Showing posts with label कुटुंब. Show all posts
Showing posts with label कुटुंब. Show all posts

वडिलोपार्जित

 

#* वडिलोपार्जित #*

               माणूस समाजप्रिय प्राणी आहे एकत्र कुटुंब पद्धती एकत्र समाज पध्दती ही आपली वैशिष्ट्य आहे. सण सुध. मंगलकार्य. दुःखाचे प्रसंग. लग्न विधी व इतर सर्व होणारें विधी समाजाच्या धर्माच्या नियमानुसार करणे हे आपले कर्तव्य माणतो. आपल्याला आपल्या वडिलांकडून घर जमीन. नोकरी स्थावर मालमत्ता. व अन्य आर्थिक मालमत्ता मिळते त्या संपत्तीला वडिलोपार्जित संपत्ती म्हणलं जातं 

                    कुटुंबात कुटुंब प्रमुख म्हणून आपले वडिल सर्व पालनपोषणाची जबाबदारी पार पाडत असतात. आपल्यासाठी आणि आपल्या मुलांसाठी आपल्या आशा आकांक्षा यांचा आपल्या दैनंदिन गरजा. आपले राहणीमान यांचा गळाघोटावा लागतो आणि आपल्या मुलांना चांगलें जीवन मिळावं यासाठी आपले वडील कायम प्रयत्नशील असतात समजा आपले वडील कोणतेही सार्थ अवैध काम करत असतील तर आपल्या मुलांनी तेच काम करावे असे कोणालाही वाटत नाही 

            गतकाळात आपल्या पालकांची परस्थिती बिकट होती. समाजात विविध व्यवसाय बलुतेदार पध्दतीने केले जात होते. म्हणजे गावातील लोहार. सुतार. मोची. कुंभार. मुस्लिम अशा विविध अल्पसंख्याक जातींना आपले वडिलोपार्जित व्यवसाय करावे लागत होते. आज आपल्या देशात राज्यात जिल्ह्यात तालुक्यात गावात शिक्षणाचा प्रसार झाला आजची पिढी शिक्षण घेवून साक्षर झाली आणि आपले वडिलोपार्जित व्यवसाय करण्याची त्यांना खंत वाटू लागली. आणि वडिलोपार्जित व्यवसाय लुप्त झाले.  

        आपल्या भारतात पहिल्यांदाच राजकारण ग्रामपंचायत माध्यमातून अंमलात आले आणि आपल्या संविधानाने मतदानाचा अधिकार प्रदान केला त्यानुसार आपला व आपले हित जपणारा आपला हक्काचा माणूस निवडण्याचा अधिकार देण्यात आला आणि त्यातूनच आपल्यात इंग्रज काळातील पाटील कुलकर्णी यांना इंग्रजांनी शेतसारा व विविध कर वसूल करण्यासाठी नेमले होते म्हणजे पाटील हे नाव नसुन ती एक पदवी होती हे आपल्या ध्यानात आले. आणि एकवेळ आपल्या क्रांतिकारक. स्वातंत्र्य सैनिक. आंदोलन. मोर्चे. उठाव चळवळ या माध्यमातून बरेच संघर्ष केला आणि एक वेळ इंग्रज आपला देश सोडून गेले. पण त्यांनी दिलेल्या पदवयाचे भांडवल करून पाटील. कुलकर्णी. यांनी आपला पवित्रा सोडला नाही. आणि आपल्या देशात गावात तालुका जिल्हा यामध्ये होणारी निवडणूक यामध्ये भाग घेण्यास सुरुवात केली. कारणं यांना जनतेवर राज्य करणे. जनतेला भुरळ पाडणे. बोलण्याचे कौशल्य. पैसा. माणूस बळ. जमिनींचे हस्तांतरण. अशा माध्यमातून राज्य करण्याचा धागा सापडला होता. आणि मग

              राजकारण सुरू झाले. यामध्ये अनुसूचित जाती जमाती व भटक्या विमुक्त जाती व इतर मागासवर्गीय जमाती यांना कधीच संधी मिळाली नाही आणि यांनी मिळून दिली नाही कारणं जनता फक्त मतदानाची बॅंक म्हणून यांनी वापर केला. समाजात फूट पाडणे. जातीयवाद घडविणे. गरिब असेलतर आणखी गरिब कसा होईल तिकडे प्रामुख्याने लक्ष दिले. आणि अशा विविध माध्यमातून यांनी राजकारणात प्रवेश केला. आणि तेथूनच वडिलोपार्जित या विषयाला सुरुवात झाली. वडील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत नगरपालिका महानगरपालिका सदस्य नेता पुढारी आमदार खासदार मंत्री यांच्यातलेच होण्यास सुरुवात झाली. आणि यांचा जयजयकार करणारे. प्रचार करणारे कार्यक्रमात खुर्च्या उचलणारे. पोस्टर डिजिटल लावण्यास आपली मुल. कारणं काय मटन आणि दारु यांमुळेच आपणं कधी पुढ गेलो नाही. आणि आज जो सुरवातीला राजकारण मध्ये गेला त्यांनंतर त्याचा मुलगा. मुलगी सून. सासू. पावणे. यांनाच निवडणूक लढण्याची संधी दिली जाते म्हणजे फक्त नाव बदलला आणि राजकारणी तोच आहे. जनतेला त्रास तोच. जनतेची लूट तीच. दहशतवाद. गुंडगिरी. अपहरण खुन. बलात्कार यांचे वाढते प्रमाण याचे कारण आहे ते म्हणजे वडिलोपार्जित पध्दतीने आलेली राजकारणातील चोर

              शुध्द बीजा पोटी फळें रसाळ गोमटी. अशी आपल्या मराठी भाषेत म्हनं आहे. पण राजकारणात असणारे सर्वजण काही चोर नसतात त्यातील काहीजण समाजसेवा ही ईश्वर सेवा मानणारे काही भारतीय नागरिक आहेत त्यांनी समाजाचे भल करण्यासाठी आपले पूर्ण जीवनाची होळी केली आहे. पण राजकारणात फक्त पैसा सत्ता संपत्ती मिळविण्याच्या उद्देशाने येणारे. यांना जनता मेली काय आणि जगली काय काहीच फरक पडत नाही. हजारों एककर जमीन. जागोजागी साखर कारखाने. बॅंक पतसंस्था. पेट्रोल पंप. शैक्षणिक संस्था अशा नोटा छापण्याचे उधोग निर्माण केले जातात मग काय त्यांची मुल याच पाऊलावर चालतात कारणं हे सर्व वडिलोपार्जित त्यांना मिळालेल असतं. 

   ‌. अनुसूचित जाती जमाती भटक्या विमुक्त जाती व जमाती इतर मागासवर्ग प्रवर्ग यातील कोणी राजकारणात दिसतं नाही आणि आलातर त्याला आपणं आपला संबंधित आहे म्हणून निवडून देत नाही. कारणं राजकारणी लोकांना या खालच्या जातीतील कोणी राजकारणात चालत नाही. आणि आपणांस पाटील कुलकर्णी यांच्या शिवाय आपल चालण नाही मला कळत नाही कशासाठी पाटील कुलकर्णी पाहिजे काय तुमच्या उरावर नाचायला पाहिजे. आजच निर्णय करा आपल्या समाजांचा प्रतिनिधी ग्रामपंचायत नगरपालिका महानगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषद नेता पुढारी आमदार खासदार मंत्री का नको ? म्हणजे ज्यांनी राजकारणात प्रवेश केला आहे त्याचीच मुल पुन्हा राजकारणात येणार आणि तुमच्यावर राज्य करतात. हे सर्व होत आपल्या मनांत आपण निवडून दिलेल्या लोकांबद्दल आदर नसून भीती असते. बोलण्याचे. विचारण्याचे धाडस नाही. आपल कोणतंही काम होत नाही त्याचा पाठपुरावा होतं नाही. आपल काम एकच आहे ते म्हणजे सर्व गप्प गुमान सहन करणे हेच आपले काम आहे

      आज वडिलोपार्जित चालत आलेले राजकारण संपविणे गरजेचे आहे. सर्व गोरगरीब जनता सर्वसामान्य लोक सर्व जाती जमाती यांनी आज सर्व शासकीय निमशासकीय कार्यालये राजकारण प्रशासन शासन यांच्या कीललया आपल्या हातात घ्या जस मतदान करताय तस मत मांडायला शिका. आपल्या हक्क व अधिकार यासाठी मैदानात येवून भांडायला शिका. 

           समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार जाहिरात प्रसिद्ध वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

गोरगरीब कुटुंबातील मुलांना मिळणार हक्काचे शिक्षण आणि शिष्यवृत्ती

 


गोरगरीब कुटुंबातील मुलांना मिळणार हक्काचे शिक्षण आणि शिष्यवृत्ती 

      समाजकल्याण विभाग यांचेकडून गरिब परस्थिती शिक्षण घेणारे मुलं मुली यांना सगळे शिका "शिक्षण हा आमचा अधिकार आहे. " असे म्हणणारे विद्यार्थी यांचेसाठी प्रत्त्येक जिल्ह्यात समाजकल्याण विभाग यांचेकडून शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येतात 

                  "शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा " हे सर्व शिक्षणाशिवाय शक्य नाही आत्ता आणि आजच आपण व आपले पालक समाजकल्याण विभागाला भेट द्या आणि योजना मिळविण्यासाठी कागदोपत्री पूर्ततेसह आपला हक्क मिळवा

(१) माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती

समाजकल्याण विभागाकडून माध्यमिक शाळेतील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते शिक्षण घेताना येणाऱ्या अडचणी ध्यानात घेवून शासनाने अशी योजना चालू केली आहे

योजना वैशिष्ट्ये/ निकष

* या योजनेसाठी माध्यमिक विद्यालयातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा प्रस्ताव संबंधित विधयालयाकडून पाठविला जातो

* अनुसूचित जातीच्या इयत्ता पाचवी ते सातवी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ५००/रुपये व आठवी ते दहावी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना १०००/ रूपये वार्षिक शिष्यवृत्ती मिळते

* विमुक्त जाती भटक्या जमाती. अनुसूचित जमातीच्या इयत्ता पाचवी ते सातवी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना २००/रुपये व आठवी ते दहावी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ४००/ रूपये वार्षिक शिष्यवृत्ती मिळते

* दुर्बल घटकात मोडणारा विद्यार्थ्यांना चांगल्या शिक्षण सुविधा मिळवण्यासाठी या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ होतो

    आत्ता या शिष्यवृत्ती मध्ये वाढ करण्यात आली आहे

(२) सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना

        समाजकल्याण विभागाकडून शाळेतील मुलींची गळती रोखण्यासाठी ही शिष्यवृत्ती योजना राबविण्यात आली आहे मागासवर्गीय समाजातील मुलीचे शिक्षण पूर्ण होऊन त्यांच्या विकास व्हावा हा या योजनेचा उद्देश आहे

    योजना वैशिष्ट्ये / निकष

* या योजनेतून विमुक्त जाती / भटक्या जमाती / अनुसूचित जमातीच्या / मुलीच्या गळतीचे प्रमाण कमी करणे व रोखण्यासाठी करण्यात आला आहे

* इयत्ता पाचवी ते सातवी शिक्षण घेणाऱ्या मुलींना. दरमहा. ६०/ रूपये शिष्यवृत्ती मिळते तर आठवी ते दहावी शिक्षण घेणाऱ्या मुलींना. दरमहा १००/ रूपये शिष्यवृत्ती मिळते शैक्षणिक वर्षात दहा महिने ही शिष्यवृत्ती योजना दिली जाते

* संबंधित विद्यालयातून अशा मुलींचे प्रस्ताव सरकारकडे पाठवला जातो

* शैक्षणिक खर्चाच्या अडचणी सोडविण्यासाठी मुलींना शिष्यवृत्ती योजनेचा फायदा होतो

* या योजनेमुळे ग्रामीण भागात मुलींची शाळेत १००/टक्के उपस्थिती राहणे बंधनकारक करण्यात आले आहे

(३) डॉ बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह

        समाजकल्याण विभागाकडून अनुसूचित जाती जमाती व नवबौद्ध मुला मुलीकरिता अशा प्रकारचे शासकीय वसतिगृह चालविले जाते यामध्ये मिळत असलेल्या सुख सोयी सोयीसुविधा. मागासवर्गीय समाजातील मुला मुलींना शिक्षण पूर्ण करण्यास मदत मिळते

योजना वैशिष्ट्ये/ निकष

* आर्थिक परिस्थिती मुळे शिक्षण पूर्ण करण्यासाठी अडचणीत असलेलें मागासवर्गीय विद्यार्थ्यांना अशा वसतिगृहात राहून शिक्षण पूर्ण करता येते

* अनुसूचित जाती जमाती व नवबौद्ध मुला मुली करिता प्रत्त्येक तालुक्यात एक अशी शासकीय निवासी शाळा असते 

* निवासी शाळेत इयत्ता पाचवी ते दहावी अनुसूचित जाती जमाती व नवबौद्ध मुला मुली करीता प्रवेश मिळतो

* निवासी शाळेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना. भोजन. निवास. व इतर शैक्षणिक सुविधा मोफत उपलब्ध करून दिल्या जातात

*मागासवर्गीय समाजात शिक्षण पूर्ण करण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांच्या या या योजनेमुळे सोय होते शिक्षण पूर्ण करण्यासाठी व विकास साधण्यासाठी मदत मिळते

     सदर योजनेत आत्ता बदल करण्यात आला आहे

(४) मुला. मुलींसाठी शासकीय वसतिगृहे

      मागासवर्गीय मुला मुलींची व आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी व मुलींची शिक्षणाची सोय व्हावी व उच्च शिक्षण घेण्यास मदत होऊन त्यांचा विकास व्हावा यासाठी अशी वसतिगृहे समाजकल्याण विभागाकडून चालवली जातात

योजना वैशिष्ट्ये/निकष

*शासकीय वसतिगृहात मुलांना. निवास. भोजन. अंथरुण. पांघरुण. मोफत दिले जाते 

* शालेय विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी दोन गणवेश. पाठ्यपुस्तके. वह्या. स्टेशनरी. यांचा मोफत पुरवठा केला जातो

* वैयक्तिक व अभियांत्रिकी. विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमानुसार. सटेथोसकोप. अॅप्रन. बाॅयलर. सूट. कलानिकेनचया मुलांसाठी. रंग. कलर बोर्ड. ब्रश. कॅनव्हास. मिळते

* वसतिगृहातील विद्यार्थ्यांना दैनंदिन खर्चासाठी मासिक निर्वाह भत्ता मिळतो

* विभागीय पातळीवर दरमहा २००/रूपये. जिल्हा पातळीवर दरमहा ७५/ रूपये व तालुका पातळीवर दरमहा ५०/ रूपये विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता दिला जातो

* अशा वसतिगृहात मध्ये विद्यालयीन व महाविद्यालयीन. शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी गुणवत्तेनुसार प्रवेश दिला जातो

* विद्यार्थी महाराष्ट्र रहिवासी असावा. प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थी पालकांचे वार्षिक उत्पन्न १ लाख रुपये चया आत असावे*इयत्ता आठवी व त्यापुढे महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो

* अशा वसतिगृहात प्रवेश मिळविण्यासाठी अर्ज करण्याची मुदत शालेय विद्यार्थी साठी १५/ मे पूर्वी तर महाविद्यालयीन विद्यार्थी साठी ३०/जून किंवा निकाल लागल्यानंतर १५ दिवसांपर्यंत असतो

(५) विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता व विद्यावेतन

समाजकल्याण विभागाकडून व्यवसायिक शिक्षण घेणाऱ्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांसाठी निर्वाह भत्ता व विद्यावेतन दिले जाते शैक्षणिक व दैनंदिन गरजा भागवतांना या योजनेतून मदत होते

  योजना वैशिष्ट्ये/ निकष

* वैयक्तिक. अभियांत्रिकी. शेती. असे व्यवसायिक शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जाती जमाती मुलांच्या साठी केंद्र सरकारकडून शिष्यवृत्ती मिळते

*या योजनेअंतर्गत वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना २३५/ ते ७४०/ निर्वाह भत्ता मिळतो

* व्यवसायिक शिक्षण घेताना येणारा खर्च फक्त शिष्यवृत्ती वर भागविणे शक्य नसलेमुळे त्यांना निर्वाह भत्ता मिळतो* महाविद्यालयाच्या वसतिगृहात. शासकीय वसतिगृहात. व इतर वसतिगृहात राहणाऱ्या अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व्यतिरिक्त या योजनेतून निर्वाह भत्ता दिला जातो

* बी एड. डी. एड. असे दोन वर्ष किंवा त्यापेक्षा कमी कालावधिचे व्यवसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दरमहा ५००/ रुपये विद्यावेतन दिले जाते हे विद्यावेतन शैक्षणिक वर्षात दहा महिन्यांसाठी दिलें जाते

* व्यवसायिक शिक्षण घेणाऱ्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता व विद्यावेतनचा प्रस्ताव संबंधित महाविद्यालय / संस्था. कडून सरकारकडे पाठवला जातो

(६) भारत सरकारची शिष्यवृत्ती

केंद्र सरकारकडून मागासवर्गीय विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन व उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळते यामुळे विद्यार्थ्यांना आपलीं शैक्षणिक गरज भागविण्यासाठी मदत होते

योजना वैशिष्ट्ये/ निकष

* मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत व्हावी व त्यांचे गळती प्रमाण रोखण्यासाठी केंद्र सरकार कडून शिष्यवृत्ती दिली जाते

*अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती शालांत परीक्षेनंतर मिळते

*पालकांचे वार्षिक उत्पन्न एक लाखाच्या आत असावे

*दरमहा. १४०/ रूपये ते ३३०/ रूपये विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता मिळतो

*ही शिष्यवृत्ती विद्यार्थ्यास निर्वाह भत्ता. शिक्षण शुल्क. परीक्षा शुल्क. व इतर बाबींवरील खर्च शुल्क या स्वरुपात मिळते

*ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण करून स्वताच्या विकास करण्यासाठी या योजनेची मदत होते

(७) छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती

समाजकल्याण विभागाकडून इयत्ता दहावी व बारावी विद्यार्थी साठी ही योजना राबविण्यात येते

*अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक. विकास. गुणवत्ता. वाढावी यासाठी शिष्यवृत्ती दिली जाते

*इयत्ता अकरावी मध्ये प्रवेश घेणाऱ्या अनुसूचित जातीच्या मुला मुलींना ही शिष्यवृत्ती मिळते

*इयत्ता बारावी मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षाच्या दहा महिन्यांच्या कालावधीत दरमहा ३०० रुपये एकूण ३००० रूपये शिष्यवृत्ती मिळते

(८) पुस्तक पेढी योजना

समाजकल्याण विभागाकडून वैद्यकीय. तंत्रनिकेतन. कृषी. पशुवैद्यकीय. अभियांत्रिकी. व्यवसायाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पुस्तकांसाठी अनुदान मिळते

* वैद्यकीय. तंत्रनिकेतन. कृषी. पशुवैद्यकीय. अभियांत्रिकी. सीए. एम एम बीए. व विधी. अशा महाग पुस्तकांसाठी अनुदान मिळते

*अनुसूचित जमातीच्या व भारत सरकार शिष्यवृत्ती मिळत असलेल्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळतो

*पुस्तकाचा खर्च झेपत नाही म्हणून शिक्षण बंद करावे लागणार या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येतो

*पुस्तक पेढी योजनेतून अनुदान मिळविण्यासाठी संबंधित महाविद्यालय यांचेकडून सरकारकडे प्रस्ताव पाठविला जातो

(८) सफाई कामगार पालकांच्या मुलांसाठी मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती

अस्वच्छ व्यवसाय ( सफाई कामगार ) करणार्या पालकांची मुले शिक्षणापासून वंचित राहू नये त्यांचा विकास व्हावा यासाठी समाजकल्याण विभागाकडून मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती दिली जाते

* ही योजना सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी आहे

*योजनेच्या निकषांत बसणारा विद्यार्थी प्रस्ताव शिष्यवृत्ती साठी विधयालयाकडून पाठविलें जातात

* गणवेश. शैक्षणिक खर्च. भागवतांना अस्वच्छ व्यवसायात काम करणाऱ्या लोकांना मुलांना मदत मिळते

(९) मोटर वाहन चालक प्रशिक्षण

अनुसूचित जाती जमाती भटक्या विमुक्त जाती व नवबौद्ध युवकांना समाजकल्याण विभागाकडून मोटर चालविण्याचे प्रशिक्षण मोफत दिले जाते. स्वावलंबी होण्याच्या व सुरक्षिततेच्या दृष्टीने युवकांना अधिकृत संसथाचालकाकडून चालक वाहक प्रशिक्षण मिळते

*प्रशिक्षण घेणाऱ्या उमेदवारांची. वयोमर्यादा. शैक्षणिक. शारीरिक. जातीचा दाखला. ही अट आहे

*प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर. वाहन चालक परवाना. परिक्षा घेऊन.  

*अधिकृत वाहन चालविण्याचे. वाहकाचे प्रशिक्षण. मोफत मिळून संबंधित विभागाचा अधिकृत परवाना मिळतो

(१०) व्यवसायिक प्रशिक्षण

अनुसूचित जाती जमाती अल्पशिक्षित बेरोजगारांना. "मागेल त्याला व्यवसाय प्रशिक्षण " या उपक्रमातून मोफत व्यवसायांचे प्रशिक्षण मिळते व्यवसाय उभारणी तरूणांना या प्रशिक्षणाचा उपयोग होतो

योजना वैशिष्ट्ये निकष

* हि योजना फक्त अनुसूचित जातीतील अल्पशिक्षित बेरोजगारांना होणार आहे

* प्रशिक्षण घेण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांचे कमीत कमी शिक्षण इयत्ता चौथी पर्यंत असावे

* शैक्षणिक पात्रतेनुसार व्यवसायाचे प्रशिक्षण कमीत कमी एक आठवडा व जास्ती जास्त दोन महिने कालावधी पर्यंत मिळते

* औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत हे शिक्षण दिले जाते प्रशिक्षण घेणाऱ्या लाभार्थी तरुणास टुलकिट. व १००/ रुपये दरमहा वेतन दिले जाते

*अलपशिक्षणावर व्यवसाय करण्यासाठी या प्रशिक्षणाची मदत होते प्रशिक्षणानंतर तरुणांना स्वताच्या स्वयंरोजगार मिळवता येतो

(११) औधोगिक प्रशिक्षण संस्थेत विद्यार्थ्यांना विद्यावेतन

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विविध व्यवसायाचे शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना या योजनेतून विद्यावेतन मिळते त्यामुळे व्यवसायाचे तांत्रिक शिक्षण घेवून विविध क्षेत्रात काम करता येते

योजना वैशिष्ट्ये निकष

* संस्थेच्या वसतिगृहात राहणाऱ्या ज्या विद्यार्थ्यांना तंत्रशिक्षण विभागाकडून दरमहा ६०/ रुपये विद्यावेतन मिळते अशांना समाजकल्याण विभागाकडून दरमहा ४०/ रूपये विद्यावेतन मिळते

* तंत्रशिक्षण विभागाकडून ज्यांना विद्यावेतन देण्यात येत नाही अशा विद्यार्थ्यांना समाजकल्याण विभागाकडून. दरमहा १००/ रुपये विद्यावेतन मिळते

* या योजनेच्या लाभासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न ६५;२९०/ रुपये पेक्षा जास्त नसावे

* अनुसूचित जमातीच्या व मान्यताप्राप्त औधौगिक प्रशिक्षण संस्थेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळतो

*गरिब कुटुंबातील विद्यार्थ्यांना दरमहा शैक्षणिक खर्चाच्या गरजा भागविण्यासाठी यांचा उपयोग होतो

* योजनेच्या निकषांत बसणारा या विद्यार्थ्यांच्या प्रस्ताव सरकारकडे संबंधित औधोगिक प्रशिक्षण संस्थेकडून पाठविला जातो

(१२) कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना

दारिद्रय रेषेखालील. भूमिहीन शेतमजूर. अनुसूचित जाती जमाती नवबौद्ध कुटुंबासाठी हि योजना राबविण्यात येते भूमिहीन कुटुंबातील लोकांचे राहणीमान सुधारण्यासाठी त्यांचा विकास व्हावा हा योजनेचा उद्देश आहे

* या योजनेअंतर्गत लाभार्थींना चार एकर कोरडवाहू किंवा दोन एकर बागायती शेतजमीन मिळते

* जमीन खरेदीसाठी योजनेतून ५०/ टक्के अनुदान तर ५०/ टक्के बिनव्याजी कर्ज

*जमीन खरेदीसाठी घेतलेलं ५०/टक्के कर्ज परत फेड करण्याची मुदत १० वर्ष असते. कर्ज मंजूर झाल्यानंतर परतफेड दोन वर्षांनंतर सूरू केल्यास चालते

* अनुसूचित जाती नवबौद्ध घटकातील लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळतो

* लाभ देताना दारिद्र्य रेषेखालील. भूमिहीन शेतमजूर. विधवा. परित्यक्ता अर्जदारांना प्राधान्य दिले जाते

*लाभ घेणाऱ्या लाभार्थी साठी वय वर्षे १८/६०/ या दरम्यान असावे लागते

*या योजनेमुळे दुर्बल घटकातील शेतमजूर यांना हक्काचे रोजीरोटी साधनं मिळू शकते

(१२) पाॅवर टिलर योजना

अनुसूचित जातीतील अल्पभूधारक शेतकऱ्यांना या योजनेतून पाॅवर टिलर साठी. १००/टक्के अनुदान मिळते मजुरांच्या वाढत्या दरामुळे पाॅवर टिलरचया साह्याने शेती सहजपणे कसता येते

योजनेची वैशिष्ट्ये निकष

*इच्छुक लाभार्थी महाराष्ट्र मधील असावा अनुसूचित जाती नवबौद्ध घटकातील असावा

* अर्जदार अल्पभूधारक / कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेचा लाभार्थी असावा

*अर्जदाराचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न ४०००० रूपयांपेक्षा कमी असावे

*योजनेचा लाभ मिळविण्यासाठी अर्जदाराने विहित नमुन्यातील समाजकल्याण विभागाकडे अर्ज करावा

*अर्जदाराचा अधिकृत अधिकार्यांकडील जातींचा दाखला जोडणे आवश्यक आहे

(१२) गटाई कामगारांना पत्र्याचे सटाॅल पुरविणे

गटाई काम करणाऱ्या अनुसूचित जाती जमाती लोकांना या योजनेतून स्टाॅल मिळतात त्यामुळे हा व्यवसाय सुरक्षित करणे सोपे जाते

योजना वैशिष्ट्ये निकष

*अर्जदाराने विहित नमुन्यातील अर्ज समाजकल्याण विभागाकडे करावा लागतो

*योजनेचा लाभ घेण्यासाठी वय १८ पुर्ण असावे

* ग्रामीण भागातील लाभार्थी उत्पन्न वार्षिक. ४०००० रूपये चया आत असावे व शहरी भागासाठी ५० हजार चे आत असावे

* अर्जदार मागत असलेलें स्टाॅल त्यांच्या स्वताच्या जागेत असावे

* चर्मकार समाजातील काही दुर्बल घटक रस्त्यावर उघड्यावर रस्त्याच्या कडेला गटाई काम करतात त्यांना सुरक्षितपणे हे काम करण्यासाठी स्टाॅलचा उपयोग होतो

* लोखंडी पत्र्याच्या स्टाॅलबरोबर लाभार्थ्यास चामडी साहित्य घेण्यासाठी ५००/ रुपये अनुदान मिळते

*या समाजाच्या लोकांना या योजनेमुळे उपजीविकेचे साधन उत्पन्नाचे साधन मिळते

* अर्जदाराने अधिकृत अधिकारयाकडील जातीचा दाखला जोडणे आवश्यक आहे

(१३) आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजना

समाजातील भेदभाव संपावा समतेचे वातावरण निर्माण व्हावे यासाठी दोन वेगवेगळ्या जातीमधील विवाह केलेल्या व्यक्तिंना या योजनेतून अनुदान मिळते

योजना वैशिष्ट्ये निकष

*अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती व विमुक्त जाती / भटक्या जाती / यापैकी एक व्यक्ती सवर्ण हिंदू. जैन. लिंगायत. शीख यापैकी दुसरी व्यक्ती अशांनी विवाह केल्यास त्यांना अनुदान मिळते

* आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांना एकत्रित. ५०'००० रूपये अनुदान मिळते

*आंतरजातीय विवाहानंतर समाजाकडून कुचंबणा होऊ नये म्हणून योजनेतून प्रबोधन केले जाते

*आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांना प्रोत्साहन रूपात मिळालेले अनुदान संसार उभारण्यासाठी उपयोगी पडते

* या योजनेमुळे आंतरजातीय विवाहाकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलण्यासाठी मदत होईल

(१४) कन्यादान योजना

सामुदायिक विवाह सोहळ्यात सहभागी होवून विवाह करणार्या मागासवर्गीय जोडप्यांना या योजनेतून अनुदान मिळते नवीन संसार उभारताना या जोडप्यांना अनुदानाची मदत मिळते

योजना वैशिष्ट्ये निकष

*अनुसूचित जाती जमाती भटक्या विमुक्त जाती व नवबौद्ध ( धनगर वंजारी ) विशेष मागास प्रवर्गातील जोडप्यांना या योजनेतून अनुदान मिळते

* सामुदायिक विवाह सोहळ्यात विवाहबद्ध झालेल्या वरील जातीच्या जोडप्यांना. १० :००० रूपये अर्थ सहाय्य. वधूचे आई वडील किंवा पालकांच्या नावे धनाअदेश विवाहाच्या दिवशी देण्यात येते

* सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करणाऱ्या संस्थांना प्रत्त्येक जोडप्यांमागे. २:००० रूपये प्रोत्साहन अनुदान मिळते

* गरीब कुटुंबांचा सामुदायिक विवाह सोहळ्यामुळे विवाहाचा अतिरिक्त खर्च वाचतो

*सामुदायिक विवाह सोहळ्यामुळे साधेपणा मुळे विधिवत विवाह करण्यासाठी समाजात प्रबोधन होण्यास मदत होते

(१५) अत्याचारित कुटुंबास अर्थ सहाय्य योजना

अत्याचाराचे बळी ठरणारया अनुसूचित जाती जमातीच्या कुटुंबातील सदस्यांना समाजकल्याण विभागाकडून अर्थ सहाय्य

योजना वैशिष्ट्ये निकष

* जातीच्या कारणावरून अतयाचारास बळी पडलेल्या अनुसूचित जमातीच्या कुटुंबातील सदस्यांचे पुनर्वसन करण्यासाठी या योजनेतून अर्थ सहाय्य मिळते

* अनुसूचित जाती जमाती कुटुंबावर / व्यक्तिवर अत्याचार घडल्यास व या गुन्ह्याची नोंद नागरि हक्क संरक्षण अधिनियम १९५५ खाली अनुसूचित जाती जमाती ( अत्याचार प्रतिबंधक ) अधिनियम १९८९ खाली झालेली असल्यास या योजनेतून अनुदान मिळते

* योजनेतून लाभासाठी जातीचा दाखला व काही गुन्ह्यात वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करावे लागते

* अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला तर कमीत कमी २५:००० रूपये ते जास्तीत जास्त २ लाख रूपये पर्यंत अर्थ सहाय्य मिळते

*अत्याचारास बळी पडलेल्या कुटुंबांचे /सदस्यांचे या योजनेमुळे पुनर्वसन होण्यास मदत होते

(१६) वृध्द कलावंत पेन्शन योजना

राज्य सरकारच्या या योजनेतून वृध्द कलावंतांसाठी वृध्दापकाळात पेन्शन मिळते. आणि उतरत्या वयात त्यांना उपजीविका करणेस मदत होते

योजना वैशिष्ट्ये निकष

*इच्छुक लाभार्थी वृध्द कलावंत यांनी विहीत नमुन्यातील अर्ज समाजकल्याण विभागाकडे करावा

*तमाशा. नाटक. लोककला. चित्रपट. यामध्ये काम केलेल्या व वयाची ६० वर्ष पूर्ण असलेल्या कलावंतांना या योजनेचा लाभ मिळतो

*इच्छुक वृध्द कलावंत म्हणून काम केल्याची माहिती पुरावे ( फोटो. कात्रणे. प्रमाणपत्र. इत्यादी ) जोडावी

*रेशनकार्ड. गाव कामगार उत्पन्न दाखला. अत्यल्प उत्पन्न असणाऱ्या कलावंतांना या योजनेचा लाभ मिळतो

*पेन्शन योजनेमुळे वृध्द कलावंत लोकांना सुरक्षितता मिळते

(१७) पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण योजना

अनुसूचित जाती जमाती भटक्या विमुक्त जाती व नवबौद्ध घटकातील युवकांना या योजनेतून पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण मिळते यामुळे समाजातील युवकांना सैन्य व पोलीस भरतील मदत होते

योजना वैशिष्ट्ये निकष

*उमेदवार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. अनुसूचित जाती जमाती भटक्या विमुक्त जाती व नवबौद्ध असावा. प्रशिक्षणासाठी वय. १८ ते २५ दरम्यान असावा. उमेदवारांची छाती. उंची. इत्यादी सैन्य व पोलीस भरतीसाठी आवश्यक असलेल्या नियमानुसार असावी. उमेदवार. इयत्ता बारावी उत्तीर्ण व शारीरिक दृष्ट्या निरोगी असावा. पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण तीन महिन्यांचा कालावधी असतो. तीन महिने पूर्ण कालावधीत उमेदवारांची राहण्याची सोय प्रशिक्षण संस्थेत केली जाते. पोलिस प्रशिक्षणात. धावने. उंच उडी. लांब उडी. गोळाफेक. पुल अप्स. आॅपटिकलस रससी खेच. चढणे उतरणे. हे प्रशिक्षण देण्यात येते. अशा प्रशिक्षणामुळे ग्रामीण भागातील युवकांना सैन्य व पोलीस भरतीत चांगली संधी मिळू शकते.  

     आत्ता आपण वरील मॅसेज पूर्ण पणे वाचला असेल तर आपल्या ध्यानात एक गोष्ट आली असेल ती म्हणजे समाजकल्याण विभाग असो वा कोणताही विभाग त्यातील योजनांचा लाभ घेण्यासाठी एक अट कायमस्वरूपीअडसर म्हणून घातली जाते ती म्हणजे जातींचा दाखला हा सर्व खेळ आहे कारणं खरोखरच या योजनेस पात्र असणारा लाभार्थी आजच्या घडीला आपण कोणत्या जातीचे आहोत हे सिद्ध करु शकत नाही कारणं त्यांच्याकडे ६० वर्षाचा पूरावा नाही. 

          खरोखरच सर्वसामान्य माणसाची मुलं मुली शिकावी असे वाटत असेल तर जातीच्या दाखल्याची अट रद्द करा नाहीतर योजना बंद करा

      समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार जाहिरात प्रसिद्ध वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

मनाला घोर लागलाय

 


मनाला घोर लागलाय

          मनुष्य एकाकी राहण्यापेक्षा गटात समुहात राहणे पसंत करतो म्हणून / सामाजिक प्राणी /आहे असे म्हणले जाते या समूह प्रवृत्ती जोडीनेच माणसांमध्ये आपले. खाजगीपणा जोपासण्याची प्रवृत्ती आढळते. माझं छंद माझ्या आवडी निवडी माझे राग लोभ वैयक्तिक असते.  म्हणजे मी समाजांचा घटक असतोच पण याशिवाय सुध्दा वेगळे खास माझे काही खाजगी जीवन असतेच.  अभ्यासाच्या सोयीसाठी सामाजिक किंवा सार्वजनिक विश्व आणि खाजगी विश्व यांचा आपण सुटा स्वतंत्र विचार करतो पण प्रत्यक्ष जीवनात या दोन्ही विश्वाचा एकामेकाशी संबंध येतोच.  पण विवाह पध्दत असो. किंवा विवाहानंतर पती पत्नी संबध वैयक्तिक नसून हे सामाजिक मूल्य मानदंड यांच्या चौकटीत हे खाजगी संबंध आकाराला येतात त्यातच. कुटुंब जात धर्म. भाषा आणि प्रादेशिक अस्मिता.  वर्ग.  भौगोलिक संदर्भ.  शिक्षण.  समाजकारण.  राजकारण.  वशिलेबाजी.   गटबाजी.  गुन्हेगारी.  टोळीयुद्ध गॅगवार.  खून मारामाऱ्या.  अपहरण.  खंडणी.  लुटमार.  श्रध्दा अंधश्रद्धा.  उच्च जाती.  कनिष्ठ जाती.   सदन घटक. दुर्बल घटक.    शिक्षित अशिक्षित.   अन्न समस्या.  रोजगार समस्या.  निवारा समस्या.  आरोग्य समस्या.  सामाजिक सुरक्षितता.   न्यायव्यवस्था.   झोपडपट्टी समस्या.  बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज.  चळवळी.  संपर्क माध्यम फुटिरता.  हुकूमशाही.  घराणेशाही.  राजकीय शिक्षण अभाव. जातीयवाद.   दहशतवाद.  भ्रष्टाचार.  महागाई.   बेरोजगारी.  अशी एक नाही अनेक प्रश्नांनी मनाला घोर लावला आहे आणि सर्वसामान्य जनता गळतीच्या मार्गावर आहे 

             आज सर्वात मोठा प्रश्न आहे तो म्हणजे बेरोजगारी महागाई शिक्षणाचा बोजवारा.  वाढती लोकसंख्या ध्यानात घेता सर्वांच्या हाताला काम मिळणे अवघड झाले आहे त्यामुळे उपासमारीची वेळ आली आहे.  सर्वात मोठा फटका बांधकाम कामगार. असंघटित क्षेत्रातील कामगार यांना झाला आहे.  शासनाची योजना मिळेना.  म्हणजे योजना हजार त्यासाठी नेमले दलाल एजंट दोन हजार लुटालूट अधिकार व कर्मचारी यांना हाताला धरून. म्हणजे कामगार कोमात एजंट दलाल कोमात असा प्रकार आहे यामुळे मनाला घोर लागलाय 

           त्यातच राहीली कसर महागाईनी भरून काढली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे. भाजी पाला फळं यापासून.  गहू ज्वारी बाजरी मका. अशी खाद्यान्न. विविध खाद्य तेल. कपडे. जागांचे भाव.  बांधकाम मटेरियल.  अशी विविध उत्पादने यांचें दर आज गगनाला भिडले आहेत.  गोरगरीब जनतेला जगणे अवघड झाले आहे.  गाडी जीवनावश्यक वस्तू झाली आहे पेट्रोल डिझेल यांचे दर विचार करायलाच लावतात रोज दर वाढत आहे.  घरगुती वापरासाठी वापरला जाणारा घरगुती गॅस सिलिंडरचा दर तर आठ दिवसाला वाढवतोय.  गरिबांचे थोडी अर्धा गुंठा जागा घेऊन घर बांधण्याचे स्वप्न स्वप्नच राहिले.  भाड्याने राहणारे घरभाडे परवडत नाही एक वेळ जेवतात आणि एक वेळ उपाशी राहतात कारणं बेरोजगारी यामुळे मिळेल ते काम करून सुध्दा दोन वेळच भागत नाही. महागाई भस्मासुर गोरगरीब जनतेला खाऊन टाकणारं यात सुखी कोण असेल तर. शासकीय नोकर.  राजकारणी लोक.  शिक्षण संस्था चे शिक्षक. कारणं यांना कायमचा पगार चालूच आहे.शासन यांना महागाई भत्ता देतय त्यांचं जमलय ?    रेशन वाला अन्न धान्य देत नाही.  आमच बी खातोय सगळ्या गावाचं बी खातोय.  शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी भ्रष्टाचाराच्या माध्यमातून बरीच माया गोळा केली आहे.  वयोवृद्ध.  नागरिक. अपंग. विधवा.  निराधार. यांच्या योजना पैसे चारलयाशिवाय मंजूर होत नाहीत  त्यातच राहील साहील रोजची गरज असणारा आपला अविभाज्य घटक म्हणजे  डॉ. यांची बेमाफी फी.  नुस्ता पैसा मिळविण्याचे धोरण. जीवंत माणसांचे वेगळ आहे हे मयत माणसांकडून सुध्दा पैसा वसूल करतात.  यांची आणि मेडिकल यांचे साटेलोटे औषधांच्या किमती मनाला येईल तेवढ्या आणि ज्या डॉ कडे उपचार घेतला आहे त्याचे औषध त्यांनी ठरवलेल्या मेडिकल मध्येच मिळणार. मग डॉ यांचा हिस्सा काढून मेडिकल वाल्यांची मिळकत हे सर्व आपल्या गरिबाकडून वसुली केली जाते   म्हणजे गोरगरीब जनतेला कोणी वाली नाही यामुळे मनाला घोर लागलाय

              शिक्षणाची गंगा घरोघरी सगळे शिकू.  सगळे साक्षर होऊ.  ही घोषणा आज कागदावरच राहिली कारणं. जिल्हा परिषद शाळा बंद पडल्या.  आणि विविध राजकारणी लोकांनी आप आपल्या शिक्षण संस्था काढल्या. त्यांना बेमाफी फी घेतली जाते उदा.  सांगायचे असेल तर आज कमीत कमी दोन वर्ष होत आली शिक्षण संस्था बंद आहेत पण आपल्या ध्यानात एक गोष्ट आली नाही जानेवारी फेब्रुवारी महिन्यात वर्षांची. शिक्षण संस्थांनी फी भरून घेतली आणि मार्च पासून शाळा कोरोना मुळे बंद करण्यात आल्या. म्हणजे पालकांनी विद्यार्थी यांची भरलेली फी गोळा करून शिक्षण संस्था बंद झाल्या. असे आपल्या महाराष्ट्रात किती शिक्षण संस्था असतील किती पैसा गोळा झाला असेल. काय अंदाज आहे का ? नाही. आत्ता सुध्दा शाळा चालू होणार पण सर्व वर्षांची फी भरून घेतल्यावर मार्च पासून शाळा बंद होणार नाहीत याची कोण जबाबदारी घेतय का ? पालकांच्या कष्टाचा व्याजाने काढून विद्यार्थी यांची फी भरली ती बुडणार नाही याची कोण ग्वाही देतय का ? यातच एक पळवाट काढली ती म्हणजे आॅनलाइन शिक्षण. मोबाईलवर. शाळा घेतात परिक्षा घेतात.  जी मुल शाळेत ११/५/ या वेळेत शाळेत शिक्षकापुढे असून सुद्धा शिकत नाहीत त्यांना मोबाईल शिक्षण कळणार का ? आई बाबा म्हणतंय पोरग मोबाईलवर तास घेतय शिकतय. पण त्या खुळ्या ना काय माहित हे कडव मोबाईलवर गेम खेळतय.  म्हणजे शिक्षणाचा बोजवारा उडाला हे शंभर टक्के खरे आहे का ? काही ठिकाणी मोबाईलला रेंज नाही. तर काही मुलांनी आॅनलाइन शिक्षण घेण्यासाठी मोबाईल मिळाला नाही घरची परिस्थिती नाही या कारणाने आत्महत्या केली हे सुद्धा आपण बघितल आहे. असच जर सगळ चाललं तर येथून पुढे निर्माण होणारी पिढी खुळी मनोरूग्ण निर्माण होणारं आज दोन वर्ष होत आली शाळेचा आणि मुलांचा संपर्क तुटला आहे आत्ता तीच मुल शाळेकडे वळतील काय ? मला नाही वाटत ? या सर्व प्रकारांचा मनाला घोर लागलाय

            स्पर्धा परीक्षा.  एम पी सी.  यासाठी मुलानी रांत्र दिवस अभ्यास केला. शासनाने आज २०१५ पासून आजपर्यंत मुलांना तारखा द्यायच्या आणि रद्द करायच्या असा लपंडाव लावला आहे.  एम पी सी स्पर्धा परीक्षा.  अभ्यास करणारी मुले सकाळी व्यायाम. करायला उठतात. आणि नंतर अभ्यासिका लावण्याची परस्थिती नसते त्यामुळे कामावर जाऊन घरच्या परिस्थितीला हातभार लावायचा आणि मग त्यातून आपल शिक्षण पुस्तक. या मुलांना खाण्यास सुध्दा त्याच प्रमाणे असतें. एवढ्या खडतर प्रवासाने या मुलांचे जीवन ग्रासलेले असते.  आत्ता एकवेळ एम पी सी परिक्षेची तारिख फायनल झाली. आणि मुलं पुन्हा व्यायाम अभ्यास याकडे वळली आजून सुध्दा भरवसा लागेना परिक्षा होईल की नाही याचा तरीही तयारी करतात ही मुल त्यातच आत्ता परीक्षा तारीख जाहीर झाली जागोजागी स्पर्धा परीक्षा यासाठी लागणारी पुस्तके याची दुकानें सजली. मग काय पुस्तकाचे दर मनाला येईल तसे. लुटायच चालू झालं. ?  आणि सर्वात मोठी लुट केली ती म्हणजे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र स्थापन केलेल्या सर्व अॅकेडमी. यांची वर्षांची फी ५०/६० हजार रुपये गोळा केले आणि आज दोन वर्ष अॅकेडमी बंद आहे म्हणजे यानी कोट्यवधी रुपये मिळवले आणि आज पुन्हा आपली दुकाने उघडली आहेत ती म्हणजे फी भरून घेण्यासाठी. आज पालकांनी जर समजा आपण फीचे पैसे भरले आणि स्पर्धा परीक्षा वर्ग जर बंद पडले तर आमचें पैसे माग द्यावे लागतील अशी अट घालून पैसे भरा. कारणं आपल्या जिल्ह्याचा विचार करू नका महाराष्ट्रात अशा अॅकेडमी किती असतील कोट्यवधी रुपये हे जर वर्षी आपल्या घशात घालत आहेत यातील काही स्पर्धा परीक्षा शाळा अॅकेडमी राजकारणी लोकांच्या सुध्दा आहेत. सावध व्हा सावध रहा   काही मुल एम पी सी स्पर्धा परीक्षा पास झाले २/३/ वर्ष नोकरी नाही त्यामुळे काही मुलांनी आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. याला आपणच जबाबदार आहोत. 

                      शासनाने एम पी सी स्पर्धा परीक्षा देण्यासाठी वयाची अट घातली आहे. जर समजा. याच वर्षी काही मुलाच वय संपतय त्या मुलानी रांत्र दिवस अभ्यास व्यायाम केला असेल तर त्याचे सर्व कष्ट पाण्यात गेले.वय जास्त असल्यामुळे लग्नाला कोण मुली देत नाही. म्हणजे आई वडील यांनी मुलांच्या नोकरीची वाट बघायची का लग्न करायच ? मोठ प्रश्न आहे    शासनाने या मुलांचा सुध्दा विचार करणे गरजेचे आहे  अशी सर्व मुल मानसिक दृष्ट्या कमकुवत झाली आहेत. मग अशा वातावरणामुळे ही मुले. गुन्हेगारी.  खंडणी. अपहरण. चोरी. लुटमार. अशा मार्गाला लागणार याला शासन जबाबदार आहे.  या एम पी सी स्पर्धा परीक्षा मधील सर्वात वाईट प्रकार आहे तो म्हणजे वशिलेबाजी. यामुळे खरोखरच अभ्यासू मुलं माग राहीली आणि ढ मुल आज विविध शासकीय ठिकाणी नोकरी करत आहेत वाईट आहे. 

            आज प्रत्येक मुलाच्या पालकांच्या मनाला घोर लागला आहे.  कोणाला मुलांच्या नोकरीचा. कोणाला अधिकारी व कर्मचारी यांच्या वागण्याचा. कोणाला आपणांस स्वातंत्र्य दिले आहे पण ते वापरण्याचा अधिकार नाही.  कोणाला हाताला काम नाही.  हातात पैसा नाही त्यामुळे उपासमारी यामुळे आत्महत्या करायची काय याचा   

            जगणं झालं अवघड मरण झालं स्वस्त 

           समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

कुटुंब आणि महिला

कुटुंब आणि महिला



               कुटुंब हा आपल्या खाजगी विश्वातील सर्वात प्राथमिक घटक असतो आपण कुटुंबात राहतो म्हणजे काय ? आपल्या कुटुंबात महिलांना कोणते स्थान असते ? आपली दिनचर्या कशी असावी कोणत्या नियमानुसार असावी ? याचा आपणच विचार करायला हवा का ? केवळ आहार. निद्रा. व आपल्या अन्य गरजा या चार भिंतींच्या आत करतो का ? आपण भावनिक व नात्याने आपल्या घरातल्या लोकांशी भावनिकदृष्ट्या जोडलेले असतो

याचाच अर्थ कमी अधिक प्रमाणात कुटुंबातील इतर मंडळींबरोबर सहजीवन असाच होतो बहुतेक सर्व भारतीय मनाने आपल्या कुटुंबियांशी पक्के जोडलेले असतात आपले कुटुंब आपले घराणे. घराण्याचा इतिहास. याबद्दल आपल्याला अभिमान असतो कुटुंबात आधार मिळतो असा बहुतेकांचा विश्वास असतो तसेच कौटुंबिक जीवनामुळे सुरक्षितता मिळते असाही अनेकांचा अनुभव असतो कौटुंबिक जबाबदाऱ्या. आपत्ती या गोष्टी कुटुंबात प्रत्येकाने आपापल्या परीने आल्या तरीही पालनपोषण. वृधदपकाळ सुरक्षितता. आजारपणात सेवा. यांसारखे फायदेही कुटुंबात आपल्या वाट्याला येतात



            आज कुटुंब रचनेप्रमाणे एकत्र कुटुंब. आणि विभक्त कुटुंब. असे प्रकार पहावयास मिळतात भारतात पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती बघायला मिळत होती त्यात प्रामुख्याने कुटुंबातील लोकांचे आचार विचार संस्कार शिक्षण हे घरातील वडीलधारी लोक देत असत. एखादा कार्यक्रम सुध्दा कुटुंबातील सर्व सदस्य याच्या विचारांवर अवलंबून होता आत्ता विभक्त कुटुंबांचे उधाण आले आहे त्यात प्रामुख्याने कुटुंबातील लोकांचे आचार विचार संस्कार आणि शिक्षण आर्थिक विचार. सामाजिक विचार हे न राहाता वैयक्तिक विचारांवर भर देण्यात आला आहे त्यामुळे आपल्यात फूट पडली आहे दोघे तिघे भाऊ. त्यांची मुले. हे सर्व एकत्र राहतात ते एकत्र कुटुंब याऊलट पती पत्नी आणि त्यांची मुले त्यांचेच कुटुंब असतें तेव्हा त्याला विभक्त कुटुंब कसे संबोधले जाते औपचारिक अर्थाने अशी विभक्त कुटुंबे आपल्या भोवती बरिच दिसत असली तरी आपला स्वभाव मात्र एकत्र कुटुंब पद्धती याला साजेसा आहे सणासुदीला अशा विभक्त कुटुंबातील सर्व सदस्य आक्का ताई. मावशी. भाऊ एकत्र जमतात तसेच चुलत मावस. अशा नातेसंबंधांचा पक्के पणा अजून आपल्या मनावर खोल रुतून बसलेला आहे आधुनिक काळात सोयीसाठी वेगळी कुटुंबे असली तरी जवळच्या दूरच्या नातेवाईक संबंध त्यांचेकडे येणे जाणे देणें घेणे. हे सर्व पारंपारिक एकत्र कुटुंबाला साजेसेच आहे म्हणून आपल्याकडे. सुखात दुःखात चांगल्या वाईट प्रसंगाला. अडचणीला धावून जाणे. हा शब्द रूढ झाला आहे परसपरासंबधामधये जो तुटकपणा अंतराय विभक्त कुटुंबाच्या पध्दतीत गृहीत धरला जातो तो आपल्या कौटुंबिक संबंधांमध्ये फारसा आढळत नाही त्यामुळे मोठा गोतावळा. अनेक जबाबदाऱ्या. आणि गरजेच्या वेळी अनेक आधार असणे ही आपली कौटुंबिक विश्वाची काही वैशिष्ट्ये आहेत पुरुष वर्चस्व हे कुटुंब संस्थेत सर्वात विचार करण्याची बाब आहे रेशनकार्ड पुरुषांच्या नावांवर. जमीन जागा ईस्टेट पुरुषाच्या नावांवर. मयताला खांदा देण्याचा मान फक्त पुरुषांना. आपलीं कुटुंबे पुरुष प्रधान पध्दतीची असतात घरात कर्ता पुरुष हाच कर्ता आणि कुटुंब प्रमुख मानला जातो अशा वातावरणात वाढल्यामुळे आपलीं जीवनदृष्टी पुरुष शाहीला अनकुल अशी बनते घरातील पुरुष मंडळी म्हणतील ते सर्वांनी न काही बोलता मानायचे अगदी साध्या साध्या बाबींमध्ये पुरुषांच्या आवडीनिवडी ना. प्राधान्य द्यायचे या गोष्टी तुम्हाला सर्वच कुटुंबात आढळतात आता अनेक कुटुंबातील महिला मिळवतया झाल्या आहेत. नोकरीच्या. / कामाच्या निमित्ताने त्या घराच्या बंदिस्त भिंती चौकटी सोडून बाहेर पडल्या आहेत पण त्यामुळे त्यांच्या घरातील स्थानात फारसा फरक पडत नाही महिलांनी नोकरी करावी की नाही इथपासून महिला बद्दल निर्णय पुरुषच घेतात अरथाजनाचया क्षमतेमुळे महिलांचा कुटुंबातील दर्जा उंचावत नाही उलट. घरच्यांचा व पतीचा व समाजातील लोकाचा ताणतणाव वाढतोच घरांची जबाबदारी आणि कामांची जबाबदारी अशा दुहेरी जबाबदारी यांना तोंड देणे कमावत्या महिलेला भाग पडते

याचाच अर्थ महिला केवळ मिळवती झाल्याने कुटुंबाच्या रचनेत फारसा फरक पडत नाही किंवा पुरुषशाहीला फारसा तडा जात नाही



            महिलेचे कुटुंबातील स्थान काय आहे ? असते ? आई. मुलगी. बहिण. सून. वगैरे नातेसंबंधात ती जोडलेली असते या सर्व कौटुंबिक भूमिका पार पाडत असताना तीला आपल्या आरोग्याचे सुध्दा भान राहत नाही हे तर खरेच आहे पण प्रत्त्येक भूमिका पार पाडत असताना महिलेवर विविध मर्यादा देखील पडतात या आणि अशा विविध भूमिकांचे उदात्तीकरण आपण साहित्यात व कवितेत वाचतो पण प्रतक्षपणे आपल्याला व आपल्या कुटुंबाला आपले जीवन खर्च करणार्या त्या माऊलीला घरात फारसे अधिकार नसतात आणि आपण ते देई शकत ऊ नावापुरतेच अधिकार आणि भरमसाठ कर्तव्याचे ओझे महिलांच्या वाट्याला येते घरातील कोणत्याही भूमिकेत महिलांचे घरातील स्थान दुय्यम राहते या दुय्यम स्थानाचे काही फायदे मिळतात असे वाटणे शक्य कुटुंबातील महिला आधार. सुरक्षितता. वगैरे मिळतात व्यवहारिक विवंचणेपासून सुटका मिळते त्याचबरोबर विविध नातेसंबधातून ती महिला कुटुंबाच्या केंदस्थानी राहते वगैरे फायदे वरवर पाहता दिसणे शक्य आहे जणू काही पुरुषप्रधान कुटुंबव्यवस्था ही महिलांच्या हिताची आहे असे चित्र रंगवले जाते पण एक व्यक्ती म्हणून आपल्या कुटुंबात महिलांचे स्थान दुय्यमच असते कोणताही कसलाही निर्णय घेण्याचा अधिकार त्यांना नसतो स्वताच्या विकासाच्या पुरेशा संधी त्यांना या व्यवस्थेत उपलब्ध होतं नाहीत या गोष्टी स्पष्ट दिसतात आपल्या पुरुषप्रधान कुटुंबात महिलांच्या वाट्याला तोटेच अधिक येतात महिलांबाबत समाजात असणार्या प्रचलित गैरसमजुती. महिलांकडून गैरवाजवी अपेक्षा. सासू. सून. भावजय. यासारख्या संबंधाविषयी होणारी टवाळी चर्चा. महिलांच्या कुवतीबाबत पूर्वग्रह या सर्व बाबी कुटुंब व्यवस्थेत महिलेच्या वाट्याला येणारे व्यवहारिक आणि भावनिक तोटेच दाखवून देतात

           पुरुषप्रधान कुटुंबपद्धती मुळे कौटुंबिक व्यवहारात पुरुषांकडे पुढाकार येतो. घरातील सर्व लोकांचे आदराचे. भीतीचे केंद्र म्हणजे कर्ता पुरुष. त्याने इतरांशी सल्लामसलत केली तर ती मोठेपणाचे. औदारयाचे लक्षण मानले जाते. कारण मुळात त्याचा अधिकार सर्वांना मान्यच असतो. केवळ कर्त्या पुरुषाला मान मिळतो असे नाही भाऊ आणि बहीण यात भावाला पक्षपाती वागणूक मिळते सर्वच पुरुषांच्या वाट्याला अशी पक्षपाती वागणूक येते. पुरुषांना ताजे. गरम. अन्न. मिळणे येथपासून ते पुरुषांना चांगले औषध उपचार आणि शुश्रूषा. मिळणे येथपर्यंत विविध लाभ पुरुषांच्या वाट्याला येतात. करमणूक. खेळ. विश्रांती. हे जणू पुरुषाचेच अधिकार मानलें जातात. पुरुषांच्या उणिवा. व्यसनाकडे. गैरवरतनाकडे. कानाडोळा केला जातो. अर्थात एवढे सर्व असूनही कुटुंबाचा भार आपल्यावर आहे सर्व निर्णय आपल्याला घ्यायचे आहेत याचे दडपण पुरुषावर येऊ शकते. पुरुषप्रधानतेमुळे घरच्या कर्त्या पुरुषाला अपेक्षा पूर्ण करण्याचे दडपण येऊ शकते सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पुरुषप्रधान कुटुंबात महिलाप्रमाणे पुरुषही निखळ सहजीवनाला मुकतात ही या व्यवस्थेमुळे होणारी मोठी हाणी समजायला हवी या हाणीमुळे पुरुषही एकाकी. अर्थहीन आणि सुसंवाद नसलेल्या नीरस जीवनाचे वाटेकरी होतात म्हणजेच पुरुषांना वरचे स्थान देणारया या व्यवस्थेत पुरूषांच्या वाट्याला काही दडपणे. तणाव येतात हे आपण सर्वजण रोज बघतो

      महिला जाचक आणि पुरुषांनाही फारशी लाभकारक नसलेली अशी ही पुरूषप्रधान कुटुंबव्यवस्था हा आपल्या खाजगी विश्वाचा एक घटक याच कुटुंबात आपण वाढतो. प्रत्त्येक घरात होणारे संस्कार थोडेफार वेगळे असले तरी या कुटुंबव्यवस्थेचया समान प्रभावाखाली आपण व आपले विश्व नातीगोती आणि पुरुषशाहीचया चौकटीत आकार घेत असतो 

          महिलांचा आदर सत्कार करा. हिंसाचार. हुंडाबळी. छेडछाड विरोधी. समान वागणूक. समान वेतन. 

समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार जाहिरात प्रसिद्ध वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

वाचा -

बॅंक खाजगीकरण - Bank privatiazation ....

कुळकायदा कुळकायदा - Land....

बिगर शेती करणे. बांधकाम परवानगी पध्दती....

आपण जाब विचारु शकतो का ?....

सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा

  सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा            अनुसूचित जाती जमाती. इतर मागासवर्गीय जाती जमाती. भटक्या विमुक्त...

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या