नवी दिल्ली : (03.02.2022)
एम आय एम प्रमुख बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी यांच्यावर
चार राउंड गोळीबार करण्यात आला. हल्ले खोर तीन-चार लोक होते, ते सर्व तेथे शस्त्रे टाकून पळून गेले असे बॅरिस्टर
ओवेसी यांनी ट्विट केले. गोळीबारात असदुद्दीन ओवेसी यांच्या कारचे नुकसान झाले.
एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी हे उत्तर प्रदेशातील मेरठमधील किथौर येथे प्रचार कार्यक्रम नंतर दिल्लीला जात असताना काही अज्ञात व्यक्तीने त्यांच्या वाहनावर गोळ्या झाडल्या. या घटनेचा तपास हापूर पोलीस करत आहेत.
हल्लेखोर फरार झाले असून या हल्ल्यात कोणतीही जीवित हानी झालेली नाही.
एका पक्षाचे प्रमुख जर उत्तर प्रदेश मध्ये सुरक्षित नसेल तर सामान्य जनतेचा काय ? हा एक मोठा प्रश्न आहे. मागेही बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी यांच्या दिल्ली निवास्थानी घरावर हमला झाले होते त्यात त्यांचा रखवालदार जखमी झाले होते. विशेष मंजे खासदार ओवेसी यांच्या दिल्लीच्या घरासमोर पोलीस स्टेशन आहे.
No comments:
Post a Comment