कोण अन्न धान्य देत कोण एका गरजूंना?

 


विद्रोह रेशन अन्नधान्यासाठी

              आपला भारत देश शेतीप्रधान देश आहे.  मुबलक शेती. भरपूर पाणी. जेमतेम लोकसंख्या होती. सर्वांची अन्न धान्य गरज व्यवस्थित भागत होती.  पण शेती तंत्रज्ञानाचा अनुभव कमी. शेती कशी करावी कमी क्षेत्रात जास्त उत्पन्न कसे घेता येईल यासंबंधी. अनुभव व शिक्षण अभाव यामुळे उत्पादनात वाढ होत नव्हती. सर्वांना दोन वेळचे पोटभर जेवायला मिळावे आणि सर्वांचे व्यवस्थित पोषण व्हावे ही किमान गरज आहे वेळोवेळी पावसाची अनियमितता. आधुनिक तंत्रज्ञान अभाव यामुळे स्वातंत्र्यानंतर बराच काळ आपल्याला अन्नधान्य तुटवडा सहन करावा लागला. त्यावेळी परदेशातून अन्न धान्य आयात करावे लागले. पुढे सिंचन व्यवस्था सुधारली सरकारने मोहीम काढून शेतीची आधुनिक तंत्रे प्रचारात आणली सुधारीत बी बियाणे रासायनिक खते. वापरात येवू लागली या सर्वांचा परिणाम म्हणून आपण अन्न धान्य उत्पादनाची उंच पातळी गाठली. या बदलाला. "हरित क्रांती" असे म्हणतात देशात अन्न धान्य उत्पादन वाढले देश स्वावलंबी बनला मात्र खाद्यतेल या बाबतीत आपण अजून मागेच आहोत 

                अन्न धान्य उत्पादन जेव्हा कमी होते सर्वांना धान्याचे वाटप व्हावे म्हणून. " रेशनिंग " ही संकल्पना अमलात आणली आजही ही रेशनिंग व्यवस्था अमलात आहे. सर्वांना पुरेसे अन्न धान्य मिळावे हा जसा एक हेतू तसेच धान्य रास्त भावाने. विनापक्षपाती पणाने मिळावे नियंत्रण भावात अन्न धान्य पुरवठा व्हावा. ते सर्वांना परवडेल अशा भावात मिळावे. त्या अन्न धान्य कोणत्या प्रतीचे आहे. उत्कृष्ट आहे का निकृष्ट आहे.  मी जर गरिब असेन तर मला रेशनचा जसा येईल तसाच माल खावे लागते.  त्याहून उच्च प्रतिचा गहू तांदूळ हा मात्र जास्त भावाने मिळतो. त्यामुळे गरिबांच्या वाट्याला सकस धान्य कसे येणार.  म्हणजे उत्पादन वाढून रेशनिंग दुकाने घालून सगळा प्रश्न सुटत नाही. पोषक धान्य रास्त भावाने मुबलक मिळण्याचा प्रश्न शिल्लक राहतो. त्यामुळे सर्वसामान्य माणसाला " झुणका भाकर केंद्र " पुरी भाजी वाले " यांचा आसरा घ्यावा लागतो. 

            श्रीमंत आणि गरीब यांच्या आहारात पोषक तत्वे विविधता या सर्व बाबी याबद्दल खुपचं अंतर असते. पोषक आहार हा प्रश्न नुसत्या धान्योत्पादन मर्यादित नाही. वाढती लोकसंख्या आणि दारिद्र्य यांचे मुळे तो जास्त गुंतागुंतीचा बनतो. 

        यातूनच मधला मार्ग शासनाने काढला तो म्हणजे शिधापत्रिका वर्गवारी. त्यात एक वार्षिक उत्पन्न ठरवून दिले आणि त्यानुसार कुटुंबांचे. नियोजन शिधापत्रिका वर्गवारी मध्ये करण्यात आले. अंत्योदय म्हणजे गरिब दारिद्र्य रेषेखालील कुटुंब म्हणून राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम २०१३ नुसार शहरी भागासाठी कमाल उत्पन्न ५९००० हजार निश्चित करण्यात आले. ग्रामीण भागासाठी रु ४४००० इतके उत्पन्न असणाऱ्या ए पी एल ( केशरी) लाभार्थी पात्र आहेत. अंत्योदय अन्न सुरक्षा योजनेत सहभागी असणाऱ्या कुटुंबांना प्रति शिधापत्रिका प्रतिमहा ३५/ किलो धान्य व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना प्रतिवयकति प्रतिमहा ५ किलो धान्य आहे पात्र लाभार्थ्यांना रु ३!प्रति किलो या दराने तांदूळ रु २ प्रति किलो दराने गहू या दराने व रु १/ प्रति किलो या दराने देण्याची तरतूद आहे 

      सर्वांत हलकाची असणारा गट व आर्थिक दृष्ट्या सक्षम समजला जाणारा गट म्हणजे १६/एप्रिल २०२१ रोजी. आलेल्या शासन आदेशानुसार. या गटाला. प्रति व्यक्ती. प्रति महिना. १ ‌किलो. गहू. व. १  किलो तांदूळ. देण्याचा. व. १९ ‌मे. शासन निर्णयानुसार. मोफत तुरडाळ चणाडाळ चणा. वाटण्यात येणार आहे. पण. आज आम्ही. रेशन दुकानदार यांच्याशी. चर्चा केली असता.  कोणीही. रेशन दुकानदार हा रेशन अन्न धान्य वितरण करण्यास तयार नाही. कारण.  १००/ टक्के. शिधापत्रिका पैकी. ५०/ टक्के. शिधापत्रिका धारकांना हा. अन्न धान्य वितरण करण्यात येणार आहे. बाकीच्याच काय.  तर आपणाकडे. हा. रेशन साठा उपलब्ध नाही.  गोदाम शिल्लक. रेशन दुकानदार यांचेकडे असणारे. अन्न धान्य शिल्लक. असा. वरवरचा मेळ घालून. सर्वसामान्य माणसाला व गोरगरीब जनतेच्या. तोंडाला पाने पुसली आहेत.  केशरी शिधापत्रिका धारक. यांचा निकष असा ठरवला जातो की कुटुंबातील एकत्रित वार्षिक उत्पन्न १५/००० पेक्षा जास्त परंतु १ लाख किंवा त्याहून जास्त नसावें कुटुंबातील कोणत्याही सदस्यांकडे चार चाकी दोन चाकी वाहन नसावे.  कुटुंबातील सर्व व्यक्तिची मिळून त्यांच्या नावे ५ हेक्टर किंवा त्यापेक्षा जास्त बारमाही बागायती जमीन असू नये. असा निकष लावून खरोखरच लाभार्थी असणारी कुटुंबे या अन्न धान्य योजनेतून बाद करण्यात आली. याचा सर्वे. २००५ साली झाला होता त्यावेळी शासन तरतुदी नुसार गृहभेट देऊन सर्वे करण्याच्या सूचना अधिकारी व कर्मचारी यांना देण्यात आल्या होत्या. पण कोणताही अधिकारी घरापर्यंत न जाता स्थानिक. नगरसेवक. सरपंच.  व अन्य समाजातील प्रतिनिधी यांच्या सांगण्यावरून अमुक याची परस्थिती चांगली आहे तमुक यांची परस्थिती बिकट आहे असी उत्तरे दिली आणि. खरोखरच गरिब असणारा. या योजनेतून बाद झाला आणि नोकरीत असणारे. शेती भरपूर असणारे.  घरात चार चाकी दोन चाकी गाड्या असणारे. अचुते या योजनेत बसले कारणं ते सर्वजण यांचेच बगलबच्चे होते. पण सर्वे करणारे अधिकारी व कर्मचारी हे कोणाचें बगलबच्चे होते. असा सर्वे दाखल करून शासनाची फसवणूक केली या अंतर्गत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अथवा त्यांना निलंबित करण्यात यावे. 

             कोरोना सारख्या महाभयंकर महामारी संकटाने थैमान घातले होते त्यावेळी तो प्रादुर्भाव रोखण्यासाठी लावण्यात आलेल्या टाळेबंदी मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी केंद्र शासनाने आत्मनिर्भर भारत वित्तीय पॅकेज अंतर्गत शासनाने दिलेल्या निर्देशानुसार राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत तसेच कोणत्याही राज्य योजनेमध्ये समाविष्ट नसलेल्या विना शिधापत्रिका धारकांना मे व जून २०२० या दोन्ही महिन्याच्या कालावधीत मोफत धान्य वितरण करण्यात आले होते. यावेळी प्रति माणशी प्रति महिना पाच किलो तांदूळ व ८/१२ या दराने अन्न धान्य वितरण करण्यात आले होते कोणाला दिले कोणाला नाही. रेशन आले नाही.  आधार लिंक नाही. थम उठत नाही. उत्पन्न दाखला जोडला नाही.  अशी उडवाउडवीची उत्तरे रेशन दुकानदार यांनी दिली. 

            शासनाच्या आत्मनिर्भर भारत वित्तीय सहाय्य पॅकेज अंतर्गत केंद्र शासनाच्या नियमांनुसार. राज्यात टाळेबंदी जारी करण्यात आली होती त्यावेळी कामासाठी परगावाहून. परराज्यातून.  परजिल्ह्यातील. असे विविध ठिकाणांहून आलेले कामगार टाळेबंदी काळात अडकून पडले त्यांच्यासाठी शासनाने पाच किलो तांदूळ फक्त आधार कार्ड. फोटो घेऊन देण्याचा निर्णय घेतला होता त्यातसुद्धा रेशन दुकानदार यांनी. यातला कोणता रेशन माल वाटला कोणाला नाही. चणा कोणाला दिला कोणाला नाही परवाच्या शासन निर्णयानुसार. गेल्या वर्षी चौथ्या महिन्यात वाटण्यात आलेल्या चणा पैकी कोणत्या जिल्ह्यात किती चणा शिल्लक आहे ते सांगितले आहे पण आज कोणत्याही जिल्ह्यातील पुरवठा विभाग या बाबतीत मुग गिळून आहे

    अंत्योदय योजनेतून वाटण्यात आलेला मोफत तांदूळ लोकांनी खाल्ला नाही मार्केट मध्ये विकला आणि उच्च प्रतिचा तांदूळ आणून खाल्ला. मग अशा बेगरजू लोकांना हे अन्न धान्य वितरण करण्यापेक्षा केशरी शिधापत्रिका धारकांना वितरण करायला हवे होते. कारण फुकट मिळणाऱ्या वस्तूला किंमत नाही. एका बाजूला लोक उपाशी मरत होती आणि सांगली जिल्ह्यात जागोजागी टनांपर्यंत रेशनचा तांदूळ सापडतो वाईट आहे 

        बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर चे वतीने आम्ही व मी मागणी करतो रेशनकार्ड वर्गवारी रद्द करा आणि सरसकट प्रत्त्येक शिधापत्रिका यांना २/३ प्रति व्यक्ती प्रति महिना रेशन अन्न धान्य वितरण करा. त्यामुळे शासनावर मोफत अन्न धान्य वितरण करण्याचा येणारा बोझा कमी होईल 

             सर्व केशरी शिधापत्रिका धारकांना आवाहन करतो ज्यांना रेशन अन्न धान्य मिळत नाही. ज्यांनी अन्न सुरक्षा योजनेत सहभाग मिळावा म्हणून पुरवठा विभाग यांचेकडे अन्न धान्य मागणी अर्ज दाखल केले आहेत अशा सर्व रेशनकार्ड धारकांनी 

नाव. 

पत्ता

रेशनकार्ड नंबर सही. मोबाईल नंबर 

आणि शासनाने आत्ता एक किलो तांदूळ व गहू वितरण करण्याचा निर्णय घेतला आहे त्याबद्दल आपले मत एक छोटासा अर्ज तयार करून सदर हाॅटसॅप वर पाठवा

प्रत्त्येक केशरी शिधापत्रिका धारकांना नोव्हेंबर महिन्यापर्यंत प्रत्येकी ३५ किलो अन्न धान्य मोफत मिळावे यासाठी आपल्या कडून येणारा प्रतिसाद अखेर आपली मागणी व आपली गरज सिध्द करणारं आहे यामुळे सर्वांनी जास्तीत जास्त अर्ज सदर नंबरवर पाठवा. मा जिल्हाधिकारी साहेब यांचेमार्फत आपण आपली मागणी केंद्रापर्यंत पोहचवू. 

      सहकार्य करा. मत आमचे साथ तुमची. लढाई उभी करण्याचे काम आमचें विजय मिळविणे मदत करणे आपले परम कर्तव्य आहे

समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

नगर रचना अधिनियम

 


नगर रचना अधिनियम

           राज्यातील नागरी क्षेत्रात अनाधिकृत इमारती बांधकामाची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असल्याचे दिसते. विकासकाकडून नियमबाह्य. / पुरेश्या परवानग्या. प्राप्त न करताच बांधकाम करण्यात येते. व तदनंतर अशा सदनिका. मालमत्ता विक्री करण्यात येतात अशा व्यवहाराची नोंदणी दुय्यम निबंधक यांचेकडे करण्यात येते. परंतु जेव्हा उक्त बांधकाम अनधिकृत असल्याचे लक्षात येते. तेव्हा नागरी स्थानिक स्वराज्य संस्था/नियोजन प्राधिकरणाकडून निषकासनाची कार्यवाही करण्यात आल्यास निष्पाप गाळेधारक किंवा सदनिका धारक यांना निषकासनाचया कार्यवाहीला सामोरे जावे लागते. वास्तविक बहुतांश गाळे धारक व सदनिका धारकांची ते राहत असलेली इमारत अनधिकृत असल्याची माहिती नसते. यामुळे गाळेधारकांना व सदनिका धारकांची फसवणूक होते. या बाबी टाळण्यासाठी. संदरभिय शासन निर्णय दि. 3/मे 2018 ते 02/मार्च 2009 अन्वये सूचना दिलेल्या आहेत 

*. वरील प्रमाणे बाबी टाळण्यासाठी दृष्टीने सुस्पष्ट सूचना देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. महाराष्ट्रातील नगर विकास विभागांतर्गत सर्व नियोजन प्राधिकरणाने महाराष्ट्र प्रादेशिक नगर रचना अधिनियम 1966 कायद्यांतर्गत अनधिकृत बांधकाम विरुद्ध कारवाई करणेबाबत यापूर्वी देण्यात आलेल्या सूचना बरोबर खालील कार्यपद्धती अवलंबली जावी यासाठी शासनाने काही नियम घालून दिले आहेत.  

*. अनधिकृत बांधकामांबाबत महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम 260/267 व 267/अ तसेच महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम 1966 मधील कलम 52/53 व 54 तसेच इतर अनुषंगिक कलमानुसार कारवाई करण्यात यावी

* सर्व संबंधित नागरी स्थानिक स्वराज्य संस्था/नियोजन प्राधिकरणे यांनी प्रभागनिहाय अधिकृत व अनधिकृत बांधकामांची यादी सर्वे नं व विकासकांच्या नावासह स्वतंत्र रित्या त्यांच्या संकेतस्थळावर तसेच. वर्तमानपत्रात प्रसिद्ध करावी

* बांधकाम निषकासीत करण्यासाठी नोटीस देतानाच महानगरपालिकेने संबंधित दिवाणी न्यायालयामध्ये कॅवहेट दाखल करण्याच्या सूचना द्याव्यात जेणेकरून संबंधित न्यायालयाचा एक्स पार्टी स्थगिती आदेश देता येणार नाही

* त्या त्या नागरि स्थानिक स्वराज्य संस्था /नियोजन प्राधिकरण क्षेत्रातील अनधिकृत इमारतींची. / बांधकामाची यादी संबंधित दुय्यम निबंधक यांचेकडे सादर करून त्यांना सदर इमारतीतील सदनिका बाबत खरेदी व्यवहार नोंदवू नयेत अशा सूचना संबंधित नियोजन प्राधिकरणाने द्याव्यात

* ज्या प्रकरणांमध्ये स्थगिती आदेश आहेत अशा प्रकरणांमध्ये संबंधित न्यायालयांना इमारत अनधिकृत असणे यामुळे ग्राहकांची फसवणूक होणे या बाबी निदर्शनास आणून स्थगिती उठविण्या करिता न्यायालयास विनंती करण्याच्या सूचना देण्यात येत आहेत. त्यानुसार कार्यवाही करण्याची जबाबदारी सर्व संबंधित अधिकारी/कर्मचारी यांची राहील

* ज्या पद निर्देशित अधिकाराच्या क्षेत्रात अनधिकृत बांधकामे आहेत अशा अधिकार यावर दि. 02/03/2009 चे शासन निर्णयानुसार सूचना व कारवाई करण्यात यावी

       बोगस भुखंड होणारें व्यवहार थांबवावेत यासाठी जागेची खरेदी विक्री करताना पहिला नियम असाहोता त्यासाठी साक्षीदार फक्त सहि केली तरी चालत होती. पण एका भूखंडाचे दोन दोन व्यवहार होण्यास सुरुवात झाली. त्यामुळे ग्राहकांची फसवणूक कायदेशीर बाबी मधून होणारा. वेळेचा व पैशांचा अपव्यय टाळण्यासाठी शासनाने आत्ता नविन पोर्टल सुरू केले आहे आत्ता खरेदी विक्री व्यवहार करताना आधार कार्ड. फोटो. कॅमपूटर फिटींग होण्यास म्हणजे आॅनलाइन पध्दतीने कामकाज सुरू झाले त्यामुळे बोगस व्यवहार थांबले. आणि नगरपालिका व महानगरपालिका या क्षेत्रात बिनशेती पलाॅट करण्याचे आदेश देणेत आले त्यामुळे भूखंड मालक एकच आणि सापेक्ष व्यवहार चालला आहे त्यातच शासन अधिकारी व कर्मचारी यांनी आर्थिक मोबदला घेऊन एकाची जागा दुस-याला दिलेली बातमी रोजचे भुखंड घोटाळे आपण रोजच वृतमानपत्रात वाचतो 

      यासाठी अनधिकृत बांधकामे अस्तित्वात असतील तर त्यावर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे आणि या सर्व प्रकाराला खत पाणी घालणारे अधिकारी व कर्मचारी यांना सुध्दा कायदेशीर चाफ बसला पाहिजे

 समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार जाहिरात प्रसिद्ध वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा 2013 रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

9890825859

इंधनाच्या करात २५ टक्के कपात करा - डॉ परवेज अशरफी

इंधनच्या करात कपात करण्यासाठी एम आय एम ने केली मागणी - डॉ परवेज अशरफी

अहमदनगर - १८.०६.२०२१

  सध्या जसे जीवन जगण्यासाठी किराणा व भाजीपाला गरजेचे आहे तसेच सध्याच्या काळात पेट्रोल व डीझेल हे सामान्य जनतेचे गरज बनली आहे. पेट्रोल व डीझेल चे भावने सध्या शतक केले असल्याने सामान्य जनतेचे आर्थिक व्यवस्था खूप बिकट झाली आहे. एकी कडे कोरोना महामारी आणी दुसरी कडे इंधन दरवाढ यामुळे प्रत्यक वस्तू महाग झाली आहे. सदर दर वाढी केंद्र व राज्य शासनाने विचारात घेतले तर कमी होऊ शकत. केंद्र व राज्य शासनाने एकमताने ठरवले तर दर एका दिवसात कमी होऊ शकतात. त्याचे मूळ कारण मंजे केंद्र शासन पेट्रोल मागे $ ३३ प्रती लिटर तर डीझेल मागे $ ३२ प्रती लिटर कर आकारते त्याच प्रमाणे राज्य शासन पेट्रोल मागे २२ टक्के तर डीझेल मागे २२ टक्के कर आकारते. केंद्र व राज्य सरकारने जर २५ टक्के करात कपात केले तर सामान्य जनतेला मोटा दिलासा मिळेल असे निवेदनाचे पत्र एम आय एम प्रदेश अध्यक्ष खासदार इम्तियाज जलील साहेब व प्रदेश कार्याध्यक्ष डॉ गफ्फार कादरी साहेब यांच्या आदेशाने पूर्ण महाराष्ट्रात स्थानिक अधिकारी मार्फत मा. केंद्रीय सचीव , पेट्रोलियम विभाग, न्यू दिल्ली व मा. सचिव, विक्रीकर विभाग, महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्र यांना देण्यात आले. अहमदनगर मध्ये एम आय एम तर्फे जिल्हा अध्यक्ष डॉ परवेज अशरफी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा अधिकारी, अहमदनगर यांना निवेदन देण्यात आले यावेळी डॉ परवेज अशरफी यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले की सध्या सामान्य जनतेची आर्थिक परीस्तीती खूप खालावली आहे. कोरोना महामारी चालू असतांना केंद्र सरकार ने पेट्रोल व डीझेल दर वाढीचे निर्णय घेऊन सामान्य जनतेला आर्थिक संकटात टाकले आहे. केंद्र सरकार व राज्य सरकारने एकमताने निर्णय घेतले व पेट्रोल व डीझेल चे कर २५ टक्केने कमी केले तर सामान्य जनतेला थोडातरी दिलासा मिळेल. आम्ही अशे पत्र आमच्या प्रदेश अध्यक्ष खासदार इम्तियाज जलील साहेब व प्रदेश कार्याध्यक्ष डॉ गफ्फार कादरी साहेब यांच्या आदेशाने पूर्ण महाराष्ट्रात देत आहे. यावेळी एम आय एम जिल्हा अध्यक्ष डॉ परवेज अशरफी, जिल्हा महासचिव हाजी जावेद, मुफ्ती अल्ताफ अहमदनगरी, नगरसेवक आसिफ सुलतान,विध्यार्थी जिल्हा अध्यक्ष शहनवाज तांबोळी, युवा शहर अध्यक्ष अमीर खान,मोहम्मद शेख,शौकत पिंजारी,तौसीफ इनामदार, इम्ररा शेख, ऑलऑल इंडिया युथ फेडरेशन शहर अध्यक्ष फिरोज शेख, आरिफ सय्यद,समीर बेग आदीं उपस्थित होते.

माहिती अधिकार 2005 अधिनियमातील कलमे व 6 प्रकरणांचा तपशील

 


              सर्वसामान्य माणसाला शासकीय शासन अनुदानित संस्था यामध्ये चालणार्या कामांचा आढावा घेण्याचा अधिकार आहे त्यासाठी सर्वसामान्य जनतेला कळावी अशी 31 सूधारित कलमे घालून दिली आहेत त्याचबरोबर त्याचा पाठपुरावा करण्यासाठी. 6 प्रकरणांचा आधार दिला आहे

* कलम /1/. माहिती अधिकार कायदा नामाभिदान व j /k सोडून देशात लागू

* कलम. /2/ समुचित शासन. शासकीय किंवा शासन अनुदान घेणा-या संस्था

         * प्रकरण. 2

* कलम. /3/ सर्व नागरिकांना माहिती अधिकार दाखल करण्याचा अधिकार

* कलम. /4/. सर्व प्राधिकरणावरिल अबंधने 120. दिवसात अपिल रचना. कार्य कर्तव्य. तपशील ठेवणें

*. कलम. /5/. जनमाहिती अधिकार यांना पदनिरदेशित करणे 100 दिवसांत जनमाहिती अधिकारी अपीलीय. पद निर्देशन

* कलम. /6/. माहिती मिळविण्यासाठी अर्ज करणे /अ/ नमुना 10 रुपये कोर्ट स्टॅम्प. बी पी एल साठी विनाशुल्क

*. कलम. /7/. माहिती अधिकार निकाली काढणे. 30. कार्य दिवसांत अथवा प्रतिदिन 250 रूपये दंड. / जीवीतासाठी . 48 तास /. एकूण 25-000रु दंड / विभागीय चौकशी. मानव हक्क उल्लंघन /. 45/ दिवसांत निकाली काढवे. प्रति झेराॅकस 2 रु. सीडी. 50 रुपये

* कलम. /8/. माहिती प्रगट करण्याबाबत अपवाद रा. सार्वभौमत्व/एकात्मता /राज्य सुरक्षेला युद्धतंत्र. / वैधानिक/आर्थिक/. परराष्ट्र संबंधाला बांधा. येथे ती न्यायालयाने मनाई केलेली राज्य / केंद्राच्या विशेषाधिकार भंग होणे ती एखाद्याच्या जीवीतास धोका निर्माण होणार असल्यास

           जी माहिती विधीमंडळ सदस्याला देण्यास नाकारता येत नाही ती माहिती कोणत्याही व्यक्तिला देण्यास नाकारता येत नाही

    मात्र. 20 वर्ष जुनी माहिती देता येते

* कलम. /9/. विवक्षीत. प्रकरणी माहीतीस नकार देण्याची कारणें काॅफी राईट चे उल्लंघन

*. कलम. /10/. पृथःकरनीय मागितलेल्या माहिती पैकी जी उघड करता येत नाही ती. कलम. /8/ 9/ नुसार इतर माहिती प्रथथकरण करून देता येते  

* कलम /11/. श्रेयसथा. पक्षाची माहिती 40 दिवसांत द्यावी लागते

        +प्रकरण. 3

* कलम. /12/. केंद्रीय माहिती आयोग. रचना. =1 मु मा आ. + 10 इ मा. आ. = एकूण 11

नियुक्ती. = राष्ट्रपती करतात

निवड = पी एम अधक्ष 

        +. लोकसभा विरोधी पक्ष नेता 

      + केंद्रीय मंत्री

कायदा समाजसेवा. विज्ञान-तंत्रज्ञान. प्रशासन. पत्रकारिता. व्यवस्थापन. इ. विषयांचे व्यापक व अनुभवी व्यक्तिची निवड केली जाते

माहिती आयुक्त. केंद्र व राज्य विधिमंडळाचा सदस्य असणार नाही

माहिती आयुक्तांचे. राजकीय पक्ष. व उधोग व्यापारात संबंध नसणार

* कलम. /13/. पदावधी

                    कालच्या मॅसेज मधील अपुरी माहिती 


माहिती अधिकार अधिनियमातील. 31 कलमे व 6 प्रकरणांचा तपशील

  * कलम. पदावधी.  

* मुख्य माहिती आयुक्त पदधारणेनंतर. 5 वर्ष किंवा 65 वर्षांपर्यंत

* पूर्ण नियुक्ती राहणार नाही

पदधारणा. राष्ट्रपती समोर अथवा त्यांनी नियुक्त व्यक्ति समोर शपथ घेतली

*. कलम 14 नुसार पदावरून दूर करता येते

* कलम. /14/ 

* सर्वोच्च न्यायालयाकडे निर्देश राष्ट्रपतीने. केल्यावरून न्यायालयीन चौकशी अंती. गैरवर्तन /असमर्थता शाबीत झाल्यास राष्ट्रपती आदेशावरून त्याला पदावरून दूर करता येत

*. न्यायालयीन चौकशी दरम्यान ही राष्ट्रपती निलंबित करु शकतात

        * प्रकरण. 4

* कलम. /15/

 राज्य माहिती आयोग

रचना. मुख्य माहिती आयुक्त. +10 माहिती आयुक्त = एकूण 11

* नियुक्ती. राज्यपाल

* निवड. मुख्यमंत्री अधक्ष

+. विधानसभा विरोधी नेता

+ कॅबीनेट मंत्री

* कलम. /16/

   *5. वर्ष = 65 वर्ष पूर्ण नियुक्ती नाही

  *. शपथ. राज्यपाल

  *. सेवाशर्ती=. राज्य मुख्य आयुक्ताप्रमाणे. 

*. कलम. /17/

राज्यपाल. उच्च न्यायालय चौकशी- दोषी - आढळल्यास अथवा चौकशी दरम्यान निलंबित

    * प्रकरण. 5

* कलम. /18/ 

माहीती आयोग अधिकार व कार्ये

       *. तक्रारी स्विकारने. चौकशी करणे

       *. दिवाणी. प्रक्रिया संहिता. 1908. नुसार अधिकार

* कलम. /19/ 

अपील. ब

         *. वेळेत निर्णय प्राप्त झाला नसेल किंवा

        *. अपुरी चुकीची माहिती मिळाली असेल तर

         * अपीलीय अधिकारी मुदत संपल्यानंतर अथवा निर्णय प्राप्त झाल्यानंतर. 30 दिवसांत अपील करता येते

         * पुरेसे कारणं असल्यास 30 दिवसांनंतर अपील स्विकारले जाते

            * प्रथम अपिल निर्णयानंतर. 90 दिवसांत मुख्य माहिती आयुक्तांकडे अपील करता येते. - पुरेसे कारणं असल्यास 90 दिवसांनंतर ही स्विकारले जाते

         *. प्रथम अपिल निर्णय. 30 दिवसांत अथवा जास्ती जास्त. 45 दिवसांपर्यंत निर्णय द्यावा लागतो

        *. मुख्य माहिती आयोगाचा निर्णय बंधनकारक असतो. 45 दिवस

 * कलम /20/

       * चुकीची माहिती दिल्यास अथवा. -. माहिती देणेस उशीर केल्याबाबत खालील प्रमाणे शास्ती होतें

        *. प्रतिदिन. 250 रुपये दंड

        * एकूण दंड. 25000/हजार

       * सेवानियमानवये. शिस्तभंगाची कार्यवाहीची शिफारस आयुक्त करेल

       * प्रकरणं. 6

*कलम. /21/ 

सदभावनेने केलेल्या कृतीला संरक्षण

        *. सदभावनेने केलेल्या गोष्टींबद्दल कोणत्याही व्यक्ती विरुद्ध दावा. खटला. व कायदेशीर. कार्यवाही दाखल करता येणार नाही

* कलम. /22/

       * अधिनियमाच्या अधिभावी परिणाम असणे

 * कलम. /23/

        * न्यायालयीन अधिकारीतेस आडकाठी

         *. कोणतेही न्यायालय या माहिती अधिनियमानुसार दिलेल्या कोणत्याही आदेशा विरुद्ध/ खटला ज्ञ दावा दाखल करुन घेणार नाही

* कलम /24/

          * विवक्षित संघटनांना हा अधिनियम लागू नसणे

           * गुप्तवार्ता. सुरक्षा. हा नियम लागू नाही

* कलम. /25/ 

         * संनियंत्रण व अहवाल देणें

         * केंद्र किंवा राज्य माहिती आयोग व्यवहार्य असेल तितक्या लवकर प्रत्त्येक वर्षाअखेर या अधिनियमातील अंमलबजावणी अहवाल समुचीत शासनास सादर करील

          * केंद्र/राज्य विधिमंडळासमोर एक प्रत ठेवली जाते

*कलम. /26/

         *समुचीत शासनाने कार्यक्रम तयार करणे

         समाजातील उपेक्षित वर्गाचा प्रबोधन करणयास शैक्षणिक कार्यक्रम करता येईन

* कलम. /27/ 

          * समुचीत. शासनास नियम करण्याचा अधिकार

*कलम. /28/

          * सक्षम अधिकार्यांचे नियम करण्याचे अधिकार

*कलम. /29/

          * नियम सभागृहापुढे ठेवणें

*कलम. /30/

         * अडचणी दूर करण्याचा अधीभार

         *. केंद्र सरकारला. या नियमांची अंमलबजावणी करताना अडचण उद्भवली तर ती दूर करण्यासाठी तसी तरतूद करता येते

*कलम. /31/

          * 2002 चा माहिती अधिनियम निरसित झाला 

       समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार जाहिरात प्रसिद्ध वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा 2013 रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

9890825859

रुग्णमित्र नादीर खान यांचे खरे कोविड योद्धा म्हणुन सन्मान



 युवक काँग्रेसच्या वतीने रुग्ण मित्र नादीर खान यांचा ‘खरे कोविड योद्धा’ म्हणून सन्मान

जीवाची पर्वा न करता रुग्णांसाठी केलेले कार्य मानवतेचे प्रतिक

- पै.मोसिम शेख


     नगर - सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरत आहे, ही एक चांगली गोष्ट आहे. परंतु ज्यावेळी कोरोनाचा कहर उच्च पातळीवर झाला होता, त्यावेळी माणूस माणासापासून दूर जात होता, अशा परिस्थितीत कोरोना बाधित रुग्णांना दिलासा देऊन त्यांना उपचार मिळवून देण्यासाठी नादीरभाई यांनी केलेले कार्य हे कौतुकास्पद असेच आहे. नादीरभाईंनी कोरोना बाधित रुग्णांना जिल्हा रुग्णालयासह इतर हॉस्पिटलमध्ये स्वत: अ‍ॅडमिट करुन उपचारासाठी सहाय्य केले. सर्वसामान्य, गोर-गरीबांना उपचार मिळवून देऊन त्यांचे प्राण वाचविले. स्वत:च्या जीवाची पर्वा न करता केलेले हे कार्य मानवतेचे प्रतिक आहे, ते खरे ‘कोरोना योद्धेच’ आहेत, असे प्रतिपादन युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष पै.मोसिम शेख यांनी केले.

      युवक काँग्रेस व अहमदनगर सोशल फौंडेशन ट्रस्टच्यावतीने कोविडच्या काळात मागील एक वर्षांपासून सतत कोरोना रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना सहाय्य करणारे रुग्ण मित्र नादीर खान यांचा ‘खरे कोविड योद्धा’ म्हणून पै.मोसिम शेख यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते नईम सरदार, काँग्रेसचे मुबीन शेख, अन्वर मुन्नवर सय्यद आदि उपस्थित होते.

     यावेळी नादीर खान म्हणाले, रुग्णसेवा ईश्‍वर सेवा मानून आपण हे कार्य अनेक वर्षांपासून करत आहे. सध्याच्या कोरोना काळात खर्‍या अर्थांना रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना उपचारा बरोबरच आधार देण्याचे काम केले. कोणत्याही फळाची अपेक्षा न करता सर्वसामान्यांना वेळेत उपचार मिळणे ही भावना आहे. आज केलेल्या सन्मानामुळे काम करण्यास आणखी प्रेरणा मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.


चेष्टा आणी फक्त चेष्टाच - पुरवठा विभाग

 


            कोरोनामुळे बिघडलेली घडी गेल्या वर्षापासून  सुरळीत करण्याचा प्रयत्न शासकीय पातळीवरून प्रयत्न सुरू आहेत. रोजीरोटी अडचण दूर करण्यासाठी. रेशन हा महत्वाचा श्रोत माणला जातो. गेल्या वर्षी सुध्दा टाळेबंदी मुळे सर्वसामान्य जनतेची परस्थिती बिकट झाली होती. शिधापत्रिका धारकांना अन्न धान्य उपलब्ध होते पण यावेळी जास्त बिकट परिस्थिती बांधकाम कामगार. परगावातून. परराज्यातून.  परदेशातून. कामासाठी. आलेले कामगार टाळेबंदी मुळे अडकून पडले होते कोठे ओळख नाही कोण मदत करतं नाही. यावेळी केंद्र शासनाच्या आत्मनिर्भर योजनेतून  प्रति महिना प्रति व्यक्ती पाच किलो तांदूळ मोफत. देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. त्यासाठी आधारकार्ड एवढाच पुरावा ग्राह्य धरला होता. रेशन दुकानदार यांनी. माणस मिळाली नाही. त्यांचा सर्वे झाला नाही.  त्यांचे गावाकडे रेशनकार्ड आहे तेथे त्यांच्या नावांचा रेशनचा अन्न धान्य घेत आहेत.   ओळखिचा पत्ता द्या.  बांधकाम क्षेत्रात काम करणारे कामगार. युपी बिहार.  राजसथानवाले.  व अन्य सर्वसामान्य गोरगरीब जनता.कोरोना काळात कोणीही उपाशी राहू नये यासाठी शासन प्रयत्नशील आहे पण रेशन दुकानदार यांनी आलेल्या मालातील. बराच रेशन अन्न धान्य. ढापले. चणा वाटप करताना कोणाला मिळाला कोणाला नाही. आजही शासन निर्णय सांगतो की प्रत्त्येक जिल्ह्यात केंद्र शासनाच्या आत्मनिर्भर योजनेतील चणा शिल्लक आहे. 
                  दि 11 एप्रिल 2017 चे अधिसूचनेनुसार राष्ट्रीय अन्न सुरक्षा. 2013/ 2013 चा 20 मधील कलम 16/1 द्वारा प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करून राज्य शासनाने राज्य अन्न आयोग गठित केला आहे त्यावर अधक्ष व इतर 4 सदस्य नेमणूक करण्यात आली असून. दि. 2/ मे 2017 चे अधिसूचनेनुसार राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 मधील कलम 16/2 मधील तरतुदीनुसार आयोगातील अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीचा सदस्यांची नेमणूक करण्यात आली आहे. 
             राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 चे कलम 16/6 मध्ये नमुद केलेली कार्ये सदर अन्न आयोग पार पाडील. कल्याणकारी संस्था.  वसतिगृह.  आश्रमशाळा. निराधार पुरूष व महिला.  विधवा परित्यक्त   गंभीर आजाराने ग्रस्त.  एकटे राहणारे.  सर्व आदिम जमाती.  भूमीहीन शेतमजूर.  अल्पभूधारक शेतकरी. ग्रामीण कारागीर.  झोपडपट्टीतील रहिवासी.  रोजंदारी करणारे.   हमाल.  मालवाहक.  सायकल रिक्षा चालक.  फळे फुले विक्रेते.  गारुडी.  कचरा गोळा करणारे.  एच आय व्ही. /एड्स बाधित. नागरिक.  कुष्ठरोगी नागरिक यांना प्राधान्य.  वरिल प्रमाणे कोणताही घटक दारिद्र्य रेषेखाली म्हणजे अंत्योदय योजनेत बसत नाही. त्यांना केशरी शिधापत्रिका आहे. अन्न सुरक्षा योजनेत सहभाग मिळावा म्हणून त्यांनी केलेला पत्रव्यवहार अजून धुळखात पडला आहे. पिवळी शिधापत्रिका.  केशरी शिधापत्रिका. शुभ्र शिधापत्रिका. असे प्रामुख्याने शिधापत्रिका प्रकार आहेत. 
                आपल्या जिल्ह्यात. केशरी शिधापत्रिका संख्या. दोन लाख अठरा हजार आहे तर दहा लाख अडतीस हजार लोकसंख्या लाभार्थी आहे शासनाच्या या निर्णयाचा प्राधान कुटुंब अंत्योदय लाभार्थ्यांना लाभ मिळत आहे पण यात अन्न धान्य मिळण्याचा लाभ केशरी शिधापत्रिका धारकांना मिळतच नाही आपल्या सांगली जिल्ह्यात एकूण रेशनकार्ड संख्या 405873 एवढी आहे. यामध्ये. प्राधान्य कुटुंब. 374508 व बी पी एल रेशनकार्ड संख्या 64928 आहे तर अंत्योदय अन्न सुरक्षा योजनेत. 31365 एवढी कमालीची संख्या आहे राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना व शेतकरी योजनेअंतर्गत समाविष्ट नसलेल्या केशरी कार्डधारकांना गेल्यावर्षी सवलतीच्या दरात धान्य उपलब्ध करून देण्यात आले होते यंदाही कोरोनामुळे अनेक घटक अडचणींत आहेत प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत व राज्य शासनाकडून पिवळ्या कार्डधारकांना. तांदूळ. गहू. साखर. महिन्यांचा मिळणारा रेशन अन्न धान्य सोडून. फक्त तांदूळ मोफत देण्यात येत आहे. राज्य शासनाने घेतलेल्या नवीन निर्णयानुसार आत्ता जून मध्ये अन्न धान्य वितरणाचा निर्णय ज्यांना रेशन मिळत नाही त्यांच्यासाठी घेण्यात आला आहे. त्यामध्ये. प्रति व्यक्ती प्रति महिना. एक कीलो गहू व एक कीलो तांदूळ  तेही  चेष्टा लावली आहे  एक किलो तरी  कशाला देताय  त्याबरोबर सर्वसामान्य जनता गोरगरीब लोक. काय खाणार. का एक मुठ तांदूळ आणि एक मुठ गहू खा आणि पाणी प्या. झालकी जेवन.  सवलतीच्या दरात वाटप करण्यात येणार आहे 
         चेष्टा लावली आहे सर्वसामान्य जनता गोरगरीब लोक यांची एका बाजूला अंत्योदय अन्न सुरक्षा योजनेत सहभागी असणारे शिधापत्रिका धारक यांना महिन्यांचे रेशन सोडून तांदूळ पाच किलो मोफत. सोबत साखर. डाळ. केवढा मोठा पक्षपाती आहे. कोरोना सारख्या महाभयंकर महामारी संकटाने सर्वजण म्हणजे लहान मोठे. गरिब श्रीमंत सर्वजण अडचणीत आले आहेत. जर रोग लहान मोठे गरिब श्रीमंत असा भेद करत नाही तर आपण का पक्षपाती पणा करताय. रेशनकार्ड वर्गवारी रद्द करा आणि सर्वांना 3/2 कीलोने सर्रास अन्न धान्य वितरण करा. सर्वजण सुखात राहतील आणि पोटभर खातील. दारिद्रय रेषेखालील कुटुंब खरोखरच दारिद्र्य रेषेखाली आहे का त्याचा पण सर्वे झाला पाहिजे.  अपात्र शिधापत्रिका शोध मोहीम राबविण्याचा प्रभावी निर्णय होता पण आजही आणि आत्ताही कोणताही अधिकारी व कर्मचारी घरापर्यंत अपात्र शिधापत्रिका शोध मोहीम सर्वे साठी आलेला नाही. म्हणजे सगळ वार्यावर आहे. अपंगांसाठी वेगळी शिधापत्रिका देण्याचा शासन निर्णय आला त्यात अपंग व्यक्तींना शिधापत्रिका देताना प्राधान लाभार्थी कुटुंब योजनेत सहभागी करून द्या असा शासन निर्णय असून सुद्धा रोज अपंग लोक तहसिलदार कार्यालयात हेलपाटे मारत आहेत. म्हणजे आहे का गोरगरीब जनतेची चेष्टा
      केंद्र शासनाने इषटाक वाढवून दिल्याशिवाय बी पी एल लाभार्थी संख्या वाढविता येणार नाही. पण इंषटांक वाढल आहे संपला आहे हे आपणास कळणार कसे त्यासाठी आपण माहिती अधिकार दाखल करून माहिती घेणें गरजेचेच आहे. या नियमांच्या अधीन राहून बी पी एल पिवळ्या शिधापत्रिका साठी गॅस सिलिंडर. व दुचाकी वाहन.  तसेच इतर अटी दि. 25 मे 2005 रोजीचया शासन निर्णयानुसार काढून टाकण्यात आल्या आहेत
               शासन निर्णय दि. 9/ सप्टेंबर 2008 अन्वये राज्यातील सर्व विडी कामगार.  तसेच सर्व पारधी. कोल्हाटी. समाजासाठी व कुटुंबासाठी आणि शासन निर्णय 29 सप्टेंबर 2008/ व 21/ फेब्रुवारी 2009 अन्वये परित्यक्त या. व निराधार महिला.  यांना तात्पुरत्या स्वरूपात बी पी एल शिधापत्रिका देण्याचा निर्णय घेतला आहे.  
 *   विविध मागणी पत्र व्यवहार आणि कालावधी
1/ नवीन शिधापत्रिका मागणी. 
   * 30/. दिवसांत नविन रेशनकार्ड देणे बंधनकारक आहे
2/. शिधापत्रिका नावात दुरुस्ती
   * कार्यालयीन कालावधीतीत म्हणजे. 3 दिवसांत
3/ इतर राज्यातून आलेल्या अर्जदारास नविन तात्पुरती शिधापत्रिका देणे
  *. 15/ दिवसांत प्रकरणं निकालात काढणे बंधनकारक आहे
 4/.  रेशन कार्ड मध्ये नाव वाढविणे किंवा कमी करणे
*. गृहभेट आवश्यक असल्यास 30 दिवस अन्यथा  3/ दिवसांत प्रकरण निकालात काढणे बंधनकारक आहे
5/.  रेशनकार्ड मधील नाव कमी करणे
*. कार्यालयाने. 3/ दिवसांत प्रकरणं निकालात काढणे बंधनकारक आहे
6/ रेशनकार्ड मधील पत्ता बदलणे. 
*. 30 दिवसांत 
7/. रेशनकार्ड मध्ये नवीन जन्माला आलेल्या मुलांचे मुलींचे नाव वाढविणे
*. हे काम. शासकीय नियमानुसार. 1/  दिवसांत झाले पाहिजे
8/. शिधापत्रिकेत नोद असलेल्या लहान मुलांचे एकांके वाढविणे
*. कार्यालयाच्या नियमानुसार. हे काम. 1/ दिवसांत झाले पाहिजे
9/. हरवलेल्या रेशनकार्ड ऐवजी दुय्यम रेशनकार्ड देणें
*.  30 दिवसांत मिळाले पाहिजे
10/ फाटलेल्या/ खराब झालेल्या रेशनकार्ड ऐवजी दुय्यम रेशनकार्ड देणें. 
*. गृह भेट आवश्यक असल्यास. 30/ दिवस. अन्यथा 6/ कार्यालयीन दिवस
   वरिल प्रमाणे सर्व काम होत नाही त्यावेळी सर्वसामान्य जनता गोरगरीब लोक यांची चेष्टा लावली आहे सर्वांनी. 
      समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार जाहिरात प्रसिद्ध वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी
बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर
रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली
रेशन अधिनियम कायदा 2013 रक्षक समिती सांगली जिल्हा
मौलाना आझाद विचार मंच सांगली
माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा
संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे
9890825859

पहिले अपात्र नंतर पात्र कसे? खंडपीठाचा दणका

 दि.17 जुन 2021



आधी अपात्र नंतर पात्र ठरलेले स्विकृत नगरसेवकांना खंडपीठाची नोटीस : 13 जुलैला होणार सुनावणी


अहमदनगर - महापालिकेने स्वीकृत नगरसेवक म्हणून नियुक्त केलेल्या पाचजणांच्या निवडी बेकायदेशीर असून, या नियुक्त्यांमध्ये निकषांचे पालन झालेले नसल्याचा दावा मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल याचिकेत करण्यात आला आहे. नगरचे सामाजिक कार्यकर्ते शेख शाकीरभाई यांनी ही याचिका दाखल केली असून, खंडपीठाने राज्याच्या प्रधान सचिवांसह मनपाचे महापौर, आयुक्त, नवे स्वीकृत नगरसेवक असे मिळून नऊ जणांना नोटीसा काढल्या आहेत. याची सुनावणी 13 जुलैला रोजी होणार आहे. 


स्थानिक स्वराज्य संस्थांतील स्वीकृत नगरसेवकांच्या निवडी बाबतच्या शासनाच्या निकषानुसार मनपाने पाचही स्वीकृत नगरसेवकांच्या निवडी केल्या नसल्याचा दावा याचिकाकर्ते शेख यांनी केला आहे. महाराष्ट्र महानगरपालिका (नामनिर्देशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या) नियम 2012 चे नियम 4 (क) ते 4 (छ) नुसार पालिका प्रशासनाचे विशेष ज्ञान असणारी व्यक्तीनाम निर्देशित पालिका सदस्याच्या पदासाठी उमेदवार म्हणून नामनिर्देशित केली जाण्यासपात्र आहे. वैद्यकीय व्यवसायी, शिक्षण तज्ज्ञ, सनदी लेखापरीक्षक, अभियांत्रिकी पदवीधारक,अभिवक्ता, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, महानगरपालिकेचे सहायक आयुक्त, समाजकल्याणकार्यात गुंतलेल्या अशासकीय संघटनेचे पदाधिकारी यांची नियुक्ती नामनिर्देशितसदस्य म्हणून करता येईल, असे या निकषात स्पष्ट केले गेले आहे. 


पण मनपाने केलेल्या सर्व पाचही नियुक्त्या केवळ समाजकल्याण कार्यात गुंतलेल्या अशासकीय संघटनेचे पदाधिकारी याच एकमेव निकषात केल्या आहेत. त्यामुळे अन्य निकषांचे पालन झालेले नाही, असे म्हणणे शेख यांनी याचिकेत मांडले आहे. तसेच दि. 28 डिसेंबर 2018 रोजी महापौरांची निवड झाल्यानंतर त्यांनी घेतलेल्या पहिल्याच महासभेत स्वीकृत नगरसेवकांची नियुक्ती करणे बंधनकारक असताना व तसा प्रस्ताव नगरसचिव कार्यालयाने 23 जानेवारी 2019 रोजी महापौर वाकळे यांच्याकडे सादर केला. प्रस्तावानंतर त्यानुसार कार्यवाही झाली नाही. तब्बल 1 वर्षाने म्हणजे 3 जानेवारी 2020 रोजी महापौरांनी फेरप्रस्ताव सादर करण्याचे आदेश नगर सचिवांना दिले व त्यांनी त्याच दिवशी तसा फेरप्रस्ताव सादर केला. त्यानुसार 10 जानेवारी 2020 रोजी महासभा बोलावण्यात आली होती. या सभेसाठी शेळके, आढाव, शेटीया, आंधळे व बाबासाहेब गाडळकर यांचे प्रस्ताव आले होते. पण तत्कालीन आयुक्त व जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी पाचही प्रस्ताव निकषात बसत नसल्याने त्यांच्या नियुक्तीची शिफारस महासभेस केली नाही. महासभेने पाचही उमेदवाराचें अर्ज अमान्य करुन फेटाळले.


महापालिकेचे विद्यमान महापौर बाबासाहेब वाकळे यांनी 1 ऑक्टोबर 2020 रोजी मनपाचे पाच स्वीकृत नगरसेवक म्हणून संग्राम शेळके व मदन आढाव (दोन्ही शिवसेना), विपुल शेटिया व राजू कातोरे (दोन्ही राष्ट्रवादी) व रामदास आंधळे (भाजप) यांची नियुक्ती केली आहे. पण ही नियुक्ती स्वीकृत सदस्य निवडीसाठीच्या निकष व नियमानुसार झाली. तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे मनपा आयुक्तपदाचा असलेला पदभार हा आयुक्त श्रीकांत मायकलवार यांच्याकडे आल्यावर स्वीकृत नगरसेवक नियुक्तीचा फेरप्रस्ताव नगर सचिवांनी 10 जून 2020 रोजी महापौर कार्यालयास सादर केला व त्यानंतर 1 ऑक्टोबर रोजी महासभेचे आयोजन करण्यात आले होते. या महासभेत शेळके, आढाव, शेटिया व आंधळे यांचे जुनेच प्रस्ताव मंजूर झाले. तसेच गाडळकर (मयत) झाल्याने यांच्याऐवजी कातोरे यांचा नवा प्रस्तावमंजूर होऊन या पाचजणांची स्वीकृत नगरसेवक म्हणून नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. पहिल्या महासभेने अपात्र ठरवलेल्या पाच सदस्यांना नंतरच्या महासभेने पात्रठरवून त्यांची निवड केल्याने याविरोधात तसेच मनपा आयुक्तांवर शिस्तभंग कारवाई करण्याच्या मागणीसाठी प्रधान सचिवांकडे शेखर यांनी तक्रार दाखलकेली होती. विद्यमान महापौर बाबासाहेब वाकळे यांनी आपले कर्तव्य पार पाडण्यात दिरंगाई केल्याने त्यांचे मनपा सदस्यत्व पदावरून अपात्र ठरवण्याची मागणी केली होती. स्वीकृत नगरसेवक नियुक्तीची महासभा होण्या आधी 29सप्टेंबर 2020 रोजी तत्कालीन आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी मनपातील पक्षीय गटनेत्यांची बैठक घेऊन स्वीकृत नगरसेवक नियुक्तीबाबत त्यांची मते जाणून घेतली होती. मात्र, या बैठकीस शिवसेनेच्या गटनेत्या रोहिणी शेंडगे यांच्याऐवजी त्यांचे पती संजय शेंडगे तसेच काँग्रेसच्या गटनेत्या सुप्रिया जाधव यांच्याऐवजी त्यांचे पती धनंजय जाधव उपस्थित होते. गटनेत्यांनाच या बैठकीसउपस्थित राहण्याचा अधिकार असल्याने त्यांच्या पतींशी केलेली चर्चाही बेकायदेशीर आहे,असाही आक्षेप शेख यांनी या याचिकेत घेतला आहे. त्यावर प्रधान सचिवांनी मनपा आयुक्तांकडून अहवालही मागवला होता. पण राज्यसरकारकडून या प्रकरणात गंभीर दखल घेतली जात नसल्याने अखेर शेख यांनीखंडपीठात याचिका दाखल केली आहे.


पण नियमबाह्य झालेल्या या नियुक्त्या रद्द करून दोषींवर कारवाई करण्याकडे शासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने अखेर शेख यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली. त्याची सुनावणी 15 जुन रोजी मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता व न्यायमूर्ती आर. व्ही. घुगे यांच्या समोर झाली. न्यायालयाने 9 जणांना नोटीसा काढल्या आहेत. याचीकाकर्त्यांच्या वतीने अ‍ॅड.नितीन गवारे यांनी बाजु मांडली. त्यांना सहायक म्हणून अ‍ॅड.एस.व्ही. सलगर व अ‍ॅड.झेड. ए. फारुकी यांनी काम पाहिले. या प्रकरणाच्या प्राथमिक सुनावणीत सरकारच्यावतीने अ‍ॅड.एस.जे.कार्लेकर यांनी काम पाहिले. ख़ंडपीठाने या प्रकरणी राज्याच्या प्रधान सचिवांसह मनपा आयुक्त,मनपाचे नगरसचिव, महापौर तसेच स्वीकृत नगरसेवक शेळके, आढाव, शेटिया, कातोरे व आंधळे यांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत. 13 जुलैपर्यंत ते सादर करण्याची मुदत आहे. 



शेख शाकीरभाई

ग्रामसेवक / ग्रामविकास अधिकारी / आणि १५००/ प्रवास भत्ता

 


            ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी यांना रु ११०० इतका कायम प्रवास भत्ता दिनांक १/१/२०१२ पासून मंजूर करण्यात आला होता. सध्याची परिस्थिती पाहता शासनाने वाढती महागाई वाढते डिझेल पेट्रोल दर. अशा बिकट काळात सदर प्रवास भत्त्यात वाढ करण्याची मागणी. ग्रामसेवक संघटनेने केली होती. मला एक कळत नाही जिल्हा परिषद यांचेकडून नियुक्ती करण्यात आलेल्या अधिकारी व कर्मचारी यांना आपले हक्क व अधिकार मागण्यांसाठी संघटना करायची काय गरज आहे. कारणं हेतर सरकारी नोकर आहेत. म्हणजे सरकारी नोकरांना सुध्दा पळवाट म्हणून ग्रामसेवक संघटना करावीं लागते हे काय समजले नाही. ग्रामसेवक/ग्रामविकास अधिकारी संवर्ग ग्रामीण भागात ग्रामपंचायत सचिव म्हणून कार्यरत असलेले पद असून केंद्र शासनाच्या राज्य शासनाच्या जिल्हा परिषद ( स्व उत्पन्न) पंचायत समिती ( स्व उत्पन्न) योजना ग्रामीण स्तरावर राबवित असतात. म्हणजे सर्व पैसा शासनाचाच असतो. ह्यांनी आपल्या पगारातून कोणताही खर्च करण्याचे धाडस केलेलें नाही. शासनाने महत्वकांक्षी प्रकल्प/ अभियाने राबविण्याची जबाबदारी देखील ग्रामसेवकावर आहे. तसेच सर्व योजना प्रस्ताव. कृती आराखडे तयार करून वरिष्ठ कार्यालयास पाठविण्याची जबाबदारी ग्रामसेवक यांची असते. हे सर्व काम त्यांच्या नोकरीचा हिस्सा नाही कां ? शासन पगार कशासाठी देते ? विविध योजना प्रस्ताव ज्या त्या गावातच असतात परगावी हे सर्व राहण्यासाठी असतात मग त्यांना परगावी आपल्या घरी जाण्यासाठी शासन प्रवास भत्ता देतय का ? त्यांना ज्यासाठी नियुक्ती करण्यात आलेली आहे तेच काम करण्यासाठी कशाला महागाई प्रवास भत्ता हवा आहे 

              ग्रामपंचायत स्तरावरील मूलभूत गरजा पुरविण्याची जबाबदारी ग्रामपंचायती असून त्यासाठी लागणारे आर्थिक नियोजन घरफाळा पानपट्टी वृक्ष कर. शिक्षण कर. अशा विविध करामधून नियोजन केले जाते आणि शासनाच्या योजनांचे नियोजन पंचायत समिती. जिल्हा परिषद. महसूल विभाग. जिल्हाधिकारी कार्यालय. विभागीय आयुक्त कार्यालयात. बैठकीला हजर राहणे बंधनकारक आहे. हा त्यांच्या नोकरीचा व शासनाकडून मिळणाऱ्या पगाराचा भाग आहे आणि ते त्यांचे परम कर्तव्य आहे. ग्रामीण स्तरावर. दिवाबत्ती. पाणीपुरवठा. आरोग्य. विविध योजनांची घरकुल बांधकामे. तसेच गोळा होणारा. कर रुपात पैसा जमा करायला तालुक्याला जाव लागत बचत गट कर्ज मंजूरी साठी तालुका पातळीवर बॅंकांना भेटी द्याव्या लागतात. आवास योजनेंतर्गत घरकुल बांधणीसाठी सामान उपलब्ध करून देण्यासाठी त्यांच्यासोबत फिरावे लागते ग्रामपंचायती मार्फत केल्या जाणाऱ्या कामाच्या पूर्ततेसाठी ग्रामसेवकांना फिरती करावी लागते. या सर्व मुद्द्यांवर विचार केला तर ज्यांना शासन आपल्या गोरगरीब जनतेसाठी अधिकार व कर्मचारी म्हणून नियुक्ती करते त्यांना शासनाचा भरपूर पगार मिळतो. मग वरिल सर्व मुद्दे त्यांचे व शासनाचे परम कर्तव्य होऊ शकत नाहीं का ? मग कशासाठी प्रवास भत्ता द्यावा. 

          राज्यातील सर्व जिल्हा परिषदेतील ग्रामसेवक/ ग्रामसेवक अधिकारी यांना रु १५००/ इतका कायम प्रवास भत्ता लागू करण्यासाठी ९/ जून २०२१ रोजी शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. त्यासाठी काही अटी शर्ती सुध्दा घालण्यात आल्या आहेत. 

(१) जर ग्रामसेवक/ ग्रामविकास अधिकारी एखाद्या महिन्यात १५ दिवसांपेक्षा जास्त कालावधी रजेवर असल्यास त्या महिन्यांचा प्रवास भत्ता त्यांना दिला जाणार नाही. पण आज सर्व ग्रामपंचायती मध्ये. ग्रामसेवक उपस्थिती बाबत दिवस/ वार ठरविण्यात आले आहेत मग हजेरी आणि गैरहजर कोणत्या बेसवर ठरविले जाणार. त्यांना गावातच आपल्या कार्यालयात राहण्याचा निर्णय असून सुद्धा हे का राहत नाहीत मग. यांना प्रवास भत्ता देणे गरजेचे आहे का?

      (२) ग्रामसेवक/ ग्रामविकास अधिकारी यांनी त्यांना नेमून दिलेल्या फिरतीचया दिवशी इतकी फिरती प्रत्त्येक महिन्यात पूर्ण करायची आहे. सर्व. घरफाळा पानपट्टी वृक्ष कर शिक्षण कर. विविध घरकुल योजना. बचत गट निर्मिती. यासाठी यांना गावसोडून बाहेर जाण्याची गरज भासतच नाही. कारणं एका गावाला एकच ग्रामसेवक असतो आणि गावची लोकसंख्या जेमतेम असतें

      (३) केलेल्या फिरतीचया दिवसांचा आढावा दर तीन महिन्यांनी घ्यावा

        (४) ज्या महिन्यात विहित केलेल्या दिवसांपेक्षा कमी फिरती असेल त्या महिन्यांचा प्रवासी भत्ता दिला जाऊ नये

        (५) कायम प्रवास धारकाने पुढील महिन्याच्या नियोजन फिरती कार्यक्रम अगोदरच्या महिन्याच्या १० तारखेपर्यंत संबंधित गट विकास अधिकारी / सहाय्यक गट विकास अधिकारी यांना सादर करावा व त्यानुसार फिरती करावी लागणार आहे

          (६) उपरोक्त दैनंदिनी प्रत्त्येक महिन्याच्या पाच तारखेला सादर करावी व त्या दैनंदिनीस कार्यालय प्रमुख गट विकास अधिकारी/ सहाय्यक गट विकास अधिकारी यांनी मान्यता दिल्याशिवाय कायम प्रवास भत्ता अदा करण्यात येवू नये

       (७) या संदर्भातील संनियंत्रण परवेक्षक अधिकारी म्हणून उप मुख्य कार्यकारी अधिकारी ( ग्रा म) आणि वरिष्ठ अधिकारी यांनी करावी

              हे सर्व अधिकारी व कर्मचारी आपल्या ग्रामविकास करण्यासाठी गावातच आपल्या कार्यालयात निवासी राहिले तर शासनाचे दरमहा १५००/ वाचतिल आणि सर्वसामान्य माणसाला ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी यांच्यासाठी वाट बघायची वेळ येणार नाही. आपल्या गावात असणारे ग्रामीण रुग्णालय. यात. सापांची लस. कुत्र्याची लस. व दैनंदिन लोकांना होणारा त्रास म्हणजे सर्दी खोकला ताप थंडी वाजने. बाहेरील दवाखान्यात जाण्याचा सल्ला देणे. डिलिव्हरी पेशंट यांची. व्यवस्थित उपचार पद्धती आहे का ? अशा आजारांची औषधे उपलब्ध असणे गरजेचे आहे. ही आहेत का नाहीत हे आपणच बघावे लागणारं आहे. 

    समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

शाळा शुल्क निश्चित करण्यासाठी शिक्षण अधिकारींना निवेदन

 


शहरातील खाजगी शाळांनी शाळाशुल्क (स्कूल फि) निश्चिती'करून ती भरण्यास पालकांना सवलत देत विद्यार्थ्यांचे निकाल रोखून न ठेवता, व्हॉटसअॅप गृपमधून काढून न टाकता पुढील वर्गात प्रवेश द्यावा; अन्यथा जिल्हाधिकारी व शिक्षणाधिकारी कार्यालयावर विद्यार्थी पालकांसह मोर्चा काढून उपोषण, धरणे आंदोलन करण्यात येईल - क्रांतिसिंह विद्यार्थी पालक संघटना, ऑल इंडिया युथ फेडरेशनचा इशारा!

अहमदनगर (प्रतिनिधी) १४.६.२०२१

येथील महानगरपालिका शिक्षणाधिकारी सुभाष पवार यांना आज दि.१४ रोजी क्रांतिसिंह विद्यार्थी पालक संघटना आणि ऑल इंडिया युथ फेडरेशन यांच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन शहरातील खाजगी शाळा व्यावस्थापनाकडून शाळाशुल्क रक्कम (स्कूल फि) निश्चित करून विद्यार्थी व पालकांना ती भरण्यास सवलत द्यावी तसेच कोणत्याही विद्यार्थ्याचा निकाल रोखून धरू नये, त्याला शाळेच्या व्हॉट्सअॅप गृपमधुन काढून टाकू नये आणि पुढील वर्गात प्रवेश देत विद्यार्थी व पालकांना दिलासा द्यावा. याबाबतचे मागणीपत्र दिले.

     तसेच येत्या आठ दिवसांत याबाबींवर कार्यवाही न झाल्यास आपल्या व जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयावर शहरातील विद्यार्थी पालकांसह मोर्चा काढून धरणे व उपोषण आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला.




    याबाबत अधिक माहिती देताना क्रांतिसिंह विद्यार्थी पालक संघटनेचे कॉम्रेड भैरवनाथ वाकळे आणि ऑल इंडिया युथ फेडरेशनचे फिरोज चाँद शेख, कॉ.दिपक शिरसाठ यांनी सांगितले कि,

    गेल्या दोन वर्षांपासुन जगभरात कोविड-१९ च्या साथरोगाने धुमाकुळ घातलेला आहे. अहमदनगरमधेही तिच परिस्थिती आहे. त्यामुळे सर्व क्षेत्रात मोठ्या प्रमाणात आर्थिक व मानसिक नुकसान झालेले आहे. नागरिकांच्या नोक-या गेल्या, व्यापार धंद्यांचे मोठे नुकसान झालेले आहे. सरकारी लॉकडाऊनमुळे सर्व शाळा प्रत्यक्षात भरणे बंद झाल्या होत्या व ऑनलाईन शिक्षण सुरू होते. गेले वर्षभर विद्यार्थी घरी राहून ऑनलाईन शिक्षण घेत आहेत. ज्या पालकांची स्मार्ट मोबाईल, लॅपटॉप घेण्याची या संकटकाळात ऐपत नाही त्यांनी कर्जभानगडी करत ते घेतले आहेत. विद्यार्थ्यांचे सध्या घरुनच शिक्षण सुरू आहे.

   महाराष्ट्र शासनाने याबाबत स्पष्ट निर्देश दिले असतानाही अहमदनगरमधील काही खाजगी शाळांनी मागच्या वर्षी पालक व विद्यार्थ्यांकडून अवास्तव शाळाशुल्क वसुलण्याचा प्रयत्न केलेला आहे. काही पालकांनी ते भरले तर काही पालकांनी मागच्या वर्षीचे काही शुल्क भरणे बाकी राहिलेले आहे.

या शैक्षणिक वर्षात शहरातील खाजगी शाळा व्यावस्थापनाने विद्यार्थी व पालकांना शाळा अनिश्चित शुल्कासाठी मोठा तगादा लावलेला आहे. काही शाळांनी शुल्क भरल्याशिवाय रिझल्ट दिले जाणार नाही, असे मेसेज पाठवले आहेत. विद्यार्थ्यांना ऑनलाईनच्या गृपमधून काढून टाकले जाईल, असे कळविले आहे. आज काही विद्यार्थ्यांना गृपमधून काढून टाकून अवमान केलेला आहे.

   तरी आम्ही शिक्षणाधिकारी पवार साहेबांकडे मागणी करत आहोत कि,

    अहमदनगर शहरातील खाजगी शाळांनी कोविड-१९ च्या साथरोग काळात विद्यार्थी व पालकांकडून अनिश्चित, अवास्तव शाळाशुल्क आकारू नये. विद्यार्थ्यांचे शाळा शुल्काअभावी रिझल्ट रोखू नयेत तसेच शिक्षणाधिकारी यांनी शाळाशुल्क निश्चित करून पालकांस ते भरण्यास सवलत द्यावी आणि नविन शैक्षणिक वर्षाचे प्रवेश द्यावेत.

   शिक्षणाधिकारी म्हणून आम्ही मागणी करत आहोत कि, सर्व खाजगी शाळांनी त्यांची वार्षिक शैक्षणिक शुल्क रक्कम निश्चित करून त्याची एक प्रत शिक्षणाधिकारी कार्यालयाकडे व पालकांना सविस्तर कळविली पाहिजे.

    या मागणीपत्राद्वारे आम्ही याबाबत त्वरीत कारवाई करण्याची मागणी करत आहोत. अहमदनगरमधील खाजगी शाळांची त्वरीत 'शुल्क निश्चिती'करणे, विद्यार्थी व पालकांना शाळाशुल्क भरण्यास सवलत देणे व नविन वर्षाचे प्रवेश त्वरीत देणे.

    वरील मागण्या तातडीने आठ दिवसांत मान्य न झाल्यास आम्ही विद्यार्थी व पालकांसह लोकशाही मार्गाने शिक्षणाधिकारी व जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयावर मोर्चा काढून धरणे आंदोलन, उपोषण करणार आहोत. याची नोंद घेऊन शिक्षणाधिकारी यांनी त्वरीत कार्यवाही करून विद्यार्थी पालकांना दिलासा द्यावा.

    याद्वारे आम्ही शहरातील विद्यार्थी व पालकांना आवाहन करत आहोत कि आपल्या पाल्याबाबत कोणत्याही खाजगी शाळा व्यवस्थापनाने शाळाशुल्का अभावी (स्कूल फि) गैरवर्तणुक केली असल्यास क्रांतिसिंह विद्यार्थी पालक संघटना - ९४०५४०१८०० व ऑल इंडिया युथ फेडरेशन - च्या या नंबरवर तक्रार द्यावी. आम्ही आपल्यावतीने सरकार दरबारी न्याय मिळविण्यासाठी लढू.

या शिष्टमंडळात कॉ.तुषार सोनवणे, कॉ.अमोल चेमटे, तसेच कॉ.राजु नन्नवरे यांचा समावेश होता. या प्रश्नाच्या चर्चेसाठी शिक्षण मंडळाचे शिक्षणाधिकारी सुभाष पवार, पर्यवेक्षक जुबेर पठाण तसेच अरूण पालवे सरांची उपस्थिती होती.

दहन आणि दफन भूमी

 


दहन आणि दफन भूमी
                 भारतीय संस्कृती मध्ये दहन आणि दफन विधी भावनेचा आणि प्रत्त्येक समाजाच्या रितीरिवाज प्रमाणे होणारा विधी आहे. प्रत्त्येक समाजासाठी ग्रामीण भागात दहन आणि दफन भूमी साठी जागा उपलब्ध करून देणे ही ग्रामपंचायतीची जबाबदारी आहे कारण. आपल्यात एक म्हनं आहे "ज्याला जन्माला देवाने घातले त्याला. पुरणयासाठी. व जाळण्यासाठी जागा दिलीच आहे" यासाठी शासन विविध अधिकारी व कर्मचारी यांना वेळोवेळी शासन निर्णयानुसार काम करण्याचे निर्देश देत असते. व दहन आणि दफन भूमी साठी मोठ्याप्रमाणात आर्थिक पाठबळ उभे करत असतें. आज सुध्दा काही गाव ग्रामीण भाग असा आहे की तेथे. विविध समाजासाठी दहन आणि दफन भूमी उपलब्ध नाही. हे सर्वात मोठे दुर्दैव म्हणावे लागेल आज सुध्दा असी काही गाव आहेत तेथे दहन आणि दफन भूमी चार चार किलोमीटर वर आहेत. ही सर्वात मोठी शोकांतिका आहे. आज अशी कोणत्या गावात दहन आणि दफन भूमीची गरज असेल तर ग्रामपंचायतीकडे मागणी करा. 
            मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम ४५ नुसार सदर अधिनियमाला जोडलेल्या अनुसूची" एक " मधील " नोंद क्र ३७" अन्वये ग्रामीण भागात दहन/ दफन भूमीची तरतूद करणे त्या सुस्थितीत राखणे व त्या विनियमन करणे ही जबाबदारी ग्रामपंचायती वर सोपविण्यात आली आहे असे दिसून आले की राज्यातील बहुसंख्य ग्रामपयतीची आर्थिक परिस्थिती समाधानकारक नसल्यामुळे ही जबाबदारी ग्रामपंचायती पार पाडू शकत नाहीत या परिस्थितीत ग्रामीण भागातील ज्या गावात दहन/ दफन भूमी साठी ग्रामपंचायतीच्या मालकीची जमीन उपलब्ध नसेल अशा गावाच्या बाबतीत खाजगी जमीन संपादित करून देण्यासाठी होणा-या खर्चाची जबाबदारी शासनाने स्वीकारली आहे. त्यानुसार याबाबतीत सर्व समावेशक आदेश शासनाने दि. ९/८/१९८९ चे परिपत्रक निर्गमित केले आहे. त्यानुसार दसन/ दफन भूमी साठी आवश्यक तेवढी जमीन उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संबंधित अधिनियमाच्या तरतुदीनुसार जिल्हाधिकारी यांच्यावर सोपवण्यात आलेली आहे. व ज्या गावात दहन/ दफन भूमी साठी जागा उपलब्ध नाही किंवा उपलब्ध जमीन अपुरी आहे कशा सर्व गावांना आवश्यक तेवढी जमीन दि. ३१/३/१९९१ पर्यंत उपलब्ध करून देण्यात यावी असे स्पष्ट आदेश परिपत्रकानुसार देण्यात आले होते. त्यासाठी. २२३५ सामाजिक सुरक्षा व कल्याण या लेखाशिरषाखाली तरतूद जिल्हाधिकारी यांना शासनाकडून उपलब्ध करून देण्यात येते. परंतु लेखा शिर्षाखाली दहन/ दफन भूमी साठी करण्यात आलेली तरतूद दहन/ दफन भूमी साठी आवश्यक असलेल्या जागेची मागणी आली नाही या कारणासाठी परत करण्यात येते/ पुनविनियोजन करण्यात येते ही वस्तुस्थिती आहे. 
                दहन व दफन भूमी साठी सन २००१/२००२ या आर्थिक वर्षात रूपये २९.८२ लाख इतकी तरतूद करण्यात आली होती. त्यापैकी फक्त १२.५८ लाख इतकाच खर्च करण्यात आला. सन २००२/२००३ मध्ये रूपये २६.८१ लाख इतकी तरतूद करण्यात आली होती. त्यापैकी फक्त रुपये ९.७० लाख इतके अनुदान खर्च करण्यात आले. सन. २००३/२००४ या आर्थिक वर्षात रूपये २९.१९ लाख तरतूद करण्यात आली होती त्यापैकी फक्त ४.३० लाख इतकी तरतूद खर्च झाली आहे. सन. २००४/२००५ या आर्थिक वर्षात रूपये २७.७४ लाख इतकी तरतूद करण्यात आली होती त्यापैकी फक्त रुपये १२.३६ लाख इतकी तरतूद खर्च झाली आहे. सन. २००५/२००६ या आर्थिक वर्षात रुपये २७.१३ लाख इतकी तरतूद करण्यात आली आहे त्यातील जिल्हाधिकारी यांचेकडून प्राप्त माहितीनुसार बहुतांश तरतूदही खर्च करण्यात आलेली नाही. यावरून असे दिसून येते की आवश्यक निधी दहन व दफन भूमी साठी उपलब्ध असतानाही त्याचा योग्य वापर जिल्हाधिकारी/ मुख्य कार्यकारी अधिकारी/ यांचेकडून करण्यात येत नाही असे म्हणण्यास बाब आहे 
      राज्यातील अनेक गावांत दहन/ दफन भूमी साठी सार्वजनिक अथवा शासनाच्या मालकीची जमीन उपलब्ध नाहीत. या संदर्भात लोक लेखा समितीसमोर मा प्रधान सचिवांची साक्ष घेण्यात आली होती. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांचेकडून पाठविण्यात आलेली माहिती पाहता अजूनही राज्यात २११३ गावांमध्ये दहन व दफन भूमीची सुविधा उपलब्ध नाही असे स्पष्ट झाले आहे. तसेच दहन व दफन भूमी कडे जाणारया रस्त्यावर ८१ ठिकाणी अतिक्रमणे झाली आहेत. तर दहन व दफन भूमीवरील अतिक्रमणाची संख्या ९६ इतकी आहे. सर्व गावानी दि. ३१/३/१९९१ पर्यंत आवश्यक असलेली जमीन दहन व दफन भूमी साठी जमीन उपलब्ध करून देण्यात यावी. असे आदेश दि. ९/८/१९८९ चे परिपत्रकानुसार देण्यात आले होते. असे असतानाही अजुनही २११३ गावांमध्ये दहन व दफन भूमीची व्यवस्था. नसणे ही खेदाची बाब आहे. जिल्हाधिकारी यांनी पाठविलेल्या अहवालात बर्याच जिल्हा परिषदाकडून दहन व दफन भूमी साठी जमीन उपलब्ध नसलेल्या गावाबाबत प्रस्ताव त्यांना प्राप्त झाला नसल्यामुळे तसी व्यवस्था करता आली नाही असे स्पष्ट केले आहे. दहन व दफन भूमी उपलब्ध असणे ही प्रत्त्येक गावाची नितांत गरज असते तथापि त्यासाठी लागणार्या जमीनीचे संपादन करण्यासाठी केलेल्या तरतुदी पूर्णपणे खर्ची न पडणे ही चिंतनिय बाब आहे याबाबत लोकलेखा समितीने सन २०००/२००१ या वर्षाच्या अहवालात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तसेच लोकलेखा समितीच्या दि. २८/६/२००४ चे बैठकीत या संदर्भात संबंधितांविरोधात कारवाई करावी त्यांनंतर लोकलेखा समितीच्या दि ११/१०/२००५ चे बैठकीत. दहन व दफन भूमी साठी देण्यात आलेल्या व निधीचे योग्य प्रकारे विनियोजन झाले नसल्याचे पुन्हा समितीने नमुद केले असून लोकप्रतिनिधी सातत्याने या कामासाठी निधी मिळावा म्हणून आग्रह धरतात कर्तव्याचे वेळेवर पालन न झाल्यामुळे निधी अखर्चित राहिलयाबाबत स्पष्टिकरण देऊन यापुढे असे घडणार नाही याबाबत योग्य ती कारवाई करून केलेल्या कार्यवाहीची माहिती लोकलेखा समितीला सादर करावी असेही मत व्यक्त केले आहे. 
          जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पंचायत समितीनिहाय प्रत्त्येक गावांचा आढावा घेऊन संबंधित गावांमध्ये दहन व दफन भूमी साठी स्वतंत्र जमीन आहे किंवा कसे त्याची खातरजमा करून आवश्यक त्या ठिकाणी दहन व दफन भूमी साठी शासकीय जमीन उपलब्ध नसल्यास त्या ठिकाणी खाजगी मालकीची जमीन संपादन करण्याचा प्रस्ताव ग्रामपंचायती मार्फत उपलब्ध करून घ्यावेत व ते जिल्हा नियोजन व विकास महामंडळ यांच्या बैठकीत मांडून त्यास मंजुरी घेण्याच्या दृष्टीने कसोकशिने प्रयत्न करावेत. या संदर्भात प्रस्ताव जिल्हा नियोजन व विकास महामंडळ यांच्या बैठकी पुढे प्रस्ताव सादर न केल्यास संबंधित मुख्य कार्यकारी यांना जबाबदार धरण्यात यावे. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या संदर्भात त्यांनी केलेल्या कार्यवाहीची माहिती शासनास एक महिन्याच्या आत कळविणे बंधनकारक आहे
                दहन व दफन भूमी साठी जमीन संपादन करण्याचे प्रस्ताव जिल्हा नियोजन व विकास मंडळाकडे प्राप्त झाल्यावर जिल्हाधिकारी यांनी जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत सदर प्रस्तावावर त्वरित निर्णय घेऊन आवश्यकता असल्यास खाजगी जमीन संपादन करण्याचे दृष्टीने त्वरित कार्यवाही करण्यात यावी
          जिल्हा परिषद यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हाधिकारी यांनी एकामेकाशी समन्वय साधून राज्यातील सर्व गावात दहन व दफन भूमी साठी व्यवस्था करून देण्यासाठी प्रामुख्याने कार्यवाही करावी
         राज्यातील प्रकल्पामुळे अथवा धरणामुळे पुनर्वसन करावे लागले आहे अशा सर्व पुनर्वसित गावांचा आढावा घ्यावा व त्या पुनर्वसित अद्यापही स्मशानभूमीसाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करून देण्यात आलेली नाही अशा गावांमध्ये स्मशानभूमीच्या सोयी तातडीने उपलब्ध करून देण्याची कार्यवाही मुख्य कार्यकारी अधिकारी/ जिल्हाधिकारी यांनी करावी
        राज्यातील ब-याच गावांत दहन व दफन भूमी साठी सार्वजनिक अथवा शासनाच्या मालकीची जागा उपलब्ध नाही ही बाब लक्षात घेऊन सदर कल्याणकारी योजना परिणामकारक राबविण्यासाठी जिल्हा परिषद/ मुख्य कार्यकारी अधिकारी/ जिल्हाधिकारी दोघांनी योग्य प्रकारे समन्वय साधून दहन व दफन भूमी साठी शासनाकडून वितरित करण्यात येणारे अनुदान पूर्णपणे खर्च होईल हे पाहावे त्यात कोणत्याही परिस्थितीत बचत होणार नाही तसेच मंजूर अनुदान पुनविनियोजन करण्याची वेळ येणार नाही याबाबत दक्षता घ्यावी
       दहन व दफन भूमी कडे जाणारया रस्त्यावर तसेच दहन व दफन भूमीवर झालेली अतिक्रमणे त्वरित काढून टाकण्याच्या संदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी / जिल्हाधिकारी यांनी तात्काळ कारवाई करावी व यापुढे अशी अतिक्रमणे होणारं नाहीत याबाबत दक्षता घ्यावी. यात कुचराई करणारे अधिकारी व कर्मचारी यांचेवर कायदेशीर कारवाई करावी तसेच झालेली अतिक्रमणे काढण्याबाबत त्यांनी केलेली कार्यवाही व किती अतिक्रमणे काढण्यात आली आहेत याबाबतची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी/ जिल्हा परिषद / जिल्हाधिकारी / यांनी शासनास एका महिन्यात सादर करावी 
       शासनाने. वेळोवेळी शासन निर्णय जारी केले आहेत 
(१) २२/ नोव्हेंबर १९७८
(२) १२ जून १९८०
(३) १६ डिसेंबर १९८०
(४) २४ मे १९८५
(५) २६ नोव्हेंबर १९८६
(६) ४ मार्च १९८७
(७) ७ जून १९८८
(८) ३ डीसेंबर १९८७
(८) ९/ ८/१९८९
(९)२९ मार्च २००१
(१०(२/४/२००५
              सर्व विभागीय आयुक्त/ सर्व जिल्हाधिकारी/ सर्व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी/ प्रधान सचिव महसूल व वन विभाग/ वित्त विभाग/ नियोजन विभाग /आदिवासी विकास विभाग/ प्रधान सचिव/ग्रामविकास यांचें सवीय सहायक/ ग्रामविकास विभागांतील सर्व उप सचिव/ ग्राम विकास /जलसंधारण विभाग/ 
         आपल्या गावात दहन व दफन भूमी आहे का ?
समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार जाहिरात प्रसिद्ध वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी
बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर
रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा
रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा
मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा
माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा
संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे
९८९०८२५८५९

रेशन कार्ड वर्गवारी रद्द करा

 

रेशन कार्ड वर्गवारी रद्द करा

           अन्न ही आपली सार्वत्रिक गरज आहे. त्यांचे पुरेसे उत्पादन आणि सर्वांमध्ये वाटप होणे गरजेचे आहे आणि निकडीचे असते. त्यामुळे शेतीचे उत्पादन वाढवण्याच्या मोहिमा आखणे गरजेचे आहे देशांची अन्न धान्य गरज लक्षात घेऊन धान्य उत्पादन एकूण गरज लक्षात घेऊन ती पूर्ण होण्यासाठी खते बियाणे यांचा पुरवठा केला जातो शेतीचे उत्पादन वाढवण्याच्या आधुनिक पद्धतीना प्रोहसतान दिले जाते 
      १९७० साली"हरित क्रांती" ची घोषणा करण्यात आली धडक योजना आखून देश अन्न धान्य बाबतीत सवालंबी करण्याचा हा कार्यक्रम होता पुढील काळात " शवेतक्रांती किंवा दुधाचा महापूर"! या योजना साकारण्यात आल्या अन्नाच्या प्रश्नाचे रुप आपल्याला आढळले पण त्याचे दुसरें राजकीय रुप म्हणजे भडखती महागाई हे आहे अन्न धान्य मुबलक झाले परंतु गोरगरिबांना सकस अन्न मिळण्याचा प्रश्न तसाच राहिला त्यासाठी पुरवठा विभाग स्थापन करण्यात आला त्यासाठी शहरातून रास्त भावाने धान्य पुरवठा करण्याचा योजना कार्यान्वित राहील्या. पण स्वस्त दराने होणा-या पुरवठ्याचा दर्जा सुमार राहीला म्हणजे खरोखरच ज्याला गरज आहे त्याला अंत्योदय अन्न योजनेच्या लाभापासून वंचित ठेवण्यात आले. २००५ साली झालेला दारिद्र्य रेषेखाली कुटुंबाचा सर्वे करण्यात आला. शासनाने ठोस सूचना देऊन सुध्दा पुरवठा विभागाचे अधिकारी व कर्मचारी लोकांच्या उंबरठ्यावर जाऊन सर्वे करा असा शासन निर्णय आदेश होता पण एकही अधिकार व कर्मचारी सर्वसामान्य जनतेच्या घरापर्यंत न जाता नामांकित नगरसेवक. पुरवठा विभागातील कर्मचारी. रेशन दुकानदार. यांनी जाग्यावर बसून रिपोर्ट तयार केला. माहिती चुकीची देण्यात आली. अमुक नोकरीला आहे. अमुकाचया घरात गाडी. टिव्ही आहे. शेती आहे. मिळवती व्यक्ती आहे. राहण्यास घर आहे. अशी बोगस माहिती खरोखरच गरज आहे त्यांच्याबद्दल सांगून त्यांचा हक्क मारला आहे ज्याच्यात सरकारी नोकरी आहे. शेती आहे गाडी टिव्ही स्वताचे घर. भरपूर शेती असणारे बलाढ्य लोक दारिद्र्य रेषेखाली आपले बगलबच्चे या योजनेत सहभागी करण्यात आले. आणि यांनी गोरगरीब जनतेचा हक्क मारला आहे.
      राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिवेशनात २०१३ शासनाने गोरगरीब जनतेसाठी अमलात आणला राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम २०१३ केंद्र सरकारने दि ५/जुलै २०१३ पासून लागू केला आहे. यावर गोरगरीब जनतेची अन्न धान्य गरज शासनाने एक विशिष्ट वर्गवारी करून मिळावी यासाठी राज्यात दि १ फेब्रुवारी २०१४ पासून जारी करण्यात येत आहे. महाराष्ट्रासाठी ग्रामीण भागातील ७६-३२/ व शहरी भागातील ४५-३४/ नागरिक प्रत्त्येक महिन्यास अनुदानित दराने मिळण्यासाठी खरोखरच हक्कदार आहेत का ? याप्रमाणे महाराष्ट्र राज्यात एकूण. ७.००.१६.६८४ एवढा लाभार्थी इंषटाक देण्यात आला आहे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम २०१३ अंतर्गत पात्र लाभार्थी निवडीसाठी काही निकष शासनाने ठरवून दिले आहेत 
* लक्ष निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थे अंतर्गत अंत्योदय अन्न योजनेचे सर्व लाभार्थी या अधिनियमा अंतर्गत" अंत्योदय अन्न योजनेचे लाभार्थी " म्हणून पात्र असून बी पी एल सर्व लाभार्थी हे या अधिनियमान्वये "प्राधान लाभार्थी कुटुंब गटातील लाभार्थी" म्हणून विचारात घेण्यात आले पण आज खरोखरच ज्यांना गरज आहे तो या कोणत्याही निकषात बसलेला नाही
* राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम २०१३ अंतर्गत प्राधान लाभार्थी कुटुंब गटातील उर्वरित लाभार्थींची निवड करण्यासाठी शहरी भागात कमाल. रु ५९०००/ हजार पर्यंत वार्षिक उत्पन्न मर्यादा असणारे व ग्रामीण भागात रु ४४०००/ हजार वार्षिक उत्पन्न असणार्या ए पी एल ( केशरी) लाभार्थी पात्र आहेत. 
       नागरि सनद प्रमाणे शासनाने ठरवून दिलेला पगार म्हणजे रोजचा. ३५० रुपये महिन्याच्या चार सुट्ट्या वगळता. त्या शहरी असू किंवा ग्रामीण असो. त्यांचा महिन्यांचा पगार. होतो ८४०० रुपये म्हणजे वर्षाचा त्याचा पगार होतो एक लाख रुपये मग तो कोणत्याच योजनेत बसत नाही मग तो अंत्योदय प्रधान लाभार्थी कुटुंब योजनेचा लाभार्थी कसा असा कोण आहे कां तो वरिल प्रमाणे शासनाने वार्षिक उत्पन्न ठरवून दिले आहे त्यात आपला आणि आपल्या कुटुंबाचा खर्च वर्षाचा चालवित असेल म्हणजे बोगस आहे हे शंभर टक्के त्याला ज्यांनी या योजनेत सहभाग दिला अशा भ्रष्ट अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे का तुमचे मत काय आहे ? 
        अंत्योदय अन्न योजनेखाली सर्व कुटुंबांना प्रति शिधापत्रिका प्रतिमहा महिन्याला ३५ किलो अन्न धान्य व प्राधान लाभार्थी कुटुंबातील लाभार्थ्यांना प्रतिमहा ५ किलो धान्य देने अनुज्ञेय आहे. पात्र लाभार्थ्यांना रु ३/ प्रति किलो या दराने व तांदूळ रु २/ प्रति किलो या दराने गहू व रूपये १/ प्रति किलो या भावाने भरड धान्य देण्याची तरतूद सदर अधिनियमात आहे. 
          २०२० मध्ये कोरोना सारख्या महाभयंकर महामारी संकटाने थैमान घातले होते त्यावेळी केंद्र शासनाच्या वित्तीय पॅकेज अंतर्गत गरिब कल्याण योजना राबविण्यात आली होती त्यावेळी कोरोना काळात कोणीही उपाशी राहू नये म्हणून शासनाने अंत्योदय अन्न सुरक्षा योजनेत सहभागी असणारे व प्रधान कुटुंब सहभागी असणारे लाभार्थी यांना महिन्याला मिळणारा ३५ रेशन अन्न धान्य सोडून प्रति महिना प्रति व्यक्ती पाच किलो तांदूळ मोफत देण्याचा अगदी महत्वकांक्षी निर्णय घेतला होता. काही लोकांना प्रमाणापेक्षा जास्त अन्न धान्य उपलब्ध झाले त्यामुळे काही लोकांनी रेशनचा मिळणारा तांदूळ न खाता तोच तांदूळ जाद भावाने मार्केट मध्ये विकला आणि त्याच पैशांचा उच्च प्रतिचा तांदूळ आणून खाल्ला म्हणजे एका बाजूला कोरोना सारख्या महाभयंकर महामारी संकटाने गावात तालुका जिल्हा राज्य देश यामध्ये टाळेबंदी जारी करण्यात आली होती लोकांना काम नाही धंदा नाही त्यामुळे उपासमारीची वेळ आली होती आणि एका बाजूला अंत्योदय दिनदयाळ योजनेअंतर्गत म्हणजे दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना मोफत मिळणारा रेशन अन्न धान्य वाटप करून काय उपयोग झाला ? प्रधान लाभार्थी कुटुंबाला विकत अन्न धान्य वितरण करण्यात आले तेही मर्यादित. केंद्र शासनाच्या आत्मनिर्भर भारत वित्तीय सहाय्य पॅकेज अंतर्गत कोरोना काळात जारी करण्यात आलेल्या टाळेबंदी काळात परगावाहून. परजिल्ह्यातील परराज्यातील कामगार कामासाठी आलेले आहेत आणि टाळेबंदी मुळे अडकून पडले आहेत त्यांना कोरोना काळात कोणीही उपाशी राहू नये यासाठी मोफत. अन्न धान्य वितरण करण्यात आले तेही प्रति कुटुंब पाच किलो तांदूळ व चणा वितरण करण्यात आला कोणाला मिळाला कोणाला नाही म्हणजे वितरण व्यवस्था किती खिळखिळी आहे आपल्याला कळेल का ? एका बाजूला लोक उपाशी मरत असताना. सांगली जिल्ह्यात. २०२० मध्ये. विविध गावांतील राईस मिल मध्ये. टनामधये रेशनचा तांदूळ सापडतो. तो कोठून आला. याच योजनेचा मोफत तांदूळ जास्त झाला आणि लोकानी मार्केट मध्ये विकला आणि तोच तांदूळ आमचे कर्तव्य दक्ष पोलिस यांनी रेशनचा तांदूळ पकडला सलाम त्यांच्या कार्याला 
           अधिनियम अंतर्गत कलम ८ नुसार पात्र व्यक्तिस अन्न/ आहार न मिळाल्यास केंद्र शासन निश्चित करेल त्या कालावधी करीता व पध्दतीनुसार राज्य शासनाकडून अन्न सुरक्षा भत्ता घेण्यास त्या व्यक्ति हक्कदार असतील अशी तरतूद आहे 
  महिला सक्षमीकरण करण्याच्या हेतूने कलम १३ नुसार पात्र कुटुंबातील ज्येष्ठ महिला ही शिधापत्रिका करिता कुटुंब प्रमुख राहील अशी तरतूद आहे
   राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम २०१३ अंतर्गत योग्य व गरजू लाभार्थ्यांना सवलतीच्या दराने अन्न धान्य लाभ मिळावा या उद्देशाने" ज्यांना गरज नाही त्यांनी अनुदानातून बाहेर पडा " ही योजना सुरू करण्याचा निर्णय दि १९ आॅकटोबर २०१६ रोजी घेण्यात आला
          शिधापत्रिका प्रकार
पिवळी शिधापत्रिका. केशरी शिधापत्रिका. शुभ्र शिधापत्रिका असे विविध प्रकार आहेत 
       बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर चे वतीने आम्ही अशी मागणी करतो की रेशनकार्ड वर्गवारी रद्द करा आणि सर्वांना २/३ किलो प्रमाणे रेशन अन्न धान्य वितरण करा त्यामुळे शासनास मोठा हातभार लागेल आणि बोगस वर्गवारी नावावर अन्न धान्य उचल करणारे यांना चाफ बसेल काही रेशन दुकानदार गोरगरीब जनतेचा अन्न धान्य हक्क मारण्यासाठी तुमचं अन्न धान्य आले नाही. तुमचे नाव दिसत नाही. थम उठत नाही. आधार लिंक नाही. अशी विविध न पटणारी कारणें सांगून अन्न धान्य मधूनच गायब करुन जास्त भावाने विक्री करत आहेत त्यांना सुध्दा चाफ बसेल. संबंधित पुरवठा विभगात. गेल्या वर्षी वाटप करण्यात आलेला चणा टनात शिल्लक आहे त्यासाठी आपल्याविभागातील पुरवठा विभाग यांचेकडे चौकशी करा 
           यासाठी रेशनकार्ड वर्गवारी रद्द करा. अमुक रेशनकार्ड याला अन्न धान्य वितरण करा. असे म्हणण्याची गरज राहणार नाही
           समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार जाहिरात प्रसिद्ध वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी
बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर
रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा
रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा
मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा
माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा
संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे
९८९०८२५८५९

सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा

  सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा            अनुसूचित जाती जमाती. इतर मागासवर्गीय जाती जमाती. भटक्या विमुक्त...

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या