ग्रामपंचायतीत १५% निधी आणि मागासवर्गीय उन्नती -Grampanchayat Maharashtra

 

            ग्रामपंचायतींनी त्यांच्या एकूण उत्पन्नापेक्षा १५/टक्के रक्कम प्रतिवर्षी मागासवर्गीयांच्या उन्नती साठी खर्च केली पाहिजे असे धोरणात्मक आदेश देण्यात आले आहेत या शासन आदेशांचे काही ग्रामपंचायती पालन करीत नाहीत तर काही ग्रामपंचायती ही रक्कम अनुत्पादक बाबीवर तसेच मागासवर्गीय लोकांना विश्वासात न घेता खर्च करतात असा प्रकार पाहावयास मिळतो अंशा तक्रारी लोकांनी शासनाकडे केल्या होत्या या प्रश्नावर अनुसूचित जाती जमाती कल्याण समितीनेही मागासवर्गीय कल्याणासाठी खर्च करण्यात यावयाची १५/टक्के रक्कम कोणकोणत्या बाबींवर खर्च करावी याबाबतचे शासन आदेश काढण्यात आले ( समितीचा अठरावा. सन १९८८/८९ चा अहवाल परिच्छेद १३/१ ) 

          मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ ( यापुढे सदर अधिनियम असा उल्लेख करण्यात येईल ) मधील कलम १५३ ए अन्वये दिलेल्या अधिकाराचा वापर करून तसेच शासन परिपत्रक ग्रामविकास विभाग क्रमांक व्हि पी एम २६७६/२३९६/दि २३ सप्टेंबर १९७६ आणि शासन परिपत्रक ग्रामविकास विभाग क्रमांक व्ही पी एम २६८०/५६२८ सी आर ६१४ / २३ ब दि २९ एप्रिल १९८० या दोन्ही परिपत्रकामधये दिलेल्या सूचनांचे अधिक्रमण करून शासन असे आदेश देत आहे की सदर अधिनियमातील कलम ४५/(६) चया तरतुदी नुसार ग्रामपंचायतीवर सोपविलेले कर्तव्य पार पाडण्यासाठी त्यांच्या एकूण उत्पन्नाच्या कमीत कमी १५/टक्के रक्कम अनुसूचित जाती जमाती ( यात यापूर्वी अनुसूचित जातीतून बौद्ध धर्म स्वीकारलेल्या व्यक्ती व कुटुंबातील लोकांचा समावेश आहे ) अनुसूचित जाती जमाती विमुक्त जाती व भटक्या विमुक्त जमाती व इतर मागासवर्गीय ( यापुढे मागासवर्गीय असा उल्लेख करण्यात येईल ) यांच्या उन्नती साठी त्यांच्या सामूहिक विकासासाठी व त्या वर्गातील व्यक्तिचा वैयक्तिक लाभ होईल अशा योजनांवर भर दिला पाहिजे अशी रक्कम खर्च करण्याबाबत खालील प्रमाणे खुलासा व तपशीलवार सूचना देण्यात येत आहेत

 (१) शासन परिपत्रक ग्रामविकास विभाग क्रमांक २६७६/२३९६/२३दि ३० सप्टेंबर १९७६

(२) शासन परिपत्रक ग्रामविकास विभाग क्रमांक व्हि पी एम २६८०/५६२८ सी आर ६१४/२३ ब दि २९ एप्रिल १९८०

(१) एकूण उत्पन्नासाठी गृहीत धरण्याचा बाबी

मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चया कलम

(अ) १२४ अन्वये मिळणारे करांचे उत्पन्न

(आ ) १२५ अन्वये कराऐवजी मिळणारी एकत्रित रक्कम

(इ ) १२६ अन्वये मिळणारी फी

(ई) १२७ अन्वये मिळणारा सेस

(उ) १३१ अन्वये मिळणारा जमीन महसूल

(ए ) १३२ अन्वये मिळणारे समानीकरण अनुदान तसेच

(ऐ ) यात्रा करा ऐवजी मिळणारे अनुदान

(ओ ) गौण खनिज स्वामित्व धनातील वाटा

(औ ) मुद्रांक शुल्कातील वाटा

(क ) इतर सर्व मार्गाने मिळणारे उत्पन्न

(२) प्रत्त्येक जाती / जमाती साठी रक्कम खर्च करणयाचे प्रमाण ग्रामपंचायतीने एकूण उत्पन्नाच्या १५/टक्के रक्कम मागासवर्गीय जाती / जमातीच्या ग्रामपंचायत कार्य क्षेत्रातील लोकसंख्येच्या प्रमाणात खर्च केली पाहिजे

(अ) मुलांसाठी बालवाडी

(आ) वसतिगृह अभ्यासिका तसेच वसतिगृहातील विद्यार्थ्यांना / विद्यार्थ्यातीनी साठी गणवेश

(इ ) अनुदानित वसतिगृहातील विद्यार्थ्यांना / विद्यार्थिनींसाठी शैक्षणिक सहल

(ई) हुशार मुले व मुलींसाठी शिष्यवृत्ती

(उ ) शिकणारी मुले व मुली शैक्षणिक सहल तसेच गणवेश

(ऊ ) शिकणार या मुला मुलींना वासंतिक अभ्यासवर्ग

(ए ) व्यवसायिक शिक्षण घेणारी मुले व मुली यांची शिष्यवृत्ती कमी पडत असल्यास त्यांना अर्थसाहाय्य करणे

(ऐ ) नवीन घर बांधनी अथवा दुरुस्ती अर्थसाह्य

( ओ ) लघुउद्योग विकास यासाठी उदा ( प्रशिक्षितांना शिलाई मशिन. यंत्र. लेथ आॅईल इंजिन. इलेक्ट्रॉनिक मोटर इत्यादी खरेदीसाठी अर्थसाह्य

(औ ) बायोगॅस प्रकल्प अर्थसाह्य

( क ) घरगुती वापरासाठी विधुत पुरवठा

(. ख ) कुष्ठरोग निवारण पुनर्वसन अर्थसाह्य

(. ग ) आंतरजातीय विवाह जोडप्याला पूरक अर्थसाह्य

( घ ) पाणी पुरवठा सोयी विहिरी बोअरवेल दुरूस्ती इत्यादी साठी अर्थसाह्य

( च) वस्तीत जोड रस्ते रस्त्यावर दिवे बत्ती गटारे जलनिससरणाची व्यवस्था इ साठी अर्थसाह्य 

(छ ) वस्तीत उधाने बगीचे समाजमंदिर प्रौढ शिक्षण व्यवस्था क्रींडागणे ग्रंथालय इ साठी अर्थसाह्य

( ज ) समाजकल्याण विभागाकडून राबविण्यात येणारया हरिजन ( नव बौद्ध धरून ) वस्त्यांची सुधारणा तसेच या योजना अंतर्गत बांधलेल्या समाजमंदिर अपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी आर्थिक मदत

          अशा विविध बाबींवर खर्च करणे आवश्यक आहे ही यादी पूर्ण नाही या सर्व योजना खेरीज इतर बर्याच योजना पार पाडणयापूरवी समाजकल्याण संचालनालयातील संबंधित व सक्षम अधिकारी यांचा सल्ला घेणे तसेच संबंधित अधिनियम व त्याखाली तयार करण्यात आलेले नियम तरतुदी नुसार सक्षम अधिकारी यांची मंजुरी घेणे बंधनकारक आहे

           (४) रक्कम खर्च न करण्याच्या बाबी

(अ ) कार्यालयीन इमारत बांधकाम

(आ ) आसथापनातील अधिकार व कर्मचारी यांचे वेतन भत्ते

(इ ) मनोरंजनात्मक

      मुंबई अधिनियम १९९८ आदेश व परिपत्रके

प्रेक्षणीय स्थळे यांना भेट देणे आयोजित सहली तसेच अधिकार व कर्मचारी यांचे दौरे. दूरचित्रवाणी संच अथवा तत्सम चैनीच्या वस्तू खरेदी. जाहिरात खर्च पुतळे स्मारके बांधकाम. हरिजन सप्ताह साजरा. करणे मेळावे आयोजित करणे मागासवर्गीय लोकांना वैयक्तिक व सामूहिक लाभदायक नसलेली कोणतीही योजना या व अशा बाबींवर १५/टक्के रक्कमेतून खर्च करण्यात येणार नाही

(५) या योजनेचे लाभार्थी

(अ ) संबंधित आर्थिक वर्षाचा लगतपूरव आर्थिक वर्षाचे सर्व मार्गांनी मिळून वार्षिक उत्पन्न रुपये ६४००/पेक्षा अधिक आहे अशी कुटुंबे

( आ ) संबंधित आर्थिक वर्षात ग्रामपचायती / पंचायत समिती / जिल्हा परिषद यांचेमार्फत या योजनेखाली पूर्वीच घेतलेला आहे अशी कुटुंबे किंवा व्यक्ती

       तथापि वर उल्लेख केल्याप्रमाणे अपात्रतेमुळे लाभार्थींची अपेक्षित संख्या उपलब्ध झाली नाही व १५/ टक्के रक्कम खर्च होत नाही असे आढळून आले आहे तर संबंधित गटविकास अधिकारी यांच्या पूर्व परवानगीने फक्त वर (आ ) येथे दिसलेली पात्रता शिथिल करुन त्यात येणारी कुटुंबे व्यक्ती त्यांचेवर ग्रामपंचायत स्व निधीतून खर्च करु शकतात

      (६) योजना अंमलबजावणी

या योजनेअंतर्गत संबंधित वर्षात संपूर्ण खर्च करून अनुशेष राहणार नाही याची दक्षता घेणें आवश्यक आहे यासाठी आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला विविध योजना आखणे आवश्यक आहे आर्थिक वर्षात त्या योजना पूर्ण करण्यासाठी लाभार्थी अर्ज घेताना ते परिपूर्ण असण्याची ग्रामपंचायतीने दक्षता घ्यावी तसेच आदिवासी उपाययोजना खाली किंवा विशेषतः घटक योजनेखाली सुरू असलेल्या योजनेअंतर्गत कामावर या योजनेतून मिळणारी रक्कम येतं नाही हे लक्षात घ्यावे जिल्हा परिषद यांनी आदिवासी उपाययोजना किंवा विशेष घटक योजनाखाली सुरू असलेल्या योजनांची माहिती ग्रामपंचायतीना पुरविण्याची व्यवस्था करावी

      (७) कार्यवाही जबाबदारी

(अ) प्रत्त्येक ग्रामपंचायत क्षेत्रात ही रक्कम खर्च करण्याची जबाबदारी संबंधित ग्रामपंचायतीची राहिल हे आदेश अंमलात न आणणारया ग्रामपंचायती सदर अधिनियमाच्या कलम १४५ (१) नुसार कारवाईस पात्र ठरतिल

( आ ) विस्तार अधिकारी (पंचायत ) व विस्तार अधिकारी ( सामाजिक शिक्षण ) यांनी ग्रामपंचायतीना वेळोवेळी भेटी द्याव्यात तसेच ग्रामपंचायती तपासणी वेळी या आदेशाचे पालन न करणाऱ्या ग्रामपंचायतीच्या तपासणी अहवालात तसे नमूद करण्यात यावे अशा ग्रामपंचायती बाबत लेखी अहवाल त्वरित तयार करण्यात यावा किंवा तपासणी दिनांकापासून एक एक महिन्याच्या आत संबंधित गट विकास अधिकारी यांचेकडे पाठवण्यात यावा

(इ ) गट विकास अधिकारी किंवा त्यांच्या कार्यालयाच्या निदर्शनास ही बाब आल्यापासून १ महिन्यांच्या आत त्यांनी संबंधित ग्रामपंचायतीच्या सरपंच व सचिव यांची बैठक घेऊन त्यांच्या अडचणी विचारांत घ्याव्यात व योग्य मार्गदर्शन करावे रक्कम संबंधित आर्थिक वर्षात खर्च करण्याचे लेखी आदेश संबंधित ग्रामपचायतीना देण्यात यावेत व तसा अहवाल संबंधित जिल्हा परिषद उप मुख्य कार्यकारी अधिकारी ( ग्रामपंचायत ) यांचेकडे लेखी स्वरूपात पाठवावा गटविकास अधिकारी यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील अशा प्रकरणांचा प्रत्त्येक महिन्याला आढावा घेऊन या व आढावयाबाबतचा अहवाल संबंधित महिन्याच्या पुढील महिन्याच्या १५ तारखेपर्यंत संबंधित जिल्ह्य परिषद उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत ) यांचेकडे पाठवावा त्यांच्या गटातील ग्रामपंचायती या आदेशांचे पालन करतील हे पाहण्याची जबाबदारी यांची राहिल

(ई) जिल्हा परिषद उप मुख्य अधिकारी (ग्रामपंचायत ) व समाजकल्याण अधिकारी यांनी एकत्रितपणे अशा मासिक अहवालाची महिन्यातून एकदा छाननी करून त्यांचा आढावा घ्यावा गट विकास अधिकारी यांनी लेखी आदेश देऊनही या आदेशांचे पालन न करणाऱ्या ग्रामपचायतीना एकत्रितपणे किंवा स्वतंत्र भेट देऊन त्यांच्या अडचणी समजावून घ्याव्यात व त्यांना मार्गदर्शन करावे त्याचप्रमाणे उप मुख्य कार्यकारी अधिकारी ( ग्रामपंचायत ) यांनी ही रक्कम संबंधित आर्थिक वर्षात खर्च करण्याचा आदेश द्यावा एवढे करूनही आपल्या आपशी मतभेदांमुळे सर्वसामान्य माणूस सदर योजनेपासून वंचित राहत असेल असे ध्यानात आल्यास सदर ग्रामपंचायत आदेश पालन करत नाही असे ग्राह्य धरून ग्रामपंचायतीच्या विरोधात सदर अधिनियम कलम १४५(१)! अन्वये कारवाई करण्याचा अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडे आहे

(उ ) मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी असा प्रस्ताव प्राप्त झाल्यावर या सूचना पालन न करणाऱ्या ग्रामपंचायतीच्या विरूद्ध सदर अधिनियम कलम १४५(१) अन्वये योग्य ती कारवाई करण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हा परिषद स्थायी समिती समोर मान्यतेसाठी सादर करावा व तसा अहवाल शासनाकडे पाठवावा हा अहवाल स्थायी समितीच्या सभेपुढे सादर करावा व स्थायी समितीचा निर्णय शासनाला कळविणे बंधनकारक आहे जिल्ह्यातील या आदेशांचे पालन करतील हे पाहणे अंतिम जबाबदारी मुख्य कार्यकारी अधिकारी याची राहिल 




           शासन अनुसूचित जाती जमाती व भटक्या विमुक्त जाती जमाती व इतर मागासवर्गीय लोकांच्या साठी विशेष महत्वाच्या योजना राबविण्यात येत आहेत पण या योजना संदर्भात आपणास काय माहित आहे का ? नसेल तर आजच आपल्या ग्रामपंचायतीला भेट द्या आणि चौकशी करा 

    समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

पुन्हा एकदा १८५७ उठाव -1857...

मुलीने केली आईची अंतिम इच्छा पूर्ण- Last wish of mother...

आकस्मिक आजारांमध्ये कोविड -१९ चा समावेश...

आपणास पुढे दिसतो जालियनवाला बाग हत्याकांड -, Jaliyanwala baug...

मुलीने केली आईची अंतिम इच्छा पूर्ण- Last wish of mother

 



#छगनबाई किसन ओव्हाळ या महिलेने आपली एकुलती एक मुलगी लक्ष्मी हिला चार वर्षांपूर्वी सांगितले की रमजानच्या पवित्र उपवासाच्या दिवशी जर मला मरण आले तर कृपया तू माझ्या शरीराला स्मशानभूमीत दहन करू नको. मला मुस्लिम धर्म रितीरिवाजानुसार अंतिम संस्कार नमाज अदा करून मुस्लिम दफनभूमी येथे कर.


 #नेमका रमजानचा पवित्र महिना सुरू असताना छगनबाई यांचे कोरोना या आजाराने निधन झाले. आईची अंतिम इच्छा पूर्ण करण्यासाठी रात्रभर मुलगी लक्ष्मी यांनी खूप परिश्रम घेऊन शेवटी आईची अंतिम इच्छा पूर्ण केली. येरवडा येथील जय जवान नगर मुस्लिम कब्रस्तान येथे मुस्लिम धर्म रितीरिवाजानुसार दफन केले.



#छगनबाई किसन ओव्हाळ ( वय वर्ष 72, बर्मा शेल कंपनीजवळ, इंद्रा नगर लोहगाव रोड, पुणे) यांना संधिवातचा त्रास होत होता. घरात राहून औषध उपचार घेत असताना अचानक जास्त त्रास होऊ लागला.


 #छगनबाई यांना शिवाजीनगर येथील जम्बो हॉस्पिटल येथे रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचे निधन झाले.डॉक्टरांनी सांगितले की हॉस्पिटल मध्ये दाखल होण्यापूर्वीच तुमच्या आईचे निधन झाले आहे तरी कृपया आपण यांना ससून हॉस्पिटल येथे घेऊन जाऊन मृत्यू दाखला तयार करावा.


 #मुली सोबत असलेल्यि स्थानिक कार्यकर्त्यांच्या मदतीने छगनबाई यांना त्यांची मुलगी लक्ष्मीने ससून रुग्णालय येथे 40 नंबर वार्ड मध्ये दाखल केले. ससून हॉस्पिटल येथील डॉक्टरांनीही तपासणी केल्यानंतर सांगितले की तुमच्या आईचे निधन काही तासापूर्वी झालेले आहे. पुढील सर्व कागदपत्र बनविण्यासाठी एक्सरे काढणे व पोलिसांचा पंचनामा जरुरी आहे. काही वेळातच कोरोना टेस्ट पॉझिटिव आली.

 

 #नियमाप्रमाणे विमानतळ पोलिसांनी पंचनामा तयार केला व लक्ष्मी यांनी रात्री दोन वाजता हिंमतीने वकील आयुब इलाही बक्ष,भीमा साखरे, सचिन चौघुले, बलभीम पवार, भारत जाधव, बसू चलवादी आदींसोबत स्वतः जाऊन आधार कार्ड झेरॉक्स व महत्त्वाची डॉक्युमेंट घेऊन ससून हॉस्पिटल येथे मृत्यू दाखला बनविण्याचा काम सुरू केले.

 

 #रात्रपाळीला असलेले, मृत्यू दाखला देणारे असे म्हणत होते की तुमची आई व तुम्ही तर धर्माने हिंदू आणि मृत्यू पास मुस्लिम दफनभूमीचा मागत आहात. हे कसे शक्य आहे. मात्र तरीही तशी तुमची इच्छा असेल तर ना हरकत पत्र सादर करा नंतरच तुम्हाला मुस्लिम कबरस्तान येथील पास बनविता येईल. स्वतःच्या अक्षरात लक्ष्मीने अर्ज तयार करून ना हरकत पत्र सादर केले व कायदेशीर रित्या येरवडा येथील जय जवान नगर मुस्लिम दफनभूमी येथे दफन करण्याचे पास देण्यात आला.

 

#सर्व कागद ससून येथील डेड हाऊस मध्ये जमा करण्यात आली. नियमाप्रमाणे ससून डेड हाऊस येथील डॉक्टरांनी महानगरपालिकेच्या कोविड क्रिमेशन ग्रुपमध्ये छगनबाई किसन ओव्हाळ यांचे निधन झाले आहे. अॅम्बुलन्स पाठवावी असा मेसेज केला.


#दफन पास तयार केला, पण आईला दफन करणार कोण लक्ष्मी पुढे प्रश्न निर्माण झाला लक्ष्मी यांच्या परिचयाचे असलेले अॅड.आयुब इलाही बक्ष यांनी सांगितले की तुम्ही तशी काही काळजी करू नका मी मूलनिवासी मुस्लिम मंचाच्या कार्यकर्त्यांना तुम्हाला पूर्ण मदत करायला सांगतो. पहाटे चार वाजता जय जवान नगर येथील मुस्लिम कब्रस्तान मध्ये मूलनिवासी मुस्लिम मंचाचे अध्यक्ष अंजुम इनामदार,सलीम शेख,इमतियाज पटेल,आसिफ शेख व इंदिरानगर भागातील सुमारे 50 सर्व जाती-धर्मांच्या लोकांच्या उपस्थितीत छगनबाई ओव्हाळ यांच्या नमाजे जनाजा अदा करून खाके सुपूर्द करण्यात आला.


#आईची अंतिम इच्छा पूर्ण होत असलेला त्या क्षणाला बघून लक्ष्मीच्या डोळ्यातील पाणी बरेच काही सांगत होते. आई गेल्याचे दुःखही मनात होते.पण अंतिम इच्छा पूर्ण होत आहे हा आनंदही त्यांच्या चेहऱ्यावरून दिसून येत होता. लक्ष्मीच्या सोबत असलेल्या राहुल पाटोळे - पती यांनी लक्ष्मीला साथ दिली तसेच वस्तीतील महिला माधवी मायकल, सुवर्णा गोडसे, इंदिरा चलवादी, सुनीता माने आणि स्थानिक महिला बरोबर राहून आधार देत होत्या. 


#छगनबाई यांनी किसन ओव्हाळ यांच्यासोबत सुमारे चाळीस वर्षांपूर्वी लग्न केले होते. छगनबाई यांचा पूर्वीचा धर्म इस्लाम होता. दोन्ही परिवार गुण्यागोविंदाने राहत होते एकमेकाच्या सण मोठ्या उत्साहाने साजरा करीत होते.


#किसन ओव्हाळ हे आंबेडकरी चळवळीतील एक मोठे कार्यकर्ते होते. इंदिरानगर या भागात एका छोट्याशा खोलीत राहून खूप लोकांचे कामे केली. किसन गंगाराम ओव्हाळ उर्फ (तात्या) पत्नी छगनबाई किसन ओव्हाळ ऊर्फ (काकू) या दोघांनी मिळून इंदिरानगर भागात भरपूर काम केले. एअरफोर्सच्या हद्दीतील ही जागा मिळविण्यासाठी ह्या दाम्पत्याचा सिंहाचा वाटा आहे.

आधार कार्ड बनविणे,रेशन कार्ड,पाण्याची समस्या शिक्षण,आरोग्य या विषयावर त्यांनी भरपूर काम केले. लोकांच्या अडीअडचणी धावून जाण्याचा काम हे पती पत्नी करत असत.


#बुद्ध विहार बनविण्यापासून तर स्थानिक मुस्लीम बांधवासाठी मस्जिद बनविण्यामध्ये काकूंचा खूप मोठा वाटा होता. सतत लोकांच्या अडीअडचणीत काम करणारी काकू आपल्यातून गेल्याने इंदिरानगर भागातील लोकांमध्ये प्रचंड दुख: होते. काकूंचे अंत्यदर्शन घेण्यासाठी व शेवटचा निरोप देण्यासाठी अनेक लोक रात्री उशिरापर्यंत आपल्या घरासमोर काकूंची वाट पाहत होते. रात्री उशिरा छगनबई यांच्यावर मुस्लिम दफनभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.


#अंजुम इनामदार

अध्यक्ष मूलनिवासी मुस्लिम मंच

9028402814

आकस्मिक आजारांमध्ये कोविड -१९ चा समावेश..

कामगार वर्ग - working sector...

आपणास पुढे दिसतो जालियनवाला बाग हत्याकांड -, Jaliyanwala baug...

पुन्हा एकदा १८५७ उठाव -1857...

आकस्मिक आजारांमध्ये कोविड -१९ चा समावेश

 


                    २२/२३ मार्च २०२० मध्ये कोविड १९ या महामारी सारखें महाभयंकर संकट आपल्यावर आले राज्यात देशात गावात वाडी गल्ली तालुका जिल्ह्यात शासनाने जनता कोरोणा महामारी संकटापासून वाचण्यासाठी टाळेबंदी जारी करण्यात आली बांधकाम कामगार. चहागाडीवाले. वडापाव विकणारे. फळे फुले भाजीपाला विक्री करणारे. मजूर. वडाप करणारे. मालवाहतूक करणाऱे. लाल परी. घरकाम करणाऱ्या महिलां पापड लोणची चटण्या करणार्या महिला. अशी एक नाही अनेक घटक आपला जीव वाचवण्यासाठी घरातच अडकून पडले होते हाताला काम नाही त्यामुळे हातात पैसा नाही त्यामुळे त्यांच्या वर व त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली होती त्यावेळी काहीजणांना ही आपलीं व आपल्या कुटुंबाची उपासमारीची वेळ बघून काहीजणांनी आत्महत्या सारखें मार्ग निवडले आणि आपलीं जीवन यात्रा संपवली त्यामुळे त्यांची कुटुंबे बेवारस झाली 

             शासनाने कोरोणा सारख्या महाभयंकर महामारी आजारात उपचारासाठी येणारा खर्च. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत करण्याचा निर्णय घेतला सर्व दवाखान्याना सदर बिला बाबत निश्चिती करण्याचे आदेश दिले आणि ज्यांची परस्थिती नाही उपचारासाठी खर्च करण्याची त्यांचे उपचार या योजनेतून झाले त्यामुळे सर्वसामान्य माणसाला मोठा आधार मिळाला आज सुध्दा कोरोणा रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे 

            राज्य सेवा ( वैद्यकीय देखभाल ) नियम १९६१ व यामध्ये वेळोवेळी झालेल्या आणि होणा-या सुधारणासह वै शि व औषधी द्रव्ये. वि. शा. नि. क्र. एम आय एस २००१/१२५६/ प्र क्र १९८/२००१/ प्रशासन -२ दिनांक २८ जानेवारी २००२ परिशिष्ट मुद्दा क्र २ नुसार शासकीय कर्मचारी व त्यांचेवर अवलंबून असणारे कुटुंब यांना विनाशुल्क वैद्यकीय उपचारांची सवलत असल्यामुळे त्यांच्याकडून वैद्यकीय खर्चाला प्रतिपूर्ती प्रमाणपत्रासाठी बिलांच्या ३०/टक्के शुल्क आकारण्यात येऊ नये मात्र इतर सर्व प्रकरणी बिलांच्या ३/ टक्के शुल्क आकारण्यात यावे मात्र आत्ताची परिस्थितीत ठराविक २७ आजाराकरीता खाजगी रुग्णालयात उपचार घेण्याची परवानगी देण्यात आलेली आहे सार्वजनिक आरोग्य विभाग शा नि क्र एम एजी २००५/९/ प्र क्र / आरोग्य -३ १९ मार्च २००५ नुसार २७ आकस्मिक व ५ गंभीर आजारांची यादी दिलेली आहे ती शा नि क्र वै ख प्र २०११/ प्र क्र ३३३/११ / रा का वि २ दि. १६ नोव्हेंबर २०११ अन्वये शा नि दि १९/ मार्च २००५ मधील केवळ ३(१) व (२) मध्ये सुधारणा. करण्यात आली

           महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग

(१) शासन निर्णय सार्वजनिक आरोग्य विभाग क्रमांक एम एजी. १०८४/४२५७/ सी आर १५६ दिनांक. २९ एप्रिल १९८५

(२) शासन निर्णय सार्वजनिक आरोग्य विभाग क्रमांक एम एजी १०८८/३८३७/आरोग्य -९ दिनांक २३ जानेवारी १९८९

(३) शासन निर्णय सार्वजनिक आरोग्य विभाग क्रमांक एम एजी १०९९/प्र क्र ४०/ आरोग्य -३ दिनांक २९ जुलै १९९९

(४) शासन निर्णय आरोग्य विभाग क्रमांक एम एजी १०९९/प्र क्र २३८/ आरोग्य -३ दिनांक २१ आॅगसट १९९९

(५) शासन निर्णय आरोग्य विभाग क्रमांक एम एजी १०९५/ सी आर ४५/आरोग्य -३ दिनांक ४ जुलै २०००

(६) शासन निर्णय सार्वजनिक आरोग्य विभाग क्रमांक एम एजी २००५/९/ प्र क्र १/ आरोग्य -३ दिनांक १९ मार्च २००५

(७) शासन निर्णय सार्वजनिक आरोग्य विभाग क्रमांक एम एजी २००५/ प्र क्र २५१/ आरोग्य -३ दिनांक १० फेब्रुवारी २००६

(८) शासन निर्णय सार्वजनिक आरोग्य विभाग क्रमांक वै ख प्र २०१९/ प्र क्र २३६/ रा का वि -२ दिनांक २७ मार्च २०२०

(९) शासन निर्णय महसूल व वन आपत्ती व्यवस्थापन. मदत व पुनर्वसन विभाग क्र डि एम यु. -२०२०/ प्र क्र ९२/ डी आय एस एम -१ दिनांक ३१ आॅगसट २०२० 

         असे वेळोवेळी शासन निर्णय जारी करण्यात आले आहेत संदर्भ क्र सहा मध्ये नमूद केल्याप्रमाणे दिनांक १९ मार्च २००५ चया शासन निर्णयानुसार आकस्मिक व गंभीर आजारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे त्या प्रामुख्याने २७ आकस्मिक आजार व ५ गंभीर आजार निश्चित केले आहेत सध्याची परिस्थिती पाहता शासनाने कोविड १९ हा एक नवीन आजार आहे व त्यावरील उपचारासाठी वैद्यकीय खर्चात देखील गोरगरीब जनतेला न परवडणारी प्रचंड वाढ झाली आहे तसेच. संदर्भ क्र ९ चया शासन निर्णयानुसार दिनांक २ सप्टेंबर २०२० पासून राज्यातील सर्व शासकीय कार्यालयातील उपस्थिती वाढविण्यात आलेली आहे कोविड १९ चा परिणाम बहुतांशी श्वसन संस्थेवर होतो ह्रदय व फुफ्फुसा संबंधित आजार हे संदरभाधीन शासन निर्णय क्र ६ मधील परिशिष्ट "अ" मधील अनुक्रमांक १ मध्ये समाविष्ट आहे परंतु शासनाचे इतर विभाग व क्षेत्रिय कार्यालयाकडून कोविड १९ या आजारांवरील उपचारासाठी वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती बाबत स्पष्टता आणण्याची मागणी करण्यात येत आहे 

      अनुषंगाने कोविड १९!या आजारांवरील उपचारासाठी करण्यात आलेल्या वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती बाबत स्पष्टता आणण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती

         शासन निर्णयानुसार संदर्भ ६ चया शासन निर्णय विरनिदिषट. करण्यात आलेल्या २७ आकस्मिक आजारांमध्ये आणखी नविन १ (एक ) आकस्मिक आजारांचा समावेश करण्यात येत आहे

 ‌. (२८) कोविड १९

वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती साठी रुग्णांचे कोविड १९ बाधीत असल्याने वैद्यकीय अहवालात नमूद असले पाहिजे तसेच रुग्णांच्या रक्तातील spo2 ( प्राणवायू पातळी ) ९५ / टक्के पेक्षा कमी असणे गरजेचे आहे

*. हे आदेश २ सप्टेंबर २०२० पासून पुरवलक्षी प्रभावाने लागू राहतील असा आदेश दिला आहे

* हे आदेश वित्त विभागाच्या सहमतीने व त्यांच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक ५४/२०२०/ सेवा -५ दिनांक. ७/१२/२०२० नुसार जारी करण्यात येत आहे

       शासनाच्या या निर्णयामुळे आता कोणीही गरीब माणूस आपला जीव गमवणार नाही तो आणि त्याचे कुटुंब निरोगी आणि सुदृढ होण्यासाठी मदत होईल

  आत्ता गरज आहे वरील शासन निर्णयानुसार सातत्याने आणि सापेक्ष डाॅ यांनी राबविला पाहिजे आणि सर्वसामान्य जनते पर्यंत हा शासन निर्णय पोहचला पाहिजे

   समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार जाहिरात प्रसिद्ध वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी 

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

अजून नाही सुटला जातीच्या दाखल्याचा व जातीचा तेढ - caste certificate...

अतिक्रमण होणार नाही ?...

आपणास पुढे दिसतो जालियनवाला बाग हत्याकांड -, Jaliyanwala baug..

पुन्हा एकदा १८५७ उठाव -1857...

कामगार वर्ग - working sector

 



               प्रत्त्येक व्यक्तिचे उपजीविकेचे साधन वेगवेगळे असते उत्पन्न कमी जास्त असते त्यामुळेच आपल्याला समाजात काहीजण गरिब आर्थिक उत्पन्न मधील तफावत उत्पन्नाचे साधन आणि व्यक्तिची मालकी असलेल्या वस्तू इत्यादी बाबीवरून आपण व्यक्तिची विभागणी वेगवेगळ्या वर्गामध्ये करतो. श्रीमंत आणि गरीब यांच्याखेरीज मध्यमवर्गीय आणि अतिदरिद्री असे लोकही समाजात असतात प्रत्त्येक वर्गाचे राहणीमान वेगळे असते त्यांच्या राहणीमानाची वैशिष्ट्ये वेगवेगळी असतात

         प्रत्येकाची स्वताच्या वर्गाबधदल काही विशिष्ट कल्पना असते साधारणपणे आपल्या वर्गावर अन्याय होतो. आपल्या वर्गाची कोंडी होते. गुणांचे चीज होत नाही अशी तक्रार सर्वजण करतात मुख्यतः मध्यमवर्गीयांना असे वाटते की आपल्यापाशी पुरेसे कर्तृत्व आहे पण आपल्याला संधी मिळत नाही मध्यमवर्गीय हे बहुतेक वेळा बुध्दीजीवी आणि पांढरपेशे नोकरदार असतात कला संस्कृती इत्यादी क्षेत्रातही त्यांचा वावर असतो पण आपल्यावर अनाठायी निर्बंध लादले जातात यांची त्यांना रुखरुख असते त्याचप्रमाणे श्रीमंत उच्च वर्गीयांना त्यांच्यावरील निर्बंध डाचत असतात आपणच समाजांचे तारणहार आहोत देशाच्या प्रगतीची गुरुकिल्ली आपल्यापाशी आहे असा त्यांचा विश्वास असतो आपल्या कल्पकतेला आणि उधमशीलतेला पुरेसा वाव मिळाला तर आपण सर्वांचेच भले करू असेही त्यांना वाटत असते हे दोन्ही वर्ग. गुणवत्ता. कौशल्य. शिस्त. कार्यक्षमता यासारख्या वैशिष्ट्यांचे खास पुरस्कर्ते असतात कनिष्ठ वर्गीय यांना कमी जास्त प्रमाणात आपल्या कनिष्ठ स्थानाची जाणीव असते पण हे कनिष्ठ स्थान आपल्यावर का व कसे लादले गेले याबाबत निश्चितता नसते आपला वर्ग हा प्रत्यक्ष श्रम करणारा कष्ट. करणारा वर्ग आहे याचे त्यांना भान असते तसेच आपली राहणी. शिक्षण. आणि संस्कृती वैशिष्ट्ये सर्वच उच्चवर्गीय पेक्षा भिन्न आहेत याचीही जाणीव त्यांना असते

      आपल्या वर्गीय समाजात प्रत्त्येक वर्ग इतरांबद्दल विशिष्ट ग्रह बाळगून असतो एका बाजूला आपण एकामेकाचे विरोधक आहोत यांची पक्की जाणीव उच्च वर्गीय आणि कनिष्ठ वर्गीय दोघांनाही असते मात्र त्याच बरोबर मर्यादित अर्थाने प्रगती साधण्यासाठी आपण एकामेकावर अवलंबून आहोत हे ते ओळखून असतात परस्परांविषयी अविश्वास हे त्यांच्या परस्परांचे ठळक वैशिष्ट्य असतें कामगार आळशी. अकुशल. अकार्यक्षम. कामचुकार असतात त्यांना कमी श्रमात अधिक मिळकत हवी असते अशा प्रकारच्या समजुती उच्चवर्गीय बाळगून असतात. उच्चवर्गीयांचा कनिष्ठ वर्गीयाशी होणारा व्यवहार दडपणुकीचा. धाकदपटशाचा आणि अरेरावी तरी असतो किंवा पितृ प्रधान पध्दतीचा उपक्रमाच्या औदार्य भावना होत असते त्यात मित्रत्व किंवा बरोबरीची भावना नसते मध्यमवर्गीय आणि उच्च वर्गीय यांचें परस्परसंबंध याहून वेगळे असतात कनिष्ठ वर्गीयाना नियंत्रणाखाली ठेवण्याच्या कामात मध्यमवर्गीय हे उच्च वर्गीयाचे साथीदार असतात कनिष्ठ वर्गीया बद्दल मध्यमवर्गीयानाही दुरावाच असतो मुख्य म्हणजे उच्च वर्गीय आणि मध्यमवर्गीय यांची मूल्ये साधारणपणे सारखीच असतात सांस्कृतिक क्षेत्रात त्यांचे सहकार्याची असते उच्च वर्गीय यांचा उपभोगावरील भर. संचयाचा हव्यास यांचें मध्यमवर्गीयांनाही आकर्षणं असते मानसिकदृष्ट्या ते उच्च वर्गीयाशी जोडले गेलेले असतात मात्र उच्च वर्गीयाप्रमाणे ते प्रत्यक्ष नफा कमवत नसल्यामुळे त्यामध्ये नैतिकतेचा अहंगंड असतो 

        गरिबां विषयांच्या सहानुभूतीने नसले तरी श्रीमंताबधदल असूयेमुळे मध्यमवर्गीय व्यक्ति नफेखोरी दडपणूक यांच्याबद्दल कधीं कधीं टीकेचा सूर लावतात परंतु कष्ट करणार्यांना. "मालक वर्ग " हा जसा फुकटखाऊ. ऐदी. चैनबाज वाटतो तसे मध्यमवर्गीयांना वाटत नाही कारखान्याच्या संचालक मंडळांवरचया श्रीमंत सभासदांचे लठ्ठ पगार हा त्या श्रीमंतांच्या धाडसाचया कल्पना शक्तीचा आणि नेतृत्वाचा मोबदला आहे असेच मध्यमवर्गीयांना वाटते चांगले वाईट याबाबत आपल्या कल्पना जीवनातील श्रेयाची आपली कल्पना ही सुद्धा आपल्या वर्गीय हितसंबधाप्रमाणे ठरत जाते आपण जर उच्च वर्गीय असलो तर चांगला व्यवसाय करावा व्यवहार भरभराटीला आणावा एक व्यवसाय यशस्वी झाला की आणखी दुसर्या व्यवसायात गुंतवणूक करावी पैसा खेळता ठेवावा सतत उधमशील असावे थोडे बहुत. सामाजिक कार्य करावे. दानधर्म करावा. इत्यादी आपले आदर्श असतात मात्र त्याचबरोबर कामगाराने सचोटीने काम करावे. एकनिष्ठ रहावे. नियम पाळावेत. शिस्तशीर असावे. आज्ञाधारक असावे. अशाही उच्च वर्गीयांचया अपेक्षा असतात त्यासाठी " आदर्श कामगार " गुणवंत कामगार. यांसारखे पुरस्कारही ठेवलें जातात कमीत कमी रजा घेणा-या कामगारांचे कौतुक केले जाते खुद्द कनिष्ठ वर्गीयांना मात्र अशा आदर्शाविषयी फारसा आपलेपणा नसतो जोडधंदा करुन आपली आर्थिक उन्नती करावी असे त्यांना वाटते सतत संघर्षमय वातावरणामुळे मालकांची अरेरावी सहन न करणे बेडरपणे काहीशी बेफिकीर या गुणांना ही बर्याच वेळा महत्व दिले जाते पांढरपेशी जीवनपद्धती हाही कनिष्ठ वर्गीयांचा आदर्श असतो उच्च शाळांमध्ये मुलांना पाठवावे मध्यमवर्गीय संस्कृतीत आपला शिरकाव करून घ्यावा असा त्यांचा प्रयत्न असतो. नैतिकता. चांगुलपणा. आदर्श यांचा विचार करताना आपल्या डोळ्यासमोर आपल्या वर्गाचे हितसंबंध असतात आणि त्यांना साजेशे विचार आपण स्विकारण्याची गरज आहे वर्गावरगा मध्ये असलेलें भेद त्यामुळे एकामेकापासून भिन्न असे त्यांचे हितसंबंध यातून त्यांच्यात संघर्षाचे नाते निर्माण होते हा संघर्ष काही वेळ सुप्त स्वरुपात असला तरी सामान्य माणसाच्या जीवनावर त्याची छाया पडतच असते

       रोजगार मिळेल का नाही मिळाला तर तो टिकेल का हे प्रश्न सामान्य माणसाला भेडसावत असतात मनासारखा रोजगार मिळणे त्यात कुटुंबाच्या गरजा भागवता येणे या बाबी अवघड असतात नोकरी मध्ये सुरक्षितता. समाधान. वगैरेंची शाश्वती नसते या तणावातून आपण वेगळ्या वर्गाचे आहोत ही भावना रूजते व्यक्तिगत आणि संघटनात्मक पातळीवर आपण इतरांपेक्षा मालक. अधिकारी उच्च वर्गीय यांच्यापेक्षा आपले वेगळेपण जोपासून सुरक्षितता मिळविण्याचा प्रयत्न करतो आपल्या समाजातील या आर्थिक तणावामुळे आणि संघर्षामुळे आर्थिक संबंध आणि व्यवहाराकडे बघण्याचा आपल्या दृष्टीने दुटप्पीपणा येतो लाचखोर आणि वशिलेबाजी वाईट असेच आपण मानतो पण स्पर्धा इतकी तीव्र असते की आपण ओळखीपाळखी शोधून त्यांचा उपयोग करण्याचा प्रयत्न करतो वशिलयाचा उपयोग झाला तर तो आपल्याला हवाच असतो पण वशिलेबाजी नसते असेही आपल्याला वाटते तीच गोष्ट भ्रष्टाचाराची स्वच्छ जीवन प्रामणिकपणा हे आपले आदर्श असतात पण आर्थिक विवेचना ‌ स्पर्धा यांच्या भाराने दडपून गेल्यावर आपण लाचखोरी चालवून घेतो आर्थिक स्पर्धा पुरेपूर अंगवळणी पडल्याने नफा घेणें तर आपल्याला मान्यच असते पण काळाबाजार. साठेबाजी. अडवणूक सावकारी. यासारख्या बाबी निष्पन्न होतात त्यांच्यावर आपण उगाच टिका करतो विषम अर्थ व्यवस्था आणि वर्गीय स्पर्धा आपल्यामध्ये दुहेरी नैतिकता निर्माण करत असते

लाचखोरी. भ्रष्टाचार. व वगैराचा आपल्याला जाच होतो तेव्हा आपण त्याचा विरोध करतो पण आर्थिक चढाओढ या गोष्टीचा आपणास फायदा होतो तेव्हा मात्र आपण हा "व्यवहारच आहे ""ही जगराहटीच आहे "किंवा टिकून राहण्यासाठी या गोष्टी करावयाच लागतात असे म्हणत आपण आपल्या कृतींचे समर्थन करतो 

        कामगारांसाठी विविध योजना विविध कायदे तयार करून सुध्दा कामगारांचे प्रश्न अजूनही सुटलेले नाहीत याला कामगार जबाबदार आहे

   समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार जाहिरात प्रसिद्ध वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

जामीन होण गुन्हा आहे का ? ...

पुन्हा एकदा १८५७ उठाव -1857...

आंतरराष्ट्रीय मानवाधिकारी राजदूत संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी अल्तमश जरीवाला -...

अजून नाही सुटला जातीच्या दाखल्याचा व जातीचा तेढ - caste certificate...

आपणास पुढे दिसतो जालियनवाला बाग हत्याकांड -, Jaliyanwala baug




               ब्रिटिश राजवटीविरुद्ध व मनमानी दंडेलीचे दर्शन घडविणारी एक काळी घटना म्हणजे १९१९ साली झालेले जालियनवाला बाग हत्याकांड स्मरण आपल्याला होते आपल्याला रौलट विधेयकाच्या विरोधात अखिल भारतीय पातळीवर सविनय प्रतिकाराचे आंदोलन छेडले. त्याचे प्रतिसाद पंजाबातही उमटले डॉ सत्यपाल व किशचलू यांच्या हद्दपारी निषेधार्थ अमृतसर मध्ये हरताळ पाळण्यात आला आपल्या नेत्यांची सुटका व्हावी. म्हणून अमृतसर मध्ये जमावाने आपला मोर्चा उपायुक्त माईसल आयवहिंग यांचेकडे वळविला. हा जमाव निशत्र होता. या जमावर इंग्रज लष्कराने व पोलीस यांनी गोळीबार केला व त्यात निरापराध दोन लोके मृत्युमुखी पडली ही घटना कळताच शांततेत आंदोलन करणाऱ्या जमावाने हिंसक आंदोलनचा आश्रय घेतला. सरकारने. सभा. बैठका. मिरवणुका. बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज विचार स्वातंत्र्य. शिक्षण स्वातंत्र्य. समानता हक्क. यांवर आत्ता सुध्दा बंदी आहे आपण आपला विचार मग तो नेते आमदार खासदार मंत्री आणि सरकार यांच्या विरोधात मांडू शकत नाही असे कोणतेही काम तुम्हाला करता येवू नये म्हणून आज विविध बंदने घालून तुमचा विचार खुडून काढण्याचे षडयंत्र केलें जात आहे शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी अशी फसवी कारणें दाखविली जात आहेत आणि आपण याचे पालन केले नाही तर विविध गुन्हे दाखल करण्यात येतात त्यामुळे सर्वसामान्य व्यक्ति येईल तशी वेळ काढताना आपण बघतो. 

        अमृतसर अखंड भारतातील पंजाब राज्यातील एक महत्वाचे शहर होते एप्रिल. १०/१९१९ रोजी सकाळी एक घोळका अमृतसर डेप्युटी कमिशनरचया घराकडे जात होता. कारण मागणी होती त्यांच्या स्वातंत्रवीर सुटकेची होती हया घोळका यावर. ब्रिटिश सरकारच्या एका तुकडीने गोळीबार केला त्यात दोन व्यक्ती मारले गेले यामुळे जनता आपल्या अस्तित्वाची आठवण जुलमी इंग्रज सरकारला करून देण्यासाठी जमावाने इमारतींना आग लावली. टाऊनहाॅल. दोन बॅंकांच्या इमारती. तारघर. रेल्वे गोदाम यांना आग लावली. गुरखा रेजीमेंटने रेल्वे स्थानकाचा बचाव केला. रेल्वे गोदामाचया एका युरोपिय रक्षकाला जमावाने जोरदार माराहान केली तीन बॅंक कर्मचारी आगीत होरपळून मृत्यू पावले. एका युरोपियन नागरिकांचा रस्त्यावर खून करण्यात आला. एका ब्रिटीश महिलेवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. पण काही भारतीय लोकांनी तिचे प्राण वाचविले. त्या दिवशी दिवसभरात हे थैमान चालू होते. गोळीबारात ८-२० स्वातंत्र्य सैनिक धराशाही पडले. हया नंतर दोन दिवस अमृतसर शांत होते. पण इतर भागात मात्र हिंसाचार चालूच होता. ३ युरोपीय अधिकारी नागरिक मारण्यात आले. हया प्रक्षोभक दंगयामुळे अखेर १३ एप्रिल रोजी मार्शल लॉ जारी करण्यात आला जालियनवाला बाग हत्याकांड झाला त्यावेळचे कारणं होते त्यावेळी असणार्या शासन व्यवस्थेला कंटाळून लोक रस्त्यावर उतरले त्यावेळी ब्रिटिश सरकारने जनरल डायर याचे नेतृत्त्वाखाली लष्कराला केले शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी लोकांनी कंटाळून सभाबंदी आदेश मोडला आणि जालियनवाला बाग येथे योगायोगाने असा की १३ एप्रिल रोजी पंजाबी जनतेचा प्रिय सण " बैसाखी "पण होता रिवाजानुसार हिंदू आणि शीख बांधव सण साजरा करण्यास एकत्र जमले होते निषेध सभा बोलावली त्यावेळी या सभेला मार्गदर्शन करण्यासाठी कोणतरी नेता येणार होता लोक नेत्यांची वाट पाहत होतो जालियनवाला बागेत जमला होता पण मार्शल लॉ मुळे जमावबंदी लागू होती पाच किंवा जास्त जणांचा जमाव. एकत्र येणे बंदि होती. जालियनवाला बाग चारी बाजूंनी पूर्ण पणे बंदिस्त होती बाहेर पडण्यासाठी एकच लहान दरवाजा होता काही काही कारणांचा राग मनात घेवून भारतीय जनतेचे मानसिक मत तोडण्यासाठी जनरल डायर याचे नेतृत्त्वाखाली बेछूट गोळीबार केला त्यात शेकडो भारतीय निघृणपणे मारले गेले तर हजारों जखमी झाले बाहेर पडण्यासाठी कोठूनही जागा नसल्याने जीव वाचवण्यासाठी काही निरापराध लोकांनी विहीरीत उड्या मारल्या सर्वसाधारणपणे जालियनवाला १३ एप्रिल १९१९ या दिवशी इंग्रजांच्या भारतावरील राजवटीत ब्रिगेडियर जनरल डायर. याने अमृतसर जालियनवाला बाग येथे मुले महिला यांचाही समावेश धरला तर कमीत कमी पन्नास हजार लोक त्या निषेध सभेला उपस्थित असावेत त्यापैकी त्यावेळी निशत्र लोकांच्या सभेवर. रायफलीचया १६०० फैरी झाडल्या यात. ३७९ लोकांचा मृत्यू दाखविण्यात आले पण खरोखर मिळालेली माहिती मृतांची संख्या एक हजार दाखविण्यात आली 

              जालियनवाला बाग हत्याकांडाचा आपल्या भारतीय मनांवर व मानसिकतेवर एक खोल परिणाम झाल्याचे आपण अजून असा विषय जरी काढला तरी अंगावर काटा येतो काय त्या जीवांचे गोळी घालताना झालेलीच तरफड काय असेल. त्या समृतीसरशी साम्राज्य वादाच्या निघृणतेचे स्मरण होते या हत्याकांड ज्या हिंदू - मुस्लिम व शीख बांधवांचा बळी गेला. त्यांच्या आठवणींने आपण व आपला जीव व्याकूळ होतो ही व्याकुळता आपल्या राष्ट्रीय बंधूभावाचे धोतक आहे या जालियनवाला बाग हत्याकांडामधये आपल्या जीवाचा त्याग करणार्या मुळे आपण प्रेरीत होतों ब्रिटिश राजवटीविरुद्ध उघड धिक्कार करणाऱ्या त्यांच्या धाडसापासून आपण आत्मनिर्भरतेचा संदेश घेतो यातून आपली भारतीय अस्मिता दृढ होत जाते म्हणूनच आपली समान राष्ट्रीय ओळख पटविण्याचा संदर्भात जालियनवाला बाग हत्याकांडासारखया आपण आजही निर्देश करतो 

              समान भारतीय अस्मितेचा परिपोष करणार्या अशा कीतीतरी घटना आत्ता सुध्दा होतात आपणास बोध घेण्याची गरज आहे स्वराज्य चळवळ. असहकार चळवळ. दांडी यात्रा. सशत्र क्रांतिकारी चळवळ. चलेजाव चळवळ. वंगभग चळवळ. आशा कितीतरी घटनांचा निर्देश या संदर्भात करता येईल तात्पर्य काही प्रेरक ऐतिहासिक घटना या आपली समान राष्ट्रीय मानसिकता घडवित असतात

*जालियनवाला बाग हत्याकांड महत्वाचे मुद्दे *

(१) २० जुलै १९०५ रोजी सरकारने बंगालची फाळणी करण्याचा निर्णय घेतला आणि ठिणगी पडली

(२)सरकारचा दावा असा होतो की प्रशासकीय विचारातून हा निर्णय घेतला आहे पण त्यामागे राष्ट्रवादी विचारांच्या बंग जनतेची फाळणी करण्याचा हेतू आहे हे जनतेने ओळखले होते

(३) १६ आक्टेबर रोजी कलकत्ता सार्वत्रिक हरताळ पाळण्यात आला व लोकांनी एक दिवस उपोषण केले

(४) कलकत्त्याच्या रस्त्यावर व मिरवणूका निघाल्या व संध्याकाळी प्रचंड सभा झाली तिला ५०'००० लोक हजर होते

(५) बंगालच्या खेड्यापाड्यातून न शहराशहरामधून सभा. मिरवणुका. व निदर्शने यांचें पडसाद उमटले

(६)! परकीय मालावर बहिष्कार आणि स्वदेशी वस्तूंचा वापर हे एकमेव सुत्र होते

(७) अनेक ठिकाणी परदेशी बनावटीच्या वस्तूंची होळी करण्यात आली

(८) शाळा कॉलेज न्यायालये सरकारी नोकरी बहिष्कार 

(९)! त्याचाच एक भाग म्हणून डिसेंबर १९०६ मधील काॅग्रेस आंदोलन अध्यक्ष दादा भाई नौरोजी म्हणले. "स्वराज्य हवे "

(१०) खेड्यातील व शहरातील जनतेला या चळवळीत सहभागी होण्याची प्रेरणा 

(११) विशेषतः विद्यार्थी. महिला आणि शहरी सहभागी स्वदेशी आणि स्वराज्य या घोषणा लवकरच इतर राज्यात पसरल्या

(१२) समान सहानुभूती व समान राजकारण या बंधनांचा वापर व्हावा व देश एकत्र होऊ लागला

(१३) सरकारने दडपशाही मार्गाने या आंदोलनास उत्तर दिले सभावर बंदी घातली

(१४) वृत्तपत्र आवाज दडपण्याचा कट रचला राजकीय संबोधन प्रबोधन मार्गदर्शन करणारे यांना तुरूंगात डांबले विद्यार्थ्यांना मारझोड करण्यात आली

(१५) जनता जागृत झाली. पण तीला अशा संघटनेत बांधण्यास व लढ्याला योग्य दिशा नवे नेतृत्व अभाव

(१६) अखेर लोकमान्य टिळक यांना अटक झाली व काळयापाणयाची शिक्षा झाली

(१७) बिपिनचंद्र पाल. अरविंद घोष. यांनी राजकारण सोडले. लाला लजपतराय राय परदेशी गेले ‌ तेव्हा सरकारला ही चळवळ दडपण्यात यश आले

(१८) मोठ्या जन आंदोलनात परिणामकारक सहभागाची संधी न मिळाल्याने व सरकारी प्रतिकार करण्यास कोणताच बाब न राहिल्याने युवा वर्ग दहशतवादी क्रांतिकारी मार्गाकडे वळला आणि तिरस्कारणीय अधिकार्यांची हत्या करणे हिच त्यांच्या राजकीय कार्याची बनली अनुशीलन व युगांतर हे त्या काळातील दहशतवादी गट होते

(१९) या जालियनवाला बाग चळवळीला जनतेचा पाठिंबा नव्हता त्यामुळे ही चळवळ फार काळ टिकू शकली नाही 

(२०) इ स १९०९ पासून १९२६ पर्यंत राष्ट्रवादी चळवळ शांत होती"इंडियन होमरूल लीग " सनदशीर मार्गाने अखिल भारतीय आंदोलन पुन्हा सुरू झाले

(२१) युद्धकाळात प्रदेशातील क्रांतिकारी कार्यकर्तेही क्रियाशील होते त्यात अमेरिका कॅनडा स्थापन झालेल्या पूर्व व आग्नेय आशियात शाखा असलेल्या गदर पक्षाचा विशेष उल्लेख केला पाहिजे

(२२) त्यानेच भारतात सशत्र क्रांति घडवून आणण्याच्या प्रयत्न केला

(२३) गुरु रविंद्रनाथ टागोर यांनी इंग्रजांनी दिलेली"सर " ही पदवी मागे दिली

(२४) शहिद उदयसिंग ( जे स्वता या हत्याकांडात जखमी झाले ) त्यांनी १३ मार्च १९४० रोजी जालियनवाला बाग हत्याकांडाचे उत्तर म्हणून जनरल डायर यांचा गोळ्या घालून वध केला

      समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

समाजपयोगी विद्यार्थी घडवणारा प्राध्यापक डॉ साईनाथ शेटोड: ..

पुन्हा एकदा १८५७ उठाव -1857..

वारस नोंद चा कायदा - ...

जामीन होण गुन्हा आहे का ? ...

अतिक्रमण होणार नाही ?

 अतिक्रमण होणार नाही ? 



               ग्रामीण भागातील रस्ते. हददीचे रस्ते.  गाडीमार्ग. पायवाट. शेतावर जाण्याचे पाय मार्ग.  गाडीमार्ग यांवर अतिक्रमण होणार नाही यासाठी शासन विविध उपाययोजना करीत आहे

            आपण बघतो शेतावर जाण्यासाठी आपले क्षेत्र सोडून शासन  शेतसोडून जागा पोटखराब म्हणून सोडत असते त्या जागेचा वापर शेतावर औत काठी. बी बियाणे नेण्यासाठी बैलगाडी शेतात जाण्यासाठी वापर केला जात असे आज आपण जर अभ्यास केला तर आपल्या ध्यानात येईल बैलगाडी जाण्यायेण्याच्या रस्त्याचे रुपांतर आज बांधात झाले आहे त्यावरुन एक व्यक्ती सुध्दा जाण्यास योग्य नसतात हे सर्व आपणास माहीत नसल्यामुळे होत असतें

       महाराष्ट्र शासन भूमापन १०८६/६८/४९६६/ ल १ महसूल व वन विभाग यांनी पहिल्यांदा शासन निर्णय ४ नोव्हेंबर १९८७ रोजी जारी केला त्यानुसार

(१) शासनाकडील. महसूल व वन विभाग क्र ठराव क्र १/प्र क्र ४९७७/ ल १

    दिनांक.  ९/१०/१९८६ व १८/११/१९८६

(२) शासनाकडील महसूल व वन विभाग पत्र क्र भूमापन /१०८६/६८/४९६६/ ल १ दिनांक २०/११/१९८६

(३) महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग निर्णय क्र व्हिपीएस. १०८६/ प्र क्र /२२१३ दिनांक २२/१०/८६

         *शासन तरतूद *

ग्रामीण भागात उपयोगात असलेलें विविध प्रकारचे रस्ते. गाडीवाट.  पाऊलवाट.  यांचे खालील प्रमाणे वर्गीकरण करण्यात आले आहे 

(१) ग्रामीण रस्ते. ( एका गावाहून दुसऱ्या गावात जाणारे )

(२) हददीचे ग्रामीण रस्ते ( एका गावाहून दुसऱ्या गावात जाणारे ) 

(३) ग्रामीण गाडीमार्ग ( पोट खराब ) ( एका गावाहून दुसऱ्या गावात जाणारे ) 

(४)!पाय मार्ग. ( पोट खराब ) ( एका गावाहून दुसऱ्या गावात जाणारे ) 

(५) शेतावर जाण्याचे गाडीमार्ग पाय मार्ग

 ‌‌.           (२) 

राज्यात ज्यावेळी भूमापनाचे काम पूर्ण करुन ग्राम नकाशे तयार करण्यात आले त्यावेळी प्रचलित असलेल्या वरील अ न १ ते २ मध्ये नमूद केलेलें रस्ते मूळ भूमापणाचे नकाशे करून दाखवले आहेत वर नमूद केलेलं अ. नं. १ ते २ बहुतांशी रस्ते हे हददीचे रस्ते म्हणून दाखवले आहेत व ते भरीव हददीनी नकाशात दाखवलेले आहेत व ह्या रस्त्यांची जमीन कोणत्याही भूमापन क्रमांकामधये ( लगत भूमापन क्रमांकात समाविष्ट केलेले नाहीत ) अशा रस्त्यांची रुंदी एकसारखी नसून वेगवेगळी आहे व ती मोजणी वेळी मोजली असून ती भूमी अभिलेखात नमुद आहे

         * ३ *

अ न  क्र ३ चे रस्ते गावच्या नकाशात तुटक दुबार रेषेने दाखविले जातात रस्त्याचे क्षेत्र ते ज्या भूमापन क्रमांकातून जात आहेत त्या भूमापन क्रमांकात समाविष्ट आहे व अशा रस्त्यांची रुंदी १६-१-२ ते २१ फूट पर्यंतच धरलेले असून त्याचा तपशील सदर नंबर मध्ये पोटखराब क्षेत्राचा विचार करताना प्रतिबुक मध्ये नमूद केलेला आहे

       * ४ *

अ क्र ४ चे पाय मार्ग हे गावचे नकाशात एका तुटक रेषेने दाखविले आहेत व अशा मार्गाचे क्षेत्र सदर मार्ग ज्या भूमापन क्रमांक मधून जातो तो त्या भूमापन क्रमांकात समाविष्ट आहे व अशा पाय मार्ग रुंदी ८-१-४ फूट असून त्याप्रमाणे पोटखराब सदर भूमापन क्रमांकात दिलेला आहे जे मार्ग पोटखराब आहेत असे मार्ग बंद झालेस त्या धारकांना बंद पडलेल्या मार्गाची जमीन रस्त्याचे हक्क जिल्हा अधिकारी यांनी कमी केले नंतर परत जमीन कसणयाचा मागण्याचा हक्क आहे

     * ५ *

अ क्र ५ चे प्रकारचें मार्ग हे शेतावर मशागतीसाठी जाण्याचे. शेतमालाची ने आण करण्याकरिता मार्ग आहेत. अशा मार्गाची नोंद भूमापनावेळी भूमी अभिलेख मध्ये केलेलीं नाही अशा रस्त्यासाठी हक्कांबाबत वाद निर्माण झाल्यास त्याबाबत चौकशी करून निर्णय देण्याचा अधिकार महाराष्ट्र जमीन महसूल कायदा १९६६ कलम १४३ अन्वये तहसिलदार यांना देण्यात आले आहेत सबब अशा शेतावर जाण्याचे मार्गाचे हक्कांबाबत वाद निर्माण झाल्यास संबंधितांना तहसिलदार यांचेकडे अर्ज दाद मागता येईल अशा शेतावर जाणारया मार्गाची भूमापनाचेवेळी मोजणी केलेली नसल्यामुळे अशा रस्त्याचे बाबत भूमापन अभिलेख उपलब्ध नसल्यामुळे अशा रस्त्यांची मोजणी भूमी अभिलेख विभागाकडून करता येणार नाहीत व त्यांच्या हद्दीत निश्चित करता येणार नाहीत शेतावर जाणे-येणे साठी असलेलें मार्गाची मोजणी करून नकाशात ते दाखविणयाबाबत मोजणीचे प्रचलित नियमांत तरतूद नाही तसेच कलम १४३ मध्ये सदर कामी केलेलीं तरतूद विचारात घेता असे रस्ते मोजण्याची आवश्यकता नाही

 .       * ६ *

वर नमूद केलेलें अ न १ ते २  नुसार वर्गात नमुद केलेलें रस्ते हे जमीन महसूल कायदा कलम २० मधील तरतुदीनुसार शासनाचे मालकीचे आहेत महाराष्ट्र जमीन महसूल कायदा १९६६ कलम १४२ व महाराष्ट्र जमीन महसूल हद्दी व हद्दीच्या निशाण्या नियम १९६९ मधील नियम १०(१) मधील व परंकतुकमधये नमुद केल्या नुसार ज्या भूमापन क्रमांकाचे लगत शासनाच्या जमीनी आहेत अशा जमीनीचे हददीचे  निशाणयाचे परिरक्षण व दुरुस्तीची जबाबदारी ही कायद्यातील तरतुदी प्रमाणे लगतचे भूमापन क्रमांकाचे धारकावर ठेवलेली आहे अशा परिस्थितीत भूमापनाचे सीमेवरील हद्दी व हद्दीच्या निशाण्या नष्ट जर एकांदे धारकाने रस्त्यात अतिक्रमण केले किंवा रस्ता अडविणे असे काही केल्यास तर महसूल अधिकाऱ्यांनी अशा अतिक्रमण करणाऱ्या जमीन धारकावर महाराष्ट्र जमीन महसूल कायद्यातील कलम १४२/५३ मधील तरतुदीप्रमाणे आवश्यक ती कारवाई तातडीने करणे जरुरीचे आहे व अतिक्रमण काढून टाकणे आवश्यक आहे 

        *७ ‌ *

ग्रामीण रस्ते यांची देखभाल व परिरक्षणाचे काम हे जिल्हा परिषदेचे बांधकाम विभागाकडून केलें जाते. व हददीचे रस्ते ( पाणंद वैगरे ) यांची देखभाल व परिरक्षण ही कामे ग्रामपंचायतीचे अंतरंग येतात जिल्हा परिषद व ग्रामपंचायत रस्त्यावरील अतिक्रमणे आढळून आल्यास ते काढून टाकण्याचा अधिकार मुंबई ग्रामपंचायत कायदा १९५८ चे कलम ५३(२) अन्वये ग्रामपंचायतीना प्रदान केलेले आहेत व कलम ५३(२ अ ) अन्वये अशा प्रकारची अतिक्रमणे हटविण्याची कारवाई ग्रामपंचायतीने न केल्यास अशा प्रकरणी अतिक्रमणे हटविण्याचे अधिकार ते जिल्हा अधिकारी यांना देण्यात आलेले आहेत त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांना कारवाई करणे शक्य आहे

         *८ *

सर्व जिल्हाधिकारी यांना वर नमूद केलेल्या ५ ५ प्रकारच्या ग्रामीण रस्त्यावर कोणतेही अतिक्रमण होणार नाही व त्यामुळे ग्रामीण विभागातील होणा-या अतिक्रमणांवर जरुर ती कारवाई करण्याबाबत सूचना देण्यात येत आहेत तहसिलदार यांना त्यांच्या तालुक्यातील अशा तर्हेने ग्रामीण रस्त्यावर अतिक्रमण आढळून आल्यास त्याबाबत त्वरित कारवाई करण्याबाबत जबाबदारी सोपविण्यात यावी

         * ९ *

ग्राम विकास विभागाकडील शासन निर्णय क्र व्हिपीएस १०८६/२२१३/२२ दिनांक २२/१०/१९८६ प्रमाणे जिल्हा परिषदा किंवा ग्रामपंचायत समित्या यांच्याकडून नवीन ग्रामीण रोजगार  रस्ते. पाऊलवाट. याबाबतची माहिती प्राप्त होताच त्या गावाच्या नकाशावर दाखविण्यासाठी जिल्हा निरिक्षक भूमी अभिलेख यांनी जरूर ती कार्यवाही करणे आवश्यक आहे

          *१० *

वरील सूचनेनुसार अंमलबजावणी काटेकोरपणे केली गेली पाहिजे त्यामुळे शेतातील अशा विविध रस्त्यासाठी होणारी भांडणे. रस्ता अडविणे. मारामाऱ्या. कोर्टात वर्षानुवर्षे चालणारे खटले. यापासून सर्व सामान्य माणसाला न्याय मिळावा पैसा व वेळ वाया जाऊ नये यासाठी शासन निर्णयानुसार काम करणे व करून घेणें गरजेचेच आहे

समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार जाहिरात प्रसिद्ध वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

वाचा

अंत्योदय योजना लाभार्थी निवड व अंमलबजावणी...

आंतरराष्ट्रीय मानवाधिकारी राजदूत संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी अल्तमश जरीवाला -...

पुन्हा एकदा १८५७ उठाव -1857...

समाजपयोगी विद्यार्थी घडवणारा प्राध्यापक डॉ साईनाथ शेटोड: ..

पुन्हा एकदा १८५७ उठाव -1857



         ब्रिटिश मुत्सधयानी व इतिहासकारांनी. १८५७ चया उठावाचे वर्णन. " शिपायांचे बंड " म्हणून केले होते भारतीय राष्ट्रवाधांनी व विशेषतः स्वातंत्र्य वीर सावरकरांनी १८५७ चा उद्रेक हा केवळ असंतुष्ट शिपायाचे बंड नव्हते तर तो जूलमी शासन. हुकूमशाही. यासाठी एक ब्रिटिश राजवटीविरुद्ध राष्ट्रीय अस्मिता चेतविणयाचा प्रयत्न होता. हा उठाव राष्ट्रीय स्वातंत्र्यासाठी होता का नाही. ? की ते सरंजामी वर्गाचे अखेरचे बंड होते 

                      ब्रिटिश शासनाने सैनिकांना नव्या एनफिल्ड रायफली दिल्या होत्या त्या काडतुसाला ‌ग्रीज म्हणून प्राण्यांची चरबी जसे गाय व डुक्कर या जनावरांची चरबी लावली जात होती हिंदू समाजात गाय पुज्य मानतात आणि मुस्लिम समाजात डुक्कर निषिद्ध मानले जाते अशी परिस्थिती असताना सुध्दा ब्रिटिश शासन हेतुपुरसकर पणे वागत होते हे काडतुसे वापर करताना ओठाने त्याचे वेष्टण काढावे लागत होते म्हणजे तोंडात घालूनच त्याचा वापर करावा लागत होता त्यामुळे धर्म भ्रष्ट होण्याचा धोका निर्माण झाला बराकपूर येथील सैनिकांनी अशी काडतुस घेण्यास नकार दिला मंगल पांडे या सैनिकाने असा राग डोक्यात घेऊन ब्रिटिश अधिकारी यांचेवर गोळीबार केला त्याला फाशीची शिक्षा देण्यात आली या घटनेने बाकी सैनिकांच्या मनात एक गंभीर समस्या निर्माण केली आणि यातूनच १० मे १८५७ उठावाचा मुहूर्त झाला 

              राष्ट्रीय उठावानंतर ब्रिटिश लषकाराची पुनर्रचना करण्यात आली कारण सन १८५७ चया उठावाने हादरलेले इंग्रज सत्ता जास्ती जास्त दृढ करणे हे इंग्रजांचे मुख्य धोरण होते १८५७ प्रमाणे भारतीय सैनिक एकत्र येऊ नये त्यांच्यात फूट पडावी व त्यांनी पुन्हा उठाव करु नये यासाठी जातीनिहाय फलटनी तयार करण्यात आल्या भारतातील इंग्रज लष्करात युरोपीय अधिकारी व सैनिकांची संख्या वाढवून साम्राज्याला संभाव्य संभाव्य उठावापासून सुरक्षित करणे यासाठी प्रयत्न चालू झाले

              १८५७ उठावाचे अनन्य साधारण महत्व आहे हा उठाव म्हणजे केवळ लष्करी बंड नसून तर समाजातील अनेक घटकांचा समावेश असलेला असा तो राष्ट्रीय उठाव होता या उठावात हिंदू मुस्लिम यांचे अनोखे ऐक्य दिसलें या उठावाने समाज घटकांमध्ये निर्माण झालेली राष्ट्रीय भावना अंत्यंत महत्वाची होती या उठावाने पुढील काळात सशत्र क्रांतीला प्रेरणा मिळाली यापुढच्या काळात ब्रिटिशांनी संघर्ष करण्यासाठी राष्ट्रवादाचा आणि लोकशाहीचा आधुनिक विचारांचा व संघटनात्मक शक्तिचा वापर करावा लागेल ही जाणीव भारतीय विचावंतामधये निर्माण झाली भारतीय विचारवंतांनी राजकीय जागरण करून राष्ट्रीय चळवळीचा पाया घालण्याचे काम सुरू केले ग्रामीण जीवनावर जमीनदार यांचा मोठा प्रभाव असल्याने ब्रिटिशांनी जमीदाराना अनकुल कसे धोरण देण्याचा विचार केला इ स १८५७ चया उठावात ज्या जमीनदारांच्या जमीनी जप्त करण्यात आल्या होत्या त्यांना त्यांच्या जमीनीपरत करण्यात आल्या यामुळे ब्रिटिशांशी निष्ठा बाळगणारा जमीनदार वर्ग निर्माण झाला 

          इ स १८५७ नंतर ब्रिटिशांनी देशी संस्थांना बाबत धोरण राबविण्यास सुरुवात केली संसथानिकावर ब्रिटिश वर्चस्व कायम राखून त्यांना अंतर्गत व्यवहाराचे स्वातंत्र्य देण्यात आले संसथानिकाबरोबर विविध तह करण्यात आले व पालन करण्याचे आश्वासन देण्यात आले

केंद्रीय कायदेमंडळ सदस्यj सर इलबरट याने न्यायदान क्षेत्रातील वर्णभेद संपविण्यासाठी सादर केलेल्या विधायकाला इलबरट विधेयक म्हणतात या विधयकाने गौरेतर भारतीय न्यायाधीशाला गौरवर्णीय युरोपीय खटले चालवण्याचा अधिकार होता

          इ स १८५७ सारखा उठाव पुन्हा होऊ नये सैन्यात कायम फूट असावी म्हणून ब्रिटिशांनी भारतातील आपल्या सैन्यदलाबाबत नवीन धोरण स्वीकारले सैन्यातील ब्रिटिश सैनिकांचे प्रमाण ४० ते ५०/ टक्के वाढविण्यात आले लष्कर दृष्टीने मोक्याच्या प्रदेशात व ठाण्यात ब्रिटिश सैन्य ठेवण्यात आले तोफखाना. चिलखती. दले. यावर ब्रिटिश अधिकाऱ्यांचे नियंत्रण ठेवण्यात आले सैन्य भरती करताना पंजाबी. गुरखे. पठाण. यांची सैन्यात अधिक भरती करण्यात आली जात वंश यांच्या आधारे सैनिक तुकड्या तयार करण्यात आल्या राष्ट्रीय विचारांचा सैन्याशी संपर्क येवू नये. एकामेकांचे विचार जुळू देत नव्हते. थोडा जरी विद्रोह दिसला तर त्या सैनिकाला फाशी दिली जात होती बाहेरील सैनिकापेक्षा ब्रिटिश सैनिकांवर जादा खर्च करण्यात येवू लागला 

            १८५७ उठावाची एक नाही अनेक कारणें आहेत आर्थिक सामाजिक धार्मिक 

जमिनीचा महसूल दरांचा ( ४५/ते ५५ टक्के) मोठा बोजा शेतकऱ्यांवर होता महसूल न भरल्यास जमीनदार. सावकार. किंवा शासन यांचेकडून शेतकरी यांच्या जमीनी जप्त करण्यात आल्या यामुळे शेतकरी गांजले. यंत्रतपोदित स्वस्त मालाच्या आयातीमुळे स्वदेशी कलाकार व्यावसायीक उधोग याची मोठी हाणी झाली देशी राज्ये नष्ट झाल्याने पारंपारिक कारागीर कलावंत यांचा राजश्रय नाहिसा झाला

       सतिबंदी. विधवा पुनर्विवाह. कायद्याने मान्यता. बालहत्या बंदी या सुधारणा म्हणजे आपल्या सामाजिक व्यवहारात चालिरीती मध्ये परकियांच्या हस्तक्षेप होय अशी भावना सामान्य जनतेत निर्माण झाली ब्रिटिश अधिकारी आपल्या वंश श्रेष्ठता अहंकारामुळे भारतीय लोकांना अपमानास्पद वागणूक देत  

    ब्रिटिश राजवटीत खिॖसती मिशनरयानी हिंदू व इस्लाम धर्माविरुद्ध निंदानालस्ती पर व आक्रमक प्रचार केला याला ब्रिटिश राज्यकर्त्यांचे सहकार्य करत असत यामुळे हिंदू व मुस्लिम यांच्यात धर्म धोक्यात आल्याची भावना निर्माण झाली शाळा कॉलेज मध्येही असाच प्रकार चालत असे इंग्रजांची हिंदी सैनिकांबरोबर कठोर मानसिकता तत्कालीन समाज जातीभेदावर आधारित होता लष्कर मोहिमांसाठी धर्माने निषिद्ध ठरवलेल्या समुद्र पर्यटन करण्याची हिंदी सैनिकांवर सक्ती केली जात असे सैन्यदलातील अनेक सैनिकांना एकाच स्वयंपाकघरातून जेवन दिले जात असे इंग्रज अधिकाऱ्यांच्या या कठोर व्यवहारामुळे रोटी व्यवहाराचे निर्बंध मोडण्याची सक्ती हिंदी सैनिकांवर होत असे त्यांच्यावर दाढी ठेवणें. गंध लावणे. परंपरागत पोशाख करणे. यांवर निर्बंध लावले जात असत सरकार आणि अधिकाराच्या या कठोर मानसिकतेमुळे हिंदी सैनिकांत असंतोष निर्माण झाला त्यातच राजकीय कारणें पण होती लाॅरड डलहौसी. खालसा धोरण. तैनाती फौज पध्दत. ब्रिटिश दडपशाही धोरण. 

       इ स १८५७ यातील शूरवीर झाशीची राणी लक्ष्मीबाई या उठवात एक महिला असून सुद्धा इंग्रजां बरोबर लढली आणि लढता लढता धारातीर्थी पडली. पेशवा नानासाहेब पेशवे बाजीराव यांच्या मृत्यूनंतर त्याचा वार्षिक तनखा नानासाहेबास देण्यास डलहौसी यांने नकार दिला म्हणून नानासाहेब पेशवे यांनी १८५७ उठावात सहभाग घेतला आणि शेवटच्या क्षणापर्यंत लढले तात्या टोपे. १८५७ उठावात महत्वाची भूमिका बजावणारे शूरवीर चिकाटी. धैर्य. व असामान्य पराक्रम यांचे अनोखे दर्शन विशवासघातामुळे त्याचा वध करण्यात आला

        १८५७ अपयशाची कारणे या उठावाचा प्रसार प्रचार व पाठिंबा उत्तर भारतापुरता मर्यादित होता दक्षिण भारतात या उठावाला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही उठावामागे व्यापक नियोजन नव्हते आणि मार्गदर्शन करणारे प्रभावी नेतृत्व नव्हते उठाव अनेक ठिकाणी विखुरलेल्या स्वरुपात झाले पण त्यात सुसूत्रता नव्हती ब्रिटिशांची शस्त्रास्त्रे युद्धतंत्र आणि लष्करी यंत्रणा उठाव करणार्या पेक्षा श्रेष्ठ होती

   ब्रिटिश राजवटीविरुद्ध भारतीय चळवळीचा आरंभ या उठावासरशी झाला अशी आपली पक्की धारणा तयार झाली १८५७ या लढ्यात स्मृती आपल्या राष्ट्रवादी भावनेचा परिपोष करतात असा मनोमन विश्वास आपणास आजही वाटतो तात्या टोपे. मौलवी अहमदशहा. नानासाहेब पेशवे. राणी लक्ष्मीबाई. पराक्रमाचे शौर्याचे त्यागाचे आजही कौतुक केले जाते व स्वातंत्र्य लढ्याचे व सेनानी म्हणून त्यांच्या स्फूर्तिदायक लढ्याचा गौरव केला जातो या गौरवात आपणही मनोमनी होतों १८५७ चया उठावातून आपली राजकीय मानसिकता घडतेे >

               आज आपल्या हक्कासाठी अधिकार यासाठी आपणास लढण्याची गरज आहे आज आपणावर घातले जाणारे विविध निर्बंध आपल्या स्वातंत्र्यावर गदा आली आहे समता बंधुता लोकशाही विकेंद्रीकरण विचार स्वातंत्र्य आपल्या हक्कासाठी बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन करण्याचा अधिकार नाही असला तर कोण उत्तर देत नाही यांचा अर्थ असा होतो की परके गेले आणि आज आपण आपल्या देशात गुलामगिरीचे जीवन जगत आहोत म्हणजे आपणांस पुन्हा उठाव करावा लागणार

समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार जाहिरात प्रसिद्ध वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

वाचा

खेळ. आदिवासी. बिगर आदिवासी. अनुसूचित जाती जमाती adhivasi samaj...

आंतरराष्ट्रीय मानवाधिकारी राजदूत संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी अल्तमश जरीवाला -...

वारस नोंद चा कायदा - ....

अंत्योदय योजना लाभार्थी निवड व अंमलबजावणी...

आंतरराष्ट्रीय मानवाधिकारी राजदूत संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी अल्तमश जरीवाला -

पदाच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे प्रश्‍न सोडवावेत-अविनाश साकुंडे



अहमदनगर - सर्वसामान्यांना कोणत्याही प्रकारची अडचणी येवू नये, त्यांच्या प्रश्‍नांसाठी लढा देऊन ते  सोडविण्यासाठी संघटना काम करत आहेत. यामुळे नागरिकांना एकप्रकारे दिलासा मिळत असून, त्या माध्यमातून संघटनेच्या कार्यात अनेकजण जोडले जात आहेत. अल्तमश जरीवाला यांनी संघटनेच्या कार्यात दिलेल्या योगदानामुळे त्यांची संघटनेच्या अहमदनगर जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. या पदाच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या प्रश्‍नांसाठी काम करुन संघटनेचे काम वाढवतील. सर्वच पदाधिकार्‍यांना वरिष्ठ पातळीवरुन योग्य ते मार्गदर्शन करुन पाठबळ दिले जाईल, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय अध्यक्ष अविनाश साकुंडे यांनी केले.

आंतरराष्ट्रीय मानवाधिकार राजदूत संघटनेच्या अहमदनगर जिल्हाध्यक्षपदी अल्तमश जरीवाला यांची नियुक्ती करुन संघटनेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष अविनाश साकुंडे यांचे हस्ते नियुक्ति पत्र देण्यात आले. अल्तमश  जरीवाला हे समाजसेवक सलीमभाई जरीवाला यांचे चिरंजीव आहेत. तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेस चे दिवंगत नेते हनीफभाई जरीवाला यांचे पुतणे आहेत.  त्यांना समाजसेवेचा मोठा वारसा त्यांच्या कुटुंबातूनच मिळाला आहे.विद्यार्थी दशे पासून ते समाजसेवेत सक्रिय आहेत.

अहमदनगर युवा फाऊंडेशन च्या माध्यमातून त्यांनी तरुणांचे संघटन करून मोठे कार्य उभे केले आहे. तसेच कोरोनां काळात त्यांनी वंचित घटकांसाठी मोठी मदत केली आहे. 500 पेक्षा अधिक कुटुंबांना त्यांनी किराणा व जीवनावश्यक वस्तू पोहचवल्या आहेत. त्यांच्या या कार्याची राष्ट्रीय पातळी वर अनेक समाजसेवी संघटनांनी नोंद घेऊन त्यांना "कोरोना योद्धा" चा पुरस्कार व प्रशस्तीपत्र देऊन गौरव  करण्यात आले आहे. आता मानवाधिकार संघटनेच्या जिल्हाध्यक्ष पदी अल्तमश जरीवाला यांची निवड झाल्याने समाजाला त्यांच्या कडून अजून आशा वाढल्या आहेत.असे सांगीतले.या वेळी राजुभाई जहागिरदार, दानिश हुंडेकरी, फज़ल कराचीवाला, आवेज़ जहागिरदार, वसिम शेख, अरबाज़ बागवान आदि उपस्थित होते. या निवडी बद्दल आंतरराष्ट्रीय अध्यक्ष अविनाश साकुंडे, राष्ट्रीय अध्यक्ष श्याम शिंदे व प्रदेश अध्यक्ष अफसर चाँद कुरेशी यांनी शुभेच्छा दिल्या. 

नुतन जिल्हाध्यक्ष अल्तमश जरीवाला म्हणाले, संघटनेचे जिल्ह्यात काम वाढत असून, संघटनेच्या पदाधिकार्‍यांच्या चांगल्या कामामुळे सर्वसामान्यांचे कामे मार्गी लागत आहेत. याच पद्धतीने यापुढेही काम करुन संघटनेशी अनेकांना जोडण्याचा प्रयत्न पदाच्या माध्यमातून केला जाईल. यासाठी प्रत्येक तालुक्यात संघटनेचे पदाधिकारी नेमण्यात येतील, असे सांगितले.

याप्रसंगी राजूभाई जहागिरदार यांनी संघटनेच्या कामकाजाची माहिती दिली. फज़ल कराचीवाला यांनी सर्वांचे आभार मानले.

वाचा

खेळ. आदिवासी. बिगर आदिवासी. अनुसूचित जाती जमाती adhivasi samaj...

डॉ बाबासाहेब आंबेडकर तुम्ही पुन्हा जन्माला या. Dr B.R Ambedkar...

जामीन होण गुन्हा आहे का ? ...

खेळ. आदिवासी. बिगर आदिवासी. अनुसूचित जाती जमाती adhivasi samaj...

वारस नोंद चा कायदा -

 वारस नोंद



             हिंदू उत्तराधिकार अधिनियम १९५६ ‌ म ज म अ कलम १४९ एकादा खातेदार मयत झाल्यानंतर त्याचे वारस. वारस नोंदणीसाठी अर्ज करतात. वारस नोंदणीसाठी अर्ज आल्यास गावकामगार तलाठी आलेल्या वारस अर्जानुसार गाव नमुना नं ६ क मध्ये ( वारस नोंदवही ) वारस ठराव नोंदविणे गरजेचे आहे वारस नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे वारसा कडून घ्यावीत या कागदपत्रांत शिधापत्रिका. सात बारा उतारा. जरूर घ्यावा. त्यातील सर्व नावे वारस अर्जात नमूद आहेत याची खात्री करावी. गावात सदर वारसाबधदल चौकशी करावी. सवयंमघोषणापत्रात सर्व वारसांची नावे नमुद करून या वारसा खेरीज अन्य कोणीही वारस नाही असे नमूद करुन घ्यावे 

      बर्याच वेळा असे निदर्शनास आले आहे की विवाहित मुलींची नावे वारस म्हणून डावलली जातात. कायद्यानुसार ते चुकीचे आहे. विवाहित मुलीच्या बाबतीत त्यांच्या पालकांचे म्हणणे असते की. " मुलीच्या लग्नात आम्ही खूप खर्च केला आहे " त्यामुळे आत्ता त्यांना आपल्या पालकांच्या इस्टेटमध्ये हकक सांगता येणार नाही त्यामुळे सर्व वारसांची नावे प्राप्त झाल्यानंतर प्रथम सर्व वारसांच्या नांवे वारस ठराव करावा. प्रचलित पद्धतीनुसार वारस ठराव ( विवाहित / अविवाहित मुलींसह ) सातबारा कबजेदार सदरी नोंदवावी

          बर्याच वेळा असे दिसून येते की मयताच्या वारसा पैकी फक्त पुरुषांची नावेच सातबाराच्या कबजेदार सदरी नोदवली जातात आणि महिलांची नावे मग ती विवाहित असो अथवा अविवाहित पत्नी. मुली. इत्यादी ) इतर हक्कात नोंदवली जातात ही पद्धत कायद्यानुसार चुकीची आहे. मयताच्या वारसा पैकी महिलांची नावे सुध्दा कबजेदार सदरीच नोंदवली गेली पाहिजेत हिंदू वारस कायदा १९५६ मधील सन २००५ चया सुधारनेनुसार मुलीलाही मुलांबरोबर मालमत्तेत हिस्सा मिळण्याचा हक्क प्राप्त झालेला आहे. सखोल चौकशी नंतरच आणि कोणताही मान्यता असणारा वारस डावलला गेला नाही. यांची खात्री झाल्यानंतर नोंद मंडलाधिकारी यांचेकडे सादर करण्यात येते. 

         "वारस नोंद प्रकार "

*ए कु म ची वारस नोंद *

         हिंदू उत्तराधिकार अधिनियम १९५६ ; म ज म अ १९६६ कलम ‌१४९ 

                         बर्याच वेळा असे निदर्शनास आले की एखाद्या जमीन. मालमत्ता यावर एकत्र कुटुंब मॅनेजर नाव दाखल असणारा व्यक्ति मयत झाल्यानंतर त्याचे वारस वारस नोंदणीसाठी अर्ज दाखल करतात आणि त्या मयत ए कु म चे वारस म्हणून त्यांच्याच मुला मुलींची नावे वारस म्हणून नोंद केली जातात यामुळे मयत इसम ज्यांच्या ए कु मॅनेजर असतो त्याचा वारस हक्क डावलला जातो

      वास्तविक एकत्र कुटुंब मॅनेजर म्हणून नाव दाखल असलेला इसम मयत झाल्यानंतर त्याची वारस नोंद करताना अंत्यंत सखोल चौकशी करण्याची गरज असते

       एकत्र कुटुंब मॅनेजर यांच्या निधनानंतर वारस नोंदणीसाठी अर्ज आल्यास तलाठी यांनी प्रथम मयत इसमाचे नावं ज्या फेरफार नुसार एकत्र कुटुंब मॅनेजर म्हणून दाखल झाले होते तो फेरफार प्राप्त करून घ्यावा. त्या फेरफेरात नमुद व्यक्तिंना नोटीस बजवावी त्यापैकी जे सज्ञान झाले आहेत त्यांची नावे तसेच इतर वयकतिपैकी. जे मयत आहेत त्यांच्या वारसांची आणि एकत्र कुटुंब मॅनेजर चे वारस अशा मुस्लिम कायद्यामध्ये एकत्र कुटुंब मॅनेजरची संकल्पना नाही हे लक्षात ठेवावे

"अविवाहित मयत खातेदाराचे. समान आडनाव असणारे दावेदार 

*हिंदू उत्तराधिकार अधिनियम १९५६ म ज म अ १९६६ कलम १४९ / ३४

एकदा खातेदार मयत झाला मयत खातेदार अविवाहित होता याबाबतची कागदपत्रे माहिती. प्राप्त झाल्यानंतर त्याबाबत स्थानिक चौकशी पूर्ण पणे केल्यावर असे निदर्शनास आले की मयत इसमाचे हिंदू वारस कायदा १९५६ अन्वये वर्ग १/२/३ किंवा ४ प्रमाणे कोणीही वारस उपलब्ध नाहीत. पण मयताचेच आडनाव असलेल्या एका व्यक्तिने वारस असण्याचा दावा केला अशा वेळेस त्या दावेदार व्यक्तिचया नावाची नोंद गाव नमुना ६ क मध्ये नोंदवावी वारस हक्क सांगणार्या व्यक्तिकडून तीन पिढ्याची वंशावळ प्रतिज्ञापत्रावर घ्यावी तया वंशावळी मध्ये नमूद सर्वांना नोटीस बजावून त्यांची चौकशी करावी. वारस विश्वास पात्र नसल्याचे आढळून आल्यास मंडलाधिकारी यांनी त्या दावेदारास दिवानी न्यायालयातून त्यांचा वारस हक्क सिध्द करून आणण्यास सांगावें आणि तसे नमूद करून नोंद रद्द करावी मयत खातेदारास कोणीही वारस नसल्याचे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ कलम ४३ अन्वये कारवाई करता येते

" मृत्यू पत्राची नोंद "

भारत वारस कायदा १९२५ कलम २ हिंदू उत्तराधिकार अधिनियम १९५६ म ज म अ १९६६ कलम १४९ मृत्यू पत्राचा कायद्यानुसार एकदा खातेदार मयत झाला त्याच्या हयातीत त्याने भारतीय वारसा कायदा १९२५ कलम २ अन्वये त्यांच्या मालमत्तेचे मृत्यू पत्र करून ठेवले आहे अशा मृत्यू पत्राबाबतची कागदपत्रे प्राप्त झाल्यानंतर तलाठी यांनी गाव नमुना ६ क मध्ये. ( वारस नोंद वही ) त्याची नोंद घ्यावी मृत्यू पत्र करून ठेवणारा याचा मृत्यू दाखला घ्यावा स्थानिक पातळीवर चौकशी करावी मृत्यू पत्राप्रमाणे वारस ठराव मंजूर झाल्यानंतर गाव नमुना "सहाला " नोंद करून सर्व वारसांना नोटीस बजवावी

          मृत्यू पत्राबाबत कोणी हरकत घेतली नाही तर मंडलाधिकारी यांनी वारस नोंद प्रमाणित करावी. हरकत घेतली गेल्यास मंडलाधिकारी यांनी तक्रार केस चालवावी. मृत्यू पत्रावर साक्षीदार म्हणून स्वाक्षरी करणार्या किमान एका साक्षीदाराचा जबाब घ्यावा अथवा त्यांच्या समक्ष मृत्यू पत्र झाले असल्याबाबत प्रतिज्ञापत्र घ्यावे जरुर तर मृत्यू पत्रावर स्वाक्षरी करणार्या डॉ चाही जबाब घ्यावा. तसेच सर्व वारसाचे जबाब घेऊन मृत्यू पत्रानुसार नोद प्रमाणित करावी मृत्यूबाबत कांहीही संभ्रम असल्यास सदर मिळकती ज्या न्यायालयाच्या कक्षेत आहेत त्या न्यायालयाकडून मृत्यूपत्र आणणेस सांगावें आणि सर्व वारसांची सात बारा सदरी नोंद करावी

      कायद्यानुसार मृत्यू पत्र नोंदणीकृत तसेच स्टॅम्प पेपरवर असण्याची आवश्यकता नसते मृत्यू पत्र साध्या कागदांवर सुध्दा करता येते मृत्यू पत्र करणारी व्यक्ती सज्ञान आणि मानसिक दृष्ट्या निर्णय घेण्यास सक्षम असावी तसा डॉक्टर चा दाखला संलग्न असला किंवा मृत्यू पत्रावर डॉ यांनी प्रमाणित केलेला असलेला दाखला असेल तर मृत्यू पत्राला बळकटी येते. मृत्यू पत्रावर मृत्यू पत्र करणारा तसेच किमान दोन किंवा अधिक साक्षीदारांच्या सह्या असाव्यात इतकीच कायद्याची अपेक्षा असते

" परागंदा. असलेल्या व्यक्तिच्या वारसांची नोद "

भारतीय पुरावा कायदा १८७२ चे कलम १०७/१०८ हिंदू उत्तराधिकार अधिनियम १९५६ म ज म अ १९६६ कलम ‌१४९ अनेकदा एकादी व्यक्ति बराच काळ परागंदा असते म्हणजे त्याचा कोणताही ठाव ठिकाणा नसणे आपले गाव सोडून दुरदेशी राहणारा त्या परागंदा व्यक्तीची पत्नी मुले यांची नावे वारस म्हणून लावण्यासाठी तलाठी यांचेकडे अर्ज करतात अशा वेळेस तलाठी यांनी अर्जदारास दिवाणी न्यायालयाकडून भारतीय पुरावा कायदा १८७२ चे कलम १०७/१०८ अन्वये वारस दाखला आणि प्रतिज्ञापत्र आणण्यास सांगावें एखादी व्यक्ती ७ किंवा अधिक वर्षे परागंदा असेल आणि त्याचा ठावठिकाणा किंवा बातमी मिळून येत नसेल तर दिवाणी न्यायालय उपरोक्त कायद्यान्वये वारस दाखल देऊ शकते असा वारस दाखल हजर केल्यानंतरच गाव नमुना ६ क. मध्ये तशी करावी वारस मंजूर झाल्यानंतर गाव नमुना सहाला नोंद करून सर्व हितसंबंधीतांना नोटीस बजवावी

"खरेदी देणारा मयत "

          भारतीय नोंदणी कायदा कलम १७ मालमत्ता हस्तांतरण कायदा १८८२ कलम हिंदू उत्तराधिकार अधिनियम १९५६ एखाद्या खातेदाराने त्यांच्या व जमीनीची विक्री केली याबाबतची कागदपत्रे प्राप्त झाल्यानंतर तलाठी यांनी गाव नमुना सहा मध्ये त्याची नोंद केली. नोंदीबाबत निर्णय होण्याआधी खरेदी देणारा मयत झाला सर्वसाधारणपणे असे निदर्शनास येते की खरेदी देणारा मयत झाल्यानंतर त्याचे वारस विविध तक्रारी करून सदर विक्री व्यवहाराला हरकत घेतात

 * सर्वसाधारणपणे अशा तक्रारींचे स्वरूप खालील प्रमाणे असते *

(१) वडीलांनी आम्हाला न सांगता जमीन विकली होती आत्ता आमची या विक्रीला हरकत आहे

(२) वडीलांना काही कळत नव्हतं. त्यांना फसवून / दारु पाजून. नशेत सह्या घेतल्या गेल्या आहेत

(३) जमीनीत आमचाही हिस्सा आहे. या विक्रीला आमची संमती नव्हती

(४) विक्री करणारी व्यक्ती मयत आहे. त्यामुळे झालेला दस्त आपोआपच रद्द झाला आहे

           अशा वेळेस गाव तलाठी यांनी खरेदी देणारा इसम मयत असल्यामुळे तात्काळ गाव नमुना ६ क मध्ये (वारस नोंदवही ) वारस नोंद धरावी स्थानिक चौकशी करावी वारस ठराव मंजूर झाल्यावर त्या वारसांची नोद गाव नमुना सहा मध्ये (हक्काचे पत्रक किंवा फेरफार रजिस्ट्रेर ) ला नोंदवावी झालेल्या विक्री व्यवहारांची नोटीस या सर्व वारसांना बजावावी जर उपरोक्त व्यवहाराबाबत तक्रार आलेली तर ही बाब मंडलाधिकारी यांच्या निदर्शनास आणून द्यावी

            दस्त नोंदणीकृत आहे व दस्त नोंदणीचा तारखेस खरेदी देणारा हयात होते हक्काची नोंद दस्तावर अवलंबून असते खरेदी देणारा मयत झाल्यामुळे त्यात कोणताही फरक पडत नाही. वारसांनी त्याचा वारस हक्क दिवाणी न्यायालय मधून शाबीत करून घ्यावा या तरतुदींचा आधार घेऊन सदर व्यवहाराची नोंद मंडलाधिकारी यांनी प्रमाणित करावी

"‌खरेदी घेणारा मयत "

           भारतीय नोंदणी कायदा कलम १७ मालमत्ता हस्तांतरण कायदा १८८२ कलमं ‌५४ हिंदू उत्तराधिकार अधिनियम १९५६ एखाद्या खातेदाराने त्यांच्या व जमीनीची. विक्री केली याबाबतची कागदपत्रे प्राप्त झाल्यानंतर तलाठी यांनी गाव नमुना सहा मध्ये त्याची नोंद केली मध्यंतरीच्या काळात नोंदी बाबत निर्णय होण्याआधी खरेदी घेणारा मयत झाला अशा वेळेस खरेदी घेणारा इसम मयत असल्यामुळे तात्काळ गाव नमुना सहा क मध्ये ( वारस नोंदवही ) त्यांच्या वारसांची नोद धरावी स्थानिक चौकशी नंतर वारस ठराव मंजूर करून घ्यावा

           कायदेशीररीत्या खरेदी दस्त केल्यानंतर जर एखादी व्यक्ती मयत झालीं तरिही त्या व्यक्तिला कायदेशीरपणे प्राप्त झालेल्या हक्कांना बाधा येत नाही या तरतुदींचा आधार घेऊन सदर व्यवहाराची नोंद मयताच्या वारसांच्या नांवे मंडलाधिकारी यांनी प्रमाणित करावी

   आपला हक्क व अधिकार सोडू नका 

समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार जाहिरात प्रसिद्ध वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

वाचा

जामीन होण गुन्हा आहे का ? ...

डॉ बाबासाहेब आंबेडकर तुम्ही पुन्हा जन्माला या. Dr B.R Ambedkar...

खेळ. आदिवासी. बिगर आदिवासी. अनुसूचित जाती जमाती adhivasi samaj...

सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा

  सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा            अनुसूचित जाती जमाती. इतर मागासवर्गीय जाती जमाती. भटक्या विमुक्त...

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या