Showing posts with label Majlis. Show all posts
Showing posts with label Majlis. Show all posts

आरक्षण मुस्लिमांचा अधीकार - खा. इम्तियाज जलील



आरक्षण मुस्लिमांचा अधीकार - खा. इम्तियाज जलील

२०१४ साली महाराष्ट्रातील काँग्रेस - राष्ट्रवादी सरकार ने मुस्लिमांना ५ % आरक्षण देण्याची घोषणा केली परंतु आज पर्यंत मुस्लिम आरक्षण देण्याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आले नाही. जेव्हा निवडणुका येत्या तेव्हा मुस्लिमांना आरक्षणाचे गाजर दाखून मत घेण्यात आले परंतु आज पर्यंत मुस्लीम आरक्षण बाबत ब्र शब्द काडण्यात कोणीही तयार नाही. मुस्लीम आरक्षण हा तर मुस्लिमांचा अधीकार असुन ते मुस्लिमांना मिळालाच पाहिजे अशे वक्तव्य एम आय एम प्रदेश अध्यक्ष तथा औरंगाबाद चे खासदार इम्तियाज जलील यांनी अहमदनगर एम आय एम टीम शी चर्चा करतांना सांगितले. २७ नोव्हेंबर रोजी मुस्लीम आरक्षण साठी पूर्ण महाराष्ट्रातून तिरंगा रॅली मुंबई पर्यंत काढण्यात येणार असून सर्वांनी ही लढाई आपली समजून तिरंगा रॅलीत शामील होण्याचे आव्हान खा. इम्तियाज जलील यांनी केले. अहमदनगर जिल्हा अध्यक्ष डॉ परवेज अशरफी यांनी आश्वासन दिले की  मुस्लीम आरक्षण साठी पूर्ण अहमदनगर जिल्ह्यातून प्रत्येक तालुक्यातून तिरंगा रॅलीत शामिल होणार आहे त्यासाठी आम्ही पूर्ण जिल्ह्यात जागो जागी बैठक घेत आहे व नागरिकांना मुस्लीम आरक्षणाची गरज आणि फायदे समजून सांगत आहे. खा. इम्तियाज जलील यानी पक्षाचे काम जोमाने चालू ठेवा व काही अडचण आल्यास संपर्क साधण्याचे सांगितले. यावेळी अहमदनगर एम आय एम जिल्हा अध्यक्ष डॉ परवेज अशरफी, जिल्हा महासचिव हाजी जावेद शेख, शिर्डी लोकसभा अध्यक्ष तोसिफ मनियार, औरंगाबाद युवा जिल्हा अध्यक्ष मुंशी पटेल, नगरसेवक कलीम बागवान, जिल्हा सह- सचिव फय्याज कुरेशी, शेवगाव तालुका अध्यक्ष युसुफ शेख, कोपरगाव तालुका अध्यक्ष जावेद पटेल, जामखेड तालुका अध्यक्ष जाकिर काजी, श्रीरामपुर तालुका अध्यक्ष शकील शेख, कर्जत तालुका अध्यक्ष डॉ अन्सार शेख, अजीज व्होरा,उबैद बागवान, राहुरी तालुका अध्यक्ष नविद बागवान, रहाता तालुकाध्यक्ष समीर बेग, श्रीरामपुर शहर अध्यक्ष शहाबाज शेख, संगमनेर शहर अध्यक्ष दानिश मिर्जा, आदी उपस्थित होते.



सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा

  सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा            अनुसूचित जाती जमाती. इतर मागासवर्गीय जाती जमाती. भटक्या विमुक्त...

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या