Showing posts with label बांधकाम कामगार. Show all posts
Showing posts with label बांधकाम कामगार. Show all posts

असं झालं पाहिजे का ?

 

असं झालं पाहिजे का ?

              बांधकाम कामगार यांना न्याय मिळावा त्यांचे सामाजिक आर्थिक शैक्षणिक वैद्यकीय अशी सेवा सुविधा मिळण्यासाठी हक्काचे व्यासपीठ म्हणजे सन १९२६ साली या कार्यालयाचे पदनाम बदलून ते संचालक माहिती व कामगार इंटिलिजस असे ठेवण्यात आले. यावेळी कामगार आयुक्त पदसिद्ध आयुक्त श्रमिक भरपाई अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. १९३९साली या कार्यालयाचे विभाजन करण्यात आले कामगार आयुक्त व माहिती संचालक अशी वेगवेगळी कार्यालये करणेत आली सन १९४७ साली मुंबई कामगार कार्यालयाची पुनर्रचना करण्यात आली यावेळी दोन वेगळेच संचालक करणेत आले १९५३ नंतर वेगळ्या मुंबई कामगार मंडळांची स्थापना करणेत आली. १९७९ मध्ये कामगार कार्यालयाची फेर रचना करणेत आली आहे त्याचे प्रशासकीय दृष्टीने तीन विभाग करण्यात आले 

(१) मुंबई कार्यालय (२) मुंबई विभाग कार्यालय (३) मुंबई जिल्हा कार्यालय कामगार कार्यालयाचे प्रमुख हे कामगार आयुक्त आहेत

                 केंद्र सरकार व राज्य सरकार मिळून केंद्रीय कामगार कायदे १९ आहेत व राज्य सरकारने कामगारांसाठी ६ कायदे तयार केले आहेत तय नुसार असंघटित क्षेत्रातील कामगार यांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई यांचेकडून १९ कल्याणकारी योजना राबविण्यात येतात त्यात प्रामुख्याने आर्थिक संरक्षण सामाजिक. वैद्यकीय. शैक्षणिक आरोग्य आशा विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. बांधकाम क्षेत्र. माथाडी. एम आय डी सी. कामगार. या कामगारांना विद्यार्थी शिकण्यासाठी शैक्षणिक सवलत. कामगार लग्नापासून ते मृत्यू पर्यंत आर्थिक स्वरुपात मदत देण्याचा माणस आहे नोंदणी कृत महिला बांधकाम कामगार यांच्यासाठी आरोग्य योजना. नैसर्गिक प्रसूती. शस्त्रक्रियेद्वारे प्रस्तुती. यासाठी मंडळाने अनुदानाची तरतूद केली आहे यासाठी. आत्ता महत्त्वाचा दुवा असणारा तो म्हणजे

                बांधकाम कामगार आहे हे सिद्ध करण्याचा अधिकार इंजिनिअर ठेकेदार कंत्राटदार शासकीय निमशासकीय कार्यालयाच्या अंतर्गत येणारा सर्व बांधकाम विभाग व त्यात असणारे सर्व बांधकाम उप अभियंता यांना देण्यात आला आहे आज सर्व उलट झाल आहे कारणं आज बांधकाम कामगार यांच्या जीवावर लाखोंची करोडोंची माया गोळा करणारे आज बांधकाम कामगार नोंदणी साठी लागणारे ९० दिवसांचे प्रमाणपत्र यासाठी विशिष्ट रक्कम घेत आहेत त्यामुळे आज खरोखरच कामगार असणारे लाभापासून वंचित राहिले आहेत आणि बाधकामासी कोणताही संबंध नसणारे लोक बांधकाम कामगार कल्याणकारी योजनांचा लाभ घेत आहेत म्हणजे बोगस कामगार नोंदणी साठी जबाबदार आहेत ते म्हणजे फक्त आणि फक्त इंजिनिअर ठेकेदार कंत्राटदार. यांची सुध्दा आज चौकशी झाली पाहिजे

          मंडळाकडून येणारा बांधकाम कामगार यांच्यासाठी विविध योजनांचा लाभ सापेक्ष पणे कामगारा पर्यंत पोहचविण्यासाठी आज गावात तालुका जिल्हा राज्य देश यामध्ये बर्याच कामगार संघटना तयार झाल्या आहेत. त्यात कामगार नेते पुढारी आमदार खासदार मंत्री यांना पेव फुटले आहे म्हणजे रोज तयार होणारे एजंट योजना मिळवून देतो म्हणून अवाजवी पैसे उकळणे. लाभार्थी कामगार यांना मिळणारा लाभतून मोठा आर्थिक वाटा काढून घेणे. दमदाटी करणे. कामगार भवन मध्ये अधिकारी व कर्मचारी कमी सर्वच ठिकाणी संघटना वाले एजंट यांचा सुळसुळाट वाढला आहे. म्हणजे अधिकारी व कर्मचारी यांना हाताला धरून तुम्ही खा आणि आम्हाला खाऊ द्या असा फंडा वापरला जातो. एका बाजूने इंजिनिअर ठेकेदार कंत्राटदार आणि दुसरिकडे कामगार संघटना. आणि बाकी काय राहीले ते सहहयक कामगार आयुक्त भवन मध्ये असणारे कर्मचारी व अधिकारी यानी कसर पूर्ण केली आहे म्हणजे बांधकाम कामगार योजनांचा आणि लाभाचा बाजार झाला आहे आणि यासाठी कारणीभूत आहेत ते म्हणजे फक्त आणि फक्त इंजिनिअर

(१) महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई यांनी खालील उपाययोजना करण्याची गरज आहे त्यामुळे खरोखरच कामगार आसेल त्यालाच लाभ मिळेल

(१) ९० दिवसांचे प्रमाणपत्र देणारया इंजिनिअर ठेकेदार कंत्राटदार यांनी बांधकाम कामगार याचे ९९ दिवसांचे पगार पत्रक जोडणे बंधनकारक करा

 पगार रोख देत असेल तर शपथ पत्र करणे बंधनकारक करा. बांधकाम कामगार यांच्या पगार बॅंकेतून होत असेल तर बॅंकेचे डिटेल्स जोडणे बंधनकारक करा

इंजिनिअर यांना कामगार नोंदणी दाखले देण्यासाठी एक विहित अट घाला

(१) नोंदणीकृत महिला कामगार यांच्यासाठी असणार्या विविध आरोग्य योजनांचा लाभ महिला कामगार यांच्या बॅक खात्यात वर्ग करण्यात यावा किंवा दवाखान्याच्या नांवे वर्ग करण्यात यावा. अन्यथा आपल्या जिल्ह्यात असणारे धर्मादाय आयुक्त यांचेकडून नियुक्त दवाखान्यातच उपचार घेणे बंधनकारक करण्यात यावे महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना. राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना. पंतप्रधान आयुष्मान आरोग्य योजना. या सर्व मोफत करून ज्या दवाखान्यात ह्या योजना आहेत तेथेच उपचार करणे बंधनकारक करण्यात यावे मग निधी कशाला पाहिजे कशासाठी मंडळांचे कोट्यवधी रुपये पाण्यात घालताय

(२) नोंदणीकृत बांधकाम कामगार यांच्या पाल्यांसाठी असणारी शिष्यवृत्ती योजना त्यांच्या खात्यात वर्ग करण्यात यावी आथवा शाळेच्या नावावर वर्ग करण्यात यावी. मंडळाने दिलेला लाभ कश्यासाठी वापरला त्याचा लेखा जोखा मागण्यात यावा

(३) व्यसनमुक्ती केंद्र यामध्ये व्यसनमुक्ती उपचार घेणा-या बांधकाम कामगार यासाठी देण्यात येणारा लाभ व्यसनमुक्ती केंद्राच्या नावांवर वर्ग करण्यात यावा

(४) बांधकाम कामगार यांना औजारे खरेदी साठी देण्यात येणारा लाभ हा मागणी करतांना दुकानांचे बिल जोडणे बंधनकारक करा. व त्यानुसार त्या खरेदी बिलाप्रमाणे त्या दुकानदारांच्या नांवे सदर रककम वर्ग करण्यात यावी 

(५) बांधकाम कामगार काम करत असताना अपघातात अपंगत्व आल्यास त्यासाठी असणारा दोन लाख रूपयांचा लाभ त्यांच्या हातात न देता त्याला बैठा उधोग उभा करण्याची तरतूद करण्यात यावी

(६) मंडळाकडून बांधकाम कामगार काम करत असताना अपघात होऊ नये यासाठी देण्यात येणारा सुरक्षा संच वाटप करण्याचे आज मोठ खुळ आहे पण पुरुष कामगारापेक्षा महिला कामगार यांना मोठ्याप्रमाणात आज सुरक्षा संच वाटप केले जात आहे आम्ही आपल्या जिल्ह्यात एक सर्वे केला आहे त्यानुसार कोणत्याच कामांवर महिला काम करताना किंवा कोणताही पुरुष कामगार मंडळाकडून देण्यात आलेला सुरक्षा संच वापरत नाही मग मंडळांचे कोट्यवधी रुपये कशासाठी पाण्यात घालताय प्रत्येक जिल्ह्यातील सहहयक कामगार आयुक्त भवन मधील अधिकारी व कर्मचारी याना कशासाठी पगार दिला जातो रोज एक गाव याप्रमाणे यांनी सर्वे करून सुरक्षा संच वापर होतो का नाही हे पाहणे गरजेचे आहे जो कोणी सुरक्षा संच वापरत नसेल तर शासनाला चुकीची माहिती देऊन शासनाची फसवणूक केली या बेसवर आशा बांधकाम कामगार महिला कामगार यांच्यावर दंडात्मक व शिक्षेची तरतूद करण्यात आली पाहिजे

(६) कामगार अपघातांत मृत्यू झाला तर असणारा पाच लाखांचा विमा व ती रक्कम त्यांच्या मुलगा किंवा मुलगी यांच्या नावे वर्ग करण्यात यावी

(७) बांधकाम कामगार अपघातांत मृत्यू झाला तर त्याच्या पाश्चात्य दिली जाणारी पेनसन ही त्यांच्या २४००० त्यांच्या पत्नीच्या नावे वर्ग करण्यात यावी

 (८) बांधकाम कामगार नोंदणी करताना जेवढा रजिस्ट्रेशन नंबर महत्वाचा त्याप्रमाणे बांधकाम कामगार काम करीत असताना त्याचा फोटो जोडणे बंधनकारक करा

      वरिलप्रमाणे मत मांडण्याचा एवढाच उद्देश आहे की भ्रष्टाचार कामगारांची आर्थिक व मानसिक सामाजिक लुट थांबविणे असा आहे. जर बांधकाम कामगार यांना मंडळाकडून मिळणारा लाभ हा पैशाच्या स्वरुपात न देता वस्तूंच्या स्वरूपात देण्यात आला तर बांधकाम कामगार यांच्या हातात पैसा न आल्यामुळे व्यसनमुक्ती सारखा जटिल प्रश्न सुटणार आहे. बांधकाम कामगार यांची लुट थांबविण्यासाठी मदत होणार आहे. समाज कल्याण पंचायत समिती यांच्याकडून राबविल्या योजनांमध्ये ही तरतूद आहे. अशी तरतूद केल्यामुळे शासनाचा एक एक रुपया कारणी लागताना दिसेल आमची किंवा जिल्ह्यातील सर्व बांधकाम कामगार यांची हीच रास्त मागणी आहे 

    समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

कामगार कल्याणकारी मंडळ बंद करा.


कामगार कल्याणकारी मंडळ बंद करा. 
अबब एवढ कामगार आलें कुठुन ? 

      असंघटित बांधकाम कामगार हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई यांचेकडून बांधकाम कामगार व महिला व मुल यांचेसाठी विविध कल्याणकारी १९ योजना राबविण्यात येतात त्यासाठी बांधकाम कामगार आहे हे सिद्ध करण्यासाठी इंजिनिअर दाखला देणे अनिवार्य आहे. कामगार व अधिकारी समोरा समोर अशी नोंदणी पध्दती असताना शासनाकडून बोगस कामगार नोंदणी बंद व्हावी यासाठी आॅनलाइन पध्दतीने बांधकाम कामगार नोंदणी केली जात आहे. त्यात सुध्दा कामगार कल्याण मंडळांची अधिकारी व कर्मचारी यांची संख्या कमी पडत आहे त्यामुळे खराखुरा कामगार नोंदणी प्रक्रिया पासून वंचित राहत आहे. आत्ता विचार करण्याची गरज आहे की रोजच्या रोज हजारो बांधकाम कामगार नोंदणी आॅनलाइन पध्दतीने होत आहे. मग एवढे बांधकाम कामगार एका जिल्ह्यात आहेत का ? एवढी बांधकाम साईट चालू आहे का ? महिला बांधकाम कामगार कामावर दिसत नाही मग परवाचे (.२०२० ) २८३०० सुरक्षा संच पुरुष कामगारापेक्षा महिलांना जास्त वाटप झाले ते कसे ? मग त्या जिल्ह्याची लोकसंख्या किती ? त्या बांधकाम कामगार नोंदणीसाठी बांधकाम कामगार प्रमाणपत्र देणारे इंजिनिअर आहेत त्यांच्या कामावर ऐवढे कामगार आहेत का ? प्रमाणपत्र देणारे इंजिनिअर यांना बांधकाम कामगार नोंदणी साठी लागणारा दाखला ९० दिवस काम केल्याचे देणे अनिवार्य आहे त्या इंजिनिअर यांना कामगार पगार पत्रक जोडणे अनिवार्य करा ? पगार पत्रक नसेल तर इंजिनिअर यांनी शपथ पत्र देणे बंधनकारक करा ? इंजिनिअर कामगारांचा पगार चेक वर देत असेल तर बॅंक तपशील नोंदणी दाखला देताना देणे अनिवार्य करा ? वरील सर्व कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे असा आदेश जारी करण्यात यावा यामुळे बोगस कामगार नोंदणी होणार नाही. कारणं खरोखरच कामगार असेल त्यालाच इंजिनिअर दाखला देणारं. बोगसगिरी होणे याला कारणीभूत आहे तो म्हणजे इंजिनिअर 

              २०११ या सांगली जिल्हा कामगार सर्वे नुसार. सांगली जिल्ह्यात. ३३.२/ टक्के कामगारांची नोद आहे. म्हणजे त्या जिल्ह्यात. शासकीय. राजकीय. विविध आस्थापनात काम करणारे अधिकारी व कर्मचारी. कोण आहे कां नाही ? दुकानदार रेशन दुकानदार. व अन्य विविध स्तरांतील लोक काही आहेत का नाही ? अंतिम २०११ सर्वे नुसार महाराष्ट्रात ४४.८/ टक्के असंघटित कामगार आकडेवारी आहे 

          २०१७ चे शासन निर्णयानुसार. व आम्ही केलेल्या कामगार सर्वे नुसार. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई यांचेकडून बांधकाम कामगार यांच्या सर्वे नुसार. ४ लाख २९ हजार १५५ एवढे बांधकाम कामगार आहेत असं मंडळाकडून सांगितले आहे. आणि बांधकाम कामगार यांना विविध १९ योजनांसाठी. १२७.७१.८०.१२५ एवढी लाभार्थी कामगारांना आर्थिक लाभ देण्यात आला होता. म्हणजे आत्ता जिल्ह्याची लोकसंख्या किती आणि बांधकाम कामगार किती याच गणित करा आणि उत्तर शोधा वेड लागल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे यातील बांधकाम कामगार नसताना सुद्धा मंडळाकडून बांधकाम कामगार यांच्यासाठी आलेला आर्थिक व वस्तू स्वरूपातील मदत बोगस कामगार नोंदणी करून लुठली याला कारणीभूत आहे तो म्हणजे इंजिनिअर कारणं बांधकाम कामगार आहे हे कुणी सिध्द केल. वरील सर्व विभागवार राज्यातील बांधकाम कामगार नोंदणी. जर ५.७५६२८ असा प्रसारीत करण्यात आला आहे. मग आत्ता आपल्या जिल्ह्यात किती बांधकाम कामगार असतील. २०१६/२०१७ पर्यंत. पुणे विभागात २३९३८ आणि २०११/पासून २०१७ पर्यंत १ लाख ७५ हजार ३२० एवढी बांधकाम कामगार नोंदणी दर्शवली आहे. म्हणजे सगळ कामगारच आहेत का ? आपल्या जिल्ह्यात. एवढ कामगार आल कुठून ? मुंबई उपनगर कामगार संख्या. ९५.८/टक्के

    पालघर ठाणे. ८०.१/टक्के

     पुणे ६५.३/ टक्के

     अलिबाग रायगड. ५९.८/ टक्के

     सातारा. ३१.९/टक्के

      रत्नागिरी. ३४.६/ टक्के

       सिंधुदुर्ग ३७.७/टक्के

      कोल्हापूर. ४२.१/ टक्के

       सोलापूर. ३३.३/टक्के

        उस्मानाबाद. २०.३/ टक्के

 ‌‌. लातूर. २६.८/ टक्के

          नांदेड. २५.७/ टक्के

          परभणी. २३.९/ टक्के

          जालना. २०.९/टक्के

         औरंगाबाद. ३७.८/टक्के

         नाशिक. ३६.५/ टक्के

         धुळे. २६.४/ टक्के

         नंदुरबार. १६.१/ टक्के

         जळगाव. २७.०/ टक्के

        बुलढाणा. १७.८/ टक्के

        वाशीम १५.२/ टक्के

        हिंगोली. १६.३/ टक्के

        अकोला. ३१.३/ टक्के

        अमरावती. २८.२/ टक्के

       यवतमाळ. १९.५/ टक्के

        वर्धा. २९.५/ टक्के

         चंद्रपूर. ३२.३/टक्के

          नागपूर ६३.५/ टक्के

           गडचिरोली १७.१/ टक्के

           गोंदिया. २४.८/ टक्के

           भंडारा. २४.३/ टक्के

          सांगली ३३.३/ टक्के

            हि २०११ ची कामगार संख्या महिला व पुरुष यांची आहे आज हीच बांधकाम कामगार नोंदणी पाचपटीत वाढली आहे. त्याला कोण जबाबदार आहे. आजच आपल्या जिल्ह्याची लोकसंख्या काढा आणि कामगार नोंदणी काढा म्हणजे तुम्हाला फरक कळेल 

     २०१६ मध्ये. मुंबई कोकण विभाग. पुणे. नाशिक. नागपूर. औरंगाबाद. या विभागातून महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई २०१६ पर्यंत एकूण नोदीत आस्थापना. ७५३० आहेत मग प्रत्येक जिल्ह्यात विविध कामगार नोंदणी असथापना कोणत्या बेसवर. बांधकाम कामगार नोंदणी करतात हे सर्व जण सहाय्यक कामगार आयुक्त भवन मधील अधिकारी व कर्मचारी यांना हाताला धरून सर्व आपली कामे करतात का ? 

                      आज बांधकाम कामगार नोंदणी होताना. परराज्यातून कामासाठी येणारे. युपी बिहार राजस्थान आणि विविध परराज्यातून येणार्या बांधकाम कामगारांची कागदपत्रे अपुरी असल्याने नोद होत नाही आपल्यातील कामगार महिला काही प्रमाणात कामांवर जातात मग एवढे बांधकाम कामगार आले कोठुन. म्हणजे. नोंदणी साठी लागणारे दाखले देणारे. सहाय्यक कामगार आयुक्त भवन मधील भ्रष्ट अधिकारी व कर्मचारी यांच्यामुळे बोगस कामगार नोंदणी होत आहे हे खरे 

          समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

कामगार ठेकेदार इंजिनिअर आणि योजना

 



कामगार ठेकेदार इंजिनिअर आणि योजना

         ‌ कामगार हे बहुतांशी अशिक्षित अडाणी गरजू असल्याने तसेच ते असंघटित असल्याने त्यांची मालक ठेकेदार इंजिनिअर वर्गाकडून सतत पिळवणूक होण्याची शक्यता असते. त्या करीता त्यांना त्यांच्या रोजगार सेवाशर्ती प्राप्त व्हाव्यात व त्यांना सामाजिक. शैक्षणिक. वैद्यकीय. आर्थिक सुरक्षा प्रधान करण्याच्या उद्देशाने विविध कामगार कायद्यामध्ये कामगारांचे हक्क निर्माण करून त्यांना संरक्षण देण्यात आलेले आहे या कामगार कायद्यांची प्रभावी पणे व यशस्वी अंमलबजावणी मालक ठेकेदार इंजिनिअर यांचेकडून केली जात आहे ती कशी हे पाहण्यासाठी व खात्री करून घेण्यासाठी असे कामगार ज्या ठिकाणी काम करतात कामांवर जातात अश्या कार्यस्थळाचे निरिक्षण करण्याकरिता आयुक्तालय कामगार आयुकतापासून तर निम्मं स्तरावरील सहकारी कामगार अधिकारी तसेच किमान वेतन निरिक्षक ( शेती व दुकाने निरिक्षक यांची विविध अधिनियमाच्या अंतर्गत #निरिक्षक # म्हणून नियुक्ती करण्यात येते व आलेली आहे अश्या प्रकारे ज्या अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती अधिनियमाच्या अंतर्गत # निरिक्षक # म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे असे अधिकारी व कर्मचारी त्यांना नेमून देण्यात भौगोलिक कार्यक्षेत्रातील विविध असथापनेतील/ उधोगांना निरिक्षक भेटी देऊन या या भेटी वेळी प्रत्यक्ष कामगारांच्या सेवाशर्ती बाबत त्यांना विविध अधिनियमाच्या अंतर्गत लाभ सुविधा सोयी सुविधा नियोक्तयाडून. दिल्या जातात किंवा नाही याची तपासणी करून खात्री करून घेतात व कामगारांना अधिनियमानुसार मिळणारे. १९ कल्याणकारी योजना सापेक्ष पणे मिळवण्यासाठी किंवा त्या मिळत नसतील तर त्या मिळवून देण्याचा प्रयत्न करतात किंबहुना ते मिळवून देण्याकरिता त्यांना केंद्रीय कायदे १९ व राज्य शासनाचे ६ कामगार कायदे तयार करण्यात आले आहेत. या कायद्यानुसार आवश्यकती कारवाई ते करतात यात नियोकतयाकडून विविध न्यायालयात अभियोग दाखल करून किंवा कामगार न्यायालय मध्ये वसुली दावे दाखल करणे यांचा समावेश होतो

      कामगार आयुक्तांकडून खालील महत्वाची कार्य केली जातात

विविध कामगार कायद्यांची अंमलबजावणी करून अधिनीयमाचे फायदे कामगारांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे. कामगार व मालक मध्ये कामगारांच्या प्रश्नावरून निर्माण होऊ पाहणा-या किंवा निर्माण झालेल्या औधोगिक विवादात वेळीच मध्यस्थी करून कामगार व मालक यांच्यात समेट घडवून आणणे. व औधोगिक क्षेत्रातील शांतता व सुव्यवस्था कायम राखणे/औधोगिक सौदाहपूरण व शांततेने राखणे. 

                  कामगार आज मोठ्या अडचणीत सापडला आहे कारणं शासकीय कल्याणकारी योजना मिळवून देण्याच्या नावाखाली प्रत्त्येक जिल्ह्यात जागोजागी तयार झालेल्या कामगार संघटना. एजंट दलाल यांचा सुळसुळाट यामुळे कामगारांची आर्थिक व मानसिक लुट चालू आहे. ह्या सर्व व प्रकाराला संघटना एजंट दलाल जेवढे जबाबदार आहेत तेवढेच सहाय्यक कामगार आयुक्त भवन मधील अधिकारी व कर्मचारी सुध्दा जबाबदार आहेत. कारणं कामगार आज वैयक्तिक पातळीवर एकादा नोंदणी अर्ज किंवा लाभाचा अर्ज देण्यासाठी किंवा विचारणा करण्यासाठी सहाय्यक कामगार आयुक्त भवन मध्ये गेला तर अधिकारी व कर्मचारी त्याला विचारतात की तुम्ही कोणत्या संघटनेकडून आला आहे असं विचारण्याचा अधिकार अधिकारी व कर्मचारी यांना नाही. सहाय्यक कामगार आयुक्त भवन मधील अधिकारी व कर्मचारी यांचे मोबाईल नंबर फलकावर का लावले जात नाहीत ? संघटना व त्यांचे सहकारी पदाधिकारी यांचें मोबाईल नंबर अधिकारी व कर्मचारी यांचेकडे कशासाठी पाहीजेत ? संघटना व एजंट यांचें सहाय्यक कामगार आयुक्त भवन मध्ये ठिय्या मारणे कोणत्या नियमांत आहे ? म्हणूनच म्हणतो की या सर्व बोगस कामगार नोंदणी यासाठी संघटना एजंट दलाल किंवा अन्य कोणीही जबाबदार नाही कारणं हे सर्व परिस्थितीचें बळी आहेत पण यांना आश्रय देणारे अधिकारी व कर्मचारी हे खरे गुन्हेगार आहेत. एक चौकशी झालीच पाहिजे

              ठेकेदार भोळ्याभाबड्या गरिब व्यसनी अडाणी गरजू अशिक्षित कामगारांवर मनमानी पद्धतीने आपला सर्वस्वी हकक सांगणारा व्यक्ती म्हणजे ठेकेदार होय. जो आपल्या मनाला येईल तेवढा पगार. आपल्या मतानुसार कामांची वेळ. ठरवणारा. आणि कामगार यांच्या जीवांवर. कमी वेळात जास्त आर्थिक माया गोळा करणारा. काही ठिकाणी कामगाराबरोबर त्याची बायको मुलं आपल राज्य सोडून पर राज्यात कामासाठी येतात त्यांचे अनुभव आपल्याला हालवून टाकणारे आहेत. ठेकेदार यांची महिलांना कामाच्या ठिकाणी मिळणारी वागणूक अपमानास्पद असते त्याचा बघण्याचा दृष्टीकोन वाईट असतो पण हे कामगार व त्यांची पत्नी याचा विरोध न करतां सर्व काही सहन करत असतात. काहीवेळा कामगारांना बांधून माराहान करणे. युपी बिहार राजस्थान मधून आलेले कामगार यांना माराहान करून काम करून घेवून न पैसे देता घालवणे. हे आपण बघतो असे कामगार कोणाकडे जाणारं परकी लोक परक राज्य यांतच कामगार अडकून जातो. एकादा कामगार कामावरून पडून मरण पावलयास. त्याला कोणताही सुरक्षा संबंधित ठेकेदार गांभीर्य घेत नाही मयत कामगारांना कोणतीही आर्थिक मदत केली जात नाही. आज आपल्या जवळ बेळगाव कर्नाटक युपी बिहार राजस्थान येथून कामगार कामासाठी येतात रस्त्याचे काम करणारे. सफाई कामगार. यांना सुध्दा ठेकेदार कंत्राट बेसवर कामांवर ठेवले जाते. पण या सर्व कामगारांचा वापर फक्त आणि फक्त पैसा मिळविण्यासाठी केला जातो यांतच कामगार सुरक्षा धोक्यात आली आहे त्यांना शासनाकडून मिळणाऱ्या कल्याणकारी योजना मिळाव्या यासाठी कोणतीही ठेकेदार मदत करत नाही. आत्ता सर्वात मोठा प्रश्न येतो तो म्हणजे कामाच्या दरांचा आजपर्यंत ठेकेदार यांच कधीही युनियन झाल नाही दर निश्चित करण्याबाबत. त्याला कारणं आहे की यांच्यात एकी नाही. यांना एकत्र येण्यासाठी सर्वात मोठा अडसर आहे तो म्हणजे यांना काम देणारया लोकांचा. अनेकवेळा यांचं युनियन दर निश्चित करण्यासाठी युनियन झाले मिटींग झाली जेवण झाली पण ही युनियनने. जास्त काळ टिकली नाहीत आणि येथून पुढे होणारं नाही आणि टिकणार नाही. दर ठरतो सर्व ठेकेदार लोकांचा एक नेता तयार होतो. पण कोणच युनियनचे ठरविल्या प्रमाणे दर घेऊन काम करत नाही कारणं रोज तयार होणारें ठेकेदार आज गल्ली बोळात काही अनुभव नाही चार फळ्या बांबू घेऊन रोज एक कंत्राटदार ठेकेदार तयार होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे खरोखरच प्रामाणिक काम करणारे कामांचा पूर्ण अनुभव असणारे. कामांचा दर्जा उत्कृष्ट असणारे. असे सेंट्रिंगवाले आज दराच्या कचाट्यात सापडले आहेत. मोठे ठेकेदार कंत्राटदार. हेच मनमानी दराने काम घेतात. आणि हेच कमी दारात काम घेतात आणि सर्वांच्या डोळ्यात धूळफेक करतात. कारणं सांगितलें जाते की आपसी संबंध होते. पाहुणे आहेत. त्या इंजिनिअरचे कायम काम आहे. मग दरासाठी एकी होणारच नाही ? १९८९ साली. काॅलम बीम. छपपरी. फाॅंडेशन. यांच दर. अॅटम बेसवर होते. त्यावेळी कामगार पगार. १८ ते चांगला मिस्त्री असेलतर त्याला ३५ रूपये पगार होता. म्हणजे. त्यावेळी कामगार पगार आणि दर यांचा विचार केला तर. आज. २०२१ रोजी. सेंट्रिंग कामांचे दर. ९०/१००/१२०/ असं आहेत कामगार पगार आज ३५०/५००/ असा झाला आहे म्हणजे १९८९ सालीच्या अंदाजानुसार आज सेंट्रिंग कामांचे दर १७०/ रू स्वेटर फूट असायला हवे होतें. याला कारणीभूत आहेत ते म्हणजे सर्व फुटार सेंट्रिंग ठेकेदार कंत्राटदार. युपी बिहार राजस्थान वाले कामगार म्हणून आले आणि स्वता ठेकेदार कंत्राटदार झाले. यांच काय केल आपण ? यांना आश्रय दिला तो म्हणजे इंजिनिअर लोकांनी 

          इंजिनिअर. ठेकेदार यांची पुढची पायरी म्हणजे इंजिनिअर. घर. बंगला. हाॅटेल. लाॅज. मंगल कार्यालय. कंपन्या. एम आय डी बांधकामे. रस्ते. पुल. बंधारे. विविध शासकीय इमारती. या सर्व कामांसाठी सर्वगुणसंपन्न आणि आज सर्वात मोठे खुळ असणारे वास्तुशास्त्र माहीत असणारा. सरळ. सुटसुटीत. मनमोहन बांधकामे करण्यासाठी जीवनातील घर आपल्या स्वप्नातील घर कसं असावं. यासाठी आपण इंजिनिअर निवडतो. जरा माग जाऊन विचार केला तर घराची व सर्व शासकीय निमशासकीय कार्यालये बांधकाम व विविध बांधकामे करण्यासाठी स्थानिक मिस्त्री यांची निवड केली जात होती. पण आज उलट झाल. एकही कंत्राटदार ठेकेदार असा आहे कां त्याला मालकाकडून काम आलंय. नाही कारणं इंजिनिअर लोकानी बांधकाम क्षेत्रात एक वेगळी छाप पाडली आहे. त्यांची एकी मोठ्या प्रमाणात आहे. त्यांच्या मिटींगा महिन्याला होतात विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात त्यामुळे समाजांचा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळाच आहे. पण कामगार ठेकेदार कंत्राटदार यांची छाप व्यसनी. आठवड्याला इंजिनिअर यांच्या आॅफिस पुढे उभे राहणारे. कामांचा अनुभव शुन्य.असणारे. अशी छाप पाडली आहे त्यामुळे यांच्या हातात कोणीही मालक आपले घरांचे काम देत नाही म्हणजे याचा अर्थ असा होतो की इंजिनिअर लोक सेंट्रिंग ठेकेदार कंत्राटदार यांना कधीच एकत्र येवू देणारं नाहीत. कारणं मालक इंजिनिअर यांना मागिल त्या दराने काम देतात जेवढे पैसे इंजिनिअर हातात. मोठ मोठी अपार्टमेंट. मोक्याच्या जागा. लाखांच्या घरात गाड्या. कुठून आलं हातुडा. थाफी बंळबा. न घेता मिळवतात तेवढे पैसे कामगार काम करून सुध्दा मिळवत नाही त्याला एकवेळ गाडीत तेल टाकायला सुध्दा पैसे नाहीत असं का? आपणं कधी विचार केला नाही ? आणि आत्ता दरासाठी मिटींगा घेवून काय उपयोग ? वेळ गेली. ? आत्ता गप्प बसा आणि आप आपसात भांडणे करत माझ काम तु घेतल तुझ काम मी घेतल काय उजेड पाडला घेतल ते सुद्धा कमी दरात आगोदर आपलं मिटवा आणि नंतर दरासाठी उठाव करा 

              आज बांधकाम कामगार कल्याणकारी योजना मिळविण्यासाठी व बांधकाम कामगार आहे हे सिद्ध करण्यासाठी इंजिनिअर यांच ९० दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र गरजेचे आहे. पण आज असा प्रकार उघडकीस आला आहे की काही संघटना सेवाभावी संस्था युनियन यांचेकडे ठराविक रक्कम घेऊन काही इंजिनिअर लोक प्रमाणपत्र देत आहेत म्हणजे खराखुरा कामगार माग आणि बोगस कामगार पुढे यासाठी सुध्दा इंजिनिअर लोक जबाबदार आहेत कां ? यांचा सर्वे झाला काय ? इंजिनिअर यांना किती दाखले देणे असा कोणता निर्णय आहे का? 

          समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

बांधकाम कामगारांना सुरक्षा द्या - चांद शेख

 


सांगली -

आज दि २०/८/२०२१ रोजी सांगली येथे बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर चे संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे व जिल्हा अध्यक्ष चांद गफुर शेख. यानी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई यांचेकडून बांधकाम कामगार यांचेसाठी सुरक्षा संच व अत्य आवश्यक सुरक्षा संच. बांधकाम कामगार यांच्यात कामांवर अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे त्यामुळे. बांधकाम कामगार व त्यांच्या कुटुंबांची सुरक्षा ध्यानात घेवून मंडळाने. कामांवर सुरक्षित काम करणेसाठी. हेल्मेट. बुट. सुरक्षा बेल्ट. बॅटरी. मच्छरदाणी. चटयी. जेवणाचा डबा. हॅणडगोलज. चार्जर. पेटी. अशा विविध वस्तू बांधकाम कामगार यांना मोफत देण्यात येतात. सोबत बांधकाम कामगार यांची अटल विश्व कर्मा विशेष बांधकाम कामगार आरोग्य तपासणी अभियान अंतर्गत कामगार यांच्या विविध मेडिकल तपासणी करण्यात येते. कामांवर असताना बांधकाम कामगार आपल्या आरोग्याची काळजी घेत नाहीत. त्यासाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांचेकडून बांधकाम कामगार यांना विविध प्रकारचे सहकार्य केले जाते 

                आम्ही आज किट वाटप केंद्राला भेट देऊन किट वाटप व आरोग्य अभियान या संबधि विचारपूस केली. त्यावेळी सर्व कर्मचारी यांनी अगदी सरळ व साध्या सोप्या पद्धतीने आमच्या प्रश्नांची उत्तरे दिली

सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा

  सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा            अनुसूचित जाती जमाती. इतर मागासवर्गीय जाती जमाती. भटक्या विमुक्त...

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या