Showing posts with label राज्य घटना. Show all posts
Showing posts with label राज्य घटना. Show all posts

वैयक्तिक स्वातंत्र्य

वैयक्तिक स्वातंत्र्य

            व्यक्तिजीवनाचा विकास. व्यक्तिच्या गुणांचा विकास करण्याचे स्वातंत्र्य व संधी समाजव्यवस्था व राष्ट्राच्या स्थैर्याचया दृष्टीने आवश्यक आहे. हा खरया लोकशाही व मानवी हक्क व अधिकार समाता आणि स्वातंत्र्य हक्कामुळे व्यक्तिला किमान सभ्य आणि सुरक्षित जीवन जगण्याला आवश्यक असे वातावरण मिळते. परंतु एवढ्या मुळे व्यक्तिचे प्रश्न सुटणार नाहीत व्यक्तिचे जीवन अधिक अर्थपूर्ण व सुसंस्कृत होण्यासाठी आचार विचार उच्चार या स्वातंत्र्याबरोबर श्रध्दा विश्वास यांसारख्या मानसिक क्रिया बाबत स्वातंत्र्य आपल्या संस्कृतीच्या संवर्धनला अनुकूल वातावरण व वैयक्तिक प्रगतीसाठी शिक्षणाच्या समान संधी या सर्वांची आवशयकता आसते आणि हे सर्व कागदोपत्री देऊनही व्यक्ती त्याचा उपभोग घेण्यासाठी आर्थिक दृष्टीने सक्षम नसेल. तिचे जर समाजातील अन्य व्यक्ती किंवा गट आपल्या स्वार्थासाठी गोरगरीब जनता.  महिला. मुल. यांच जर शोषण करत असतील तर त्या शोषणाविरुद्ध लढण्याचा अधिकार हक्क व्यक्तिला आवश्यक आहे. यामुळे व्यक्ती अनेक प्रकारच्या आर्थिक व मानसिक परावलंबनातून मुक्त होऊ शकेल सुसंस्कृत जीवन जगण्यासाठी आवश्यक असणार्या हक्काचा आपण विचार अवलंब केला पाहिजे
                    स्वातंत्र्याच्या हक्कात व्यक्तिच्या वैयक्तिक स्वातंत्र्याचा स्पष्ट उल्लेख केला आहे. यात प्रामुख्याने शारीरिक व मानसिक संदर्भात विचार केलेला आहे.  कोणत्याही व्यक्तिच्या शारीरिक हालचालींवर बंधने पडली की तिच्या व्यक्तिगत स्वातंत्र्याला मुळातच बाधा येते.  शारीरिक हालचालींवर कठोर मर्यादा पडल्या की उर्वरित वैयक्तिक स्वातंत्र्यावर आपोआप अधिक बंधने येतात.  उदा. पोलिसांनी आपल्याला काही कारणास्तव पकडले काही आरोपाखाली कोठडीत बंद करून ठेवले तर व्यक्तिशः आपल्या हालचालींना प्रतिबंध होतो.  आपण काहीच करू शकत नाही. याचाच दुसरा अर्थ असा होतो की वैयक्तिक स्वातंत्र्याच्या संकोचाची सुरवात तेथूनच होते हे सर्व लक्षात घेऊन या वस्तुस्थितीची दखल घेऊन संविधान व्यक्तिगत स्वातंत्र्याबद्दल मांडणी केली आहे. हे हक्क सर्वांना आहेत
            वेळप्रसंगी राज्याला मरयादाभंग करणारे गुन्हेगार दहशतवादी नक्षलवादी असे वर्तन करणार्या व्यक्तिंना प्रतिबंध करावा लागतो. त्यासाठी त्याला अटक केली जाते. तर त्याबद्दल आपणांस कितपत माहिती आहे. येथूनच आपले वैयक्तिक स्वातंत्र्य याला सुरुंग लागतो म्हणजे. एखाद्या व्यक्तिला अटक झाली म्हणजे तो गुन्हेगार सिध्द होत नाही. न्यायालयात त्या व्यक्तिचा गुन्हा सिद्ध होईपर्यंत त्या व्यक्तिला निरापराध मानले पाहिजे. म्हणून अटकेतील व्यक्तिला सुध्दा काही अधिकार संविधानात दिले आहेत.  बेकायदेशीर अटकेला विरोध करणे. केंव्हाही कोणताही पोलिस तुम्हाला विनाकारण अटक करू शकत नाही. अटक करण्यापूर्वी अटकेचे कारणं सांगणे अनिवार्य आहे.  अटक झालेल्या व्यक्तिला स्वताचा बचाव करण्यासाठी वकील नेमण्याचा अधिकार आहे.  अटक झाल्यापासून चोवीस तासांच्या आत आरोपींला जवळच्या न्यायदंडाधिकारी समोर हजर करणे आवश्यक आहे.  चौकशी किंवा अन्य कारणांसाठी अधिक काळ व्यक्तिला अटकेत ठेवणें आवश्यक असेल. तर पोलिसांना न्यायदंडाधिकारी यांची परवानगी घेणे आवश्यक आहे.  या संदर्भात नयायमंडळाची भूमिका अर्थपूर्ण आहे. कारणं पोलिस किंवा शासनकर्ती व्यक्ति यांच्यावर कांहीच बंधने नसतील तर ते अटकेतील व्यक्तिला शारीरिक व मानसिक अपाय किंवा इजा करु शकतील. जुलूम जबरदस्तीने तिचा कबूली जबाब घेऊ शकतील म्हणून अटकेत असतानासुद्धा व्यक्तिला शारीरिक व मानसिक इजा होणार नाही याची दक्षता संविधानाने घेतलेली आहे. व्यक्तिच्या स्वातंत्र्यावर राजकारणी लोकांकडून अतिक्रमण विरूद्ध व्यक्तिला संरक्षण दिलेले आहे 
            अटकेत असलेल्या व्यक्तिबाबत काही हक्क दिलेले आहेत त्याचप्रमाणे गुन्हा सिद्ध झाला आणि व्यक्ती गुन्हेगार ठरली तरी तिला व्यक्ती म्हणून कायद्याने काही सरक्षणे मान्य केली आहेत. उदा. गुनहयाबाबत व्यक्तिला गुन्हा घडला तेव्हा अस्तित्वात असलेल्या कायद्यानुसार शिक्षा झाली पाहिजे. कायद्यात सांगितलेल्या शिक्षेपेक्षा अधिक शिक्षा देऊ नये. विरोधी जबाब किंवा विरोधी साक्ष देण्यास सक्ती करु नये. कोणाही व्यक्तीला जिवंत राहण्याचा हक्क व अधिकार हिरावून घेतला जाणार नाही इत्यादी राजकारणी लोकांचें हेवेदावे सुडापोटी लहरी द्वेष बुध्दी आकस किंवा सुडापोटी एखाद्या व्यक्तिचा बळी दिला जाऊ नये यासाठी हे सर्व व्यवस्था केली आहे. अर्थात प्रतिबंधक स्थानबद्ध ते खाली अटक केलेल्या व्यक्तिंना यातून वगळलेले आहे. परंतु तो अपवाद आहे. प्रतिबंधक सथानबधदता वेगळे नियम आहेत व ते राजकारणी लोकांवर बंधनकारक आहेत
        वैयक्तिक स्वातंत्र्याचा विविध अनाठायी कारणें लावून खून केला जात आहे. संविधानाने आपल्याला मुक्त संचार करण्याचें स्वातंत्र्य दिले आहे.  व्यवसाय करण्याचे तेही कोणीही व्यक्ती कोठेही आपला व्यवसाय सुरू करू शकतो.  सर्वांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण मिळाले पाहिजे.  शालेय शिक्षणाबरोबरच मुलांना तरुणांना व्यवसायिक शिक्षण देणे आवश्यक आहे.  स्थलांतरित कामगार यांना हक्काचे काम समान वेतन किमान वेतन कायद्यानुसार वेतन व संरक्षण मिळाले पाहिजे.  महिलांना कामाच्या ठिकाणी सन्मानाची वागणूक मिळाली पाहिजे डिलिव्हरी काळात पगारी तीन महिने रजा मिळाली पाहिजे.  सर्वांना कुशल अकुशल कामांवर शासकीय योजनाचा लाभ निष्पक्षपणे मिळाला पाहिजे.  मुलांची बालमजुरी बंद झाली पाहिजे त्यांना शाळेत जाण्यास प्रवृत्त करणे गरजेचे आहे.  ग्रामपंचायत नगरपालिका महानगरपालिका यामधून येणारा मिळकत कर घरपट्टी पाणीपट्टी यांच्या मनमानी कारभार पध्दतीवर सर्वांना आवाज उठवण्याचे स्वातंत्र्य आहे.  आपली संस्कृती आपला धर्म नितिमूलय. आचार विचार यांचे आचरण करण्याचा सर्वांना हक्क व अधिकार आहे.  सार्वजनिक ठिकाणी येणे जाणे यांवर कोणीही बंधन घालू शकत नाही.शासकिय निमशासकीय कार्यालयात चालणारे कामकाज तपासणी पडताळणी करण्याचा संविधान अधिकार आपणांस आहे.   
      मूलभूत हक्क व अधिकार हे नकारात्मक व सकारात्मक अशा दोन्ही स्वरूपाचे असतात. सकारात्मक स्वरूपात मूलभूत हक्क व अधिकार व्यक्तिचे स्वातंत्र्य सुरक्षित करतात आणि त्याचा व्यक्तिगत विकासाचा मार्ग प्रशस्त करतात दुसर्याच्या बाजूला हे हक्क शासनाच्या विविध घटकांवर अधिकारावर बंधने घालतात राज्याने काय करावे काय करू नये याचे आदेश त्यातच असतांत त्यामुळे व्यक्तिच्या स्वातंत्र्याचा संकोच करण्याचा राज्याच्या प्रयत्नात प्रतिबंध होतो 
              समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी
बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर
रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा
रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा
मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा
माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा
संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे
९८९०८२५८५९ 
माहिती अधिकार दाखल केल्यावर तुम्हाला माहिती मिळाली नाही तर ३० दिवसांनंतर अपिल दाखल करू शकता
रेशन संबंधित अन्न सुरक्षा योजनेत सहभागी होणेसाठी आजच अन्न सुरक्षा योजनेचा अर्ज भरा आणि संबंधित पुरवठा विभागात दाखल करा
  बांधकाम कामगार नोंदणी आॅनलाइन पध्दतीने करताना आपणाकडे कोण जादा पैसे मागत असेल तर आजच तक्रार करा अन्यथा आपल्या घरातील शिकलेली व्यक्ती सोबत घेवून जवळच्या नेट कॅफे मध्ये समोर कामगार नोंदणी अर्ज भरा

सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा

  सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा            अनुसूचित जाती जमाती. इतर मागासवर्गीय जाती जमाती. भटक्या विमुक्त...

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या