Showing posts with label सफाई कामगार. Show all posts
Showing posts with label सफाई कामगार. Show all posts

कामगार ठेकेदार इंजिनिअर आणि योजना

 



कामगार ठेकेदार इंजिनिअर आणि योजना

         ‌ कामगार हे बहुतांशी अशिक्षित अडाणी गरजू असल्याने तसेच ते असंघटित असल्याने त्यांची मालक ठेकेदार इंजिनिअर वर्गाकडून सतत पिळवणूक होण्याची शक्यता असते. त्या करीता त्यांना त्यांच्या रोजगार सेवाशर्ती प्राप्त व्हाव्यात व त्यांना सामाजिक. शैक्षणिक. वैद्यकीय. आर्थिक सुरक्षा प्रधान करण्याच्या उद्देशाने विविध कामगार कायद्यामध्ये कामगारांचे हक्क निर्माण करून त्यांना संरक्षण देण्यात आलेले आहे या कामगार कायद्यांची प्रभावी पणे व यशस्वी अंमलबजावणी मालक ठेकेदार इंजिनिअर यांचेकडून केली जात आहे ती कशी हे पाहण्यासाठी व खात्री करून घेण्यासाठी असे कामगार ज्या ठिकाणी काम करतात कामांवर जातात अश्या कार्यस्थळाचे निरिक्षण करण्याकरिता आयुक्तालय कामगार आयुकतापासून तर निम्मं स्तरावरील सहकारी कामगार अधिकारी तसेच किमान वेतन निरिक्षक ( शेती व दुकाने निरिक्षक यांची विविध अधिनियमाच्या अंतर्गत #निरिक्षक # म्हणून नियुक्ती करण्यात येते व आलेली आहे अश्या प्रकारे ज्या अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती अधिनियमाच्या अंतर्गत # निरिक्षक # म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे असे अधिकारी व कर्मचारी त्यांना नेमून देण्यात भौगोलिक कार्यक्षेत्रातील विविध असथापनेतील/ उधोगांना निरिक्षक भेटी देऊन या या भेटी वेळी प्रत्यक्ष कामगारांच्या सेवाशर्ती बाबत त्यांना विविध अधिनियमाच्या अंतर्गत लाभ सुविधा सोयी सुविधा नियोक्तयाडून. दिल्या जातात किंवा नाही याची तपासणी करून खात्री करून घेतात व कामगारांना अधिनियमानुसार मिळणारे. १९ कल्याणकारी योजना सापेक्ष पणे मिळवण्यासाठी किंवा त्या मिळत नसतील तर त्या मिळवून देण्याचा प्रयत्न करतात किंबहुना ते मिळवून देण्याकरिता त्यांना केंद्रीय कायदे १९ व राज्य शासनाचे ६ कामगार कायदे तयार करण्यात आले आहेत. या कायद्यानुसार आवश्यकती कारवाई ते करतात यात नियोकतयाकडून विविध न्यायालयात अभियोग दाखल करून किंवा कामगार न्यायालय मध्ये वसुली दावे दाखल करणे यांचा समावेश होतो

      कामगार आयुक्तांकडून खालील महत्वाची कार्य केली जातात

विविध कामगार कायद्यांची अंमलबजावणी करून अधिनीयमाचे फायदे कामगारांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे. कामगार व मालक मध्ये कामगारांच्या प्रश्नावरून निर्माण होऊ पाहणा-या किंवा निर्माण झालेल्या औधोगिक विवादात वेळीच मध्यस्थी करून कामगार व मालक यांच्यात समेट घडवून आणणे. व औधोगिक क्षेत्रातील शांतता व सुव्यवस्था कायम राखणे/औधोगिक सौदाहपूरण व शांततेने राखणे. 

                  कामगार आज मोठ्या अडचणीत सापडला आहे कारणं शासकीय कल्याणकारी योजना मिळवून देण्याच्या नावाखाली प्रत्त्येक जिल्ह्यात जागोजागी तयार झालेल्या कामगार संघटना. एजंट दलाल यांचा सुळसुळाट यामुळे कामगारांची आर्थिक व मानसिक लुट चालू आहे. ह्या सर्व व प्रकाराला संघटना एजंट दलाल जेवढे जबाबदार आहेत तेवढेच सहाय्यक कामगार आयुक्त भवन मधील अधिकारी व कर्मचारी सुध्दा जबाबदार आहेत. कारणं कामगार आज वैयक्तिक पातळीवर एकादा नोंदणी अर्ज किंवा लाभाचा अर्ज देण्यासाठी किंवा विचारणा करण्यासाठी सहाय्यक कामगार आयुक्त भवन मध्ये गेला तर अधिकारी व कर्मचारी त्याला विचारतात की तुम्ही कोणत्या संघटनेकडून आला आहे असं विचारण्याचा अधिकार अधिकारी व कर्मचारी यांना नाही. सहाय्यक कामगार आयुक्त भवन मधील अधिकारी व कर्मचारी यांचे मोबाईल नंबर फलकावर का लावले जात नाहीत ? संघटना व त्यांचे सहकारी पदाधिकारी यांचें मोबाईल नंबर अधिकारी व कर्मचारी यांचेकडे कशासाठी पाहीजेत ? संघटना व एजंट यांचें सहाय्यक कामगार आयुक्त भवन मध्ये ठिय्या मारणे कोणत्या नियमांत आहे ? म्हणूनच म्हणतो की या सर्व बोगस कामगार नोंदणी यासाठी संघटना एजंट दलाल किंवा अन्य कोणीही जबाबदार नाही कारणं हे सर्व परिस्थितीचें बळी आहेत पण यांना आश्रय देणारे अधिकारी व कर्मचारी हे खरे गुन्हेगार आहेत. एक चौकशी झालीच पाहिजे

              ठेकेदार भोळ्याभाबड्या गरिब व्यसनी अडाणी गरजू अशिक्षित कामगारांवर मनमानी पद्धतीने आपला सर्वस्वी हकक सांगणारा व्यक्ती म्हणजे ठेकेदार होय. जो आपल्या मनाला येईल तेवढा पगार. आपल्या मतानुसार कामांची वेळ. ठरवणारा. आणि कामगार यांच्या जीवांवर. कमी वेळात जास्त आर्थिक माया गोळा करणारा. काही ठिकाणी कामगाराबरोबर त्याची बायको मुलं आपल राज्य सोडून पर राज्यात कामासाठी येतात त्यांचे अनुभव आपल्याला हालवून टाकणारे आहेत. ठेकेदार यांची महिलांना कामाच्या ठिकाणी मिळणारी वागणूक अपमानास्पद असते त्याचा बघण्याचा दृष्टीकोन वाईट असतो पण हे कामगार व त्यांची पत्नी याचा विरोध न करतां सर्व काही सहन करत असतात. काहीवेळा कामगारांना बांधून माराहान करणे. युपी बिहार राजस्थान मधून आलेले कामगार यांना माराहान करून काम करून घेवून न पैसे देता घालवणे. हे आपण बघतो असे कामगार कोणाकडे जाणारं परकी लोक परक राज्य यांतच कामगार अडकून जातो. एकादा कामगार कामावरून पडून मरण पावलयास. त्याला कोणताही सुरक्षा संबंधित ठेकेदार गांभीर्य घेत नाही मयत कामगारांना कोणतीही आर्थिक मदत केली जात नाही. आज आपल्या जवळ बेळगाव कर्नाटक युपी बिहार राजस्थान येथून कामगार कामासाठी येतात रस्त्याचे काम करणारे. सफाई कामगार. यांना सुध्दा ठेकेदार कंत्राट बेसवर कामांवर ठेवले जाते. पण या सर्व कामगारांचा वापर फक्त आणि फक्त पैसा मिळविण्यासाठी केला जातो यांतच कामगार सुरक्षा धोक्यात आली आहे त्यांना शासनाकडून मिळणाऱ्या कल्याणकारी योजना मिळाव्या यासाठी कोणतीही ठेकेदार मदत करत नाही. आत्ता सर्वात मोठा प्रश्न येतो तो म्हणजे कामाच्या दरांचा आजपर्यंत ठेकेदार यांच कधीही युनियन झाल नाही दर निश्चित करण्याबाबत. त्याला कारणं आहे की यांच्यात एकी नाही. यांना एकत्र येण्यासाठी सर्वात मोठा अडसर आहे तो म्हणजे यांना काम देणारया लोकांचा. अनेकवेळा यांचं युनियन दर निश्चित करण्यासाठी युनियन झाले मिटींग झाली जेवण झाली पण ही युनियनने. जास्त काळ टिकली नाहीत आणि येथून पुढे होणारं नाही आणि टिकणार नाही. दर ठरतो सर्व ठेकेदार लोकांचा एक नेता तयार होतो. पण कोणच युनियनचे ठरविल्या प्रमाणे दर घेऊन काम करत नाही कारणं रोज तयार होणारें ठेकेदार आज गल्ली बोळात काही अनुभव नाही चार फळ्या बांबू घेऊन रोज एक कंत्राटदार ठेकेदार तयार होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे खरोखरच प्रामाणिक काम करणारे कामांचा पूर्ण अनुभव असणारे. कामांचा दर्जा उत्कृष्ट असणारे. असे सेंट्रिंगवाले आज दराच्या कचाट्यात सापडले आहेत. मोठे ठेकेदार कंत्राटदार. हेच मनमानी दराने काम घेतात. आणि हेच कमी दारात काम घेतात आणि सर्वांच्या डोळ्यात धूळफेक करतात. कारणं सांगितलें जाते की आपसी संबंध होते. पाहुणे आहेत. त्या इंजिनिअरचे कायम काम आहे. मग दरासाठी एकी होणारच नाही ? १९८९ साली. काॅलम बीम. छपपरी. फाॅंडेशन. यांच दर. अॅटम बेसवर होते. त्यावेळी कामगार पगार. १८ ते चांगला मिस्त्री असेलतर त्याला ३५ रूपये पगार होता. म्हणजे. त्यावेळी कामगार पगार आणि दर यांचा विचार केला तर. आज. २०२१ रोजी. सेंट्रिंग कामांचे दर. ९०/१००/१२०/ असं आहेत कामगार पगार आज ३५०/५००/ असा झाला आहे म्हणजे १९८९ सालीच्या अंदाजानुसार आज सेंट्रिंग कामांचे दर १७०/ रू स्वेटर फूट असायला हवे होतें. याला कारणीभूत आहेत ते म्हणजे सर्व फुटार सेंट्रिंग ठेकेदार कंत्राटदार. युपी बिहार राजस्थान वाले कामगार म्हणून आले आणि स्वता ठेकेदार कंत्राटदार झाले. यांच काय केल आपण ? यांना आश्रय दिला तो म्हणजे इंजिनिअर लोकांनी 

          इंजिनिअर. ठेकेदार यांची पुढची पायरी म्हणजे इंजिनिअर. घर. बंगला. हाॅटेल. लाॅज. मंगल कार्यालय. कंपन्या. एम आय डी बांधकामे. रस्ते. पुल. बंधारे. विविध शासकीय इमारती. या सर्व कामांसाठी सर्वगुणसंपन्न आणि आज सर्वात मोठे खुळ असणारे वास्तुशास्त्र माहीत असणारा. सरळ. सुटसुटीत. मनमोहन बांधकामे करण्यासाठी जीवनातील घर आपल्या स्वप्नातील घर कसं असावं. यासाठी आपण इंजिनिअर निवडतो. जरा माग जाऊन विचार केला तर घराची व सर्व शासकीय निमशासकीय कार्यालये बांधकाम व विविध बांधकामे करण्यासाठी स्थानिक मिस्त्री यांची निवड केली जात होती. पण आज उलट झाल. एकही कंत्राटदार ठेकेदार असा आहे कां त्याला मालकाकडून काम आलंय. नाही कारणं इंजिनिअर लोकानी बांधकाम क्षेत्रात एक वेगळी छाप पाडली आहे. त्यांची एकी मोठ्या प्रमाणात आहे. त्यांच्या मिटींगा महिन्याला होतात विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात त्यामुळे समाजांचा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळाच आहे. पण कामगार ठेकेदार कंत्राटदार यांची छाप व्यसनी. आठवड्याला इंजिनिअर यांच्या आॅफिस पुढे उभे राहणारे. कामांचा अनुभव शुन्य.असणारे. अशी छाप पाडली आहे त्यामुळे यांच्या हातात कोणीही मालक आपले घरांचे काम देत नाही म्हणजे याचा अर्थ असा होतो की इंजिनिअर लोक सेंट्रिंग ठेकेदार कंत्राटदार यांना कधीच एकत्र येवू देणारं नाहीत. कारणं मालक इंजिनिअर यांना मागिल त्या दराने काम देतात जेवढे पैसे इंजिनिअर हातात. मोठ मोठी अपार्टमेंट. मोक्याच्या जागा. लाखांच्या घरात गाड्या. कुठून आलं हातुडा. थाफी बंळबा. न घेता मिळवतात तेवढे पैसे कामगार काम करून सुध्दा मिळवत नाही त्याला एकवेळ गाडीत तेल टाकायला सुध्दा पैसे नाहीत असं का? आपणं कधी विचार केला नाही ? आणि आत्ता दरासाठी मिटींगा घेवून काय उपयोग ? वेळ गेली. ? आत्ता गप्प बसा आणि आप आपसात भांडणे करत माझ काम तु घेतल तुझ काम मी घेतल काय उजेड पाडला घेतल ते सुद्धा कमी दरात आगोदर आपलं मिटवा आणि नंतर दरासाठी उठाव करा 

              आज बांधकाम कामगार कल्याणकारी योजना मिळविण्यासाठी व बांधकाम कामगार आहे हे सिद्ध करण्यासाठी इंजिनिअर यांच ९० दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र गरजेचे आहे. पण आज असा प्रकार उघडकीस आला आहे की काही संघटना सेवाभावी संस्था युनियन यांचेकडे ठराविक रक्कम घेऊन काही इंजिनिअर लोक प्रमाणपत्र देत आहेत म्हणजे खराखुरा कामगार माग आणि बोगस कामगार पुढे यासाठी सुध्दा इंजिनिअर लोक जबाबदार आहेत कां ? यांचा सर्वे झाला काय ? इंजिनिअर यांना किती दाखले देणे असा कोणता निर्णय आहे का? 

          समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

कामगार आणि हडताल A . Munde

https://shooterconsultationcart.com/azp33ctwgz?key=f5e461ccbeb850c3df0b07f34593b0c2https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=8918e3ebc1d8b81261ae6dde0667357d

 कामगार आणि हडताल



आपल्या भारतातील कामगार चळवळी ब्रिटिश काळापासून सुरूवात झाली त्यावेळी कामगार हा शब्द वापरला जात नव्हता कामगारांना गुलाम म्हणून संबोधले जात होते यांचेवर अनेक अत्याचार केले जात होते वेतन निश्चिती नाही कोणतीही सुविधा सुरक्षा कायदा विमा नाही काळ बदलला आणि कामगारांना आपले चांगले वाईट कळायला सुरवात झाली आणि आंदोलन चळवळीचा पहिला प्रयत्न मुंबई मध्ये लोखंडे यांनी केला १९१८  मध्ये बी पी वाडिया यांनी कामगार चळवळीची सुरुवात मद्रास येथे पहिली मजूर संघटना स्थापन केली भारतातील मजूर चळवळींना येथून चालना मिळाली आणि कामगारांसाठी केवळ दोन वर्षांत म्हणजे एप्रिल १९२१ मुंबई कार्यालयांची स्थापना झाली त्यावेळचे गव्हर्नर लाॅरड लाईड यांनी केली संपूर्ण भारतात असे कामगार कार्यालय पहिलेच होते त्यावेळेपासून आजपर्यंत ७७ वर्षे पूर्ण पणे यशस्वी पणे कामगार हितांचे काम हे कार्यालय करत आहे  

         कामगारांसाठी विविध केंद्रिय कायदे १९ आणि राज्य सरकारने कामगारांसाठी  ६ कामगार कायदे तयार करण्यात आले कामगार कार्यालयाकडून कामगार कायद्यांची अंमलबजावणी करणे. अधिनियम फायदे कामगारांना मिळवून देणे कामगार व मालक यात समेट घडवून आणणे  कामगारांसाठी विविध कल्याणकारी योजना अगदी नाममात्र शुल्क घेवून देणे औधोगिक विवाद.  बोनस प्रदान.  कंत्राटी कामगार. बिडी सिगारेट कामगार.  किमान वेतन.  मोटर परिवहन. वेतन प्रदान. श्रमिक पत्रकार.  सांख्यिकी संकलन.  श्रमिक संघ. प्रसुती लाभ.  समान वेतन. वेठबिगार कायदा.  विक्री संवर्धन.  उपदान प्रदान.  स्थलांतरित कामगार.  बाल कामगार. इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ. असे विविध अधिनियम कायदे जारी करण्यात आले कामगारांसाठी हक्काचे व्यासपीठ तयार झाले 

             कामगार म्हणजे अडाणी गरजू व्यसनी गरिब असा एक टप्पा कामगारांवर पडला आहे जागोजागी तयार झालेले सत्ताधारी नेते यांनी आपले जवळचे बगलबच्चे कामगारांवर दबाव पाडण्यासाठी तयार केले हे तयार झालेले कामगार हितचिंतक यांना कामगार म्हणजे कोण हे सुद्धा माहित नाही  यांना काय म्हणतात हे सुद्धा माहित नाही संघटित व असंघटित क्षेत्रातील कामगार कोणते किती टक्के कामगार संघटित आहेत किती कामगार असंघटित आहेत हे सुद्धा ज्यांना माहीत नाही असे कामगार हितचिंतक झाले  विचार केला तर १३/टक्के कामगार संघटित आहेत ८७/टक्के कामगार असंघटित आहेत म्हणजे बांधकाम व्यावसायात येणारे २२ प्रकारचे कामांचे प्रकार येतात बांधकाम कामगार.  पेंटर. फरशी वाले.  पलमबर.  फॅब्रिकेटर. खुदाई कामगार. विट भट्टी कामगार.  असे विविध प्रकारचे काम करणारे कामगार यात समावेश करण्यात आला आहे तसेच अवजड कामे करणारे खाणकाम उद्योग.  टावर काम. पाईप लाईन. अशी विविध प्रकारची कामे करणारे कामगार असंघटित कामगार वर्गात मोडतात. सगळ मंडळाचे काम व्यवस्थित चाललें होते त्यावेळेस कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी विविध पक्ष सामाजिक सेवा संस्था युनियन तयार झाल्या त्यात कामगार नेते म्हणून काम बघणारे यांना वाळू खडी सिमेंट. खिळे मोळे. सेंटरिंग कामासाठी फळी कोणत्या लाकडाची वापरतात विट तयार करण्यासाठी कोणती माती वापरतात कामांचे नियोजन टाईंमिंग किती पगार कीती यातील काहीही माहिती नसणारे बांधकाम कामगारांचे हितचिंतक झाले सायकल घेण्याची तयारी नसणारे बांधकाम कामगार संघटना हे दुकान चालु केल्यावर हाईफाई कमीतकमी १० लाखांच्या पुढच्या किमतीच्या गाडीत दिसायला लागले कशामुळे मंडळाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध १९ कल्याणकारी योजना कामगार. मुले-मुली. महिला. यांच्या कल्याणासाठी राबविण्यात येतात काही अधिकारी व कर्मचारी यांना हाताशी धरून बेमाफी नोंदणी फी लाभातून मोठा वाटा काढून घेणे. बांधकामासी कोणताही संबंध नसलेले लोक त्यांची नोंद घालून नुसता पैसा उकळणे. यामुळे मंडळाचा कामगार कल्याणासाठी जो पैसा वापरला गेला पाहिजे तो बोगस कामगार संघटना व अधिकार कर्मचारी यांच्या माध्यमातून लूटला जात आहे तुम्ही खा आणि आम्ही खातो असा फंडा वापरला जात आहे वरिल कामगार नोंदणी साठी इंजिनिअर दाखला महत्वाचा आहे तो सुध्दा बोगस कामगार यांना मिळतो कसा 



             कामगाराबरोबर असा दुजा भाव संघटना सेवाभावी संस्था युनियन अधिकार व कर्मचारी हे करतातच आणि यांना आपले काम स्वता करून घेण्यासाठी आॅफिस सहकार्य लाभत नाही कामगारांना विचारले जाते तुम्ही कोणत्या संघटनेकडून आला आहे सिमेंट कंपन्या आपल्या प्रचार प्रसार जाहिरात करण्यासाठी मेळावे घेतात मोठ्या मोठ्या हाॅटेलमधये. त्यात विविध प्रतिनिधी. ठेकेदार इंजिनिअर. यांना बोलावले जाते पण खरोखर सिमेंट मध्ये राबणारा कामगार या मेळाव्याला बोलावले जात नाही ज्या बांधकाम कामगारामुळे आपल्या कंपनीचे सिमेंट वापरले जाते त्यांच्यामुळे यांच्या मेळाव्याला कमीपणा वाटतो आणि कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार बांधकाम कामगारांना जेवन आणि भेट वस्तू दिल्या की कामगार गोळा होतात एवढा आमचा कामगार खालच्या दर्जाचा आहे का. कामगार रोज ५०० मिळवतो आम्हाला तुमच्या जेवणाची आणि भेट वस्तूंची गरज नाही 

             मुंबई राज्यात १९४८ साली करण्यात आलेल्या बाॅमबे इंडस्ट्रियल रिलेशन्स अॅकट मध्ये किमान ३० /टक्के कामगार ज्या संघटनेचे सभासद आहेत तिला प्रतिनिधिक संघटना म्हणून मान्यता देण्याची व कामगाराविषयी सर्व करार मान्यताप्राप्त संघटनेसी करण्याची तरतुद करण्यात आली या कायद्याच्या जोरावर आप आपले स्थान व वर्चस्व टिकवण्यासाठी संघटना मध्ये तक्रार होण्यास सुरुवात झाली भारतातील कामगार संघटना कार्याबद्दल अनेक टिका होण्यास सुरुवात झाली जगात काम करणार्या इतर कामगार संचटनाप्रमाणे आपल्या देशातील कामगार संघटनांनी वेतन वाढ. नोकरिची हमी. व्यवस्थापनामध्ये सहभाग कामामध्ये चांगली परिस्थिती सुविधा असणे इत्यादी स्वरूपाच्या प्रामुख्याने आर्थिक मागण्या केल्या आहेत याचा अर्थ कामगार संघटना केवळ अरथवादी बनल्या आहेत यात राष्ट्रीय हितसंबंध गौण झाले आहेत कामगार संघटनांच्या माध्यमातून देशात क्रांति घडवून आणता येईल असा विश्वास असणारे कामगार व इतर वर्गाचा. भ्रम निरास झाला आहे पन्नास वर्षांहून अधिक काळ लोटला तरी कामगार क्रांतिकारक विचार हिताचा विचार न करता अधिक वेतनवाढीची मागणी करणार्या व ती पदरात पाडून घेण्यासाठी हिंसक बेकायदेशीर मार्गावर कामगारांना बरोबर घेवून अशा विविध मार्गाने आर्थिक मागणी मंजूर करण्यासाठी विविध मार्गाचा अवलंब करण्यास प्रवृत करणे यासाठी कामगार नेत्यांच्या पाठिमागे जातात हा कठू आणि विधारक अनुभव आला आहे

        आपल्या देशातील कामगार संघटना वेतन वाढ वेतन वृध्दी जसा आग्रह धरतात तयाप्रमाणे कामगारांनी आपले कर्तव्य चोख बजावून अधिक उत्पादन करावे असा कामगार प्रयतण करत नाहीत कामगारांच्या या धोरणामुळे व दृष्टीकोनामुळे आधुनिकीकरण अडचणी निर्माण झालेल्या आहेत




              कामगार संघटना अवास्तव स्वरूपाच्या आणि कधीही मान्य होणार नाहीत अशा मागणीचा आग्रह धरतात काही वेळा मालक ठेकेदार यांच्या हितासाठी संप घडवून आणतात आणि मालक वर्गाला मदत करतात आणि मोठा धनलाभ घेतात आणि अशा प्रकारचे करार कामगारांवर लादले जातात आणि तुमच्या मुळे वेळ आली अशी टिका केली जाते त्यामुळे संघटना आणि कामगार यामधील वातावरण संशयास्पद झाले आहे आपल्या पुष्कळशा कामगार संघटना राजकीय पक्षांच्या दावनीला बांधलेल्या असलेने त्यांना स्वतंत्र निर्णय घेण्याचा अधिकार नाही राजकीय कारणांसाठी मुंबई बंद. गाव. तालुका. जिल्हा. भारत बंद. अशा राजकीय कारणांसाठी संघटनांना व कामगारांना अशा कार्यक्रमात या संघटना राजकीय पक्षांमुळे भाग घेतात शिवाय अशा संघटनांचे निर्णय देखील लोकशाही पध्दतीने घेतलें जात नाहीत प्रत्त्येक कामगार संघटना एखाद्या नेत्याच्या इशारयावर चालते त्यामुळे  सर्वसामान्य कामगार यांना नाईलाजाने संपामधये सहभागी व्हावे लागते याबाबत इलाज राहत नाहीी >

        कामगार संघटना आणि चळवळ यांतील वाढता हिंसाचार हि आणखी चिंचेची बाब आहे अनेक कामगार संघटना यांनी आप आपल्या प्रभाव क्षेत्रात दहशतीचे निर्माण केलेलें आहे आपल्या देशातील कामगार संघटना मध्ये अजून प्रौढत्व आलेले नाही भविष्याचा वेध घेण्याची क्षमता त्यांच्यात नाही त्यांचा दृष्टिकोन पुष्कळसा नकारात्मक आहे आणि त्यामुळे देशाच्या औद्योगिक प्रगतीत अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत

      ‌.  माझ्या मताप्रमाणे बांधकाम कामगारांनी कोणत्याही भुलभुलयाला बळी पडू नका मंडळ आपले योजना आपल्यासाठी आहेत आपली कामगार नोंदणी स्वता करा आपल्या दाखल अर्जाची चौकशी आॅफिस अधिकार व कर्मचारी यांच्याशी स्वता विचारपूस करा वेळ पडल्यास कामगार एकत्र येऊन आंदोलन करा पण त्यात कोणताही नेता नको 

    ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया पध्दत समजून घ्या नाही समजली तर आपल्या जिल्ह्यातील सहाय्यक कामगार आयुक्त भवन मध्ये संपर्क करा 

     समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी विविध गाव तालुका जिल्हा राज्य देश यातून पदाधिकारी नेमणे आहे तरी इच्छुक व्यक्ति तरुण यांनी खालील नंबरवर संपर्क साधावा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

९८९०८२५८५९

वाचा -

अधिकारी व कर्मचारी कामचोर ? A. Munde ...

सुरूंग सुरूंग सुरूंग सुरूंग Ahmed Munde....

गुन्हेगारी व फुटीरतावाद Ahmed Munde...

गुलाम. मजूर. कामगार

गुलाम. मजूर. कामगार

https://shooterconsultationcart.com/azp33ctwgz?key=f5e461ccbeb850c3df0b07f34593b0c2

गुलाम. मजूर. कामगार



                 शब्द एक सारखे असले तरी यांचा अर्थ भयानक व अंगावर काटा आणणारा आहे याचे वर्गीकरण आर्थिक परिस्थिती नुसार श्रीमंत. गरिब. असे ढोबळ वर्गीकरण तर आहेच परंतु त्यातही वयसायपरतवे. शेतकरी. शेतमजूर कुशल. अकुशल कामगार अशी वर्गवारी देखील आहे. शहरी व ग्रामीण. सुशिक्षित. अशिक्षित. असा भेद देखील अनेक वेळा महत्वाचा असतो महिला पुरुष उच्च कनिष्ठ दर्जा देण्याची वृत्ती आपल्या विचारात खोलवर धृढ झालेली आहे यांच्या जोडीला प्रादेशिक. अहंकार आणि राजकीय मतभेद आहेतच थोडक्यात म्हणजे सामाजिक. आर्थिक. सांस्कृतिक. व राजकीय. अंगानी आपण व आपला समाज विभागलेला आहे या विभागलेल्या सर्व गटाचे सर्व व्यक्तिचे रास्त न्याय. आणि लोकशाही हितसंबंध. जपत जपत अंतिम आपल्याला स्वातंत्र्य. समता. बंधुता. व सामाजिक न्याय. यावर आधारलेला एकात्मिक राजकीय समाज निर्माण करावयाचा आहे वरिल प्रकारचया सर्व मतभेदाचा विचार न करता आपण सर्वांनी समाजांचे पाईक म्हणून माणसाला. माणूस म्हणून कसे जगता व जगविता येईल इकडे लक्ष दिले पाहिजे

                 गुलाम हा शब्द आपण स्वातंत्र्य मिळायच्या आधी मोगल गुलामगिरीत होतो. २५० वर्ष. आणि नंतर ब्रिटिश कालखंडात १५० वर्षे. भोगली आहेतः माणसाला गुलाम म्हणून वागविले जाण्याचा प्रसंग देखील आपल्याला थक्क करून सोडणारा आहे जनावरांचा बाजार भरावा तसा त्यावेळी मजूर विक्री साठी बाजार भरत असत माणसाची बोली लावली जात असे तब्येत चांगली असणारे गुलाम शेतात काम करण्यासाठी घरात घरकाम करण्यासाठी. जनावरें गुरे चारणे. तेलाचे घाणे ओढणे बैलाप्रमाणे काम शेणघाण काढणे संडास साफ करणे. करण्यासाठी असे गुलाम विकत घेतले जात होते अनेक अशी कामे होती की आपण त्याचा विचार सुध्दा करू शकत नाही हि वेळ आपल्यावर आली ती आपल्या फुटिरतेचया भावनेमुळे आपणच या सर्वाला जबाबदार आहोत बराच काळ लोटला आणि बर्याच परीश्रमा आपल्या देशहिताचा विचार करणार्या लोकांच्या. तन मन धन याचाच नाही तर आपल्या संसाराची होळी केली आणि एकवेळ आपण स्वातंत्र्य दिनाच्या नावाने मोकळा श्वास घेतला तोपर्यंत गुलामगिरीत असणारे लोक त्यांना गुलामगिरीतून मुक्ति मिळाली

            गुलाम या नावाला नवीन कापड बदलाव तसं मजूर हे नवीन नाव मिळाले त्यावेळी बांधकाम क्षेत्र आत्ता एवढे व्यापक नव्हतं लोक ज्यांच्याकडे शेती जादा आहे गावात जो इतरांपेक्षा मोठा आहे त्यांच्यात सर्व कुटुंब आपली व आपल्या कुटुंबाची दोन वेळचे जेवण कसंबसं मिळावं म्हणून काम करण्यास जात होते खेडेगावात लोकसंख्या वाढत निघाली काम करणारे जास्त झाले काम कमी पडायला सुरुवात झाली स्वातंत्र्य मिळाले आणि काही वर्षांत ग्रामपंचायत राजची स्थापना झाली मग सरपंच उपसरपंच सदस्य टीम तयार झाली शासनाने लोकांची परस्थिती बिकट आहे हे ध्यानात घेवून महात्मा गांधी स्वयंरोजगार योजना. ग्रामीण भागातील लोकांना संजीवनी म्हणून चालू करून दिली यात कोंबडी पालन शेळी मेंढी पालन. रोपवाटीका. जनावरांचे गोठे बांधकाम. गोबरगॅस बांधणे. अशी विविध कामे लोकांच्या हाताला रोजगार देण्याचे काम करत होते रोजगार हमी योजना धर्तीवर जाॅब कार्ड. चालू करण्यात आले १५ दिवसांच्या वर रोजगार उपलब्ध नसेल तर रोजगार भत्ता म्हणून मजूरांना पगार देणे बंधनकारक करण्यात आले काळ बदलत गेला आणि शिक्षण व्यवस्था थोड्याफार प्रमाणात सुरू झाली होती शिकलेली लोक रोजगार हमी योजनेअंतर्गत काम करण्यास समर्थ नव्हते ग्रामपंचायत राज स्थापन झाले होते सरपंच उपसरपंच सदस्य ग्रामसेवक तलाठी यांनी हि बाब शासनाच्या लक्षात आणून दिली आणि गावागावात मजूर सहकारी सोसायट्या या नावाने मजूरांना हक्काचे काम मिळणारे व्यासपीठ तयार झाले मजूर सोसायट्यांचे माध्यमातून अल्प भूधारक. मिळेल ते काम करणारे कामगार यांना शासन विना अनामत रक्कम भरता गटर समाजमंदिर पाण्याची टाकी रस्ते विकास महामंडळ कामे देणे बंधनकारक आहे पण झाले उलटेच मजूर सोसायट्या मध्ये नावासाठी फक्त मजूर हे नावच राहिले आणि नेते व त्यांचे बगलबच्चे यांनीच या सोसायटीत नावे मोठी मोठी टेंडर घेण्यास सुरुवात केली मजूर नावालाच उरला आज बघा सोसायटी मजूरांचया नावांवर पण एकही मजूर त्यात सभासद नाही दिनदयाळ मागासवर्गीय. या नावाने चालू असणार्या विविध संस्था यात खरोखर एकही वरिल प्रमाणे कोणी नाही याला कारणीभूत आहे ती आपली प्रशासन व्यवस्था हे सर्व वेगळंच होण्यास सुरुवात झाली मग मजूर नाव जरा व किळसवाणे वाटायला लागलं आणि मग एक वेगळ अस नाव आलं ते म्हणजे सुशिक्षित कामगार असं



                बांधकाम क्षेत्रात झपाट्याने वाढ झाली आणि शासनाला मदत करील असा बांधकाम व्यावसायाने भरारी घेतली लोकांच्या हाताला भरपूर काम उपलब्ध झाले यामुळे गौण खनिज उत्खनन यात सुध्दा मोठी उलथापालथ झाली नद्या डोंगर यावर भस्मासूर राक्षसा प्रमाणे मोठ्या मोठ्या मशिनरी बसल्या डोंगर सपाट झाले नद्यांमधील वाळू उपसत उपसत माती सुध्दा यांनी उपसली विट भट्टी नदी कडची माती काढून नदी गावा पर्यंत आली आणि दरवर्षी महापूर नुकसान होण्यास सुरुवात झाली याला आपण जबाबदार आहोत

          कामगारांचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन एप्रिल. १९२१ मध्ये मुंबईत पहिलें कामगार कार्यालय स्थापन झाले त्याची व्याप्ती पाच विभागांत करण्यात आली यावर अधिकार व कामगार कायदे कल्याणकारी योजना बांधकाम कामगारांना आपले हक्क समजण्यासाठी ८/३/२००० रोजी नागरि सनद तयार करण्यात आली त्यानुसार समान वेतन किमान वेतन सुरक्षा कायदा विमा संरक्षण अशा २७ कल्याणकारी योजना राबविण्यात आल्या त्यासाठी १८/६०/ वयोगटातील व्यक्तींना अंशदान रक्कम भरून नोंदणी साठी हक्क देणेत आला कामगार संख्या वाढली आणि बांधकाम विभागासी कोणताही संबंध नसलेले लोक बांधकाम कामगार संघटना नावांची दुकाने निर्माण झाली कामगार नोंदणी नावाखाली कामगार लूट सुरू झाली सायकली वर असणारे कामगार संघटना स्थापन करून अगदी थोड्या दिवसात लाखोंचे मालक झाले याला कामगार नोंदणी आॅफिस मधील अधिकार व कर्मचारी हे सुद्धा या कामगार हितचिंतक लोकांना सामिल आहेत कामगारांना विविध योजना मिळवून देण्याच्या आमिषाने फसवणूक आर्थिक लूट चालूच आहे 

             याचाच अर्थ असा होतो की गुलाम या शब्दाचा अजून कामगारावरील शाप गेला नाही पोटासाठी राबणारा गुलामच होता आणि अजून आहे गरिब. गरजू. व्यसनी. अडाणी. आहे म्हणून सर्वांनी याला लूटायचा घाट घातला आहे का कामगारातला खासदार आमदार ग्रामपंचायत सदस्य या कोणत्याही शासकीय क्षेत्रात कामगार नाही कारण आम्हाला चालत नाही कामगार जन्माला आला कामगार म्हणून मरायचे ते निसहाय म्हणून 




       समाजसेवा व बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन मागणी अर्ज तक्रार अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात प्रसिद्ध वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी विविध गाव तालुका जिल्हा राज्य देश यातून पदाधिकारी नेमणे आहे तरी इच्छुक व्यक्ति तरुण यांनी खालील नंबरवर संपर्क साधावा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

९८९०८२५८५९

वाचा -

आत्ता वाचणार वेळ आणि पैसा - MONEY AND TIME SAVING ....

उघड्यावरचे खाद्य पदार्थ आणि आपले आरोग्य - Food ..

आजची शिक्षणपद्धती आणि आपण- education

शासनाचा सर्वात मोठा निर्णय...

AMAZING MOBILES SHOP NOW

सफाई कामगार सफाई कामगार

https://shooterconsultationcart.com/azp33ctwgz?key=f5e461ccbeb850c3df0b07f34593b0c2

 सफाई कामगार सफाई कामगार



          आपल्याकडे लहान लहान वाडया वस्त्या होत्या लोक विभागून राहतं होते त्यावेळी स्वच्छता आणि टापटीप आरोग्य याचा फारसा विचार केला जात नव्हता आणि त्याची तेवढी गरज नव्हती कारण प्रदुषण कमी स्वच्छ आणि मोकळी हवा केमिकल रहित अन्न धान्य दुध ताजा भाजीपाला आणि फळे यामुळे लोक अंगापिंडाने गच्च असायची कोणतेही व्यसन नाही एकत्र कुटुंब पद्धती काळ बदलत गेला आणि 

          गावांचे रूपांतर शहरात झाले विविध खेड्यातून नोकरी व कामधंदा यांच्या शोधात लोकांचा लोंढा शहराकडे वाढला लोकसंख्या वाढली सुखसोयी यात वाढ झाली लोकसंख्या वाढल्यामुळे विविध रस्त्यांवर चालणारे लहान लहान व्यवसाय वाढले खाणपानाचया वस्तू मध्ये वाढ झाली जागोजागी संडास मुतारी लेडिज जेंटस. यांची निर्मिती झाली बाजार एस टी स्टँड लोकाचा वावर जास्त आसलेमुळे वापर जास्त होऊ लागला बाजार. बस स्टेशन. रेल्वे स्टेशन. चौक. पानपट्टी विक्री. सार्वजनिक बागा. पर्यटन स्थळे. रस्ते गटर. सार्वजनिक समाजमंदिर. सार्वजनिक पाण्याच्या टाक्या. लोकसंख्या वाढल्यामुळे रोज वापराच्या वस्तू त्याचा कचरा. जसे दुध पिशवी. वृतमान पेपर. भाजीपाला. डॉ व मेडिकल मध्ये निघणारा घातक कचरा. लोखंडी जाळी गंजलेल्या वस्तू. आशा एक नाही अनेक ठिकाणचा निर्माण होणारा कचरा

          कचरा कोठून तयार होतो कसा व कोणत्या ठिकाणाहून किती कचरा तयार होतो हे आपण आत्ता बघितले पण हा कचरा गोळा कसा होतो कोण कचरा गोळा करत त्या कचरयाची विलवेहाट कोण आणि कशी लावली जाते हे आपण कधी विचार सुध्दा करत नाही आपणास विचार करण्याची गरज आहे

       आज शहराची वाढ महानगरात झाली आहे आसमानाला विचार करायला लावणारी लोकसंख्या आणि त्यामुळे जागोजागी केर कचऱ्याचे डोंगराएवढे ढिग त्यातून होणारे प्रदुषण वाढता मोकाट कुत्री यांचा वावर आणि संकटात सापडलेले मानवी जीवन हा कचरा गोळा करण्यासाठी व आपले शहर स्वच्छ व सुंदर दिसण्यासाठी पहाटे पाच वाजल्यापासून राबणारे सफाई कामगार हे सुद्धा आपल्यासारखेच लोक आहेत नगरपंचायत नगरपालिका महानगरपालिका येथे मोठ्या प्रमाणावर हे कामगार आपले व आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी अशी गलिच्छ वस्ती राहून गलिच्छ काम करत असतात 



          पावसाळा सुरू झाला आणि मग काय ठिकठिकाणी पावसाच्या पाण्याणे तुंबलेल्या गटारी तुंबलेल्या व घाणीचे भरलेल्या मुतारी व सार्वजनिक संडास यातून येणारि पावसाच्या पाण्यामुळे रस्त्यावर येणारी घाण जागोजागी साचलेले डबके  यातून आपणास चालन सुध्दा होत नाही आपण आपल्या नाकाला रुमाल बांधून फीरतो मग त्यात काम करणार्या सफाई कामगारांनचा आपण व आपल्या नगरात नगरपंचायत नगरपालिका महानगरपालिका यातील अधिकारी व कर्मचारी यांनी कधीही विचार केला नाही सफाई कामगार नसेल तर शहराची कचराकुंडी होण्यास वेळ लागणार नाह

      शासनाने अशा सफाई कामगार लोकांच्या साठी १२/८/१९७५ पासून शासन प्रयत्नशील आहे  त्यानंतर लाड समितीचे नावाने २१ मार्च २०१६  यात कायमस्वरूपी सफाई कामगारांना घरकुल योजना. महागाई भत्ता. निर्वाह निधी. सफाई कामगार पुनर्वसन. वारस हक्काने नोकरी कायदा. सफाई कामगार. विमा संरक्षण. कामगारांना कामावर असताना विविध सुखसोयी उपलब्ध करून देणे. अशी सफाई कामगार यांना विविध योजना विविध शासन निर्णयानुसार देणेत आल्या आहेत 

         आज सर्वत्र खाजगीकरण चालू झाले आहे यातच विविध ग्रामपंचायत. नगरपरिषद. महानगरपालिका. स्थानिक स्वराज्य संस्था. यांनी कामगारांचा कोणताही लोड आपल्यावर येऊ नये यासाठी ठेकेदारि पध्दतीने सफाई कामगार घेण्यास सुरुवात केली आहे त्यामुळे कामगारांना कोणताही लाभ देणे आवश्यक नाही त्यांना मिळणारा भत्ता नियमानुसार ७० रूपये वरून ४०० रुपये करण्यात आला आहे पण आज ठेकेदार २२० रुपये असे नाममात्र पगार पोटी शुल्क देऊन आठ आठ तास काम करुन घेत आहेत त्यात महिला सफाई कामगारांना मिळणारी वागणूक ही तर वाईट आहे त्यांच्याकडे मुकादम लोकांचा बघण्याचा दृष्टीकोन कायम वेगळाच असतो 

            आपल्या हक्क व अधिकार यासाठी सफाई कामगार आंदोलन उपोषण करण्यास बसले असता नगरपरिषद नगरपंचायत महानगरपालिका यांचे सी ओ हे प्रकरण आमच्या अधिकारात येत नाही असा पवित्रा घेऊन प्रकरण टाळले जाते आणि तुमचा ठेकेदार आणि तुम्ही बघून घ्या असे सांगितले जाते विविध सफाई कामगार संघटना नावाखाली तयार झालेली दुकानदारी मोडून काढणे गरजेचे आहे अधिकारी आणि कर्मचारी व ठेकेदार यांचे बरोबर सगणमत करून पैसा मिळवणारे समाजकंटक यांना सफाई कामगार संघटनेचे नेतृत्व करण्याची गरज नाही  




             खरोखरच सफाई कामगारांना सेवा सुविधा हॅणडगलोज. बुट. सुरक्षा जॅकेट. टोपी. विमा संरक्षण. व अन्य सुरक्षा पूरविणयाची सर्व जबाबदारी हि ठेकेदारावर आहे आणि सर्वात मोठी जबाबदारी ही अधिकारी व कर्मचारी यांचेवर आहे जिथे जिथे सफाई कर्मचारी आपल्या हक्क व अधिकार यासाठी उपोषण व आंदोलन करित असतील त्यांनी आपली मागणी मान्य होई पर्यंत जागा सोडू नका कारणं आपण झाडू खाली ठेवला तर बघू हे ठेकेदार व अधिकार कर्मचारी झाडू घेतात का बघू 

      वरील प्रमाणे समाजसेवा उठाव बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन मागणी अर्ज तक्रार अर्ज वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात यासाठी विविध गाव तालुका जिल्हा राज्य देश यातून पदाधिकारी नेमणे आहे तरी इच्छुक व्यक्ति तरुण यांनी खालील नंबरवर संपर्क साधावा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

९८९०८२५८५९

माहिती अधिकार

आपण एखाद्या विभाग शासकीय आॅफिस ग्रामपंचायत. नगरपरिषद महानगरपालिका येथील कोणतीही माहिती मागितली असेल तर त्यांनी देणे बंधनकारक आहे

माहिती अधिकार दाखल केल्यानंतर कोणी आपणास दमदाटी. जीवे मारण्याची धमकी देत असेल तर पोलिस स्टेशनला तक्रार द्या कारण माहित अधिकार दाखल करणार्या व्यक्तिला शासन निर्णयानुसार पोलिस संरक्षण देण्यात आले आहे

वाचा - 

लूट आणि फक्त लूट - अहमद मुंडे . 

उघड्यावरचे खाद्य पदार्थ आणि आपले आरोग्य - Food ...

तहसिलदार कार्यालयात खालील प्रमाणे कामकाज चालते...

आजची शिक्षणपद्धती आणि आपण- education...

सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा

  सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा            अनुसूचित जाती जमाती. इतर मागासवर्गीय जाती जमाती. भटक्या विमुक्त...

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या