Showing posts with label GOVERNMENT. Show all posts
Showing posts with label GOVERNMENT. Show all posts

धाड - आपले परिचयाचा शब्द

 


धाड 

      धाड - आपले परिचयाचा शब्द

 आपल्या परिचयाचे आहेत वरिल शब्द आपण वेळोवेळी वृतमानपत्रात वाचतो.की. पिकांवर टोळधाड आली आहे. म्हणजे. धाड म्हणजे एखाद्या विषयांचा सुपडासाप करण्यासाठी तयार करण्यात आलेले एक. संरक्षण कवच असे म्हणता येईल. आपल्या आजूबाजूला बघतो. अमुक येथे तमुक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रेड टाकली धाड घातली. विविध विभागात ठराविक अधिकारी व कर्मचारी यांना अधिकार देवून नेमले आहेत 

              जुगार. दारु भट्टी. मद्यविक्री केंद्र. रेशन विभाग. ग्रामपंचायत. नगरपरिषद. महानगरपालिका. तहसिलदार कार्यालय. पंचायत समिती. जिल्हा परिषद. कामगार विभाग. पाणी पुरवठा. सार्वजनिक बांधकाम विभाग. जलसंधारण विभाग. कृषी विभाग. कृषी उत्पन्न बाजार समिती. आठवडा बाजार. महावितरण कंपन्या. औद्योगिक विकास. विविध कल्याणकारी मंडळ. विविध कर्ज पुरवठा करणारी मंडळे. एस टी महामंडळ. वेश्याव्यवसाय ठिकाणे. विविध सामाजिक अनुदानित विनाअनुदानित संस्था. अन्न व औषध प्रशासन विभाग बालमजुरी. आश्रमशाळा. बेघर निवारा केंद्र. अशी एक नाही अनेक ठिकाणी शासनाला. कोणताही गैरप्रकार घडत असल्याची बातमी लागल्यास त्या प्रकाराचया विरोधात धाड. रेड. धागा. चौकशी करून सदर अहवाल शासनाकडे दाखल करणे बंधनकारक असते

                  शासनामार्फत देण्यात येणार्या विविध लोक उपयोगी सेवा सुविधा. योजना. त्याचे कार्य. कालमर्यादा. मालाचा दर्जा. त्यासाठी असणार्या तक्रारी. निवेदन. यांचे निवारण करण्याची पध्दती यांबाबत माहीती. प्रचार प्रसार जाहिरात. जनप्रबोधन. जनकल्याण. व्हावे यासाठी शासनाने ३/२/२००८ रोजी नागरि सनद तयार केली त्यानुसार प्रत्त्येक शासकीय निमशासकीय अनुदानित विनाअनुदानित संस्था यामध्ये चालणारे काम त्याचा आढावा निकष माहिती करून घेण्यासाठी सनद तयार करण्यात आली आहे. त्यामुळे प्रशासन अधिक लोकाभिमुख पारदर्शी व अधिक बळकट होईल शासकीय सेवा यामधील अधिकारी व कर्मचारी यांच्या व्यवहारात बदल होईल. अशी अपेक्षा जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा. ग्राहक संरक्षण हित. वजन मांपे कायद्याची अंमलबजावणी शेतकरयांना हमी भाव ग्राहकांना सुरक्षित व निश्चित दरात अन्न धान्य व वस्तू वितरण व्हावे. यात नागरिकांचा सहभाग मिळवून सदर कामाच्या अधिक प्रभावी व पारदर्शक अंमलबजावणी दृष्टीने या नागरि संसदेतील निश्चित माहिती उपयोगी ठरेल 

            माहिती अधिकार कायदा २००५ अमलात आणण्याचा उद्देश एवढाच आहे की सर्वसामान्य माणसाला सर्व शासकीय निमशासकीय कार्यालये यातील कामकाज जाणून घेणे हे आहे. पण तसं होत नाही. कारण माहिती अधिकार दाखल करणार्या व्यक्तिवर प्राणघातक हल्ले. होत आहेत. दमदाटी देणें. जीवे मारण्याची धमकी देणें. 

            आज सर्वच क्षेत्रात काळाबाजार. भ्रष्टाचार चालूच आहे. अधिकारी व कर्मचारी ठराविक दलाल एजंट यांना हाताला धरून सर्वसामान्य जनतेची कामे करत आहेत त्यातच. सर्वसामान्य माणसाला योजना माहीत नाही. आपल्यासाठी शासनाने काय केले आहे हे सुद्धा माहित नाही. प्रत्त्येक शासकीय विभागाला. योजना संबधी प्रचार प्रसार जाहिरात करण्यासाठी शासन एक ठराविक रक्कम देतय पण आज कुठेही. मेळावे. वृतमापत्र जाहिरात. बॅनर. पत्रक. यासाठी लाखों रुपये शासन खर्च करतय मग आपल्याला माहीती कळतच नाही.  

      प्रशासनाने. यासाठी. सापेक्ष पणे कोणताही भेदभाव न करणारे अधिकारी व कर्मचारी नेमून. जागोजागी. धाड. रेड. चौकशी करण्यासाठी टिम नेमणे गरजेचे आहे. नेमण्यात येणारे अधिकारी. लाच न घेणारे असावेत. नसेल तर एखादी सेवाभावी संस्था युनियन. यातील विश्वास पात्र लोकांना हा अधिकार देण्यात यावा. कारणं यांच कोणासी लागेबांधे नसणार आहेत. आपणांस मिळणारा अहवाल स्वच्छ व बिगर पक्षपाती पणाने मिळणारं आहे. 

          धाड. घातली तर त्यासाठी शासनाने सर्वसामान्य जनतेची मदत घ्यावी. चौकशी यांचेजवळ करावी. 

          समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

आपले शासकीय कार्यालय निरीक्षण व सूची

 


आपले शासकीय कार्यालय निरीक्षण व सूची

                     नागरिकांनी शासकीय कार्यालयांची निरीक्षण करताना अवलंबयाची सूची रोज कोणत्याना कोणत्या शासकीय कार्यालयाशी आपला संपर्क येतोच पण कार्यालय उघडण्याची वेळ अधिकारी व कर्मचारी आपल्या पदानुसान नोकरी वर येण्याची वेळ. कार्यालयात कोण कोणत्या सेवा सुविधा भारतीय नागरिक या नात्याने आपणास शासनाने दिल्या पाहिजेत याबाबत आपणास माहीती असणे गरजेचे आहे. आणि तो आपला अधिकार आहे खालील प्रमाणे आपल्या गावात तालुका जिल्हा राज्य देश येथील शासकीय कार्यालयात अंमलबजावणी केली जाते का ? आजच आपल्या नजिकच्या शासकीय कार्यालयात जाऊन बघा 

(१) नाव. व पत्ता

_-____________________

_______________________

(२) कार्यालयाचे नाव

_______________________

_______________________

(३) शासकीय वेळ ९/४५ सकाळी उशीर १० मी= ९ / ५५ वा सकाळी

(४) निर्धारित वेळेत उपस्थिती / अधिकारी व कर्मचारी संख्या = 

(५) लेटमारक वेळेत उपस्थिती अधिकारी व कर्मचारी संख्या

(६) रजेवर असणारे अधिकारी व कर्मचारी संख्या 

(७) नागरिकांची सनद आहे किंवा

(८) माहिती अधिकाकाराचे बोर्ड आहेत किंवा नाहीत

(९) नोटीस बोर्ड आहे किंवा नाही

(१०) तक्रार पुस्तिका ठेवली आहे किंवा नाही

(११) नागरिकांच्या साठी पिण्याच्या पाण्याची सोय आहे किंवा नाही

(१२) बैठक व्यवस्था आहे किंवा नाही

(१३) फायर सिलिंडर नूतनीकरण केले आहे किंवा नाही

(१४) प्राथमिक उपचार पेटी आहे किंवा नाही

(१५) साधी प्रलंबित प्रकरणे किती आहेत

(१६) अरधनयायीक प्रलंबित प्रकरणे

(१७) आवक टपाल संख्या

(१८) जावक टपाल संख्या

(१९) कार्यालयात स्वच्छता आहे किंवा नाही

(२०) प्रसाधन गृह स्वच्छ आहे किंवा नाही

(२१) महिलांच्या विषयी लैंगिक अत्याचार समिती बोर्ड आहे किंवा नाही

(२२) सेवा पुस्तिका व गोपनीय अहवाल लिहिले आहेत किंवा कसे

(२३) अधिकारी व कर्मचारी यांनी ओळखपत्र परिधान केलेलयाची संख्या

(२४) तक्रार पेटी आहे किंवा नाही

(२५) माहिती अधिकारातील कलम ४ मधील १ ते १७ मुद्द्यांची माहिती लावली आहे किंवा नाही

(२६) काम करत असलेले अंशकालीन कर्मचारी यांची संख्या

(२७) मोबाईलवर व्यस्त असणारे लोकसेवकाची संख्या कारयासन नुसार

(२८) कार्यालयाचा मेल आय डी व संपर्क क्र बोर्ड आहेत किंवा नाहीत

(२९) आपले सरकार पोर्टल वरिल प्राप्त तक्रारी संख्या

(३०) अशिक्षितासाठी मदतनीस आहेत किंवा नाहीत

(३१) वर्तणूक बाबत शेरा चांगली बरी अतिउतकृषट खराब वाईट. एकदम वाईट

(३२) व्यक्तिगत अर्जाची स्थिती बाबत दिनांक व त्यावरील कारवाई

(३३) नागरिकांसाठी योजना बोर्ड

(३४) लाभार्थी यादी

(३५) लाभार्थी निकष तक्ता

(३६) वार्षिक लेखा परीक्षण अहवाल

(३७) कार्यालयास प्राप्त अनुदान

(३८) अनुदान विनियोग तक्ता

(३९) निलंबित कर्मचारी व अधिकारी यांची संख्या

(४०) लाचलुचपत विरोधी सापळा प्रकरणांवर मंजुरी

(४१) कार्यालयीन प्रमुखाकडे प्रलंबित प्रकरणे संख्या

जिल्हाधिकारी / निवासी उपजिल्हाधिकारी / प्रांत आॅफिस/ तहसिलदार/नायब तहसीलदार / मंडल अधिकारी/ तलाठी

(४२) माहिती अधिकार दिन साजरा केला जातो किंवा नाही

(४३) वार्षिक विवरण पत्र जमा केलेल्या कर्मचारी संख्या

(४४) वार्षिक विवरण पत्र जमा न केलेलें कर्मचारी संख्या

(४५) ३ अपत्या बाबतचे विवरण पत्र स्टॅम्प

(४६) मासिक मिटींग मध्ये चर्चा झालेले विषय सूची

(४७) फायर आॅडट रिपोर्ट

(४८) माहिती अधिकार अधिनियम २००५ मधील कलम ४(१/१७) मुद्द्यांची माहिती मागील १० वर्षांची

(४९) लोकशाही दिनात समाविष्ट प्रकरणे व निकाली प्रकरणे

(५०) म. से. व. नियम १९७९ कलम १९ मोठ्या रक्कमेची वस्तू खरेदीसाठी वरिष्ठांची परवानगी प्रकरणे

(५१) अभ्यास दौरे याबाबत कार्यालयीन टिप्पणी

(५२) माहिती अधिकारांचे प्रशिक्षित अधिकारी/ कर्मचारी संख्या

(५३) शासनाच्या शासकीय वाहनांचे लाॅगबुक (प्रवासाची रोजनिशी) 

(५४) शासकीय इमारत देखभाल दुरुस्ती /वस्तू खरेदी साठी मंजुरी प्रकरणे व खर्च तपशील

(५५) शासकीय वाहनानुसार मेंटेनन्स दर्शविणारे रजिस्टर

(५६) शासकीय वाहनांचे काम संपलेवर पार्किंग कुठं होते

(५७) सर्वात महत्त्वाचे हालचाल रजिस्टर नोंदी

(५८) प्रत्त्येक कर्मचाऱ्यांची पात्रते प्रमाणे आसन व्यवस्था आहे का? 

(५९) कंत्राटी कामगार संख्या. आणि त्यांची वेतन व्यवस्था काय कामाच्या जबाबदार्या

(६०) शासकीय कर्मचारी यांची दैनंदिन तपशील

(६१) डेड सटाॅक रजिस्टर

(६२) कपाटे खुर्ची कॅमपुटर. बयानर. कपाटे 

(६३) धनादेश नोंदवही

(६४) जात वैधता पडताळणी प्रमाणपत्र नोद वही 

(६५) डाक मुद्रांक मागणी तपशील व वापरलेले मुद्रांक नोंदवही

(६६) लोकसभा विधानसभा राज्य सभा. विधानसभेस तारांकीत प्रश्न उत्तरे तपशील

(६७) समित्या नेमणूक व त्यांचे निकष

(६८) समिती सदस्यांची नावे व त्यांनी दाखल केलेली कागदपत्रे

(६९) समित्यांच्या बैठका तपशील व इतिवृत्त पुस्तिका

(७०) मुदतीनंतर नष्ट केलेल्या कागदपत्रांची यादी

(७१) वार्षिक टेंडर ( निविदा ) व प्रकिया नोंदवही व निकष

(७२) वार्षिक मंजूर निविदाची यादी व त्याचा देखभाल दुरुस्ती कालावधी

(७३) अमानत रक्कम नोंदवही

(७४) शासकीय समारंभ व त्याचा खर्चाचा तपशील 

             वरील प्रमाणे सर्व शासनाने शासकीय कार्यालय सुरू करताना कोणत्या पध्दतीत राबविणे अंमलबजावणी. केली पाहिजे ते तत्व घालून दिले आहे आपण शासकीय कार्यालयात जातो बघतो आणि न आपले काम करताच येतो 

            समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५८

आपल्या गावात तालुका जिल्हा राज्य देश यामध्ये आत्ता आपल्या अर्थव्यवस्थेची महत्वाची बाब समजली जाणारी ती म्हणजे रस्ते विकास

आपल्या तालुक्यात चालू असणारे सार्वजनिक बांधकाम विभाग यांचेमार्फत रस्त्यांची कामे यांची माहिती विचारा

चालू रस्त्याचे काम पद्धत. अनुदानित रक्कम. कोणत्या योजनेतून रस्ता काम चालू. ठेकेदार इंजिनिअर नाव. दोष आणि दायित्व कालावधी. ही माहिती आजच माहिती अधिकार दाखल करून मागवा

तहसिलदार कार्यालयात खालील प्रमाणे कामकाज चालते

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=8918e3ebc1d8b81261ae6dde0667357dhttps://shooterconsultationcart.com/azp33ctwgz?key=f5e461ccbeb850c3df0b07f34593b0c2

 तहसिलदार कार्यालयात खालील प्रमाणे कामकाज चालते

      महत्वाचे कामकाज



(१) अधिनसत कर्मचारी वर्ग मंडळ अधिकारी तलाठी कोतवाल इ कामकाज नियंत्रण व पर्यवेक्षण

(२) ग्रामीण महसुली विभागांचे पर्यवेक्षक

(३)! महसूल अधिकारी म्हणून महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ अन्वये कर्तव्य आणि कार्य पार पाडणे

(४)! पैसा कागदपत्रे वगैरे बाबतीची मागणी संबंधित इसमाला कळविणे म ज म अ कलम १७

(५) शासकीय पैसा वसुली मागणी प्रमाणे वसुली करणे ( म ज म अ कलम १८)

(६)!शेतीचे प्रयोजनासाठी शासकीय जमीनीबाबत प्रस्ताव करणे ( म ज म अ कलम २०/३१ ) 

(७) शासकीय जमीनीवरिल झाडे आणि इतर नैसर्गिक उत्पन्न बाबत कार्यवाही ( म ज म अ कलम २३/२४/२५)

(८) सोडून दिलेल्या किंवा जप्त केलेल्या पोटविभागाची विल्हेवाट ( म ज म अ कलम ३५)

(९) जमीनीचा उपयोग एका प्रयोजनातून दुसर्या प्रयोजनात रुपांतर करणे ( म ज म अ कलम ४४)

(१०) अवैध गौण खनिज उत्खनन कारवाई करणे ( म ज म अ कलम ४८) 

(११) शासकीय भूखंडावरील अतिक्रमण पाडणयाबाबची कार्यवाही (म ज म अ कलम ५०/५१ )

(१२) शासकीय भूखंडावरील अनाधिकृत ताबा असलेल्या इसमास काढून टाकणे ( म ज म अ कलम ५९)

(१३) शासकीय भूखंडावरील अनाधिकृत ताबा असणारा काढून सदर मिळकत सरकार जमा करणे ( म ज म अ कलम ५४)

(१४) हस्तांतरित अयोग्य वहिवाट प्रमाणपत्राची कारवाई करणे (म ज म अ कलम ६१) 

(१५) जप्त केलेलीं जमीन ताब्यात घेणे त्यांचा विनियोग करणे ( म ज म अ कलम ७३) 

(१६) धारण जमिनीतीचे विभाजन करणे ( म ज म अ कलम ८५) 

(१७) भुमापन क्रमांकाच्या किंवा पोटविभागाचया हद्द आखणी करणे (म ज म अ कलम १३६)

(१८) भुमापन क्रमांकाच्या आणि गावाच्या हद्दीत निशाण्या लावणे व दुरुस्त करणे ( म ज म अ कलम १३९/१४१)

(१९) दंडणीय कारवाई करणे (म ज म म अ कलम १५२) 

(२०) हस्तलिखित प्रमादाची दुरुस्ती करणे ( म ज म अ कलम १५५) 

(२१) जमीन महसूल थकबाकी करणार्या विरोधात कारवाई करणे ( म ज म अ कलम १७४ )

(२२) शेतसारा रक्कम जमीन महसूलाची थकबाकी म्हणून वसुल करणे ( म ज म अ कलम १७६)

(२३) स्थावर मालमत्ता विक्री संबंधित उद्घोषणा व लेखी नोटीस काढणे ( म ज म अ कलम १९७)

(२४) कसूर करणाऱ्या व्यक्तिची जंगम मालमत्ता अटकाव व विक्री करणे ( म ज म अ कलम १८०)

(२५) कसूर करणाऱ्या व्यक्तिची मालमत्ता विक्री करणे ( म ज म अ कलम १८१) 

(२६) कसूर करणाऱ्या व्यक्तिची जंगम स्थावर मालमत्ता जप्त करण्याच्या आणि ती वयवसथेखाली घेणे ( म ज म अ कलम १८२) 

(२७) स्थावर व जंगम मालमत्ता विक्री विषयी उद्घोषणा करणे (म ज म अ कलम १९२/१९३) 

(२८) जप्त केलेल्या मालमत्तेविषयी दावे निकालात काढणे ( म ज म अ कलम २१८)

 अन्न व नागरी पुरवठा कामकाज बाबतीत तहसिलदार

(१) तालुका स्तरावरील नियंत्रण

(२) अन्न धान्य साठवण व वितरण

(३) रास्त भाव दुकाने व अन्य जीवनावश्यक वस्तू विषयक कामकाज

(४) उपकोषागार अधिनियम नुसार दरमहा मुद्रांक व अन्य किंमती कागदपत्रे याबाबतीत कोषागार कार्यालयांची तपासणी करणे

(५) सब जेल मनयुअल नुसार सब जेल अधिक्षक म्हणून कामकाज पाहणे 

   अर्ध न्यायिक कामकाज तहसिलदार

(१) कुळ वहिवाट व शेतजमीन कायदे अन्वये कामकाज

(२) मामलेदार न्यायालय अधिनियम १९०६ अन्वये कामकाज

(३) महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ अन्वये चौकशी कामकाज

  * कार्यकारी दंडाधिकारी नात्याचे तहसिलदार *

(१) फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ कलम ६ मध्ये फौजदारी न्यायालयाचे जे वर्ग नमूद केलेलें आहेत त्यात ( कार्यकारी दंडाधिकारी ) यांच्या न्यायालयाचा समावेश होतों या अन्वये कार्यकारी दंडाधिकारी यांचें न्यायालय हे फौजदारी न्यायालय आहे कार्यकारी दंडाधिकारी यांच्या स्थानिक अधिकारितेत अपराध येत असेल तर फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ कलम ४४ अन्वये कार्यकारी दंडाधिकारी यांना अशा अपराध करणार्यांना अटक करण्याचे अधिकार आहेत खालील विविध कायद्यानुसार तहसिलदार यांना अर्ध न्यायिक कामकाज पार पाडावे लागते

(१) फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ कलम १०७ते ११०/१३३/१४४/१७४/ चया तरतुदी अन्वये कामकाज

(२) उच्च न्यायालय क्रिमिनल मॅन्युअल अन्वये प्रतिज्ञा पत्र मृत्यूपूर्वी जबानी घेणे मृत्यू कारणांचा पंचनामा करणे ओळख परेड घेणे इत्यादी

(३) कार्यकारी दंडाधिकारी या नात्याने तालुक्यात कायदा आणि सुव्यवस्था राखणे

(४) असामाजिक तत्वावर लक्ष वेधून त्यांच्या हालचाली विषयीं माहिती मिळविणे

(५) शांतता समितीच्या बैठका घेणे व विविध सण उत्सव प्रसंगी कायदा व सुव्यवस्था हाताळणे

   इतर कामकाज

(१) तालुका स्तरावर राज्य शासन व केंद्र शासनाच्या विविध योजना व कार्यक्रम आयोजित तहसिलदार समन्वय व अंमलबजावणी अधिकारी असल्यामुळे त्यांना खालील कर्तव्य पार पाडावी लागतात

(१) ग्रामीण रोजगार हमी योजना

(२) विविध शासकीय विभाग समन्वय व शासकीय योजना अंमलबजावणी करणे आढावा घेणे

(३) जनगणना. कृषी गणना. पशु गणना. रोगराई निवारण कामांचे नियोजन

(४) लोकसभा. विधानसभा. विधानपरिषद. जिल्हा परिषद. पंचायत समिती. नगरपरिषद. ग्रामपंचायत. विरनीषट सहकारी संस्था निवडणुकां पोट निवडणूक विषयी कामकाज

(५) तालुका स्तरावर विविध समित्या अध्यक्ष सचिव सदस्य म्हणून कामकाज पाहणे

(६) कारयशेत्रात अतिमहत्वाच्या व्यक्तिच्या व्यक्ति यांचें दौरे दरम्यान राजशिष्टाचार विषयी कामकाज पाहणे

 *तहसिलदार यांचे अधिनसथ खालील प्रमाणे अधिकारी व कर्मचारी वृंद असून त्यांचे मार्फत खालील प्रमाणे कर्तव्य / कामकाज पार पाडले जाते

 (१) नायब तहसिलदार

 (२) अव्वल कारकून

 (३) मंडळ अधिकारी

 (४) तलाठी

 (५) शिपाई

  (६) कोतवाल

आपणास माहीत असणे गरजेचे आहे कि आपल्या तालुक्यातील तहसिलदार कार्यालयात वरिल प्रमाणे कामकाज चालते

        वरील प्रमाणे समाजसेवा उठाव बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी विविध गाव तालुका जिल्हा राज्य देश यातून पदाधिकारी नेमणे आहे तरी इच्छुक व्यक्ति तरुण यांनी खालील नंबरवर संपर्क साधावा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

९८८०८२५८५९





वाचा -

आजची शिक्षणपद्धती आणि आपण- education..

आत्ता वाचणार वेळ आणि पैसा - MONEY AND TIME SAVING ...

शासनाचा सर्वात मोठा निर्णय...

कायदा माझ्या भारतीय घटनेचा - ..

शासनाचा सर्वात मोठा निर्णय

https://shooterconsultationcart.com/azp33ctwgz?key=f5e461ccbeb850c3df0b07f34593b0c2

 शासनाचा सर्वात मोठा निर्णय



       दिव्याग व्यक्ति यांना मिळाला न्याय प्रत्त्येक दिव्याग व्यक्तीला मिळणार शिधापत्रिका .

               दिव्याग व्यक्ति समाजात एक सहानुभूतीने विचार करण्याचा वर्ग आहे . तीन चाकी सायकल , पाटावरून , कुबड्या , घेऊन चालणारे . काठीच्या आधाराने , कृत्रिम अवयव , वापरुन आपली कामे करणारे . मदतीसाठी दुसर्याची वाट केवीलवाने चेहरे करून बघताना आपणास दिसतात . आधार कार्ड नोंदणी , सर्कल चौकशी , तहसिलदार कार्यालयात पेन्शन , योजना , यासाठी आॅफिस मध्ये चौकशी करणेसाठी जाता येत नाही .

                बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर चे वतीने वेळोवेळी निवेदने व संदेश पाठवून दिव्याग व्यक्तिच्या अडचणी मांडल्या आहेत . पण कोणत्याही कार्यालयाने याचा विचार केला नाही . त्यांना अधिकारी व कर्मचारी यांना भेटण्यास जाता येत नाही . तर प्रत्त्येक दिव्याग कल्याणकारी आॅफिस मध्ये , दिव्याग सहाय्यता करणेसाठी एक एक कर्मचारी नेमण्यात यावेत .

             शासनाने या सर्व गोष्टींचा अभ्यास करून व सर्वे करून दिव्याग लोकांना काही काम धंदा करता येत नाही . म्हणून त्यांचा अन्न , धान्य याचा प्रश्न सुटावा यासाठी अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांचेकडून वेळोवेळी म्हणजे .

         दि. ५-११-१९९९

         दि. ८-८-२००१

        दि . २५-५-२००५

        दि . २९ जून २०१३

        दि. १७ डिसेंबर २०१३

        दि .२१ डिसेंबर २०२०


          अन्न सुरक्षा अधिनियम अंतर्गत २०१३ नुसार ग्रामीण भागात (४ लाख ६ हजार ९७१ ) शहरातील लोकांच्या साठी (२ लाख ३०हजार ४५ ) अशी एकूण (७ लाख १६ ) लाभार्थी संख्या निश्चित केली आहे . अंत्योदय योजना, बीपीएल , सर्व दिव्याग व्यक्तिचा समावेश करणेसाठी १ फेब्रुवारी २०१४ नुसार सर्व राज्यांत अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत .

             अन्न सुरक्षा कायदा २०१३ नुसार अन्न धान्य याचा लाभ मिळवण्यासाठी ज्या दिव्याग व्यक्तिंना रेशनकार्ड हवे आहे . अशा सर्व दिव्याग बांधवांनी संबंधित कार्यालयात नवीन रेशनकार्ड मिळणे साठी अर्ज करावा .दिव्याग व्यक्ति कडून नवीन शिधापत्रिकेसाठी अर्ज प्राप्त झाल्यानंतर शासनाने निश्चित केल्याप्रमाणे पात्र दिव्याग व्यक्तिंना नवीन शिधापत्रिका वितरण करण्यात यावे , व त्यांच्या समावेश प्रधान लाभार्थी कुटुंब योजनेत त्वरित करण्यात यावा अशी तरतूद शासन निर्णयानुसार करण्यात आली आहे .

             तरी सर्व दिव्याग बांधवांनी आपल्या जवळच्या तहसिलदार कार्यालय येथील पुरवठा विभागासी आजच संपर्क साधावा . काही अडचण आल्यास खालील नंबरवर फोन करा .


    बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर ,

  संस्थापक अध्यक्ष :- अहमद नबीलाल मुंडे .



    रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा.

    रेशन कृती समिती सांगली जिल्हा

    मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा .

    माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा.

९८९०८२५८५९


प्रचार व प्रसार समाजसेवा जनप्रबोधन ,वाचन ,लेखन संबोधन, प्रबोधन, आणि नेतृत्व करणेसाठी आपल्या गावात तालुका , जिल्हा , राज्य , येथून पदाधिकारी नेमणे आहे .

   तरी इच्छुक उमेदवारांनी आधार कार्ड झेरॉक्स , एक फोटो व कागदपत्रांच्या माहीती व आमचें कामा संदर्भात माहिती घेणे साठी वरिल फोन नंबर वर फोन करून संपर्क साधावा .





वाचा -

कायदा माझ्या भारतीय घटनेचा -

अन्न धान्य वितरण आणि कायदा - FOOD ...

लूट आणि फक्त लूट - अहमद मुंडे ...

खाद्य तेलावर अन्न प्रशासन ची धाड- FDA MUMBAI...

सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा

  सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा            अनुसूचित जाती जमाती. इतर मागासवर्गीय जाती जमाती. भटक्या विमुक्त...

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या