पुन्हा एकदा १८५७ उठाव -1857



         ब्रिटिश मुत्सधयानी व इतिहासकारांनी. १८५७ चया उठावाचे वर्णन. " शिपायांचे बंड " म्हणून केले होते भारतीय राष्ट्रवाधांनी व विशेषतः स्वातंत्र्य वीर सावरकरांनी १८५७ चा उद्रेक हा केवळ असंतुष्ट शिपायाचे बंड नव्हते तर तो जूलमी शासन. हुकूमशाही. यासाठी एक ब्रिटिश राजवटीविरुद्ध राष्ट्रीय अस्मिता चेतविणयाचा प्रयत्न होता. हा उठाव राष्ट्रीय स्वातंत्र्यासाठी होता का नाही. ? की ते सरंजामी वर्गाचे अखेरचे बंड होते 

                      ब्रिटिश शासनाने सैनिकांना नव्या एनफिल्ड रायफली दिल्या होत्या त्या काडतुसाला ‌ग्रीज म्हणून प्राण्यांची चरबी जसे गाय व डुक्कर या जनावरांची चरबी लावली जात होती हिंदू समाजात गाय पुज्य मानतात आणि मुस्लिम समाजात डुक्कर निषिद्ध मानले जाते अशी परिस्थिती असताना सुध्दा ब्रिटिश शासन हेतुपुरसकर पणे वागत होते हे काडतुसे वापर करताना ओठाने त्याचे वेष्टण काढावे लागत होते म्हणजे तोंडात घालूनच त्याचा वापर करावा लागत होता त्यामुळे धर्म भ्रष्ट होण्याचा धोका निर्माण झाला बराकपूर येथील सैनिकांनी अशी काडतुस घेण्यास नकार दिला मंगल पांडे या सैनिकाने असा राग डोक्यात घेऊन ब्रिटिश अधिकारी यांचेवर गोळीबार केला त्याला फाशीची शिक्षा देण्यात आली या घटनेने बाकी सैनिकांच्या मनात एक गंभीर समस्या निर्माण केली आणि यातूनच १० मे १८५७ उठावाचा मुहूर्त झाला 

              राष्ट्रीय उठावानंतर ब्रिटिश लषकाराची पुनर्रचना करण्यात आली कारण सन १८५७ चया उठावाने हादरलेले इंग्रज सत्ता जास्ती जास्त दृढ करणे हे इंग्रजांचे मुख्य धोरण होते १८५७ प्रमाणे भारतीय सैनिक एकत्र येऊ नये त्यांच्यात फूट पडावी व त्यांनी पुन्हा उठाव करु नये यासाठी जातीनिहाय फलटनी तयार करण्यात आल्या भारतातील इंग्रज लष्करात युरोपीय अधिकारी व सैनिकांची संख्या वाढवून साम्राज्याला संभाव्य संभाव्य उठावापासून सुरक्षित करणे यासाठी प्रयत्न चालू झाले

              १८५७ उठावाचे अनन्य साधारण महत्व आहे हा उठाव म्हणजे केवळ लष्करी बंड नसून तर समाजातील अनेक घटकांचा समावेश असलेला असा तो राष्ट्रीय उठाव होता या उठावात हिंदू मुस्लिम यांचे अनोखे ऐक्य दिसलें या उठावाने समाज घटकांमध्ये निर्माण झालेली राष्ट्रीय भावना अंत्यंत महत्वाची होती या उठावाने पुढील काळात सशत्र क्रांतीला प्रेरणा मिळाली यापुढच्या काळात ब्रिटिशांनी संघर्ष करण्यासाठी राष्ट्रवादाचा आणि लोकशाहीचा आधुनिक विचारांचा व संघटनात्मक शक्तिचा वापर करावा लागेल ही जाणीव भारतीय विचावंतामधये निर्माण झाली भारतीय विचारवंतांनी राजकीय जागरण करून राष्ट्रीय चळवळीचा पाया घालण्याचे काम सुरू केले ग्रामीण जीवनावर जमीनदार यांचा मोठा प्रभाव असल्याने ब्रिटिशांनी जमीदाराना अनकुल कसे धोरण देण्याचा विचार केला इ स १८५७ चया उठावात ज्या जमीनदारांच्या जमीनी जप्त करण्यात आल्या होत्या त्यांना त्यांच्या जमीनीपरत करण्यात आल्या यामुळे ब्रिटिशांशी निष्ठा बाळगणारा जमीनदार वर्ग निर्माण झाला 

          इ स १८५७ नंतर ब्रिटिशांनी देशी संस्थांना बाबत धोरण राबविण्यास सुरुवात केली संसथानिकावर ब्रिटिश वर्चस्व कायम राखून त्यांना अंतर्गत व्यवहाराचे स्वातंत्र्य देण्यात आले संसथानिकाबरोबर विविध तह करण्यात आले व पालन करण्याचे आश्वासन देण्यात आले

केंद्रीय कायदेमंडळ सदस्यj सर इलबरट याने न्यायदान क्षेत्रातील वर्णभेद संपविण्यासाठी सादर केलेल्या विधायकाला इलबरट विधेयक म्हणतात या विधयकाने गौरेतर भारतीय न्यायाधीशाला गौरवर्णीय युरोपीय खटले चालवण्याचा अधिकार होता

          इ स १८५७ सारखा उठाव पुन्हा होऊ नये सैन्यात कायम फूट असावी म्हणून ब्रिटिशांनी भारतातील आपल्या सैन्यदलाबाबत नवीन धोरण स्वीकारले सैन्यातील ब्रिटिश सैनिकांचे प्रमाण ४० ते ५०/ टक्के वाढविण्यात आले लष्कर दृष्टीने मोक्याच्या प्रदेशात व ठाण्यात ब्रिटिश सैन्य ठेवण्यात आले तोफखाना. चिलखती. दले. यावर ब्रिटिश अधिकाऱ्यांचे नियंत्रण ठेवण्यात आले सैन्य भरती करताना पंजाबी. गुरखे. पठाण. यांची सैन्यात अधिक भरती करण्यात आली जात वंश यांच्या आधारे सैनिक तुकड्या तयार करण्यात आल्या राष्ट्रीय विचारांचा सैन्याशी संपर्क येवू नये. एकामेकांचे विचार जुळू देत नव्हते. थोडा जरी विद्रोह दिसला तर त्या सैनिकाला फाशी दिली जात होती बाहेरील सैनिकापेक्षा ब्रिटिश सैनिकांवर जादा खर्च करण्यात येवू लागला 

            १८५७ उठावाची एक नाही अनेक कारणें आहेत आर्थिक सामाजिक धार्मिक 

जमिनीचा महसूल दरांचा ( ४५/ते ५५ टक्के) मोठा बोजा शेतकऱ्यांवर होता महसूल न भरल्यास जमीनदार. सावकार. किंवा शासन यांचेकडून शेतकरी यांच्या जमीनी जप्त करण्यात आल्या यामुळे शेतकरी गांजले. यंत्रतपोदित स्वस्त मालाच्या आयातीमुळे स्वदेशी कलाकार व्यावसायीक उधोग याची मोठी हाणी झाली देशी राज्ये नष्ट झाल्याने पारंपारिक कारागीर कलावंत यांचा राजश्रय नाहिसा झाला

       सतिबंदी. विधवा पुनर्विवाह. कायद्याने मान्यता. बालहत्या बंदी या सुधारणा म्हणजे आपल्या सामाजिक व्यवहारात चालिरीती मध्ये परकियांच्या हस्तक्षेप होय अशी भावना सामान्य जनतेत निर्माण झाली ब्रिटिश अधिकारी आपल्या वंश श्रेष्ठता अहंकारामुळे भारतीय लोकांना अपमानास्पद वागणूक देत  

    ब्रिटिश राजवटीत खिॖसती मिशनरयानी हिंदू व इस्लाम धर्माविरुद्ध निंदानालस्ती पर व आक्रमक प्रचार केला याला ब्रिटिश राज्यकर्त्यांचे सहकार्य करत असत यामुळे हिंदू व मुस्लिम यांच्यात धर्म धोक्यात आल्याची भावना निर्माण झाली शाळा कॉलेज मध्येही असाच प्रकार चालत असे इंग्रजांची हिंदी सैनिकांबरोबर कठोर मानसिकता तत्कालीन समाज जातीभेदावर आधारित होता लष्कर मोहिमांसाठी धर्माने निषिद्ध ठरवलेल्या समुद्र पर्यटन करण्याची हिंदी सैनिकांवर सक्ती केली जात असे सैन्यदलातील अनेक सैनिकांना एकाच स्वयंपाकघरातून जेवन दिले जात असे इंग्रज अधिकाऱ्यांच्या या कठोर व्यवहारामुळे रोटी व्यवहाराचे निर्बंध मोडण्याची सक्ती हिंदी सैनिकांवर होत असे त्यांच्यावर दाढी ठेवणें. गंध लावणे. परंपरागत पोशाख करणे. यांवर निर्बंध लावले जात असत सरकार आणि अधिकाराच्या या कठोर मानसिकतेमुळे हिंदी सैनिकांत असंतोष निर्माण झाला त्यातच राजकीय कारणें पण होती लाॅरड डलहौसी. खालसा धोरण. तैनाती फौज पध्दत. ब्रिटिश दडपशाही धोरण. 

       इ स १८५७ यातील शूरवीर झाशीची राणी लक्ष्मीबाई या उठवात एक महिला असून सुद्धा इंग्रजां बरोबर लढली आणि लढता लढता धारातीर्थी पडली. पेशवा नानासाहेब पेशवे बाजीराव यांच्या मृत्यूनंतर त्याचा वार्षिक तनखा नानासाहेबास देण्यास डलहौसी यांने नकार दिला म्हणून नानासाहेब पेशवे यांनी १८५७ उठावात सहभाग घेतला आणि शेवटच्या क्षणापर्यंत लढले तात्या टोपे. १८५७ उठावात महत्वाची भूमिका बजावणारे शूरवीर चिकाटी. धैर्य. व असामान्य पराक्रम यांचे अनोखे दर्शन विशवासघातामुळे त्याचा वध करण्यात आला

        १८५७ अपयशाची कारणे या उठावाचा प्रसार प्रचार व पाठिंबा उत्तर भारतापुरता मर्यादित होता दक्षिण भारतात या उठावाला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही उठावामागे व्यापक नियोजन नव्हते आणि मार्गदर्शन करणारे प्रभावी नेतृत्व नव्हते उठाव अनेक ठिकाणी विखुरलेल्या स्वरुपात झाले पण त्यात सुसूत्रता नव्हती ब्रिटिशांची शस्त्रास्त्रे युद्धतंत्र आणि लष्करी यंत्रणा उठाव करणार्या पेक्षा श्रेष्ठ होती

   ब्रिटिश राजवटीविरुद्ध भारतीय चळवळीचा आरंभ या उठावासरशी झाला अशी आपली पक्की धारणा तयार झाली १८५७ या लढ्यात स्मृती आपल्या राष्ट्रवादी भावनेचा परिपोष करतात असा मनोमन विश्वास आपणास आजही वाटतो तात्या टोपे. मौलवी अहमदशहा. नानासाहेब पेशवे. राणी लक्ष्मीबाई. पराक्रमाचे शौर्याचे त्यागाचे आजही कौतुक केले जाते व स्वातंत्र्य लढ्याचे व सेनानी म्हणून त्यांच्या स्फूर्तिदायक लढ्याचा गौरव केला जातो या गौरवात आपणही मनोमनी होतों १८५७ चया उठावातून आपली राजकीय मानसिकता घडतेे >

               आज आपल्या हक्कासाठी अधिकार यासाठी आपणास लढण्याची गरज आहे आज आपणावर घातले जाणारे विविध निर्बंध आपल्या स्वातंत्र्यावर गदा आली आहे समता बंधुता लोकशाही विकेंद्रीकरण विचार स्वातंत्र्य आपल्या हक्कासाठी बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन करण्याचा अधिकार नाही असला तर कोण उत्तर देत नाही यांचा अर्थ असा होतो की परके गेले आणि आज आपण आपल्या देशात गुलामगिरीचे जीवन जगत आहोत म्हणजे आपणांस पुन्हा उठाव करावा लागणार

समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार जाहिरात प्रसिद्ध वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

वाचा

खेळ. आदिवासी. बिगर आदिवासी. अनुसूचित जाती जमाती adhivasi samaj...

आंतरराष्ट्रीय मानवाधिकारी राजदूत संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी अल्तमश जरीवाला -...

वारस नोंद चा कायदा - ....

अंत्योदय योजना लाभार्थी निवड व अंमलबजावणी...

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा

  सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा            अनुसूचित जाती जमाती. इतर मागासवर्गीय जाती जमाती. भटक्या विमुक्त...

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या