Showing posts with label Corona. Show all posts
Showing posts with label Corona. Show all posts

कोरोना, महापूर बेरोजगारी, कर्जाचा डोंगर

 


                   22/23/ मार्च 2020 पासून गाव तालुका जिल्हा राज्य देश वाडी. वस्ती कोरोना सारख्या महाभयंकर महामारी संकटाने थैमान घातले होते रोगाचा प्रसार जनसंपर्क गर्दि झाल्यामुळे होतं असल्यामुळे जनता कोरोना सारख्या महाभयंकर संकटापासून वाचण्यासाठी शासनाने वेळोवेळी टाळेबंदी. लाॅकडाऊन जारी केला होता त्यामुळे सर्वसामान्य जनता गोरगरीब लोक मध्यमवर्गीय कुटुंबे. घरातच अडकून पडले होतें. घरातच अडकून पडल्यामुळे रस्त्यावर फिरणे नाही मेडिकल जीवनावश्यक वस्तूंच्या विक्रीसाठी दुकाने सोडून काहिच चालू नाही. त्यामुळे लाॅकडाऊन टाळेबंदी जारी केल्यामुळे हाताला काम नाही त्यामुळे हातात पैसा नाही त्यामुळे त्यांच्या वर व त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली काही लोकांना ही प्रस्थिती बघवली नाही त्यांनी आत्महत्या सारखें मार्ग निवडले आणि आपली जीवनयात्रा संपवली. मरणाने मरून गेले पण मागे राहिलेल्या कुटुंबांचे हाल होण्यास सुरुवात झाली खाण्यास अन्न धान्य नाही हाताला काम नाही धुणीभांडी काम करायला सुध्दा कोण बोलवत नाही. बांधकाम कामगार. फळे फुले भाजीपाला विक्री करणारे. चायनीज भेळ पाणीपुरी रगडा पॅटीस बिर्याणी मसाला. पापड लोणची चटण्या तयार करणारे उद्योग सुरू करण्यासाठी लहान लहान पतसंस्था. बॅंका. भिशी. व्याजाने पैसे. हात उसणे पैसे लाईट बील. घरफाळा पानपट्टी. विविध कर . हे सर्व व्यवहार जाग्यावर थांबले. त्यामुळे या सर्व बाबींचा आर्थिक व्याजाची रक्कम वाढतं गेली. ग्रामपंचायत नगरपालिका यांनी त्यांचे कर माफ करण्याचे बाजूला राहीले पण त्या रककमेला दंड लावला आणि त्या दंडाला सुध्दा व्याज लावले. ही जनतेबरोबर झालेली वागणूक आपण बघितली आहे. म्हणजे सर्व आर्थिक संस्थांचे आणि शासन सरकार यांचे काही लागेबांधे आहेत काय असा प्रश्न पडतो

      सर्वात मोठा धोका दर पाच चार वर्षाने येणारा मोठा पश्चिम महाराष्ट्रात येणारा धोका म्हणजे येणारा महापूर. प्रत्त्येक महापूरावेळी. कोट्यावधी रुपयांचे नुकसान होते. पूराची चाहूल लागताच. हजारों कुटुंब स्थलांतरित करणे. जनावरें. जीवनावश्यक वस्तूंचे स्थलांतर करणे यासाठी येणारा शासनाचा लाखों रुपये खर्च दर पाच वर्षांनी होतो. 2005/2014/2019/2021 असा क्रम आपण अनुभवला आहे. सातारा सांगली कोल्हापूर या जिल्ह्याला मोठा फटाका बसतो. हजारों एककर शेती पाण्याखाली जाते नदीकडची शेतजमीन खचून जाणे. जी शेतजमीन पाण्याखाली जाते त्यासाठी शेतकऱ्यांनी मशागत. पेरणी. कोळपणी. भांगलणी. बी बियाणे. रासायनिक खते. किटकनाशके फवारणी. असा दर एककराला लाखों रुपये खर्च येतो. जर त्या शेतकऱ्यांची शेतजमीन पाण्याखाली किंवा वाहून खचून गेली तर आत्महत्या करण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय उरत नाही.कारण हे सर्व खरेदी करण्यासाठी बॅक पतसंस्था. सोसायटी. पाहुणे पै. मित्र. खाजगी सावकाराकडून. हात उसणे. असे शेत जमीनीसाठी भांडवल उभे करतात. आणि नैसर्गिक आपत्ती यामुळे जर नुकसान झाले तर येणारे. मंत्री खासदार आमदार विरोधी पक्षनेते. सत्ताधारी नेते. समाजसेवक. अनेक सामाजिक संस्था. सेवाभावी संस्था. हे आम्ही बघतो. आम्ही करतो. अशी फसवी उत्तरे देऊन काढतां पाय घेतात. ते माग वळुन सुध्दा पाहत नाहीत. यांच्या दौऱ्याचा खर्चाचा तपशील जर घेतला तर एका एका गावचे पुनर्जीवन होईल आश्वासन देण्यापेक्षा बांधावर मदत द्या तुमच्या देखरेखीखाली पंचनामा करून घ्या. घर. शेतजमीन. जनावरें. लहान मोठी जनावरे. मयत जनावरें. मयत व्यक्ति शेतात घरातील गाळ वाळू घाण. स्वच्छ करण्यासाठी जीवनावश्यक वस्तू. वरील सर्व पंचनामे जाग्यावर घटनास्थळी करा. मदत जाग्यावर द्या. अशा वेळोवेळी होणार या विघातक घटनांमुळे आपले बांधव मागे मागे निघाले आहेत कर्जाचा डोंगर रोजच वाढत आहे अशीच परिस्थिती राहीली तर एक दिवस आपली शेती घर विकून कर्ज भागवावे लागणारं. म्हणून मी म्हणतो की शासन आणि सरकार आणि आर्थिक संस्था यांचें काही लागेबांधे आहेत का खरोखरच पूरग्रस्त भागातील लोकांना मदत करणारं असाल तर. त्या भागचा दौरा. पाहणी. भेट. देताना आपल्या सोबत झाडू घेऊन जा आणि पूरग्रस्त लोकांच्या घरातील परिसरातील घाण स्वच्छ करा आणि मग त्यांना जीवनावश्यक वस्तूंची मदत करा म्हणजे खरोखर मदत केल्याचे तुम्हाला समाधान आणि पूरग्रस्त लोकांना आपण भेट व मदत केल्याचे समाधान

          कोरोना काळात टाळेबंदी जारी केल्यामुळे ग्रामीण भागातील कंपनी मधील कामगार कामावरून घरी घालवले त्यामुळे त्यांचा रोजगार गेला हातचे काम गेले. गावाकडे काम नाही त्यामुळे बेरोजगारी वाढली. बेरोजगारी वाढल्यामुळे लोकांना काम नाही मिळेल ते काम करून लोक आपला आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवू लागले बांधकाम कामगार यांना मोठा फटका 2817 साली वाळू बंदी झाल्यापासून झाला आहे त्यापासून बांधकाम कामगार यांच्या हाताला म्हणावं तसा रोजगार नाही. मिळणारी मजूरी कामानुसार नाही. सरकारी नोकर यांना हजारों रुपये महागाई भत्ता. दिड वर्ष शिक्षण संस्था बंद आहेत तरी लाखांच्या आत पगार नसणारे शिक्षक यांचा पगार चालूच आहे. पण बांधकाम कामगार यांना तीन महिन्यांसाठी 1500 रूपये मदत कशाला एवढा मोठा उपकार करताय का चेष्टा करताय. या रोजगार मिळेल या अपेक्षेने विविध कंपन्यांचे कामगार बांधकाम कामगार व अन्य ठिकाणी काम करणारे कामगार महिला कामगार. यांनी आपली घरे. दुकान. व अन्य कारणांसाठी मुलांना नोकरी नाही त्यांना जगण्याचे साधन मिळावे म्हणून फायनान्स कंपनी. बॅक. पतसंस्था. खाजगी सावकाराकडून. कर्ज काढून मालवाहतूक. प्रवाशी वाहतूक करणारी वाहने घेतली आहेत आज जवळपास दोन वर्षे कोरोनामुळे जागोजागी टाळेबंदी लाॅकडाऊन आहे त्यामुळे या वाहनांना रस्त्यावर माणूस नाही कोणताही उद्योग चालू नाही त्यामुळे गाड्यांना भाडे नाही. त्यामुळे बॅक. फायनान्स कंपनी. पतसंस्था. खाजगी सावकार व विविध आर्थिक संस्था यांचें पोट भरले व्याजाने पण सर्वसामान्य माणसांचे काय. यातील भयानक प्रकार म्हणजे काही जणांनी थोडे थोडे पैसे भरुन गाड्या घेतल्या हप्ते थटले म्हणून आर्थिक संस्थांनी गाड्या वडून नेल्या पैसे गेले आणि गाडी सुध्दा काय करायचं गरिबांन यामुळे काही बेरोजगार तरुणांनी गुन्हेगारी मार्ग निवडले तर काही व्यसनी झाले तर काहीजणांनी आत्महत्या सारखें मार्ग निवडले याला कारणीभूत आहे ते म्हणजे आपले शासन म्हणून मी म्हणतो की सर्व आर्थिक संस्थांचे आणि शासन व सरकार यांचें काही लागेबांधे आहेत का कारणं माफी करत नाहीत पण त्याला बढावा तरी देऊ नका

            कोरोना काळ आज जवळजवळ आपल्या मागे दोन वर्ष होत आले तरी आहे यात. लहान मोठ्या बॅका. पतसंस्था. विविध कार्यकारी सोसायटी. फायनान्स कंपनी. गृहकर्ज. व्यवसाय कर्ज. शिक्षण कर्ज. भीशी. कट्टा भीशी. खाजगी सावकार. व अन्य विभागातून होणारी आर्थिक मदत. यांचा एकही हप्ता काय पण व्याज सुध्दा सर्वसामान्य माणसाला गोरगरीब व हातावरचे पोट असणाऱ्या कामगारांना जगायच. लहान मोठे व्यवसायिक. यांचा उधोग बंद त्यात पूराचा फटका यामुळे हप्ता भरायचा या विवंचनेत जमलंच नाही त्यामुळे या सर्व आर्थिक संस्थांच्या रककमेचे व्याज आणि हप्त्याची रक्कम आणि थकीत हप्ता यांवर येणारे व्याज दंड यांवर लागणारे चक्रि व्याज यामुळे सर्वसामान्य जनतेवर कर्जाचा डोंगर आज तयार झाला आहे. यामुळे फक्त आणि फक्त फायदा होणारं आहे तो म्हणजे कायदेशीर व बेकायदेशीर पणे वसुली करणार्या आर्थिक संस्था आज फायद्यात आहेत 

        यातून नीशपनन काय होणार याचा अभ्यास केला तर भयानक आहे. आहे असेच जर चालू राहीले तर आपल्या आपण पोटमारून. दोन वेळचे जेवन अर्धपोटी राहून अतिशय कष्टाने घेतलेल्या जागा जमीन घर गाड्या. व अन्य असणारी आपली संपत्ती विकून यांचें कर्ज भागविण्याची वेळ येणार आहे कोणीही आपला एकही रूपया माफ करणार नाही करा म्हणाणार नाही त्यामुळे आपणालाच या विरोधात आवाज उठविण्याचा गरज आहे सर्वांचे कर्ज माफ होत असेल तर मग असंघटित क्षेत्रातील सर्व सामान्य कामगार यांचें का होत नाही 

          आवाज उठविण्याचा गरज आहे

समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा 2013 रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

9890825859

आकस्मिक आजारांमध्ये कोविड -१९ चा समावेश

 


                    २२/२३ मार्च २०२० मध्ये कोविड १९ या महामारी सारखें महाभयंकर संकट आपल्यावर आले राज्यात देशात गावात वाडी गल्ली तालुका जिल्ह्यात शासनाने जनता कोरोणा महामारी संकटापासून वाचण्यासाठी टाळेबंदी जारी करण्यात आली बांधकाम कामगार. चहागाडीवाले. वडापाव विकणारे. फळे फुले भाजीपाला विक्री करणारे. मजूर. वडाप करणारे. मालवाहतूक करणाऱे. लाल परी. घरकाम करणाऱ्या महिलां पापड लोणची चटण्या करणार्या महिला. अशी एक नाही अनेक घटक आपला जीव वाचवण्यासाठी घरातच अडकून पडले होते हाताला काम नाही त्यामुळे हातात पैसा नाही त्यामुळे त्यांच्या वर व त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली होती त्यावेळी काहीजणांना ही आपलीं व आपल्या कुटुंबाची उपासमारीची वेळ बघून काहीजणांनी आत्महत्या सारखें मार्ग निवडले आणि आपलीं जीवन यात्रा संपवली त्यामुळे त्यांची कुटुंबे बेवारस झाली 

             शासनाने कोरोणा सारख्या महाभयंकर महामारी आजारात उपचारासाठी येणारा खर्च. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत करण्याचा निर्णय घेतला सर्व दवाखान्याना सदर बिला बाबत निश्चिती करण्याचे आदेश दिले आणि ज्यांची परस्थिती नाही उपचारासाठी खर्च करण्याची त्यांचे उपचार या योजनेतून झाले त्यामुळे सर्वसामान्य माणसाला मोठा आधार मिळाला आज सुध्दा कोरोणा रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे 

            राज्य सेवा ( वैद्यकीय देखभाल ) नियम १९६१ व यामध्ये वेळोवेळी झालेल्या आणि होणा-या सुधारणासह वै शि व औषधी द्रव्ये. वि. शा. नि. क्र. एम आय एस २००१/१२५६/ प्र क्र १९८/२००१/ प्रशासन -२ दिनांक २८ जानेवारी २००२ परिशिष्ट मुद्दा क्र २ नुसार शासकीय कर्मचारी व त्यांचेवर अवलंबून असणारे कुटुंब यांना विनाशुल्क वैद्यकीय उपचारांची सवलत असल्यामुळे त्यांच्याकडून वैद्यकीय खर्चाला प्रतिपूर्ती प्रमाणपत्रासाठी बिलांच्या ३०/टक्के शुल्क आकारण्यात येऊ नये मात्र इतर सर्व प्रकरणी बिलांच्या ३/ टक्के शुल्क आकारण्यात यावे मात्र आत्ताची परिस्थितीत ठराविक २७ आजाराकरीता खाजगी रुग्णालयात उपचार घेण्याची परवानगी देण्यात आलेली आहे सार्वजनिक आरोग्य विभाग शा नि क्र एम एजी २००५/९/ प्र क्र / आरोग्य -३ १९ मार्च २००५ नुसार २७ आकस्मिक व ५ गंभीर आजारांची यादी दिलेली आहे ती शा नि क्र वै ख प्र २०११/ प्र क्र ३३३/११ / रा का वि २ दि. १६ नोव्हेंबर २०११ अन्वये शा नि दि १९/ मार्च २००५ मधील केवळ ३(१) व (२) मध्ये सुधारणा. करण्यात आली

           महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग

(१) शासन निर्णय सार्वजनिक आरोग्य विभाग क्रमांक एम एजी. १०८४/४२५७/ सी आर १५६ दिनांक. २९ एप्रिल १९८५

(२) शासन निर्णय सार्वजनिक आरोग्य विभाग क्रमांक एम एजी १०८८/३८३७/आरोग्य -९ दिनांक २३ जानेवारी १९८९

(३) शासन निर्णय सार्वजनिक आरोग्य विभाग क्रमांक एम एजी १०९९/प्र क्र ४०/ आरोग्य -३ दिनांक २९ जुलै १९९९

(४) शासन निर्णय आरोग्य विभाग क्रमांक एम एजी १०९९/प्र क्र २३८/ आरोग्य -३ दिनांक २१ आॅगसट १९९९

(५) शासन निर्णय आरोग्य विभाग क्रमांक एम एजी १०९५/ सी आर ४५/आरोग्य -३ दिनांक ४ जुलै २०००

(६) शासन निर्णय सार्वजनिक आरोग्य विभाग क्रमांक एम एजी २००५/९/ प्र क्र १/ आरोग्य -३ दिनांक १९ मार्च २००५

(७) शासन निर्णय सार्वजनिक आरोग्य विभाग क्रमांक एम एजी २००५/ प्र क्र २५१/ आरोग्य -३ दिनांक १० फेब्रुवारी २००६

(८) शासन निर्णय सार्वजनिक आरोग्य विभाग क्रमांक वै ख प्र २०१९/ प्र क्र २३६/ रा का वि -२ दिनांक २७ मार्च २०२०

(९) शासन निर्णय महसूल व वन आपत्ती व्यवस्थापन. मदत व पुनर्वसन विभाग क्र डि एम यु. -२०२०/ प्र क्र ९२/ डी आय एस एम -१ दिनांक ३१ आॅगसट २०२० 

         असे वेळोवेळी शासन निर्णय जारी करण्यात आले आहेत संदर्भ क्र सहा मध्ये नमूद केल्याप्रमाणे दिनांक १९ मार्च २००५ चया शासन निर्णयानुसार आकस्मिक व गंभीर आजारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे त्या प्रामुख्याने २७ आकस्मिक आजार व ५ गंभीर आजार निश्चित केले आहेत सध्याची परिस्थिती पाहता शासनाने कोविड १९ हा एक नवीन आजार आहे व त्यावरील उपचारासाठी वैद्यकीय खर्चात देखील गोरगरीब जनतेला न परवडणारी प्रचंड वाढ झाली आहे तसेच. संदर्भ क्र ९ चया शासन निर्णयानुसार दिनांक २ सप्टेंबर २०२० पासून राज्यातील सर्व शासकीय कार्यालयातील उपस्थिती वाढविण्यात आलेली आहे कोविड १९ चा परिणाम बहुतांशी श्वसन संस्थेवर होतो ह्रदय व फुफ्फुसा संबंधित आजार हे संदरभाधीन शासन निर्णय क्र ६ मधील परिशिष्ट "अ" मधील अनुक्रमांक १ मध्ये समाविष्ट आहे परंतु शासनाचे इतर विभाग व क्षेत्रिय कार्यालयाकडून कोविड १९ या आजारांवरील उपचारासाठी वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती बाबत स्पष्टता आणण्याची मागणी करण्यात येत आहे 

      अनुषंगाने कोविड १९!या आजारांवरील उपचारासाठी करण्यात आलेल्या वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती बाबत स्पष्टता आणण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती

         शासन निर्णयानुसार संदर्भ ६ चया शासन निर्णय विरनिदिषट. करण्यात आलेल्या २७ आकस्मिक आजारांमध्ये आणखी नविन १ (एक ) आकस्मिक आजारांचा समावेश करण्यात येत आहे

 ‌. (२८) कोविड १९

वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती साठी रुग्णांचे कोविड १९ बाधीत असल्याने वैद्यकीय अहवालात नमूद असले पाहिजे तसेच रुग्णांच्या रक्तातील spo2 ( प्राणवायू पातळी ) ९५ / टक्के पेक्षा कमी असणे गरजेचे आहे

*. हे आदेश २ सप्टेंबर २०२० पासून पुरवलक्षी प्रभावाने लागू राहतील असा आदेश दिला आहे

* हे आदेश वित्त विभागाच्या सहमतीने व त्यांच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक ५४/२०२०/ सेवा -५ दिनांक. ७/१२/२०२० नुसार जारी करण्यात येत आहे

       शासनाच्या या निर्णयामुळे आता कोणीही गरीब माणूस आपला जीव गमवणार नाही तो आणि त्याचे कुटुंब निरोगी आणि सुदृढ होण्यासाठी मदत होईल

  आत्ता गरज आहे वरील शासन निर्णयानुसार सातत्याने आणि सापेक्ष डाॅ यांनी राबविला पाहिजे आणि सर्वसामान्य जनते पर्यंत हा शासन निर्णय पोहचला पाहिजे

   समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार जाहिरात प्रसिद्ध वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी 

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

अजून नाही सुटला जातीच्या दाखल्याचा व जातीचा तेढ - caste certificate...

अतिक्रमण होणार नाही ?...

आपणास पुढे दिसतो जालियनवाला बाग हत्याकांड -, Jaliyanwala baug..

पुन्हा एकदा १८५७ उठाव -1857...

कोरोना २ को कैसे रोके ?

कोरोना २ को कैसे रोके  ? 


            कोईभी बिमारीकी साथ  बिमारोकी संख्या पहले बार कम होनेके बाद जब उस बिमारिकी दुसरी लाट आती है उस वक़्त बिमारोकी संख्या पहेले से ज्यादा होनेका अंदेश रहेता है. १९१८ के दशक मे जब फ्लु महामारी दुनीयामे जोर पकडा और जब  बिमारोकी संख्या घटने लगी जनता ये समज रही थी की महामारी अब खतम हो रही है तब अचानकसे महामारी ने फिर  जोर पकडा और बिमारी  फिरसे बडने लगी और इस्की संख्या पहलेसे भी ज्यादा गतीसे बढने लगी.    

        कोविड १९ महामारी  से  पुरे दुनीया परेशान है और अब युरोपिअन देशोमे कोविड १९ फिर से अपने पैर फैला रहा है . इसे कोरोना की दुसरी लाट कहेना मुनासीफ होंगा. अब सवाल ये है की इस तऱ्ह के लाट क्यो आते है ?  

        कोईभी रोग या बिमारी  की साथ आने पर उसे काबु करने  केलीए  जनता तऱ्ह तऱ्ह की कोशीश करती है सरकार ने बताये हुए नियमो का पालन करती है. और जैसे जैसे रोग की साथ बढने लगती है नियम का पालन करनेवालो की संख्या बढने लगती है. इसके लिए हर एक व्यक्तीने जो मेहनत किया उसे भुल नही सख्ते. सरकार, पोलीस, आरोग्य से जुडे हुए डॉक्टर और कर्मचारी ,  समाजसेवक, सफाई कामगार आदी. सभीका अलग किरदार है.

       लेकीन इन्सानी फितरत ये है की वो ज्यादा दिनोतक बंदन मे नही रह सकता वो बंदन तोडने लगता है. नागरीक बताए हुए नियमोका पालन करणा कम कर देता है .उसी का कारण है की फिर मारीजोकी  संख्या बढने लागती है. बिमार लोगो कि संख्या नियमोका पालन नही करनेसे बढना शुरू होती है और फिर बिमारीकी दुसरी लाट के चपेत मे नागरिक आने लगते है.  ये लाट कभी जलद आती ही तो कभी देरीसे आती है और जनता इसके हत्ते चढ जाते है. जब तक सरकारी और खासगी दवाखाने  इस बिमारी का इलाज करनेमे सक्षम है तब तक ये हमारे काबुमे है लेकीन अगर मरीजोकी संख्या ज्यादा होगी तो ये बडी मुश्कील खडी कर देती है. सामान्य जनता की ये जिम्मेदारी है की ये बिमारी ज्यादा ना फहले. 
        
        
        जीस  देश मे थंडी का मौसम शुरू हो राहा है और वाह का तापमान बहुत कम है वहाकी जनताको अब ज्यादा समजदारी से काम लेना होंगा . अगर जरुरत नही है तो भीडवाले इलाके मे जाना टालना होंगा.     

भविष्य मे दुसरी लाट कब और किस तऱ्ह की होंगी ये बताना मुश्कील है.
  • जब तक हम सब मिलकर एक निश्चय नही करते तब तक ये मुमकिन नही.
  • जरुरत हो तो गर्दी वाले जगह पर ना जाए जितने गर्दी कम उतना धोका  कम.
  • निर्धारित नियमोका पालन करना.     
        अगर हर व्यक्तीने अपनी जिम्मेदारी समज कर खुद पर निरबंद लगाले तो कोरोना की दुसरी लाट कम दर्जे की होंगी.

        आशा करते है की  हमसब मिलकर कोरोना जैसी बिमारी का सामना करेंगे.    


वाचा -

रफिक मुंशी आणि सहेबान जहागीरदार यांचे सत्कार

कोरोना काळात सामान्य जनतेला मदत हेच महत्त्वाचे- रियाज सय्यद



अहमदनगर- कोरोणा काळात जनतेला मदत खूप गरजेची होती रुग्णालयातील असो की कोणी किरोना मुळे दगावले. जनतेला समजेना असे झाले त्याकाळात दगावलेल्या व्यक्तीचा अंतिम विधी करण्यासाठी साहेबान जहागीरदार आणि त्यांचे सहकारी समोर आले. साहेबान जहागीरदार यांना रुग्णालयातून फोन आले की ते आणि त्यांचे सहकारी पुढील काम सुरू करीत. कोरोना मुळे मृत्यू झालेले लोकांना त्यांचे त्यांचे धर्मानुसार अंतीम विधी केले.

त्याच बरोबर अहमदनगर शहरातील रुग्णालय सामान्य जनतेसाठी खुले करून कोरोना रुग्णाला दिलासा देण्याचे काम कर्मयोगी प्रतिष्ठान च्या माध्यमातून माजी समाज कल्याण अधिकारी रफीक मुनशी आणि त्यांचे सहकारी ने मदत केली.

 या वेळी ऍड फारुक  साहेब, शफी जहागीर, अनिस भाई, डॉ.रिजवान, डॉ.इम्रान, डॉ. परवेज,नगर सेवक आसिफ सुलतान, सय्यद शानु भाई, फायज भाई केबल वाले नफिस भाई चुडीवाले आदी मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला* .

पुण्यातील कोरोणाने मृत्यु झालेले नागरिकांची अंतिम विधी करणारे अंजुम इनामदार यांचे अहमदनगर मध्ये सत्कार

 पुण्यातील कोरोणाने मृत्यु झालेले नागरिकांची अंतिम विधी करणारे अंजुम इनामदार यांचे अहमदनगर मध्ये सत्कार.



    कोरोना काळात जेव्हा सर्वांना आपली जीवाची रक्षा कशी करावी याकळे लक्ष होते. नागरिक लॉक डाऊन आल्याने घरा बाहेर पडत नव्हते. ज्या व्यक्तीला कोरोणा झाला तर त्याचे व त्याच्या कुटुंबाकडे जाण्यास लोक घाबरायचे. कोरोणा ने मृत्यु झालेले व्यक्तीचा अंतिम दफन विधी कसा आणी कोण करणार याची चिंता नागरिक मध्ये होती. तेव्हा सामान्य जनतेचा विचार करून पुण्यात मूलनिवासी मुस्लिम मंच चे अध्यक्ष अंजुम इनामदार व त्यांचे सहकारी घराबाहेर पडले आणी कोरोणा ने मृत्यु झालेल्या नागरिकांची अंतिम विधीची जबाबदारी घेतली. मृत्यु कोणतेही जाती धर्माचे व्यक्तीचा असो अंजुम भाई आणी त्यांचे सहकारी तयार असायचे. मेलेल्या व्यक्तीची अंतिम विधी त्याचे धर्मा प्रमाणे व्यवस्थित पार पाडून त्यांच्या नातेवाईकांना त्याची सविस्तर माहिती देत असे. सादारण ६०० पेक्षा जास्त विविध धर्माचे लोकांची विधी अंजुम भाई आणि त्यांचे सहकारी यांनी पर पाडले. हे सर्व काम अनुजमभाई यांनी निःशुल्क केले. यामुळे पुण्यातील जनतेला मोठा दिलासा मिळाला व समाधान वाटले की आपले नातेवाईकाची विधी योग्य रिती पर पडली. 
    अंजुम इनामदार हे अहमदनगर येथे काही काम निमित्त आले असता एम आय एम अहमदनगर तर्फे त्यांचा सत्कार करण्यात आले. यावेळी अंजुम इनामदार यांनी आपला अनुभव मांडला ते म्हणाले जेव्हा मी आणी माझे सहकारी या कामासाठी तयार झालो तेव्हा आम्ही प्रशासनाला भेटून त्यांना याची कल्पना दिली जेव्हा कोणाचा मृत्यू झाला की आम्हाला रुग्णालयातून किंवा रुग्णाचे नातेवाईकांचा कॉल यायचा आणी लगेच आम्ही एक मेकांना संपर्क करून तयारीला लागायचो दिवस असो की रात्र पहिले अंतिम विधीचा काम पूर्ण करून मृतच्या नातेवाईकाला कल्पना द्यायचो. हा काम अल्लाह परमेश्वर यांनी आमच्या हाते घेतला याचा आम्हा सर्वांना खूप समाधान आणी आनंद आहे.
      एम आय एम जिल्हा अध्यक्ष डॉ परवेज अशरफी, जिल्हा महा सचिव जावेद शेख, विद्यार्थी जिल्हा अध्यक्ष शाहनवाज तांबोळी, जिल्हा उपाध्यक्ष फिरोज शेख, मुफ्ती अल्ताफ, शेवगाव तालुका अध्यक्ष युसुफ शेख, निसार शेख, राजेश्वर श्रीराम आदी उपस्थित होते.

वाचा-



सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा

  सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा            अनुसूचित जाती जमाती. इतर मागासवर्गीय जाती जमाती. भटक्या विमुक्त...

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या