लाच लाच
आपल्या सर्वांना माहीत असणारा रोज आपण वृतमानपत्रात एक तरी बातमी रोजच्या रोज वाचतो सर्वांना परिचयाचा असणारा हा शब्द बरेच काही सांगून जातो
एसी आॅफिस मध्ये बसून लाखांच्या वर पगार असणार्या अधिकारी व कर्मचारी यांना लाच घेण्याची काय गरज आहे लाच घुस भ्रष्टाचार. वरची मिळकत. अशा विविध नांवाने ओळखले जाते भारतीय संविधान 161 मध्ये लाच भ्रष्टाचार यांच्या विरोधात नोद आहे 1947 साली लाचलुचपत कायदा संमत करण्यात आला भ्रष्टाचार विरोधी कायदा 1988साली अंमलबजावणी करण्यात आला. भ्रष्टाचार लाच या विषयांत भारताचा 97, वा नंबर लागतो किती भयानक आहे आपल्या लक्षात येईल.
लाच देणे हा प्रकार लहानपणापासून आपण करत असतो म्हणजे एखाद्या लहान मुलांकडून आपले अपेक्षित काम करण्यासाठी आपण त्याला. *माझ हे काम केले तर मी तुला एवढे पैसे देईन * अशी सुरुवात केली जाते लहानपण संपत आणि आपणं शाळेत जातो. शाळेत दाखला मिळण्यासाठी शिक्षकांना काही तरी प्रमाणात लाच द्यावी लागते. प्राथमिक शिक्षण चालू असताना शाळेत पास होण्यासाठी सुध्दा लाच दिली जाते प्राथमिक शिक्षण संपते आणि आपण पुढील शिक्षण घेण्यासाठी शहरांत जातो. काॅलेज महाविद्यालय विद्यालय यात सवलती मिळविण्यासाठी विविध दाखले लागतात ते दाखले मिळविण्यासाठी अधिकार व कर्मचारी यांना देण्यात येणारी ती लाच शिक्षण घेण्यासाठी शहरांत गेल्यावर राहण्यासाठी रुम घेण्यासाठी सुध्दा लाच द्यावी लागते.
निवडणूका मध्ये मतदार यांना मतदान आपणालाच मतदान करावे यासाठी मतदार यांना सुध्दा लाच द्यावी लागते बांधकाम व्यावसाय जागा एन ए करणे. बेकायदेशीर रित्या बांधकाम करण्यासाठी. नगरपालिका ग्रामपंचायत यांवर अतिक्रमण करून बांधकाम करण्यासाठी शासकिय अधिकारी व कर्मचारी यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक लाच दिली जाते. शेअर बाजार एखाद्याला रस्त्यावर आणण्यासाठी त्याचा धंदा व्यवसाय मोडीत काढण्यासाठी त्या कंपनीचे शेअर्स विकत घेण्यासाठी शेअर्स होल्डर यांना लाचेचे आमिष दाखवून कंपनीचे शेअर्स विकत घेणे आणि एखाद्याला रस्त्यावर आणण्यासाठी लाच कारणीभूत असते. रस्ते आपल्या गावात तालुका जिल्हा राज्य देश यामध्ये प्रगती साधण्यासाठी रस्ते सर्वात मोठा महत्वपूर्ण जबाबदारी निभावतात या रस्त्याची कामे व त्यांचे टेंडर ठेकेदार इंजिनिअर आपणांस मिळावे यासाठी शासनाच्या लहान अधिकार व कर्मचारी शिपाई यांना सुध्दा लाच द्यावी लागते आणि मग शिल्लक राहील त्या पैश्यात काम करायचे मग काय त्या प्रमाणेच हितांचे काम होणारं म्हणजे शासनाचे असणारे पैसे या चोरांच्या खिशात जातात त्याला कारणीभूत आहे ती म्हणजे लाच. बॅंकिंग क्षेत्रात तर सर्वात मोठ्या प्रमाणात लाच देण्याचे प्रमाण आहे म्हणजे शासन विविध आर्थिक योजना राबविते की कोणीही बेरोजगार राहू नये यासाठी विविध अंत्योदय दिनदयाळ योजना. किसान क्रेडिट योजना. कर्ज मुक्ति योजना. लहान लहान उद्योग धंदे करण्यासाठी कर्ज उपलब्ध करून दिले जाते. पण शासन योजना जाहीर करते पण त्या योजनांसाठी राष्ट्रीय कृत बॅंकांना अधिकार असतो पण आज एकही कर्ज बॅंक अधिकारी व कर्मचारी यांनी लाच घेतल्याशिवाय मंजुरी दिली जात नाही हे एक मोठ दुर्दैव आहे. राजकीय क्षेत्रात आपला पक्ष वाढविण्यासाठी व आपले सत्ता व वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी विरोधी पक्षातील नेत्यांना लाच देऊन आपणाकडे वळविणे ही आज एक फॅशन झाली आहे. प्रशासकीय क्षेत्र सर्वसामान्य माणसाला जनतेला न्याय मिळण्यासाठी प्रशासकीय कार्यालये व अधिकारी व कर्मचारी यांची नेमणूक केली जाते. मग त्यात. पाणीपुरवठा. घरफाळा पाणीपट्टी. कर वसुली बाजार कर. रेशनकार्ड. मोजणी आॅफिस. महसूल विभाग. निवृत्त व्यक्तिच्या साठी असणार्या विविध योजना. आपण आपल्या कामासाठी हक्कासाठी केलेला पत्र व्यवहार. वृक्ष कर. दिवाबत्ती. गटार रस्ते. असे एक नाही अनेक कर आपल्यावर लादले जातात आणि त्याची सुख सुविधा आपण घेत असतो यातील वाढून किंवा एकदमच जास्त येणारा कर किंवा दंड कमी करण्यासाठी आपण त्या त्या क्षेत्रातील अधिकारी व कर्मचारी यांना लाच देतो आणि पगार आणि वरची मिळकत आपणच वाढवतो. आर्थिक क्षेत्र आपले बॅंक व इतर माध्यमातील आपली कर्ज प्रकरण मंजूर करण्यासाठी आपणास आर्थिक किंवा इतर माध्यमातून लाच द्यावी लागते. धार्मिक क्षेत्र सर्वच ठिकाणी लाच घेणें व देणं चालू असतं पण सर्वात भयावह प्रकार आहे तो म्हणजे देवालयात सुध्दा दर्शन घेण्यासाठी. हवन व विविध धार्मिक विधी करण्यासाठी व देवांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांना मंदिर ट्रस्टी यांना लाच द्यावी लागते. काय प्रकार आहे बघा वैद्यकीय क्षेत्र माणूस देवापुढे आणि डॉ यांचे पुढेच आपले हात जोडतो कारणं जीवन वाचविण्यासाठी देवानंतर डॉ उपयोगी पडतात पण आज या दवाखान्यातील पेशंट दुसर्याच्या दवाखान्यात घालवला तर संबंधित डॉ यांना त्यांच्या स्तरावर लाच द्यावी लागते. मेडिकल. लॅबरोटरी. रक्त लघवी तपासणी केंद्र. औषधं एजन्सी. यातून सुध्दा मोठ्या प्रमाणात डॉ यांना विविध औषधे तयार करणार्या कंपन्या लाच देतात आणि डॉ याच कंपनीचे औषध वापरण्याचा व त्याच मेडिकल मध्ये औषध घेण्याचा आणि त्यांनी सांगितले त्याच रक्त लघवी व इतर टेस्ट करणार्या लॅब मध्येच तपासणी करण्याचा आग्रह धरतात म्हणजे कोणतयाना कोणत्या मार्गाने लाच देणें व घेणें चालूच आहे
सामाजिक क्षेत्र समाजात जातपंचायत ही प्रथा मागील काळात प्रचलित होत्या त्यावेळी न्यायनिवाडा करण्यासाठी पंच नेमले जात होतें हे सुद्धा गुन्हेगारी क्षेत्रातील लोकांना साव सिध्द करतात आणि चांगलें विचार चांगलं व्यक्तिमत्व असणार्या लोकांना गुन्हेगार सिध्द करतात यासाठी परस्पर पार्टीकडून लाच घेतात आणि गोरगरीब माणसांचा घात करतात. शैक्षणिक क्षेत्र मुलाला शाळेत घालण्यापासून त्यांच्या वह्या पुस्तके गणवेश घेण्यासाठी निवडलेल्या दुकानातून शिक्षकांना आपला बोगस माल विक्रीसाठी लाच दिली जाते. महिलांच्या बाबतीत एक वाईट विषय आहे तो म्हणजे एकादा विषय मिटवायचा असेल तर एखादे प्रकरणं मंजूर करायचे असेल तर त्या महिलेला अधिकारी व कर्मचारी शरिर सुखांची मागणी करतात ही मानसिक त्रास देण्याचा व कशा प्रकारे लाच मागण्याचा प्रकार आहे बघा आपल्या अंगावर काटा येतो पण असे वागणारे यांना कांहीच वाटतं नाही. बांधकाम कामगार गरिब. अडाणी गरजू व्यसनी अशिक्षित असतांत त्यांना कल्याणकारी मंडळाच्या योजना मिळवून घेण्यासाठी अधिकारी व कर्मचारी एजंट दलाल यांना लाच द्यावी लागते त्याशिवाय खरोखर कामगार असणारे यांना कोणताही लाभ मिळत नाही वाळू माफिया कडून लाच घेणारे अधिकारी व कर्मचारी यांचे लागेबांधे बरेच वर्ष चालू असतात. यांना लाच नाही मिळाली की आमच्या अंगावर गाडी घातली शिवीगाळ केली अशी अफवा पसरवली जाते
लाच घेण एक नशा आहे चांगलें जीवन. चांगली गाडी चांगले घर मुलांना उच्च शिक्षण. महिलांच्या साठी दाग दागिने. स्थावर मालमत्ता. चंगळवादी. पार्ट्या दारु डान्स बार. उंची व कंपनीची दारु. परदेशी दौरे. झटपट श्रीमंत. यश मिळविणे. गुन्हेगारी दहशतवाद यांचा पुढाकार यांना खतपाणी घालण्यासाठी. जात वर्ग लिंगभावातमक विषमता या भौतिक सुखासाठी विविध कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी लाच घेतात पण हे चुकीचे आहे हे यांना कोण सांगणार
सर्वांत महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे सर्वत्र लाच या प्रकाराणे मोठ्या प्रमाणात हाहाकार माजवला आहे आज स्मशानभूमीतून सुध्दा आपले सगेसंबधी कोण मयत झाल्यास त्याला दहन देण्यासाठी सुध्दा लाच द्यावी लागते
आजचं निर्णय ठाम विश्वास विचार करा कोणालाही लाच देणार नाही कोणीही लाच घेणार नाही
समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार जाहिरात प्रसिद्ध वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी
बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर
रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा
रेशन अधिनियम कायदा 2013 रक्षक समिती सांगली जिल्हा
मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा
माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा
संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे
9890825859