कुटुंब आणि महिला
कुटुंब हा आपल्या खाजगी विश्वातील सर्वात प्राथमिक घटक असतो आपण कुटुंबात राहतो म्हणजे काय ? आपल्या कुटुंबात महिलांना कोणते स्थान असते ? आपली दिनचर्या कशी असावी कोणत्या नियमानुसार असावी ? याचा आपणच विचार करायला हवा का ? केवळ आहार. निद्रा. व आपल्या अन्य गरजा या चार भिंतींच्या आत करतो का ? आपण भावनिक व नात्याने आपल्या घरातल्या लोकांशी भावनिकदृष्ट्या जोडलेले असतो
याचाच अर्थ कमी अधिक प्रमाणात कुटुंबातील इतर मंडळींबरोबर सहजीवन असाच होतो बहुतेक सर्व भारतीय मनाने आपल्या कुटुंबियांशी पक्के जोडलेले असतात आपले कुटुंब आपले घराणे. घराण्याचा इतिहास. याबद्दल आपल्याला अभिमान असतो कुटुंबात आधार मिळतो असा बहुतेकांचा विश्वास असतो तसेच कौटुंबिक जीवनामुळे सुरक्षितता मिळते असाही अनेकांचा अनुभव असतो कौटुंबिक जबाबदाऱ्या. आपत्ती या गोष्टी कुटुंबात प्रत्येकाने आपापल्या परीने आल्या तरीही पालनपोषण. वृधदपकाळ सुरक्षितता. आजारपणात सेवा. यांसारखे फायदेही कुटुंबात आपल्या वाट्याला येतात
आज कुटुंब रचनेप्रमाणे एकत्र कुटुंब. आणि विभक्त कुटुंब. असे प्रकार पहावयास मिळतात भारतात पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती बघायला मिळत होती त्यात प्रामुख्याने कुटुंबातील लोकांचे आचार विचार संस्कार शिक्षण हे घरातील वडीलधारी लोक देत असत. एखादा कार्यक्रम सुध्दा कुटुंबातील सर्व सदस्य याच्या विचारांवर अवलंबून होता आत्ता विभक्त कुटुंबांचे उधाण आले आहे त्यात प्रामुख्याने कुटुंबातील लोकांचे आचार विचार संस्कार आणि शिक्षण आर्थिक विचार. सामाजिक विचार हे न राहाता वैयक्तिक विचारांवर भर देण्यात आला आहे त्यामुळे आपल्यात फूट पडली आहे दोघे तिघे भाऊ. त्यांची मुले. हे सर्व एकत्र राहतात ते एकत्र कुटुंब याऊलट पती पत्नी आणि त्यांची मुले त्यांचेच कुटुंब असतें तेव्हा त्याला विभक्त कुटुंब कसे संबोधले जाते औपचारिक अर्थाने अशी विभक्त कुटुंबे आपल्या भोवती बरिच दिसत असली तरी आपला स्वभाव मात्र एकत्र कुटुंब पद्धती याला साजेसा आहे सणासुदीला अशा विभक्त कुटुंबातील सर्व सदस्य आक्का ताई. मावशी. भाऊ एकत्र जमतात तसेच चुलत मावस. अशा नातेसंबंधांचा पक्के पणा अजून आपल्या मनावर खोल रुतून बसलेला आहे आधुनिक काळात सोयीसाठी वेगळी कुटुंबे असली तरी जवळच्या दूरच्या नातेवाईक संबंध त्यांचेकडे येणे जाणे देणें घेणे. हे सर्व पारंपारिक एकत्र कुटुंबाला साजेसेच आहे म्हणून आपल्याकडे. सुखात दुःखात चांगल्या वाईट प्रसंगाला. अडचणीला धावून जाणे. हा शब्द रूढ झाला आहे परसपरासंबधामधये जो तुटकपणा अंतराय विभक्त कुटुंबाच्या पध्दतीत गृहीत धरला जातो तो आपल्या कौटुंबिक संबंधांमध्ये फारसा आढळत नाही त्यामुळे मोठा गोतावळा. अनेक जबाबदाऱ्या. आणि गरजेच्या वेळी अनेक आधार असणे ही आपली कौटुंबिक विश्वाची काही वैशिष्ट्ये आहेत पुरुष वर्चस्व हे कुटुंब संस्थेत सर्वात विचार करण्याची बाब आहे रेशनकार्ड पुरुषांच्या नावांवर. जमीन जागा ईस्टेट पुरुषाच्या नावांवर. मयताला खांदा देण्याचा मान फक्त पुरुषांना. आपलीं कुटुंबे पुरुष प्रधान पध्दतीची असतात घरात कर्ता पुरुष हाच कर्ता आणि कुटुंब प्रमुख मानला जातो अशा वातावरणात वाढल्यामुळे आपलीं जीवनदृष्टी पुरुष शाहीला अनकुल अशी बनते घरातील पुरुष मंडळी म्हणतील ते सर्वांनी न काही बोलता मानायचे अगदी साध्या साध्या बाबींमध्ये पुरुषांच्या आवडीनिवडी ना. प्राधान्य द्यायचे या गोष्टी तुम्हाला सर्वच कुटुंबात आढळतात आता अनेक कुटुंबातील महिला मिळवतया झाल्या आहेत. नोकरीच्या. / कामाच्या निमित्ताने त्या घराच्या बंदिस्त भिंती चौकटी सोडून बाहेर पडल्या आहेत पण त्यामुळे त्यांच्या घरातील स्थानात फारसा फरक पडत नाही महिलांनी नोकरी करावी की नाही इथपासून महिला बद्दल निर्णय पुरुषच घेतात अरथाजनाचया क्षमतेमुळे महिलांचा कुटुंबातील दर्जा उंचावत नाही उलट. घरच्यांचा व पतीचा व समाजातील लोकाचा ताणतणाव वाढतोच घरांची जबाबदारी आणि कामांची जबाबदारी अशा दुहेरी जबाबदारी यांना तोंड देणे कमावत्या महिलेला भाग पडते
याचाच अर्थ महिला केवळ मिळवती झाल्याने कुटुंबाच्या रचनेत फारसा फरक पडत नाही किंवा पुरुषशाहीला फारसा तडा जात नाही
महिलेचे कुटुंबातील स्थान काय आहे ? असते ? आई. मुलगी. बहिण. सून. वगैरे नातेसंबंधात ती जोडलेली असते या सर्व कौटुंबिक भूमिका पार पाडत असताना तीला आपल्या आरोग्याचे सुध्दा भान राहत नाही हे तर खरेच आहे पण प्रत्त्येक भूमिका पार पाडत असताना महिलेवर विविध मर्यादा देखील पडतात या आणि अशा विविध भूमिकांचे उदात्तीकरण आपण साहित्यात व कवितेत वाचतो पण प्रतक्षपणे आपल्याला व आपल्या कुटुंबाला आपले जीवन खर्च करणार्या त्या माऊलीला घरात फारसे अधिकार नसतात आणि आपण ते देई शकत ऊ नावापुरतेच अधिकार आणि भरमसाठ कर्तव्याचे ओझे महिलांच्या वाट्याला येते घरातील कोणत्याही भूमिकेत महिलांचे घरातील स्थान दुय्यम राहते या दुय्यम स्थानाचे काही फायदे मिळतात असे वाटणे शक्य कुटुंबातील महिला आधार. सुरक्षितता. वगैरे मिळतात व्यवहारिक विवंचणेपासून सुटका मिळते त्याचबरोबर विविध नातेसंबधातून ती महिला कुटुंबाच्या केंदस्थानी राहते वगैरे फायदे वरवर पाहता दिसणे शक्य आहे जणू काही पुरुषप्रधान कुटुंबव्यवस्था ही महिलांच्या हिताची आहे असे चित्र रंगवले जाते पण एक व्यक्ती म्हणून आपल्या कुटुंबात महिलांचे स्थान दुय्यमच असते कोणताही कसलाही निर्णय घेण्याचा अधिकार त्यांना नसतो स्वताच्या विकासाच्या पुरेशा संधी त्यांना या व्यवस्थेत उपलब्ध होतं नाहीत या गोष्टी स्पष्ट दिसतात आपल्या पुरुषप्रधान कुटुंबात महिलांच्या वाट्याला तोटेच अधिक येतात महिलांबाबत समाजात असणार्या प्रचलित गैरसमजुती. महिलांकडून गैरवाजवी अपेक्षा. सासू. सून. भावजय. यासारख्या संबंधाविषयी होणारी टवाळी चर्चा. महिलांच्या कुवतीबाबत पूर्वग्रह या सर्व बाबी कुटुंब व्यवस्थेत महिलेच्या वाट्याला येणारे व्यवहारिक आणि भावनिक तोटेच दाखवून देतात
पुरुषप्रधान कुटुंबपद्धती मुळे कौटुंबिक व्यवहारात पुरुषांकडे पुढाकार येतो. घरातील सर्व लोकांचे आदराचे. भीतीचे केंद्र म्हणजे कर्ता पुरुष. त्याने इतरांशी सल्लामसलत केली तर ती मोठेपणाचे. औदारयाचे लक्षण मानले जाते. कारण मुळात त्याचा अधिकार सर्वांना मान्यच असतो. केवळ कर्त्या पुरुषाला मान मिळतो असे नाही भाऊ आणि बहीण यात भावाला पक्षपाती वागणूक मिळते सर्वच पुरुषांच्या वाट्याला अशी पक्षपाती वागणूक येते. पुरुषांना ताजे. गरम. अन्न. मिळणे येथपासून ते पुरुषांना चांगले औषध उपचार आणि शुश्रूषा. मिळणे येथपर्यंत विविध लाभ पुरुषांच्या वाट्याला येतात. करमणूक. खेळ. विश्रांती. हे जणू पुरुषाचेच अधिकार मानलें जातात. पुरुषांच्या उणिवा. व्यसनाकडे. गैरवरतनाकडे. कानाडोळा केला जातो. अर्थात एवढे सर्व असूनही कुटुंबाचा भार आपल्यावर आहे सर्व निर्णय आपल्याला घ्यायचे आहेत याचे दडपण पुरुषावर येऊ शकते. पुरुषप्रधानतेमुळे घरच्या कर्त्या पुरुषाला अपेक्षा पूर्ण करण्याचे दडपण येऊ शकते सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पुरुषप्रधान कुटुंबात महिलाप्रमाणे पुरुषही निखळ सहजीवनाला मुकतात ही या व्यवस्थेमुळे होणारी मोठी हाणी समजायला हवी या हाणीमुळे पुरुषही एकाकी. अर्थहीन आणि सुसंवाद नसलेल्या नीरस जीवनाचे वाटेकरी होतात म्हणजेच पुरुषांना वरचे स्थान देणारया या व्यवस्थेत पुरूषांच्या वाट्याला काही दडपणे. तणाव येतात हे आपण सर्वजण रोज बघतो
महिला जाचक आणि पुरुषांनाही फारशी लाभकारक नसलेली अशी ही पुरूषप्रधान कुटुंबव्यवस्था हा आपल्या खाजगी विश्वाचा एक घटक याच कुटुंबात आपण वाढतो. प्रत्त्येक घरात होणारे संस्कार थोडेफार वेगळे असले तरी या कुटुंबव्यवस्थेचया समान प्रभावाखाली आपण व आपले विश्व नातीगोती आणि पुरुषशाहीचया चौकटीत आकार घेत असतो
महिलांचा आदर सत्कार करा. हिंसाचार. हुंडाबळी. छेडछाड विरोधी. समान वागणूक. समान वेतन.
समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार जाहिरात प्रसिद्ध वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी
बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर
रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा
रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा
मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा
माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा
संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे
९८९०८२५८५९
वाचा -
बॅंक खाजगीकरण - Bank privatiazation ....
No comments:
Post a Comment