मुस्लिम वारस नियम
मुस्लिम Law part १
मुस्लिम कायदा हा मुस्लिम धर्मियांचा व्यक्तिगत कायदा असून तो जगभरातील धर्मियांसाठी लागू आहे. मुस्लिम कायद्याचे मूळ पुढील चार तत्वावर आधारित आहे. (१) कुराण (२) सुनना. (३) इजमा (४) कियास. याशिवाय इतिहासन, इतिलाह, रुढी परंपरा कायदे हि दुय्यम दर्जाची स्त्रोत आहे
. मुस्लिम कायद्यानुसार मुस्लिम समाजात प्रामुख्याने दोन शाखा आहेत. त्यासुद्धा मुस्लिम बांधवांनी आप आपल्या सोयीनुसार केल्या आहेत. (१) शिया. (२) सुन्नी.
मुस्लिम समाजात लग्न निकाह, घटस्फोट तलाक., मेहर मंजे लग्नाआधी नवरदेवाने नवर्या मुलीला देण्याची रक्कम बक्षीस पत्र, हिबा मृत्यू पत्र. वसियतनामा, वारसा हक्क, पालनपोषण हक्क, अज्ञान पालकत्व, वफत आदी सर्व बाबी मुस्लिम कायधयांनवये पार पाडल्या जातात.
. ब्रिटिश राजवटीत मुस्लिमांसाठी काही कायदे केले गेले त्यातील शरियत ॲक्ट १९३७ हा महत्वाचा कायदा आहे
शरियत ॲक्ट हा. ७ आक्टेबर १९३७ रोजी अमलात आला याचा मुस्लिम धर्मियांचा व्यक्तिगत कायदा असे म्हणले जाते. या कायद्यातील कलम २ अन्वये. रुढी परंपरा विरुद्ध असली तरी शेत जमीन सोडून इतर अन्य बाबी जसे वारसा हक्क. सत्रिची विशेष संपत्तीी, निकाह. तलाक. उदरनिर्वाह. मेहर. पालकत्व. बक्षीस. न्यास मालमत्ता. वफत या सर्व बाबी मुस्लिम व्यक्तिगत कायद्यान्वये ठरविले जातात. त्यासाठी अटि म्हणजे (१) व्यक्ति मुसलमान असावी. (२) भारतीय करार कायद्यातील कलम ११ अन्वये व्यक्ती करार करण्यास सक्षम असावी. (३) हा कायदा ज्या प्रदेशात लागू पडतो त्या प्रदेशातील रहिवासी असावी.
हिंदू उत्तराधिकार. अधिनियम १९५६ चे तरतुदी मुस्लिम धर्मियांना लागू होत नाहीत. त्यांच्या मिळकतीचे वारस मुस्लिम व्यक्तिगत. पर्सनल लॉ. कायद्यातील तरतुदी प्रमाणे ठरविले जाते. मुस्लिमांच्या वैयक्तिक कायद्याप्रमाणे हनाफि सुन्नी आणि शिया अशा दोन्ही पंथाचे वारस कायदे वेगवेगळे नियम आहेत
मुस्लिम वारसा हक्क कायदा. (१) पवित्र कुराण. (२) सुन्नी प्रेषिताला मानणारे (३) इझमा एका ठराविक मुद्द्यावर निर्णय घेताना समाजातील सुशिक्षित लोकाचा विचार घेणारे (४) किया देवाने जे चांगले आणि योग्य ठरवून दिले आहे त्याच सामाजिक आर्थिक मानसिक सुधारणा करणारे.
मुस्लिम व्यक्तिगत कायद्याप्रमाणे वारसा विषयक सर्वसाधारण नियम करण्यात आले आहेत.
. अमान्य संकल्पना. इंग्रजी कायद्यात असलेला #. स्थावर मालमत्ता संपत्ती # व जंगम मालमत्ता संपत्ती. असा भेद मुस्लिम कायद्यात केला जात नाही हिंदू कायद्यामध्ये असलेला. #. वडिलोपार्जित संपत्ती # आणि स्व संपादित संपत्ती असा भेद मुस्लिम कायद्यात नसतो. मुस्लिम कायद्यात संयुक्त किंवा एकत्र कुटुंब ही संकल्पना नसते. मुस्लिम व्यक्तिची सर्व मालमत्ता त्यांच्या एकट्याच्या मालकिची असते. व तो मृत झाल्यावर तिच्या वारसदार यांचेकडे हिशयाप्रमाणे प्रक्रांत होते. मुस्लिम कायद्याला#. जन्मसिद्ध अधिकार. # मान्य नाही मुसलमान व्यक्तिचा वारसधिकार पूरवसवामीचया मृत्यू नंतरचं होतो. पूर्व स्वामी जीवंत असताना केवळ जन्मामुळे कोणालाही वडिलोपार्जित संपत्तीत काहीही हितसंबंध निर्माण होऊ शकत नाही. तसेच कोणी हस्तांतर केले तर ते बेकायदेशीर ठरते. मुस्लिम कायद्याला प्रतिनिधित्व मान्य नाही. मात्र याबाबतीत शिया आणि सुन्नी यांच्या नियमात फरक आहे. वारस मृत्यू वेळी ठरतात.
वारसाधिकार. मुस्लिम कायद्यानुसार महिलांना वारसा अधिकार नसतो. मात्र नात्यांच्या दृष्टीने एकाच स्तरावरील महिला व पुरुषाला. महिलेपेक्षा दुप्पट हिस्सा मिळतो. अनौरस संततीला वडिलांचा हिस्सा मिळत नाही. पण आईचा मिळतो. मनुष्य वध करणार्या व्यक्तिला वारसाधिकार मिळत नाही
हनाफी ( सुन्नी ) वारसा नियम. नुसार. मुस्लिम कायद्यानुसार वारसदाराचे सात वर्ग करण्यात आले आहे त्यापैकी तीन वर्ग प्रमुख असून चार दुय्यम वर्ग आहेत
वारसाचे सात वर्ग. हनाफी नियमानुसार वारसाचे सात वर्ग आहेत तिन प्रमुख वर्ग. (१) हिस्सेदार. (२) अवशिषटग्राही. (३) दुरचे नातेवाईक या तीन वर्गामध्ये. गोत्रज. असोत किंवा भिन्न गोत्रज. असे मृतांचे सर्व रक्त संबंधी नातेवाईक त्यांच्या निवाय नवरा बायको ही विवाहाने नातेवाईक झालेली वयकतिही येते. वरिल तीन वर्गात कोणी वारस नसल्यास अपवाद म्हणून दुय्यम वारसदार उत्तराधिकारी होतात
चार. दुय्यम वर्ग. (४) संविदा निर्मित उत्तराधिकारी (५) अभिसवीकृत. नातेवाईक. (६) एकमेव उततरदानग्राही. ( ७) वरील ४ ते ६ यांच्या अभावी सरकार.
तीन प्रमुख वर्ग या वर्गामध्ये मृतांचे काही निकटचे नातेवाईक येतात. त्यांना पवित्र कुराण विनिर्दिष्ट हिस्सा देण्यात आला आहे. म्हणून त्यांना प्रमुख वारसदार म्हणतात नवरा बायको हे विवाहसंबधाने नातेवाईक धरून हिससेदारांचा संखया बारा आहे
माहिती उद्याच्या मॅसेज मध्ये
समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार जाहिरात प्रसिद्ध वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी
बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर
रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा
रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा
मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा
माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा
संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे
९८९०८२५८५९
nice sahab
ReplyDeleteThank you
Deletenice
ReplyDeletevery nice information dr.sahab
ReplyDeleteThank you
Delete