Showing posts with label Remdisiver. Show all posts
Showing posts with label Remdisiver. Show all posts

आकस्मिक आजारांमध्ये कोविड -१९ चा समावेश

 


                    २२/२३ मार्च २०२० मध्ये कोविड १९ या महामारी सारखें महाभयंकर संकट आपल्यावर आले राज्यात देशात गावात वाडी गल्ली तालुका जिल्ह्यात शासनाने जनता कोरोणा महामारी संकटापासून वाचण्यासाठी टाळेबंदी जारी करण्यात आली बांधकाम कामगार. चहागाडीवाले. वडापाव विकणारे. फळे फुले भाजीपाला विक्री करणारे. मजूर. वडाप करणारे. मालवाहतूक करणाऱे. लाल परी. घरकाम करणाऱ्या महिलां पापड लोणची चटण्या करणार्या महिला. अशी एक नाही अनेक घटक आपला जीव वाचवण्यासाठी घरातच अडकून पडले होते हाताला काम नाही त्यामुळे हातात पैसा नाही त्यामुळे त्यांच्या वर व त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली होती त्यावेळी काहीजणांना ही आपलीं व आपल्या कुटुंबाची उपासमारीची वेळ बघून काहीजणांनी आत्महत्या सारखें मार्ग निवडले आणि आपलीं जीवन यात्रा संपवली त्यामुळे त्यांची कुटुंबे बेवारस झाली 

             शासनाने कोरोणा सारख्या महाभयंकर महामारी आजारात उपचारासाठी येणारा खर्च. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत करण्याचा निर्णय घेतला सर्व दवाखान्याना सदर बिला बाबत निश्चिती करण्याचे आदेश दिले आणि ज्यांची परस्थिती नाही उपचारासाठी खर्च करण्याची त्यांचे उपचार या योजनेतून झाले त्यामुळे सर्वसामान्य माणसाला मोठा आधार मिळाला आज सुध्दा कोरोणा रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे 

            राज्य सेवा ( वैद्यकीय देखभाल ) नियम १९६१ व यामध्ये वेळोवेळी झालेल्या आणि होणा-या सुधारणासह वै शि व औषधी द्रव्ये. वि. शा. नि. क्र. एम आय एस २००१/१२५६/ प्र क्र १९८/२००१/ प्रशासन -२ दिनांक २८ जानेवारी २००२ परिशिष्ट मुद्दा क्र २ नुसार शासकीय कर्मचारी व त्यांचेवर अवलंबून असणारे कुटुंब यांना विनाशुल्क वैद्यकीय उपचारांची सवलत असल्यामुळे त्यांच्याकडून वैद्यकीय खर्चाला प्रतिपूर्ती प्रमाणपत्रासाठी बिलांच्या ३०/टक्के शुल्क आकारण्यात येऊ नये मात्र इतर सर्व प्रकरणी बिलांच्या ३/ टक्के शुल्क आकारण्यात यावे मात्र आत्ताची परिस्थितीत ठराविक २७ आजाराकरीता खाजगी रुग्णालयात उपचार घेण्याची परवानगी देण्यात आलेली आहे सार्वजनिक आरोग्य विभाग शा नि क्र एम एजी २००५/९/ प्र क्र / आरोग्य -३ १९ मार्च २००५ नुसार २७ आकस्मिक व ५ गंभीर आजारांची यादी दिलेली आहे ती शा नि क्र वै ख प्र २०११/ प्र क्र ३३३/११ / रा का वि २ दि. १६ नोव्हेंबर २०११ अन्वये शा नि दि १९/ मार्च २००५ मधील केवळ ३(१) व (२) मध्ये सुधारणा. करण्यात आली

           महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग

(१) शासन निर्णय सार्वजनिक आरोग्य विभाग क्रमांक एम एजी. १०८४/४२५७/ सी आर १५६ दिनांक. २९ एप्रिल १९८५

(२) शासन निर्णय सार्वजनिक आरोग्य विभाग क्रमांक एम एजी १०८८/३८३७/आरोग्य -९ दिनांक २३ जानेवारी १९८९

(३) शासन निर्णय सार्वजनिक आरोग्य विभाग क्रमांक एम एजी १०९९/प्र क्र ४०/ आरोग्य -३ दिनांक २९ जुलै १९९९

(४) शासन निर्णय आरोग्य विभाग क्रमांक एम एजी १०९९/प्र क्र २३८/ आरोग्य -३ दिनांक २१ आॅगसट १९९९

(५) शासन निर्णय आरोग्य विभाग क्रमांक एम एजी १०९५/ सी आर ४५/आरोग्य -३ दिनांक ४ जुलै २०००

(६) शासन निर्णय सार्वजनिक आरोग्य विभाग क्रमांक एम एजी २००५/९/ प्र क्र १/ आरोग्य -३ दिनांक १९ मार्च २००५

(७) शासन निर्णय सार्वजनिक आरोग्य विभाग क्रमांक एम एजी २००५/ प्र क्र २५१/ आरोग्य -३ दिनांक १० फेब्रुवारी २००६

(८) शासन निर्णय सार्वजनिक आरोग्य विभाग क्रमांक वै ख प्र २०१९/ प्र क्र २३६/ रा का वि -२ दिनांक २७ मार्च २०२०

(९) शासन निर्णय महसूल व वन आपत्ती व्यवस्थापन. मदत व पुनर्वसन विभाग क्र डि एम यु. -२०२०/ प्र क्र ९२/ डी आय एस एम -१ दिनांक ३१ आॅगसट २०२० 

         असे वेळोवेळी शासन निर्णय जारी करण्यात आले आहेत संदर्भ क्र सहा मध्ये नमूद केल्याप्रमाणे दिनांक १९ मार्च २००५ चया शासन निर्णयानुसार आकस्मिक व गंभीर आजारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे त्या प्रामुख्याने २७ आकस्मिक आजार व ५ गंभीर आजार निश्चित केले आहेत सध्याची परिस्थिती पाहता शासनाने कोविड १९ हा एक नवीन आजार आहे व त्यावरील उपचारासाठी वैद्यकीय खर्चात देखील गोरगरीब जनतेला न परवडणारी प्रचंड वाढ झाली आहे तसेच. संदर्भ क्र ९ चया शासन निर्णयानुसार दिनांक २ सप्टेंबर २०२० पासून राज्यातील सर्व शासकीय कार्यालयातील उपस्थिती वाढविण्यात आलेली आहे कोविड १९ चा परिणाम बहुतांशी श्वसन संस्थेवर होतो ह्रदय व फुफ्फुसा संबंधित आजार हे संदरभाधीन शासन निर्णय क्र ६ मधील परिशिष्ट "अ" मधील अनुक्रमांक १ मध्ये समाविष्ट आहे परंतु शासनाचे इतर विभाग व क्षेत्रिय कार्यालयाकडून कोविड १९ या आजारांवरील उपचारासाठी वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती बाबत स्पष्टता आणण्याची मागणी करण्यात येत आहे 

      अनुषंगाने कोविड १९!या आजारांवरील उपचारासाठी करण्यात आलेल्या वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती बाबत स्पष्टता आणण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती

         शासन निर्णयानुसार संदर्भ ६ चया शासन निर्णय विरनिदिषट. करण्यात आलेल्या २७ आकस्मिक आजारांमध्ये आणखी नविन १ (एक ) आकस्मिक आजारांचा समावेश करण्यात येत आहे

 ‌. (२८) कोविड १९

वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती साठी रुग्णांचे कोविड १९ बाधीत असल्याने वैद्यकीय अहवालात नमूद असले पाहिजे तसेच रुग्णांच्या रक्तातील spo2 ( प्राणवायू पातळी ) ९५ / टक्के पेक्षा कमी असणे गरजेचे आहे

*. हे आदेश २ सप्टेंबर २०२० पासून पुरवलक्षी प्रभावाने लागू राहतील असा आदेश दिला आहे

* हे आदेश वित्त विभागाच्या सहमतीने व त्यांच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक ५४/२०२०/ सेवा -५ दिनांक. ७/१२/२०२० नुसार जारी करण्यात येत आहे

       शासनाच्या या निर्णयामुळे आता कोणीही गरीब माणूस आपला जीव गमवणार नाही तो आणि त्याचे कुटुंब निरोगी आणि सुदृढ होण्यासाठी मदत होईल

  आत्ता गरज आहे वरील शासन निर्णयानुसार सातत्याने आणि सापेक्ष डाॅ यांनी राबविला पाहिजे आणि सर्वसामान्य जनते पर्यंत हा शासन निर्णय पोहचला पाहिजे

   समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार जाहिरात प्रसिद्ध वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी 

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

अजून नाही सुटला जातीच्या दाखल्याचा व जातीचा तेढ - caste certificate...

अतिक्रमण होणार नाही ?...

आपणास पुढे दिसतो जालियनवाला बाग हत्याकांड -, Jaliyanwala baug..

पुन्हा एकदा १८५७ उठाव -1857...

राज्यामध्ये सर्वसामान्य जनतेसाठी रेम्डेसिवीर, मेडिकल ऑक्सीजन व रक्ताची मुबलक उपलब्धता करण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने उचललेली पाऊले - FDA


महाराष्ट्र- मुंबई


सध्या महाराष्ट्रात कोविड च्या रुग्ण संख्येत वाढ होत असून, संभाव्य वाढणा-या रुग्णांचे हित लक्षात घेऊन ऑक्सिजन, रेम्डेसिवीर इंजेक्शनची व रक्ताची पुरेशी उपलब्धता व्हावी याकरीता अन्न व औषध प्रशासनाने ठोस पावले उचलली आहेत.  औषध नियंत्रण,भारत सरकार यांनी सदर औषधाच्या उत्पादन व विक्री/वितरणासाठी मे.सिप्ला लि., मे. हेटेरो हेल्थकेअर व मे. मायलॅान लि.,  मे. झायडस कॅडिला, मे. डाँ. रेडिज,  मे. ज्यूबीलंट लाईफ सायंसेस व मे. सन फार्मा. या औषध उत्पादकांना उत्पादन व विक्री/वितरणासाठी अनुमती दिलेली असून, सध्या एकूण 7 औषधी उत्पादकांचा Remidesivir Injection चा साठा गंभीर रूग्णांकरीता उपलब्ध आहे. सदरच्या औषधांचे विक्री वितरण हे त्यांच्या भिवंडी, नागपूर व पूणे इत्यादी डेपोमधून संपूर्ण राज्यात शासकिय /निमशासकिय रूग्णालये , संस्था व वितरकांना पुरवठा होत आहे.

सदर रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याची परिस्थिती पाहता डॉ. राजेंद्र शिंगणे , माननीय मंत्री महोदय,अन्न व औषध प्रशासन, म. राज्य, श्री. सौरभ विजय, माननीय सचिव, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग व श्री. अभिमन्यू काळे, माननीय आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, म. राज्य यांनी दिनांक ०४.०४.२०२१ रोजी रेमडेसिविर इंजेक्शनच्या उत्पादकांचे व मेडिकल ऑक्सिजन उत्पादक यांचे प्रतिनीधी व प्रशासनाचे अधिकारी यांचे सोबत तातडीची बैठक घेतली व महाराष्ट्र राज्यासाठी जास्तीत जास्त इंजेक्शनचा  पुरवठा व मेडिकल ऑक्सिजनची उपलब्धता यांचे नियोजन करण्याच्या सुचना देण्यात आल्या.  तसेच त्यानुसार सर्व उत्पादकांनी प्राधान्याने  महाराष्ट्र राज्यासाठी औषधाचा पुरवठा करण्याचे आश्वासन दिलेले असून, सध्या देखील सुमारे 5000०  ते ६०००० इंजेक्शनचा साठा दररोज उपलब्ध होत आहे. त्यामुळे राज्यात Remdesivir Injection चा फारसा तुटवडा नाही.

          शासनाने दिनांक 30/03/2021 च्या आदेशान्वये राज्यात निर्माण होणाऱ्या ऑक्सीजन साठयापैकी 80 टक्के साठा हा वैदयकिय वापरासाठी राखीव ठेवला आहे.

        महाराष्ट्र  राज्यातील दररोजचे ऑक्सीजनचे उत्पादन 1250 मेट्रीक टन इतके असून त्यापैकी 700 टन साठा वैदयकिय कारणासाठी वापरला जात आहे.

       ऑक्सीजनची सर्वत्र योग्य व जलद वाहतूक केली जावी म्हणून आयुक्त, अन्न व औषध प्रशासन यांनी दिनांक 03.04.2021 च्या आदेशान्वये राज्यातील 06 महत्वाच्या उत्पादकांचे 80 टक्के टँकर्स मेडिकल ऑक्सिजनच्या वाहतूकीसाठी राखीव ठेवण्याचे आदेश काढलेले आहेत.

          

          भविष्यात ऑक्सीजनची अधिकची गरज भासल्यास त्या दृष्टीने शासनाने गुजरात व छत्तीसगड मधून ऑक्सीजन आणण्यास सुरुवात केली आहे.

         तसेच आवश्यकता भासल्यास जेथे कोविड रुग्ण मोठया संख्येने नाहीत अशा राज्यामधुन देखील ऑक्सिजन प्राप्त करुन घेण्यासाठी प्रशासन स्तरावर चाचपणी सुरु आहे. त्यामुळे मेडीकल ऑक्सीजनची रुग्णासाठी करण्याच्या दृष्टीने अन्न व औषध प्रशासनाकडून योग्य त्या उपाययोजना केल्या जात आहे.

अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी, रेमडेसिविर इंजेक्शनची चढ्या दराने विक्री होवू नये या बाबीवर बारीक लक्ष ठेवून आहेत. अदयापपावेतो  अशी कोणतीही घटना तथा तक्रार अन्न व औषध प्रशासनास  प्राप्त झालेली नाही.

सदर औषधाचा कोवीड रूग्णांसाठी वापर करण्याबाबत जेव्हापासून अनुमती देण्यात आलेली आहे तेव्हापासून सदर औषधाच्या विक्री,वितरण व साठा यावर अन्न व औषध प्रशासन नियंत्रण ठेवत आहे. Remdesivir Injection हे औषध तसेच आणीबाणीच्या प्रसंगी गरजू रूग्णास औषध सहज उपलब्ध्‍ व्हावे व सदर औषधाचा काळा बाजार होवू नये याबाबत प्रशासनातील सर्व अधिकाऱ्यांना काटेकोरपणे पाळत ठेवण्याबाबतच्या सूचना प्रशासनातर्फे देण्यात आलेल्या आहेत. तसेच सदर औषधाच्या किंमत आकरणीवर नियंत्रण ठेवण्यात येत आहे. 

तसेच सध्या कोविड रुग्णांच्या संख्येत झपाटयाने होत असलेली वाढ विचारात घेवून रेम्डेसीवीर इंजेक्शनचा वापर यथोचीत व योग्यरित्या करण्याचे आवाहन प्रशासनातर्फे सर्व रुग्णालयांना करण्यात येत आहे. 

 Medical Oxygen व Remdesivir Injection यांच्या प्राप्त, वापर व शिल्लक साठयाबाबत माहिती प्रत्येक जिल्हात उपलब्ध असून त्यावर प्रशासनातर्फे नियंत्रण ठेवले जात आहे. तसेच त्यांच्या उत्पादकांना देखिल महाराष्ट्र राज्यात जास्तीत जास्त साठयाचा पुरवठा करण्याबाबत सुचित करण्यात आलेले  आहे. सध्या महाराष्ट्रात Medical Oxygen, Remdesivir Injection औषधाचा पुरेसा साठा उपलबध होत असून तुटवडा होणार नाही याबाबत योग्य ती दक्षता घेतली जात आहे.

तरी Medical Oxygen व Remdesivir Injection कोणत्याही रुग्णास मिळत नसल्यास अथवा त्यांचा काळाबाजार होत असल्यास त्या बाबतची माहिती त्यांनी संबंधित अन्न व औषध कार्यालयाच्या जिल्हा कार्यालयास अथवा प्रशासनाच्या १८००२२२३६५ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. याबाबत त्यांना औषध मिळून देण्यास निश्चित मदत केली जाईल व काळाबाजार करणाऱ्या विरुध्द योग्य ती कडक कार्यवाही केली जाईल याची नोंद घ्यावी. असे निर्देश मा.मंत्री अन्‍न व औषध प्रशासन डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिले आहेत. 

मुंबई व राज्यतील इतर रक्तपेढयांकडे किती रक्त व त्याचे घटक उपलब्ध आहेत व ते किती कालावधीसाठी पुरेसे आहेत याबाबत अधिकाऱ्यांकडून मा’ मंत्री महोदया यांनी  आढावा घेतला असता दिनांक 03.04.2021 रोजी मुंबईतील रक्तपेढ्याकडे एकूण 3181 युनिट रक्त व रक्त घटक असल्याचे आढळून आले आहे’ तसेच राज्यात एकूण 29928 युनिट रक्त व घटक उपलब्ध असल्याचे दिसुन आले. सदर साठा अंदाजे 5 ते7 दिवसासाठी पुरेसा असुन पुढील कालावधीत रुग्णांना रक्ताचा तुटवडा येवू नये यासाठी सर्व रक्त पेढयांनी लहान मोठे रक्तदान शिबीरे  कोव्हीड 19 च्या संदर्भात घ्यावयाची दक्षता पाळून आयोजित करावे असे आवाहन मा. मंत्री महोदय यांनी केले. अधिकाऱ्यांनी या संदर्भात सजग राहून परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक पाऊले उचलावी असेही निर्देश मा. मंत्री महोदय यांनी यावेळी दिले.

वाचा

तेढ अनुदान आणि विना अनुदानाचा माध्यमिक व उच्च माध्यमिक संस्थांचा- Granted and Non Granted Secondary school's...

माहिती अधिकार कलम (२) - RTI section 2..

कलाकार...

सर्वनाश आणि केवळ सर्वनाश - ...

सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा

  सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा            अनुसूचित जाती जमाती. इतर मागासवर्गीय जाती जमाती. भटक्या विमुक्त...

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या