मुस्लिमांची कट्टरता - Mujahid Shaikh

मुस्लिमांची कट्टरता -  मुजाहीद शेख 




अत्यंत विचारपूर्वक आणि धुर्तपणे मुस्लिमांशी कट्टर हा शब्द जोडण्यात आला आहे, परिणामतः या देशात कट्टर म्हणताच केवळ मुस्लिमांची प्रतिमा उभी राहते. 

या देशात विविध समाजातील, जाती धर्मातील लोक दाढी राखतात, विशेषतः शीख धर्मातील; तसेच अनेक मराठा बांधव शिवप्रेमापोटी दाढी राखतात; परंतु मुस्लिमांनी दाढी राखणे म्हणजे कट्टरता.

या देशात विविध जातीधर्माचे लोक डोके झाकतात, विशेषतः शीख लोक धार्मिक परंपरा म्हणून पगडी घालतात; परंतु मुस्लिमांचे टोपी घालणे म्हणजे कट्टरता.

या देशात विविध जातीधर्मातील लोकांचे विविध पेहराव आहेत आणि त्यांना तसे पेहराव करण्याचे स्वातंत्र्यही आहे. उदा. उदा. दक्षिणेकडचे अनेक लोक अगदी केंद्रीय मंत्रिमंडळाचे सदस्य झाले तरीही लुंगीच घालतात. काही धर्म विशेषशी संबंधित असणारे लोक निर्वस्त्र राहण्यास प्राधान्य देतात. त्यांचे विधिमंडळात व्याख्यानही आयोजित केले जाते. मात्र मुस्लिमांचा पोशाख म्हणजे कट्टरता.

या देशात ख्रिस्ती नन सर्वांग झाकणारा पोशाख परिधान करतात. चित्रपट, मालिका आणि धारावाहिकांमधून त्यांना अत्यंत पवित्र, सोज्वळ म्हणून सादर केले जाते. मात्र मुस्लिम स्त्रियांचा बुरखा म्हणजे कट्टरता.

या देशात सर्व जातीधर्माचे आपापले धार्मिक स्थळ आणि ज्ञान केंद्रे आहेत. सर्व जातीधर्मातील लोक आपापल्या धार्मिक स्थळांना आणि ज्ञान केंद्रांना भेटी देतात. मात्र मुस्लिमांचे धार्मिक स्थळ मस्जिद आणि ज्ञान केंद्र मदरसा म्हणजे कट्टरता.

Family Health Survey च्या अधिकृत आकडेवारीनुसार भारतात 75 टक्केपेक्षा जास्त लोक मांसाहारी आहेत. विशेषतः भारतातील क्षत्रिय आणि शूद्र वर्ग पूर्णतः मांसाहारी आहेत. लपून छापून मांसाहार करणारे वैश्य आणि ब्राह्मणही काही कमी नाहीत. तरीही केवळ मुस्लिमांचा मांसाहार म्हणजे कट्टरता.

या देशात प्रत्येक जातीधर्माची अभिवादानाची आपली एक पद्धत आहे. ते सर्व एकमेकांना त्यांच्या परंपरेनुसार अभिवादन करतात. परंतु मुस्लिमांनी अन्य मुस्लिमांना 'सलाम अलैकुम' म्हणणे म्हणजे कट्टरता.

या देशात विविध समूहांच्या विविध मातृभाषा आहेत. त्या भाषांना जपण्याचे त्यांना स्वातंत्र्यही आहे. तसेच त्या भाषांचे जतन, संवर्धन आणि विकास करण्याचा संवैधानिक हक्कही आहे. मात्र मुस्लिमांनी उर्दू भाषेबद्दल प्रेम दाखवणे म्हणजे कट्टरता.

मुळात 'कट्टर'तेचे लेबल लावून मुस्लिमांची अभिव्यक्ती दाबण्यात आली आहे. मुस्लिमांच्या मुस्लिम म्हणून व्यक्त होण्याला अत्यंत धुर्तपणे कट्टरता ठरविण्यात आले आहे. मुस्लिमांचे मुस्लिमत्व जपणेच कट्टरता ठरविण्यात आले आहे. असे करून अत्यंत धुर्तपणे मुस्लिमांची अभिव्यक्ती मुस्लिमांकडून काढून इतरांच्या हाती देण्यात आली आहे. आता ते सांगतील तीच मुस्लिमांसाठी पूर्वदिशा असेल. त्यांच्या विचारांशी मुद्देसूद मतभेद करून त्यांचे खंडन करणारा कोणी मुस्लिम उभा राहत असेल तर म्हणे कट्टरता. का? कारण मुस्लिम आपली अभिव्यक्ती त्यांच्याकडून परत घेऊ पाहतोय.

मुजाहीद शेख 

https://m.facebook.com/story.php?story_fbid=201589934750595&id=100046987687696

संविधान भारताचा आत्मा आहे -Shahid Shaikh...

सूल्तान_महमूद_ग़ज़नवी - Mahemood Gajnavi.....

मोगलांचा शासनकाळ व प्रजा - Muzaffar Sayyed .....

मुज़फ्फर अहमद उर्फ काका बाबू - INDIAN FREEDOM FIGHTER .....

इतिहास किती विक्रुत कराल ?...


No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा

  सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा            अनुसूचित जाती जमाती. इतर मागासवर्गीय जाती जमाती. भटक्या विमुक्त...

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या