आपल्याला शासकीय निमशासकीय योजनांचा लाभ सापेक्ष पणे मिळावा यासाठी शासनाने विविध सेवा सुविधा साठी विविध शासकीय कार्यालये जनतेच्या हितासाठी तयार केली आहेत. त्या कार्यालयाकडून जनतेला निःपक्षपाती पणाने सरकारी योजनांचा लाभ योजना संबधी माहिती मिळावी त्या योजनांसाठी असणारा पत्र व्यवहार त्यासाठी लागणारी कागदपत्रे यांची माहिती देणे कोणते दाखले किती दिवसात द्यायचे. साठी त्या त्या विभागात विविध पदांची अधिकारी व कर्मचारी यांची निवड केली जाते
पण आज अधिकारी व कर्मचारी आपली जबाबदारी सापेक्ष पणे पार पाडत नाहीत. आणि जर एखादा नागरिक आपल्या व आपल्यावर झालेल्या अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी अधिकारी व कर्मचारी यांच्या कार्यालयात गेला तर अधिकारी व कर्मचारी यांची जरी चूक असेल तरी सुद्धा आपल्याला शासकीय कामांत अडथळा आणला आम्हाला माराहान अंगावर आले आम्हाला खंडणी मागितली अशी कोणताही आधार नसलेली कारणें सांगून आपणांस भिती घालण्याचे काम केले जाते त्याला कोणताही पुरावा नाही असे होत नाही असे म्हणता येणार नाही काही ठिकाणी खरोखरच शासकीय अधिकारी यांचेवर प्राणघातकी हल्ले झालेले आपण बघतो वाचतो
शासनाने वरील प्रमाणे सर्व अधिकारी व कर्मचारी यांचा विचार करून शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना संरक्षण देण्यासाठी शासकीय अधिकारी यांच्या बाबतीत कोणताही शासकीय कामांत अडथळा आणणारे काम केले तर त्यासाठी कोणती शिक्षा व कोणत्या कलमांच्या आधारें हे ठरवले जाते यासाठी तरतूद करण्यात आली आहे
(१) सरकारी कर्मचारी यांच्यावर हल्ला
* खुनाचा प्रयत्न करणे *इचछपूरवक दुखापत केल्यास *इच्छा पुर्वक जबर दुखापत केल्यास कलम ३२० नुसार *घातक हत्याराने जबर दुखापत केल्यास*अवैध कृती करण्याच्या उद्देशाने जबर दुखापत*लोक सेवकास कर्तव्यापासून परावृत्त करण्यासाठी जबर दुखापत * इतरांचे जीवीत व व्यक्तिगत सुरक्षितता आणणरया कृतीने दुखापत) जबर मारहाण करणे * कोणतेही कारणं नसताना हमला किंवा फौजदारी बल प्रयोग करणे * अशा कामांसाठी अपप्रेरणा देणारी व्यक्ती असल्यास
# कलम व शिक्षा #
३०७/३२३/३२५/३२६/३२७/३३२/३३३/३३७/३५२/३५३/१०९/११४/३४/
# १० वर्ष. १ वर्ष. १० वर्ष. ३ वर्ष. ६महिने. २ वर्ष. ३ महिने. २ वर्ष
(२) जमाव करून सरकारी कर्मचारी यांना दमदाटी व शिवीगाळ करणे
* देह. लौकिक व मालमत्ता यास हाणी पोचविण्याची धमकी दिल्यास *निनावी संदेशांद्वारे धमकी देणें * अशा कामांसाठी अपप्रेरणा देणारी व्यक्ती
# कलम आणि शिक्षा #
३५३/३४/५०६/५०८/११४/
शिक्षा. २ वर्ष. २ वर्ष
(३) जबरदस्तीने कार्यालयात घुसणे व साहित्याची मोडतोड करणे
* जो कोणी हानी नुकसान पोचविण्याचया उद्देश्याने आगळीक करून *५० रूपये किंमतीचे नुकसान करून आगळीक केल्यास * शांतता भंग करण्याच्या उद्देशाने आगळीक केल्यास. * अशा कामांसाठी अपप्रेरणा देणारी व्यक्ती असल्यास
# कलम व शिक्षा #
३५३/४२६/४२७/५०५/१०९/११४/
# शिक्षा. २ वर्ष. ३ महिने. २ वर्ष.
(४) सरकारी कर्मचारी यांच्यावर दबाव आणून आत्महत्येस प्रवृत्त करणे
#कलम व शिक्षा #
३०६/१०९/११४/
शिक्षा. १० वर्ष
(५) सरकारी कर्मचारी यांचेवर दबाव आणून पैशाची मागणी करणे
पैशांची मागणी करणे /तशा प्रकारची भिती निर्माण करणे
# कलम व शिक्षा #
३४८/३८५/
# कलम व शिक्षा #
३ वर्ष. २ वर्ष
(६) महिला कर्मचारी यांना दमदाटी व शिवीगाळ करणे
सरकारी कामकाज करत असताना महिलेचा विनयभंग करण्याच्या उद्देशाने हमला किंवा बल प्रयोग करणे / स्त्री चा विनयभंग होऊल असा हावभाव. उच्चार करणे/ अशा कामांसाठी अपप्रेरणा देणारी व्यक्ती असल्यास
# कलम व शिक्षा #
३५४/३५३/५०९/१०९/११४/
शिक्षा. २ वर्ष. १ वर्ष
(७) सरकारी कार्यालयात गोंधळ घालणे
* जो कोणी हानी नुकसान पोचविण्यासाठी आगळीक करतो * ५० रूपये किंमतीचे नुकसान करून आगळीक केल्यास * शांतता भंग करण्याच्या उद्देशाने अपमान करणे * सार्वजनिक प्रशांतता विरूद्ध अपराध होईल अशी कृती * अशा अपप्रेरणा देणारी व्यक्ती
# कलम व शिक्षा #
३५३/४२६/४२७/५०४/ ५०५/१०९/११४/
शिक्षा. २ वर्ष. ३ महिने २ वर्ष. ३ वर्ष
(८) सरकारी कर्मचारी यांचे बरोबर वाद घालणे व धमकी देणें
शांतता भंग करण्याच्या उद्देशाने अपमान करणे *सार्वजनिक शांतता भंग करण्याच्या उद्देशाने * अशा कामांसाठी अपप्रेरणा देणारी व्यक्ती
# कलम व शिक्षा #
५०४/५०५/१०९/११४/
शिक्षा. २ वर्ष. ३ वर्ष
(९) लोकसेवकास कोंडून बांधून ठेवणे
कोणत्याही व्यक्तिस कोणत्याही दिशेने जाण्यास अटकाव करणे * विवक्षित सीमांचया पलिकडे जाण्यास प्रतिबंध करणे * अशा कामांसाठी अपप्रेरणा देणारी व्यक्ती असल्यास
# कलम व शिक्षा #
३४१/३४२/१०९/११४
शिक्षा क्ष१ महिना. १ वर्ष
(१०) अवैध गौण खनिज वाहतूक आणि यावर कारवाई करताना वाद दंगा घालणे
विनापरवाना गौण खनिज वाहतूक उत्खनन करणे * अनधिकृत वाहतूक पकडले असता मोठ्या प्रमाणात लोक जमा करून दंगा करून दमदाटी करणे माराहान करणे
# कलम व शिक्षा #
आय पी सी चे कलम ३७८/१२०ब/३४/३५३/१५२/५०४/५०६/ आणि १०९ रेगुलर अॅकट १९५७ चे कलम २१(१) २१(२)
शिक्षा. वेगवेगळ्या शिक्षा
(११) शासकीय भूखंडावरील अतिक्रमण. बांधकाम करणे
शासकीय भूखंडावरील अतिक्रमण करणे/ शासकीय भूखंडावरील विनापरवाना बांधकाम विकास करणे
# कलम व शिक्षा#
आय पी सी. ४४७ एम आर टी पी अॅकट ५२
शिक्षा वेगवेगळ्या शिक्षा
(१२) खोटा पुरावा देणे
खोटा आहे हे माहीत असूनही खोटा पुरावा देणें /खोटा पुरावा रचणे / न्यायिक कार्यवाहीत खोटा पुरावा देणें
# कलम व शिक्षा #
१९३/
शिक्षा ७ वर्ष आणि ३ वर्ष
(१३) खोटे प्रमाणपत्र देणे
एखादे प्रमाणपत्र खोटे आहे हे माहीत असूनही खरे आहे असे समजून पुरावा म्हणून देणें
#. कलम व शिक्ष#
१९०
शिक्षा नाही
(१४) प्रतिज्ञापत्र खोटे कथन करणे
प्रतिज्ञापत्र खोटी माहिती मजकूर कथन करणे
# कलम व शिक्षा #
१९९
शिक्षा. ३ वर्ष
(१५)!प्रतिज्ञापप्र खोटे असतानाही खरे समजून वापरणे
प्रतिज्ञापत्र किंवा त्यातील माहिती खोटी आहे हे माहीत असताना खरे म्हणून वापरणे
# कलम व शिक्षा #
२००
शिक्षा ३ वर्ष
(१६) न्यायालयात अप्रामाणिक खोटी माहिती मागणी हकक सांगणे
दुसऱ्यास नुकसान पोचविण्याचा उद्देश्याने न्यायालयात खोटी मागणी हक्क सांगणे
# कलम व शिक्षा #
२०९
शिक्षा २ वर्ष
(१७) न्यायीक कार्यवाहीतील लोकसेवकाचा उदेश पूर्वक अपमान करणे
नयायीक कार्यवाही करीत असलेल्या लोकसेवकाचा उदेश पूर्वक अपमान करणे किंवा त्यांच्या कामात व्यत्यय आणणें
# कलम व शिक्षा *
२२८
शिक्षा ६ महिने
(१८) संगणक. लॅपटॉप मोबाइल यास नुकसान पोचविणे
संगणक. लॅपटॉप. मोबाईल. यांची तोडफोड करणे / संगणक. नेट सर्व्हर कामात व्यत्यय आणणे /संगणक मोबाईल चोरी करणे
# कलम व शिक्षा #
अॅकट २००० चे कलम ४३ डी. ६६ आय पी सी ४२६/ ४७७ अ. आय टी अॅकट. ४३ ई. ६६ . ४३ बी. ६६ ६६बी. ६६ बी ३७९
शिक्षा. वेगवेगळे दंड व कारावास
(१९)! घडलेल्या व अपराधाची खोटी माहिती सांगणे
जो अपराध घडला आहे त्याची माहिती न देता किंवा त्याबद्दल खोटी माहिती देणे
# कलम व शिक्षा #
२०३
शिक्षा २ वर्षं.
अनेक वेळा सरकारी अधिकारी व कर्मचारी यांचेवर हल्ले होतात असे अधिकारी व कर्मचारी जेव्हा गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिस ठाण्यात जातात तेव्हा निश्चित कोणती कलमे लावली पाहिजेत जेणेकरून सदर गुन्हा हा दखलपात्र होईल व जास्तीत जास्त शिक्षा आरोपीस देता याबाबत माहिती नसल्याने पोलिस अधिकारी जे कलम लावतील ते मान्य करतो सबब वरिल पैकी कोणत्या स्वरूपाचा गुन्हा घडल्यास कोणती कलमे लावावीत एव्हाना हीच कलमे लावणेबाबत आपण आग्रह धरले पाहिजे. तसेच सदर कलमांचा गुन्ह्यांच्या अनुषंगाने आग्रह धरणे पूर्वी भारतीय दंड संहिता आणि संबंधित कायद्यातील ही कलमे एकदा सर्वांनी आवश्यक वाचुन घ्यावेत
समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार जाहिरात प्रसिद्ध वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी
बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर
रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा
रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा
मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा
माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा
संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे
९८९०८२५८५९
No comments:
Post a Comment