहेत. आदिवासी व भटके हे अस्पृश्य नाहीत अस्पृश्यता हा अनु जातीचा महत्वपूर्ण निकष आहे अस्पृश्यता ही निव्वळ सामाजिक. सांस्कृतिक सतरावरिल हीन दर्जा प्रदान करणारी प्रथा नसून ती अस्पृश्य जातींना निरवाहक्षम उत्पादनाच्या साधना पासून दूर करणारी सामाजिक व आर्थिक व्यवस्था आहे. जाती व्यवस्थेवर होणार या आर्थिक शोषणाचा निकषांवर अस्पृश्य आदिवासी व भटके यांच्यातील शोषण पिडीत दमनाची भिननता पुढे येते. दलित समाजाला गत काळात मिळणारी वागणूक आपणं सर्वांनी बघितली आहे कंबरेला झाडू बांधून रस्त्यावरुन चालावे लागत होते. गळयात मडक बाधाव लागत असे कारण रस्त्यावर थुंकणयाचा सुध्दा अधिकार नव्हता. गावातील प्रतिष्ठित व्यक्तिला जोहार मायबाप घालावा लागत असे. रहाण गावाबाहेर.  पाणवठ्यावर पाणी सुध्दा भरण्याची परवानगी नव्हती. अशी विविध बंधने दलित समाजावर होती. हळूहळू काळ बदलला आणि समाजात शिक्षणाचे महत्त्व वाढले. आणि समाजाला आपले हक्क व अधिकार याची जाणीव झाली. आणि समाजात विचार आचार संस्कृती याची उन्नती झाली यात सर्वात मोठा वाटा. डॉ बाबासाहेब आंबेडकर.  छत्रपती शाहू महाराज.  महात्मा ज्योतिबा फुले.  सावित्रीबाई फुले. अशी विविध समाजहितासाठी प्रयत्न करणारी विभूती यांचा सिंहांचा वाटा आहे. पण आज सुध्दा काही गावांत समोर नाही मागून का होईना दलित समाजाला जाणीवपूर्वक मानसिक सामाजिक धार्मिक त्रास अवहेलना केली जाते आहे

            वाळवा तालुक्यातील पोखरणी हे खेडे गाव या गावात बराच दलित समाज आहे. याच गावात सरपंच व ग्रामसेवक यांचा जाणिवपूर्वक मनमानी कारभार राजकीय आश्रयाखाली केला आहे या गावातील सरपंच सौ रेखाताई पाटील व गावाच्या विकासासाठी ग्रामीण योजना कोणत्याही  राजकीय दबावाशिवाय राबविण्यासाठी ग्रामसेवक नेमला जातो त्याचा कोणत्याही राजकारणी लोकाशी संबंध नसणारा असावा पण या दोघांनी मिळून ग्रामपंचायत कारभार हा मनमानी सुरू आहे. व अनेक योजनांच्या कामामध्ये प्रचंड असा भ्रष्टाचार केला आहे. व दलित व मातंग समाजाच्या विरोधात सातत्याने जाणिवपूर्वक जातीय द्वेषापोटी. व राजकीय द्वेषापोटी काम करीत आहेत. दलित वस्ती सुधार योजनेचा कामाबाबत ची प्लॅन इसटिमेंट मागणी लेखी व तोंडी वारंवार करून सुध्दा देण्यास जाणिवपूर्वक टाळाटाळ करीत आहेत.  ग्रामसेवक मोरे मॅडम या कामांवर हजर झाल्या पासून कधीही वेळेवर आॅफिस मध्ये येत नाहीत व आल्या नाहीत लोकांना लागणारे विविध दाखले. घराचे ८ अ चे उतारे.  जन्म आणि मृत्यू दाखले. रहिवासी दाखले. व इतर दाखले देण्यासाठी जाणिवपूर्वक टाळाटाळ करीत आहेत कोणत्याही शासकीय योजनांची माहिती मागासवर्गीय लोकांना व इतर लोकांना दिली जात नाही दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत शासन भरिव निधी उपलब्ध केला आहे पण त्यानुसार कोणतेच काम केले जात नाही. या योजनेतून एकादे काम झाले तरी लोंढे वस्ती मध्ये आंबेडकर नगर १ व आंबेडकर नगर २ मध्ये या ठिकाणी पथदिवे बसविण्यात आले आहेत त्या बाबतची प्लॅन इसटिमेंटची मागणी केली असता आजपर्यंत जनतेला प्लॅन इसटिमेंट दिली नाही. लोंढे वस्ती मध्ये पथदिवे बसविण्यात आले आहेत. परंतु लोंढे वस्ती या ठिकाणी प्रत्येक पोलवर एकच पथदिवा बसविण्यात आला आहे. व लोंढे वस्ती शेजारी पाटील समाजाच्या घराजवळ दोन पथदिवे बसविण्यात आले आहेत आंबेडकर नगर दोन वसाहतीत सुध्दा प्रत्येक दोन पथदिवे बसविण्यात आले आहेत मात्र जाणिवपूर्वक व जातीय द्वेषापोटी लोंढे वस्ती मध्ये प्रत्येक पोलवर एकच पथदिवा बसविण्यात आला आहे याची चौकशी करण्यात यावी 

  दलित वस्ती कामांचा ठेका देताना मागासवर्गीय ठेकेदार व मजूर सोसायट्या यांना न देता पोखरणी ग्रामपंचायत यांचेकडून सरपंच व ग्रामसेवक यांनी त्यांच्या सोयीनुसार अन्य ठेकेदाराला काम दिले आहे दलित वस्ती सुधार योजनेचे ठेकेदार ग्रामसेवक व सरपंच यांची तातडीने चौकशी करून कारवाई करण्यात यावी. मातंग समाजाच्या स्मशानभूमीचे सुशोभीकरण व्हावे यासाठी सातत्याने मागणी करून सुध्दा जाणिवपूर्वक दुर्लक्ष केले आहे

            पोखरणी संतोषनगर येथे मातंग समाज रहात आहे या ठिकाणी गेल्या दहा वर्षांत कोणत्याही योजनेचा एकही पैसा खर्च केला नाही.  १४ वा वित्त आयोग. १५ वा वित्त आयोग नुसार शासनाकडून येणारा भरिव हा दलित वस्ती सुधार योजनेचा कोणताही निधी आजपर्यंत खर्च करण्यात आलेला नाही. या संदर्भात सुध्दा ग्रामसेवक व सरपंच व ग्रामपंचायत प्रशासनाची चौकशी झाली पाहिजे.  मातंग समाजाला जाणिवपूर्वक दलित विकास निधी पासून व इतर विकास योजनांपासून वंचित ठेवण्याचे राजकारण ग्रामपंचायत प्रशासन करीत आहे. जर हा सर्व निधी खर्च केला नाही तर तो गेला कुठे याची चौकशी झालीच पाहिजे. ग्रामसभा झाली नाही. झाली असेल तर त्या ग्रामसभेला नागरिक होते का ? सर्व मागण्यासाठी २६ जानेवारी २०२१ पासून सातत्याने जिल्हाधिकारी. मुख्य कार्यकारी.  समाजकल्याण अधिकारी.  गटविकास अधिकारी. तहसिलदार यांचेकडे निवेदनाद्वारे मागणी केली होती त्यावेळी या संदर्भात बैठका घेऊन चर्चा झालेल्या आहेत पण निर्णय शुन्य.  तरी सुद्धा ग्रामपंचायत कारभारामधये कोणताही बदल झालेला नाही म्हणूनच पुन्हा पोखरणी ग्रामपंचायत कारभाराची चौकशी व्हावी. यासाठी विविध दलित बांधव मुख्यत्वे प्रयत्न करत आहेत वेळ पडल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन मोर्चा करण्याची तयारी आहे याची शासन प्रशासन यंत्रणेने गांभीर्याने दखल व नोद घ्यावी 

        वेळोवेळी उठाव मागणी करून सुध्दा जाणिवपूर्वक दुर्लक्ष या वंचिताकडे केले जात आहे किती सोसावं आम्ही कळत नाही

         समाजसेवा बंद आंदोलन उपोषण मोर्चा रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

गोरगरिबांचा आधार माहिती अधिकार

 


गोरगरिबांचा आधार माहिती अधिकार

          भारताच्या राज्य घटनेनुसार भारतीय नागरिकांना भारत हे लोकशाही प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून सथापणयाचे घोषित केले आहे हा उद्देश साध्य करण्यासाठी राज्य घटनेने कार्यकारी मंडळ. विधिमंडळ व न्यायमंडळ या संस्थात्मक संरचेनेची निर्मिती केली आहे. काळाच्या ओघामधये या संघराज्य व्यवस्थेमध्ये व त्याच्या विविध संस्थांमध्ये तसेच नागरिकांना सहभागातही उदासीनता आल्याचे सकृत दिसून येते. आज मितीस म्हणजे स्वातंत्र्य प्राप्तीनंतर सहाव्या दशकातही नागरिकांचा राज्य कारभारामधये मतदानाशिवाय कोणताही सक्रिय सहभाग दिसून येत नाही

          वास्तविक भारतासारख्या प्रतिनिधीक लोकशाही राष्ट्रात सार्वजनिक जीवनातील प्रत्येक महत्वाच्या बाबींवर हिरीरीने मतप्रदर्शन करून नागरिकांकडून राज्य कारभारात सहभाग होणे आवश्यक आहे राज्यघटनेने त्यासाठी नागरिकांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य मूलभूत हक्क म्हणून बहाल केले आहे. अर्थात नागरिकांना त्याचे माहीतीपूर्ण मत मांडण्यासाठी शासनाच्या कार्यपद्धती माहिती व सार्वजनिक हिताच्या बाबी कशा हाताळल्या जातात याची माहिती मिळणे आवश्यक आहे ही माहिती नागरिकांना प्राप्त व्हावी हा. # माहिती अधिकार अधिनियम २००५ # लागू करण्यामागचं उदेश आहे माहिती अधिकार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि राज्य कारभारात अभ्यासू नागरिकाचा सहभाग याची सांगड असणे आवश्यक आहे. ही भूमिका आता जगभर मान्य झाली आहे. जगभर माहीतीचा अधिकार हा मूलभूत अधिकार म्हणून मान्यता पावू लागला आहे. व तो नागरिकांना प्राप्त होण्यासाठी देशात खास कायदे पारित करण्यात आले आहेत. भारताने माहीतीचा अधिकार अधिनियम कायदा २००५ पारित करून अशा स्वरूपाचे कायदे केलेल्या देशाच्या समूह प्रवेश केला आहे. तद्वतच सुमारे २५ इतर देशात अन्य स्वरूपात अशा प्रकारे हक्क नागरिकांना बहाल करण्यात आला आहे

              माहिती अधिकार कायद्याचे दुहेरी फायदे आहेत वैयक्तिक पातळीवर तुम्हाला तुमच्या आवश्यकतेनुसार हवी माहिती त्वरित प्राप्त होते आवश्यक ती प्रमाणपत्र. दस्त ऐवज. विविध शासकीय कार्यालयातून प्राप्त करण्यापासून कार्यालयात प्रलंबित असलेल्या तुमच्या अर्जाची किंवा प्रकरण सधसथिती पर्यंतच्या अनेक बाबीचा यात समावेश होतो. त्यामुळे कार्यालयात हेलपाटे घालावे लागणारे हेलपाटे संदिग्ध माहिती अथवा दुरूततरे या जाचापासून मुक्तता होण्यासाठी. तसेच आपली हक्काची माहिती मिळविण्यासाठी हांजी. हांजी करून अपमानास्पद प्रसंग येण्याचा ही. संभव रहात नाही त्याच बरोबर माहीतीच्या अधिकारामुळे तुम्हाला जागरूक व समाजांचे तितकेच जागरूक व प्रगल्भ नागरिक होण्याचे सामर्थ्य प्राप्त होते ते माहीत अधिकार अधिनियम कायदा २००५ मुळेच

* तुम्हाला तुमच्या गावातील रस्ते विकास. गटार. समाजमंदिर. बाग बगिचे. या कामाचा दर्जा 

*. तुमच्या गावात तालुका जिल्हा राज्य देश यामध्ये चालणारे शासकीय बांधकाम याची वैधता तपासणी पडताळणी करण्याचा अधिकार आपणांस येतो तो माहिती अधिकार मुळे

* तुमच्या गावात तालुका जिल्हा राज्य देश निवडणूकीसाठी उभ्या असलेल्या उमेदवारांचे पूर्व चौकशी

* विविध शासकीय निमशासकीय योजनेतील पात्र अपात्र लाभार्थी निवडी इत्यादी बाबत माहिती विचारण्याची संधी आपणांस माहीती अधिकार अधिनियम यामुळे मिळते 

               या अधिकारामुळे कार्यालयीन गोपनीयतेचे वातावरण दूर करून शासकीय यंत्रणेस ते करीत असलेल्या कामाबद्दल उत्तरदायित्व येईल त्याचप्रमाणे तुमच्या सभोवतालच्या नागरिकांना संघटन करून भ्रष्टाचार व बेकायदेशीर व बिनदिक्कतपणे चालू असणार्या कुप्रथा विरूद्ध लढा देता येईल म्हणूनच आपण माहिती अधिकार कायदा आपल्या मुलाबाळांना व पुढील. पिढ्यांना देत असलेली बहुमूल्य देणगीच असणार आहे

             भारतीय संसदेने माहितीचा अधिकार अधिनियम २००५ हा पारित केला आहे असून तो १३ आक्टेबर २००५ पासून अंमलात देखील आला. या अधिनियमामुळे प्रत्येक भारतीय नागरिकाला अंत्यंत बहुमूल्य असा अधिकार प्राप्त झालेला आहे त्या अधिकारांची तसेच या अधिनियमाची तोंड ओळख करून देण्यासाठी तसेच या अधिनियमाची नागरिकांना कशी मदत घेता येईल आणि हा अधिनियम राबविण्यासाठी कोणती यंत्रणा निर्माण करण्यात आली याची माहिती देण्यासाठी ही संकल्पना अमलात आणली आहे

* या अधिनियमामुळे लोकशाही. सामान्य माणसाच्या दारात आली आहे माहिती प्राप्त करण्याच्या दृष्टीने तुम्हाला नागरिक म्हणून लोकसभेच्या विधिमंडळाच्या सदस्या इतकाच अधिकार प्राप्त झालेला आहे

* आत्ता तुम्हाला शासकीय विभाग कशी कामे करतात. शासकीय कामकाज कसे चालते कोणत्या कार्यपद्धती अवलंबिलया जातात आणि जनतेस कशा प्रकारे सेवा देतात हे जाणून घेण्याचा अधिकार आहे

*तुम्ही वेगवेगळ्या खात्याचे न्यायालयीन प्रशासकीय विभागाच्या फाईल्स ( नस्ती ) यादी तुम्हाला जरूर असेल तेव्हा पाहू शकाल

*तुम्ही तुमच्या अर्जाच्या सधसथितीची माहिती हक्काने मागू शकाल व इतर अर्जदाराच्या अर्जाची योग्य माहिती घेऊन तुलना करू शकता

*तुमच्या परिसरात चालू असलेल्या विकास कामांची माहिती तपासणी पडताळणी तुम्ही प्राप्त करू शकाल 

* तुम्हाला कुठलेही शासकीय कामांवर उदा. रस्त्याचे बांधकाम किंवा शाळेचं बांधकाम वापरण्यात येत असलेलें साहित्याच्या साक्षांकित नमुना प्राप्त करता येईल

* तुम्हाला कोणत्याही कामाच्या निविदा चां तुलनात्मक तक्ता प्राप्त होवू शकेल

*तुम्हाला तुमचा अर्ज नाकारण्यात आला याबाबत माहिती मिळण्याचा पूर्ण अधिकार आहे

*तुम्हाला शासकीय इस्पितळातील औषधाचा साठा माहिती मिळवू शकता

* स्वस्त धान्य दुकानातील धान्य साठा. ठेवन. साठवन व संरक्षण याबाबत माहिती करून घेता येईल

  अधिनियमाची आवश्यकता

वरील उल्लेख केल्याप्रमाणे माहिती अधिकार कायदा अधिनियम आपणांस या पूर्वी होता काय ? वरीलप्रमाणे माहिती मिळाल्यानंतर आपणांस नवे सामर्थ्य प्राप्त झाले आहे असे आपणांस निश्चय वाटतं असेल. माहीतीचे महत्व. विशेषत ती जर आपले माहिती अधिकार आणि हितसंबंध याबाबतची असेल तर तिचे महत्त्व आगळेच असते माहितीच्या अधिकारामुळे भारतीय नागरिकांना शासनाच्या कारभाराबद्दल त्याचप्रमाणे शासन मदत देत असलेल्या स्वयंसेवी संस्थांच्या कारभाराबाबत माहिती मिळविण्याच्या प्रशस्त मार्ग खुला झाला आहे

          हा अधिनियम अस्तित्वात आल्यामुळे यापूर्वीच माहिती देण्याच्या अथवा राखून ठेवण्याचा संदर्भातील कार्यालयीन गोपनियतेचा अधिनियम १९९३ चे तरतुदी नुसार इतर कायद्यातील अशा सर्व तरतुदी निष्प्रभ झाल्या आहेत यापूर्वी महाराष्ट्रात अशा स्वरूपाचा अधिकार नागरिकांना महाराष्ट्र माहितीचा अधिकार अधिनियम २००३ अन्वये देण्यात आला होता तो अधिनियम आत्ता निरसित झाला असला तरी केंद्रीय कायद्याचे स्वरूप या अधिनियमा सारखें आहे. त्यामुळे आत्ता राज्य शासनाच्या अधिनिसत कार्यालयाबाबत राज्य शासनाकडून नव्याने तयार करण्यात आलेल्या पध्दतीनुसार माहिती मागविता येईल तर केंद्रशासनाच्या अधिपत्याखाली. कार्यालये/ संस्था कडून माहिती प्राप्त करण्यासाठी पध्दती व फी केंद्र शासनाकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार कार्यवाही करता येण्याचा अधिकार 

      माहिती अधिकारांचे स्वरूप आपणास शासनाच्या कारभारातील कृती. आकृती. किंवा प्रतिबंधित कृती जाणून घेण्यासाठी नक्कीच आनंद असतो. या अधिनियमानुसार शासनाचे अभिलेख. दस्त ऐवज. लाॅगबुकस. प्राप्त झालेले सल्ले. परिपत्रके. आदेश. निविदा. अहवाल. यांच्या प्रती आपणांस मिळवणं सोपं जातं त्याचप्रमाणे शासकीय प्राधिकरणाकडे उपलब्ध असलेले साहित्यांचे नमुने. प्रतिकृती. इलेक्ट्रॉनिक. स्वरूपातील माहिती. इमेल्स इत्यादी बाबी प्राप्त करता येतील. या अधिनियमामधये अभिलेख व साहित्य तपासणी पडताळणी अधिकाराची तरतूद आहे

       माहिती अधिकार कसा वापरता येईल ? 

जर आपणास विशिष्ट माहिती प्राप्त करावयाची असेल तर आपण संबंधित माहिती अधिकारयाकडे अर्ज करावा. आपण जर आडवळणी गावात राहत असाल तर आपला अर्ज त्या विभागाच्या वा त्या खात्याच्या माहिती अधिकाराकडे सादर करावा. हा माहिती अधिकारी तुमच्या अर्जावर ३० दिवसांत कारवाई करेल आणि त्याला कारवाई करावीच लागेल. या अधिनियमात जरि नमुना अर्जाचे बंधनं घालण्यात आले नसले तरीही सोईकरिता म्हणून अर्जाचा नमुना पहा त्यासोबत रूपये १०/ रोखीने अथव ड्राफ्ट चेक अथवा डिमांड ड्राफ्ट अथवा कोर्ट फी स्टॅम्प लावून भरावयाचे आहे. असे न केल्यास अर्ज नाकारला जाऊ शकतो. एका अर्जात शक्यतो एकाच खातयासंबधीची माहिती विचारल्यास अर्ज लवकर विचारांत घेतला जाऊ शकेल

            आज माहिती अधिकार दिवस आहे. आज काही लोक काही माहिती अधिकार कार्यकर्ते या माहिती अधिकार अधिनियम कायदा २००५ याचा वापर फक्त आणि फक्त पैसा मिळविणे यासाठी करतं आहेत कायदा सर्वांना समान आहे कोणताही असा कार्यकर्ता शासकीय निमशासकीय अधिकारी यांना नाहक त्रास देण्याच्या उद्देशाने माहिती अधिकार दाखल करत असेल तर त्यांना सुध्दा कायदा समान आहे कोणताही शासकीय अधिकारी व कर्मचारी माहिती अधिकार दाखल केल्यानंतर माहिती देण्यास टाळाटाळ करत असेल उडवाउडवीची उत्तरे देत असेल तर अशा अधिकारी व कर्मचारी यांना कायद्याचा हिसका दाखवावाच लागेल 

         समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार जाहिरात प्रसिद्ध वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

काय झालं आंबेघरच

 


काय झालं आंबेघरच

                  सांगली. सातारा कोल्हापूर जिल्ह्यात जुलै महिन्यात बर्याच ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस झाला होता. पाऊस एवढा जोरात होता की लोकांना आपले. जीवनावश्यक वस्तू. महत्वाची कागदपत्रे. मुल बाळ महिला. महतारे आई वडील. प्रमाणापेक्षा प्रिय असणारी जनावरें यांना सुध्दा सावरण्याचा किंवा सुरक्षित ठिकाणी हालवणयाचा वेळ सुद्धा मिळाला नाही. या पूराचा तडाखा एवढा जोरात होता की २००५/ २०१९ पेक्षा जास्त होता. कोल्हापूर मध्ये. १३ गाव. सांगली २७ गाव आणि उर्वरित ५४ गाव या गावात जनावरे. मृत्यू. माणसाची हालपेषटा. हजारों एककर शेती जमीन पाण्याखाली गेली. हातातोंडाशी आलेली पिकें पूराचया पाण्यात बुडलयाने. नुकसान झाले आपल्या भागातील सर्वात मोठी धरणे म्हणजे कोयणा. चांदोली. या धरण क्षेत्रात सतत पडणाऱ्या पावसामुळे धरणांची पाणी पातळी झपाट्याने वाढली आणि लोकांचा जीव धोक्यात आला 

              यात आपलं सुध्दा चुकत कारणं एक महिना अगोदर प्रत्येक जिल्ह्यातील मा जिल्हाधिकारी सो यांनी पूराने पिडीत असणार्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला होता पण आपण त्याकडे दुर्लक्ष केले होते पूराचे पाणी आपल्या गावात आले गावातून आपल्या घरांत घुसले. जनावरांच्या गोठ्यात घुसल्यावर आपण सर्वजण धावाधाव करतो म्हणजे आपली आणि आपल्या कुटुंबाची जनावरांची जास्त काळजी शासन करतंय आणि आपण निष्काळजी आहोंत आणि मग शासनाने आमच्यासाठी काय केले म्हणत बसताय. भूखसंकलन या घटना वेळोवेळी घडतात. घाटातील दरड कोसळणे. डोंगराला भेगा पडणे. पुल तुटणे. बंधारे वाहून जाणे. शेतात पाणी येणे. विविध इंटरनेट कंपन्या बीसनल जिओ. एअरटेल. वहिआयवी अशा विविध कंपन्यांचे मोबाईल इंटरनेट बंद पडले. त्यामुळे कोणाकडे संपर्क करण्याचा प्रश्नच मिटला. त्यात प्रामुख्याने लाईट नसणं हे आपणांस माहीत आहे. यामुळे पाणी समस्या. पाण्यासाठी वणवण भटकावे लागते. लाईट नसल्यामुळे पेट्रोल डिझेल पंप बंद. यामुळे परगावाहून मालवाहतूक करणारे वाहने. त्यामुळे जनजीवन विस्कळित होते. पूर येवून गेल्यावर होणारी घाण. मयत जनावरें. कुत्री मांजरे उंदीर घुशी. साप यामधून येणारी दूरगंधी पसरणारी रोगराई पूरग्रस्त भागाचा दौरा करणारे आमदार खासदार मंत्री पुढारी नेते हे हेलिकॉप्टर मधून खाली सुध्दा उतरत नाहीत. आणि सर्वात मोठी आत्ता फॅशन झाली आहे ती म्हणजे फोटो सेकसन करण्याची आम्ही पूरग्रस्त भागाची पाहणी केली भेट दिली आणि मदत करण्याचे आश्वासन दिले. प्रत्यक्ष मदत कुठ आहे. शासनाने पुरग्रसत भागात दहा किलो गहू. दहा किलो तांदूळ पाच लिटर केरोसीन. देण्याची घोषणा केली. पण खरोखरच गरज असणार्या लोकांना ते मिळाले का ? कोणाला मिळाले कोणाला नाही ? सर्व लोकांनी मागणी करण्याची गरज आहे गावातील चोरांनी हा सर्वसामान्य माणसाला आलेली मदत लाटली. 

                आमचा पाटण तालुका. थोर समाजसुधारक लोकनेते क्रांतिकारक. कोकणाचे तोंड माणले जाणारा आमचा पाटण तालुका. येथील लोकनेते बाळासाहेब देसाई सर्वात मोठा दानधर्म करण्याचा वारसा असणारे नेते. दुष्काळ पडला मोठा. त्यात सुध्दा आपल्या धान्य गोदामाची दारे जनतेसाठी खुले करणारे लोकनेते बाळासाहेब देसाई कोयनेत मोठा भुकंप झाला लोकाची घरं पडली. मोठ्याप्रमाणात नुकसान झाले लोक रस्त्यावर आली. डोक्यावरचे छप्पर उडून गेलं त्यामुळे लोक हवालदिल झाले होते त्यावेळी घरासाठी लागणारे साहित्य देणारे लोकनेते बाळासाहेब देसाई हेच होतें. पाटण तालुका म्हणलं की डोंगराळ भाग. कोकणी लोक मनमोकळ्या स्वभावाचे. माफक शेती. भात शेंगा नाचणी वरी. अशी पावसावर अवलंबून असणारी पिकें घेणारे. शेती शिवाय दुसरा व्यवसाय नाही 

              पाटण तालुक्यातील आंबेघर तर्फे मरळी येथे डोंगराखाली वसलेले एक गाव म्हणजे आंबेघर. कोकण म्हणलं की जोरात पाऊस जुलै महिन्यात असाच ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. एवढा मोठा पाऊस होता की कोयना धरणाजवळील पाणी पातळी उंची ५४ फूटावर पोहोचली. पाऊसाने कहर केला आणि डोंगरा शेजारी असणारे आंबेघर गावाजवळ असणारा डोंगर भुसंखलन झाले आणि बघता बघता आंबेघर हे गाव ढिगारयाखाली आलें आज असणारे गाव उद्या तिथे नाही काय वाटल असेल. आणि आलेल्या ढिगारयाखाली लोक अडकून पडली अक्षरशः लोकांचा जीव गुदमरून तडफडून मृत्यू झाला. उभा पाऊस असल्यामुळे घटनास्थळी कोणीही गेले नाही

              अतिवृष्टी हाहाकार उडविलेलया जनतेला शनिवारी काहीसा दिलासा मिळाला. पावसाने उघडीप दिली आणि कृष्णा कोयना यासह अन्य धरणांची पाणी कमी होवू लागली. निसर्ग प्रकोपाचा रूद्रवतार झालेल्या पाटण तालुक्यातील आंबेघर तर्फे मरळी येथील ढिगारयाखाली गाडल्या गेलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम युध्दपातळीवर सुरू झाले शनिवारी सायंकाळ पर्यंत अकरा मृत देह सुखरूप बाहेर काढण्यात आले. यात लहान मुलांचा ही समावे होता यावेळी सातारा जिल्हा जिल्हाधिकारी शेखर सिंह हे घटनास्थळी दाखल झाले आहेत. पाटणचे कर्तव्य दक्ष तहसिलदार योगेश टोपे व त्यांचे सहकारी मदतकार्य सक्रिय झाले. आणि त्यांनी स्वतालक्ष घालून अकरा मृत देह बाहेर काढले. तरि सुध्दा तीन लोक सांपडली नाही यातच चार कुटुंबातील १४ जन ढिगारयाखाली गाडले गेलयाचीभीती अजून सुद्धा आंबेघर गावातील लोकांच्या मनात आहे हे तर लोकांचं झाल पण कुठेही पाळीव जनावरे मयत झाल्याची एकही घटना उघड झाली नाही. याचा अर्थ असा होतो की सर्व प्रकरण दाबले गेले काय

      आंबेघर गावातील लोकांना शासनाकडून काही मदत देण्यात आली का ? आली असेल तर ती मदत कोणत्या स्वरूपाची होती. त्या तालुक्यातील सामाजिक संघटना. सेवाभावी संस्था युनियन. मान्यवर नेते पुढारी खासदार आमदार यांनी काय केल आंबेघर गावांसाठी त्यांना पर्यायी जागा. घर बांधणीसाठी साहित्य. रेशन अन्न धान्य. कापड. जीवनावश्यक वस्तू. अन्नदान. आहार किट दिली का.मयत व्यक्तिंना आर्थिक मदत देण्यात आली का ? नाही म्हणजे घटनास्थळी जाऊन भेट देण्यापेक्षा मदत काय दिली आपल्या प्रत्येक जिल्ह्याला बरेच आमदार खासदार मंत्री लाभले आहेत पण. मदत करणारे लोक आज दिसायची बंद झाली जनता मनातून ओरडत आहे भेट दौरे करण्यापेक्षा. फोटो काढण्यासाठी निवडणूक भांडवल नको तर जनतेचे शुभचिंतक म्हणून रस्त्यावर या हे आत्ताच संपल नाही दरवर्षी असे विविध प्रकारचे पूर येणार आहेत. म्हणजे याचा अर्थ असा होतो की ज्या जिल्ह्यात आमदार आहे तेथे विकासाचा अनुशेष आहे 

              बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

निराधार मातेचे सासरी पुनर्वसन



मानवसेवा प्रकल्पातील निराधार मातेचे सासरी पुनर्वसन

सासरला आशाची रितीरिवाजाप्रमाणे संस्थेने केली पाठवणी

खडतर प्रवास थांबवून, मानवसेवेने तिच्या सुखी संसाराची केली सुरुवात

•••••••••••••••••••••••••

अहमदनगर - डोक्यावरील आई-वडिलांचे छत्र हरपले, कुठे जाणार?, कशी जगणार? अशा अनेक प्रश्‍नांचा सामना करीत तिला प्रत्येक प्रसंगाला तोंड दिल्याशिवाय पर्याय नव्हता. तिला फसवण्यासाठी वाईट प्रवृत्तीच्या लोकांनी जाळे टाकले, दलालांच्या जाळ्यात ती अडकत गेली. तिला अनेकदा शोषणाला बळी पडावे लागले. त्यातुन तिला निष्पाप जीव जन्माला आला आणि तिच्याबरोबर त्यांचीही वनवन सुरू झाली. अशा वाईट परिस्थितीमध्ये ते बाळ मृत्यू पावले. या खडतर प्रवासात तिचा जगण्याचा संघर्ष सुरुच होता. नातेवाईकांनी तर तिला केंव्हाच परकं करून सोडलं होत. आई-वडीलांच्या मृत्युनंतर तिला आश्रय घेता येईल, अशी एकही जागा शिल्लक नव्हती. जोडीदाराच्या रूपात तिला चांगला पति मिळाला. दोघांनी संमतीने लग्न केले. काही महिने चांगले सोबत घालवले. पण नंतर भुतकाळाने पुन्हा तिच्या मनात जागा घेतली आणि ती मानसिक रूग्ण बनली. घरात कुणाला काहीही न सांगता ती मानसिक संतुलन बिघडल्याने घर सोडून गेली. पुन्हा तिच्यावर अत्याचाराचे प्रसंग ओढवले अन ती गर्भवती राहून बाळ जन्मास आले. बाळाबरोबर अहमदनगर शहराच्या गल्ली बोळात, रस्त्यांवर, दारोदारी व बसस्थानक परिसरात ही आशा (बदललेले नांव) फिरु लागली. या निराधार महिला मनोरुग्णास श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळ संचलित मानवसेवा प्रकल्पाने आधार दिला. तिच्यावर उपचार करुन बरी झालेल्या आशा तिच्या कुटुंबीयांनी स्विकार केला नाही. मात्र पतीचे समुपदेशन करुन आशाला सासरी पुनर्वसन करण्यात आले. जशी माहेरवरून मुलगी सासरला पाठवतात त्याच रितीरिवाजाप्रमाणे साडी-चोळी देऊन तिची पाठवणी संस्थेच्या वतीने करण्यात आली. अंगावर शहारे आणणारा व थक्क करणारा आशाचा खडतर प्रवास थांबवून, मानवसेवेने तिच्या सुखी संसाराची सुरुवात करुन दिली.

निराधार मनोरुग्णाच्या अवस्थेत शहराल आलेली आशाचे अतोनात हाल झाले, विचार शक्ती हिरावून बसलेल्या महिलेचे काही नरधमांनी शोषण केले. निष्पाप बाळासह शहरात आलेल्या या निराधार मनोरुग्ण महिलेची माहिती महिला व बाल विकास विभागाच्या वन स्टॉप सेंटर कडून श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाचे संस्थापक दिलीप गुंजाळ यांना मिळाली. वाईट प्रवृतीबरोबर चांगली प्रवृत्तीही जन्म घेत असते, याप्रमाणे बेघर, निराधार, पिडीत मनोरुग्णांच्या पुनर्वसनासाठी काम करणारी श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाच्या मानवसेवा प्रकल्पात वन स्टॉप सेंटर मार्फत पिडीत आशा 3 ऑक्टोबर 2020 रोजी दाखल झाली. 

मानवसेवा प्रकल्पात तिला हक्काचा निवारा मिळाला. मानसोपचार तज्ञ डॉ. अनय क्षीरसागर आणि डॉ. सुरेश घोलप यांच्या मार्गदर्शनाने पिडीत महिलेवर उपचार करुन तिचे समुपदेशन करण्यात आले. आशा हळू हळू मानसिक आजारातून सावरत होती. हरवलेली स्मरणशक्ती हळूहळू मिळत होती. आठवणार्‍या सर्व घटना संस्थेचे समुपदेशक सुशांत गायकवाड व स्वयंसेवकांना सागत होती. पुन्हा सामान्य आयुष्य जगण्याची तिच्या आशा पल्लवीत झाल्या. अतिशय खेळीमेळीने मानवसेवा प्रकल्पात ती राहत होती. मानसिक आजारातून पुर्ण बरी होताच आता चुलते, मावशी आणि जवळचे नातेवाईक स्वीकारतील अशी अपेक्षा निर्माण झाली. श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाचे संस्थापक दिलीप गुंजाळ यांनी महिला स्वयंसेवकांसह आशाला व तिच्या बाळाला बारामती येथे पुनर्वसनासाठी घरी पाठवले. मात्र तिचे कुटुंबीय आशाला स्विकारण्यास तयार नव्हते. पती तिला स्विकारेल की नाही, या चिंतेने ती पतीची माहिती सांगत नव्हती. मात्र प्रकल्पातील महिला कार्यकर्त्या सुरेखा केदार यांनी समुपदेशन करुन तिच्या पतीकडील माहिती मिळवली. आशाच्या पतीची माहिती मिळताच दिलीप गुंजाळ यांनी तिच्या पतिकडे संपर्क साधून चर्चा व समुपदेशन केले. नगर तालुक्यातील एका युवकाशी तिचा लग्न झाला होता. संस्थेने त्याच्या पतीची व तिला सांभाळण्याची पुर्ण खात्री करुन घेतली. यानंतर पती व सासरच्या लोकांचे समुपदेशन करुन पतीने तिचा स्विकार करण्याचा निर्णय घेतला. पतीबरोबर तिचे सुखी संसार थांटण्यासाठी मानवसेवा प्रकल्पाने आशाचे पुनवर्सन केले. 

आशाच्या पुनर्वसनासाठी सर्व देणगीदार, मार्गदर्शक डॉ. अनय क्षिरसागर, संजय शिंगवी, अ‍ॅड. जयदिप देशपांडे, अविनाश मुंडके, डॉ. प्रीतमकुमार बेदरकर, शशिकांत चेंगेडे, डॉ. अविनाश मोरे, महेश पवार, शारदाताई होशिंग, डॉ. सुरेश घोलप, पत्रकार सुधीर लंके, अतिक शेख, योगिता मुथा, भरतभाऊ बागरेचा, स्वप्निल कुलकर्णी, नागराज बडगेरी, प्रदीप पेंढारे, अ‍ॅड. वृषाली तांदळे, धिरज तनपुरे, सागर खेत्रे, शिवदास चव्हाण, रेलफोर फाउंडेशनचे नितीन घोडके, रीचर्डस प्रा. लि.चे रोहीत कर्नावट, कोहीनूरचे अश्‍वीन गांधी, मनोज गुगळे, अभिजित काळे, सुधीर लांडगे, किरण गवते, अ‍ॅड. संतोष गायकवाड, उज्वलाताई बागवाडे यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. संस्थेचे स्वयंसेवक सुरेखा केदार, अविनाश पिंपळे, सुशांत गायकवाड, स्वप्नील मधे, रोहन नायडू, सिराज शेख, अंबादास गुंजाळ, शुभांगी माने, पल्लीवी हिवाळे-तुपे, श्रीकांत शिरसाठ, मच्छिंद्र दुधवडे, ऋतिक बर्डे, प्रसाद माळी, अनिल दुधवडे यांनी उपचार समुपदेशन आणि पुनर्वसनाकरीता परिश्रम घेतले.


*मानवसेवा प्रकल्प*

०२४१-२४२९९४२

धाड - आपले परिचयाचा शब्द

 


धाड 

      धाड - आपले परिचयाचा शब्द

 आपल्या परिचयाचे आहेत वरिल शब्द आपण वेळोवेळी वृतमानपत्रात वाचतो.की. पिकांवर टोळधाड आली आहे. म्हणजे. धाड म्हणजे एखाद्या विषयांचा सुपडासाप करण्यासाठी तयार करण्यात आलेले एक. संरक्षण कवच असे म्हणता येईल. आपल्या आजूबाजूला बघतो. अमुक येथे तमुक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रेड टाकली धाड घातली. विविध विभागात ठराविक अधिकारी व कर्मचारी यांना अधिकार देवून नेमले आहेत 

              जुगार. दारु भट्टी. मद्यविक्री केंद्र. रेशन विभाग. ग्रामपंचायत. नगरपरिषद. महानगरपालिका. तहसिलदार कार्यालय. पंचायत समिती. जिल्हा परिषद. कामगार विभाग. पाणी पुरवठा. सार्वजनिक बांधकाम विभाग. जलसंधारण विभाग. कृषी विभाग. कृषी उत्पन्न बाजार समिती. आठवडा बाजार. महावितरण कंपन्या. औद्योगिक विकास. विविध कल्याणकारी मंडळ. विविध कर्ज पुरवठा करणारी मंडळे. एस टी महामंडळ. वेश्याव्यवसाय ठिकाणे. विविध सामाजिक अनुदानित विनाअनुदानित संस्था. अन्न व औषध प्रशासन विभाग बालमजुरी. आश्रमशाळा. बेघर निवारा केंद्र. अशी एक नाही अनेक ठिकाणी शासनाला. कोणताही गैरप्रकार घडत असल्याची बातमी लागल्यास त्या प्रकाराचया विरोधात धाड. रेड. धागा. चौकशी करून सदर अहवाल शासनाकडे दाखल करणे बंधनकारक असते

                  शासनामार्फत देण्यात येणार्या विविध लोक उपयोगी सेवा सुविधा. योजना. त्याचे कार्य. कालमर्यादा. मालाचा दर्जा. त्यासाठी असणार्या तक्रारी. निवेदन. यांचे निवारण करण्याची पध्दती यांबाबत माहीती. प्रचार प्रसार जाहिरात. जनप्रबोधन. जनकल्याण. व्हावे यासाठी शासनाने ३/२/२००८ रोजी नागरि सनद तयार केली त्यानुसार प्रत्त्येक शासकीय निमशासकीय अनुदानित विनाअनुदानित संस्था यामध्ये चालणारे काम त्याचा आढावा निकष माहिती करून घेण्यासाठी सनद तयार करण्यात आली आहे. त्यामुळे प्रशासन अधिक लोकाभिमुख पारदर्शी व अधिक बळकट होईल शासकीय सेवा यामधील अधिकारी व कर्मचारी यांच्या व्यवहारात बदल होईल. अशी अपेक्षा जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा. ग्राहक संरक्षण हित. वजन मांपे कायद्याची अंमलबजावणी शेतकरयांना हमी भाव ग्राहकांना सुरक्षित व निश्चित दरात अन्न धान्य व वस्तू वितरण व्हावे. यात नागरिकांचा सहभाग मिळवून सदर कामाच्या अधिक प्रभावी व पारदर्शक अंमलबजावणी दृष्टीने या नागरि संसदेतील निश्चित माहिती उपयोगी ठरेल 

            माहिती अधिकार कायदा २००५ अमलात आणण्याचा उद्देश एवढाच आहे की सर्वसामान्य माणसाला सर्व शासकीय निमशासकीय कार्यालये यातील कामकाज जाणून घेणे हे आहे. पण तसं होत नाही. कारण माहिती अधिकार दाखल करणार्या व्यक्तिवर प्राणघातक हल्ले. होत आहेत. दमदाटी देणें. जीवे मारण्याची धमकी देणें. 

            आज सर्वच क्षेत्रात काळाबाजार. भ्रष्टाचार चालूच आहे. अधिकारी व कर्मचारी ठराविक दलाल एजंट यांना हाताला धरून सर्वसामान्य जनतेची कामे करत आहेत त्यातच. सर्वसामान्य माणसाला योजना माहीत नाही. आपल्यासाठी शासनाने काय केले आहे हे सुद्धा माहित नाही. प्रत्त्येक शासकीय विभागाला. योजना संबधी प्रचार प्रसार जाहिरात करण्यासाठी शासन एक ठराविक रक्कम देतय पण आज कुठेही. मेळावे. वृतमापत्र जाहिरात. बॅनर. पत्रक. यासाठी लाखों रुपये शासन खर्च करतय मग आपल्याला माहीती कळतच नाही.  

      प्रशासनाने. यासाठी. सापेक्ष पणे कोणताही भेदभाव न करणारे अधिकारी व कर्मचारी नेमून. जागोजागी. धाड. रेड. चौकशी करण्यासाठी टिम नेमणे गरजेचे आहे. नेमण्यात येणारे अधिकारी. लाच न घेणारे असावेत. नसेल तर एखादी सेवाभावी संस्था युनियन. यातील विश्वास पात्र लोकांना हा अधिकार देण्यात यावा. कारणं यांच कोणासी लागेबांधे नसणार आहेत. आपणांस मिळणारा अहवाल स्वच्छ व बिगर पक्षपाती पणाने मिळणारं आहे. 

          धाड. घातली तर त्यासाठी शासनाने सर्वसामान्य जनतेची मदत घ्यावी. चौकशी यांचेजवळ करावी. 

          समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा

  सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा            अनुसूचित जाती जमाती. इतर मागासवर्गीय जाती जमाती. भटक्या विमुक्त...

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या