Showing posts with label ADITYA THAKARE. Show all posts
Showing posts with label ADITYA THAKARE. Show all posts

एम आय एम अशोकनगर अध्यक्ष पदी समीर शेख - AIMIM Ahmednagar

एम आय एम अशोकनगर अध्यक्ष पदी समीर शेख


श्रीरामपूर - अहमदनगर

एम आय एम श्रीरामपूर तालुक्याची बैठक अशोक नगर येथे घेण्यात आली. अशोक नगर अध्यक्ष पदा बाबत चर्चा करण्यात आली. बैठकीत एक मताने समीर शेख यांची निवड करण्यात आली. एम आय एम जिल्हा अध्यक्ष डॉ परवेज अशरफी यांच्या आदेशाने व जिल्हा उपाध्यक्ष यांच्या मार्गर्शनाखाली व एम आय एम श्रीरामपूर तालुका अध्यक्ष शकील शेख यांच्या अध्यक्षतखाली अशोक नगर येथे समीर शेख यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. त्याच बरोबर अशोक नगर कार्यकारणी जाहीर करण्यात आली. कार्यकारणी अशोक नगर अध्यक्ष समीर शेख, उपाध्यक्ष अय्युब शेख,  सचिव मनोज सूभास काळे,   सहसचिव  जमिल  शेख  कार्यअध्यक्ष सागर रमेस मगरे , खजिंनदार अरबाज निजाम पठान मेडिया प्रमूख सोहेल रऊफ शेख अशोक नगर प्रसिधी प्रमुख अनिल रगूनाथ जगधने , सल्लागार आजिम यासीन पठान,  सह सल्लगार रमेस शंकर गागूर्ड्   संगठक अल्ताफ यूनूस सय्यद

यावेळी  तालुका अध्यक्ष शकील भाई शेख तालुका उपाध्यक्ष यूनूस भाई शेख  शहर अध्यक्ष यूनुस भाई शेख शहर उपाध्यक्ष आमोल रूपट्के  शहर सचिव नावेद पटेल शहर सलागार शाहरुख मन्सूरी  व  पक्षाचे कार्यकर्ता उपस्थित होते


वाचा -

एम आय एम उंदिरगाव अध्यक्ष पदी अमीर शेख ...

एम आय एम हरेगाव अध्यक्ष पदी अविनाश वाहुळ...

ओवेसी का समर्थन क्यो करती है युवा पिढी?...

एम आय एम मानोरी गाव अध्यक्ष पदी शाहरुख शेख...

एम आय एम मानोरी विद्यार्थी अध्यक्ष पदी सोहेल शेख यांची निवड...


धुळे शहरातील प्रसिद्ध हजरत मेहबुब सुभानी बाबा दर्गाचे होणार सुशोभिकरण..

पर्यटन मंत्री ना. आदित्य ठाकरे या स्थळाला भरघोस निधी देणार - आमदार फारूक शाह


धुळे दि.०३-११-२०२० - शहरात लहान टेकडीवर ऐतिहासिक असे मेहबुब सुभानी दर्गाह हे अत्यंत पवित्र आणि जागृत स्थान आहे. मेहबुब सुभानी दर्गाह हा अतिशय प्राचीन दर्गा आहे. मुस्लीम बांधवांच्या समवेतच हिंदू समाजातील भिल्ल, आदिवासी बांधव देखील या दर्ग्यास आदराचे स्थान मानतात. त्यांचे मान-मानता, नवस करत असतात. नवसाला पावणारा देव म्हणुन या दर्ग्याचे स्थान खुप मोठे आहे. या ठिकाणी दररोज धार्मिक कार्यक्रम होत असतात. त्याच प्रमाणे दर गुरुवारी व शुक्रवारी सर्व धर्मीय नागरिक येथे दर्शनासाठी येत असतात. त्याच प्रमाणे गुरुवारी अन्नदानाचा कार्यक्रम आयोजित केला जातो व त्याला प्रचंड प्रतिसाद मिळत असतो. या दर्ग्यावर जाण्यासाठी कुठल्याही प्रकारचा रस्ता नाही व लाईटची सोय नाही. सर्व टेकडी चढ-उताराची आहे. वयोवृद्ध भाविकांना या दर्ग्यावर जाणे-येणे फारच त्रासदायक होत असते. दर वर्षी उरूस, संदल असे कार्यक्रम ५-६ दिवस मोठ्या उत्साहात साजरे होतात. या दर्ग्यास धुळे शहरा बरोबर मालेगाव, सटाणा, अंतापुर ताहराबाद, शिरपुर, शिंदखेडा, अंमळनेर, पारोळा, जळगाव या परिसरातुन २० ते २५ हजार भाविक मोठ्या प्रमाणावर येत असतात. तरी या ठिकाणी भाविकांच्या सोईसाठी रस्ता होणे तसेच विजेची सोय देखील होणे अत्यंत गरजेचे आहे. याला अनुसरून आज धुळे शहराचे आमदार फारूक शाह यांनी मंत्रालय मुंबई येथे पर्यटन मंत्री, पर्यावरण, राजशिष्टाचार श्री. आदित्य ठाकरे यांची भेट घेऊन मेहबूब सुभानी दर्गाह बाबतचे नुतनीकरण व सुशोभिकरण करणेबाबतचे निवेदन सादर केले. त्याला प्रतिसाद देत श्री. आदित्य ठाकरे यांनी या स्थळाला भरघोस निधी देणार असल्याचे मान्य करत लवकरात लवकर निधी उपलब्ध करून देऊ असे आश्वासन दिले.


सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा

  सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा            अनुसूचित जाती जमाती. इतर मागासवर्गीय जाती जमाती. भटक्या विमुक्त...

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या