श्राध्द - अंधश्रद्धा

 


श्राध्द - अंधश्रद्धा

         देव भावाला भुकेला असतो. जो मनुष्य ज्या भावनेने देवास भजतो तशा स्वरूपात तो व्यक्त होतो मनुष्याची चित्तवृत्ती जशी असते तसे त्यास फल प्राप्त होते. परलोकातही त्यास तशीच गती मिळतो. गुरू. ब्राम्हण. देश. देव. गोमाता. महिला. कुमारी कन्या. बालक. यांचें रक्षण करण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणारे आज कुठेही बघायला मिळत नाहीत 

जल पूर्ण. कुंभ दान. अन्नदान. तिलदान. दक्षिणादान. धान्य दान. गायीला चारा देणे. केवळ पिंडदान करणे. स्नान तिलांजली दान. श्राध्द तिथीस उपवास करावा. श्राध्द दिवशी श्राध्द विधी व विधीचे मंत्र वाचन. 

                         मरणानंतर जीवाला सदगती मिळावी म्हणून अंत्येष्टी करतात. दहाव्या व बाराव्या दिवशी अनेक धार्मिक विधी धर्माच्या रिती रिवाजाप्रमाणे करतात. श्राधदे करतात ती दर महिन्याला व दर वर्षी करतात पितृपक्ष म्हणजे भाद्रपद वध पक्ष. तो काळ पितरांना उद्देशून करावयाच्या धार्मिक विधीसाठी नेमून दिलेल्या आहे. श्राधदाची परंपरा हिंदू धर्मात पुरातन काळापासून आहे. तशीच ती जैन पारशी. मुस्लिमांना. ख्रिश्चन. वगैरे धर्मातही आहे मूळ श्रध्दा अशी आहे की आपण भूलोकात काहीतरी संकलपूरवक त्याग केला पूजा केली. हवन केले तर भुवलोक. स्वर्गलोक आदि सुक्षम लोकातील मृतांना ते मिळेल व त्यांच्या ईच्छा तृप्त होऊन ते अधिक उच्च स्थितीत पोहचतिल याबाबत क्रियाकर्म काय करावे यात फरक असतो पण मूळ भावना व हेतू एकच असतो. 

            आपल्या जवळची प्रिय व्यक्ती मरण पावलयास त्याची आठवण व त्याची आवड निवड जपण्यासाठी व त्यांना ध्यानात आणून त्याची आठवण म्हणून आपण भाद्रपद महिन्यात पितृपक्ष म्हणून साजरा करतो. जीवन पणी आपले पिता / आजा / पणजा /पितृत्रयी / आई/ आजी / पणजी /पितयाकडील. / सावत्र आई/आईचा पिता /आजा/ पणजा /आईची आई/पत्नी/मुलगे/मुली/काका /मामा/भाऊ / आत्या/ मावशी /बहिण /सासरा /गुरू/ शिष्य/आप्त या सर्वांचे आपण पितृपक्षात श्राध्द करतो पण विचार केला तर जीवन असेपर्यंत आपण त्यांना काय वागणूक देतो. माझ्या आई वडील यांना हे आवडते ते आवडते जीवंत असताना त्यांना कधी विचारलें नाही आणि आज त्यांच्या तिस-या विधीला सर्व पदार्थ आणून ठेवले जातात काय उपयोग आहे का? ज्यांना आपण जगविणयाचे कर्तव्य बजावणयाची गरज होती त्यांनी आपल्या आप्त यांना निराधार केंद्र. वृध्दाश्रम. येथे सोडले आणि आज त्यांच्या नावाने श्राध्द घालून लाडू जिलेबी व अन्य खाद्यपदार्थ यांचें भोजन लोकांना वाढले जाते म्हणजे जे अन्न अन्न जेवन जेवन करून उपाशी मेले त्यांच्यासाठी आज श्राध्द या नावाने महाभोज घातला जातो तो सुद्धा आम्ही आमच्या आपतावर किती प्रेम करत होतो हे दाखविण्यासाठी श्राध्द मोठे मोठे जेवन घातली जातात. ज्यांना कधी सन्मानाची वागणूक मिळाली नाही. वेळोवेळी आपल्या मुलांकडून व इतरांकडून अपमान सहन करावा लागला. आपल्या आप्त लोकांना आपण शिव्या घातल्या. माराहन केली. मग कशासाठी. वरच प्रेम दाखवितात लोक मला कळत नाही ? जे आपले आई वडील आप्त यांनी स्वता मिळेल ते काम करून स्वता उपाशी राहून आपणांस पोसले तेच उपाशी मेले तर कशासाठी पितृपक्ष साजरा करायचा प्रश्न पडतो मोठा ? 

        मरणानंतर जीव वासनामय व मनोमय कोशात असतो त्यावेळी त्याला. वासना. इच्छा. विकार. असे सर्व असतें पण वासना तृप्त करून घेण्यासाठी शरिर हे एक साधन असते ते मरणार या व्यक्तिला नसते. जर उच्च राहणीमान असणार्या लोकात ईच्छा आकांक्षा पूर्ण होणे शक्य असतें. मयत व्यक्तिंना मोक्ष मिळत नाही. त्यामुळे मयत होणारा म्हणजे. अपघातात. आत्महत्या. फास. जळणे. किंवा इतर मार्गाने. जीवाचा अंत करणारे. मोक्षासाठी. भुलोकावर फिरण असतांत. म्हणजे ते भूत होतात असे आपल्या मनात घर करून बसले आहे. मेल्यावर माणूस स्वर्गात जातो की नरकात हे कोणी पाहिले आहे का. ? जीव गेल्यावर मृत शरीर जाळले काय आणि पुरले काय मृत शरिराला काय कळणार. ? नरक आणि स्वर्ग हे माणसाला एक चांगल वाईट काम करण्याची दहशत मनांत असावी म्हणून रचना करण्यात आली आहे. कोण स्वर्गात गेला कुणी बघितलं आहे का. ? ‌‌कोण नरकात गेला काय माहित आहे का ? मग आपणांस प्रिय असणारी व्यक्ती भुत होते काय. ? हे सर्व आपल्या मनाचा वहेम आहे जसं आपण कर्तव्य केले आहे भविष्यात त्याचे फळ तसेच मिळणारं. हा निसर्ग नियम आहे. आपण संपत्ती साठी काहीही संबंध नसणारे लोक यांच्याशी आपला संबंध जोडतो. रोज हजारों निराधार मरतात. त्यांचे श्राध्द कोण करत काय ?  

              श्राध्द कोणी करावे त्यासाठी कोणाला बोलविणे योग्य ब्राम्हण न मिळाल्यास जो असेल तो चालतो. पण मला एक कळत नाही. आपणच. श्राध्द. सत्यनारायण पूजा. व विविध शुभ अशुभ कार्य करण्यासाठी ब्राम्हण यांना बोलाविले जाते मग. ब्राम्हण यांच्यात मयत झाल्येलया लोकांचे श्राद्धाचे जेवन महाभोज घातलेला मी आजपर्यंत बघितला नाही तुम्ही बघितला आहे का ? त्यांच्यात कोणत्याही शुभ अशुभ कार्यक्रमात तुमच्यापैकी कोणी जेवला आहे का ? म्हणजे यांच्यासाठी हे कर्म करणे गरजेचे नाही ते फक्त आपणासाठी आहे. यांना प्रथम भोजन. काळे तीळ. सातू. सुपारया. गंध. पांढरी फुले. तुळशी माका. धुप. तीन ताम्हणे. पळी पंचपात्र तांब्या. दरभ. काजल. मध. पाट. केळीची पाने. द्रोण तुप. स्वयंपाक. गोपीचंदन. जातवे लोकटिचे वस्त्र व. यथाशक्ती दक्षिणा. आणि मयत व्यक्तिला आवडणारे जेवन करावे असे सांगितले जाते. म्हणजे वरील सर्व वस्तू कार्यक्रम झाल्यावर गोळा करून नेणारे यांच्या मागें कधी भूत लागलें आहे का ? श्राद्धाला येणाऱ्या खर्चाचा पेक्षा जास्त दक्षिणा द्यावी. अस सांगितल जाते. 

        श्राद्धात काय करु नये यांवर सुध्दा हे कार्य पार पाडणार या लोकांनी बंधने घातली आहेत. संध्याकाळी. रात्र व सकाळचा संधिकाळ या वेळा श्राद्धासाठी वर्ज्य आहेत. हे सुद्धा आपण आपल्या सवडीनुसार केले आहे. घरतच किंवा तळमजला. किंवा भाड्याने जागा. असावी. जमीन स्वच्छ सारवलेली आसावी. आपले आप्त यांना मरताना झोपायला जागा नाही होती ती कोपरयात अंगावर फाटकी चादर. अंगावर फाटकी कपडे. आणि आत्ता हे काय नविन. फरशी स्वच्छ पुसलेली असावी. किडा मुंगी नसावी. मळलेली नसावी. आत्ता एक खर सांगतो आपले आप्त कीडा मुंगीत झोपले. रात्री मरून पडलेली लोक मी बघितले आहेत त्यांना मुंग्या सुध्दा लागल्या होत्या काहिजण एका जागेवर पडून असल्यामुळे किडे पडलेले मी बघितले आहेत लोक ह्यो मरण मेला तर बरे होईल कोण सेवा करायच याची. आणि आत्ता बघा ? श्राद्धा दिवशी भिकारी यांना भिक देऊ नये आणि ब्राम्हण लोकांना दक्षिणा दिली तरी चालतें. रांगोळी काढू नका. माळा. गजरा. शृंगार यांवर बंधन आहे. श्राध्द धर्माकडे धार्मिक पणाने लक्ष द्यावे गप्पा मारु नये. अमंगल बोलू नये. आणि श्राद्धाचे जेवन ब्राम्हण जेवलयाशिवाय घरातील लोकानी जेवन करू नये असा नियम नाही भेद कसा पेरला गेला आहे बघा रजवल महिला. वांझ महिला. कुषटी. अन्य कुळातील स्त्री. ब्रम्ह हत्यारे. पापी. पशु. घंटानाद. अश्व सानिध्य. अपंग. काणा. नोकर. यांना टाळावे असे सांगितले जाते मग विचार करा मयत यांच्यातील कोण असेल तर त्याचे श्राध्द करणे योग्य आहे का? चालतें कारणं मयत खात नाही त्याच्या नावाखाली आपणच भुत हे खातो. महिला कुळ याचा भेदभाव येथे सुद्धा केल गेला आहे विचार करा ? 

              गुरू अथवा राजा यांच्यापासून लपवून दृष्य कृत्य केली तर यम धरमाकडून त्यांना शिक्षा होते. वायफळ बडबड करणारा. धेनूसाठी खोटे बोलणारे. मुके होतात. ब्रम्ह हत्या करणारे क्षयरोगी होतात. पुस्तक चोर अंध होतो. ब्राम्हणास शिळे अन्न देणारा कुबडा होतो. मधयपी. काळया दातांचा. सोने चोर. कुनखी. गुरु पत्नी बरोबर समागम करणारा. दोष युकत त्वचा असणारा असतो. दान दिल्याशिवाय खाणारा अपतयहीन असतो. सखया भगिनीशी संग करणारा मनुष्य षंढ असतो. प्रतिज्ञा करूनही विप्रास धन न देणारा गिधाड होतो. ब्राम्हणांची निंदा करणारी कासव होतो. अग्नी पदस्पर्श करणारा मांजर होतो. पूर्व जन्माची फळे भोगावी लागतात हे मला पटत नाही. आणि जी कर्म भोगायची राहली आहेत त्यांचा जन्म नीच योनीत होतो म्हणजे वरील प्रमाणे सर्व मुद्दे आपणास चांगल वाईट रस्ता दाखवतात फक्त याचा वापर आचरण असे करावे याचा आपण विचार करण्याची गरज आहे 

                  समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार जाहिरात प्रसिद्ध वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्ती वेतन योजना

 


इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्ती वेतन योजना 

             राज्यात निराधार अंध अपंग शारीरिक आजाराने त्रस्त व्यक्ती व निराधार विधवा. परित्यक्ता. देवदासी या सर्व दुर्बल घटकांसाठी अर्थसहाय्य देण्याच्या उद्देशाने राज्य पुरस्कृत. #. संजय गांधी निराधार अनुदान योजना # व वृध्द लोकांसाठी श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना.  विधवा महिलांसाठी इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना व दिवयांग व्यक्तिसाठी इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन योजना राबविण्यात येतात.  संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ राज्य निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत मिळणाऱ्या अर्थ सहहयात वाढ करण्याबाबत.  मा लोकप्रतिनिधी. विविध संघटना.  स्वयंसेवा संस्था व अनेक नागरिक यांच्या माध्यमातून शासनाकडे वेळोवेळी मागणी अर्ज.  मोर्चे.  उपोषण. अशा विविध माध्यमातून वारंवार मागणी व पाठपुरावा करण्यात येत होता.  संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत लाभार्थ्यांच्या अर्थ सहहयात दरमहा रुपये. ६०० होती. शासनाकडे मागणी पाठपुरावा करून रूपये १०००/ व सदरहून योजनेतील विधवा लाभार्थ्यांना. १ मुल. असल्यास त्याच्या पालनपोषणासाठी. दरमहा. ११०० रूपये. व विधवा महिलेस दोन मुल असल्यास दरमहा रूपये १२०० इतकं अर्थसहाय्य देण्याबाबत. मा मंत्री ( वित्त) महोदयांनी सन २०१९/२०२० या वर्षाचा अतिरिक्त अर्थसंकल्पीय. भाषणामध्ये घोषणा करण्यात आली आहे.  त्यानुसार सदर योजनेअंतर्गत लाभार्थींना देण्यात येणाऱ्या अर्थसाह्य वाढ करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. 

      विशेष सहाय्य योजना राज्यात राबविण्याबाबत गठीत संजय गांधी निराधार अनुदान योजना.   समितीची कार्यकक्षा.  योजनेचे निकष.  लाभार्थी पात्रता अटी व शर्ती त्याचप्रमाणे अनुदान वाटपाचे करावयाच्या कारवाई बाबतचे संदर्भ. १/१४ येथील शासन निर्णय व परिपत्रक या शासन निर्णयाद्वारे अधिक्रमित करण्यात येत आहे. तसेच विशेष सहाय्य योजना राज्यात राबविण्याकरीता करावयाच्या कार्यपद्धती/कार्यवाही या शासन निर्णयानवये विहित करण्यात येत आहे 

       योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

(१) कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न (२) आर्थिक सहाय्य निवृत्ती वेतन (३) पात्रतेची अहरता (५) वयाचा दाखला (६) उत्पन्नाचा दाखला (७) रहिवासी प्रमाणपत्र (८) अपंगांचे प्रमाणात (९) असमर्थता रोगाचा दाखला (१०) अनाथ निराधार असल्याचा दाखला 

   अर्ज करण्याची पद्धत व अर्जाची छाननी करण्याचा अधिकार

(१) तलाठी. (२) तहसिलदार (३) नायब तहसीलदार (४) ग्रामसभा. (५) केंद्र शासनाच्या निकषानुसार वर्षातून दोनदा ग्रामसभा सथावर अपात्र लाभार्थी शोध मोहीम घेणे बंधनकारक आहे

    आर्थिक सहाय्य मंजूर करणे व त्यांचे वितरण या शासन निर्णयानुसार धयायवयाचे आर्थिक सहाय्य संजय गांधी निराधार अनुदान योजना समिती मार्फत मंजूर केले जातात. नवाने मंजूर करण्यात आलेल्या प्रकरणांत लाभार्थी माहिती दर महिन्यास शासनाला कळविणे बंधनकारक आहे

        योजना राबविण्यासाठी शासनाने गठीत करण्यात आलेली समिती

(१) मा पालकमंत्री यांनी शिफारस केलेली संबंधित तालुक्यातील सामाजिक क्षेत्रात काम करणारी व्यक्ती अध्यक्ष

(२) मागासवर्गीय ( अ जा / अ ज अशासकीय प्रतिनिधी एक सदस्य

(३) महिला अशासकीय प्रतिनिधी एक सदस्य

(४) इतर मागासवर्गीय/ वि जा. भ ज प्रवर्गातील अशासकीय प्रतिनिधी दोन सदस्य

(५) सर्वसाधारण प्रवर्गातील अशासकीय प्रतिनिधी एक सदस्य

(६) अपंग प्रवर्गातील अशासकीय प्रतिनिधी एक सदस्य

(७) संबंधित तालुक्यातील शासन नोंदणी कृत स्वयंसेवी संस्थांच्या अशासकीय प्रतिनिधी एक सदस्य

(८) संबंधित तालुक्यातील सामाजिक क्षेत्रात कार्य करणारी व्यक्ती अशासकीय प्रतिनिधी एक सदस्य

(९) संबंधित तालुक्यातील ज्येष्ठ नागरिक अशासकीय प्रतिनिधी एक सदस्य

(१०) पंचायत समिती गटविकास अधिकारी/ मुख्य अधिकारी नगरपालिका/ प्रभाग अधिकारी महानगरपालिका ( शासकीय प्रतिनिधी ) 

(११) तहसिलदार/ नायब तहसीलदार (शासकीय प्रतिनिधी ) 

समिती बैठका /लाभार्थ्यांच्या याद्या/ लाभार्थी मरण पाल्याची सूचना/ लाभार्थी तपासणी पडताळणी पध्दती/ दक्षता समिती पथके

            वरील सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी सर्व लोकांनी आपल्या आपल्या विभागांना भेट द्या आणि चौकशी करून योजनचा लाभ घ्या 

           समाजसेवा बंद आंदोलन उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार जाहिरात प्रसिद्ध वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५

गोरगरीब कुटुंबातील मुलांना मिळणार हक्काचे शिक्षण आणि शिष्यवृत्ती

 


गोरगरीब कुटुंबातील मुलांना मिळणार हक्काचे शिक्षण आणि शिष्यवृत्ती 

      समाजकल्याण विभाग यांचेकडून गरिब परस्थिती शिक्षण घेणारे मुलं मुली यांना सगळे शिका "शिक्षण हा आमचा अधिकार आहे. " असे म्हणणारे विद्यार्थी यांचेसाठी प्रत्त्येक जिल्ह्यात समाजकल्याण विभाग यांचेकडून शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येतात 

                  "शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा " हे सर्व शिक्षणाशिवाय शक्य नाही आत्ता आणि आजच आपण व आपले पालक समाजकल्याण विभागाला भेट द्या आणि योजना मिळविण्यासाठी कागदोपत्री पूर्ततेसह आपला हक्क मिळवा

(१) माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती

समाजकल्याण विभागाकडून माध्यमिक शाळेतील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते शिक्षण घेताना येणाऱ्या अडचणी ध्यानात घेवून शासनाने अशी योजना चालू केली आहे

योजना वैशिष्ट्ये/ निकष

* या योजनेसाठी माध्यमिक विद्यालयातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा प्रस्ताव संबंधित विधयालयाकडून पाठविला जातो

* अनुसूचित जातीच्या इयत्ता पाचवी ते सातवी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ५००/रुपये व आठवी ते दहावी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना १०००/ रूपये वार्षिक शिष्यवृत्ती मिळते

* विमुक्त जाती भटक्या जमाती. अनुसूचित जमातीच्या इयत्ता पाचवी ते सातवी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना २००/रुपये व आठवी ते दहावी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ४००/ रूपये वार्षिक शिष्यवृत्ती मिळते

* दुर्बल घटकात मोडणारा विद्यार्थ्यांना चांगल्या शिक्षण सुविधा मिळवण्यासाठी या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ होतो

    आत्ता या शिष्यवृत्ती मध्ये वाढ करण्यात आली आहे

(२) सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना

        समाजकल्याण विभागाकडून शाळेतील मुलींची गळती रोखण्यासाठी ही शिष्यवृत्ती योजना राबविण्यात आली आहे मागासवर्गीय समाजातील मुलीचे शिक्षण पूर्ण होऊन त्यांच्या विकास व्हावा हा या योजनेचा उद्देश आहे

    योजना वैशिष्ट्ये / निकष

* या योजनेतून विमुक्त जाती / भटक्या जमाती / अनुसूचित जमातीच्या / मुलीच्या गळतीचे प्रमाण कमी करणे व रोखण्यासाठी करण्यात आला आहे

* इयत्ता पाचवी ते सातवी शिक्षण घेणाऱ्या मुलींना. दरमहा. ६०/ रूपये शिष्यवृत्ती मिळते तर आठवी ते दहावी शिक्षण घेणाऱ्या मुलींना. दरमहा १००/ रूपये शिष्यवृत्ती मिळते शैक्षणिक वर्षात दहा महिने ही शिष्यवृत्ती योजना दिली जाते

* संबंधित विद्यालयातून अशा मुलींचे प्रस्ताव सरकारकडे पाठवला जातो

* शैक्षणिक खर्चाच्या अडचणी सोडविण्यासाठी मुलींना शिष्यवृत्ती योजनेचा फायदा होतो

* या योजनेमुळे ग्रामीण भागात मुलींची शाळेत १००/टक्के उपस्थिती राहणे बंधनकारक करण्यात आले आहे

(३) डॉ बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह

        समाजकल्याण विभागाकडून अनुसूचित जाती जमाती व नवबौद्ध मुला मुलीकरिता अशा प्रकारचे शासकीय वसतिगृह चालविले जाते यामध्ये मिळत असलेल्या सुख सोयी सोयीसुविधा. मागासवर्गीय समाजातील मुला मुलींना शिक्षण पूर्ण करण्यास मदत मिळते

योजना वैशिष्ट्ये/ निकष

* आर्थिक परिस्थिती मुळे शिक्षण पूर्ण करण्यासाठी अडचणीत असलेलें मागासवर्गीय विद्यार्थ्यांना अशा वसतिगृहात राहून शिक्षण पूर्ण करता येते

* अनुसूचित जाती जमाती व नवबौद्ध मुला मुली करिता प्रत्त्येक तालुक्यात एक अशी शासकीय निवासी शाळा असते 

* निवासी शाळेत इयत्ता पाचवी ते दहावी अनुसूचित जाती जमाती व नवबौद्ध मुला मुली करीता प्रवेश मिळतो

* निवासी शाळेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना. भोजन. निवास. व इतर शैक्षणिक सुविधा मोफत उपलब्ध करून दिल्या जातात

*मागासवर्गीय समाजात शिक्षण पूर्ण करण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांच्या या या योजनेमुळे सोय होते शिक्षण पूर्ण करण्यासाठी व विकास साधण्यासाठी मदत मिळते

     सदर योजनेत आत्ता बदल करण्यात आला आहे

(४) मुला. मुलींसाठी शासकीय वसतिगृहे

      मागासवर्गीय मुला मुलींची व आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी व मुलींची शिक्षणाची सोय व्हावी व उच्च शिक्षण घेण्यास मदत होऊन त्यांचा विकास व्हावा यासाठी अशी वसतिगृहे समाजकल्याण विभागाकडून चालवली जातात

योजना वैशिष्ट्ये/निकष

*शासकीय वसतिगृहात मुलांना. निवास. भोजन. अंथरुण. पांघरुण. मोफत दिले जाते 

* शालेय विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी दोन गणवेश. पाठ्यपुस्तके. वह्या. स्टेशनरी. यांचा मोफत पुरवठा केला जातो

* वैयक्तिक व अभियांत्रिकी. विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमानुसार. सटेथोसकोप. अॅप्रन. बाॅयलर. सूट. कलानिकेनचया मुलांसाठी. रंग. कलर बोर्ड. ब्रश. कॅनव्हास. मिळते

* वसतिगृहातील विद्यार्थ्यांना दैनंदिन खर्चासाठी मासिक निर्वाह भत्ता मिळतो

* विभागीय पातळीवर दरमहा २००/रूपये. जिल्हा पातळीवर दरमहा ७५/ रूपये व तालुका पातळीवर दरमहा ५०/ रूपये विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता दिला जातो

* अशा वसतिगृहात मध्ये विद्यालयीन व महाविद्यालयीन. शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी गुणवत्तेनुसार प्रवेश दिला जातो

* विद्यार्थी महाराष्ट्र रहिवासी असावा. प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थी पालकांचे वार्षिक उत्पन्न १ लाख रुपये चया आत असावे*इयत्ता आठवी व त्यापुढे महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो

* अशा वसतिगृहात प्रवेश मिळविण्यासाठी अर्ज करण्याची मुदत शालेय विद्यार्थी साठी १५/ मे पूर्वी तर महाविद्यालयीन विद्यार्थी साठी ३०/जून किंवा निकाल लागल्यानंतर १५ दिवसांपर्यंत असतो

(५) विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता व विद्यावेतन

समाजकल्याण विभागाकडून व्यवसायिक शिक्षण घेणाऱ्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांसाठी निर्वाह भत्ता व विद्यावेतन दिले जाते शैक्षणिक व दैनंदिन गरजा भागवतांना या योजनेतून मदत होते

  योजना वैशिष्ट्ये/ निकष

* वैयक्तिक. अभियांत्रिकी. शेती. असे व्यवसायिक शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जाती जमाती मुलांच्या साठी केंद्र सरकारकडून शिष्यवृत्ती मिळते

*या योजनेअंतर्गत वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना २३५/ ते ७४०/ निर्वाह भत्ता मिळतो

* व्यवसायिक शिक्षण घेताना येणारा खर्च फक्त शिष्यवृत्ती वर भागविणे शक्य नसलेमुळे त्यांना निर्वाह भत्ता मिळतो* महाविद्यालयाच्या वसतिगृहात. शासकीय वसतिगृहात. व इतर वसतिगृहात राहणाऱ्या अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व्यतिरिक्त या योजनेतून निर्वाह भत्ता दिला जातो

* बी एड. डी. एड. असे दोन वर्ष किंवा त्यापेक्षा कमी कालावधिचे व्यवसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दरमहा ५००/ रुपये विद्यावेतन दिले जाते हे विद्यावेतन शैक्षणिक वर्षात दहा महिन्यांसाठी दिलें जाते

* व्यवसायिक शिक्षण घेणाऱ्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता व विद्यावेतनचा प्रस्ताव संबंधित महाविद्यालय / संस्था. कडून सरकारकडे पाठवला जातो

(६) भारत सरकारची शिष्यवृत्ती

केंद्र सरकारकडून मागासवर्गीय विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन व उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळते यामुळे विद्यार्थ्यांना आपलीं शैक्षणिक गरज भागविण्यासाठी मदत होते

योजना वैशिष्ट्ये/ निकष

* मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत व्हावी व त्यांचे गळती प्रमाण रोखण्यासाठी केंद्र सरकार कडून शिष्यवृत्ती दिली जाते

*अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती शालांत परीक्षेनंतर मिळते

*पालकांचे वार्षिक उत्पन्न एक लाखाच्या आत असावे

*दरमहा. १४०/ रूपये ते ३३०/ रूपये विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता मिळतो

*ही शिष्यवृत्ती विद्यार्थ्यास निर्वाह भत्ता. शिक्षण शुल्क. परीक्षा शुल्क. व इतर बाबींवरील खर्च शुल्क या स्वरुपात मिळते

*ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण करून स्वताच्या विकास करण्यासाठी या योजनेची मदत होते

(७) छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती

समाजकल्याण विभागाकडून इयत्ता दहावी व बारावी विद्यार्थी साठी ही योजना राबविण्यात येते

*अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक. विकास. गुणवत्ता. वाढावी यासाठी शिष्यवृत्ती दिली जाते

*इयत्ता अकरावी मध्ये प्रवेश घेणाऱ्या अनुसूचित जातीच्या मुला मुलींना ही शिष्यवृत्ती मिळते

*इयत्ता बारावी मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षाच्या दहा महिन्यांच्या कालावधीत दरमहा ३०० रुपये एकूण ३००० रूपये शिष्यवृत्ती मिळते

(८) पुस्तक पेढी योजना

समाजकल्याण विभागाकडून वैद्यकीय. तंत्रनिकेतन. कृषी. पशुवैद्यकीय. अभियांत्रिकी. व्यवसायाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पुस्तकांसाठी अनुदान मिळते

* वैद्यकीय. तंत्रनिकेतन. कृषी. पशुवैद्यकीय. अभियांत्रिकी. सीए. एम एम बीए. व विधी. अशा महाग पुस्तकांसाठी अनुदान मिळते

*अनुसूचित जमातीच्या व भारत सरकार शिष्यवृत्ती मिळत असलेल्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळतो

*पुस्तकाचा खर्च झेपत नाही म्हणून शिक्षण बंद करावे लागणार या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येतो

*पुस्तक पेढी योजनेतून अनुदान मिळविण्यासाठी संबंधित महाविद्यालय यांचेकडून सरकारकडे प्रस्ताव पाठविला जातो

(८) सफाई कामगार पालकांच्या मुलांसाठी मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती

अस्वच्छ व्यवसाय ( सफाई कामगार ) करणार्या पालकांची मुले शिक्षणापासून वंचित राहू नये त्यांचा विकास व्हावा यासाठी समाजकल्याण विभागाकडून मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती दिली जाते

* ही योजना सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी आहे

*योजनेच्या निकषांत बसणारा विद्यार्थी प्रस्ताव शिष्यवृत्ती साठी विधयालयाकडून पाठविलें जातात

* गणवेश. शैक्षणिक खर्च. भागवतांना अस्वच्छ व्यवसायात काम करणाऱ्या लोकांना मुलांना मदत मिळते

(९) मोटर वाहन चालक प्रशिक्षण

अनुसूचित जाती जमाती भटक्या विमुक्त जाती व नवबौद्ध युवकांना समाजकल्याण विभागाकडून मोटर चालविण्याचे प्रशिक्षण मोफत दिले जाते. स्वावलंबी होण्याच्या व सुरक्षिततेच्या दृष्टीने युवकांना अधिकृत संसथाचालकाकडून चालक वाहक प्रशिक्षण मिळते

*प्रशिक्षण घेणाऱ्या उमेदवारांची. वयोमर्यादा. शैक्षणिक. शारीरिक. जातीचा दाखला. ही अट आहे

*प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर. वाहन चालक परवाना. परिक्षा घेऊन.  

*अधिकृत वाहन चालविण्याचे. वाहकाचे प्रशिक्षण. मोफत मिळून संबंधित विभागाचा अधिकृत परवाना मिळतो

(१०) व्यवसायिक प्रशिक्षण

अनुसूचित जाती जमाती अल्पशिक्षित बेरोजगारांना. "मागेल त्याला व्यवसाय प्रशिक्षण " या उपक्रमातून मोफत व्यवसायांचे प्रशिक्षण मिळते व्यवसाय उभारणी तरूणांना या प्रशिक्षणाचा उपयोग होतो

योजना वैशिष्ट्ये निकष

* हि योजना फक्त अनुसूचित जातीतील अल्पशिक्षित बेरोजगारांना होणार आहे

* प्रशिक्षण घेण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांचे कमीत कमी शिक्षण इयत्ता चौथी पर्यंत असावे

* शैक्षणिक पात्रतेनुसार व्यवसायाचे प्रशिक्षण कमीत कमी एक आठवडा व जास्ती जास्त दोन महिने कालावधी पर्यंत मिळते

* औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत हे शिक्षण दिले जाते प्रशिक्षण घेणाऱ्या लाभार्थी तरुणास टुलकिट. व १००/ रुपये दरमहा वेतन दिले जाते

*अलपशिक्षणावर व्यवसाय करण्यासाठी या प्रशिक्षणाची मदत होते प्रशिक्षणानंतर तरुणांना स्वताच्या स्वयंरोजगार मिळवता येतो

(११) औधोगिक प्रशिक्षण संस्थेत विद्यार्थ्यांना विद्यावेतन

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विविध व्यवसायाचे शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना या योजनेतून विद्यावेतन मिळते त्यामुळे व्यवसायाचे तांत्रिक शिक्षण घेवून विविध क्षेत्रात काम करता येते

योजना वैशिष्ट्ये निकष

* संस्थेच्या वसतिगृहात राहणाऱ्या ज्या विद्यार्थ्यांना तंत्रशिक्षण विभागाकडून दरमहा ६०/ रुपये विद्यावेतन मिळते अशांना समाजकल्याण विभागाकडून दरमहा ४०/ रूपये विद्यावेतन मिळते

* तंत्रशिक्षण विभागाकडून ज्यांना विद्यावेतन देण्यात येत नाही अशा विद्यार्थ्यांना समाजकल्याण विभागाकडून. दरमहा १००/ रुपये विद्यावेतन मिळते

* या योजनेच्या लाभासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न ६५;२९०/ रुपये पेक्षा जास्त नसावे

* अनुसूचित जमातीच्या व मान्यताप्राप्त औधौगिक प्रशिक्षण संस्थेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळतो

*गरिब कुटुंबातील विद्यार्थ्यांना दरमहा शैक्षणिक खर्चाच्या गरजा भागविण्यासाठी यांचा उपयोग होतो

* योजनेच्या निकषांत बसणारा या विद्यार्थ्यांच्या प्रस्ताव सरकारकडे संबंधित औधोगिक प्रशिक्षण संस्थेकडून पाठविला जातो

(१२) कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना

दारिद्रय रेषेखालील. भूमिहीन शेतमजूर. अनुसूचित जाती जमाती नवबौद्ध कुटुंबासाठी हि योजना राबविण्यात येते भूमिहीन कुटुंबातील लोकांचे राहणीमान सुधारण्यासाठी त्यांचा विकास व्हावा हा योजनेचा उद्देश आहे

* या योजनेअंतर्गत लाभार्थींना चार एकर कोरडवाहू किंवा दोन एकर बागायती शेतजमीन मिळते

* जमीन खरेदीसाठी योजनेतून ५०/ टक्के अनुदान तर ५०/ टक्के बिनव्याजी कर्ज

*जमीन खरेदीसाठी घेतलेलं ५०/टक्के कर्ज परत फेड करण्याची मुदत १० वर्ष असते. कर्ज मंजूर झाल्यानंतर परतफेड दोन वर्षांनंतर सूरू केल्यास चालते

* अनुसूचित जाती नवबौद्ध घटकातील लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळतो

* लाभ देताना दारिद्र्य रेषेखालील. भूमिहीन शेतमजूर. विधवा. परित्यक्ता अर्जदारांना प्राधान्य दिले जाते

*लाभ घेणाऱ्या लाभार्थी साठी वय वर्षे १८/६०/ या दरम्यान असावे लागते

*या योजनेमुळे दुर्बल घटकातील शेतमजूर यांना हक्काचे रोजीरोटी साधनं मिळू शकते

(१२) पाॅवर टिलर योजना

अनुसूचित जातीतील अल्पभूधारक शेतकऱ्यांना या योजनेतून पाॅवर टिलर साठी. १००/टक्के अनुदान मिळते मजुरांच्या वाढत्या दरामुळे पाॅवर टिलरचया साह्याने शेती सहजपणे कसता येते

योजनेची वैशिष्ट्ये निकष

*इच्छुक लाभार्थी महाराष्ट्र मधील असावा अनुसूचित जाती नवबौद्ध घटकातील असावा

* अर्जदार अल्पभूधारक / कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेचा लाभार्थी असावा

*अर्जदाराचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न ४०००० रूपयांपेक्षा कमी असावे

*योजनेचा लाभ मिळविण्यासाठी अर्जदाराने विहित नमुन्यातील समाजकल्याण विभागाकडे अर्ज करावा

*अर्जदाराचा अधिकृत अधिकार्यांकडील जातींचा दाखला जोडणे आवश्यक आहे

(१२) गटाई कामगारांना पत्र्याचे सटाॅल पुरविणे

गटाई काम करणाऱ्या अनुसूचित जाती जमाती लोकांना या योजनेतून स्टाॅल मिळतात त्यामुळे हा व्यवसाय सुरक्षित करणे सोपे जाते

योजना वैशिष्ट्ये निकष

*अर्जदाराने विहित नमुन्यातील अर्ज समाजकल्याण विभागाकडे करावा लागतो

*योजनेचा लाभ घेण्यासाठी वय १८ पुर्ण असावे

* ग्रामीण भागातील लाभार्थी उत्पन्न वार्षिक. ४०००० रूपये चया आत असावे व शहरी भागासाठी ५० हजार चे आत असावे

* अर्जदार मागत असलेलें स्टाॅल त्यांच्या स्वताच्या जागेत असावे

* चर्मकार समाजातील काही दुर्बल घटक रस्त्यावर उघड्यावर रस्त्याच्या कडेला गटाई काम करतात त्यांना सुरक्षितपणे हे काम करण्यासाठी स्टाॅलचा उपयोग होतो

* लोखंडी पत्र्याच्या स्टाॅलबरोबर लाभार्थ्यास चामडी साहित्य घेण्यासाठी ५००/ रुपये अनुदान मिळते

*या समाजाच्या लोकांना या योजनेमुळे उपजीविकेचे साधन उत्पन्नाचे साधन मिळते

* अर्जदाराने अधिकृत अधिकारयाकडील जातीचा दाखला जोडणे आवश्यक आहे

(१३) आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजना

समाजातील भेदभाव संपावा समतेचे वातावरण निर्माण व्हावे यासाठी दोन वेगवेगळ्या जातीमधील विवाह केलेल्या व्यक्तिंना या योजनेतून अनुदान मिळते

योजना वैशिष्ट्ये निकष

*अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती व विमुक्त जाती / भटक्या जाती / यापैकी एक व्यक्ती सवर्ण हिंदू. जैन. लिंगायत. शीख यापैकी दुसरी व्यक्ती अशांनी विवाह केल्यास त्यांना अनुदान मिळते

* आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांना एकत्रित. ५०'००० रूपये अनुदान मिळते

*आंतरजातीय विवाहानंतर समाजाकडून कुचंबणा होऊ नये म्हणून योजनेतून प्रबोधन केले जाते

*आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांना प्रोत्साहन रूपात मिळालेले अनुदान संसार उभारण्यासाठी उपयोगी पडते

* या योजनेमुळे आंतरजातीय विवाहाकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलण्यासाठी मदत होईल

(१४) कन्यादान योजना

सामुदायिक विवाह सोहळ्यात सहभागी होवून विवाह करणार्या मागासवर्गीय जोडप्यांना या योजनेतून अनुदान मिळते नवीन संसार उभारताना या जोडप्यांना अनुदानाची मदत मिळते

योजना वैशिष्ट्ये निकष

*अनुसूचित जाती जमाती भटक्या विमुक्त जाती व नवबौद्ध ( धनगर वंजारी ) विशेष मागास प्रवर्गातील जोडप्यांना या योजनेतून अनुदान मिळते

* सामुदायिक विवाह सोहळ्यात विवाहबद्ध झालेल्या वरील जातीच्या जोडप्यांना. १० :००० रूपये अर्थ सहाय्य. वधूचे आई वडील किंवा पालकांच्या नावे धनाअदेश विवाहाच्या दिवशी देण्यात येते

* सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करणाऱ्या संस्थांना प्रत्त्येक जोडप्यांमागे. २:००० रूपये प्रोत्साहन अनुदान मिळते

* गरीब कुटुंबांचा सामुदायिक विवाह सोहळ्यामुळे विवाहाचा अतिरिक्त खर्च वाचतो

*सामुदायिक विवाह सोहळ्यामुळे साधेपणा मुळे विधिवत विवाह करण्यासाठी समाजात प्रबोधन होण्यास मदत होते

(१५) अत्याचारित कुटुंबास अर्थ सहाय्य योजना

अत्याचाराचे बळी ठरणारया अनुसूचित जाती जमातीच्या कुटुंबातील सदस्यांना समाजकल्याण विभागाकडून अर्थ सहाय्य

योजना वैशिष्ट्ये निकष

* जातीच्या कारणावरून अतयाचारास बळी पडलेल्या अनुसूचित जमातीच्या कुटुंबातील सदस्यांचे पुनर्वसन करण्यासाठी या योजनेतून अर्थ सहाय्य मिळते

* अनुसूचित जाती जमाती कुटुंबावर / व्यक्तिवर अत्याचार घडल्यास व या गुन्ह्याची नोंद नागरि हक्क संरक्षण अधिनियम १९५५ खाली अनुसूचित जाती जमाती ( अत्याचार प्रतिबंधक ) अधिनियम १९८९ खाली झालेली असल्यास या योजनेतून अनुदान मिळते

* योजनेतून लाभासाठी जातीचा दाखला व काही गुन्ह्यात वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करावे लागते

* अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला तर कमीत कमी २५:००० रूपये ते जास्तीत जास्त २ लाख रूपये पर्यंत अर्थ सहाय्य मिळते

*अत्याचारास बळी पडलेल्या कुटुंबांचे /सदस्यांचे या योजनेमुळे पुनर्वसन होण्यास मदत होते

(१६) वृध्द कलावंत पेन्शन योजना

राज्य सरकारच्या या योजनेतून वृध्द कलावंतांसाठी वृध्दापकाळात पेन्शन मिळते. आणि उतरत्या वयात त्यांना उपजीविका करणेस मदत होते

योजना वैशिष्ट्ये निकष

*इच्छुक लाभार्थी वृध्द कलावंत यांनी विहीत नमुन्यातील अर्ज समाजकल्याण विभागाकडे करावा

*तमाशा. नाटक. लोककला. चित्रपट. यामध्ये काम केलेल्या व वयाची ६० वर्ष पूर्ण असलेल्या कलावंतांना या योजनेचा लाभ मिळतो

*इच्छुक वृध्द कलावंत म्हणून काम केल्याची माहिती पुरावे ( फोटो. कात्रणे. प्रमाणपत्र. इत्यादी ) जोडावी

*रेशनकार्ड. गाव कामगार उत्पन्न दाखला. अत्यल्प उत्पन्न असणाऱ्या कलावंतांना या योजनेचा लाभ मिळतो

*पेन्शन योजनेमुळे वृध्द कलावंत लोकांना सुरक्षितता मिळते

(१७) पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण योजना

अनुसूचित जाती जमाती भटक्या विमुक्त जाती व नवबौद्ध घटकातील युवकांना या योजनेतून पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण मिळते यामुळे समाजातील युवकांना सैन्य व पोलीस भरतील मदत होते

योजना वैशिष्ट्ये निकष

*उमेदवार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. अनुसूचित जाती जमाती भटक्या विमुक्त जाती व नवबौद्ध असावा. प्रशिक्षणासाठी वय. १८ ते २५ दरम्यान असावा. उमेदवारांची छाती. उंची. इत्यादी सैन्य व पोलीस भरतीसाठी आवश्यक असलेल्या नियमानुसार असावी. उमेदवार. इयत्ता बारावी उत्तीर्ण व शारीरिक दृष्ट्या निरोगी असावा. पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण तीन महिन्यांचा कालावधी असतो. तीन महिने पूर्ण कालावधीत उमेदवारांची राहण्याची सोय प्रशिक्षण संस्थेत केली जाते. पोलिस प्रशिक्षणात. धावने. उंच उडी. लांब उडी. गोळाफेक. पुल अप्स. आॅपटिकलस रससी खेच. चढणे उतरणे. हे प्रशिक्षण देण्यात येते. अशा प्रशिक्षणामुळे ग्रामीण भागातील युवकांना सैन्य व पोलीस भरतीत चांगली संधी मिळू शकते.  

     आत्ता आपण वरील मॅसेज पूर्ण पणे वाचला असेल तर आपल्या ध्यानात एक गोष्ट आली असेल ती म्हणजे समाजकल्याण विभाग असो वा कोणताही विभाग त्यातील योजनांचा लाभ घेण्यासाठी एक अट कायमस्वरूपीअडसर म्हणून घातली जाते ती म्हणजे जातींचा दाखला हा सर्व खेळ आहे कारणं खरोखरच या योजनेस पात्र असणारा लाभार्थी आजच्या घडीला आपण कोणत्या जातीचे आहोत हे सिद्ध करु शकत नाही कारणं त्यांच्याकडे ६० वर्षाचा पूरावा नाही. 

          खरोखरच सर्वसामान्य माणसाची मुलं मुली शिकावी असे वाटत असेल तर जातीच्या दाखल्याची अट रद्द करा नाहीतर योजना बंद करा

      समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार जाहिरात प्रसिद्ध वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

बांधकाम कामगार आणि दारू?

 


बांधकाम कामगार आणि दारू

           दारू सोडा आरोग्याशी नात जोडा. निरोगी रहा विविध विनाशकारी रोगांपासून वाचा. जस आपण आज वागता तसेच उद्या आपली मुल वागणार म्हणजे बा दारुडा पोरग दारूड. अस नको. आजच विचार बदला. कारण दारू विक्री व्यवसाय करणारा कधीच दारू पित नाही म्हणून तो मालक आहे आणि आपण गुलाम झालो आहे

         बांधकाम कामगार म्हणलं की व्यसनी अडाणी गरजू अशिक्षित मिळेल ते काम करणारा मिळेल ती मजूरि घेणारा ठेकेदार इंजिनिअर यांचा अन्याय सहन करणारा. गरिबी मुळे शिक्षण नाही. शिक्षण नसल्यामुळे नोकरी नाही. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगणारा. तो व्यक्ती म्हणजे बांधकाम कामगार होय. 

    बांधकाम कामगार.क्षेत्रात आज आपल्या लोकसंख्येच्या ६५ टक्के लोक याच व्यवसायावर आपला व आपल्या कुटुंबांचा उदरनिर्वाह चालवतात. म्हणजे. सरकारला सर्वात मोठा आर्थिक टॅक्स हा बांधकाम क्षेत्रातून ज्याला बांधकाम कामगार व्हायचे आहे त्यासाठी कोणतीही परिक्षा नाही. कोणतेही अनुभव सर्टिफिकेट लागतं नाही शिक्षणाची अट नाही त्यामुळे ६५ टक्के लोक या बांधकाम क्षेत्राकडे वळतात. ग्रामीण भागातून येणारा लोकांचा लोंढा हा शहरांत बांधकाम कामगार म्हणूनच काम करतात. त्यामुळे वाढणारी गुंडगिरी बेकायदा अवैध व्यवसाय. व्यसनी. अशा विविध कारणानें ही जनता ग्रासली आहे 

                दारु हा शब्द मधीरा. सुरा. सोमरस अशी मनमोहक नाव असणारा एक शब्द आहे. जुन्या काळात काळया कुजलेल्या गुळापासून. नवसागर. युरिया. भाबळीची साल. असे एक मिश्रण तयार केले जाते ते ठराविक दिवसासाठी कुजणयासाठी सोडले जाते त्यात साप उंदीर घुशी पाली. असे एक नाही अनेक प्राणी पाडतात आणि मरतात आणि अशा मिश्रणापासून मानवी आरोग्यास हानिकारक असणारी दारु तयार केली जाते. आणि लोक बांधकाम कामगार दिवसभर उन्हात राबून चार पैसे गाठीला बांधायचे सोडून त्याच पैशांत दारु सारखं विष विकत घेतात किती वाईट आहे बघा. बांधकाम कामगार दारुच्या अधिन झाले आहेत. सकाळपासून संध्याकाळपर्यंत फक्त दारूच्या नशेत असणारे बांधकाम कामगार मी बघितले आहेत. यात बांधकाम व्यावसायिक व ठेकेदार इंजिनिअर. यांना कामगारांची गरज असेल तर सकाळी त्याला दारू पिण्यासाठी पैसे देऊन नंतरचं कामांवर न्यावे लागते. बांधकाम कामगार यांचे असे मत आहे की दिवसभर कामांचा कंटाळा घालविण्यासाठी आम्ही दारू पितो. काहीजण म्हणतात आम्हाला लय टेन्शन आहे म्हणून आम्ही दारू पितो. काहीजण मुल ऐकत नाहीत म्हणून आम्ही दारू पितो. काहीजण कर्जबाजारी पणामुळे दारू पितात. काहीजण बायकोच्या त्रासामुळे किंवा बेजबाबदार वागण्यामुळे दारू पितात. तर काहीजणांन खास चैनी करायची म्हणून पीतात. अशी एक नाही अनेक कारणे लोक सांगतात पण हा सर्व खेळ आहे ते आपल्या मित्रांची कुटुंबाची. फसवणूक करत नाहीत तर ते सवताची फसवणूक करत असतात. 

              काॅंकरेट.गॅंग म्हणजे येथे एक ठेकेदार असतो. रोज सकाळी दारूच्या अड्ड्यावर असणारे बांधकाम कामगार गोळा करून त्यांना दारू पाजून कामांवर नेतात आणि काम झाल्यावर ठरविल्याप्रमाणे पगार न देता घालविले जाते. या अशा कामांवर जाणारे बांधकाम कामगार यांची नोंदणी पोलिस स्टेशनला करणे आवश्यक आहे पण कोणीही करत नाही. त्यांचा इनसुरनस करणे गरजेचे आहे पण कोणीही करत नाही. याचयामगचे कारणं सांगितलें जाते ते म्हणजे हे कामगार परगावचे आहेत आमच्याकडे काय कायम आहेत का ? मग यांच्यासाठी आम्ही काही करू शकत नाही. असे मत या ठेकेदार लोकांचे असते. यामध्ये अंगावर पैसे देण्याचे नविन खुळ आल आहे कारणं या कामगारांना दारूचं व्यसन आणि दुसरें कोणतेही काम येत नाही मग एखाद्या ठेकेदार यांचेकडून अंगावर पैसे घ्यायचे. मग काय या कामगारांचा दारुचा खर्च आणि पगार कमी यामुळे या बांधकाम कामगार याचे अंगावर असणारे पैसे कसे फिटणार मग त्या कामगारांचे मरेपर्यंत हेच काम करायचे. पैशासाठी कामगारांना माराहाण. बांधून मारणे. शिविगाळ. रात्री अपरात्री घराकडे जाणे. दम देणें जीवे मारण्याची धमकी. पोलिस स्टेशनला गेला तर जीवे मारण्याची धमकी. . त्यांच्या बायकांवर वाईट नजर तुझ्या नवरयाने अंगावर पैसे घेतले आहेत ते तुला फेडावे लागतिल नाहितर या महिलांच्या कडे शरिरसुखाची मागणी करणारे नराधम याच धंद्यात आहेत. कामगाराच दारूडा नाही हे ठेकेदार सुध्दा दारु पितात पण ते बार मध्ये. महागडी दारु पितात यासाठी येणारा पैसा हा बांधकाम कामगार यांच्या घामातून येतो.कामावर काम चालू असताना काही अपघात झाल्यास.दुखापत झाल्यास त्यासाठी येणारा औषधांचा खर्च व जोपर्यंत तो बांधकाम कामगार काम करू शकत नाही तोपर्यंत त्याचा पगार. ज्या ठेकेदार कंत्राटदार यांनी कामाला घेऊन जाणारया वर आहे. पण आज कोणीही बांधकाराला ओळख सुद्धा देत नाही आजचं निर्णय करा आणि ज्यांच्याकडे कामाला जाताय तेथे असा कोणताही प्रकार घडल्यास तात्काळ पोलिस स्टेशनला तक्रार करा. फक्त दारू पिऊ नका क्रांकरेट कामांवर जाणारे बांधकाम कामगार हे काम करत असताना बरेच कामगाराचा कामांवर मृत्यू झाला आहे अशी बरिच प्रकारणे आहेत. पण आजपर्यंत या बांधकाम कामगार यांच्या नातेवाईकांनी कोणत्याही पोलिस स्टेशनला तक्रार केली नाही का ? मला कळत नाही. बांधकाम कामगार यांच्या नशिबाला हे सर्व येते ते म्हणजे फक्त आणि फक्त दारूमुळे

                दारूचे व्यसन असणा-या व्यक्तीला समाजात किंमत नाही मुलबाळ पत्नी सगेसोयरे यांच्यात किंमत नाही. कारणं रोज संध्याकाळी घराकडे दारू पिऊन येणारे रस्त्याला पडत पडतं येताना आपण बघतो. आणि म्हणतो आज काय पगार झालाय वाटत ? आज काय बाजार आहे वाटतं ? मग त्या घरातील महिलांना व मुलांना एकादा माणूस सांगतं येतो की तुमचा माणूस अमुक ठिकाणी दारू पिऊन पडला आहे काय वाटतं असलं त्या जीवाला. उसने पैसे घेऊन. कर्ज काढून. घरातील भांडी कुंडी विकून. चोरी करून संडास धुवून. कष्टाची कामे करून. साफसफाई करून. वेळ पडल्यास घरातील बायको मुलं कामाला ठेवून स्वता. दारु पिणारे. असं एक नाही अनेक प्रकारची कामे करून दारू पिणारे मी बघितले आहेत. आणि याचं प्रमाण जास्त आहे ते म्हणजे बांधकाम कामगारांत वाईट आहे 

            आज शासनाकडून देशी विदेशी दारूला लाईसनस देवून विक्री करण्याची परवानगी दिली आहे. म्हणजे शासन सुध्दा पूर्ण दारूबंदी कायदा अंमलात आणत नाही. काही ठिकाणी उलटी बाटली अशी महिला आंदोलन झाली पण त्याला सुद्धा जोर लागला नाही. त्यात सुध्दा मोठ्या प्रमाणात राजकारण आल आणि अशी आंदोलने करणार्या महिला राजकारणात गेल्या आणि आंदोलन मोर्चा हे सर्व शांत झालयं महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई यांचेकडून बांधकाम कामगार यांच्यासाठी १९ कामगार महिलांना मुलांना जशा विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात तसेच मंडळाकडून व्यसनमुक्ती उपचारासाठी योजना आहे पण आज कोणताही बांधकाम कामगार या योजनेकडे वळत नाही आणि वळलेला नाही. म्हणजे मंडळांचा बांधकाम कामगार यांना व्यसनापासून दूर करण्यासाठी असणा-या प्रयत्न फोल ठरला आहे. मंडळाने सर्वांचे चेक अप करण्याची गरज आहे किंवा मंडळाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी व्यसनमुक्ती केंद्रांचा दाखला अनिवार्य करण्यात यावा कारणं आत्ता अटल विश्व कर्मा विशेष बांधकाम कामगार आरोग्य तपासणी अभियान अंतर्गत बांधकाम कामगार यांच्या विविध टेस्ट करण्याच्या मागच कारणं आहे ते म्हणजे बांधकाम कामगार दारू पितो का? जर एखाद्या कामांवर बांधकाम कामगार याचा काही अपघात झाला तर अभियान मध्ये करण्यात आलेल्या विविध टेस्ट मध्ये अल्कोहोल चे सुध्दा टेस्ट होते त्यामुळे मंडळाकडून बांधकाम कामगार कामावर असताना अपघातात मृत्यू झाल्यास असणारा पाच लाख रुपये इतकी शासनाची त्यांच्या कुटुंबाला मिळणारी रक्कम मिळणारं नाही म्हणजे दारू किती वाईट आहे बघा ? महात्मा गांधी व्यसनमुक्ती केंद्र ही योजना शासनाने अंमलात आणली होती पण त्याचा सुध्दा काही उपयोग झाला नाही. 

            आजचं दारू सोडा आरोग्याशी नातं जोडा. निरोगी रहा कारणं दारु म्हणजे गुलामगिरी. 

        समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

कलम १६ कलम २१ काय आहे?

 


कलम १६ कलम २१ काय आहे?

            माणूस आहे म्हणजे तो आजारी पडणार आहे. रुग्ण सेवा ही ईश्वर सेवा मानली जात होती पण आज या वैद्यकीय क्षेत्राचा बाजार मांडला आहे जागोजागी बोगस डॉक्टर यांचा सुळसुळाट आपण बघतो. ज्याला कोणतीही डीग्री नाही कोणताही अनुभव नाही असे संधीसाधू डॉ आपणास पाहावयास मिळतात. अशा बोगस डॉक्टर यांनी आपल्या वैद्यकिय धर्माचा बाजार मांडला आहे कोणत्याही दवाखान्यात रुग्ण हक्काची सनद लावलेली दिसत नाही. कोणत्या उपचारासाठी किती खर्च येणारं किंवा किती पैसे भरावे लागणार. याचे कोणत्याही दवाखान्यात दरपत्रक लावलेले दिसत नाही. औषधांची किंमत रुग्णांच्या नातेवाइकांना सांगितली जात नाही धर्मादाय आयुक्त यांचेकडून आपल्या जिल्ह्यात किती दवाखाने आहेत. कोणता दवाखाना कोणत्या योजनेअंतर्गत मोफत उपचार करतो याची माहिती व त्यासंबंधी माहिती सांगणारे मदतनीस कोणत्याही दवाखान्यात दिसत नाहीत. 

आपल्या कडे येणाऱ्या रुग्णांना त्यांनी ठरवून दिलेल्या प्रयोगशाळेत विविध चाचण्या करण्यासाठी पाठविणे आपल्या ओळखीच्या मेडिकल मधून औषध खरेदी करण्यासाठी आग्रह धरणे किंवा जर एखाद्या रुगनाकडे डॉ यांनी सांगितलेले औषधं घेण्यासाठी पैसे नसतील तर तेच औषध त्याला त्याच्या गावांत सुध्दा उपलब्ध झाले पाहिजे आपल्या दवाखान्यात पेशंट बरा होत नाही असे सांगून एखाद्या तज्ञ किंवा डॉ पेशंट पाठविणे या पद्धतीवर म्हणजे डॉ कट प्रॅक्टिस वर बंदी येणार आहे याविषयी सविस्तर पुढीलप्रमाणे एक पेशंट उपचारांसाठी दवाखान्यात गेलेवर जो पर्यंत डॉ यांचा पैसयाचा कोटा भरत नाही तोपर्यंत त्या पेशंटला डिस्चार्ज केले जात नाही यासाठी शासनाने २०१८ रोजी अर्थ संकलपिय विधेयक मांडण्यात येणार होते 

त्यातील तरतुदी पुढील प्रमाणे

(१) २०१८ मध्ये विधिमंडळ अर्थ संकलपिय अधिवेशनात डॉ व प्रकटिस वर बंदी आणणारे विधीयक मांडण्यात येणार होते

(२) सध्या खाजगी व निमशासकीय आणि सरकारी रुग्णालयात अनेक डॉ आपल्या कडे येणाऱ्या रुग्णांना बाहेरच्या प्रयोगशाळेत विविध चाचण्या करण्यासाठी भाग पाडत आहेत विशिष्ट कंपनी चे औषध लिहून देणा-या डॉ यांना संबंधित कंपनी कडून भ मोठ्या प्रमाणात आर्थिक मोबदला दिला जातो रुग्णांच्या खिसयातून डॉ यांना कमिशन दिले जाते अशा सर्व प्रकारची गंभीर दखल घेण्याचा विचार करून या मध्ये दोन दवाखाने व दोन डाॅ आणि मेडिकल यांचें एक जिव्हाळ्याचे संबंध तयार झाले आहेत त्यामुळे पेशंटची बेमाफि लूट केली जात आहे       

    कोरोना काळात डॉ यांची. बरिच प्रकारणे आपले मन हालवून टाकणारी होती मयताचे अवयव यांचा व्यापार बेमाफी रुग्ण उपचारांचे बिल तर काही डॉ यांनी मयत असणारे पेशंट जीवंत आहेत म्हणून रुग्णांच्या नातेवाइकडून. बिलाची रक्कम वसूल केली. यांच्या वर कारवाई झाली तरी सुध्दा यांची दुकानें चालूच होती. काहीजण या दवाखान्याचे परवाने व डॉ यांच्यावर कारवाई करा या मागणीसाठी निवेदन उपोषण केली पण त्याचा उपयोग झाला नाही रुग्णांना मिळणारी वागणूक आपणं सर्वांनी बघितली आहे चेक अप नाही तपासणी नाही औषध अंगावर टाकणे. लांब उभे राहून बोला. हाडाचा प्राबलम असेलतर त्या रुग्णाला ताप थंडी यांचे औषध देणारे डॉ आपण बघितले आहेत. एकादा रुग्ण मरत असेल तरी डाॅ यांनी उपचार केला नाही आपल्या गावातील जिल्हा उप रुग्णालय मध्ये डॉ वेळेवर येत नाहीत. औषध बाहेरून आणायला सांगतात. साप कुत्रं चावल्यास लागणारी लस सदैव उप जिल्हा रुग्णालयात उपलब्ध असणे आवश्यक आहे. जे डॉ सरकारी दवाखान्यात कामास आहेत त्यांचे सवताचा दवाखाना आहे. सरकारी दवाखान्यातील औषध हे डॉ आपल्या क्लिनिक मध्ये वापरत नसतील कशावरून ? महिन्याला येणारा उप जिल्हा रुग्णालयासाठी औषधं साठा याचा सटाॅक रिपोर्ट आपणांस बघण्याचा अधिकार आहे. 

(३) विशिष्ट. प्रयोगशाळा. मेडिकल. स्टोअर्स लॅब. यांनी त्या डॉ चे नाव सांगणे वरिल प्रमाणे विविध आग्रह करणार्या डॉ विरोधात तक्रार करणे गरजेचे आहे असे कोठेही लिहून ठेवलेले नाही की जेथे दवाखाना आहे तेथे त्याच डॉ यांचे मेडिकल असते त्या डॉ कडे उपचार घेतला म्हणजे त्याचं औषध आपणांस बंधनकारक नाही कि येथेच घेतलें पाहिजे असा कोणताही डॉ आपणाकडे आग्रह किंवा तगादा लावत असेलतर जवळच्या पोलिस ठाण्यात तक्रार केल्यास गुन्हा दाखल केला जाईल गुन्हा सिद्ध झाल्यास १ वर्ष शिक्षा व ५० हजार रुपये दंड. जर याच डॉ कडून दुसऱ्यांदा गुन्हा झाल्यास २ वर्ष शिक्षा व १ लाख रुपये दंड शिवाय त्यांचा परवाना रद्द करण्यात येणार आहे अशी तरतूद या विधेयकात आहे

(४) हे विधेयक मंजूर झाल्यास अशा प्रकारे कायदा झाल्यामुळे सर्वसामान्य जनता गरिब गरजू लोकांना या डॉ कडून संरक्षण मिळण्यास मदत होणार आहे असा कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरणार आहे

डॉ यानी पेशंटला चांगली वागणूक दिली पाहिजे

डॉ यांनी पेशंटला उपचार पद्धती निवडण्याचा अधिकार द्यावा

डॉ यांनी आपल्या दवाखान्यात रुग्ण हक्क सनद लावणे बंधनकारक आहे

रुग्ण हक्क

रुग्ण आपल्या निवडलेल्या मेडिकल मध्ये औषध खरेदी करू शकतो

रुग्ण आपलीं उपाचार पध्दती निवडू शकतो

रुग्ण महात्मा फुले आरोग्य योजनेची

राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना या योजनेतून अनुदान व उपचार मिळणे बाबत हट करु शकता

        आपल्या भारतात अठरा पगड जातींचे लोक गुण्यागोविंदाने नांदत असतात. प्रत्येकाचे धर्म चालीरीती सणवार मंगल कार्य तसेच विविध धार्मिक कार्यक्रम प्रत्येकाच्या धर्माच्या रिती प्रमाणे होतात त्यातच सर्वात महत्त्वाचा आणि भावनिक विधी कोणता असेल तर तो म्हणजे अंत्यविधी करण्याची प्रत्येकाची प्रथा धर्माप्रमाणे असते. त्यात प्रामुख्याने मुस्लिम समाजात मृतदेह दफन करण्याची प्रथा आहे त्यात दफन विधी करताना धार्मिक विधी केला जातो. हिंदू समाजात दहन पध्दतीने मृत व्यक्तिला शेवटचा निरोप दिला जातो असे विविध समाज आपल्या आपल्या धर्माप्रमाणे अंत्यविधी करतात त्यात कोणीही मृतदेहाची. अवहेलना करु शकत नाही त्याला दहन दफन करण्यासाठी अडवू शकत नाही. हा कायद्याने गुन्हा आहे 

              अलिकडे आपण बघतो वाचतो की उघड्यावर मृतदेह टाकलें जातात. हे आपल्या धर्मानुसार अगदी खालच्या दर्जाचे कृत्य माणले जाते. संविधानात जिवंत माणसांच्या हितासाठी संरक्षणासाठी विविध कायदे कलम तयार करण्यात आले आहेत पण मला एक समजतं तोच व्यक्ती मृत झाल्यावर त्यांच्यासाठी काही तरतुद आहे का ? होय मृत्यू नंतर सुध्दा मृतदेहाला असे कायदेशीर अधिकार आहेत का ? पण जीवंत माणसाला असणारे विविध अधिकार कायदे कलम मृत्य व्यक्तिलाही लागू होतात का ? आपल्या कायदेसंहीता मध्ये मरणानंतर सुध्दा काही कायदेशीर तरतूद करण्यात आली आहे

       समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

गॅस ग्राहकांचे हक्क ?



 गॅस ग्राहकांचे हक्क 

              जस हवा पाणी मानवाला जीवंत राहण्यासाठी गरजेचे आहेत तसेच आज लाईट गॅस जीवनावश्यक वस्तू म्हणूनच आपण यांचेकडे पाहतो. जस पेट्रोल डिझेल यांचें दर रोज वाढत आहेत पण फिरणारी वाहन. गाड्यांच्या शोरुम मध्ये दोन चाकी चार चाकी गाड्या खरेदी करण्यासाठी लागणारी रांग कमी झालेली नाही. लाईट विज बिल आज महावितरण कंपनीचे खाजगीकरण झाले आणि कंपन्या ठेकेदार यांना चालविण्यास दिल्या मग काय मनाला येईल तसा युनिट दर ह्या कंपन्यांनी आकारण्यास सुरुवात केली. पहिलें विज बिल तीन महिन्याला होतें त्यावेळी विज बिलासोबत असणारे सर्व कर तीनं महिन्याला आपण भरत होतो आज विज बिल महिन्याला झाले पण त्यासोबत असणारे विविध कर आज आपण महिन्याला भरतो म्हणजे विज बिलापेक्षा या करांची रक्कम जास्त आहे तरि सुध्दा आपण भरतो. पाच मिनिट लाईट गेली तर महावितरण कंपनीला पाचसे फोन जातात म्हणजेच या ठेकेदार कंपन्यांना कळल लोकांची लाईट ही जीवनावश्यक झाली आहे. पेट्रोल डिझेल गॅस विज बिल. यांच्या दराचा आज सुध्दा मोठा बटयाबोळ सुरू आहे. म्हणजे शासनाला सुध्दा कळल की सर्वसामान्य असो किंवा नोकरदार किंवा शेतकरी यांना या सर्व दर वाढीमुळे काही फरक पडत नाही. म्हणजे लोकांच्या कडे पैसा आहे लोक खरेदी करत आहेत म्हणजे लोकांना हे या दराने चालतं

              जीवनावश्यक गोष्टींत घरगुती किंवा व्यवसायिक गॅस याचा सुध्दा समावेश होतो. कारणं पहिल जंगल होती त्यामुळे जळावू लाकूड मिळत होतें आज जंगल संपली. त्यामुळे गॅसला महत्व आल. जनावरें होती त्यावेळी खेड्यात शेणी मिळत होत्या आणि जळण्याची पोकळी भरून निघत होती. आत्ता जनावरं सुध्दा नामशेष झाली सर्वात महत्वाचा तोटा म्हणजे  दहन विधी साठी लाकूड शेणी याचा वापर प्रामुख्याने केला जात होता आज यापैकी कोणतीही सोय उपलब्ध नाही त्यामुळे दहन विधी सुध्दा गॅसवर केला जातो. 

              उज्वला योजनेतून मोफत गॅस कनेक्शन देण्याचा शासनाचा निर्णय एक महिना व्यवस्थित चालला आणि खेड्यात सर्व घरांत उज्वला योजनेतून मोफत गॅस आला आज गॅसने कोपरा धरला आणि महिलानी चुलीकडे मोर्चा वळविला. शासनाचा फार मोठा फायदा झाला तो असा उज्वला योजनेतून देण्यात येणारा मोफत गॅस ज्यांना गरज नाही अशा लोकांची गॅस सबसिडी रद्द झाली आत्ता उज्वला योजनेतून मोफत गॅस मोफत भरुन मिळत नाही पण गॅस धारकांची सबसिडी मात्र बंद झाली 

* नविन कनेक्शन बरोबर. शेगडी स्टॅण्ड   लायटर वितरकाकडून घेतले पाहिजे असे बंधनकारक नाही

*नविन गॅस कनेक्शन काही अडचण आल्यास मुदतीत न घेतल्यास प्रतिक्षा क्रमांक रद्द होत नाही तो पुढील लाॅट मध्ये वर्ग करणे गॅस वितरकाला बंधनकारक आहे

* नविन व जादा सिलेंडर नोंदणी विनामुल्य करणे वितरकावर बंधनकारक असतें ती नोंदणी वितरक नाकारू शकत नाही पण विनामूल्य फक्त म्हणल जात आपणाकडून त्या फोन काॅल सह रक्कम घेतली जाते आपणांस कळत सुद्धा नाही

* नविन कनेक्शन सुचना रजिस्टर पोस्टाने पोहोच करणे गॅस वितरकावर बंधनकारक आहे

*  आपण नंबर लावल्या पासून ४८ तासात सिलेंडर पोहच झाला पाहिजे. ही जबाबदारी गॅस वितरकावर असतें. सिलेंडर गोडावूनला येऊन घेऊन जा अस म्हणता येणार नाही.  ग्राहकांच्या गरजेपोटी गोडाऊन वरून किंवा दुकानातून सिलेंडर घेऊन गेल्यास गॅसच्या किंमतीच्या ५/ टक्के सुट गॅस वितरकाने देणे बंधनकारक आहे

* ग्राहकाला त्याचा प्रतिक्षा क्रमांक लेखी अथवा फोन वरून देणें बंधनकारक आहे. सिलेंडर वेळेवर न आल्यास वितरकाकडे नोंदणी रजिस्टर तपासण्याचा अधिकार गॅस ग्राहकाला आहे

* वितरकाने ठळक दिसेल असा सटाॅक बोर्ड लावला पाहिजे. ग्राहकास काही शंका असल्यास ग्राहक सटाॅक रजिस्टर तपासू शकतो

* सिलेंडर वितरण क्रमवारीने करणे आवश्यक असते.  तुमचा अग्रहकक डावलेला नाही हे तुम्ही वितरकांच्या रजिस्टर मध्ये तपासू शकता

* गॅस पावतीवर गॅस वजन लिहिलेले असले पाहिजे. गॅस वजनाबद्दल शंका असल्यास वितरकाकडून वजन तपासून मागण्याचा ग्राहकांना हक्क आहे.  वजन कमी आल्यास वजनमापे निरिक्षकाकडे तक्रार करावी तुमचा सिलेंडर अन्य व्यक्तिंना दिला जात नाही ना ? याची खात्री करण्यासाठी त्याच्या पावतीवर तारखेसहीत सही करा

* बाहेरगावी बदली झाल्यास कनेक्शन बदलून मिळू शकते कंपनीच्या परवानगीने अन्य व्यक्तिच्या नांवे गॅस कनेक्शन ट्रान्स्फर करता येते

* रेग्युलेटर खराब झाल्यास तो विनामूल्य बदलून देणें गॅस वितरकाना बंधनकारक आहे

* गॅस सिलिंडर विशिष्ट मुदतीत संपला पाहिजे असा कोणताही नियम नाही अथवा बंधनं नाही 

* काळजी म्हणून आपल्या गॅस कार्ड वरील नोदी अधुन मधुन तपासून पहावयात म्हणजे आपल्या नावावर कोणी सिलिंडर नेत नाही ना ? याची खात्री व खातरजमा करता येऊ शकते

              आपला गॅस सिलिंडर वितरण करण्यास येणार्या कामगार किंवा वितरण कंपनीच्या कामगारांना शासन दरापेक्षा जास्त पैसे देऊ नका. आपले घरगुती गॅस कनेक्शन मोफत चेक अप करणे.संबधित गॅस विरतरकाची जबाबदारी आहे  हुशार व्हा सतर्क रहा आणि आपली लुट होण्यापासून वाचवा 

          समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

कार्यकर्त्यांचे वाईट दिवस ?

 


वाईट दिवस कार्यकर्त्यांचे 

          जन्माला आला की त्याला स्वातंत्र्य व सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळतो आणि तो संविधानाने आपणास बहाल केला आहे जात. धर्म लिंग रंग वंश. अशा सगळ्या भेदाचया पलिकडे जाऊन समता पूर्ण वातावरण आनंदानें जगण्यासाठी पोषक सभोवताल मिळणे हा सुद्धा आपला परम अधिकार आहे. तो आपणांस जन्मजात मिळतो. व्यक्ती जन्माला आल्यानंतर त्याला बालवयात सर्व सुविधा मिळण्याचा व अधिकार मिळतोच आणि मिळालेला असतोच. शिक्षणाचा अधिकार. रोजगार अधिकार. विकासाच्या अधिकार. व्यवसायाचा अधिकार मतदानाचा अधिकार. मुक्तपणे भ्रमण संचार अधिकार. मालमत्ता व साधनें बाळगण्याचा अधिकार. आरोग्यपूर्ण जीवन जगण्याचा अधिकार. शोषणापासून मुक्त राहण्याचा अधिकार. राजकीय दबाव. शासकीय अधिकारी व कर्मचारी यांचेकडून मागणी मागण्याचा अधिकार. असे एक नाही अनेक अधिकार जन्मातच माणसाला मिळतता. सर्वसामान्य आणि लोकशाही देशातील नागरिक म्हणून पुढे त्याला बोलण्याचा लिहिण्याचा अधिकार. व विविध माध्यमातून अभिव्यक्ती होण्याचा. संघटित होण्याचा. अन्यायाविरुद्ध आवाज उठविणे. अहिंसक मार्गाने आपले म्हणने मांडण्याचा अधिकार मिळालेलाच असतो हे सर्व अधिकार आपणांस सभ्य नागरि समाजांत आपोआप बहाल झालेले असतात. तरीही आपल्यापैकी अनेकांना वरील अधिकारांचा पूरेपूर लाभ मिळत नाही आणि आपण तो मिळविण्यासाठी प्रयत्न सुध्दा करत नाही. अनेकांना समतेचा अधिकार असून सुद्धा. जात धर्म. अशा भेंदाना बळी पडावे लागते. शिक्षणाचा अधिकार असून सुद्धा आज कित्येक मुलं. लाखांच्या घरात मुल आज शासनाच्या विविध शैक्षणिक संस्था सेवा सुविधा असून सुद्धा बालकांना गरिबी मुळे शाळा किंवा विद्या मिळत नाही. हसण्या बागडणयाचया वयांत कोवळ्या वयात मुलांना अवैध धंदे. व इतर ठिकाणी कामगार म्हणून वेठबिगारी करावी लागते त्यासारखे वाईट नाही. बालिक आणि महिला यांचा कामाच्या ठिकाणी उच्च पदावरील अधिकारी व कर्मचारी यांचेकडून होणरया शोषणाला बळी पडत आहेत आपण रोज वृतमानपत्रात वाचतो आणि विसरून जातो. सामान्य नागरिकांना काय पाहिजे असतं. दोन वेळचे अन्न. अंगभर कपडे. डोक्यावर आपल सवताच आणि हक्काचं घर. आज अशा सर्वसामान्य जनता वंचित आहे. शेतीतून निर्माण संपत्तीचे शोषण. होत रहावी अशी पध्दतशीर व्यवस्था. असल्याने ग्रामीण भारतातील शेतमजूर लोक शहरांत स्थलांतरित होऊन झोपडपट्टीत नरकयातना भोगत आहेत इतके खराब जीवन जगत आहेत त्यांची आपण कल्पना सुध्दा करू शकत नाही त्याचबरोबर आदिवासी भटके विमुक्त आणि अल्पसंख्याक लोकांना मुळ सामाजिक प्रवाहात कसलेही स्थान नाही. जातीय व धार्मिक हिंसाचार अतिरेकी हल्ले यात मोठा राजकीय नेते पुढारी कधीं भरडले आहेत का नाही सर्वसामान्य माणूसच यात भरडला जात आहे. मग आंदोलन मोर्चा वेळी होणारी पोलिस कारवाई कार्यकर्ते यांचेवर होते आणि कार्यकर्ते असतांत ते म्हणजे सर्वसामान्य. यामुळे राजकीय व संघटना सेवाभावी संस्था युनियन व इतर पक्षाचे गट यांच्यामुळे सामाजिक सुरक्षितता हा मानवीय अधिकार पायदळी तूडवला जात आहे 

                  मग आपणांस असा प्रश्न पडतो की इतके भरपूर मानवी अधिकार कार्यकर्त्यांना असताना आमच्या समाजात इतका मोठ्या प्रमाणात अन्याय आणि अत्याचार का ? मनाला अस्वस्थ करणारी ही विसंगती का आहे ? या आमच्या प्रश्नाला अनेक कंगोरे व अनेक पदर आहेत. परंतु मूळ प्रश्न असा गंभीर आहे त्याचा विचार सर्व पक्ष. संघटना. सेवाभावी संस्था. युनियन. सामाजिक संघटना. इतर गट. अपक्ष नेते यांच्या संघटनेना. सत्ताधारी लोकांच्या संघटना यामध्ये मृगजळामागे धावणारे कार्यकर्ते व आम्ही अधिकारांची भाषा भरपूर करतो परंतु आम्ही आमचें कर्तव्य विसरतो आणि पदाला बळी पडतो आणि स्वताच्या स्वाभिमान विकून एखाद्याच्या ताटाखालचे मांजर म्हणजे कार्यकर्ते होतो भारतीय राज्यघटनेने. माणसाला माणसा प्रमाणे वागणूक व अधिकार कर्तव्य आम्हास सांगितली आहेत ती आपण व आपल्या डोक्यावर थैमान घालणारे राजकीय व अन्य लोक पाळतता का ? जो कार्यकर्ता किंवा समाज आपले हक्क व अधिकार विसरतो त्या समाजास कार्यकर्त्यांना आपले हक्क व अधिकार सहजासहजी मिळत नाहीत हा सर्व दोष आपलाच आहे कारणं गाफिल आणि झोपलेल्या व्यक्तिच्या घरात चोरी होते तो सतत जागरूक असतो व सावध असतो. त्यांच्या घरात चोरी करण्याचे धाडस चोर करत नाहीत याचा साधा आणि सोपा अर्थ असा होतो की आपणांस कोणाचेही कार्यकर्ते होण्यासाठी समाजांत आपल्या आजूबाजूला असे चोर फिरत असतात. तुमच काम चांगल आहे. पैशांचे बळ आहे. माणसांचे बळ आहे. गुंडगिरी बेकायदा मालमत्ता. घरची परिस्थिती बेताची आहे. आहे यांच्यावर अशा चोरांचे लक्ष असते. म्हणून आपण गाफिल न रहाता सतर्क राहण्याची गरज आहे या उलट या चोरांना आत्ता रान मोकळे झाले आहे कारण आमचा समाज जागरूक नाही. धर्म. जाती. पंथ. संप्रदाय. प्रांत. भाषिक. शैक्षणिक सांस्कृतिक जातीयवाद निरक्षरता. फुटिरता. अशा विषमतेच्या विषाने जो मुरचित झालेला आहे म्हणजे कार्यकर्ते होताना. जेवन दारु काही थोडे आर्थिक अमिष. यामुळे तो भुललेला आहे. संविधानातील समतेच्या मुलयाचया नेहमीचं येथे व आपल्या दलबदलू वागण्यामुळे अनादर झाला आहे. आपण जागरूक नसल्याने समाजांचे आर्थिक. राजकीय. सामाजिक शोषण होताना आपण बघतो गरीबांचे अज्ञान व हतबलता व मध्यमवर्गीय आत्मकेंद्रित वृत्ती यामुळे मानवीय अधिकारांचे रक्षण करणारे सकारात्मक दबावगट राहिलेले नाहीत. ज्याप्रमाणे अंधार्या रात्री सुसाट वाहत असताना हातांची ओंजळ करून दिवा त्याला वारा लागू नये दिवा विजू नये यासाठी आपणच प्रयत्न करणे गरजेचे आहे. नाहीतर भविष्यात आपण आणि आपली येणारी पिढी अंधारात चाचपडत राहणार आहे. आज वादळात सापडलेल्या दिल्यासारखी परस्थिती कार्यकर्त्यांची झाली आहे. हा दिवा विजू नये म्हणून कर्तव्याशील ओंजळी म्हणजे या रस्ता भटकलेलया कार्यकर्त्यांना रस्त्यावर आणण्यासाठी ओजळी रुपी मार्गदर्शन करणे गरजेचे तरच कार्यकर्ता रूपी दिवा वाचणार आहे 

                  कार्यकर्ता म्हणजे सर्व आणि सांगेल तसे म्हणजे हजुरी करण्यासारखे काम करणारा म्हणजे कार्यकर्ता. काही ठिकाणी आपण बघतो काही कार्यकर्ते परस्थिती मुळे कार्यकर्ते याला बळी पडले आहेत. तर काही पक्षाचे नेते पुढारी यांच्या भुरभुलया आश्वासनांना बळी पडतात. तर काही जण फक्त फक्त पदासाठी आणि खोटा आव आणण्यासाठी कार्यकर्ते होतात मग काय आपल्या गाडीवर अमुक कार्यकर्ता. टि शर्ट. विविध ग्रुप तयार होतात. आंदोलन मोर्चा दंगेधोपे जाळपोळ यासाठी अशा कार्यकर्त्यांचा वापर केला जातो. त्यावेळी त्यात शिक्षण पूर्ण झालेले तरूण यांच्यावर पोलिस केस दाखल होते भविष्यात कोठेही नोकरी नाही जनसामान्यांच्या मनात प्रतिष्ठा खराब त्यामुळे लग्न नाही मग. व्यसनाधीनता. गुंडगिरी अवैध धंदे. अशा विविध मार्गाला असे तरूण लागतात. त्यावेळी ज्या नेत्यांचा पक्षाचा संघटनेचा सेवाभावी संस्था युनियन यांचा तो कार्यकर्ता आहे तो प्रमुख बघायला सुध्दा कोर्टात पोलिस स्टेशनला जात नाही त्यावेळी सवताची जमीन गहाण ठेवून विकून आपल्या मुलांना कचेरीतून सोडवून आणणारे आई वडील मी बघितले आहेत. मग आत्ता कुठं गेल या कार्यकर्त्यांचे नेते ? विचार करण्याची गरज आहे. डिजिटल वर नाव आल की कार्यकर्ता स्वताला नेता समजतो आई वडील रोजगार करतात. मग पोरग कोणाचीतरी कार्यकर्ता झाला व्याजाने कर्ज काढून गाडी घेवून देतात मग गाडी प्रमाणे कपडे बुट सोबत असणारे कार्यकर्ते यांचा खर्च मग काय सहा महिने ते एक वर्षात शेती घर विकलेले मी कार्यकर्ते बघितले आहेत. आत्ता कुठ आहे नेता तुमचा ? प्रश्न मनाला करा उत्तर निश्चित मिळेल? 

                  आजच पक्का निर्धार करा निवडणूक आली आहे प्रत्येक जण तुम्हाला आपल समजायला लागलंय. पण कोणत्याही भुलभुलयाला बळी पडू नका जर कोणी म्हणत असेल तुमच सामाजिक कार्य चांगल आहे तुम्ही आमच्याकडे या. तर तुम्ही त्यांना विचारा की तुम्ही आमच्यासाठी काय करणारं ? पद नको ? पदातून नोटा पडत नाहीत ? आमच्या हाताला काम द्या एकादा सक्षम व जगण्याचा पकका रोजगार धया. एकादा उधोग उभा करून आम्हाला चार पैसे मिळविण्याचे साधन तयार करून द्या ? मग बघा जो तुम्हाला कार्यकर्ता म्हणतो किंवा आमच्या पक्षात सेवाभावी संस्था युनियन मध्ये या म्हणणारा म्हणील मी तुम्हाला फोन करून कळवतो त्याचा फोन तुमहाला भविष्यात येणार नाही. 

        ‌. कार्यकर्ता सक्षम असेल तरच तुमचा नेता पुढारी संघटना अध्यक्ष व इतर कोणीही असो तो सक्षम होणार आहे नाही तर जो कार्यकर्त्यांना सक्षम करू शकत नाही त्याने कार्यकर्त्यांना खोट आश्वासन देवू नये कारण स्वता फाटका असणारा. वेळोवेळी दलबदलू असणारा कार्यकर्त्यांचे भले करू शकत नाही सवताचे चप्पल फाटक असणारा दुस-याला काय नवीन चप्पल घेवून देणारं. विचार करा ? एखाद्याचा कार्यकर्ता ताटाखालचे मांजर होण्यापेक्षा कष्ट करून जगा मानाने जगणार तुम्ही तुम्हाला संविधानाने भरपूर हकक अधिकार दिले आहेत त्यांचा वापर करा कायदा सर्वांसाठी समान आहे त्याचा सुध्दा वापर करून बघा यश निश्चित मिळेल

          समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

याड. याड

 


याड. याड 

              आज आपण सर्वजण या परस्थिती मधून जातो आहोत. याड हा शब्द म्हणलं की आपल्या समोर एकादा मळलेली कपडे घातलेले. रस्त्यावर कचरा गोळा करणारा असाच आपणं लावतो. यामध्ये मानसिक.रुपाने कोणी वेळ परस्थिती यामुळे आपले मानसिक आरोग्य बिघडलेला व्यक्ती आपल्या डोळ्यासमोर येतो. यालाच आपण म्हणतो याड लागलंय त्याला पण अशी लोक कोणालाही काही म्हणत नाहीत. उलट आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना चालणारे जनजीवन आपले कुटुंब आपले सगेसोयरे शासन राजकारण अर्थकारण समाजकारण शैक्षणिक यांच्याशी काहीही देण घेण नसतं. कारणं ह्या लोकांना याड लागलंय

                आपल्या समाजात आपल्या आजूबाजूला अशा बर्याच व्यक्ती आहेत की त्यांना याड लागलंय कोणाला सत्तेचे याड. कोणाला आर्थिक माया गोळा करण्याचे याड. कोणाला चोरीमारी. लुट करण्याचे याड. कोणाला दुसर्यांना डबरयात घालण्याचे याड. कोणाला प्रेमाचं याड. कोणाला सर्वसामान्य माणसाला आर्थिक मानसिक त्रास देण्याचे याड. कोणाला आपलं कुटुंब आणि आपण यांचं याड. अशा विविध प्रकारांची याड लोकांना लागलं आहे. यांना घोड्यांचा चष्मा घातल्या सारखं समोरच बघायला आवडते आणि तो आपला जन्मसिद्ध हक्क होऊन बसला आहे

              समाजसेवक. माहिती अधिकार कार्यकर्ते. कामगार संघटना. शासकीय अधिकारी व कर्मचारी. शासकीय योजना. ग्रामपंचायत नगरपालिका महानगरपालिका रस्ते गटारे बागबगीचे. घरकुल योजना. बंद आंदोलन मोर्चा तक्रार अर्ज मागणी अर्ज. निवेदन. समाजप्रबोधन करणारे. कलाकार. रेशन घोटाळा. असे विविध शासकीय घोटाळे. गॅस घोटाळा. महागाई. कुपोषण. भुकमारी. दारिद्रय. गरिबी. विविध सामाजिक संघटना. सणवार. जातीयवाद.गुलामगीरी. असे एक नाही अनेक प्रश्न आज आपल्या आ वासून उभे आहेत या प्रश्नावर आवाज उठविणारे जे कोणी लोक आहेत त्यांना आपले भले करण्याचे याड नाही शासकीय आॅफिस मध्ये चालणारा घोटाळा समाजापुढे यावा यासाठी आटोकाट प्रयत्न करणारे माहिती अधिकार कार्यकर्ते हे आपल्या हितासाठी नाही समाजाच्या हितासाठी स्वता मरतात. जीवनयातना सहन करतात आपल्या कुटुंबाचा विचार न करता समाजाच्या हितासाठी उपोषण करणारे. रस्त्यावर आंदोलन मोर्चा काढणारे. वेळोवेळी शासनाच्या चुका ध्यानात आणून देण्यासाठी निवेदन दाखल करणारे मागणी करणारे आपल्या गावात तालुका जिल्हा राज्य देश यामध्ये चालणारे सर्व शासकीय निमशासकीय कार्यालये यामधील काम पाहण्यासाठी मागणी करणारे. असे एक नाही अनेक प्रश्न घेऊन शासनाचा. राजकारणी लोकाचा. सावकर. गुंड. यांचा विरोध घेतला त्यांना जीवंत जाळण्यात आले. काहीजणांना गोळ्या घालण्यात आल्या. काही जण गायब झाले आजतागायत त्यांचा पत्ता लागला नाही. हे सर्व जणांना काय याड लागलंय का ? 

            वार्ताहर. पत्रकार. लेखक. यांच जीवन आज अतिशय कष्टमय झाले आहे. आपल्या व आपल्या कुटुंबाची काळजी न करता हे सर्व कानाकोपऱ्यात घडणारया चांगल्या वाईट घटना समाजाच्या पुढं आणतात. त्यावेळी यांना धमकी जीवे मारण्याची. अडवून दम देणे. असा प्रकार आपण बघतो वाचतो लेखक समाजावर राजकीय शासकीय निमशासकीय सरकार. यांच्यावर लिखाण करतात यांना सुध्दा मोठा त्रास सहन करावा लागतो  

                 समाजाला चांगल्या वाईट गोष्टी कळण्यासाठी रात्र दिवस लिखाण करणारे लोक यांना खरोखरच याड लागलंय का अस मला वाटायला लागलंय कारण लोक आणि आपण एखादा लेख आला की वाचतो आणि विसरून जातो. त्यातील चांगलं काही घेत नाही म्हणजे गाढवापूढ गिता वाचली असा प्रकार आहे.

             समाजावर बदल होण गरजेच आहे यासाठी आपण समाजापुढे चांगल्या वाईट गोष्टी याव्यात समाजाच्या हितासाठी निस्वार्थी पणे झटणारे समाजसेवक यांना याड लागलंय. असंच राहीले तर समाजातील विचारवंत लोक संपणार आणि आपण गुलामच राहणार. कारण आपल्याला चांगल पचत नाही आणि चांगलं रूचत नाही 

                समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९ 

सर्व प्रकारच्या शासकीय पत्र व्यवहार संबंधित माहितीसाठी संपर्क साधा

रेशन संबधी अडचणी असल्यास संपर्क साधा

गोदाम तपासणी पडताळणी यासाठी आम्ही केलेला अर्ज कचरयाचया टोपलीत गेला काय. म्हणूनच म्हणतो की आम्हाला याड लागलंय

सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा

  सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा            अनुसूचित जाती जमाती. इतर मागासवर्गीय जाती जमाती. भटक्या विमुक्त...

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या