गिधाडे

 


         आपण आपल्या गावात प्राचिन काळापासून हे नाव ऐकत आलो आहे  मृत्यू झालेले जीव सुध्दा ही जात सोडत नाही एक म्हनं आहे की जनावरं किंवा कोणताही प्राणी मृत्यू झाला तर या गिधाडांना स्वप्न पडते आणि यांचें थवे चया थवे येथे उतरतात आणि मृत्यू झालेल्या प्राण्यांचा फडशा पाडतात तो असा की त्या जनावरांची फक्त हांडे दिसतात सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की पुरेपूर एखाद्याला संपविण्याचा जणू विडा उचलला आहे

      आज मानवरुपी गिधाड आपणास सर्वत्र पाहायला मिळतात ती म्हणजे आर्थिक लुबाडणूक.  सामाजिक दबाव. महिला अत्याचार.  कामगार लुबाडणूक. सर्वसामान्य माणसाला शासकीय अधिकारी व कर्मचारी यांचेकडून मिळणारी वागणूक.   वैद्यकीय सेवा. मेडिकल व्यवसाय.   किराणा दुकान. फळे भाजीपाला. महागाई.  अशी विविध प्रकारची गिधाडे आपणास दिसतात 

            रेशन विभाग ( पुरवठा विभाग ) यातून आपणास काय वागणूक मिळते आपणास माहीत आहे दारिद्र्य रेषेखालील कुटुंबात सदन असणारे ज्यांना गरज नाही असे लोक असतात. त्यांना रेशन मधून मिळवणारे अन्न धान्य खाण्यास योग्य वाटत नाही ते जादा दराने विक्री करतात त्याचा उपयोग गरजवंताला होईल पण तशी तरतूद केली जात नाही रेशन दुकानदार महिन्याला जेवढे रेशनकार्ड धारकांना अन्न धान्य मिळणार या लाभातून   तुमचे नाव दिसत नाही.  थम उठत नाही. आधार कार्ड लिंक नाही. वरून येत नाही. अशी एक नाही अनेक कारणे दाखवून आपला हक्क मारला जातो.  नविन रेशनकार्ड काढणे.  नाव कमी करणे. नाव वाढविणे. अन्न सुरक्षा योजनेत समावेश करणे.  अशी अनेक प्रकरणे महिने न महिने धुळखात पडलीं आहेत याचा अर्थ काय 

         सामाजिक दबाव आपण समाजप्रिय लोक आहोत  समाजात म्हणजे  एक कुटुंब असल्यासारखे आपण राहतो समाजातील चालीरीती सणवार. मृत्यू दहन दफन शिक्षण.  लग्न संभारभ. याचा आपणास अभिमान असतो आज समाजाच्या नावांवर आज सर्वत्र प्रत्त्येक जण आपापल्या परीने सत्ता आपला दबदबा निर्माण करण्याकडे कल आहे  समाजातील लोकांना वाळीत टाकण्याची भीती घालून पैसा उकळणे. जात पंचायतीच्या नावाखाली जातक अटि घालणे तुम्ही पंचांच्या निर्णयानुसार वागले पाहिजे असे निर्बंध घालणे अशी विविध प्रकारची बंधने घातली जातात याला काय म्हणायचे

           जननी जन्म जन्मभूमी जय. एक महिला आई बहीण वयीनी. आजी. या सर्व नात्याची आठवण आपणास महिला दिनाच्या. दिवशी आपणास आठवतात. पण खरोखर पाहिले तर  आज महिला आपल्या घरातच सुरक्षित नाही. बाहेर आपण पाहतो शाळेत जाणाऱ्या मुली सुरक्षीत नाहीत. अॅसिड हल्ले. बलात्कार. अपहरण. छेडछाड. लज्जा उत्पन्न होईल असे वक्तव्य करणे. अशा विविध समस्यांना महिलांना मुलींना रोज सामना करावा लागतो 

                शाळेत जाणारी मुलगी. बाजारात बाजार आणण्यास गेलेली मुलगी परत घरात येई पर्यंत तीची आई वडील घराच्या दरवाज्याकडे डोळे लावून बसतात कारणं बाहेर भली मोठी गिधाड फिरत असतात आपल्याला आपल्या संस्कृतीची ओळख करून देणारी महिला आज सुरक्षित नाही  महिलांना. वेश्याव्यवसाय करण्यास प्रवृत्त करणारे आपणातीलच आहेत . त्यांच्या वरिल. अन्याय दूर करण्यासाठी महिला कायद्यात सुधारणा करण्याची गरज आहे बलात्कार करणार्या व्यक्तिला पोलिसांच्या ताब्यात न देता जनतेच्या ताब्यात द्या. महिला वावर जास्त असणाऱ्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत 

    त्यामुळे उनाड फिरणारा या गिधाडांना चाफ बसेल 

            कामगार संघटीत आणि असंघटित कामगार असे दोन प्रकार असतात त्यात मोलमजुरी करणारे. बिगारी काम करणारे. बांधकाम क्षेत्रातील कामगार यांना  वेतन जेमतेम असते. त्यातूनच अडाणी गरजू व्यसनी गरिब अशी छाप यांच्यावर पडलेली असते    महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई यांचे कडून अशा बांधकाम व्यावसायिक कामगार यांच्यासाठी १९ कल्याणकारी योजना राबविण्यात येतात त्यात प्रामुख्याने कुटुंबातील. मुलं. वैयक्तिक कामगार. यांना भविष्य निर्वाह करण्यासाठी विविध योजना राबविण्यात येतात या योजना मिळविण्यासाठी कोणतेही एजंट दलाल यांची गरज भासत नाही. पण कामगार हितचिंतक आहे असा आव आणून आज जागोजागी विविध कामगार संघटना सेवाभावी संस्था युनियन व इतर माध्यमातून बेमाफी फि घेवून कामगार नोंदणी केली जाते   लाभ मिळवून देण्यासाठी कामगारांकडून मंडळातून मिळणाऱ्या लाभातून मोठा वाटा काढून घेतला जातो  बोगस कामगार नोंदणी केली जाते बांधकामासी कोणताही संबंध नसणारे लोक आज मंडळांचा लाभ संघटना आणि सहाय्यक कामगार आयुक्त मधील अधिकार व कर्मचारी यांच्या तुम्ही खा आम्ही खातो असा फंडा वापरला जातो  अशी बरीच प्रकरणे आहेत लिहायला वेळ कमी पडेल मग मला सांगा यांना काय म्हणता येईल मृत्यू झालेल्यांना खाणारे बरे ही तर जीवंत माणसांना या मार्गाने खात आहेत

        आत्ता सर्वात मोठा प्रश्न आहे तो म्हणजे एखाद्या व्यक्तिने आपल्यावर अन्याय झाला आहे त्याचा न्याय मिळावा जाब विचारता यावा यासाठी. शासकीय आॅफिस.  ग्रामपंचायत. पंचायत समिती.  जिल्हा परिषद. तहसिलदार कार्यालय अंतर्गत येणारे सर्व विभाग. जिल्हा अधिकारी. अशे सर्व शासकीय क्षेत्रातील आॅफिस मध्ये निवेदन.  तक्रार अर्ज. मागणी अर्ज. स्मरणपत्र. बंद. आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन. अशा विविध विषयांवर वेळोवेळी अर्ज करत असतात पण आजपर्यंत माझ्या पाहण्यात नाही की कोणत्याही शासकीय आॅफिसने कोणत्याही पत्र व्यवहाराचे लेखी उत्तर दिले नाही  असे का ? आपण लोकशाही राज्यात आहोत. लोकांनी लोकांच्या साठी तयार केलेले राज्य आहे पण सर्वसामान्य जनतेला काहीच किंमत नाही. एकाधा व्यक्ति उपोषणाला बसतो पण कोणीही त्या उपोषण स्थळी जाऊन भेट देत नाही याउलट एखाद्या नामांकित व्यक्तिच्या वाढदिवस कार्यक्रमाला उपस्थित असते हे काय आहे  शासनाने गोरगरीब जनतेला न्याय मिळावा म्हणून शासकीय अधिकारी व कर्मचारी यांची नेमणूक केली आहे पण खरोखर एक विचार येतो शासकीय अधिकारी नावालाच आहेत यांच्या किल्ल्या राजकारणी लोकांच्या हातात आहेत 

        यांना काय म्हणता येईल मृत्यू झालेल्यांना खाणारे बरे पण जीवंत लोकांना खाणारे कोण ?

        आपणं डॉ यांना देव मानतो आज आपणं बघतो की वैद्यकीय सेवेचा व्यवसाय सुरू केला आहे  दवाखान्यात दाखल झाल्यापासून फी आकारण्यास सुरवात होतें ती अमुक आजारासाठी अमुक अशी नाही तोंडाला येईल ती फी. दवाखान्यात मेडिकल त्याच डॉ लोकाच मग त्याच्या उपचार घेताय म्हणून त्यांचे औषध त्यांच्याच मेडिकल मध्ये मिळणार दुसरीकडे मिळणार नाही. औषधांची किमंत किती आहे हे विचारायचे नाही. पेशंट बरा होऊ अथवा नाही यांचे बिल माफात झाले की सांगितले जाते तुमचा पेशंट दुसरीकडे हालवा. ?  पेशंट मयत झाल्यास पैसे भरल्याशिवाय मृतदेह ताब्यात दिला जात नाही. आपण भावनिक असतो आपला व्यक्ती मयत असतो आपण ईकड १०/२० टक्के नी पैसे काढतो आणि यांच्या मढयावर घालतो  मेडिकल हा एक पैसा मिळवण्याचा मार्ग आहे  दहा गोळ्यांचे पाॅकीट. ५० रुपये म्हणजे पाच रुपयांला एक गोळी त्याची विक्री दहा रुपये प्रमाणे केली जाते. सलाईन बाॅटल. ४० रु मेडिकल वाले विकणार १०० रु डॉ तीच सलाईन बाॅटल अडमिट असणार्या पेशंटला  लावली की त्याची किंमत खाट भाडे. आय सी यु चार्ज वेगळा. जनरल चार्ज वेगळा. म्हणजे सर्व मिळून दिवसांचे.  कमीत कमी १०/००० हजार बिल होत असावे. म्हणजे आय सी यु मध्ये पेशंटला कोणती वैद्यकीय सेवा दिली जाते हे नातेवाईक यांना सुध्दा माहिती नसते. आणि आपण विचारत नाही. मी पाहिले आहे. एका तासांपूर्वी व्यवस्थित बोलत असणारा पेशंट नाहिसा होतो. मयत असणार्या पेशंटला सुध्दा आॅकसिजन वर ठेवून काही डॉ पैसे उकळतात. दवाखान्यात कोठेही  रुग्ण हक्क सनद लावली जात नाही. वैद्यकीय सेवेप्रमाणे रुग्णांचे बिल आकारण्यात यावे  आपण विचारत नाही लक्ष देत नाही. आणि त्यामुळे वर्षाला एक मजला डॉ वाढवत आहेत जागोजागी मोठ्याप्रमणात माया गोळा केली आहे. महिला बाबतीत  बाळंतपण काळात. नैसर्गिक रीत्या जरी बाळंतपण होत असेल तरी सुद्धा सिझर करण्याचा सल्ला दिला जातो 

      .  मग यांना काय म्हणता येईल आपण विचार करा. सजग नागरिक व्हा प्रश्न विचारा नाहितर ही अशी अनेक ठपून बसली आहेत कवा पड पडत्या आणि मी खातोय 

       समजा काही कारणांमुळे एखाद्या गावात तालुका जिल्हा राज्य देश बंद  किंवा लाॅकडाऊन करण्यात आला की मग किराणा दुकानदाराचे सोनं होतंय कारण. जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत ही दुकाने जसे. किराणा. दुध. भाजीपाला फळे. यांना सुट देण्यात येते. पण वेळेचा आणि सर्वसामान्य जनतेच्या वेळेचा फक्त फायदाच करुन घेण्यासाठी. मालाचा दर डबल केला जातो. मग. तेल. शेंगदाणे. गुळ. ज्वारी. गहू बाजरी. मका. व अन्य किराणा माल. अगोदर सटाॅक केला जातो आणि मग आम्हाला माल मिळत नाही असे कारणं दाखवून जनतेला लुटले जाते  नासका कुजक्या. भाज्या फळं विकली जातात. अशा जीवनावश्यक वस्तूंच्या विक्री करणारे दुकानदार त्यांचेवर कोणाचा अंकुश आहे का ? यांना काय म्हणता येईल

         विविध उत्पादनांची आज आपणं मार्केटला.  निर्मिती होताना बघतो. तयांची मोठ्याप्रमाणात टेलिव्हिजन वृतमानपत्र. व विविध माध्यमातून आपल्या उत्पादनाची जाहिरात करतात एका वर एक मोफत पाकिटावर किंमत जास्त आत माल कमी. तेल किलोचा भाव वेगळा लिटरचा वेगळा  आज आॅनलाइन शापिंग च याड प्रत्येकाला लागलंय किंमत अगोदर भरुन घेतलीं जाते अन्यथा पॅकिंग फोडण्याच्या आधी आत काय आहे कसे आहे ते आपल नशीब. अशी एक नाही अनेक गिधाड आपल्या भोवती फिरत आहेत कवा कोण सापडतो त्या टार्गेट मध्ये. हा सर्वात मोठा प्रश्न आहे 

        यांना काय म्हणता येईल तुमच्याकडे उत्तर आहे का ? 

        बॅंक. पतसंस्था. विविध सोसायट्या. पतपेढी. फायनान्स कंपन्या. खाजगी सावकार.  सरकारमान्य सावकार. भिशी मंडळे. अशा विविध आर्थिक उलाढाल करणारी माध्यमे आपण बघतो  त्यात एक म्हनं आहे. * ऊस मुळासकट खाल्ला. * याचा अर्थ असा होतो की  एखाद्याने एखाद्या वित्तीय संस्थेकडून कर्ज घेतले तर त्यावर व्याज किती आकारण्यात आले आहे त्या कर्जाला मुदत किती आहे. जामीन कोण आहेत याचा पाठपुरावा आपणच करायचा असतो. मी पाहिले आहे की अशी कर्जे काढणारे एक तर फास लावून घेतात अन्यथा आपले गाव सोडून जातात आपलीं सर्व संपत्ती विकून सुध्दा अशी कर्ज भागत नाहीत ती म्हणजे आपल्या गलथानपणामुळे. आज खाजगी सावकारकी बर्याच प्रमाणात वर डोकं काढत आहे. व्याजाला व्याज. घरदार शेतीवाडी लिहून घेतलीं जाते वेळ पडल्यास घरातल्या महिलांना सुध्दा वेठीस सरकारी लाईसनस देण्याची तरतूदही आहे त्यामुळे त्याला सरकारमान्य सावकारी म्हणले तर वावगे ठरणार नाही  धरले जाते अशी बरीच गिधाड आपणास आपल्या भोवती दिसतात त्यावर शासन अंकुश नाही 

      यांना पाठबळ कोण देत विचार करा उत्तर सापडेल 

       अशी बरीच मोठी गिधाड आपणास खाण्यास तयार आहेत  त्यातच सत्तेची लालसा असणारे आपला दबदबा कायम ठेवण्यासाठी कोणत्याही स्तरावर जातील आजची तरुण पिढी यांना बळी पडत आहे सवलत. शोषण. यातला फरक समजून घ्या 

           समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार जाहिरात प्रसिद्ध वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

 संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

घृणा...

रोग मोठा का ? माणूस - IS DISEASE BIGGER THAN HUMAN ?- अ.MUNDE ...

मुलीने केली आईची अंतिम इच्छा पूर्ण- Last wish of mother...

शेख सरांचे रुपात मला विठ्ठलाचे दर्शन झाले. - संदीप दंडवते Oxygen shortage....

घृणा

 


     या शब्दाचा अर्थ फार मोठा आहे चालू वेगाने धावणाऱ्या वाहनाला जीवनाला थांबण्यासाठी लावला जाणारा अडसर किंवा एखादी वस्तू वेळ म्हणजे घुणा होय 

     जरा मागें जाऊया खेडेगाव साधी झोपडी वजा मातीची घरे जी उन्हाळ्यात थंड असायची. पावसाळ्यात उबदार असायची कृत्रिम वारे घेण्याची गरज भासली नाही घरे जरी साधी असली तरी राहायला जागा कमी असलीं तरी मनात एकोपा होता एकामेकांच्या सुखात दुःखात सहभागी होत होते सर्व एकामेकांच्या विचार घेत होते उंची कपडे घालायला नव्हती पण मन स्वच्छ होती कुचेष्टा कमी पणाची वागणूक नव्हती साध्या वेशातील लोक रानांत वस्ती आजुबाजुला हिरवळ उंच उंच डोंगर कपारी झुळझुळ वाहणारे झरे तुथडी भरून वाहणार्या नद्या सर्व कसे अगदी स्वच्छ असे शिक्षण घेण्यासाठी पारावरची अन्यथा गावातील देवळातील शाळा बेमाफी फि नाही पण शिक्षण मनासारखं होत मोकळी हवा रोजच्या रोज ताजे वातावरण रोज उगवणारा नितळ तेज असणारा सुर्य स्वच्छ किरणे कसलही प्रदुषण नाही केमिकल नाही कारणं त्यावेळी आपल्या आशा आकांक्षा इच्छा कमी होत्या खायला दुध तुप लोणी भरपूर भाजीपाला बिगर केमिकल्स लग्न संभारभ साधे पध्दतीने विविध कार्यक्रम साध्या पद्धतीने व कसलही ध्वनी प्रदुषण नाही जास्त धामधूम नाही कचासलाही आजार नाही दात घासायला बाभळीचे ठेरे कडुलिंबाच्या काड्या. मी पाहिले आहे की काहीजण मातीने दात स्वच्छ करत होते तरी त्यांचे दात शंभर वर्षे टिकत होतें कोणतेही कोलगेट नाही कसलीही पाउडर नाही रानात काबाडकष्ट करणारे लोक कधी यांचें गुडघे दुखले नाही त्यांना खाल्याले पचवायसाठी फिरायला जाण्याची गरजच नव्हती लोक प्रातविधी करायला सुध्दा चालत एक किलोमीटर चालत जात होते करमणुकीचे साधन रेडिओ होता गावात एकाच घरात टिव्ही असायचा 

              काळ बदलला आणि आपल्या अशा आकांक्षा वाढल्या खाण्यापासून सर्व सुविधा घरातच आल्या आणि येथून आपला व्यायाम थांबला वाढणारया लोकसंख्येमुळे जागा कमी पडू लागली लोक जंगल तोडायला सुरुवात झाली आणि आपलीं अधोगती चालू झाली जागोजागी सिमेंट जंगल उभी राहिली वाढत्या लोकसंख्येमुळे हाताला काम नाही त्यामुळे बेरोजगारी वाढली आणि एम आय डी सी विविध केमिकल कारखाने सुरू होण्यास सुरुवात झाली त्यामुळे या प्रगतीमुळे आपल्या हाताला काम मिळाले हातात पैसा येण्यास सुरुवात झाली मग आपल्या खाण्यात पिण्यात बदल झाला खाण केमिकलच राहणं बदललं गाड्या आल्या चालन बंद झाले मुल पारावरचया शाळेतून शहरात शिक्षण घ्यायला लागली बेमाफी फि काहीजणांनी मुल मुली सांभाळण्यासाठी होस्टेलमध्ये शिक्षण घेण्यास पाठवली आणि व्यक्तिून सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत घड्याळाच्या काट्याप्रमाणे धावायला लागला माणसाला विमानांची गती आली जीवन व्यवस्थित चाललें होते वरिल प्रमाणे सर्व काही सुरळीत चालू होते एक बाजू आपण बघितली पण एकाबाजूला मोठा खड्डा पडला तो म्हणजे विविध कारखाने केमिकल कंपनी एम आय डी सी या माध्यमातून आपणांस फायदा झाला पण हे सर्व मिळवताना आपण या सर्व औधौगिक विकास यामधून बाहेर पडणारे वेष्टज केमिकलचे पाणी बाॅयलर मधून बाहेर पडणारा धूर यामधून होणारें प्रदुषण घाण पाणी नदीत सोडले जाते त्यामुळे नदी प्रदूषणात वाढ पाणी अस्वच्छ दुर्गंधीयुक्त त्यामुळे व निघणारा धूर यातून विविध रोग व्हायरस निर्माण होण्यास सुरुवात झाली मलेरिया. डेंग्यूचा प्रादुर्भाव विविध तापाचे आजार मधूमेह व कॅन्सर बीपी काविळनुर्वात क्षय. फुफ्फुसाचे विविध आजार दमा टिबी. मानसिक व शारीरिक दृष्ट्या अपंग मुले. असे एक नाही अनेक रोगराई आपणच आणली आहे मला काय पूर्ण माहिती नाही पण आपण जी रोज श्वासोच्छ्वास करताना विविध असे अनेक व्हायरस आपण घेत असलेल्या श्वासा वाटे आपल्या शरीरात जातात पण त्यामुळे आपणांस जीवीत हाणी होतं नाही पण यातूनच असे काही व्हायरस निर्माण झाले की त्याने मानवी जीवन अगदी हालवून ठेवले ते आपण गेल्या. २२/२३ मार्च पासून भोगतो आहे

                आणि असा एक व्हायरस आज आपल्या जीवन मरणावर आला आहे जगण्यासाठी विमानांप्रमाणे धावनारा माणूस जीव वाचवण्यासाठी घरातच बसून राहिला आहे शासन या जीवघेण्या आजारांपासून जनता व सर्व सामान्य माणूस वाचावा म्हणून वेळोवेळी लाॅकडाऊन करत आहे घरातच रहा सुरक्षित रहा असा नारा शासन व शासनाचे अधिकारी व कर्मचारी डॉ नर्स सामाजिक संघटना सेवाभावी संस्था मोठा प्रयत्न करत आहेत आपणं रोगांपासून संरक्षण व्हावे म्हणून आपली व आपल्या कुटुंबाची काळजी न करता पोलिस बांधव अहोरात्र रस्त्यावर उभे आहेत पण आपणास अजून सुध्दा वेळेच गांभीर्य नाही

             आज. मोठे लग्न नाही वाढदिवस मुंजी जावळ. विविध पार्ट्या विनाकारण रांत्र दिवस रस्त्यावर फिरणे चौकात घोळका करून गुटखा तंबाखू रात्र रात्र चालणारे बिअर बार डान्स बार यातून होणारी गुन्हेगारीत वाढ वाढणारे गुन्हेगार वाढणारे गुन्हे त्यातून तयार होणारे टोळीयुद्ध गॅगवार. जागोजागी तयार होणारे गुंड यामुळे महिला मुली याचं जीवन धोक्यात आले आहे आपण कोणाच्यात जात नाही कोणाला आपल्यात येवून देत नाही. पाऊना पयी त्यांनाच काय पण आपला भाऊ बहिण हे सुद्धा एकामेकांच्यात जाऊ येवू शकत नाहीत आत्ता लग्नात जास्त माणसं नाहीत मोठ्या मोठ्या पंगती नाहीत अनाठायी खर्च नाही वाढदिवस फॅशन बंद लग्न करायची एक पद्धत सांगतो काही जणांनी दोन चाकी गाडीवरून जाऊन लग्न केले माझा हा येणार आहे थांबा म्हणने बंद झाले जागोजागी मदत देण्यास सुरुवात झाली. स्थानिक लोकांनी फुलनाही फुलांची पाकळी सारखी मदत केली जागोजागी लोकांना काम नाही त्यामुळे हातात पैसा नाही उपासमारीची वेळ आली त्यावेळी जेवने चालू झाली. मदत केली पण त्यात आम्ही दिले याचा पुरावा म्हणून प्रत्त्येक क्षणाचे फोटो काढले. एकच घटक सोडला तर तो म्हणजे पोलिस निरीक्षक पी आय डी वाय एसपी यांचेकडून सुध्दा बरीच भरीव मदत झाली पण कोठेही फोटोग्राफी नाही कसलाही गाजावाजा नाही केंद्र शासनाच्या वतीने आत्मनिर्भर योजने अंतर्गत परगावाहून असलेले मजूर. ब. गटातील म्हणजे ज्यांना धान्य मिळत नाही यांचेसाठी एक महिना मोफत तांदूळ दिला कोणाला मिळाला कोणाला नाही अंत्योदय दिनदयाळ योजना अंतर्गत. त्यांना महिन्यांचा. २/३ किलोचा महिन्यांचा अन्न धान्य वितरण करून पर माणसी पाच किलो मोफत तांदूळ दिला पण ज्यांच्या शिधापत्रिकेवर नाव जास्त आहेत त्यांना हा रेशनचा तांदूळ जास्त झाला त्यांनी तो तांदूळ मार्केटमध्ये १०/१२/किलोने विकला. म्हणून एका बाजूला जनता उपाशी मरत होती आणि त्याचवेळी आपल्या जिल्ह्यात जागोजागी टनांपर्यंत. रेशनचा तांदूळ सापडत होता म्हणजे शासन वाईट नाही ज्यांना मदत केली ती लोक वाईट आहेत 

     रुग्ण संख्या एवढी झपाट्याने वाढली की आॅकसिजन कमतरता दवाखान्यात बेड नाही सर्व सामाजिक हाॅल मस्जिद. दवाखाने यांचा उपयोग रुग्णांना उपचार देण्यासाठी. दवाखान्यात कन्व्हर्ट करण्यात आले शासनाने महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजना व्हायरस रोगी साठी चालू केली त्यामुळे सर्वसामान्य माणसाला मोठा आधार मिळाला पेशंटला भेटण्यास मनाई कोणी मयत झाले तरी कोण कुणाच्याही जात नाही कोण आले नाही कोण वाट बघत नाही मृत्यू तांडव भयानक होते दवाखान्या पासून पैसे उकळणयाचे काम चालू ते मयत जाळण्यापरयणत बेमाफी पैसा उकळला जात होता आपल्या प्रिय माणसाचा शेवटी चेहरा सुद्धा दाखविला जात नव्हता जागोजागी असा प्रकार पाहावयास मिळत होता की लोकांना दहन देण्यासाठी जिथे जागा मिळेल तिथे त्यांना दहन दिले जात होते मृतांचे प्रमाण वाढले अशी वेळ आली की अर्धवट जळालेल्या अवस्थेतील प्रेताचे कुत्री लचके तोडून खायला लागले सर्व प्रकार भयानक होता 

                  थोडे प्रमाण व्हायरस रोगांचे कमी आले पुन्हा एकदा सर्वजण मागचा प्रकार विसरून कामाला लागले पण एक वर्ष व्हायरस रोगाच्या भितीने घरातच अडकून पडलेल्या कुटुंबांचे घरफाळा. लाईट बील. पानपट्टी. बॅंक कर्ज. पतसंस्था. भिसी. कट्टा भिसी. लोकांचे देण. रोगाच्या काळात दुकानदारांची उधारी. असे एक नाही अनेक प्रकरणे आ वासून उभी राहिली लोकांना आपण घरातच होतो त्यामुळे वरील सर्व करांची रक्कम सरकारने माफ करावी यासाठी बर्याच समाजसेवकानी जनतेला खोटी आश्वासने देऊन सदर कर न भरण्यासाठी भरिव घातले पण सर्व व्यर्थ झाले शेवटी दंड आणि दंडाला व्याज लावून आपणास जगविणारयानी रक्कमा वसूल केल्या जप्ती. लाईट बंद करण्याची धमकी दिली गेली तेव्हा एकही समाजसेवक पुढे आला नाही जनता पूर्णपणे भरडली गेली सर्वात मोठा खड्डा पडला तो म्हणजे. एम पी सी स्पर्धा परीक्षा. पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण वर्ग. अॅकडमी. यांनी वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे जानेवारी महिन्यात मनमानी फि भरुन घेतलीं तसेच. परगावी शिकण्यास जाणारी मुलं मुली. हाॅसटेल. मध्ये व्यवस्थित शिक्षण मिळत म्हणून त्यांच्या पालकांनी कमीत कमी. ४० हजार ते एक लाखापर्यंत फी भरली आणि मार्च मध्ये आणि आत्ता सर्व मुलं मुली. व्हायरस रोगाच्या भीतीने घराकडे पाठविण्यात आली पण या मुलांच्या पालकांकडून शिक्षणाच्या नावाखाली भरलेल्या मनमानी फि याच काय. ? मोठा प्रश्न आहे. ? यातून वेगळा मार्ग काढला आॅनलाइन पध्दतीने शिक्षण शाळेत शिकवून ज्या मुलांना समजतं नाही त्यांना आॅनलाइन अभ्यास करणे सोपे आहे का ? याचा अर्थ मुलांच्या पालकांकडून शिक्षणाच्या नावाखाली भरलेल्या लाखों करोडो रुपयांचे काय ? ते शिक्षण संस्था मागे देणार काय ? शिक्षण घेण्याची इच्छा असणारी मुले पण घरची परिस्थिती बेताची बिकट असल्याने त्यांना स्मार्ट फोन मिळाला नाही म्हणून काही मुलांनी आत्महत्या केल्या कोण घेणार जबाबदारी उत्तर आहे का. ? काही मुले मुली खेडेगावात रहिवासी असलेल्याने काहींच्या कडे स्मार्ट फोन होते पण त्या मोबाईलवर टाॅवर नाही त्यामुळे काहीच शिकता आले नाही यांनी वर्षभर अभ्यास केला त्याचा उपयोग काय. ? पोलिस भरती नाही. सैनिक भरती नाही. रेल्वे भरती नाही. अशा विविध भरती प्रक्रिया व्हायरस रोगामुळे थांबल्या. मुलांची. आज परीक्षा तारीख जाहीर होईल. उद्या तारीख जाहीर होईल या दुटप्पीपणा मुळे. मानसिक कुचंबणा झाली. यातल्या काही मुलांची मानसिकता बदलली आणि त्यांनी. मिळेल ते काम करायला सुरुवात केली. शासनाला नविन अधिकार व कर्मचारी नेमायचेच नाहीत असा याचा अर्थ होतो काय. ? काही मुलांनी भरती प्रक्रिया याची वाट बघत बघत लग्नाचे वय निघून गेले यांना कोण मुली देणार का ? यांची लग्ने होणार का ? आई बाबा यांचे मन हळवं आहे आपला मुलगा कोणतरी अधिकार व्हावा अशी इच्छा आहे पण वेळ बघता चारी बाजूंनी कोंडी झाली आहे. म्हणजे. कामगारांचा मुलगा कामगारच होणार का ? इंजिनिअर याचा मुलगा इंजिनिअर होणारं का ? डॉ वकील पोलिस सैन्यात नेव्ही रेल्वे अशा ठिकाणी ज्याचा पालक आणि पैसा आहे तोच भरती होणार यात शंका नाही ? आपण फक्त जगायचे दोन वेळच्या जेवणासाठी कोणतंही काम करुन काय आणि केंव्हा होणार सर्व सुरळीत काय माहित ? 

        पुन्हा अशी परिस्थिती आ वासून उभी राहिली आहे अशा विविध माध्यमातून आपल्या जीवनाला घुणा लागला आहे आणि अजून जर आपण नाही विचार केला तर असाच प्रकार आपल्या समोर कायम येणार 

          समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार जाहिरात प्रसिद्ध वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

शेख सरांचे रुपात मला विठ्ठलाचे दर्शन झाले. - संदीप दंडवते Oxygen shortage...

भूक भूक भूक -Humger Hunger....

अहमदनगर येथील ऑक्सिजन प्लांटला लिक्वीड पुरवण्यासाठी एम आय एम चे मुख्य मंत्रीना पत्र - डॉ परवेज अशरफी AIMIM Ahmednagar...

आकस्मिक आजारांमध्ये कोविड -१९ चा समावेश...

रोग मोठा का ? माणूस - IS DISEASE BIGGER THAN HUMAN ?- अ.MUNDE

 रोग मोठा का ? माणूस



           मानव आहे म्हणजे तो आजारी पडणार. पूर्वीच्या काळात आत्ता पेक्षा भयानक आजार साथी होत्या  मोठें मोठें रुग्णालय दवाखाने रक्त लघवी तपासणी केंद्र नव्हती. एक्सरे सारखी सुविधा उपलब्ध नव्हती  काही अपघात झाल्यास फॅकचर प्लास्टर. सारखी सुविधा उपलब्ध नव्हती  बीपी. साखर. मधूमेह. कॅन्सर. असे महाभयंकर महामारी सारखें आजार नव्हते. कारणं असतील तर त्यावेळी त्यांची नावे सुध्दा वेगळी असतील. काही काही आजार त्यावेळी हकीम. वैध. जंगलातून विविध जडीबुटी आणून त्यापासून विविध आणि प्रभावी औषध तयार केले जात होते माणसांची नाडी बघून आजार सांगणारे  गावठी डॉ होते जनसेवा म्हणून उपचार करण्याची वृत्ती होती. 

              आपण एकूण आहे प्लेग पटकी सारखी महामारी आपल्या पूर्वजांवर आली होती त्यात  हा आजार उंदीर या प्राण्यांच्या अंगावर असणारी पिसू चावली की माणसाला. ताप येवून दोन ते तीन दिवसांत माणूस मरत असे. त्यावेळी उंदर सुध्दा जास्त असायची कारण घर मातीची. धान्य मुबलक साठवण करण्यासाठी पुरेशी व्यवस्था नाही धान्य असल्यामुळे उंदरांची संख्या जास्त घरांवर पाला पाचोळा असे छप्पर असायचे. प्लेग पटकी सारखी साथ आली की गावच्या गावं मृत्युमुखी पडायचे एकाला दहन केले की दुसरा मृतदेह तयार असायचा. असे एक नाही अनेक दिवस चालायचे. त्यावेळी.अलगीकरण  लाॅकडाऊन सारखी फसवी व्यवस्था होती का ? त्यावेळी लोक आपल्या इच्छेनुसार अलगीकरण करत होते ते म्हणजे गाव सोडणे गावाशी कोणताही संबंध नाही पाहिजे तेवढं अन्न धान्य जनावरे घेवून डोंगरात वास्तव्य करत होते  त्यामुळे गावातील उंदरांची संख्या कमी होण्यास सुरुवात होत होती  त्यामुळे रोगाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी चांगलीच मदत होत होती लोकांच्या मनात बदल झाला रोग सुध्दा बदलले सुख सोयी सुविधा उपलब्ध झाल्याने विविध गंभीर आजार निर्माण झाले त्यात

       एड्स. काविळ डेंग्यू. मलेरिया हिवताप. घटसर्प क्षय धनुर्वात असे एक नाही अनेक रोग व्हायरस निर्माण झाले लोकांचे खाणपान बदलले. राहणसाण बदलले विविध व्यसने  तंबाखू गुटखा खैणी पान मसाला शासनाने बंधनं घालून सुध्दा कोठे जागा मिळेल तिथे थुंकणे या थुंकी वर बसणारया विविध माशा डास रोग पसरविण्याचे एक मोठे माध्यम आहे आपले रस्त्यावरचे उघडे खाद्यपदार्थ खाणे यामुळे सुध्दा विविध आजार आपणास होतात 

        आज एक नवीन व्हायरसने जवळपास दिड वर्ष महामारी सारखें थैमान घातले आहे  श्वासोच्छ्वास घेणे. संपर्क.  गर्दित जाणे.  मांस मासे अंडी यामुळे याचा प्रसार होतों असे सांगितले जाते या व्हायरस रोगाने एखादा व्हायरस रोगाने बाधित झाल्यास. त्याला. अलगीकरण करणे. त्याचा इतरांशी संपर्क टाळणे. सॅनिटाईजर. मास्क व्हायरस रोगांवर प्रतिबंध करण्यासाठी औषध उपचार असे विविध उपाययोजना करण्यात येतात त्यातून हा  व्यक्ती मृत झाल्यास त्याला स्पर्श करायचा नाही. त्याची अंत्यविधी सुध्दा करण्यास आपणास परवानगी नाही. दवाखान्या पासून स्मशानात स्मशानभूमीत. मृतदेहाची विटंबना झालेली आपण बघितली आहे. काही काही मृतदेह कुत्र्यानी लचके तोडले. काय माणसांचे जीवन आहे हे आपल्या ध्यानात आले नेऊन दहन करेपर्यंत फक्त होणारे बील भरण्याचा आपणास अधिकार आहे 

                  आपल्या रक्तातील व्यक्ती. आपले मित्र. सगेसोयरे. यांना आपणं असा व्हायरस रोग येण्याअगोदर दवाखान्यात बघायला जात होतो  त्याची विचारपूस करत होतो. त्याला मदत करत होतो  एखादा मृत्युमुखी पडल्यास त्याचे सर्व अंत्यविधी कार्यक्रम समाज रितीरिवाज प्रमाणे करत होतो 

           आज काळ वेळ बदलली आणि आपले महणनारे. आज आपल्यापासून लांब होत आहेत व्हायरस रोगाने ग्रस्त असलेल्या व्यक्तिकडे कायतरी भयानक आजार झाला आहे अशी मानसिकता तयार करून समाज पाहत असतो कायम जवळ असणारे आज कोण जवळ येत नाही बोलत नाही अशी वागणूक बाहेरचे देण्यातच पण मी पाहिले आहे की व्हायरस रोगाने ग्रस्त असलेल्या व्यक्तीला त्याची घराची लोक सुध्दा वाईट आणि एक वेगळ्या प्रकारे बघत असतात की त्या रोगी माणसाला रोगापेक्षा या वागणूकी मुळे त्यांचे मानसिक संतुलन बिघडते आणि मनोधैर्य खचते आणि आजारापेक्षा  या वागणूकीने आणि रोगाच्या दहशती मुळे मरताना आपण पाहिले आहे. रोगांचे भांडवल झाले जागोजागी रुग्णालये तयार झाले 

      मानवता हाच खरा धर्म आहे रोग आत्ता आला आहे माणूस अगोदर आहे म्हणून मानव धर्म श्रेष्ठ करा रोगी लोकांना हीण वागणूक देऊ नका त्यांना धीर द्या कारणं कोणी कोणाचें दुःख वाटून घेत नाही सुख वाटून घेऊ शकते. रोगी लोका बरोबर सकारात्मक विचारात बोला. त्यांना त्या आजाराबरोबर लढण्याची प्रेरणा द्या मदत करा कारणं माणसांपेक्षा रोग मोठा नाही आपणांस माणूस हवा आहेे 

        समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार जाहिरात प्रसिद्ध वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

अंत्योदय योजनेतील लाभार्थी कुटुंबासाठी एप्रिल ते मे दोन महिन्यांचे. गहूं आणि तांदूळ मोफत वाटण्याचा शासनाचा निर्णय

माहिती अधिकार आत्ता माहिती अधिकार दाखल केल्यानंतर ३० दिवस वाट पाहण्याची गरज नाही कारण माहित अधिकार कायदा २००५ नुसार शासनाने जारी केलेल्या शासन निर्णयानुसार १० दिवसांत संबंधित माहिती देणे बंधनकारक करण्यात आले आहे

भूक भूक भूक -Humger Hunger..

शेख सरांचे रुपात मला विठ्ठलाचे दर्शन झाले. - संदीप दंडवते Oxygen shortage....

मुलीने केली आईची अंतिम इच्छा पूर्ण- Last wish of mother...

अहमदनगर येथील ऑक्सिजन प्लांटला लिक्वीड पुरवण्यासाठी एम आय एम चे मुख्य मंत्रीना पत्र - डॉ परवेज अशरफी AIMIM Ahmednagar...

"

भूक भूक भूक -Humger Hunger


            आजचा सर्वात मोठा प्रश्न आहे तो म्हणजे भूक वाढती लोकसंख्या त्यामुळे वाढती बेकारी हाताला काम नाही त्यामुळे वाढती गुन्हेगारी जागोजागी तयार होणा-या गुन्हेगारी टोळ्या विविध दारु तंबाखू मटका जुगार अशी विविध व्यसनाच्या आहारी गेलेली तरूण पिढी यामुळे आपले व आपल्या देशांचे भविष्य धोक्यात आले आहे

       लोकसंख्या कमी होती तेंव्हा आपली अन्न धान्य गरज कमी होती पण जसजशी लोकसंख्या वाढत गेली आणि अन्न धान्य पुरवठा कमी पडण्यास सुरुवात झाली आपल्या देशाने यावेळी बाहेरच्या देशातून अन्न धान्य आयात करण्यास सुरुवात केली त्यातून आपली अन्न धान्य गरज भागत नाही असे ध्यानात आले त्यावेळी शासनाने नवीन कृषी धोरण तयार केले त्यात आधुनिक तंत्रज्ञान प्रशिक्षण वापर नवीन बी बियाणे. कमी खर्चातून जास्त उत्पन्न देणारे धोरण आखण्यात आले आपणास लागणारे अन्न धान्य आपल्या देशात आपल्या गावात आपल्याला पुरेसं होईल एवढे तयार होण्यास सुरुवात झाली 

       सर्वांना दोन वेळेला पोटभर जेवायला मिळावे आणि सर्वांचे व्यवस्थित पोषण व्हावे ही आपली अगदी किमान गरज आहे पावसाची अनियमितता. आधुनिक तंत्रज्ञान अभाव यामुळे स्वातंत्र्यानंतर ब-याच काळापर्यंत आपल्याला अन्न धान्य तुटवडयाला तोंड द्यावे लागले परदेशातून अन्न धान्य आयात करून आपली अन्न धान्य तुट भरून काढण्याचा आपण प्रयत्न केला पुढे सिंचन व्यवस्था सुधारली सरकारने मोहीम काढून शेतीची आधुनिक तंत्रे प्रचारात आणली सुधारीत जाती बी बियाणे आणि रासायनिक खतांचा वापर या सर्वांचा परिणाम आपण धान्य उत्पादनात आपण १९७० मध्ये पातळी बरिच उंचावली या बदलाला. "हरित क्रांती "असे म्हणले हरित क्रांती मुळे उत्पादन वाढले देश अन्न धान्य या बाबतीत स्वावलंबी बनला. मात्र खाद्यतेल निर्माण करण्याच्या बाबतीत अजूनही पूर्ण स्वावलंबन शक्य झाले नाही

धान्य उत्पादन कमी होते तेव्हा सर्वांना धान्याचे वाटप व्हावे म्हणून. "रेशनिंग " म्हणजे सरकार मार्फत अन्न धान्य पुरवठा नियंत्रित करण्याचे धोरण अंमलात आले होते. सर्वांना हक्काचे अन्न धान्य मिळण्यासाठी रेशन दुकान नेमण्यात आली आज. आपण बघतो. सर्वात मोठा घोटाळा म्हणजे रेशन घोटाळा. रेशन दुकानात येणारा अन्न धान्य वितरण करण्यासाठी असणारा माल निकृष्ट दर्जाचा असतो. नियमानुसार. दारिद्रय रेषेखालील. प्राधान्य लाभार्थी कुटुंब. ब. गट अशी वर्गवारी फक्त एक फाॅरमलिटी म्हणून केली जाते. ज्यांना गरज आहे त्यांना. अन्न धान्य योजनेतून बाहेर काढले जाते. ज्यांना गरज नाही त्यांना डबल डबल धान्य वितरण केलें जाते. विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे दिली जातात रेशन दुकानदार अन्न धान्य वेळेवर व नियमानुसार देत नाही. पाच व्यक्तिला धान्य मिळत असेल तर तीन लोकांचे धान्य वितरण केले जाते विचारलें असता आपली नावे दिसत नाहीत. आधार लिंक नाही. अशी विविध उत्तरे दिली जातात. सर्वांना पुरेसे अन्न धान्य मिळावे असा उद्देश होता तसेच ते रास्त भावात मिळावे हाही त्यामागचा उद्देश होता. धान्याचा पुरवठा मुबलक असून सुद्धा आपली गरज भागत नाही. ते सर्वांना परवडेल अशा दरात मिळायला हवे. म्हणजे. रेशनकार्ड वर्गवारी रद्द करा आणि सर्वांना. २/३ किलो प्रमाणे अन्न धान्य विकत द्या त्यामुळे. समाजातील दारिद्र्य रेषेखालील कुटुंब उच्च कुटुंब मध्यमवर्गीय कुटुब असा भेद नष्ट होईल त्यासाठी सरकारने नियंत्रित भावात अन्न धान्य पुरवठा करावा. मात्र त्याच वेळी बाजारात. रेशन दुकानदार यांचेकडून काळाबाजार. जास्त दराने अन्न धान्य विक्री करणे अशा वेळी बाजारात जास्त भावाने अन्न धान्य उपलब्ध असतेच त्यामुळे रेशन दुकानदार यांचेकडून मिळणाऱ्या अन्न धान्य दर्जाचा प्रश्न निर्माण होतो. म्हणजे मी जर गरिब आहे तर मला रेशनला मिळेल ते धान्यच खावे लागणार आणि लागते. त्याहून उच्च प्रतीचा गहू तांदूळ हा मात्र जास्त भावाने मिळतो. त्यामुळे सर्वसामान्य माणसाला. गोरगरीबाला सकस धान्य कसे येणार. हा प्रश्न निर्माण होतो. म्हणजे धान्याचे उत्पादन वाढून किंवा रेशन ची दुकानें टाकून सगळा प्रश्न सुटत नाही. पोषक मुबलकपणे धान्य रास्त भावाने मिळण्याचा प्रश्न शिल्लक राहतोो

           या फरकामुळे वेगवेगळ्या सामाजिक स्तरातील माणसांचे आहार वेगवेगळे असतात. आपल्या देशात कुपोषण समस्या मोठ्या प्रमाणात आहे. लहान मुले. कामांचे वय नसणारी. फक्त जेवणासाठी हाॅटेल. धाबे. चायनिज गाडे. वडापाव. अशा विविध ठिकाणी. स्वच्छता करताना आपण बघतो कचरयात ठाकलेले अन्न हुडकून खाणारी मुल. माणस आपण बघतो. एखाद्या मोठ्या लग्न वाढदिवस मुंजी. सणवार. यात मोठ्या प्रमाणात अन्न ‌ ताटातून कचरयात ठाकलेले आपण बघतो आपल्या घरांत सुध्दा आपण शिळे अन्न खात नाही टाकून देतो. याचा अर्थ असा होतो की एकाबाजूला. अन्न अन्न करणारे लोक आणि एकीकडे अन्न टाकणारे लोक. 

           कष्टकरी व कामगार. यांना झुनका भाकर. केंद्राचा आधार मिळतो काही जण. हाॅटेलमधये जावून आपली अन्न याची गरज भागवितात. श्रीमंत आणि गरीब यांच्या आहारात पोषक तत्वे. विविधता. या सर्वच बाबतीत खूप अंतर असते. पोषक आहाराच्या अभावामुळे हा प्रश्न धान्य उत्पादन पुरता मर्यादित नाही. वाढती लोकसंख्या आणि दारिद्र्य यांचे मुळे तो जास्त गुंतागुंतीचा बनतो. म्हणूनच शाळकरी मुलांना न्याहारी किंवा एक वेळेचे जेवण स्वस्त किंवा मोफत देण्याचे प्रयत्न वेगवेगळ्या राज्यात केलें जातात. रेशनिंग. भावनियंत्रण. आणि सकस अननचा. ठराविकच गटाना विद्यार्थी. आजारी माणसे. पुरवठा अशा विविध पातळ्यांवर आपल्याला अन्न प्रश्नाला सामोरे जावे लागते.

महाराष्ट्र ने भारतातील सर्वाधिक थेट परकीय गुंतवणूकीचे पुढाकार घेतला आहे महाराष्ट्रात चार वर्षांत १/ १७/ ४९३ बालके कुपोषणाचे बळी पडले आहेत (वरषास ३०/०००) जागतिक कुपोषणाचा आकडा चडता दिसत आहे त्याचप्रमाणे देशात राज्याचा भूक बळीचा आकडा जागतिक स्तरावर चढती कमान आहे महाराष्ट्रात माता कुपोषणाने बळी पडण्याचे प्रमाण सरासरी (२८००/ते २९००) चया दरम्यान आहे त्यात ४८० ते ५०० माता केवळ अति कुपोषणाने मरण होताना दिसत आहे इतकी गंभीर परिस्थिती निर्माण होत असताना एकात्मिक बालविकास योजना मध्यान्ह भोजन यांचा खर्च जी डी पी चया ०'०८/टक्के एवढाच आहे हा गंभीर प्रश्न वैधानिक पातळीवर गंभीरपणे घेतला जात नाही   

धान्य आहे गरजू पर्यंत सर्वे चया व अन्य कारणांमुळे पोहचत नाही 


राष्ट्रीय पोषण अभियान अंतर्गत कुपोषण रोखण्यासाठी ३० नोव्हेंबर २०१७ रोजी मंत्री मंडळाने मंजूर देण्यात आली कुपोषण अशक्त बालकांचे प्रमाण कमी करण्याचे उद्दिष्ट या अभियानात ठेवण्यात आले 

   १० कोटी जनतेला या योजनेचा लाभ मिळणार आहे

१ ‌कुपोषण रोखण्यासाठी विविध योजना योगदानाचा ढाचा तयार करणे 

२ जलदगतीने सहयोग यंत्रणा उभारणे 

३ आयसीटीवर आधारित देखरेख यंत्रणा उभारणे

४ उद्दिष्ट साध्य करण्यासाठी राज्य व केंद्र शासित प्रदेशाना बळ देणे 

५ माहिती तंत्रज्ञान आधारित उपकरणे वापरणे अंगणवाडी कर्मचारी बळ देणे अंगणवाडी कर्मचारी यांचेकडून रजिस्टर चां वापर थांबवणे अंगणवाडी केंद्रातील बालकांची उंची मोजमापाला सुरुवात करणे 

  केंद्र सरकार आपल्या साठी हे सर्व करत आहे पण अवलंब केला जात नाही चालढकल केली जाते .


 जागतिक अन्न कार्यक्रम

स्वरुप. WFP हि आंतरराष्ट्रीय स्तरावर उपासमार नष्ट करण्यासाठी कार्यरत असणारी संयुक्त संघाची एक महत्त्वाची संघटना आहे अन्न उत्पादन वाढविण्यासाठी भर देते 

२ ‌‌ स्थापना. १९६१    

2. मुख्यालय. रोम. 

3. अध्यक्ष. David Beasley

4 सदस्य. 83. साहाय्य प्रारपत देश

5. ध्येय. उपासमारी विरोधात लढा देणे

6. नारा zero hunger 2030. मध्ये जे sdgs गाठायचे आहेत त्यातील ध्येय 2. उपासमारी दूर करण्याचे आहे 

9. उपासमारी दूर करणे अन्न सुरक्षा पुरविणे पोषण स्तर उंचावण्यासाठी. WFP कार्यरत आहे

10. यासाठी WFP विविध राष्ट्रीय तांत्रिक साहाय्य करते व क्षमता वाढविण्यासाठी मदत करते 

11. राष्ट्रांना अन्न पुरवठा साखळी नियमनासाठी मदत करते 

12. संकटकाळी अन्न पुरविण्याचे महत्त्वाचे कार्य WFP करते

      आत्ता कोरोणा सारखी महामारी चालू आहे राज्यात टाळेबंदी जारी केल्यामुळे हातावरचे पोट असणारे कामगार व सर्व सामान्य जनता. फळे फुले भाजीपाला विक्री करणारे. वडापाव विकणारे व्यापारी वाहनं चालक मालक आणि घरकाम करणाऱ्या महिलां पापड लोणची चटण्या किराणा दुकान. रिक्षावाले. टाळेबंदी असताना कोणालाही वर्गवारी नाही कोरोणा सारख्या महामारी संकटाला गरिब श्रीमंत ओळखत नाही भूक सर्वांना सारखीच आहे मग अंत्योदय दिनदयाळ योजना ( दारिद्र्य रेषेखालील कुटुंब ) यांनाच शासनाने कोरोणा काळात एप्रिल आणि मे महिन्याचे रेशन अन्न धान्य मोफत देण्याचा निर्णय कसा घेतला 

    ‌.

      समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार जाहिरात प्रसिद्ध वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

शेख सरांचे रुपात मला विठ्ठलाचे दर्शन झाले. - संदीप दंडवते Oxygen shortage..

अहमदनगर येथील ऑक्सिजन प्लांटला लिक्वीड पुरवण्यासाठी एम आय एम चे मुख्य मंत्रीना पत्र - डॉ परवेज अशरफी AIMIM Ahmednagar...

ग्रामपंचायतीत १५% निधी आणि मागासवर्गीय उन्नती -Grampanchayat Maharashtra...

मुलीने केली आईची अंतिम इच्छा पूर्ण- Last wish of mother...

शेख सरांचे रुपात मला विठ्ठलाचे दर्शन झाले. - संदीप दंडवते Oxygen shortage


 

एक स्वानुभव शेअर करतोय.

पाच दिवसांपूर्वीची गोष्ट आहे. माझ्या नाट्य संघातील एका मुलीचे वडील कोरोनामुळे नगरमधील एका हॉस्पिटलला ऍडमिट होते. त्यांची कंडिशन नाजूक होती. आम्ही सर्व मित्र मिळून इंजेक्शन व इतर बाबतीत शक्य तेवढी मदत करत होतो पण त्यादिवशी रात्री 10.30 वाजता तिचा फोन आला की 'हॉस्पिटलने ऑक्सिजन संपणार असल्याने पेशंट दुसरीकडे हलवायला सांगितलंय'. माझी मदत होईल म्हणून तिने खूप अपेक्षेने फोन केला होता पण काय करावं मला कळत नव्हतं. मी कॉन्टॅक्ट मधील सर्व हॉस्पिटलला फोन केला पण कुठेच जागा नसल्याचं आणि काही हॉस्पिटलमधून असेच पेशंट दुसरीकडे हलवण्यात येत असल्याचं कळलं. आता काय होणार या विचाराने मला तर घामचं फुटला होता. 


मी तडक हॉस्पिटलला गेलो. तिथे त्या दोघी बहिणी जिवाच्या आकांताने दुसऱ्या कुठल्या हॉस्पिटलला जागा मिळतेय का पाहत होत्या. हॉस्पिटलने तर दोन्ही हात वर केले होते. या सगळ्यात एक विचार डोक्यात घोळत होता की इथे आपल्यासारखी परिस्थिती असलेले आणखी पेशंट असतीलचं ते काय सोय पाहताहेत आधी पाहूयात मग निर्णय घेऊयात.

थोड्याच वेळात लक्षात आले की ऑक्सिजनवर असलेले सात ते आठ पेशंट असून, त्यात 3 पेशंट असे आहेत की ज्यांचं ऑक्सिजन काढलं की ते जास्तीत जास्त दोन तासच जगू शकतील. त्यात आमचंही पेशंट होतं.

आमच्या पेशंटसाठी आम्ही तिघे होतो आणि एका मुस्लिम बाईसाठी पाच ते सात मुस्लिम मुले व एक पन्नास वर्षे वयाचा शेख सर म्हणून व्यक्ती होता. 

हे शेख सर शिक्षक असून ती पेशंट त्यांची सख्खी बहिण होती. तिसऱ्या पेशंटसाठी मात्र कुणीच आले नव्हते. एवढ्या वेळात पेशंट दुसरीकडे हलवणे शक्य नाही हे सर्वांनाच कळून चुकले होते. मग एकच पर्याय शिल्लक होता तो म्हणजे कुठून तरी ऑक्सिजन उपलब्ध करून देणे. पण कुठून? 


त्यावेळेला रात्रीचे 11 वाजले होते आणि केवळ 3 तास पुरेल एवढा ऑक्सिजन होता. आम्ही हातावर हात ठेवून विचार करत असताना ती मुले मात्र याला-त्याला फोन करत, हात जोडत टाक्यांची व्यवस्था करत होती, कधी मोपेड कधी कार घेऊन मोकळ्या टाक्या घेऊन जात होती आणि कुठून-कुठून एकेक टाकी गोळा करत आणत होती. 16 ते 21 वयोगटातील मुले असतील ती, पण त्यांनी अक्षरशः जीवाचा खुळखुळा केला होता. सिलेंडर साठी नगर शहराच्या कोपऱ्या न कोपऱ्यात धावत होती. हे पाहून आपण काही करू शकत नाही याची मला लाज वाटली, मी पण माझे कॉन्टॅक्ट वापरले पण हाती एकहि टाकी लागली नाही. पण यांनी मात्र पहाटे 1 पर्यंत 5 टाक्या म्हणजे आणखी दोन तास जगण्याची सोय केली होती. शहरातील एका ऑक्सिजन प्रोव्हाईडरने पहाटे 2 पर्यंत टँकर येणार असल्याच सांगितलं होतं म्हणजे जास्तीत जास्त पहाटे 4 पर्यंत ऑक्सिजन हॉस्पिटलला पोहचणार होता म्हणजे आम्हाला पहाटे 4 पर्यंत पेशंट जगवायचे होते. पण कसे?


त्या मुलांमधील 4 मुले सहा मोकळ्या टाक्या घेऊन ऑक्सिजन साठी एम आय डी सी ला गेले. तोपर्यंत आम्ही मोकळ्या होत आलेल्या ऑक्सिजनच्या टाक्या आणि पेशंटचे श्वास मोजत होतो. Midc ला गेलेल्या मुलांनी इकडे खूप गर्दी असल्याने आणखी 1 तास लागत असल्याचं फोनवरून सांगितलं. त्यात जो टँकर येणार होता तो कुठेतरी फेल झाल्याने सकाळी 11 पर्यंत तरी ऑक्सिजन मिळणार नव्हता. म्हणजे किमान दीड-दोन तास तरी पेशंट ऑक्सिजन शिवाय राहणार होते. आकड्यांचा एवढा खेळ मी माझ्या आयुष्यात कधीच खेळला नव्हतो. 

आता मात्र मी घाबरलो होतो. भीती ऑक्सिजन पेक्षा माणुसकीची वाटायला लागली होती. ज्यांनी टाक्या उपलब्ध केल्यात त्यांनी त्यांचंच पेशंट जगवायचं ठरवलं तर? हा विचार डोक्यात यायला आणि कानावर जीवघेणे शब्द पडायला एकच वेळ झाली. शेख सरांच्या कानाशी हॉस्पिटलमधीलच एक व्यक्ती लागला आणि 'सगळ्या टाक्या तुमच्याच पोरांनी आणल्यात त्यामुळे तुमचं पेशंट वाचवायच पहा' अस सुचवू लागला'. हे ऐकून माझ्या तर काळजाचा ठोकाच चुकला. अस झालं तर सगळं संपणार होतं. situation चं अशी होती की तीन मरण्यापेक्षा एक वाचवलं असतं तर कुणाचीही काहीचं हरकत आली नसती. त्यावर दुसऱ्या क्षणी शेख सर त्याला म्हणाले की "माझ्याकडून अस पाप घडणार नाही... माणुसकी मारण्यापेक्षा माणसं मेलेली कधी पण चांगलं. अस केलं तर माझा अल्लाह मला कधीच माफ करणार नाही, उलट आपल्यामुळे एक-दोघांचा जीव वाचत असलं तर यासारखं पुण्य नाही". पहाटे 3 वाजून 9 मिनिटांनी मला शेख सरांच्या रुपात माझा विठ्ठल दिसत होता. मला नवस-सावस, उपास-तपास, जपजाप्य, व्रत वैकल्य न करता देवदर्शन झाले होते. कधीही दगडाच्या मूर्तीसमोर न जोडले गेलेले माझे हात इथे आपोआप जोडले गेले होते. शेख सर पुढे म्हणाले की ' कुणाला काही नाही होणार सगळे मिळून प्रयत्न करूयात'.


त्यानंतर दोन तासात आम्ही 12 टाक्या मिळवल्या. ती मुलं आणि शेख सर गरज पडली की अजूनही ऑक्सिजन साठी त्याच तडफेने पळताहेत.

आज यांच्या प्रयत्नामुळे तेथील सगळे पेशंट वाचलेत शिवाय बऱ्यापैकी रिकव्हर होत आहेत.

आजही बातम्या वाचतोय कि कुठल्या तरी शहनवाज नावाच्या व्यक्तीने स्वतःची गाडी विकून लोकांना चार हजार ऑक्सिजन सिलेंडर पुरवले. 

कोणी तरी अहमद आणि त्याचा भाऊ एक वर्षापासून कोरोनाने मृत्यू पावलेले मृतदेह स्मशानात जाळताहेत. जिथे सख्खे नाक मुरडतात तिथे हे दोघे अख्खेच्या अख्खे उभे असतात.

आणि जातीत विष पेरणारा दंगे घडवणारा तो कुठला दल आणि ती कुठली सेना आणि कुठला संघ... 

विष पेरण्यात तुम्ही थोडे फार जिंकला असाल पण माणुसकी पुढे तुम्ही सपशेल हरलात...!


- संदीप दंडवते, अहमदनगर यांच्या फेसबुक टाईमलाईन वरून 

(पोस्ट दिनांक -26 एप्रिल 2021)

वारस नोंद चा कायदा - ....

अहमदनगर येथील ऑक्सिजन प्लांटला लिक्वीड पुरवण्यासाठी एम आय एम चे मुख्य मंत्रीना पत्र - डॉ परवेज अशरफी AIMIM Ahmednagar...

मुलीने केली आईची अंतिम इच्छा पूर्ण- Last wish of mother...

कामगार वर्ग - working sector...

अहमदनगर येथील ऑक्सिजन प्लांटला लिक्वीड पुरवण्यासाठी एम आय एम चे मुख्य मंत्रीना पत्र - डॉ परवेज अशरफी AIMIM Ahmednagar

 

 


अहमदनगर -

काही दिवसापासून पूर्ण महाराष्ट्रातील परिस्तीत चिंताजनक होत चालली आहे. महाराष्ट्र राज्यात करोना विषाणू ने थैमान घातला आहे. अहमदनगर जिल्हातही रुग्ण झपाट्याने वाढत असल्याने रुग्ण संख्या जास्त आणि सुविधा कमी जाणवत आहे. मागील १५ ते २० दिवसापासून इंजेक्शन रेम्दिसेवीर व ऑक्सिजन चा तुटवडा जास्त जाणवत आहे. सामान्य जनतेत अशी अस्था तयार झाली आहे की जर हा इंजेक्शन दिला तर आमचा रुग्ण बरे होणार. त्यामुळे नातेवाईक पाहिजेल तितके पैसे इनजेक्शन साठी मोजण्यात तयार होत आहे. त्याच बरोबर अहमदनगर येथील ऑक्सिजन प्लांटला ऑक्सिजन तयार करणारे लिक्वीड मिळत नसल्याने प्लांट ऑक्सिजन तयार करणे शक्य नाही. लिक्वीड आणि इंजेक्शन हे अन्न व औषध प्रशासन यांच्या इखत्यारीत असल्याने अशी बातमी येत आहे की अन्न व औषध प्रशासनाने लिक्वीड पुरवणारी कंपनीला अहमदनगर येते लिक्वीड न देण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे ती कंपनी अहमदनगर येथील ऑक्सिजन प्लांट ला लिक्वीड देत नाही.त्याच अहमदनगर जिल्हा अधिकारी साहेबांनी इंजेक्शन व ऑक्सिजन पुरवठा स्वतःच्या हातात घेतले असून सर्व रुग्णालयाला ८०% खाट कोविडसाठी राखीव ठेवण्याचे आदेश दिले आहे. मागील ६ दिवसापासून जील्हा अधिकारी कार्यालयातून सर्व रुग्णालयांना संपर्क करून त्यांची ऑक्सिजन आणि इंजेक्शन ची रोजची किती मागणी आहे याची माहिती घेतली जात असून काही रुग्णालयांना आलेल्या ऑक्सिजन पैकी जास्त ऑक्सिजन देण्यात येत आहे तर काहींना काहीच दिले जात नाही. सध्या इंजेक्शन व ऑक्सिजनचा इतका तुटवडा असून अहमदनगर येथील प्लांट ला लिक्वीड पुरवठा न करण्याचे अन्न व औषध प्रशासन आदेश मंजे अधिकरिंच्या राजकारण मुळे सामण्या जनतेच्या जीवाशी खेळणे. सध्या जबाबदार कोणाला धरण्या पेक्षा पुरवठा सुरळीत कसे होईल या साठी काम करणे गरजेचे आहे.असे निवेदनाचे पत्र एम आय एम जिल्हा अध्यक्ष डॉ परवेज अशरफी तर्फे मुख्य मंत्री साहेबांना देण्यात आले आहे.  


पत्रात पुढे लिहिले आहे की अहमदनगर येथील अन्न व औषध प्रशासन अधिकारी संपर्क शेत्राच्या बाहेर आहे. मुंबई अन्न व औषध प्रशासन कडून एका व्यक्तीचा नंबर घेतले असता त्यांनी फोन ही घेतला नाही आणि मेसेज ला प्रतिसादही दिले नाही. अहमदनगर जिल्हा अधिकारी व निवासी जिल्हा अधिकारी यांना देखील प्लांट बंद असल्याचे माहीत आहे. परंतु कोणीही त्यावर लक्ष केंद्रित करण्यास तयार नाही. सध्या अहमदनगर जिल्ह्यातील मृत्यूचा प्रमाण ऑक्सिजन बेड न मिळाल्याने वाडले असावे असल्याचे सांगण्यात आले आहे. मुख्य मंत्री साहेबांना सदर प्रकरणात योग्य तो निर्णय घेऊन लवकरात लवकर अहमदनगर येथील प्लांट सुरू करण्याचे व संबंधित प्लांट ला ऑक्सिजन लिक्वीड पुरवठा सुरळीत करण्याचे आदेश देऊन संबंधित प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर एम आय एम जिल्हा अध्यक्ष डॉ परवेज अशरफी, जिल्हा महासचिव जावेद शेख,मुफ्ती अल्ताफ साहेब, नगर सेवक असिफ सुलतान,ऑल इंडिया युथ फेडरेशन शहर अध्यक्ष फिरोज शेख, एम आय एम शहर युवा अध्यक्ष अमीर खान, सलमान खान, समीर बेग,आरिफ सय्यद,आदींचे सह्या आहेत.


डाँ.परवेज अशरफी 

9890006580

आपणास पुढे दिसतो जालियनवाला बाग हत्याकांड -, Jaliyanwala baug...

ग्रामपंचायतीत १५% निधी आणि मागासवर्गीय उन्नती -Grampanchayat Maharashtra....

आकस्मिक आजारांमध्ये कोविड -१९ चा समावेश...

वारस नोंद चा कायदा - ....

ग्रामपंचायतीत १५% निधी आणि मागासवर्गीय उन्नती -Grampanchayat Maharashtra

 

            ग्रामपंचायतींनी त्यांच्या एकूण उत्पन्नापेक्षा १५/टक्के रक्कम प्रतिवर्षी मागासवर्गीयांच्या उन्नती साठी खर्च केली पाहिजे असे धोरणात्मक आदेश देण्यात आले आहेत या शासन आदेशांचे काही ग्रामपंचायती पालन करीत नाहीत तर काही ग्रामपंचायती ही रक्कम अनुत्पादक बाबीवर तसेच मागासवर्गीय लोकांना विश्वासात न घेता खर्च करतात असा प्रकार पाहावयास मिळतो अंशा तक्रारी लोकांनी शासनाकडे केल्या होत्या या प्रश्नावर अनुसूचित जाती जमाती कल्याण समितीनेही मागासवर्गीय कल्याणासाठी खर्च करण्यात यावयाची १५/टक्के रक्कम कोणकोणत्या बाबींवर खर्च करावी याबाबतचे शासन आदेश काढण्यात आले ( समितीचा अठरावा. सन १९८८/८९ चा अहवाल परिच्छेद १३/१ ) 

          मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ ( यापुढे सदर अधिनियम असा उल्लेख करण्यात येईल ) मधील कलम १५३ ए अन्वये दिलेल्या अधिकाराचा वापर करून तसेच शासन परिपत्रक ग्रामविकास विभाग क्रमांक व्हि पी एम २६७६/२३९६/दि २३ सप्टेंबर १९७६ आणि शासन परिपत्रक ग्रामविकास विभाग क्रमांक व्ही पी एम २६८०/५६२८ सी आर ६१४ / २३ ब दि २९ एप्रिल १९८० या दोन्ही परिपत्रकामधये दिलेल्या सूचनांचे अधिक्रमण करून शासन असे आदेश देत आहे की सदर अधिनियमातील कलम ४५/(६) चया तरतुदी नुसार ग्रामपंचायतीवर सोपविलेले कर्तव्य पार पाडण्यासाठी त्यांच्या एकूण उत्पन्नाच्या कमीत कमी १५/टक्के रक्कम अनुसूचित जाती जमाती ( यात यापूर्वी अनुसूचित जातीतून बौद्ध धर्म स्वीकारलेल्या व्यक्ती व कुटुंबातील लोकांचा समावेश आहे ) अनुसूचित जाती जमाती विमुक्त जाती व भटक्या विमुक्त जमाती व इतर मागासवर्गीय ( यापुढे मागासवर्गीय असा उल्लेख करण्यात येईल ) यांच्या उन्नती साठी त्यांच्या सामूहिक विकासासाठी व त्या वर्गातील व्यक्तिचा वैयक्तिक लाभ होईल अशा योजनांवर भर दिला पाहिजे अशी रक्कम खर्च करण्याबाबत खालील प्रमाणे खुलासा व तपशीलवार सूचना देण्यात येत आहेत

 (१) शासन परिपत्रक ग्रामविकास विभाग क्रमांक २६७६/२३९६/२३दि ३० सप्टेंबर १९७६

(२) शासन परिपत्रक ग्रामविकास विभाग क्रमांक व्हि पी एम २६८०/५६२८ सी आर ६१४/२३ ब दि २९ एप्रिल १९८०

(१) एकूण उत्पन्नासाठी गृहीत धरण्याचा बाबी

मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चया कलम

(अ) १२४ अन्वये मिळणारे करांचे उत्पन्न

(आ ) १२५ अन्वये कराऐवजी मिळणारी एकत्रित रक्कम

(इ ) १२६ अन्वये मिळणारी फी

(ई) १२७ अन्वये मिळणारा सेस

(उ) १३१ अन्वये मिळणारा जमीन महसूल

(ए ) १३२ अन्वये मिळणारे समानीकरण अनुदान तसेच

(ऐ ) यात्रा करा ऐवजी मिळणारे अनुदान

(ओ ) गौण खनिज स्वामित्व धनातील वाटा

(औ ) मुद्रांक शुल्कातील वाटा

(क ) इतर सर्व मार्गाने मिळणारे उत्पन्न

(२) प्रत्त्येक जाती / जमाती साठी रक्कम खर्च करणयाचे प्रमाण ग्रामपंचायतीने एकूण उत्पन्नाच्या १५/टक्के रक्कम मागासवर्गीय जाती / जमातीच्या ग्रामपंचायत कार्य क्षेत्रातील लोकसंख्येच्या प्रमाणात खर्च केली पाहिजे

(अ) मुलांसाठी बालवाडी

(आ) वसतिगृह अभ्यासिका तसेच वसतिगृहातील विद्यार्थ्यांना / विद्यार्थ्यातीनी साठी गणवेश

(इ ) अनुदानित वसतिगृहातील विद्यार्थ्यांना / विद्यार्थिनींसाठी शैक्षणिक सहल

(ई) हुशार मुले व मुलींसाठी शिष्यवृत्ती

(उ ) शिकणारी मुले व मुली शैक्षणिक सहल तसेच गणवेश

(ऊ ) शिकणार या मुला मुलींना वासंतिक अभ्यासवर्ग

(ए ) व्यवसायिक शिक्षण घेणारी मुले व मुली यांची शिष्यवृत्ती कमी पडत असल्यास त्यांना अर्थसाहाय्य करणे

(ऐ ) नवीन घर बांधनी अथवा दुरुस्ती अर्थसाह्य

( ओ ) लघुउद्योग विकास यासाठी उदा ( प्रशिक्षितांना शिलाई मशिन. यंत्र. लेथ आॅईल इंजिन. इलेक्ट्रॉनिक मोटर इत्यादी खरेदीसाठी अर्थसाह्य

(औ ) बायोगॅस प्रकल्प अर्थसाह्य

( क ) घरगुती वापरासाठी विधुत पुरवठा

(. ख ) कुष्ठरोग निवारण पुनर्वसन अर्थसाह्य

(. ग ) आंतरजातीय विवाह जोडप्याला पूरक अर्थसाह्य

( घ ) पाणी पुरवठा सोयी विहिरी बोअरवेल दुरूस्ती इत्यादी साठी अर्थसाह्य

( च) वस्तीत जोड रस्ते रस्त्यावर दिवे बत्ती गटारे जलनिससरणाची व्यवस्था इ साठी अर्थसाह्य 

(छ ) वस्तीत उधाने बगीचे समाजमंदिर प्रौढ शिक्षण व्यवस्था क्रींडागणे ग्रंथालय इ साठी अर्थसाह्य

( ज ) समाजकल्याण विभागाकडून राबविण्यात येणारया हरिजन ( नव बौद्ध धरून ) वस्त्यांची सुधारणा तसेच या योजना अंतर्गत बांधलेल्या समाजमंदिर अपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी आर्थिक मदत

          अशा विविध बाबींवर खर्च करणे आवश्यक आहे ही यादी पूर्ण नाही या सर्व योजना खेरीज इतर बर्याच योजना पार पाडणयापूरवी समाजकल्याण संचालनालयातील संबंधित व सक्षम अधिकारी यांचा सल्ला घेणे तसेच संबंधित अधिनियम व त्याखाली तयार करण्यात आलेले नियम तरतुदी नुसार सक्षम अधिकारी यांची मंजुरी घेणे बंधनकारक आहे

           (४) रक्कम खर्च न करण्याच्या बाबी

(अ ) कार्यालयीन इमारत बांधकाम

(आ ) आसथापनातील अधिकार व कर्मचारी यांचे वेतन भत्ते

(इ ) मनोरंजनात्मक

      मुंबई अधिनियम १९९८ आदेश व परिपत्रके

प्रेक्षणीय स्थळे यांना भेट देणे आयोजित सहली तसेच अधिकार व कर्मचारी यांचे दौरे. दूरचित्रवाणी संच अथवा तत्सम चैनीच्या वस्तू खरेदी. जाहिरात खर्च पुतळे स्मारके बांधकाम. हरिजन सप्ताह साजरा. करणे मेळावे आयोजित करणे मागासवर्गीय लोकांना वैयक्तिक व सामूहिक लाभदायक नसलेली कोणतीही योजना या व अशा बाबींवर १५/टक्के रक्कमेतून खर्च करण्यात येणार नाही

(५) या योजनेचे लाभार्थी

(अ ) संबंधित आर्थिक वर्षाचा लगतपूरव आर्थिक वर्षाचे सर्व मार्गांनी मिळून वार्षिक उत्पन्न रुपये ६४००/पेक्षा अधिक आहे अशी कुटुंबे

( आ ) संबंधित आर्थिक वर्षात ग्रामपचायती / पंचायत समिती / जिल्हा परिषद यांचेमार्फत या योजनेखाली पूर्वीच घेतलेला आहे अशी कुटुंबे किंवा व्यक्ती

       तथापि वर उल्लेख केल्याप्रमाणे अपात्रतेमुळे लाभार्थींची अपेक्षित संख्या उपलब्ध झाली नाही व १५/ टक्के रक्कम खर्च होत नाही असे आढळून आले आहे तर संबंधित गटविकास अधिकारी यांच्या पूर्व परवानगीने फक्त वर (आ ) येथे दिसलेली पात्रता शिथिल करुन त्यात येणारी कुटुंबे व्यक्ती त्यांचेवर ग्रामपंचायत स्व निधीतून खर्च करु शकतात

      (६) योजना अंमलबजावणी

या योजनेअंतर्गत संबंधित वर्षात संपूर्ण खर्च करून अनुशेष राहणार नाही याची दक्षता घेणें आवश्यक आहे यासाठी आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला विविध योजना आखणे आवश्यक आहे आर्थिक वर्षात त्या योजना पूर्ण करण्यासाठी लाभार्थी अर्ज घेताना ते परिपूर्ण असण्याची ग्रामपंचायतीने दक्षता घ्यावी तसेच आदिवासी उपाययोजना खाली किंवा विशेषतः घटक योजनेखाली सुरू असलेल्या योजनेअंतर्गत कामावर या योजनेतून मिळणारी रक्कम येतं नाही हे लक्षात घ्यावे जिल्हा परिषद यांनी आदिवासी उपाययोजना किंवा विशेष घटक योजनाखाली सुरू असलेल्या योजनांची माहिती ग्रामपंचायतीना पुरविण्याची व्यवस्था करावी

      (७) कार्यवाही जबाबदारी

(अ) प्रत्त्येक ग्रामपंचायत क्षेत्रात ही रक्कम खर्च करण्याची जबाबदारी संबंधित ग्रामपंचायतीची राहिल हे आदेश अंमलात न आणणारया ग्रामपंचायती सदर अधिनियमाच्या कलम १४५ (१) नुसार कारवाईस पात्र ठरतिल

( आ ) विस्तार अधिकारी (पंचायत ) व विस्तार अधिकारी ( सामाजिक शिक्षण ) यांनी ग्रामपंचायतीना वेळोवेळी भेटी द्याव्यात तसेच ग्रामपंचायती तपासणी वेळी या आदेशाचे पालन न करणाऱ्या ग्रामपंचायतीच्या तपासणी अहवालात तसे नमूद करण्यात यावे अशा ग्रामपंचायती बाबत लेखी अहवाल त्वरित तयार करण्यात यावा किंवा तपासणी दिनांकापासून एक एक महिन्याच्या आत संबंधित गट विकास अधिकारी यांचेकडे पाठवण्यात यावा

(इ ) गट विकास अधिकारी किंवा त्यांच्या कार्यालयाच्या निदर्शनास ही बाब आल्यापासून १ महिन्यांच्या आत त्यांनी संबंधित ग्रामपंचायतीच्या सरपंच व सचिव यांची बैठक घेऊन त्यांच्या अडचणी विचारांत घ्याव्यात व योग्य मार्गदर्शन करावे रक्कम संबंधित आर्थिक वर्षात खर्च करण्याचे लेखी आदेश संबंधित ग्रामपचायतीना देण्यात यावेत व तसा अहवाल संबंधित जिल्हा परिषद उप मुख्य कार्यकारी अधिकारी ( ग्रामपंचायत ) यांचेकडे लेखी स्वरूपात पाठवावा गटविकास अधिकारी यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील अशा प्रकरणांचा प्रत्त्येक महिन्याला आढावा घेऊन या व आढावयाबाबतचा अहवाल संबंधित महिन्याच्या पुढील महिन्याच्या १५ तारखेपर्यंत संबंधित जिल्ह्य परिषद उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत ) यांचेकडे पाठवावा त्यांच्या गटातील ग्रामपंचायती या आदेशांचे पालन करतील हे पाहण्याची जबाबदारी यांची राहिल

(ई) जिल्हा परिषद उप मुख्य अधिकारी (ग्रामपंचायत ) व समाजकल्याण अधिकारी यांनी एकत्रितपणे अशा मासिक अहवालाची महिन्यातून एकदा छाननी करून त्यांचा आढावा घ्यावा गट विकास अधिकारी यांनी लेखी आदेश देऊनही या आदेशांचे पालन न करणाऱ्या ग्रामपचायतीना एकत्रितपणे किंवा स्वतंत्र भेट देऊन त्यांच्या अडचणी समजावून घ्याव्यात व त्यांना मार्गदर्शन करावे त्याचप्रमाणे उप मुख्य कार्यकारी अधिकारी ( ग्रामपंचायत ) यांनी ही रक्कम संबंधित आर्थिक वर्षात खर्च करण्याचा आदेश द्यावा एवढे करूनही आपल्या आपशी मतभेदांमुळे सर्वसामान्य माणूस सदर योजनेपासून वंचित राहत असेल असे ध्यानात आल्यास सदर ग्रामपंचायत आदेश पालन करत नाही असे ग्राह्य धरून ग्रामपंचायतीच्या विरोधात सदर अधिनियम कलम १४५(१)! अन्वये कारवाई करण्याचा अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडे आहे

(उ ) मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी असा प्रस्ताव प्राप्त झाल्यावर या सूचना पालन न करणाऱ्या ग्रामपंचायतीच्या विरूद्ध सदर अधिनियम कलम १४५(१) अन्वये योग्य ती कारवाई करण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हा परिषद स्थायी समिती समोर मान्यतेसाठी सादर करावा व तसा अहवाल शासनाकडे पाठवावा हा अहवाल स्थायी समितीच्या सभेपुढे सादर करावा व स्थायी समितीचा निर्णय शासनाला कळविणे बंधनकारक आहे जिल्ह्यातील या आदेशांचे पालन करतील हे पाहणे अंतिम जबाबदारी मुख्य कार्यकारी अधिकारी याची राहिल 




           शासन अनुसूचित जाती जमाती व भटक्या विमुक्त जाती जमाती व इतर मागासवर्गीय लोकांच्या साठी विशेष महत्वाच्या योजना राबविण्यात येत आहेत पण या योजना संदर्भात आपणास काय माहित आहे का ? नसेल तर आजच आपल्या ग्रामपंचायतीला भेट द्या आणि चौकशी करा 

    समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

पुन्हा एकदा १८५७ उठाव -1857...

मुलीने केली आईची अंतिम इच्छा पूर्ण- Last wish of mother...

आकस्मिक आजारांमध्ये कोविड -१९ चा समावेश...

आपणास पुढे दिसतो जालियनवाला बाग हत्याकांड -, Jaliyanwala baug...

मुलीने केली आईची अंतिम इच्छा पूर्ण- Last wish of mother

 



#छगनबाई किसन ओव्हाळ या महिलेने आपली एकुलती एक मुलगी लक्ष्मी हिला चार वर्षांपूर्वी सांगितले की रमजानच्या पवित्र उपवासाच्या दिवशी जर मला मरण आले तर कृपया तू माझ्या शरीराला स्मशानभूमीत दहन करू नको. मला मुस्लिम धर्म रितीरिवाजानुसार अंतिम संस्कार नमाज अदा करून मुस्लिम दफनभूमी येथे कर.


 #नेमका रमजानचा पवित्र महिना सुरू असताना छगनबाई यांचे कोरोना या आजाराने निधन झाले. आईची अंतिम इच्छा पूर्ण करण्यासाठी रात्रभर मुलगी लक्ष्मी यांनी खूप परिश्रम घेऊन शेवटी आईची अंतिम इच्छा पूर्ण केली. येरवडा येथील जय जवान नगर मुस्लिम कब्रस्तान येथे मुस्लिम धर्म रितीरिवाजानुसार दफन केले.



#छगनबाई किसन ओव्हाळ ( वय वर्ष 72, बर्मा शेल कंपनीजवळ, इंद्रा नगर लोहगाव रोड, पुणे) यांना संधिवातचा त्रास होत होता. घरात राहून औषध उपचार घेत असताना अचानक जास्त त्रास होऊ लागला.


 #छगनबाई यांना शिवाजीनगर येथील जम्बो हॉस्पिटल येथे रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचे निधन झाले.डॉक्टरांनी सांगितले की हॉस्पिटल मध्ये दाखल होण्यापूर्वीच तुमच्या आईचे निधन झाले आहे तरी कृपया आपण यांना ससून हॉस्पिटल येथे घेऊन जाऊन मृत्यू दाखला तयार करावा.


 #मुली सोबत असलेल्यि स्थानिक कार्यकर्त्यांच्या मदतीने छगनबाई यांना त्यांची मुलगी लक्ष्मीने ससून रुग्णालय येथे 40 नंबर वार्ड मध्ये दाखल केले. ससून हॉस्पिटल येथील डॉक्टरांनीही तपासणी केल्यानंतर सांगितले की तुमच्या आईचे निधन काही तासापूर्वी झालेले आहे. पुढील सर्व कागदपत्र बनविण्यासाठी एक्सरे काढणे व पोलिसांचा पंचनामा जरुरी आहे. काही वेळातच कोरोना टेस्ट पॉझिटिव आली.

 

 #नियमाप्रमाणे विमानतळ पोलिसांनी पंचनामा तयार केला व लक्ष्मी यांनी रात्री दोन वाजता हिंमतीने वकील आयुब इलाही बक्ष,भीमा साखरे, सचिन चौघुले, बलभीम पवार, भारत जाधव, बसू चलवादी आदींसोबत स्वतः जाऊन आधार कार्ड झेरॉक्स व महत्त्वाची डॉक्युमेंट घेऊन ससून हॉस्पिटल येथे मृत्यू दाखला बनविण्याचा काम सुरू केले.

 

 #रात्रपाळीला असलेले, मृत्यू दाखला देणारे असे म्हणत होते की तुमची आई व तुम्ही तर धर्माने हिंदू आणि मृत्यू पास मुस्लिम दफनभूमीचा मागत आहात. हे कसे शक्य आहे. मात्र तरीही तशी तुमची इच्छा असेल तर ना हरकत पत्र सादर करा नंतरच तुम्हाला मुस्लिम कबरस्तान येथील पास बनविता येईल. स्वतःच्या अक्षरात लक्ष्मीने अर्ज तयार करून ना हरकत पत्र सादर केले व कायदेशीर रित्या येरवडा येथील जय जवान नगर मुस्लिम दफनभूमी येथे दफन करण्याचे पास देण्यात आला.

 

#सर्व कागद ससून येथील डेड हाऊस मध्ये जमा करण्यात आली. नियमाप्रमाणे ससून डेड हाऊस येथील डॉक्टरांनी महानगरपालिकेच्या कोविड क्रिमेशन ग्रुपमध्ये छगनबाई किसन ओव्हाळ यांचे निधन झाले आहे. अॅम्बुलन्स पाठवावी असा मेसेज केला.


#दफन पास तयार केला, पण आईला दफन करणार कोण लक्ष्मी पुढे प्रश्न निर्माण झाला लक्ष्मी यांच्या परिचयाचे असलेले अॅड.आयुब इलाही बक्ष यांनी सांगितले की तुम्ही तशी काही काळजी करू नका मी मूलनिवासी मुस्लिम मंचाच्या कार्यकर्त्यांना तुम्हाला पूर्ण मदत करायला सांगतो. पहाटे चार वाजता जय जवान नगर येथील मुस्लिम कब्रस्तान मध्ये मूलनिवासी मुस्लिम मंचाचे अध्यक्ष अंजुम इनामदार,सलीम शेख,इमतियाज पटेल,आसिफ शेख व इंदिरानगर भागातील सुमारे 50 सर्व जाती-धर्मांच्या लोकांच्या उपस्थितीत छगनबाई ओव्हाळ यांच्या नमाजे जनाजा अदा करून खाके सुपूर्द करण्यात आला.


#आईची अंतिम इच्छा पूर्ण होत असलेला त्या क्षणाला बघून लक्ष्मीच्या डोळ्यातील पाणी बरेच काही सांगत होते. आई गेल्याचे दुःखही मनात होते.पण अंतिम इच्छा पूर्ण होत आहे हा आनंदही त्यांच्या चेहऱ्यावरून दिसून येत होता. लक्ष्मीच्या सोबत असलेल्या राहुल पाटोळे - पती यांनी लक्ष्मीला साथ दिली तसेच वस्तीतील महिला माधवी मायकल, सुवर्णा गोडसे, इंदिरा चलवादी, सुनीता माने आणि स्थानिक महिला बरोबर राहून आधार देत होत्या. 


#छगनबाई यांनी किसन ओव्हाळ यांच्यासोबत सुमारे चाळीस वर्षांपूर्वी लग्न केले होते. छगनबाई यांचा पूर्वीचा धर्म इस्लाम होता. दोन्ही परिवार गुण्यागोविंदाने राहत होते एकमेकाच्या सण मोठ्या उत्साहाने साजरा करीत होते.


#किसन ओव्हाळ हे आंबेडकरी चळवळीतील एक मोठे कार्यकर्ते होते. इंदिरानगर या भागात एका छोट्याशा खोलीत राहून खूप लोकांचे कामे केली. किसन गंगाराम ओव्हाळ उर्फ (तात्या) पत्नी छगनबाई किसन ओव्हाळ ऊर्फ (काकू) या दोघांनी मिळून इंदिरानगर भागात भरपूर काम केले. एअरफोर्सच्या हद्दीतील ही जागा मिळविण्यासाठी ह्या दाम्पत्याचा सिंहाचा वाटा आहे.

आधार कार्ड बनविणे,रेशन कार्ड,पाण्याची समस्या शिक्षण,आरोग्य या विषयावर त्यांनी भरपूर काम केले. लोकांच्या अडीअडचणी धावून जाण्याचा काम हे पती पत्नी करत असत.


#बुद्ध विहार बनविण्यापासून तर स्थानिक मुस्लीम बांधवासाठी मस्जिद बनविण्यामध्ये काकूंचा खूप मोठा वाटा होता. सतत लोकांच्या अडीअडचणीत काम करणारी काकू आपल्यातून गेल्याने इंदिरानगर भागातील लोकांमध्ये प्रचंड दुख: होते. काकूंचे अंत्यदर्शन घेण्यासाठी व शेवटचा निरोप देण्यासाठी अनेक लोक रात्री उशिरापर्यंत आपल्या घरासमोर काकूंची वाट पाहत होते. रात्री उशिरा छगनबई यांच्यावर मुस्लिम दफनभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.


#अंजुम इनामदार

अध्यक्ष मूलनिवासी मुस्लिम मंच

9028402814

आकस्मिक आजारांमध्ये कोविड -१९ चा समावेश..

कामगार वर्ग - working sector...

आपणास पुढे दिसतो जालियनवाला बाग हत्याकांड -, Jaliyanwala baug...

पुन्हा एकदा १८५७ उठाव -1857...

आकस्मिक आजारांमध्ये कोविड -१९ चा समावेश

 


                    २२/२३ मार्च २०२० मध्ये कोविड १९ या महामारी सारखें महाभयंकर संकट आपल्यावर आले राज्यात देशात गावात वाडी गल्ली तालुका जिल्ह्यात शासनाने जनता कोरोणा महामारी संकटापासून वाचण्यासाठी टाळेबंदी जारी करण्यात आली बांधकाम कामगार. चहागाडीवाले. वडापाव विकणारे. फळे फुले भाजीपाला विक्री करणारे. मजूर. वडाप करणारे. मालवाहतूक करणाऱे. लाल परी. घरकाम करणाऱ्या महिलां पापड लोणची चटण्या करणार्या महिला. अशी एक नाही अनेक घटक आपला जीव वाचवण्यासाठी घरातच अडकून पडले होते हाताला काम नाही त्यामुळे हातात पैसा नाही त्यामुळे त्यांच्या वर व त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली होती त्यावेळी काहीजणांना ही आपलीं व आपल्या कुटुंबाची उपासमारीची वेळ बघून काहीजणांनी आत्महत्या सारखें मार्ग निवडले आणि आपलीं जीवन यात्रा संपवली त्यामुळे त्यांची कुटुंबे बेवारस झाली 

             शासनाने कोरोणा सारख्या महाभयंकर महामारी आजारात उपचारासाठी येणारा खर्च. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत करण्याचा निर्णय घेतला सर्व दवाखान्याना सदर बिला बाबत निश्चिती करण्याचे आदेश दिले आणि ज्यांची परस्थिती नाही उपचारासाठी खर्च करण्याची त्यांचे उपचार या योजनेतून झाले त्यामुळे सर्वसामान्य माणसाला मोठा आधार मिळाला आज सुध्दा कोरोणा रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे 

            राज्य सेवा ( वैद्यकीय देखभाल ) नियम १९६१ व यामध्ये वेळोवेळी झालेल्या आणि होणा-या सुधारणासह वै शि व औषधी द्रव्ये. वि. शा. नि. क्र. एम आय एस २००१/१२५६/ प्र क्र १९८/२००१/ प्रशासन -२ दिनांक २८ जानेवारी २००२ परिशिष्ट मुद्दा क्र २ नुसार शासकीय कर्मचारी व त्यांचेवर अवलंबून असणारे कुटुंब यांना विनाशुल्क वैद्यकीय उपचारांची सवलत असल्यामुळे त्यांच्याकडून वैद्यकीय खर्चाला प्रतिपूर्ती प्रमाणपत्रासाठी बिलांच्या ३०/टक्के शुल्क आकारण्यात येऊ नये मात्र इतर सर्व प्रकरणी बिलांच्या ३/ टक्के शुल्क आकारण्यात यावे मात्र आत्ताची परिस्थितीत ठराविक २७ आजाराकरीता खाजगी रुग्णालयात उपचार घेण्याची परवानगी देण्यात आलेली आहे सार्वजनिक आरोग्य विभाग शा नि क्र एम एजी २००५/९/ प्र क्र / आरोग्य -३ १९ मार्च २००५ नुसार २७ आकस्मिक व ५ गंभीर आजारांची यादी दिलेली आहे ती शा नि क्र वै ख प्र २०११/ प्र क्र ३३३/११ / रा का वि २ दि. १६ नोव्हेंबर २०११ अन्वये शा नि दि १९/ मार्च २००५ मधील केवळ ३(१) व (२) मध्ये सुधारणा. करण्यात आली

           महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग

(१) शासन निर्णय सार्वजनिक आरोग्य विभाग क्रमांक एम एजी. १०८४/४२५७/ सी आर १५६ दिनांक. २९ एप्रिल १९८५

(२) शासन निर्णय सार्वजनिक आरोग्य विभाग क्रमांक एम एजी १०८८/३८३७/आरोग्य -९ दिनांक २३ जानेवारी १९८९

(३) शासन निर्णय सार्वजनिक आरोग्य विभाग क्रमांक एम एजी १०९९/प्र क्र ४०/ आरोग्य -३ दिनांक २९ जुलै १९९९

(४) शासन निर्णय आरोग्य विभाग क्रमांक एम एजी १०९९/प्र क्र २३८/ आरोग्य -३ दिनांक २१ आॅगसट १९९९

(५) शासन निर्णय आरोग्य विभाग क्रमांक एम एजी १०९५/ सी आर ४५/आरोग्य -३ दिनांक ४ जुलै २०००

(६) शासन निर्णय सार्वजनिक आरोग्य विभाग क्रमांक एम एजी २००५/९/ प्र क्र १/ आरोग्य -३ दिनांक १९ मार्च २००५

(७) शासन निर्णय सार्वजनिक आरोग्य विभाग क्रमांक एम एजी २००५/ प्र क्र २५१/ आरोग्य -३ दिनांक १० फेब्रुवारी २००६

(८) शासन निर्णय सार्वजनिक आरोग्य विभाग क्रमांक वै ख प्र २०१९/ प्र क्र २३६/ रा का वि -२ दिनांक २७ मार्च २०२०

(९) शासन निर्णय महसूल व वन आपत्ती व्यवस्थापन. मदत व पुनर्वसन विभाग क्र डि एम यु. -२०२०/ प्र क्र ९२/ डी आय एस एम -१ दिनांक ३१ आॅगसट २०२० 

         असे वेळोवेळी शासन निर्णय जारी करण्यात आले आहेत संदर्भ क्र सहा मध्ये नमूद केल्याप्रमाणे दिनांक १९ मार्च २००५ चया शासन निर्णयानुसार आकस्मिक व गंभीर आजारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे त्या प्रामुख्याने २७ आकस्मिक आजार व ५ गंभीर आजार निश्चित केले आहेत सध्याची परिस्थिती पाहता शासनाने कोविड १९ हा एक नवीन आजार आहे व त्यावरील उपचारासाठी वैद्यकीय खर्चात देखील गोरगरीब जनतेला न परवडणारी प्रचंड वाढ झाली आहे तसेच. संदर्भ क्र ९ चया शासन निर्णयानुसार दिनांक २ सप्टेंबर २०२० पासून राज्यातील सर्व शासकीय कार्यालयातील उपस्थिती वाढविण्यात आलेली आहे कोविड १९ चा परिणाम बहुतांशी श्वसन संस्थेवर होतो ह्रदय व फुफ्फुसा संबंधित आजार हे संदरभाधीन शासन निर्णय क्र ६ मधील परिशिष्ट "अ" मधील अनुक्रमांक १ मध्ये समाविष्ट आहे परंतु शासनाचे इतर विभाग व क्षेत्रिय कार्यालयाकडून कोविड १९ या आजारांवरील उपचारासाठी वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती बाबत स्पष्टता आणण्याची मागणी करण्यात येत आहे 

      अनुषंगाने कोविड १९!या आजारांवरील उपचारासाठी करण्यात आलेल्या वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती बाबत स्पष्टता आणण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती

         शासन निर्णयानुसार संदर्भ ६ चया शासन निर्णय विरनिदिषट. करण्यात आलेल्या २७ आकस्मिक आजारांमध्ये आणखी नविन १ (एक ) आकस्मिक आजारांचा समावेश करण्यात येत आहे

 ‌. (२८) कोविड १९

वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती साठी रुग्णांचे कोविड १९ बाधीत असल्याने वैद्यकीय अहवालात नमूद असले पाहिजे तसेच रुग्णांच्या रक्तातील spo2 ( प्राणवायू पातळी ) ९५ / टक्के पेक्षा कमी असणे गरजेचे आहे

*. हे आदेश २ सप्टेंबर २०२० पासून पुरवलक्षी प्रभावाने लागू राहतील असा आदेश दिला आहे

* हे आदेश वित्त विभागाच्या सहमतीने व त्यांच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक ५४/२०२०/ सेवा -५ दिनांक. ७/१२/२०२० नुसार जारी करण्यात येत आहे

       शासनाच्या या निर्णयामुळे आता कोणीही गरीब माणूस आपला जीव गमवणार नाही तो आणि त्याचे कुटुंब निरोगी आणि सुदृढ होण्यासाठी मदत होईल

  आत्ता गरज आहे वरील शासन निर्णयानुसार सातत्याने आणि सापेक्ष डाॅ यांनी राबविला पाहिजे आणि सर्वसामान्य जनते पर्यंत हा शासन निर्णय पोहचला पाहिजे

   समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार जाहिरात प्रसिद्ध वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी 

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

अजून नाही सुटला जातीच्या दाखल्याचा व जातीचा तेढ - caste certificate...

अतिक्रमण होणार नाही ?...

आपणास पुढे दिसतो जालियनवाला बाग हत्याकांड -, Jaliyanwala baug..

पुन्हा एकदा १८५७ उठाव -1857...

सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा

  सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा            अनुसूचित जाती जमाती. इतर मागासवर्गीय जाती जमाती. भटक्या विमुक्त...

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या