Showing posts with label महिला. Show all posts
Showing posts with label महिला. Show all posts

महिला बचत गट आणि शेळी पालन

 



महिला बचत गट आणि शेळी पालन 

        विशेष केंद्रिय सहाय्य योजनेअंतर्गत महिला बचत गटांना शेळी युनिट पुरवठा करणेसाठी शासनाने सन २०१४/२०१५ करिता विशेष केंद्रीय सहाय्य योजनेअंतर्गत शेळी पालन ही योजना शासनाकडे प्रस्थापित करण्यात आली होती. केंद्र सरकारने विशेष केंद्रीय सहाय्य योजनेअंतर्गत मंजूर अनुदानातून १० शेळ्या व एक बोकड ही योझना राबविण्यासाठी सन. २९१४/१५ करिता ५ लाख निधी मंजूर केला आहे सबब शेळी पालन माध्यमातून महिला बचत गटांचे उत्पन्न वाढून गटांचे बळकटीकरण. महिला. सबलीकरण. महिला सक्षम. करण्याच्या मार्गदर्शक सूचनांना मान्यता देण्याची बाब विचाराधीन होती. महिलांना ५०/ टक्के आरक्षण बरोबरच सर्व शासकीय निमशासकीय कार्यालये यामध्ये नोकरी विविध लहान लहान उद्योग सुरू करण्यासाठी शासकीय कमी व्याज दराने कर्ज योजना. त्यातच सर्वात मोठा आणि महिलांना सक्षमीकरण करण्यासाठी. सबलीकरण. यासाठी. सर्व ग्रामीण व शहरी भागात महिला बचत गटांना प्राधान्य देण्यात आले आहे. त्यातच सर्वात महत्वाची योजना केंद्र शासनाकडून राबविण्यात येते ती म्हणजे बचत गटांना शेळी पालन करण्यासाठी भरिव स्वरूपाचे अनुदान शासन उपल्ब्ध करून देत आहे. 

        आदिवासी विकास विभाग शासन निर्णय क्रमांक केंद्रिय २०१९ / प्र क्र २९/का १९ मंत्रालय मुंबई ४०००३२ दिनांक १/१/२०२१ रोजी. जनजाती मंत्रालय नवी दिल्ली यांचें पत्र. क्र. F no. ११०१५/०३/(१३) /२०१४/ दिनांक १९/०६/२०१४ आदिवासी विकास विभाग शासन निर्णय विकेस २०१४/ प्र क्र ७८/ का १९ दिनांक १७ मार्च २०१५ व २८/ मार्च २०१५ आदिवासी विकास विभागातर्फे आदिवासी जनजाती साठी विविध योजना राबविल्या जातात आदिवासी बांधव मुख्यत्वे डोंगरमाथा. दर्या. डोंगर. अति दुर्गम भागात वस्ती करून राहतात व त्यांची उपजीविका पावसावर आधारित शेती व तत्सम व्यवसाय तसेच वन उपज यावर अवलंबून आहे. मुख्यत्वे पावसावर शेती करत असल्यामुळे प्रत्त्येक वर्षी शेतीच्या माध्यमातून निश्चित उत्पन्न मिळेल याची हमी नसते परिणामी त्यांना रोजगाराच्या शोधात कुटुंबासह स्थलांतर करावे लागते. शेतीबरोबरच शेतीशी निगडित जोडधंदा केल्यास त्यांना निश्चित उत्पन्नची हमी मिळू शकते. आदिवासी भागात जोड व्यवसाय म्हणून मुख्यतः शेळी पालन केले जाते. शेळी पालन करण्यासाठी जास्त जागेची व भांडवलाची गरज नसते. हा व्यवसाय निश्चित उत्पन्न मिळवून देणारा आहे. या व्यवसायाशी मुख्यत्वे महिला वर्ग निगडित आहे. यास्तव महिला बचत गटांना. १० शेळ्या व एक बोकड यांचे एक युनिट दिल्यास त्यांच्या उत्पन्नात वाढ होऊन बचत गट. बळकटीकरण. सबलीकरण. सक्षमीकरण. होण्यास मदत होईल तसेच त्यांचे स्थलांतर देखिल कमी होईल 

          महिला बचत गटांना प्रोत्साहन देण्यासाठी सक्षमीकरण करण्यासाठी बकरी पालन माध्यमातून बचत गटांचे उत्पन्न वाढून बचत गटांचे बळकटीकरण करणे त्यांचे स्थलांतर. पैशांची चणचण. भागावी. हे सर्व कमी करण्यासाठी या केंद्र शासनाच्या कार्यक्रम अंतर्गत मंजूर. १० शेळया एक बोकड यांचे साठी केंद्राकडून ५ लाख अनुदान या योजनेच्या अंमलबजावणीसाठी मार्गदर्शक सूचनांना या निर्णयाद्वारे सोबत जोडण्यात आलेल्या परिशिष्ट क्रमांक १ नुसार मंजूरी प्रधान करण्यात येणार आहे. सदर मार्गदर्शक सूचनांनुसार वितरीत तरतुदी मर्यादेत योजना राबविण्यासाठी व त्याची अंमलबजावणी करण्यासाठी यंत्रणेमार्फत त्वरित कारवाई करण्यात यावी व त्यांचे उपयोगिता प्रमाणपत्र आर्थिक व भौतिक अहवालासह शासनास सादर करणे अधिकारी व कर्मचारी यांना बंधनकारक आहे

             शासनाचे धोरण आहे ते म्हणजे महिला सक्षमीकरण सबलीकरण. बळकटीकरण. हे आहे पण आज बचत गटांच्या नावाखाली. राजकीय हेतू साध्य करण्याचे प्रकार दिसत आहेत म्हणजे शासनाच्या योजनांचा आपल्या राजकीय वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी वापर करणारेही आज आपल्या आजूबाजूला आहेत. त्यामुळे मूळ उद्देश मागेच राहत आहे

        समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९ 

सर्व मुस्लिम बांधवांना आपल्या मुलाच्या साठी मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ यांचेकडून शिष्यवृत्ती योजना मिळत आहे. शिक्षण कर्ज योजना सुध्दा चालू आहे आपणच मागे का. आजच आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी असणार्या मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ या कार्यालयाला भेट द्या. आणि आपल्यासाठी शासनाने दिलेले अनुदान याचा लाभ घ्यावा

जननी सलाम जननी सलाम - महिला हक्क व अधिकार

 


महिला हक्क व अधिकार

          "जननी देवाहूनही श्रेष्ठ " हे वाचायला आणि ऐकायला बर वाटत पण प्रतयक्षपणे आपल्या मनात महिला विषयी आपले विचार काय आहेत महिलांना शासनाने ५०/ टक्के आरक्षण जाहीर केले आहे. आज महिला चूल आणि मूल एवढंच न करता पुरुषांबरोबर खांद्याला खांदा लावून काम करतं आहेत  सुई तयार करण्यापासून वैमानिक सैनिक. नेव्ही अशा विविध ठिकाणी काम करताना दिसतात. एवढेच काय पण राजकारणात सुध्दा. महत्वाची भूमिका बजावतात. 

              राणी लक्ष्मीबाई.  राजमाता जिजाऊ.  अहिल्याबाई होळकर.  रमाबाई आंबेडकर.  सावित्रीबाई फुले. फातिमा शेख.  किरण बेदी.  मदर तेरेसा. इंदिरा गांधी. अशी एक नाही अनेक विरांगना आपल्या भारत भूमित जन्माला आल्या. त्यांचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवून आज महिला काम करत आहेत. कौतुकास्पद आहे. 

                  महिलांना कामाच्या ठिकाणी मिळणारी वागणूक. काय असते आपण सर्वजण बघतो पण त्यासाठी आवाज उठविण्याचा प्रयत्न सुध्दा आपण करत नाही. कामाच्या ठिकाणी महिलांना हिण वागणूक दिली जाते.  बघण्याचा दृष्टीकोन वाईट असतो.  फक्त वापर करण्याच्या हेतूने महिलांकडे बघितले जाते. त्यांना पगार कमी देणें.  समान वेतन कायद्यानुसार. एकसारखा पगार देणें बंधनकारक आहे.   त्यांना महिला कायद्यानुसार. संध्याकाळी सहा नंतर कामांवर येण्यास. तगादा लावणे कायद्यानुसार गुन्हा आहे.  डिलिव्हरी काळात. सहा महिन्यांची पगारी सुट्टी देणें बंधनकारक आहे.  वागणे बोलणे यांवर निर्बंध घालणे. महिलांच्या वर होणारें अन्याय यासाठी शासनाने विविध कायदे कलम तयार केली आहेत

             वरिल प्रमाणे सर्व शासनाच्या ध्यानात आल्यावर. रोज वृतमानपत्रात. येणार्या. बलात्कार. छेडछाड. अॅसिड हल्ले    रस्त्यात अडविणे.  जिवे मारण्याची धमकी देणे.  असे विविध महिलांबाबत प्रश्न आ वासून उभे आहेत.  

              दिनांक १/ मार्च २०२१ रोजी कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळ ( प्रतिबंध व निवारण )! अधिनियम २०१३ मधील तरतुदीनुसार अंतर्गत तक्रार व समितीची पुनर्रचना करण्यासाठी शासन निर्णय जारी करण्यात आला आहे  या अगोदर. महिला व बालविकास विभाग शासन परिपत्रक क्रमांक म क क २०१०/ प्र क्र म क क दि. ११/०६/२०१०! व महिला व बालविकास विभाग शासन परिपत्रक क्रमांक म क क २०१० / प्र क्र ६३/ म क क दि १९/०६/२०१४  तसेच. सा प्र वि कार्यालयीन आदेश क्र संकीर्ण _२७१९/ प्र क्र ३६/ का- २१ आस्था दि ०७/०३/२०१९ ‌असे विविध शासन निर्णय जारी करण्यात आले आहेत पण त्यांची अंमलबजावणी कितपत झाली माहिती नाही आजही आमच्या आई बहीण सुरक्षित नाहीत. त्याला आम्हीच कारणीभूत आहोत. केंद्र शासनाकडून कामाच्या ठिकाणी महिलांचे छळापासून संरक्षण ( प्रतिबंध मनाई व निवारण ) अधिनियम दि २३/०४२०१३ व त्या अंतर्गत दिनांक ९/१२/२०१३ रोजी नियम प्रसिद्ध करण्यात आला आहे त्यानुसार प्रत्येक कार्यालयात अंतर्गत तक्रार समिती स्थापन करण्याबाबत महिला व बालविकास विभागाला शासन निर्णय दि १९/०६/२०१४ रोजी सूचना देण्यात आल्या आहेत त्यानुसार मंत्री आसथापनेत अधीनसत मा मुख्यमंत्री सचिवालय.  मा मंत्री व मा राज्यमंत्री यांच्या कार्यालयातील कार्यरत महिला अधिकारी / कर्मचारी यांच्यासाठी तक्रार समिती गठीत करण्यात आली आहे. सदर समिती अध्यक्ष नियतनवयोमानानुसार सेवानिवृत्त झालया आहेत तसेच समितीचे सदस्य सधसथितीत मुख्यमंत्री सचिवालयात कार्यरत नसल्यामुळे व समितीची पुनर्रचना करण्याचे प्रस्तावित होते. प्रशासन विभाग शासन निर्णय दि ७/३/२०१९ अन्वये कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण प्रतिबंध मनाई व निवारण अधिनियम २०१३ अंतर्गत मंत्री आस्थापना अधीनसत मा मुख्यमंत्री सचिवालय. मा मुख्यमंत्री. मा मंत्री व मा राज्यमंत्री यांच्या कार्यालयातील प्रतिनियुक्तीने कार्यरत महिला अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी लैंगिक छळाबाबत येणाऱ्या तक्रारींची चौकशी करणे व त्यानुसार कार्यवाहीची शिफारस करणे याकरिता प्रत्त्येक शहरात जिल्ह्यात. तालुक्यात राज्यात देशात महिला तक्रार समितीची पुनर्रचना करण्यात यावी 

          (१) मा मुख्यमंत्री सचिवालय. मा उप मुख्यमंत्री. मा मंत्री व राज्यमंत्री कार्यालयात कार्यरत महिला अधिकारी व कर्मचारी यांना याद्वारे शासन आदेश देत आहे की त्यांना छळासंदरभात कोणतीही तक्रार आल्यास ती महिला तक्रार निवारण समितीच्या अध्यक्ष किंवा सदस्य सचिवांकडे सादर करावी

       (२) उपरोक्त समिती मा मुख्यमंत्री सचिवालय. मा उपमुख्यमंत्री मा मंत्री व मा राज्यमंत्री कार्यालयात प्रतिनियुक्तीने कार्यरत महिला अधिकारी व कर्मचारी यांच्यापासून लैंगिक छळासंदरभात प्राप्त झालेल्या तक्रारीची चौकशी करून कारवाई शिफारस करण्यात यावी

      (३) उपरोक्त समितीच्या नावाचा फलक विभागाच्या दर्शनी लावण्यात यावा  २१ अ नुसार तात्काळ कारवाई करण्यात यावी

" प्रत्त्येक महिलेला माहिती असने गरजेचे आहे हे अधिकार "

(१) रात्री करू शकत नाहीत अटक

सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार सुर्यास्तानंतर महिलेला अटक करता येत नाही. अगदी महिला शिपाईही तसे करु शकत नाही. फारच गंभीर गुन्हा असल्यास न्यायालयात अटकेचे लेखी कारणं द्यावे लागते

      (२) प्रायव्हसीचा अधिकार

बलात्कार पीडिता खासगीत जबाब देऊ शकते. त्या वेळी मॅजिस्ट्रेट सोबत असतात पीडित लेडी काॅनसेटेबल आणि पोलिस अधिका-यांनाही गुप्त जबाब देऊ शकते पोलिस सर्वांसमोर जबाब देण्यासाठी. दबाव आणू शकत नाही

   (३) कितीही काळानंतर तक्रार देता येते

      अनेक महिला समाज  कुटुंब वा इतर कारणांमुळे पोलिसांना घटनेनंतर तक्रार करत नाहीत. अशा वेळी महिला उशिरानेही तक्रार करू शकतात. ही तक्रार नोंदवायला पोलिस नकार देऊ शकत नाहीत. महिला ईमेलचया माध्यमातून तक्रार नोंदवू शकतात

(३) झीरो एफ आय आर चा अधिकार

   रेप पीडित महिलेला झीरो एफ आय आर चा अधिकार अाहे अशा केस मध्ये महिला कोणत्याही पोलिस स्टेशनला तक्रार देऊ शकते

(४) चौकशीसाठी बोलवू शकतं नाहीत

 कोणत्याही महिलेला चौकशीसाठी पोलिस स्टेशनला बोलावले जाऊ शकत नाही. महिलेची चौकशी तिच्या घरिच एखाद्या महिला पोलिसांच्या उपस्थितीतच करू शकतात

(५) गोपनीयतेचा अधिकार

रेप केस मध्ये महिलेची ओळख गोपनीय ठेवणे गरजेचे आहे. पोलिस अथवा प्रसार माध्यमे कोणीही पिडित महिलेचे नाव उजागर करु शकत नाही

(६) डिलिव्हरी काळात महिला कर्मचाऱ्यांची कामावरून हकालपट्टी करू शकत नाही

(७) कोणत्याही वेळी कोणत्याही हाॅटेलमधये तुम्हाला पिण्याचे पाणी मागणी करता येते तसेच. वाॅशरुमचा वापरही करु शकता तेही मोफत

(८) कायद्यानुसार एखाद्या हाॅटेलमधये अविवाहित जोडप्याला प्रवेश नाकारण्याचा अधिकार नाही

(९) महिलांना एखाद्याच्या विरोधात थेट आयुक्त किंवा उप आयुक्त इमेल किंवा रजिस्टर पोस्टाने तक्रार नोंदवता येते

(१०) एखाद्याला अटक केल्यानंतर २४ तासात कोर्टात हजर करावे लागते. नसता पोलिस त्या व्यक्तीला आपल्या ताब्यात ठेवू शकत नाहीत

(११) मुली आणि मुलांना कायद्यानुसार. समान वारसाहक्क असतो

(१२) लग्नाला किमान एक वर्ष झाल्याशिवाय एखाद्या दांपत्याला घटस्फोटासाठी अर्ज करता येत नाही

(१३) पोलिस अधिकारी एखाद्याला अटक करताना किंवा विचारपूस करताना तो पोलिस आहे हे लक्षात येईल असे कपडे परिधान करणे किंवा ओळख दाखवणे बंधनकारक आहे

(१४) सुर्यास्तानंतर आणि सुर्यास्तापूरवी महिलांना अटक करता येत नाही

(१५) एखाद्या महिलेवर थेट व्याभिचाराचा आरोप लावता येणार नाही

(१६) तुमची तक्रार नोंदविण्यास नकार देणा-या किंवा टाळाटाळ करणा-या पोलिसाला ६ महिने ते २ वर्षे तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते

(१७) विवाहित जोडप्याला दोन मुले किंवा मुली ( दोन समलिंगी ) दत्तक घेता येत नाही एक मुलगा आणि एक मुलगी दत्तक घेता येते

(१८) एकटा पुरुष असल्यास त्याला मुलगी दत्तक घेता येणार नाही

(१९) एखाद्याला अटक केल्यावर त्याला अटक का झाली कारणं काय आहे हे जाणून घेण्याचा अधिकार आहे

(२०) एखाद्याचा रेकाॅडेड फोन काॅल न्यायालयात पुरावा म्हणून सादर करता येतो

(२१) गुन्हा कोठेही झाला असेल तरी महिला कोणत्याही पोलिस स्टेशनला तक्रार नोंदवू शकते पोलिस तक्रार नोंदवून घेण्यास नकार देऊ शकत नाही

(२२) बलात्कार प्रकरणात मोफत कायदेशीर सल्लागार व मदत मिळविण्याचा अधिकार महिलेला असतो

(२३) बलात्कार पीडितेला पोलिसात तक्रार न करता डॉ कडे वैद्यकीय तपासणीसाठी जाता येते

(२४) बलात्कार झाला किंवा याबाबत डाॅकटरचे मत हा अंतिम पुरावा ग्राह्य धरला जात नाही

(२५) ब्रिथलायझर चाचणीस नकार दिला तर एखाद्याला मद्यपान केल्याच्या आरोपावरून अटक करण्यासाठी पोलिसांना वाॅरंटची गरज नसते

(२६) महिला आरोपीला महिला पोलिसच अटक करू शकते तेही सकाळी ६ ते संध्याकाळी ६ या काळात

(२७) कामाच्या ठिकाणी महिला आणि पुरुष यांना समान वेतन मिळण्याचा हकक असतो

   समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

कुटुंब आणि महिला

कुटुंब आणि महिला



               कुटुंब हा आपल्या खाजगी विश्वातील सर्वात प्राथमिक घटक असतो आपण कुटुंबात राहतो म्हणजे काय ? आपल्या कुटुंबात महिलांना कोणते स्थान असते ? आपली दिनचर्या कशी असावी कोणत्या नियमानुसार असावी ? याचा आपणच विचार करायला हवा का ? केवळ आहार. निद्रा. व आपल्या अन्य गरजा या चार भिंतींच्या आत करतो का ? आपण भावनिक व नात्याने आपल्या घरातल्या लोकांशी भावनिकदृष्ट्या जोडलेले असतो

याचाच अर्थ कमी अधिक प्रमाणात कुटुंबातील इतर मंडळींबरोबर सहजीवन असाच होतो बहुतेक सर्व भारतीय मनाने आपल्या कुटुंबियांशी पक्के जोडलेले असतात आपले कुटुंब आपले घराणे. घराण्याचा इतिहास. याबद्दल आपल्याला अभिमान असतो कुटुंबात आधार मिळतो असा बहुतेकांचा विश्वास असतो तसेच कौटुंबिक जीवनामुळे सुरक्षितता मिळते असाही अनेकांचा अनुभव असतो कौटुंबिक जबाबदाऱ्या. आपत्ती या गोष्टी कुटुंबात प्रत्येकाने आपापल्या परीने आल्या तरीही पालनपोषण. वृधदपकाळ सुरक्षितता. आजारपणात सेवा. यांसारखे फायदेही कुटुंबात आपल्या वाट्याला येतात



            आज कुटुंब रचनेप्रमाणे एकत्र कुटुंब. आणि विभक्त कुटुंब. असे प्रकार पहावयास मिळतात भारतात पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती बघायला मिळत होती त्यात प्रामुख्याने कुटुंबातील लोकांचे आचार विचार संस्कार शिक्षण हे घरातील वडीलधारी लोक देत असत. एखादा कार्यक्रम सुध्दा कुटुंबातील सर्व सदस्य याच्या विचारांवर अवलंबून होता आत्ता विभक्त कुटुंबांचे उधाण आले आहे त्यात प्रामुख्याने कुटुंबातील लोकांचे आचार विचार संस्कार आणि शिक्षण आर्थिक विचार. सामाजिक विचार हे न राहाता वैयक्तिक विचारांवर भर देण्यात आला आहे त्यामुळे आपल्यात फूट पडली आहे दोघे तिघे भाऊ. त्यांची मुले. हे सर्व एकत्र राहतात ते एकत्र कुटुंब याऊलट पती पत्नी आणि त्यांची मुले त्यांचेच कुटुंब असतें तेव्हा त्याला विभक्त कुटुंब कसे संबोधले जाते औपचारिक अर्थाने अशी विभक्त कुटुंबे आपल्या भोवती बरिच दिसत असली तरी आपला स्वभाव मात्र एकत्र कुटुंब पद्धती याला साजेसा आहे सणासुदीला अशा विभक्त कुटुंबातील सर्व सदस्य आक्का ताई. मावशी. भाऊ एकत्र जमतात तसेच चुलत मावस. अशा नातेसंबंधांचा पक्के पणा अजून आपल्या मनावर खोल रुतून बसलेला आहे आधुनिक काळात सोयीसाठी वेगळी कुटुंबे असली तरी जवळच्या दूरच्या नातेवाईक संबंध त्यांचेकडे येणे जाणे देणें घेणे. हे सर्व पारंपारिक एकत्र कुटुंबाला साजेसेच आहे म्हणून आपल्याकडे. सुखात दुःखात चांगल्या वाईट प्रसंगाला. अडचणीला धावून जाणे. हा शब्द रूढ झाला आहे परसपरासंबधामधये जो तुटकपणा अंतराय विभक्त कुटुंबाच्या पध्दतीत गृहीत धरला जातो तो आपल्या कौटुंबिक संबंधांमध्ये फारसा आढळत नाही त्यामुळे मोठा गोतावळा. अनेक जबाबदाऱ्या. आणि गरजेच्या वेळी अनेक आधार असणे ही आपली कौटुंबिक विश्वाची काही वैशिष्ट्ये आहेत पुरुष वर्चस्व हे कुटुंब संस्थेत सर्वात विचार करण्याची बाब आहे रेशनकार्ड पुरुषांच्या नावांवर. जमीन जागा ईस्टेट पुरुषाच्या नावांवर. मयताला खांदा देण्याचा मान फक्त पुरुषांना. आपलीं कुटुंबे पुरुष प्रधान पध्दतीची असतात घरात कर्ता पुरुष हाच कर्ता आणि कुटुंब प्रमुख मानला जातो अशा वातावरणात वाढल्यामुळे आपलीं जीवनदृष्टी पुरुष शाहीला अनकुल अशी बनते घरातील पुरुष मंडळी म्हणतील ते सर्वांनी न काही बोलता मानायचे अगदी साध्या साध्या बाबींमध्ये पुरुषांच्या आवडीनिवडी ना. प्राधान्य द्यायचे या गोष्टी तुम्हाला सर्वच कुटुंबात आढळतात आता अनेक कुटुंबातील महिला मिळवतया झाल्या आहेत. नोकरीच्या. / कामाच्या निमित्ताने त्या घराच्या बंदिस्त भिंती चौकटी सोडून बाहेर पडल्या आहेत पण त्यामुळे त्यांच्या घरातील स्थानात फारसा फरक पडत नाही महिलांनी नोकरी करावी की नाही इथपासून महिला बद्दल निर्णय पुरुषच घेतात अरथाजनाचया क्षमतेमुळे महिलांचा कुटुंबातील दर्जा उंचावत नाही उलट. घरच्यांचा व पतीचा व समाजातील लोकाचा ताणतणाव वाढतोच घरांची जबाबदारी आणि कामांची जबाबदारी अशा दुहेरी जबाबदारी यांना तोंड देणे कमावत्या महिलेला भाग पडते

याचाच अर्थ महिला केवळ मिळवती झाल्याने कुटुंबाच्या रचनेत फारसा फरक पडत नाही किंवा पुरुषशाहीला फारसा तडा जात नाही



            महिलेचे कुटुंबातील स्थान काय आहे ? असते ? आई. मुलगी. बहिण. सून. वगैरे नातेसंबंधात ती जोडलेली असते या सर्व कौटुंबिक भूमिका पार पाडत असताना तीला आपल्या आरोग्याचे सुध्दा भान राहत नाही हे तर खरेच आहे पण प्रत्त्येक भूमिका पार पाडत असताना महिलेवर विविध मर्यादा देखील पडतात या आणि अशा विविध भूमिकांचे उदात्तीकरण आपण साहित्यात व कवितेत वाचतो पण प्रतक्षपणे आपल्याला व आपल्या कुटुंबाला आपले जीवन खर्च करणार्या त्या माऊलीला घरात फारसे अधिकार नसतात आणि आपण ते देई शकत ऊ नावापुरतेच अधिकार आणि भरमसाठ कर्तव्याचे ओझे महिलांच्या वाट्याला येते घरातील कोणत्याही भूमिकेत महिलांचे घरातील स्थान दुय्यम राहते या दुय्यम स्थानाचे काही फायदे मिळतात असे वाटणे शक्य कुटुंबातील महिला आधार. सुरक्षितता. वगैरे मिळतात व्यवहारिक विवंचणेपासून सुटका मिळते त्याचबरोबर विविध नातेसंबधातून ती महिला कुटुंबाच्या केंदस्थानी राहते वगैरे फायदे वरवर पाहता दिसणे शक्य आहे जणू काही पुरुषप्रधान कुटुंबव्यवस्था ही महिलांच्या हिताची आहे असे चित्र रंगवले जाते पण एक व्यक्ती म्हणून आपल्या कुटुंबात महिलांचे स्थान दुय्यमच असते कोणताही कसलाही निर्णय घेण्याचा अधिकार त्यांना नसतो स्वताच्या विकासाच्या पुरेशा संधी त्यांना या व्यवस्थेत उपलब्ध होतं नाहीत या गोष्टी स्पष्ट दिसतात आपल्या पुरुषप्रधान कुटुंबात महिलांच्या वाट्याला तोटेच अधिक येतात महिलांबाबत समाजात असणार्या प्रचलित गैरसमजुती. महिलांकडून गैरवाजवी अपेक्षा. सासू. सून. भावजय. यासारख्या संबंधाविषयी होणारी टवाळी चर्चा. महिलांच्या कुवतीबाबत पूर्वग्रह या सर्व बाबी कुटुंब व्यवस्थेत महिलेच्या वाट्याला येणारे व्यवहारिक आणि भावनिक तोटेच दाखवून देतात

           पुरुषप्रधान कुटुंबपद्धती मुळे कौटुंबिक व्यवहारात पुरुषांकडे पुढाकार येतो. घरातील सर्व लोकांचे आदराचे. भीतीचे केंद्र म्हणजे कर्ता पुरुष. त्याने इतरांशी सल्लामसलत केली तर ती मोठेपणाचे. औदारयाचे लक्षण मानले जाते. कारण मुळात त्याचा अधिकार सर्वांना मान्यच असतो. केवळ कर्त्या पुरुषाला मान मिळतो असे नाही भाऊ आणि बहीण यात भावाला पक्षपाती वागणूक मिळते सर्वच पुरुषांच्या वाट्याला अशी पक्षपाती वागणूक येते. पुरुषांना ताजे. गरम. अन्न. मिळणे येथपासून ते पुरुषांना चांगले औषध उपचार आणि शुश्रूषा. मिळणे येथपर्यंत विविध लाभ पुरुषांच्या वाट्याला येतात. करमणूक. खेळ. विश्रांती. हे जणू पुरुषाचेच अधिकार मानलें जातात. पुरुषांच्या उणिवा. व्यसनाकडे. गैरवरतनाकडे. कानाडोळा केला जातो. अर्थात एवढे सर्व असूनही कुटुंबाचा भार आपल्यावर आहे सर्व निर्णय आपल्याला घ्यायचे आहेत याचे दडपण पुरुषावर येऊ शकते. पुरुषप्रधानतेमुळे घरच्या कर्त्या पुरुषाला अपेक्षा पूर्ण करण्याचे दडपण येऊ शकते सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पुरुषप्रधान कुटुंबात महिलाप्रमाणे पुरुषही निखळ सहजीवनाला मुकतात ही या व्यवस्थेमुळे होणारी मोठी हाणी समजायला हवी या हाणीमुळे पुरुषही एकाकी. अर्थहीन आणि सुसंवाद नसलेल्या नीरस जीवनाचे वाटेकरी होतात म्हणजेच पुरुषांना वरचे स्थान देणारया या व्यवस्थेत पुरूषांच्या वाट्याला काही दडपणे. तणाव येतात हे आपण सर्वजण रोज बघतो

      महिला जाचक आणि पुरुषांनाही फारशी लाभकारक नसलेली अशी ही पुरूषप्रधान कुटुंबव्यवस्था हा आपल्या खाजगी विश्वाचा एक घटक याच कुटुंबात आपण वाढतो. प्रत्त्येक घरात होणारे संस्कार थोडेफार वेगळे असले तरी या कुटुंबव्यवस्थेचया समान प्रभावाखाली आपण व आपले विश्व नातीगोती आणि पुरुषशाहीचया चौकटीत आकार घेत असतो 

          महिलांचा आदर सत्कार करा. हिंसाचार. हुंडाबळी. छेडछाड विरोधी. समान वागणूक. समान वेतन. 

समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार जाहिरात प्रसिद्ध वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

वाचा -

बॅंक खाजगीकरण - Bank privatiazation ....

कुळकायदा कुळकायदा - Land....

बिगर शेती करणे. बांधकाम परवानगी पध्दती....

आपण जाब विचारु शकतो का ?....

सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा

  सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा            अनुसूचित जाती जमाती. इतर मागासवर्गीय जाती जमाती. भटक्या विमुक्त...

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या