Showing posts with label गरीब. Show all posts
Showing posts with label गरीब. Show all posts

ध्यास मदतीचा

 

ध्यास मदतीचा

      समाजात प्रत्येकजण आपापल्या परीने गोरगरीब जनतेला मदत करतो कोण धान्य दान करतो. कोणी पाणी दान करतो. कोण आर्थिक मदत करतो. कोण शारीरिक कष्ट करून मदत करतो पण सर्वात मोठा आणि जटिल असणारा असा प्रश्न आहे तो म्हणजे आपल्या समाजात अशी काही लोक आहेत कि जी अर्धपोटी उपाशी राहून कशीबशी जगत आहेत मग त्यांना दवाखान्यात जाण्यासाठी अठठरा विश्व दारिद्र्य असल्यामुळे वैद्यकीय खर्च करणे शक्य नाही यासाठी बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा यांचेकडून आमचें शिराळा तालुका महिला अध्यक्ष. व शिराळा तालुका उपाध्यक्ष. व त्यांचे सहकारी यांनी आपला अनमोल वेळ धन खर्ची घालून सोनवडे सारख्या गावांत मोफत डोळ्यांचे विविध विकार यांवर तपासणी व उपचार यासाठी मोफत शिबीर आयोजित केले होते 

सोनवडे येथे डोळ्यांचं शिबिर 9 /11/ 2019 रोजी संपन्न झालेल्या डॉक्टर सविता नलवडे, रवी यादव, नांगरे चेअरमन सतीश पाटील शिवाजी संचालक, विजय चौगुले, मणदुर उपसरपंच, आयोजक हसीना मुल्ला. संगीता बाबर मनीषा बाबर पूनम भोसले, वैभव बाबर, त्यांनी सर्वांनी मिळून सोनवडे, आरळा ,मणदूर ,बेरडे वाडी, शित्तुर ,शिराळा या भागातील लहान मुले व मोठी माणसे पेशंट मोतीबिंदू, काचबिंदू ,लासरू, मास वाढणे असे डोळ्यांचे गंभीर आजार तपासणी करून मोफत शस्त्रक्रिया पाठवले. या समाज कार्याला आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो.हा विचार मनात आणतात मरावे परी कीर्तिरूपे उरावे. आपण समाजात जन्माला आलो म्हणजे आपल्या हातून कळत नकळत आपण समाजाचे काही तरी देण लागतो ही भावना मनात घेऊन आमच्या रमाई आंबेडकर. झासीची राणी. अहिल्याबाई होळकर. राजमाता जिजाऊ. मदर तेरेसा. सावित्रीबाई फुले. यांच्या लेकी. यांनी सर्वात मोठा उपक्रम हाती घेतला सलाम त्यांच्या कामाला # ध्यास मदतीचा#

    बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

दारिद्रय रेषेचा सर्वे काळाची गरज

 


दारिद्रय रेषेचा सर्वे काळाची गरज  

        आज कोरोना. महापूर. बेरोजगारी. यामुळे सर्वसामान्यांना गोरगरिबांना. हाताला काम नाही त्यामुळे हातात पैसा नाही त्यामुळे त्यांच्या वर व त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे शासन वेळोवेळी जनतेला जागविण्यासाठी विविध अन्न धान्य योजना राबवित आहे. पण काही अधिकारी व कर्मचारी यांच्या मनमानी. व कामात कसूर.  हालगरजी पणामुळे.  रेशन अन्न धान्य वितरण व्यवस्था कोलमडली आहे. गरिबांना धान्य मिळत नाही. सदन कोण गरिब कोण याचा तिढा सुटला नाही. त्यामुळे खरोखरच योजनेत सहभागी असणारे यांना धान्य मिळत नाही.  यासाठी. दारिद्रय रेषेखालील कुटुंबांचा सर्वे 2005 नंतर आजपर्यंत झालेला नाही त्यामुळे सदन व्यक्तिचा सर्वे झाल्याशिवाय दुर्बल घटकातील लोकांना अन्न सुरक्षा योजनेत सहभागी होता येणार नाही. त्यामुळे दारिद्र्य रेषेखाली लोकांचा सर्वे झालाच पाहिजे. 

राज्यातील दारिद्र्य रेषेखालील आणि दुर्गम भागातील पात्र कुटुंबाना निवडक जीवनावश्यक वस्तू सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यासाठी सार्वजनिक वितरण व्यवस्था हे एक सार्थ माध्यम आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्था ही केंद्र व राज्य सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने जबाबदारीने चालविली जाते. या योजनेची माहिती सर्व नागरिकांना असणे अत्यंत गरजेचे तर आहेच आणि त्या आधारे सदर योजना प्रभावीपणे व पारदर्शक पणे राबविण्यासाठी आपला म्हणजेच नागरिकांचा अंत्यंत मोलाचा सहभाग असणे गरजेचे आहे

                  या विभागामार्फत देण्यात येणाऱ्या विविध लोकापयोगी सेवा त्याचे निकष कालमर्यादा तसेच तक्रार निवारण पध्दत याबाबत माहिती नागरिकांना असणे गरजेचे आहे त्यासाठी नागरि सनद तयार करण्यात आली. त्यामुळे प्रशासन अधिक लोकाभिमुख पारदर्शी व बळकट होईल अशी अपेक्षा आहे.  जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा. ग्राहक संरक्षण व वजन मापे कायद्याची अंमलबजावणी शेतकरयांना त्यांच्या धान्याला योग्य हमीभाव मिळावा यासाठी आधारभूत योजनेखाली धान्य खरेदी ही प्रमुख कार्ये पार पाडतात त्यात नागरिकांना सहभाग मिळवून सदर कामाच्या अधिक प्रभावी व पारदर्शक अंमलबजावणी दृष्टीने या नंतर नागरि संनदेला माहिती निश्चित उपयुक्त ठरेल   

                आधुनिक तंत्रज्ञान वापर करून व संगणकीकरण माध्यमातून सार्वजनिक वितरण व्यवस्था अधिक प्रभावी. परिणामकारक व सक्षम करावयाची शासनाची तयारी आणि त्याला नागरि संसदेच्या माध्यमातून अधिक बळकटी करण्याच्या उद्देशाने नागरिकांच्या प्रत्यक्ष सहभागाची जोड देऊन सदर यंत्रणा ही लोकाभिमुख. प्रतिसादशील होऊन प्रशासनाची जनमानसातील प्रतिमा उंचविणयास त्याची मदत निश्चित होईल 

                   राज्य अन्न आयोग स्थापन करण्यामागे शासनाचा साध्य हेतू होता सर्वसामान्य जनता गोरगरीब लोक ज्यांचे हातावरचे पोट आहे अशी लोक त्यांना रास्त आणि स्वस्त दराने अन्न धान्य आपत्कालीन वेळ पडल्यास त्यांना मोफत सुध्दा अन्न धान्य देण्यासाठी राज्य सरकारने अन्न आयोगाची स्थापना केली होती

            दि. 11/एप्रिल 2017 चया तरतुदीनुसार राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम 2013/2013चा 20 मधील कलम 16/1 नुसार प्रदान करण्यात आलेल्या शक्तिचा वापर करून राज्य शासनाने राज्य अन्न आयोग गठीत केला असून. त्यावर अध्यक्ष व इतर 4 सदस्य नेमणूक करण्यात आली असून. दि. 2/मे 2017/ या अधिसूचनेनुसार राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम 2013 मधील कलम 16/2 मधील तरतुदीनुसार आयोगातील अनुसूचित जाती जमाती सदस्यांची नेमणूक करणे शासनाने बंधनकारक केले आहे

           राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम 2013 चे कलम 16/6 मध्ये नमूद केलेली कार्ये सदर अन्न आयोग पार पाडील. 

        कल्याणकारी संस्था. वसतिगृह. आश्रमशाळा. इत्यादी संस्थांना बी पी एल दराने धान्य वितरण करण्याची सुविधा

         राज्यातील कल्याणकारी संस्थांना प्रत्त्येक लाभार्थी दरमहा 15 किलो याप्रमाणे धान्याचे वितरण करण्यासाठी केंद्र शासन बी पी एल दराने अन्न धान्याचे /गहू व तांदूळ /अतिरिक्त नियतन मंजूर करते 

              राज्यात केंद्रिय अन्नपूर्णा योजनेची अंमलबजावणी दि 1 एप्रिल 2001 पासून सुरू करण्यात आलीया योजनेअंतर्गत 65 वर्षे किंवा त्यावरील विधवा.  अपंग. दुर्धर आजार.  एकट्या राहणाऱ्या विधवा महिलां सर्व आदिम जमाती.  भूमीहीन.  शेतमजूर. अल्पभूधारक. ग्रामीण कारागीर.  उदा. कुंभार.  चांभार. मोची. विणकर.  सुतार.  झोपडपट्टीतील रहिवासी.  विशिष्ट क्षेत्रातील रोजंदारी काम करणारे कामगार   हमाल.  मालवाहक. सायकल रिक्षा चालक.  हातगाडी ओढणारे.  फळें फुले भाजीपाला विक्री करणारे.  गारुडी. कचरा वेचन करणारे कामगार.  निराधार.  शहरी व ग्रामीण भागातील व्यक्तिची कुटुंब. एच आय व्हि /एड्स /कॅन्सर /कुष्ठरोगी. यांना दरमहा 10. किलो धान्य मोफत देण्यात येते. प्रामुख्याने ज्या व्यक्तिंना केंद्र व राज्य पुरस्कृत योजनेअंतर्गत निवृत्ती वेतन योजनेचा लाभ मिळत नाही अशी व्यक्ती या योजनेसाठी पात्र आहे 

              1/. अन्न सुरक्षा योजनेत सहभागी

2/ नाव कमी करणे

3/ नाव वाढविणे

4/ रेशनकार्ड फाटलेले.  खराब जिरण.  हारवणे. 

5/ रेशनकार्ड मधील मृत व्यक्तिची नांवे कमी करा

6/ नवीन रेशनकार्ड काढणे

 8/ रेशन मिळत नाही म्हणून दाखल विविध तक्रारी

      वरील प्रमाणे विविध मागणी अर्ज हजारोंच्या संख्येने धुळखात पुरवठा विभागात पडले आहेत. असे कोणाचें अर्ज सहा महिने किंवा त्यांच्यापुढे पुरवठा विभागाकडे दाखल असतील तर त्यांनी आमच्याशी संपर्क साधा आत्ता उठाव करावाच लागेल

          समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा 2013 रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

9890825859

बेघर बेघर

 


बेघर बेघर 

              आपणांस किती किळसवाणा वाटणारा शब्द आहे. शासनाने सर्वांना स्वताचा हक्काचा निवारा मिळावा यासाठी दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांचा सर्वे २००५ साली करण्यात आला होता तो सर्वे करताना. निरपेक्ष दारिद्र्य. सापेक्ष दारिद्र्य. अशा तत्वावर करण्यात आला होता. हि समिती. सुरेश तेंडुलकर यांच्या अध्यक्षतेखाली २ डिसेंबर २००५ साली नेण्यात आली होती. त्यानंतर. २००८ साली एन सी सक्सेना यांच्या अध्यक्षतेखाली दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांचा सर्वे करण्यासाठी पुन्हा समिती नेमण्यात आली. आणि सर्वात पहिल्यांदा. १९७६ साली सर्वात पहिली दारिद्र्य रेषेखाली कुटुंबाचा सर्वे झाला होता आणि करण्यासाठी समिती नेमण्यात आली होती. सदन आणि निर्धन या तत्वावर आधारित दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांचा सर्वे करण्यात आला होता. पण त्यात मोठ्या प्रमाणात गोलमाल करण्यात आला होता तो गोलमाल स्थानिक स्वराज्य संस्था. नेते पुढारी व त्यांचे बगलबच्चे यांनी केला

            त्यावेळी झालेला दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांचा सर्वे हा गृहभेट देवून घेण्यासाठी शासनाने निर्देश दिले होते. पण. ग्रामीण भागातील सरपंच उपसरपंच सदस्य. व रेशन दुकानदार यांच्या एका जागेवर बसून दिलेल्या माहितीनुसार करण्यात आला. अमुक असा तमुक तसा. अशी आपली लोक आगोदर दारिद्र्य रेषेखाली समावेश करण्यात आला. सर्व माहिती ज्याची खरी परस्थिती होती त्यांची खोटी सांगण्यात आली. तसेच शहरी भागातीसाठी. नगरसेवक शासकीय अधिकारी व यांनी सुध्दा शासनाला कोणाच्याही दारात न जाता सर्वे आपल्या मनाप्रमाणे करून आपले कार्यकर्ते बगलबच्चे यांची नावे आगोदर घातली आणि गोरगरीब यांच्यावर तेव्हा झालेला अन्याय ही जनता अजूनही भोगत आहे. रेशन अन्न धान्य यापासून लोक वंचित राहिली. शासनाच्या विविध घरकुल योजना यापासून वंचित राहिली. शासनाच्या लहान लहान उद्योग व्यवसायासाठी असणारे विविध अर्थसहाय्य योजना यापासून खरोखरच दारिद्र्य रेषेखालील लोक वंचित राहीली. अपंग निराधार विधवा अशी लोक यापासून वंचित राहिले यासाठी कारणीभूत आहेत ते म्हणजे आपण आपल्या मताने निवडणून दिलेली आपलीच लोक. यापासून जे काय शिल्लक राहिले ते रेशन दुकानदार यांनी लोक रेशन अन्न धान्य आणायला गेले की हीत सहि करा असे करुन आम्हाला दारिद्र्य रेषेखालील रेशनकार्ड याची गरज नाही रेशन अन्न धान्य या योजनेतून आम्ही बाहेर पडत आहोत. आमच्यापेक्षा गरिब लोकांना अन्न धान्य योजनेचा लाभ व्हावा या अर्जावर लोकानी केव्हा सह्या केल्या लोकाना कळलंच नाही. आणि पुढच्या महिन्यात रेशन अन्न धान्य बंद झाल आपण विचारणा केली असता. तुम्ही सह्या केल्या आहेत त्यामुळे तुमचं नाव दारिद्र्य रेषेखालील यादीतून वगळण्यात आले. अशी फसवी आणि उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. नाव वगळण्यासाठी सर्वे कधी झाला माहित नाही. मग नाव गेली कुठं ? 

            २००५ साली झालेल्या दारिद्र्य रेषेखालील सर्वे चां आधार घेऊन व तळागाळातून खरी आणि सापेक्ष माहिती आली असे ग्रहित धरुन केंद्र सरकारने *बेघर *ही संकल्पना अमलात आणली. बेघर म्हणजे ज्याला कोठेही त्याच्या नावावर जागा नाही. शेती नाही. शासकीय नोकरी नाही. त्याचे उत्पन्न मर्यादित आहे. अशा लोकांच्या साठी बेघर घरकुल योजना राबविण्यात आली. त्यानुसार. २५० चौ मिटर. घर. शासनाच्या निधीतून संबंधित ग्रामपंचायत नगरपालिका महानगरपालिका यांच्या देखरेखीखाली घरकुल पूर्ण तयार करून म्हणजे. हाॅल. बेड. किचन संडास बाथरुम. अशी रचना पूर्ण घर तयार करून लाभार्थी व्यक्तिंना देण्यात येते लाभार्थी व्यक्तिने फक्त जाऊन राहायचे आहे. त्यात प्रामुख्याने (१) प्रधान मंत्री आवास योजना (२) रमाई आवास योजना (३) राजीव गांधी ग्रामीण निवारा योजना (४) शबरि आवास योजना (५) इंदिरा आवास योजना (६) वाल्मिकी आवास योजना (७) अशा विविध योजना बेघर लोकांच्यासाठी राबविल्या जातात. त्यात प्रामुख्याने प्रधान मंत्री आवास योजना ही योजना केंद्र व राज्य सरकार यांच्या संगनमताने चालते. ज्यांच्याकडे घर बांधण्यासाठी जागा उपलब्ध आहे त्यांना. ३३० चौ मिटर बांधकाम करण्यासाठी अथवा घर दुरुस्ती करण्यासाठी बांधकाम करण्यासाठी. २५० लाख. व दुरुस्ती साठी. १५० लाख. अशा स्वरुपात घराचे बांधकाम टप्प्यात आले की टप्पे बघून संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केल्यानंतर अनुदान हप्ता वर्ग केला जातो. या योजनेत सुध्दा मोठ्या प्रमाणात बोगस प्रकार झाला आहे. ज्यांच्याकडे घर आहे त्यांनी सुध्दा याचा लाभ उचलला आहे. तर याउलट ज्यांचे बांधकाम पूर्ण झाले व्याजाने पैसे काढून. सगेसोयरे यांचेकडून उसने पासने करून. बॅक कर्ज काढून. त्यांचे आज घर पूर्ण आहे पण त्यांना घरकुल योजनेचा हप्ता अजून आला नाही. काही जणांनी चांगले राहते घर पाडले आणि भाड्याच्या घरात राहिले ते भाडे भरून मेले. तरि त्यांचे घर अपुरेच राहिले. म्हणजे घरकुल योजनेचा सर्वे करणारे यांची काहीतरी चूक होत आहे. 

      २००५ चा दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांचा सर्वे नुसार ज्या कुटुंबाकडे सवताचे जगाच्या पाठीवर कुठेही घर नाही यासाठी बेघर योजना राबविण्यात आली. आत्ता मल एक सांगा जगात कोठेही घर किंवा जागा नसणारा आभाळातून पडला पाहिजे. कारणं त्यांच्या वडिलाचे घर असेल जागा असेल शेत असेल ते वारसाहक्काने मुलाला मिळणारं मग तो बेघर कसा ? तो कोणत्या योजनेत बसतो ? मग योजना सुरू करताना शासनाचे काहितरी चुकले काय ? शासनाचा निर्णय बेघर वसाहतीत घर बांधण्यासाठी निर्णय आला. २००५ ला झालेला दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांचा सर्वे आपणास माहीत आहे कसा व कोणत्या निकषांवर झाला. मग काय प्रत्त्येक जण ज्याचे नाव दारिद्र्य रेषेखाली आहे तो बेघरासाठी अर्ज करायला लागले. ग्रामीण भागात सुध्दा घरकुल योजना सुरू झाली 

              बेघर वसाहत मधील घरे बांधून पूर्ण झाली. आत्ता याचे लोकार्पण करण्यासाठी नेते पुढारी यांचे राजकीय डाव रंगले आमच्या सत्तेत झाले आम्ही उद्घाटन करणार. मग. लकी ड्रॉ काढण्यात आला आणि फक्त गिलावा. दरवाजे नाही. फरशी नाही. संडास बाथरुम अपुरे पाणी नाही. लाईट नाही. अशी घर. १५०००/२०००० माणसी भरुन वितरित करण्यात आली. याला आपणच कारणीभूत आहोत कारणं शासन सांगत पूर्ण झालेली घरे ताब्यात द्या म्हणजे सर्व सोयी सुविधांनी युक्त असे. पण. मला मिळेल का ? तुला मिळेल ? मिळतय तवर घ्या बाकीचे सर्व काम आपण करू ? अशी आपली धारणा झाली. 

                अपूर्ण असणारी बेघर वसाहतीतील घरे लोकानी ताब्यात घेतली. आणि मग काय. उंची टप दराची फरशी. फॅन्सी दरवाजे. फॅन्सी कलर. पी ओ पी. अशी नजर न थांबण्यासारखी घरे काचची असल्यासारखी तयार केली. आज जर एकादा शासनाचा अधिकारी व कर्मचारी यांनी जर ह्या घरांचा सर्वे केला तर व शासनाचे सुध्दा डोळे उघडतील आणि २००५ साली काय गोलमाल झालं याचं पितळ उघडे पडेल. त्यातला एक वेगळाच प्रकार आहे तो म्हणजे बेघर वसाहती मध्ये असे काही लोक आहेत त्यांच्या नांवाने बेघर घरकुल वितरण झाले आहे पण आजतागायत ती व्यक्ति त्या घराकडे फिरवली सुध्दा नाही. काहीजणांनी तर आपल्याला मिळालेली बेघर घर चांगला मोबदला घेऊन विकली आहेत. काही जणांनी आपल्या बेघर घरकुल मध्ये भाडोत्री ठेवले आहेत. तर काहीजणांनी ना अर्ज ना शासनाची फी न भरता मिळेल तेथें आपले ठाण मांडून बसले आहेत कोण विचारणार. एका घरांत वडिलोपार्जित घर असून सुद्धा घरातील प्रत्येक सदस्याला बेघर घरकुल मध्ये घर आहे ते कसे ? म्हणजे घर तयार आहेत राहण्यास लोक नाहीत. असा झाला २००५ चा दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांचा सर्वे

          वरिल कोणत्याही प्रकाराबद्दल विचारणा केली असता आम्हाला असे सांगण्यात आले की २००५ चे आगोदर या लोकाची परस्थिती बिकट होती पण आत्ता ते सदन आहेत. त्यांना आत्ता बेघरांची गरज नाही तर यांच्याकडून. आत्ता सापेक्ष पणे सर्वे करून घर काढून घ्या. आज सुध्दा खरोखरच गरज असणारे लोक झोपडीत राहतात. असाच जर सर्वे होत राहिला तर आपण आणि आपला भारत कधीच झोपडपट्टी मुक्त होणार नाही.  

              शासनाला विनंती आहे की आपण आपल्या स्तरावर ज्या ज्या गावात तालुका जिल्हा यामध्ये बेघर वसाहती आहेत तेथें न भ्रष्टाचार करणारे अधिकारी व कर्मचारी याची नेमणूक करून सापेक्ष पणे सर्वे करून खरोखरच लाभार्थी असतील त्यांना बेघर घरकुल योजनेतून घर देण्यात यावे. 

     समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

म्हणा मी भारतीय

 


म्हणा मी भारतीय

           अनुसूचित जाती जमाती भटक्या विमुक्त जाती इतर मागासवर्गीय आदिवासी अल्पसंख्याक  बहुसंख्यांक   पांढरपेशा जाती. शेतकरी जाती. कष्टकरी जाती दलित हरिजन. उच्च वर्गीय. मध्यमवर्गीय. कनिष्ठ वर्गीय   श्रीमंत गरीब.   अशी विविध माध्यमातून आणि आपल्या भारतीय संस्कृतीत प्रत्त्येक व्यवसायावरुन कामावरून विविध जाती तयार झाल्या म्हणजे जातींचा तिढा आजचा नाही पहिल्यापासून आहे म्हणजे आपले जीवन आपले राजकारण समाजातील चाली रिती सामाजिक कार्यक्रम सणवार मंगल कार्य दहन दफन हे सर्व आपल्या जात वर्गवारी वरुन केले जातात. म्हणजे काही केले तरी जात वर्गवारी याची किड आपला पिच्छा सोडत नाही. शासन विविध योजना जाहीर करतय मग त्या समाजाच्या असोत. शैक्षणिक योजना आर्थिक सक्षमीकरण योजना संस्कृतीक.  अशा एक नाही अनेक योजना राबविल्या जातात पण त्यात सर्वात मोठा साप सोडला जातो तो म्हणजे मागासवर्गीय सुतगिरणी. अनुसूचित जाती जमाती सुत गिरण्या. मजूर सोसायट्या. विविध समाजासाठी आर्थिक योजना पण त्याला वर्गवारी ठरलेली आहे.  यामुळे गोरगरीब कुटुंबातील मुल जातीच्या तेढामुळे. त्यांना आज नोकरी नाही शैक्षणिक सवलती नाहीत. कोणताही लाभ घेण्यासाठी जातींचा दाखला नाही. यामुळे जात वर्गवारी रद्द करण्याची गरज आहे. आपणाला आपल्या जातीबद्दल गर्व आहे पण आज या मुद्द्याचा. बाजार मांडला आहे. राजकारण केले जात आहे. जातींचे भांडवल करून आपल्याला आपसात लढवले जात आहे म्हणजे योजना आहे कागदावर जातीच्या नावाखाली गोरगरीब मुल जातीच्या दाखल्या अभावी आज जगण्यासाठी व आपल्या कुटुंबांचे पालनपोषण. करण्यासाठी मिळेल ते काम करून जगत आहेत. ज्यांना या वर्गवारी लाभ घेण्यासाठी लागणारे जातीचे दाखले नेत्यांच्या बगलबच्चे यांना मिळतातं पण ज्यांना खरच गरज आहे त्यांना. 1967 चा पुरावा दाखवा. तुमच्या रक्ताच्या नात्यात कोणाचा जातीचा दाखला आहे का. आत्ता मला सांगा 1967चा काळ हा शिक्षणात मागास असेल त्यावेळी आमचें पूर्वज अडाणी अशिक्षित रानटी असल्यामुळे पोटासाठी हे गाव ते गाव फिरणारे होतें मग त्यांना कुठला जातीचा दाखला माहीत.  कसल असत जात प्रमाणपत्र. कोणता पुरावा आपणांस व आपल्या येणार्या पिढीला उपयोगी पडेल असे त्यांना माहीत होते का. म्हणून म्हणतो जात वर्गवारी रद्द करा आणि" मी भारतीय म्हणा. " आणि सर्व बिगर जातीच्या आधारावर मोकळे करा . "आरक्षण नको. " ज्या मुलांत धमक असेल तोच नोकरी मिळविल. 

            संविधानात कलम १५(४)!व १६(४) यांचा आधार घेऊन देशभरात ओबीसी समाजाला २७/टक्के शिक्षण व नोकरी देण्याचा निर्णय होते मात्र या धर्तीवर राजकीय आरक्षण दिले जाऊ शकत नाही. सामाजिक व शैक्षणिक मागासलेपण हे राजकीय मागासलेपणा पेक्षा वेगळे आहे. सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास समाज राजकीय दृष्ट्या मागासच आहे असे नाही. आणि आज जर हे सिद्ध करायचे असेल तर ओबीसी समकालीन वस्तुस्थिती अभ्यास करणे आणि माहिती घेणें महत्वाचे आहे राज्य सरकारने १९९४ साली ओबीसी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये २७/टक्के आरक्षण देताना कोणताही ठोस पुरावे नसल्यामुळे कागदोपत्री पुरावा सादर करता आला नाही. अशा पळवाटा काढून आपल्या डोळ्यात धूळफेक केली जात आहे. म्हणजे एका बाजूला योजना आणि दुसरीकडे जात वर्गवारीचे भांडवल करावयाचा प्रकार चालू आहे. म्हणून मी म्हणतो. "मी भारतीय म्हणा "

                  जात हा आपल्या सामाजिक वास्तवाचा एक भाग आहे. आपल्या समाजातील सर्वात मोठा घटक असलेला हिंदू समाज हा जातींचा मिळून बनलेला आहे. जातीशिवाय व्यक्तिचा विचार करणे आपल्याला सहसा जमत नाही. अशा जातीबद्द समाजात आपण राहत असल्याने आपल्या वैयक्तिक/खाजगी जीवनातही आपण आपले रागलोभ पूर्वग्रह आपल्या महत्वकांक्षा या सर्व बाबी जातीला जोडून घेतो. आपल्या घरगुती जीवनावर जातच नव्हे तर पोटजातीचाही प्रभाव असतो. आपण त्या त्या जातीच्या चालीरीती समजुती सणसंभारभ. धार्मिक विधी उपचार या सर्वांचे पालन करत जातो. आपल्या जातींचा. पोटजाती चां. जातपरंपरा आपल्याला सुप्त अभिमान असतो. आपली भाषा. आपले संस्कार यांच्यावर आपल्याही नकळत जात आणि पोटजाती प्रभाव असतो. समोर आलेल्या माणसाच्या जातीबद्दल/ पोटजाती बद्दल. आपल्याला जिज्ञासा असते. आपला समाज इतका जातीबद्द आहे की अनेक वेळा आडणावरुन समोरच्या व्यक्तीच्या जातींचा आपण अंदाज लावतो पण आपण भारतीय आहोत हे आपण विसरतो शिवाय समोरच्या माणसाला. "म्हणजे तुम्ही अमक्या जातींचे का"? असेही बरेचसे निःसंकोचपणे विचारतो विचारणारा आणि सांगणारे मनात जात पक्की घर करून बसली आहे. त्यामुळे यांत कोणाला फारसे गैर वाटत नाही. जसा मी अमक्या गावचा अमुक घराण्यातील. अमुक कुळातील.  तसाच सर्वात मोठा भाग म्हणजे मी अमुक एक जातींचा.  असे म्हणले वर त्या जातींचे वैशिष्ट्य त्यांच्यात असणारा हे धरूनच चालतो. स्वभाव वैशिष्टे संस्कार. चालीरीती. इतकेच काय दैवतांचे आपण जातवार वर्गवारी आपणच करतो याचाच अर्थ कमी-अधिक प्रमाणात आपण जातीच्या आणि पोटजाती यांची चौकट तयार करतो आपल्या अपेक्षा. नातेसंबंध. कुळधर्म. इत्यादी सर्व गोष्टी जातीच्या कोंदणात सीमित असतात. आपल्या समाजाची जातीच्या आधारें विभागणी झाली आहे जातीव्यवस्था ही आर्थिक स्तरावर अनुभवाला येते. 

          पूर्वीच्या काळात तर जातिनिहाय व्यवसाय परंपरा अस्तित्वात होती. आता आधुनिक काळात त्या परंपरेत खंड पडल्यासारखे दिसते. पण कोणत्या जातीचा आज कोणते व कशा प्रकारचे व्यवसाय करतात हे आपण पाहिले तर जातीच्या प्रभावाची आपणास कल्पना येईल     अंगमेहनतीचया किंवा शारीरिक कष्टाची कामामध्ये उच्च मानलेल्या जातीचे लोक सहसा आढळत नाहीत. ओझी वाहणे झाडलोट करणे. सफाई. धुणीभांडी करणे. या व्यवसाय करणारे लोक उच्च जातींचे समजले जात नाहीत. म्हणजे. "उच्च" व "पांढरपेशे " व्यवसाय यांचें एक समिकरण तयार झाले आहे. कचेरीत काम. टंकलेखन. कारकुन. पर्यवेक्षण. बॅंकिंग. व्यवस्थापन. शिक्षण. वैद्यकीय. व्यवसाय. "प्रतिष्ठेचे "चे व्यवसाय माणले जातात यात वरच्या जातींचा भरणा जास्त असतो. कौटुंबिक. सामाजिक वातावरणाचा परिणाम म्हणून आणि इतर घटकांमुळे या जातींचा कल अशा व्यवसायाकडे जास्त असतो. अशा व्यवसायात त्यांना संधीही जास्त मिळतात आणि त्याचा फायदा घेणेही या जातीच्या व्यक्तिंना सहज शक्य असते.  तसेच मध्यम जाती या प्रामुख्याने शेती व्यवसायाशी संलग्न असतात. त्यांच्याकडे बहुतेक वेळा जमीन मालकी असते. ग्रामीण अर्थव्यवस्था नेतृत्व त्यांच्याकडे असते.  शेती. सहकार.  शेतीवर आधारित उद्योग.  शेती विकास कामे. यांच्यामध्ये. "शेतकरी जाती " म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मध्यम जातींचा वरचष्मा असतो.  राहता राहिल्या मागासलेल्या जाती.  आपल्या समाजात त्यांना कनिष्ठ माणले जाते. त्यामुळे त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अडथळे येऊन त्या मागासलेल्या अवस्थेत राहिल्या  विशेषतः पूर्वी अस्पृश्य गणल्या जाती "दलित जाती " म्हणून ओळखल्या जातात.  भारताच्या राज्यघटनेही " अनुसूचित जाती" म्हणून अशा दलित जातींची स्वतंत्रपणे वर्गवारी केली आहे.  तेव्हा दलित जाती. भटक्या जाती जमाती.  इतर मागासवर्गीय जाती  यांच्या वाट्याला पांढरपेशे व्यवसाय फारसे येत नाहीत.  आणि त्यांच्याकडे जमीन मालकी नसते. मग त्यांच्या वाट्याला कोणती कामे येतात ? ग्रामीण भागातील शेतात मजुरी.  आणि शहरात अंगमेहनत कामे. कष्टाची कामे. नोकर्या कनिष्ठ स्तरावरील पदे यांवर या जातींना समाधान मानावे लागते. पांढरपेशा जाती शेतकरी जाती आणि कष्टकरी जाती अशी जात व्यवस्था आणि व्यवसाय यांची जुळणी झालेली दिसते. 

       जातीबद्दल बरेच काही बोलले जाते जातीमुळे होणार या अन्यायामुळे जातीव्यवस्था नष्ट व्हायला पाहिजे असेही मत आहे. जातीमुळे आप आपसात दुरावा निर्माण होतो  पण हे सर्व असुनही आपल्यापैकी बहुतेक जण जातीला चिटकवून राहतात. जात व जातींचे आचार सोडायला आपण फारसं उत्सुक नसतो कारणं आपल्यात व आपल्या डोक्यात असणारा जातींच भूत   मग जातीमुळे मग ती कोणतीही असो-काही फायदे मिळतात. असे आपल्याला वाटते.  उदा. जातीमुळे आपण बिरादरी यांच्याशी जोडतो.  उच्च जातीच्या जातीमुळे त्यांना प्राप्त होणारे श्रेष्ठत्व हा महत्वाचा भावनिक घटक असतो. परंपरा घराणेशाही वरच्या जातींचा माणूस आपण माणूस आपण श्रेष्ठ आहोत असे धरून चालतो. जातीमुळे माणसाला प्रतिष्ठा प्राप्त होते. उच्च जातींना उत्तम सुविधा चांगल्या संधी आणि प्रतिष्ठेचे व्यवसाय मिळतात. त्यांना करावा लागणारा संघर्ष व्यवहारिक फायदयामुळे बराचसा सुसह्य होतो. शेतकरी जातींना जमीन आणि तत्सम इतर लाभ. मिळतील अशी शक्यता यांच्यामुळे आपण जातींमध्ये अडकून पडतो.  जातीच्या अभियानातून आपला दृष्टिकोन आकार घेतो.  म्हणजेच स्वजातीय बद्दल आपल्याला जवळीक वाटू लागते आणि इतर जाती बद्दल आपण थोडे सांक्षाक बनतो.  उच्च जातीना त्यांच्या जात वर्गवारी मुळे बरेच फायदे मिळतात. पण जातिसंसथा असणारच ती धरमाचाच एक भाग असतो. यासारख्या अपसंमजामुळे इतर जातीसुधदा इतर जाती सुध्दा जातिवयसथेची चौकट मान्य करतात आणि करावी लागते 

          म्हणून"म्हणा मी भारतीय " त्याशिवाय आपल्या मुलांचे भवितव्य उजाळणार नाही. 

           समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा

  सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा            अनुसूचित जाती जमाती. इतर मागासवर्गीय जाती जमाती. भटक्या विमुक्त...

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या