Showing posts with label सांगली. Show all posts
Showing posts with label सांगली. Show all posts

काय झालं आंबेघरच

 


काय झालं आंबेघरच

                  सांगली. सातारा कोल्हापूर जिल्ह्यात जुलै महिन्यात बर्याच ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस झाला होता. पाऊस एवढा जोरात होता की लोकांना आपले. जीवनावश्यक वस्तू. महत्वाची कागदपत्रे. मुल बाळ महिला. महतारे आई वडील. प्रमाणापेक्षा प्रिय असणारी जनावरें यांना सुध्दा सावरण्याचा किंवा सुरक्षित ठिकाणी हालवणयाचा वेळ सुद्धा मिळाला नाही. या पूराचा तडाखा एवढा जोरात होता की २००५/ २०१९ पेक्षा जास्त होता. कोल्हापूर मध्ये. १३ गाव. सांगली २७ गाव आणि उर्वरित ५४ गाव या गावात जनावरे. मृत्यू. माणसाची हालपेषटा. हजारों एककर शेती जमीन पाण्याखाली गेली. हातातोंडाशी आलेली पिकें पूराचया पाण्यात बुडलयाने. नुकसान झाले आपल्या भागातील सर्वात मोठी धरणे म्हणजे कोयणा. चांदोली. या धरण क्षेत्रात सतत पडणाऱ्या पावसामुळे धरणांची पाणी पातळी झपाट्याने वाढली आणि लोकांचा जीव धोक्यात आला 

              यात आपलं सुध्दा चुकत कारणं एक महिना अगोदर प्रत्येक जिल्ह्यातील मा जिल्हाधिकारी सो यांनी पूराने पिडीत असणार्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला होता पण आपण त्याकडे दुर्लक्ष केले होते पूराचे पाणी आपल्या गावात आले गावातून आपल्या घरांत घुसले. जनावरांच्या गोठ्यात घुसल्यावर आपण सर्वजण धावाधाव करतो म्हणजे आपली आणि आपल्या कुटुंबाची जनावरांची जास्त काळजी शासन करतंय आणि आपण निष्काळजी आहोंत आणि मग शासनाने आमच्यासाठी काय केले म्हणत बसताय. भूखसंकलन या घटना वेळोवेळी घडतात. घाटातील दरड कोसळणे. डोंगराला भेगा पडणे. पुल तुटणे. बंधारे वाहून जाणे. शेतात पाणी येणे. विविध इंटरनेट कंपन्या बीसनल जिओ. एअरटेल. वहिआयवी अशा विविध कंपन्यांचे मोबाईल इंटरनेट बंद पडले. त्यामुळे कोणाकडे संपर्क करण्याचा प्रश्नच मिटला. त्यात प्रामुख्याने लाईट नसणं हे आपणांस माहीत आहे. यामुळे पाणी समस्या. पाण्यासाठी वणवण भटकावे लागते. लाईट नसल्यामुळे पेट्रोल डिझेल पंप बंद. यामुळे परगावाहून मालवाहतूक करणारे वाहने. त्यामुळे जनजीवन विस्कळित होते. पूर येवून गेल्यावर होणारी घाण. मयत जनावरें. कुत्री मांजरे उंदीर घुशी. साप यामधून येणारी दूरगंधी पसरणारी रोगराई पूरग्रस्त भागाचा दौरा करणारे आमदार खासदार मंत्री पुढारी नेते हे हेलिकॉप्टर मधून खाली सुध्दा उतरत नाहीत. आणि सर्वात मोठी आत्ता फॅशन झाली आहे ती म्हणजे फोटो सेकसन करण्याची आम्ही पूरग्रस्त भागाची पाहणी केली भेट दिली आणि मदत करण्याचे आश्वासन दिले. प्रत्यक्ष मदत कुठ आहे. शासनाने पुरग्रसत भागात दहा किलो गहू. दहा किलो तांदूळ पाच लिटर केरोसीन. देण्याची घोषणा केली. पण खरोखरच गरज असणार्या लोकांना ते मिळाले का ? कोणाला मिळाले कोणाला नाही ? सर्व लोकांनी मागणी करण्याची गरज आहे गावातील चोरांनी हा सर्वसामान्य माणसाला आलेली मदत लाटली. 

                आमचा पाटण तालुका. थोर समाजसुधारक लोकनेते क्रांतिकारक. कोकणाचे तोंड माणले जाणारा आमचा पाटण तालुका. येथील लोकनेते बाळासाहेब देसाई सर्वात मोठा दानधर्म करण्याचा वारसा असणारे नेते. दुष्काळ पडला मोठा. त्यात सुध्दा आपल्या धान्य गोदामाची दारे जनतेसाठी खुले करणारे लोकनेते बाळासाहेब देसाई कोयनेत मोठा भुकंप झाला लोकाची घरं पडली. मोठ्याप्रमाणात नुकसान झाले लोक रस्त्यावर आली. डोक्यावरचे छप्पर उडून गेलं त्यामुळे लोक हवालदिल झाले होते त्यावेळी घरासाठी लागणारे साहित्य देणारे लोकनेते बाळासाहेब देसाई हेच होतें. पाटण तालुका म्हणलं की डोंगराळ भाग. कोकणी लोक मनमोकळ्या स्वभावाचे. माफक शेती. भात शेंगा नाचणी वरी. अशी पावसावर अवलंबून असणारी पिकें घेणारे. शेती शिवाय दुसरा व्यवसाय नाही 

              पाटण तालुक्यातील आंबेघर तर्फे मरळी येथे डोंगराखाली वसलेले एक गाव म्हणजे आंबेघर. कोकण म्हणलं की जोरात पाऊस जुलै महिन्यात असाच ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. एवढा मोठा पाऊस होता की कोयना धरणाजवळील पाणी पातळी उंची ५४ फूटावर पोहोचली. पाऊसाने कहर केला आणि डोंगरा शेजारी असणारे आंबेघर गावाजवळ असणारा डोंगर भुसंखलन झाले आणि बघता बघता आंबेघर हे गाव ढिगारयाखाली आलें आज असणारे गाव उद्या तिथे नाही काय वाटल असेल. आणि आलेल्या ढिगारयाखाली लोक अडकून पडली अक्षरशः लोकांचा जीव गुदमरून तडफडून मृत्यू झाला. उभा पाऊस असल्यामुळे घटनास्थळी कोणीही गेले नाही

              अतिवृष्टी हाहाकार उडविलेलया जनतेला शनिवारी काहीसा दिलासा मिळाला. पावसाने उघडीप दिली आणि कृष्णा कोयना यासह अन्य धरणांची पाणी कमी होवू लागली. निसर्ग प्रकोपाचा रूद्रवतार झालेल्या पाटण तालुक्यातील आंबेघर तर्फे मरळी येथील ढिगारयाखाली गाडल्या गेलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम युध्दपातळीवर सुरू झाले शनिवारी सायंकाळ पर्यंत अकरा मृत देह सुखरूप बाहेर काढण्यात आले. यात लहान मुलांचा ही समावे होता यावेळी सातारा जिल्हा जिल्हाधिकारी शेखर सिंह हे घटनास्थळी दाखल झाले आहेत. पाटणचे कर्तव्य दक्ष तहसिलदार योगेश टोपे व त्यांचे सहकारी मदतकार्य सक्रिय झाले. आणि त्यांनी स्वतालक्ष घालून अकरा मृत देह बाहेर काढले. तरि सुध्दा तीन लोक सांपडली नाही यातच चार कुटुंबातील १४ जन ढिगारयाखाली गाडले गेलयाचीभीती अजून सुद्धा आंबेघर गावातील लोकांच्या मनात आहे हे तर लोकांचं झाल पण कुठेही पाळीव जनावरे मयत झाल्याची एकही घटना उघड झाली नाही. याचा अर्थ असा होतो की सर्व प्रकरण दाबले गेले काय

      आंबेघर गावातील लोकांना शासनाकडून काही मदत देण्यात आली का ? आली असेल तर ती मदत कोणत्या स्वरूपाची होती. त्या तालुक्यातील सामाजिक संघटना. सेवाभावी संस्था युनियन. मान्यवर नेते पुढारी खासदार आमदार यांनी काय केल आंबेघर गावांसाठी त्यांना पर्यायी जागा. घर बांधणीसाठी साहित्य. रेशन अन्न धान्य. कापड. जीवनावश्यक वस्तू. अन्नदान. आहार किट दिली का.मयत व्यक्तिंना आर्थिक मदत देण्यात आली का ? नाही म्हणजे घटनास्थळी जाऊन भेट देण्यापेक्षा मदत काय दिली आपल्या प्रत्येक जिल्ह्याला बरेच आमदार खासदार मंत्री लाभले आहेत पण. मदत करणारे लोक आज दिसायची बंद झाली जनता मनातून ओरडत आहे भेट दौरे करण्यापेक्षा. फोटो काढण्यासाठी निवडणूक भांडवल नको तर जनतेचे शुभचिंतक म्हणून रस्त्यावर या हे आत्ताच संपल नाही दरवर्षी असे विविध प्रकारचे पूर येणार आहेत. म्हणजे याचा अर्थ असा होतो की ज्या जिल्ह्यात आमदार आहे तेथे विकासाचा अनुशेष आहे 

              बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

शिराळा तालुका एजंट लोकांच्या विळख्यात




 शिराळा तालुका एजंट लोकांच्या विळख्यात 

            सांगली जिल्ह्यातील कोकणाच तोंड मानलें जाणारे गाव म्हणजे शिराळा राज्य महाराष्ट्र अंदाजानुसार २००१ मध्ये शिराळा गावांची लोक संख्या २८/६७९ अशी होती शिराळा गावाला मोरणा सारखी पावन नदी. गोरक्षनाथ यांचा महान वारसा. नागपंचमी १६४५ साली स्थापन मारुती मंदिर येथून नागपंचमी या ऐतिहासिक सणाला सुरवात जगात नाव असलेला पावन आणि पवित्र सण. शिराळा तेथेच होतो. . शिवाजी महाराज यांच्या काळात ३२ खेड्यांचा महसूल एका. भुईकोट किल्ला शिराळा गावाला गोळा होत होता म्हणून या गावाला शिराळा असे नाव पडले. छत्रपती संभाजी महाराज यांना गणोजी शिर्के आणि मुकर्रबखान यांनी जेव्हा पकडले तेव्हा छत्रपती संभाजी महाराज यांचा एक मुक्काम शिराळा येथे पडला.असा महान वारसा असणारे गाव त्याचा आम्हाला नव्हे तर सर्वांनाच अभिमान आहे. शिराळा गावांत गणपती मंदिर / गुरु देव दत्त मंदिर/ गोरक्षनाथ मंदिर / अंबामाता मंदिर / नृसिंह मंदिर /महादेव मंदिर /मारुती मंदिर /राम मंदिर /लक्ष्मी नारायण मंदिर / विठ्ठल रखुमाई मंदिर अशी धार्मिक वारसा असणारे शिराळा हे गाव. या गावात. आठरा पगड जातीचे लोक विविध जाती धर्माचे लोक सर्व सणासंभारभ. विविध जातींचे धार्मिक विधी. यामध्ये एकमनाने सहभागी होताना दिसतात. शैक्षणिक संस्था. वरिष्ठ शैक्षणिक दर्जा प्रत्येकाची नांवे वेगळी प्रत्येकाची भाषा वेगळी प्रत्येकाची रहानसान वेगळे. बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज यामध्ये कोणावर जरी अन्याय झाला तर तो व्यक्ति कोण आहे. कोणत्या धर्माचा आहे कोणत्या जातींचा आहे कोणत्या पक्षाचा आहे. हे सर्व माग ठेवून सहभागी होणारे मोठ्या मनांचे लोक येथेच पहावयास मिळतात. जवळजवळ खेडीपाडी. साधे मनमोकळी लोक डोगराशेजारी राहणारी. मुबलक पाऊस. मोकळी हवा. मोकळ मन आनंदी कायम उत्साही अशी लोक फक्त माझ्या शिराळ्यात च  

                काळ बदलला आणि ३२ खेड्यात पूर्वी आसणारी चावडी वाचन. सभा मिंटिंगा मंदिरांत भरणारी संध्याकाळी भोजनासाठी गर्दि मंदिरांवर सकाळी वाजणारी भुपाळी मनाला मुग्ध करणारी होती. आत्ता त्यात फार बदल झाला चावडी चे स्थानांतर ग्रामपंचायत मध्ये झाले तालुक्याला तहसिलदार कार्यालय आलं. जागोजागी प्रत्त्येक गावात नेते पुढारी तयार झाले. विविध पक्ष. अपक्ष. तयार झाले विविध धार्मिक. सामाजिक संघटना तयार झाल्या तरुणांचे गट तयार झाले. दहशतवाद. गुंडगिरी. अवैध व्यवसाय. दारु. निवडणूक नावाखाली जातीवाद. असं विविध प्रकार हळूहळू मान वर काढायला लागले यामुळे लोकांच्या मनात असणारे प्रेम संपण्यास सुरुवात झाली.  

             डोंगराळ भागात लोक अडाणी अशिक्षित रानटी असतांत असे समजाणारे नेते पुढारी यांचें बगलबच्चे यांनी विविध पक्षांच्या नावांवर शासनाच्या विविध योजनांचा फायदा सर्वसामान्य माणसाला लाभ मिळवून देण्यासाठी जागोजागी विविध संघटना तयार करण्यात आल्या त्याच्या मागचा उद्देश एवढाच होता की फक्त आणि फक्त पैसा मिळविणे.  

              सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई यांचेकडून बांधकाम कामगार यांच्यासाठी विविध कल्याणकारी १८ योजना राबविण्यात येतात त्यात महिला मुल शैक्षणिक वैद्यकीय संरक्षण यासाठी विविध योजनांचा सहभाग आहे. सांगली जिल्हा येथे जिल्ह्याचे सहाय्यक कामगार आयुक्त भवन आहे. संघटना बांधकाम कामगार यांची नोंदणी करण्यासाठी गावा गावात आपले तात्पुरत्ये अध्यक्ष उपाध्यक्ष असे काही कार्यकर्ते तयार करते. कामगार भवन मधील काही अधिकारी व कर्मचारी यांना हाताला धरून तुम्ही खा आम्ही खातो असा फंडा वापरला जातो. मग काय कोणत्याही गावात जा कोणीही कीतीही पैसै घेऊन बांधकाम कामगार नोंदणी करतांना दिसत आहे त्यात सर्वात मोठा आर्थिक लुटिचा फटका शिराळा तालुक्यातील गोरगरीब जनतेला सोसावा लागत आहे. कोणी यांना लगाम घालणारे नाही का ? 

                आज प्रत्येक गावातील एक महिला. व. समाजसेवक म्हणून ओळख असणारा कार्यकर्ता निवडायचा आणि. बांधकाम कामगार नोंदणी करण्यासाठी. १०००/१२००/१४००/ अशी तोंडाला येईल तेवढी फी घ्यायची आणि कामगारांना लुटायच. परवा आम्हाला अशी बातमी लागली की काही इंजिनिअर कामगार नोंदणी साठी लागणारे दाखले देण्यासाठी एक ठराविक रक्कम घेतात. अन्यथा संघटना वाल्यांनी त्यांच्याकडे इंजिनिअर मॅनेज केले आहेत ते संघटना कार्यकर्ते तुम्ही फक्त कागदपत्रे द्या इंजिनिअर दाखला फी सहित बांधकाम कामगार यांचेकडून मोठी आर्थिक रक्कम घेतात. आत्ता आॅनलाइन नोंदणी पध्दत असल्यामुळे ज्या इंजिनिअर यांचे रजिस्ट्रेशन आहे त्याचाच दाखला बांधकाम कामगार नोंदणी साठी ग्राह्य धरला जातो त्यामुळे दिवसांत. १०० दाखले जर एक इंजिनिअर आणि संघटना यांच साटंलोटं करून किती पैसे मिळवतात बघा. यांवर कोणी अंकुश लावणारे नाही का ? इंजिनिअर लोकांना किती दाखले द्यावेत याची काय अट मर्यादा आहे का ? तो इंजिनिअर कामगार भवनाला कामगार टॅक्स भरतो का ? त्याचे रजिस्ट्रेशन नुतनीकरण आहे का? याचा कधीं कधीं सहायक कामगार आयुक्त भवन यांनी कधी सर्वे केला आहे का? असे किती इंजिनिअर आहेत हे कामगार भवनाला तरी माहीत आहे का? 

                आज कामगार नोंदणी नावाखाली शिराळा तालुक्यात. जिल्ह्यातील विविध संघटना व एजंट याचं एक पेव फुटले आहे जो तो काही काम नाही असा सुध्दा एखादा इंजिनिअर हाताला धरून बांधकाम कामगार नोंदणी करताना दिसत आहे. यातील सर्वात मोठी हाणी आहे ती म्हणजे ज्याचा बांधकाम कामगार किंवा बांधकाम यांच्याशी काही संबध नसणारे. विविध दुकानात काम करणारे कामगार. घरात घरकाम करणाऱ्या महिलां. नोकरी वर असणारे लोक फळे फुले भाजीपाला विक्री करणारे. असे एक नाही अनेक लोक बांधकाम कामगार यांच्या हक्काच्या योजनांचा अशा बोगस एजंट कामगार हितचिंतक यांच्या फक्त आणि फक्त पैसा मिळविणे या धोरणामुळे लाभ घेत आहेत. 

              गावा गावात फिरणारे कामगार नोंदणी एजंट. विविध कामगार संघटना यांना आपल्या गावात येण्यास मनाई करा. आपल्या गावात जर कोणी एजंट संघटना कार्यकर्ता आला तर त्यांचेकडे आयकार्ड कोणाचे आहे ते बघा त्याला तसं खणकाहून विचारा. आयकार्ड किंवा येणारा एजंट किंवा संघटना वाला. यांचेकडे कोणत्याही शासन किंवा शासनाच्या जिल्हास्तरीय नेमणूक आयकार्ड नसेल ? कोणत्याही नेत्यांचे नावांचे आयकार्ड असल्यास ? म्हणजे शासन प्रशासन शासकीय आयकार्ड धारक सोडून कोणालाही आपल्या गावातच काय तर गावाच्या बाहेर सुध्दा फिरु देवू नका. यांना आपल्या गावातील कोणी सहकार्य करत असेल तर आजच नजिकच्या पोलिस स्टेशनला सदर व्यक्ती अनोळखी असून खोटी व दिशाभूल करणारी माहिती सांगून जनतेची आर्थिक लुट करत आहे म्हणून कामगारांनी एकत्र येऊन तक्रार दाखल करा. पोलिस मित्र आपल्या मदतीसाठी सदैव तत्पर आहेत. त्यांची मदत घ्या कोणत्याही राजकीय दबाव याला बळी पडू नका. कोणीही संघटना यांच्याविरोधात तक्रार किंवा बोलत नाही कारणं यांचे क्षेत्र गुंडगिरी आहे. कामगार आयुक्त भवन मधील वरिष्ठ अधिकारी यांचे नाव घेऊन दम धमकी देणारे एजंट सुध्दा आज गावा गावात फिरत आहेत. 

              प्रत्त्येक गावांतील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य. समाजसेवक. समाजांचे व गोरगरीब जनतेचे हित लक्षात घेणारे नेते यांनी आजच या गोष्टींवर लक्ष केंद्रित करा आणि आपल्या गावात येणारा कोणताही व्यक्ती कशासाठी आला आहे ? तो काय करत आहे ? कोणती माहिती सांगत आहे ? कोणत्या योजना त्यासाठी किती पैसे मागत आहे ? त्याचा कर्ता करविता कोण आहे ? मोबाईल शुटिंग करुन पुरावा तयार करा. जर कोणी वरिष्ठ अधिकारी याची ओळख किंवा त्यांच्या नावाखाली आपली बोगसगिरी राबवत असेल तर त्यांची तर आगोदर पोलिस स्टेशनला तक्रार करा याचा आजपासूनच पाठपुरावा करा. 

आणि आपण आपल्या गावांचे तालुक्याचे जिल्ह्याचे राज्य देश याचे प्रथम नागरिक आहोत हे सिध्द करून आर्थिक मानसिक सामाजिक धार्मिक व इतर माध्यमातून जनतेची होणारी लुट थांबवा

       समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा

  सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा            अनुसूचित जाती जमाती. इतर मागासवर्गीय जाती जमाती. भटक्या विमुक्त...

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या