किती सोसावं आम्ही ?

 


किती सोसावं आम्ही  ?

                          भारतीय समाजव्यवस्थेत मागासलेले समाज घटक म्हणून. अनुसूचित जाती.  अनुसूचित जमाती. विमुक्त जाती भटक्या जमाती.  विशेष मागासवर्गीय. इतर मागासवर्गीय. असे गट आपल्या सोयीनुसार सरकारने पाडले आहेत त्यामागचा उद्देश एवढाच आहे. मतदान मिळविणे. जातीयवाद दंगल. दंगेधोपे जाळपोळ करण्यासाठी आणि जातींमध्ये आपसी मतभेद निर्माण करणे हाच महत्वाचा उद्देश आहे. उपरोक्त मागासवर्गीय अनुसूचित जाती जमाती. विमुक्त जाती.  भटक्या जमाती या अवर्ण असून उर्वरित प्रवर्ग सवर्ण आहे. जातीव्यवस्था. गावरचनेत. प्रत्येक व्यक्तिच्या वयवसायानूसार जाती ठरविल्या जातात.  महार मांग चांभार. लोहार सुतार कुंभार मोची विणकर. रामोशी बेरड माकडवाला मांगगारुडी कंजारभाट. टकारी. पारधी. गोपाळ. गोलहा. दांगट. कोल्हाटी मदारी. साप गारुडी. चित्रकथी. कुडमोडे. जोशी. डमरू वाले. वासुदेव. रजपूत. भामटा. कैकाडी. बेसतर. वडार अशा एका नाही अनेक जाती जमाती आहेत की त्यांची जात वर्गवारी व्यवसायामुळे ठरली आहे.  अवर्ण जाती जमाती स्तर अनुसूचित जाती म्हणजेच पूर्वा स्पृश्य दलित जाती या गावाबाहेरील बहिष्कृत वस्त्यांमध्ये असून अनुसूचित जमाती म्हणजेच आदिवासी जाती वयवसथाक गावरचनेपासून विभक्त असलेल्या जंगल पाड्यांमध्ये वसलेले आहेत. भटक्या विमुक्त जमाती या गावरचनेबाहेर आहेत. परंतु त्या एक ठिकाणी वसती करून राहत नाहीत. त्यामुळे त्यांना सवताचे वा स्थानिक असे गाव नाही सवताची शेतजमीन वा निरवाहाचे कोणतेही साधन नसल्याने त्यांना गाव गाडयवरच अवलंबून राहावे लागते 

        डॉ बाबासाहेब आंबेडकर अस्पृश्य जाती आदिवासी व भटक्या जमाती यांच्यातील भेदरेषा अधोरेखित केल्या आहेत. आदिवासी व भटके हे अस्पृश्य नाहीत अस्पृश्यता हा अनु जातीचा महत्वपूर्ण निकष आहे अस्पृश्यता ही निव्वळ सामाजिक. सांस्कृतिक सतरावरिल हीन दर्जा प्रदान करणारी प्रथा नसून ती अस्पृश्य जातींना निरवाहक्षम उत्पादनाच्या साधना पासून दूर करणारी सामाजिक व आर्थिक व्यवस्था आहे. जाती व्यवस्थेवर होणार या आर्थिक शोषणाचा निकषांवर अस्पृश्य आदिवासी व भटके यांच्यातील शोषण पिडीत दमनाची भिननता पुढे येते. दलित समाजाला गत काळात मिळणारी वागणूक आपणं सर्वांनी बघितली आहे कंबरेला झाडू बांधून रस्त्यावरुन चालावे लागत होते. गळयात मडक बाधाव लागत असे कारण रस्त्यावर थुंकणयाचा सुध्दा अधिकार नव्हता. गावातील प्रतिष्ठित व्यक्तिला जोहार मायबाप घालावा लागत असे. रहाण गावाबाहेर.  पाणवठ्यावर पाणी सुध्दा भरण्याची परवानगी नव्हती. अशी विविध बंधने दलित समाजावर होती. हळूहळू काळ बदलला आणि समाजात शिक्षणाचे महत्त्व वाढले. आणि समाजाला आपले हक्क व अधिकार याची जाणीव झाली. आणि समाजात विचार आचार संस्कृती याची उन्नती झाली यात सर्वात मोठा वाटा. डॉ बाबासाहेब आंबेडकर.  छत्रपती शाहू महाराज.  महात्मा ज्योतिबा फुले.  सावित्रीबाई फुले. अशी विविध समाजहितासाठी प्रयत्न करणारी विभूती यांचा सिंहांचा वाटा आहे. पण आज सुध्दा काही गावांत समोर नाही मागून का होईना दलित समाजाला जाणीवपूर्वक मानसिक सामाजिक धार्मिक त्रास अवहेलना केली जाते आहे

            वाळवा तालुक्यातील पोखरणी हे खेडे गाव या गावात बराच दलित समाज आहे. याच गावात सरपंच व ग्रामसेवक यांचा जाणिवपूर्वक मनमानी कारभार राजकीय आश्रयाखाली केला आहे या गावातील सरपंच सौ रेखाताई पाटील व गावाच्या विकासासाठी ग्रामीण योजना कोणत्याही  राजकीय दबावाशिवाय राबविण्यासाठी ग्रामसेवक नेमला जातो त्याचा कोणत्याही राजकारणी लोकाशी संबंध नसणारा असावा पण या दोघांनी मिळून ग्रामपंचायत कारभार हा मनमानी सुरू आहे. व अनेक योजनांच्या कामामध्ये प्रचंड असा भ्रष्टाचार केला आहे. व दलित व मातंग समाजाच्या विरोधात सातत्याने जाणिवपूर्वक जातीय द्वेषापोटी. व राजकीय द्वेषापोटी काम करीत आहेत. दलित वस्ती सुधार योजनेचा कामाबाबत ची प्लॅन इसटिमेंट मागणी लेखी व तोंडी वारंवार करून सुध्दा देण्यास जाणिवपूर्वक टाळाटाळ करीत आहेत.  ग्रामसेवक मोरे मॅडम या कामांवर हजर झाल्या पासून कधीही वेळेवर आॅफिस मध्ये येत नाहीत व आल्या नाहीत लोकांना लागणारे विविध दाखले. घराचे ८ अ चे उतारे.  जन्म आणि मृत्यू दाखले. रहिवासी दाखले. व इतर दाखले देण्यासाठी जाणिवपूर्वक टाळाटाळ करीत आहेत कोणत्याही शासकीय योजनांची माहिती मागासवर्गीय लोकांना व इतर लोकांना दिली जात नाही दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत शासन भरिव निधी उपलब्ध केला आहे पण त्यानुसार कोणतेच काम केले जात नाही. या योजनेतून एकादे काम झाले तरी लोंढे वस्ती मध्ये आंबेडकर नगर १ व आंबेडकर नगर २ मध्ये या ठिकाणी पथदिवे बसविण्यात आले आहेत त्या बाबतची प्लॅन इसटिमेंटची मागणी केली असता आजपर्यंत जनतेला प्लॅन इसटिमेंट दिली नाही. लोंढे वस्ती मध्ये पथदिवे बसविण्यात आले आहेत. परंतु लोंढे वस्ती या ठिकाणी प्रत्येक पोलवर एकच पथदिवा बसविण्यात आला आहे. व लोंढे वस्ती शेजारी पाटील समाजाच्या घराजवळ दोन पथदिवे बसविण्यात आले आहेत आंबेडकर नगर दोन वसाहतीत सुध्दा प्रत्येक दोन पथदिवे बसविण्यात आले आहेत मात्र जाणिवपूर्वक व जातीय द्वेषापोटी लोंढे वस्ती मध्ये प्रत्येक पोलवर एकच पथदिवा बसविण्यात आला आहे याची चौकशी करण्यात यावी 

  दलित वस्ती कामांचा ठेका देताना मागासवर्गीय ठेकेदार व मजूर सोसायट्या यांना न देता पोखरणी ग्रामपंचायत यांचेकडून सरपंच व ग्रामसेवक यांनी त्यांच्या सोयीनुसार अन्य ठेकेदाराला काम दिले आहे दलित वस्ती सुधार योजनेचे ठेकेदार ग्रामसेवक व सरपंच यांची तातडीने चौकशी करून कारवाई करण्यात यावी. मातंग समाजाच्या स्मशानभूमीचे सुशोभीकरण व्हावे यासाठी सातत्याने मागणी करून सुध्दा जाणिवपूर्वक दुर्लक्ष केले आहे

            पोखरणी संतोषनगर येथे मातंग समाज रहात आहे या ठिकाणी गेल्या दहा वर्षांत कोणत्याही योजनेचा एकही पैसा खर्च केला नाही.  १४ वा वित्त आयोग. १५ वा वित्त आयोग नुसार शासनाकडून येणारा भरिव हा दलित वस्ती सुधार योजनेचा कोणताही निधी आजपर्यंत खर्च करण्यात आलेला नाही. या संदर्भात सुध्दा ग्रामसेवक व सरपंच व ग्रामपंचायत प्रशासनाची चौकशी झाली पाहिजे.  मातंग समाजाला जाणिवपूर्वक दलित विकास निधी पासून व इतर विकास योजनांपासून वंचित ठेवण्याचे राजकारण ग्रामपंचायत प्रशासन करीत आहे. जर हा सर्व निधी खर्च केला नाही तर तो गेला कुठे याची चौकशी झालीच पाहिजे. ग्रामसभा झाली नाही. झाली असेल तर त्या ग्रामसभेला नागरिक होते का ? सर्व मागण्यासाठी २६ जानेवारी २०२१ पासून सातत्याने जिल्हाधिकारी. मुख्य कार्यकारी.  समाजकल्याण अधिकारी.  गटविकास अधिकारी. तहसिलदार यांचेकडे निवेदनाद्वारे मागणी केली होती त्यावेळी या संदर्भात बैठका घेऊन चर्चा झालेल्या आहेत पण निर्णय शुन्य.  तरी सुद्धा ग्रामपंचायत कारभारामधये कोणताही बदल झालेला नाही म्हणूनच पुन्हा पोखरणी ग्रामपंचायत कारभाराची चौकशी व्हावी. यासाठी विविध दलित बांधव मुख्यत्वे प्रयत्न करत आहेत वेळ पडल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन मोर्चा करण्याची तयारी आहे याची शासन प्रशासन यंत्रणेने गांभीर्याने दखल व नोद घ्यावी 

        वेळोवेळी उठाव मागणी करून सुध्दा जाणिवपूर्वक दुर्लक्ष या वंचिताकडे केले जात आहे किती सोसावं आम्ही कळत नाही

         समाजसेवा बंद आंदोलन उपोषण मोर्चा रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा

  सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा            अनुसूचित जाती जमाती. इतर मागासवर्गीय जाती जमाती. भटक्या विमुक्त...

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या