Showing posts with label हडताल. Show all posts
Showing posts with label हडताल. Show all posts

चिपको आंदोलन -अ. मुंडे

https://shooterconsultationcart.com/azp33ctwgz?key=f5e461ccbeb850c3df0b07f34593b0c2https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=3839313865336562633164386238313236316165366464653036363733353764

चिपको आंदोलन



                     हक्क संरक्षण न्याय मंडळाचे कार्य स्पष्ट करण्यासाठी आणखी एक मुद्दा म्हणजे आदिवासी कित्येक वेळा ज्या माणसांचा हक्क व अधिकार हिरावून घेतला जातो तो व्यक्ति न्यायालयात जाण्याचा खर्च देखील करु शकत नाही अज्ञानी गरिब नागरिकांना तर हक्क संरक्षण तरतूद माहितच आहे नाही काय माहित त्यामुळे बर्याच वेळा या सर्व तरतुदींचा फायदा राजकीय कार्यकर्ते उच्च शिक्षित आणि आर्थिकदृष्ट्या सुरक्षित असणारे अशा पुरताच मर्यादित राहतोय आदिवासी झोपडीवासीय कच्च्या कैदेतील अडाणी कैदी यांचेवरिल अन्यायाची दाद या व्यवस्थेत लागणार का ? कोणी स्वयंसेवी संस्था संघटना त्यांचे खटले लढवतील का ? यावरही गेल्या काही वर्षांत वर्षांमध्ये अभिनव असा दृष्टिकोन स्वीकारलेला दिसतो भागलपूर तुरुंगात कैद्यांचे डोळे फोडणे किंवा आदिवासी अत्याचार महिलांच्या विक्री प्रकरण अशा प्रकारे बातमीपत्राचया आधारे मूलभूत हक्कांचा संकोच झाला आहे हे पाहून न्यायाधिश यांनी रजिस्ट्रेरना खटले दाखल करायला सांगितले आणि चौकशी करण्याचे आदेश पोलिसांना दिले या पध्दतीमुळे हक्क संरक्षण कार्याची व्याप्ती एकदमच वाढली गरजू व गरीब आदिवासी नागरीकांना न्यायालयीन कारवाईचा लाभ मिळणे शक्य झाले

        ‌‌. आदिवासी म्हणले की आपल्या डोळ्यासमोर जंगलात राहणारे अर्ध नग्न अंगावर लज्जा रक्षणा एवढेच कपडे असणारे महिला व पुरुष यांची प्रतिमा उभी राहते मध गोळा करणे. शिकार करणे. कंदमुळे फळे. गूहेत राहणे अन्यथा झाडावर वास्तव्य करणे निडर ताकदवान. चफळ चलाख. हुशार. असे आदिवासी लोकांची एक थोडक्यात ओळख आहे जंगल हे अशा आदिवासी लोकांच्यासाठी संजिवनी असते हिंस्र प्राणी यांचा सहवास हे जंगल यांच्यासाठी जगणे राहणे यासाठी पोषक असते

             भारतात औधोगिक आणि आर्थिक विकासाबरोबरच पर्यावरण क्षेत्रात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत या समस्यांचा प्रारंभ ब्रिटिश काळापासून झालेला असला तरी स्वातंत्र्य काळामध्ये या समस्यांचे गंभीर रुप आज अधिक जाणवत आहे आर्थिक विकासासाठी हाती घेण्यात आलेल्या कार्यक्रमाबरोबरच जंगल संपत्ती. खणिज संपत्ती यांचा मोठ्याप्रमाणात वापर होऊ लागला विज निर्मिती आणि प्रगत शेतीसाठी जंगल तोडून मोठी मोठी धरणे बांधली गेली मोठी आण्विक शक्ति केंद्रे उभारण्यात येऊ लागली औधोगिक शहराच्या वाढीबरोबर बकाल झोपडपट्टी वाढली या सर्व कारणांनी हवेंत व पाण्यात मोठ्या प्रमाणात प्रदुषण वाढले आणि पर्यावरणाला धोका निर्माण झाला



                प्रत्त्येक देशांची भौगोलिक परिस्थिती तेथील हवामान लोकांची जीवनशैलीत भिन्न भिन्न असल्याने देशपरतवे पर्यावरणविषयक प्रश्नाचे स्वरूप वेगळे असणे स्वाभाविक आहे ब्रिटिशांनी भारतातील जलसंपत्तीचा उपयोग व्यापार करण्यासाठी सुरू केला त्यानुसार त्यांनी जंगल व जलसंपत्ती विषयक कायदे बनविले आदिवासी जीवन प्रामुख्याने जंगल संपत्ती वर अवलंबून आहे या संपत्तीचा उपयोगाबद्दल त्यांनी काही बंधने स्व इच्छेने स्विकारली होती ब्रिटिशांनी कायदे करताना याची दखल न घेतल्याने बिहार मध्ये संथाळ आदिवासी यांनी आपले जंगल वाचविण्यासाठी बंड पुकारले आजच्या झारखंड हा प्रारंभ होय असे म्हणले तर वावगे ठरणार नाही आजही बिहार वनविकास महामंडळाने साल वृक्ष तोड करून सागाची लागवड करण्याचें धोरण स्वीकारले तेव्हा सालापासून आदिवासी यांना जगण्यासाठी थोडाफार मिळणारा आसरा हिरावून घेतला जातो या भावनेतून आदिवासी यांनी साग लागवड करण्याला मोठ्या प्रमाणात विरोध केला साल वृक्षामुळे आदिवासी यांना भरणं पोषणासाठी अनेक पदार्थ मिळतात उलट साग लागवड हि व्यापारी तत्वावर केली जाणार होती. १९८० मध्ये गुआ. या ठिकाणी झालेल्या दंगलीत. गरिब निरपराध असे १३ आदिवासी यांना मोठ्या कृर पणे मारण्यात आले यात ३ पोलिस सुध्दा मृत्युमुखी पडले यावरून आंदोलन व बंड याची भयानकता आपल्या लक्षात येईल

               १९७३ मध्ये गढवाल मध्ये. सुंदरलाल बहुगुणा यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झालेले चिपको आंदोलन मात्र कोणतीही हिंसा न करता राबविण्यात आले ठेकेदार व समाजातील व्यक्तिच्या संगणमताने मोठ्या प्रमाणात वृक्ष तोड चालू करण्यात आली आदिवासी यांचा जीव असणारे जंगल आत्ता संपतय की काय या भितीने आदिवासी लोकांनी आपल्या बायका मुलांसह प्रत्त्येक झाडाला विळखा घालून त्याला चिटकवून राहण्याचे अभिनव असा उपक्रम तंत्र तेथील आदिवासी लोकांनी वापरले म्हणून त्याला चिपको आंदोलन असे नाव पडले या आंदोलनातून पुढे दारिद्र्य आणि बेकारी यांचा नायनाट करण्यासाठी मद्यपान निषेधाची चळवळही आदिवासी यांचेकडून सुरू करण्यात आली मुळात चालू आंदोलन चळवळीला व्यापक अधिष्ठान मिळाले 

         आज आपल्या भागात रस्ते विकास महामंडळ यांचे काम जोरात चालू आहे हजारों वर्षांपासून आपल्याला सावली व अपघात संरक्षण देणारी लाख मोलाची विशाल असे वृक्ष आपल्या समोर उभे आडवे कापले जात आहेत आपण बघणयापलीकडे काहीच करु शकत नाही हे आपले दुर्दैव आहे कारण रस्त्याचे काम घेणारा मंत्र्यांचा पावना झाड विकत घेणारा त्याचा पावना तोडलेली झाडे गेली कुठे कुणाला माहीत. ? याचा अर्थ असा होतो की प्रगतीसाठी आपण आपलीं हजारों वर्षांची झाडें तोडली मग आदिवासी आपल्यापेक्षा कितीतरी पटीने चांगले होते कारण अधी आम्हाला कापा आणि मग झाडे कापा आपणास काहीतरी शिकण्याची गरज आहे आदिवासी लोकांकडून जर माझा मॅसेज कोण वाचत असेल तर आजच माहिती अधिकार दाखल करुन आपल्या जवळ चालू असलेल्या रस्त्यालगत असलेल्या झाडांची झालेल्या कत्तल संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभाग मधून माहिती मागवा

                    कर्नाटक मध्ये निलगिरी वृक्ष लागवडी विरूद्ध अॅसिको चळवळ. अशाच पध्दतीने उभी राहिली निलगिरी लागवडीपासून फक्त रेयाॉन व कागद निर्मिती धंद्यांना गती मिळते परंतु त्याचा जनावरांसाठी चारा आणि जळावू लाकूड म्हणून वापरात आणता येत नाही तसेच जमीनीचा कस कमी होऊन इतर झाडांना पाणी पुरवठा होत नाही अशीही तक्रार ग्रामीण भागातून आहे कर्नाटक मध्ये बिरलानी हरिहर पाॅलीफामवरस हा मोठा प्रकल्प राज्य सरकार यांच्या संयुक्त सहकार्याने सुरू करण्याची योजना आखली त्यालाही वरिल कारणाने मोठा विरोध झाला मोठ्या औधोगिक कारणांमुळे मोठ्या प्रमाणात वृक्ष तोड होत आहे आणि विविध कारखान्यांनी बाहेर फेकलेल्या रसायानिक पदार्थ व कारखान्यातून बाहेर पडणारे दुषित पाणी नदीत मिसळून जलचर प्राणी व माणसाच्या जीवनाला मोठा धोका निर्माण झाला आहे कर्नाटक मध्ये याबाबत प्रतिकार करण्यासाठी तुंगभद्रा. परिशवरा. समिती पश्चिम घाट बचाव समिती यासारख्या लहान मोठ्या संघटना काम करत आहेत आपल्याजवळील सांगली मिरज शेरिनाला याचे पूर्ण महानगरातील गोळा होणारे घाण अस्वच्छ पाणी कृष्णा नदीच्या पात्रात सोडले जात आहे विविध प्रकारांची आंदोलन झाली पण मुद्दा जसाच्या तसा राहीला 




                       वाढत्या औद्योगिक विकासामुळे खनिज संपत्तीची मोठ्या प्रमाणात उधळपट्टी होत आहे बिहारमधील छोटा नागपूर संथाळ परगाणा याठिकाणी याबाबत मोठी चळवळ चालू आहे याचे कारणं आहे की खनिज संपत्तीचा उपयोग त्या विभागाच्या विकासासाठी होतच नाही ओरिसातील गंधमधरन टेकड्यांच्या भारत अल्युमिनियम कंपनीने चालविलेल्या बाॅकसाइटचया खाण कामाबद्दल तेथील आदिवासी यांनी आंदोलन उभारले आहे या खाणी मुळे येथे मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड झाली त्याचा विपरित परिणाम महानदी व त्यांच्या उप नद्या यावर झाला आहे उत्तर प्रदेश डेहराडून येथे चुणखडीचया खाणीना आमचा कडक विरोध आहे 

            खनिज संपत्ती बाबत माहिती उद्याच्या मॅसेज मध्ये

समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी विविध गाव तालुका जिल्हा राज्य देश यातून पदाधिकारी नेमणे आहे तरी इच्छुक व्यक्ति तरुण यांनी खालील नंबरवर संपर्क साधावा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

९८९०८२५८५९

बांधकाम कामगार यांनी कोणत्याही भुलथापांना बळी पडू नका 

ज्यांनी आपणास फसविले आहे तेच आज इतरांच्या विरोधात उभे आहेत आपले व परके ओळखा तुम्ही देताय म्हणून हे घेतायत 

ऑनलाईन नोंदणी संदर्भात काही अडचण आल्यास फोन करा मोफत सल्ला दिला जाईल ऑनलाईन नोंदणी चा आग्रह धरा

वाचा -

सुरूंग सुरूंग सुरूंग सुरूंग Ahmed Munde...

गुन्हेगारी व फुटीरतावाद Ahmed Munde...

आगडोंब Ahmed Munde...

लोकशाही आणि घराणेशाही...

कामगार आणि हडताल A . Munde

https://shooterconsultationcart.com/azp33ctwgz?key=f5e461ccbeb850c3df0b07f34593b0c2https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=8918e3ebc1d8b81261ae6dde0667357d

 कामगार आणि हडताल



आपल्या भारतातील कामगार चळवळी ब्रिटिश काळापासून सुरूवात झाली त्यावेळी कामगार हा शब्द वापरला जात नव्हता कामगारांना गुलाम म्हणून संबोधले जात होते यांचेवर अनेक अत्याचार केले जात होते वेतन निश्चिती नाही कोणतीही सुविधा सुरक्षा कायदा विमा नाही काळ बदलला आणि कामगारांना आपले चांगले वाईट कळायला सुरवात झाली आणि आंदोलन चळवळीचा पहिला प्रयत्न मुंबई मध्ये लोखंडे यांनी केला १९१८  मध्ये बी पी वाडिया यांनी कामगार चळवळीची सुरुवात मद्रास येथे पहिली मजूर संघटना स्थापन केली भारतातील मजूर चळवळींना येथून चालना मिळाली आणि कामगारांसाठी केवळ दोन वर्षांत म्हणजे एप्रिल १९२१ मुंबई कार्यालयांची स्थापना झाली त्यावेळचे गव्हर्नर लाॅरड लाईड यांनी केली संपूर्ण भारतात असे कामगार कार्यालय पहिलेच होते त्यावेळेपासून आजपर्यंत ७७ वर्षे पूर्ण पणे यशस्वी पणे कामगार हितांचे काम हे कार्यालय करत आहे  

         कामगारांसाठी विविध केंद्रिय कायदे १९ आणि राज्य सरकारने कामगारांसाठी  ६ कामगार कायदे तयार करण्यात आले कामगार कार्यालयाकडून कामगार कायद्यांची अंमलबजावणी करणे. अधिनियम फायदे कामगारांना मिळवून देणे कामगार व मालक यात समेट घडवून आणणे  कामगारांसाठी विविध कल्याणकारी योजना अगदी नाममात्र शुल्क घेवून देणे औधोगिक विवाद.  बोनस प्रदान.  कंत्राटी कामगार. बिडी सिगारेट कामगार.  किमान वेतन.  मोटर परिवहन. वेतन प्रदान. श्रमिक पत्रकार.  सांख्यिकी संकलन.  श्रमिक संघ. प्रसुती लाभ.  समान वेतन. वेठबिगार कायदा.  विक्री संवर्धन.  उपदान प्रदान.  स्थलांतरित कामगार.  बाल कामगार. इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ. असे विविध अधिनियम कायदे जारी करण्यात आले कामगारांसाठी हक्काचे व्यासपीठ तयार झाले 

             कामगार म्हणजे अडाणी गरजू व्यसनी गरिब असा एक टप्पा कामगारांवर पडला आहे जागोजागी तयार झालेले सत्ताधारी नेते यांनी आपले जवळचे बगलबच्चे कामगारांवर दबाव पाडण्यासाठी तयार केले हे तयार झालेले कामगार हितचिंतक यांना कामगार म्हणजे कोण हे सुद्धा माहित नाही  यांना काय म्हणतात हे सुद्धा माहित नाही संघटित व असंघटित क्षेत्रातील कामगार कोणते किती टक्के कामगार संघटित आहेत किती कामगार असंघटित आहेत हे सुद्धा ज्यांना माहीत नाही असे कामगार हितचिंतक झाले  विचार केला तर १३/टक्के कामगार संघटित आहेत ८७/टक्के कामगार असंघटित आहेत म्हणजे बांधकाम व्यावसायात येणारे २२ प्रकारचे कामांचे प्रकार येतात बांधकाम कामगार.  पेंटर. फरशी वाले.  पलमबर.  फॅब्रिकेटर. खुदाई कामगार. विट भट्टी कामगार.  असे विविध प्रकारचे काम करणारे कामगार यात समावेश करण्यात आला आहे तसेच अवजड कामे करणारे खाणकाम उद्योग.  टावर काम. पाईप लाईन. अशी विविध प्रकारची कामे करणारे कामगार असंघटित कामगार वर्गात मोडतात. सगळ मंडळाचे काम व्यवस्थित चाललें होते त्यावेळेस कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी विविध पक्ष सामाजिक सेवा संस्था युनियन तयार झाल्या त्यात कामगार नेते म्हणून काम बघणारे यांना वाळू खडी सिमेंट. खिळे मोळे. सेंटरिंग कामासाठी फळी कोणत्या लाकडाची वापरतात विट तयार करण्यासाठी कोणती माती वापरतात कामांचे नियोजन टाईंमिंग किती पगार कीती यातील काहीही माहिती नसणारे बांधकाम कामगारांचे हितचिंतक झाले सायकल घेण्याची तयारी नसणारे बांधकाम कामगार संघटना हे दुकान चालु केल्यावर हाईफाई कमीतकमी १० लाखांच्या पुढच्या किमतीच्या गाडीत दिसायला लागले कशामुळे मंडळाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध १९ कल्याणकारी योजना कामगार. मुले-मुली. महिला. यांच्या कल्याणासाठी राबविण्यात येतात काही अधिकारी व कर्मचारी यांना हाताशी धरून बेमाफी नोंदणी फी लाभातून मोठा वाटा काढून घेणे. बांधकामासी कोणताही संबंध नसलेले लोक त्यांची नोंद घालून नुसता पैसा उकळणे. यामुळे मंडळाचा कामगार कल्याणासाठी जो पैसा वापरला गेला पाहिजे तो बोगस कामगार संघटना व अधिकार कर्मचारी यांच्या माध्यमातून लूटला जात आहे तुम्ही खा आणि आम्ही खातो असा फंडा वापरला जात आहे वरिल कामगार नोंदणी साठी इंजिनिअर दाखला महत्वाचा आहे तो सुध्दा बोगस कामगार यांना मिळतो कसा 



             कामगाराबरोबर असा दुजा भाव संघटना सेवाभावी संस्था युनियन अधिकार व कर्मचारी हे करतातच आणि यांना आपले काम स्वता करून घेण्यासाठी आॅफिस सहकार्य लाभत नाही कामगारांना विचारले जाते तुम्ही कोणत्या संघटनेकडून आला आहे सिमेंट कंपन्या आपल्या प्रचार प्रसार जाहिरात करण्यासाठी मेळावे घेतात मोठ्या मोठ्या हाॅटेलमधये. त्यात विविध प्रतिनिधी. ठेकेदार इंजिनिअर. यांना बोलावले जाते पण खरोखर सिमेंट मध्ये राबणारा कामगार या मेळाव्याला बोलावले जात नाही ज्या बांधकाम कामगारामुळे आपल्या कंपनीचे सिमेंट वापरले जाते त्यांच्यामुळे यांच्या मेळाव्याला कमीपणा वाटतो आणि कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार बांधकाम कामगारांना जेवन आणि भेट वस्तू दिल्या की कामगार गोळा होतात एवढा आमचा कामगार खालच्या दर्जाचा आहे का. कामगार रोज ५०० मिळवतो आम्हाला तुमच्या जेवणाची आणि भेट वस्तूंची गरज नाही 

             मुंबई राज्यात १९४८ साली करण्यात आलेल्या बाॅमबे इंडस्ट्रियल रिलेशन्स अॅकट मध्ये किमान ३० /टक्के कामगार ज्या संघटनेचे सभासद आहेत तिला प्रतिनिधिक संघटना म्हणून मान्यता देण्याची व कामगाराविषयी सर्व करार मान्यताप्राप्त संघटनेसी करण्याची तरतुद करण्यात आली या कायद्याच्या जोरावर आप आपले स्थान व वर्चस्व टिकवण्यासाठी संघटना मध्ये तक्रार होण्यास सुरुवात झाली भारतातील कामगार संघटना कार्याबद्दल अनेक टिका होण्यास सुरुवात झाली जगात काम करणार्या इतर कामगार संचटनाप्रमाणे आपल्या देशातील कामगार संघटनांनी वेतन वाढ. नोकरिची हमी. व्यवस्थापनामध्ये सहभाग कामामध्ये चांगली परिस्थिती सुविधा असणे इत्यादी स्वरूपाच्या प्रामुख्याने आर्थिक मागण्या केल्या आहेत याचा अर्थ कामगार संघटना केवळ अरथवादी बनल्या आहेत यात राष्ट्रीय हितसंबंध गौण झाले आहेत कामगार संघटनांच्या माध्यमातून देशात क्रांति घडवून आणता येईल असा विश्वास असणारे कामगार व इतर वर्गाचा. भ्रम निरास झाला आहे पन्नास वर्षांहून अधिक काळ लोटला तरी कामगार क्रांतिकारक विचार हिताचा विचार न करता अधिक वेतनवाढीची मागणी करणार्या व ती पदरात पाडून घेण्यासाठी हिंसक बेकायदेशीर मार्गावर कामगारांना बरोबर घेवून अशा विविध मार्गाने आर्थिक मागणी मंजूर करण्यासाठी विविध मार्गाचा अवलंब करण्यास प्रवृत करणे यासाठी कामगार नेत्यांच्या पाठिमागे जातात हा कठू आणि विधारक अनुभव आला आहे

        आपल्या देशातील कामगार संघटना वेतन वाढ वेतन वृध्दी जसा आग्रह धरतात तयाप्रमाणे कामगारांनी आपले कर्तव्य चोख बजावून अधिक उत्पादन करावे असा कामगार प्रयतण करत नाहीत कामगारांच्या या धोरणामुळे व दृष्टीकोनामुळे आधुनिकीकरण अडचणी निर्माण झालेल्या आहेत




              कामगार संघटना अवास्तव स्वरूपाच्या आणि कधीही मान्य होणार नाहीत अशा मागणीचा आग्रह धरतात काही वेळा मालक ठेकेदार यांच्या हितासाठी संप घडवून आणतात आणि मालक वर्गाला मदत करतात आणि मोठा धनलाभ घेतात आणि अशा प्रकारचे करार कामगारांवर लादले जातात आणि तुमच्या मुळे वेळ आली अशी टिका केली जाते त्यामुळे संघटना आणि कामगार यामधील वातावरण संशयास्पद झाले आहे आपल्या पुष्कळशा कामगार संघटना राजकीय पक्षांच्या दावनीला बांधलेल्या असलेने त्यांना स्वतंत्र निर्णय घेण्याचा अधिकार नाही राजकीय कारणांसाठी मुंबई बंद. गाव. तालुका. जिल्हा. भारत बंद. अशा राजकीय कारणांसाठी संघटनांना व कामगारांना अशा कार्यक्रमात या संघटना राजकीय पक्षांमुळे भाग घेतात शिवाय अशा संघटनांचे निर्णय देखील लोकशाही पध्दतीने घेतलें जात नाहीत प्रत्त्येक कामगार संघटना एखाद्या नेत्याच्या इशारयावर चालते त्यामुळे  सर्वसामान्य कामगार यांना नाईलाजाने संपामधये सहभागी व्हावे लागते याबाबत इलाज राहत नाहीी >

        कामगार संघटना आणि चळवळ यांतील वाढता हिंसाचार हि आणखी चिंचेची बाब आहे अनेक कामगार संघटना यांनी आप आपल्या प्रभाव क्षेत्रात दहशतीचे निर्माण केलेलें आहे आपल्या देशातील कामगार संघटना मध्ये अजून प्रौढत्व आलेले नाही भविष्याचा वेध घेण्याची क्षमता त्यांच्यात नाही त्यांचा दृष्टिकोन पुष्कळसा नकारात्मक आहे आणि त्यामुळे देशाच्या औद्योगिक प्रगतीत अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत

      ‌.  माझ्या मताप्रमाणे बांधकाम कामगारांनी कोणत्याही भुलभुलयाला बळी पडू नका मंडळ आपले योजना आपल्यासाठी आहेत आपली कामगार नोंदणी स्वता करा आपल्या दाखल अर्जाची चौकशी आॅफिस अधिकार व कर्मचारी यांच्याशी स्वता विचारपूस करा वेळ पडल्यास कामगार एकत्र येऊन आंदोलन करा पण त्यात कोणताही नेता नको 

    ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया पध्दत समजून घ्या नाही समजली तर आपल्या जिल्ह्यातील सहाय्यक कामगार आयुक्त भवन मध्ये संपर्क करा 

     समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी विविध गाव तालुका जिल्हा राज्य देश यातून पदाधिकारी नेमणे आहे तरी इच्छुक व्यक्ति तरुण यांनी खालील नंबरवर संपर्क साधावा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

९८९०८२५८५९

वाचा -

अधिकारी व कर्मचारी कामचोर ? A. Munde ...

सुरूंग सुरूंग सुरूंग सुरूंग Ahmed Munde....

गुन्हेगारी व फुटीरतावाद Ahmed Munde...

गुलाम. मजूर. कामगार

सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा

  सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा            अनुसूचित जाती जमाती. इतर मागासवर्गीय जाती जमाती. भटक्या विमुक्त...

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या