पालथ्या घड्यावर पाणी
आपले पूर्वज सांगून गेले आहेत. जी गोष्ट आपण एक वेळा नव्हे तर हजार वेळा सांगून सुद्धा ऐकत नसेल तर त्याला * पालथ्या घड्यावर पाणी * अस म्हणलं जातं शाळेत शिक्षक शिकवित असताना आपलं ध्यान नसतं त्याला काहीही करा पालथ्या घड्यावर पाणी अस म्हणलं जातं समाजातील व्यवहारातील काही प्रश्न यांवर सडेतोड लिखाण करून कानाकोपऱ्यातील लोक हुशार सतर्क करण्याचा प्रयत्न करत असतात ते काय खुळे आहेत कां ? त्यांच्या काय डोक्यावर परिणाम झाला काय ?
आपले गाव तालुका जिल्हा राज्य देश यामध्ये सुधारणा करण्यासाठी शासकीय योजना मग त्या ग्रामीण भागात असो अथवा शहरी भागातील लोकांना असो यासाठी शासनाने त्या त्या विभागात एक सतर्क कर्तव्य दक्ष अधिकारी व कर्मचारी नेमला आहे. समजा पहिली गाव लहान होती गावांत वाहनांची. लोकसंख्या कमी असल्यामुळे लोकांची रेलचेल कमी होती. कोणताही कोणालाही कसलाही त्रास नव्हता. आज प्रस्थिती उलट आहे लोकसंख्या झपाट्याने वाढली गावाचे रूपांतर शहरांत झाले. सायकल काळाच्या पडद्याआड गेली. आणि सर्वत्र चार चाकी वाहने आली. लोकांच्या जीभेचे चोचले वाढले आणि जागोजागी वडापाव. चायनीज भेळ रेसिपी. दाबेली. असे विविध खाद्यपदार्थ विक्री करणारे दुकानें यांची संख्या वाढली. लोकसंख्या वाढल्यामुळे राहण्याचा प्रश्न गंभीर झाला लोक ग्रामपंचायत नगरपालिका महानगरपालिका यांनी शहरातील लोकांना मोकळा श्वास घेता यावा. शहरातील गावातील प्रत्येक घरापर्यंत. पोलिस गाडी. अॅमबुलनस. अग्निशमन. कचरा गाडी. फवारणी यंत्र. अश्या विविध अडचणी वेळी ही सर्व वाहने लोकांच्या दारापर्यंत पोहोचावी वाहन गर्दि मुळें शाळेत जाणारी मुले. पादचारी लोक. दैनंदिन गरजांसाठी बाहेर पडणारे लोक. यांना अपघातांना सामोरे जावे लागते म्हणून ग्रामीण भागात शहरी भागात मोठे मोठे रस्ते त्या त्या भागांची शान वाढावीत असतांत. पण आज उलट झाल आहे ग्रामीण भागातील असो वा शहरी भागातील असो लोकानी आणि विविध खाद्यपदार्थ विक्री करणारे यानी आपली दुकाने घराच्या पायर्या रस्त्यावर आणल्या आणि वाहतूकीला व लोकांना ये जा करण्यासाठी अडथळा होण्यास सुरुवात झाली आणि अपघातांचे प्रमाण वाढले.
. ग्रामीण भागातील ग्रामसेवक आणि शहरातील मुख्य अधिकारी. यांच्या हातात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी अधिकार शासन देते पण त्या त्या गावातील शहरातील राजकारणी हा माझा आहे तो येथेच राहणार त्याला कोण उठवतो बघतो लोकांमुळे हे अधिकार वापरण्यासाठी अडचणी येतात मग एक वेळ येते आणि ग्रामपंचायत नगरपालिका महानगरपालिका यांचा कार्यकाळ संपतो आणि सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयाचा कारभार प्रशासक यांच्या हातात जातो आणि मग गावांचा शहरांचा विकास करण्यासाठी प्रशासक रस्त्यावर उतरतात आणि ज्या ज्या लोकांनी शासकीय जागेवर अतिक्रमण केले आहे त्यांचे अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली जाते. बाजारात फळें फुले भाजीपाला विक्री करणारे दुकानें. रस्त्यावर ठाण मांडून बसतात त्यांना सुद्धा व्यवस्थित बसणे की ज्यामुळे वाहने ये जा करणारी लोक यांना त्रास होणार यासाठी प्रशासक झटत असतात. प्रशासकाचा कोणाबरोबर वैर वाद नाही हा माझा तो माझा महणयाचा संबंध येत नाही. प्रशासक म्हणून काम पाहणारा अधिकारी आपले गाव समजतो. आपली नगरपालिका समजतो आणि काम करतो मग आपल्या स्तरावरील नगरसेवक नेते पुढारी आमदार खासदार मंत्री यांच्याकडून दबाव येण्यास सुरुवात होते. अशावेळी प्रशासक म्हणून कार्यभार सांभाळणारा अधिकारी व कर्मचारी यांनी फक्त आणि फक्त आपले कर्तव्य सांभाळले पाहिजे. कोणाचाही दबाव असेल तर जास्तीत जास्त काय करतील बदली पण मी माझ्या कामाशी प्रामाणिक राहीन असे म्हणणारे अधिकारी पाहीजेत
प्रशासक शहराला व गावाला मोकळा श्वास घेता यावा म्हणून अतिक्रमण मोहीम राबविण्यात येते सुरवातीला सर्वजण आपलेच शहरं व गाव म्हणून प्रशासक अधिकारी यांच्या म्हणण्यानुसार अतिक्रमण काढतात आणि काही दिवसांनी पुन्हा शहरं गाव पहिलें होतें तसे रेलचेल मध्ये श्वास घुटमळतो म्हणजे शासन आणि प्रशासक यांनी आपणांस जे काय सांगितले ते सर्व पालथ्या घड्यावर पाणी असाच प्रकार आहे यात आपलाच फायदा होता पण आपणं ऐकून न ऐकल्या सारखे करतो
ग्राहकांची फसवणूक व्यापारी लोक करतात त्यासाठी ग्राहकांचं प्रबोधन संबोधन करण्यासाठी सुटसुटीत पध्दतीने लिखाण करणारे बरेच लोकं आहेत. वस्तूंची निर्मिती. वस्तूंची ठेवन. वस्तूंची एक्सपायरी डेट. भेळमिसळ. अशी विविध माध्यमातून ग्राहकांची लुट आणि फसवणूक केली जाते जनजागृती करण्यासाठी विविध माध्यमातून अंमलबजावणी केली जाते पण आपण कधीच गांभीर्याने घेत नाही यांचाच अर्थ असा होतो की पालथ्या घड्यावर पाणी ओतलयासारखे आहे
बांधकाम कामगार यांची महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई यांचेकडून बांधकाम कामगार यांच्यासाठी १९ कल्याणकारी योजना राबविण्यात येतात यात सुध्दा बांधकाम कामगार यांचें सहहयक कामगार आयुक्त भवन मधील अधिकारी व कर्मचारी. संघटना सेवाभावी संस्था युनियन एजंट यांच्याकडून मानसिक आर्थिक शोषण केले जाते यासाठी सुध्दा वेळोवेळी बांधकाम कामगार जनप्रबोधन जनजागृती करण्यासाठी मॅसेज द्वारे विविध माध्यमातून बांधकाम कामगार यांना हुशार सतर्क करण्याचा प्रयत्न केला जातो पण आज तीन हजार मॅसेज माझे पूर्ण झाले पण आजपर्यंत मला एकाही बांधकाम कामगार यांचा फोन सुध्दा आला नाही याचा अर्थ असा होतो की मला खुळ लागलंय म्हणून मी सर्व बांधकाम हीताची माहिती पाठवितो मग पालथ्या घड्यावर पाणी हे खरोखरच खर आहे
व्यसनमुक्ती साठी शासन विविध कार्यक्रम राबवित आहे त्यानुसार सिगरेट. विडी. अफू गांजा चरस. दारू. गुटखा. तंबाखू. खैनी. पेनी.पाऊडर पान अशी विविध प्रकारची व्यसनाधीनता तयार करणारी उत्पादने यांवर मोठ्या अक्षरांत लिहिलेलं असतं व्यसनामुळे मृत्यू निश्चित आहे तरीपण आपण बघतो की आजची तरूण पिढी बरबाद होत आहे. पानटपरी. दारू दुकान. व विविध नशेच्या दुकानदार छापे मारण्यापेक्षा जेथे हे नशेचे पदार्थ तयार होतातच त्या कारखान्यांना कुलप घाला पण नाही कारणं हे सर्व कारखाने नेते पुढारी आमदार खासदार मंत्री यांचेच आहेत म्हणजे शासन व विविध व्यसनमुक्ती केंद्र. समाजातील संस्था व्यसन मुक्ती साठी वेळोवेळी जनजागृती संबोधन प्रबोधन करत आहेत पण आज मात्र आपल वागन आहे ते म्हणजे पालथ्या घड्यावर पाणी
रेशन म्हणजे गोरगरिबांचा हक्काचा घास पण आज हा घास मोठ्यांच्या पोटात जात आहे त्याला कारणीभूत आहेत ते म्हणजे पुरवठा अधिकारी. तालुका पुरवठा अधिकारी. शिधावाटप अधिकारी. गोदाम निरिक्षक. अन्न व नागरी पुरवठा विभाग. याचा बोगस कारभार रस्त्यावर आणण्यासाठी लिखाण रोज करतो पण अजून सुद्धा लोकांच्यात जनजागृती संबोधन प्रबोधन झालेले दिसत नाही एजंट दलाल अधिकारी व कर्मचारी ग्राहकांना लुटतच आहेत. गोरगरीब जनतेला धान्य नाही ज्याला मिळत तो जनावरांना घालतो हाच आहे २००५ चा दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाचा सर्वे किती सापेक्ष झाला आहे हे आपल्या ध्यानात येईल. रेशन दुकानदार धान्य देतच नाही. दिले तर हक्काचं नाही. एका व्यक्तिला चार चार रेशन दुकाने चालवायला आणि हजारो गरजू लोकांचे अर्ज धुळखात पडले आहेत कार्यालयात. आमच्या युनियनचा रेशन दुकान मागणी अर्ज २०१९ पासून जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या कार्यालयात आहे का कचरयाचया कुंडीत आहे काय माहित ? म्हणजे सर्व प्रकार पालथ्या घड्यावर पाणी असाच आहे हे खोट नाही
भ्रष्टाचार हा सर्वात मोठा साप आ वासून आपल्यापुढे उभा आहे. म्हणजे. स्टॅम्प घेताना १०० चा १२० रुपये. महसूल विभाग म्हणजे भ्रष्टाचाराचा मोठा अडडाच आहे. फेरफार सातबारा. विविध नोंद. नोंद वारस अशा विविध अर्जाच्या निकालासाठी ठराविक दर ठरला आहे. रेशन कार्ड काढण्यासाठी २०००/२५०० रूपये. जातपडताळणी प्रमाणपत्र तयार करण्यासाठी एक आर्थिक हिस्सा. विविध पेन्शन योजना मिळविण्यासाठी पैसे दिल्याशिवाय कामच होत नाही बाजारात पावती फाडली जाते एकच पावती रक्कम दोन वेळा. एकावर पाच रूपये. एकावर दहा रूपये पण लिहल जात दोन ठिकाणी. काहीजणांना पावती दिली जाते तर काही जणांचे नुसतेच पैसे घेतले जातात. फळें व इतर गाडे लावण्यासाठी टारफिक अधिकारी पैसे घेतात. घरफाळा पाणीपट्टी थकबाकी झाली की दंड आणि दंडाला व्याज लावून वसुली केली जाते. आम्ही जनजागृती संबोधन प्रबोधन करण्याचा प्रयत्न करतो पण आज पालथ्या घड्यावर पाणी असाच प्रकार आहे लोकांचा
डॉ. मेडिकल. नर्स यांच्याकडून होणारी लूट भयानक आहे कारणं दवाखान्यात रूग्ण हक्काची सनद नाही. दवाखान्यात आजाराप्रमाणे उपचार करण्यासाठी दर पत्रक नाही. उपचार निवडण्याची संधी नाही. योजनांची माहिती सांगणारे रुग्ण सहहयक नाहीत. योजनेची माहिती डॉ सांगत नाहीत. दवाखान्याचे मेडिकल डॉ कमिशन काढून रुग्णाला औषध विक्रि केले जाते. मेडिकल वाले दहा रूपयांचे पाकिट पण मेडिकल मध्ये एक गोळी दहा रूपयला विकली जाते. म्हणजे कसली लुट म्हणायची ही आम्ही जागृती करण्याचे पण केले आहे तरि सुध्दा जनतेच्या पालथ्या घड्यावर पाणी आमचे सर्व प्रयत्न वाया जाणार काय
. समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार जाहिरात प्रसिद्ध वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी
बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर
रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा
रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा
मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा
माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा
भ्रष्टाचारविरोधी जन आक्रोश महाराष्ट्र राज्य पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष
संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे
९८९०८२५८५९