अहमदनगर सरोज टॉकिज बॉमबस्फोट - Saroj Bomb Blast

 25 दिसम्बर 1942

अहमदनगर सरोज टॉकिज बॉमबस्फोट, 


अहमदनगर- 


१९४२ ला महात्मा गांधी च्या चलेजाव चळवळीत प.नेहरू,मौलाना आझाद,वल्लभभाई पटेल,कृपलानी आदी नेते अहमदनगर च्या किल्ल्यात कैद झाल्याने आपण काही तरी देशा साठी करावे हा विचार रत्नमम पिल्ले, हबीब खान, पन्ना लालचौधरी खोमणे यांच्या मनात उत्पन्न झाला.त्यातून मग तरुणांनी भूमिगत होऊन संपर्क तोडण्यासाठी टेलिफोन वायर तोडणे,जाळपोळी,असहकार करण्याचे काम भिंगार व नगर मध्ये सुरु केले.


एका क्रांतीकारकांने पुण्यातील ऑर्डनन्स फॅक्टरी मधून बॉम्ब चोरला व तो एका महिलेने पोटावर बॉम्ब ठेऊन गर्भवती असल्याचे भासवून बसने भिंगारला आणला.त्याचा स्फोट कोठे करायचा याचा विचार करून रत्नम पिल्ले,हबीब खान,पन्नालाल चौधरी,खोमणे यांच्यावर हि जबाबदारी टाकण्यात आली.ब्रिटीशाची गर्दी संरोष टॉकीजवर जास्त असते म्हणून ती जागा निवड़न्यात आली.पिल्लेंनी इशारा केला व हबीब खान यांनी बॉम्ब टाकला,


यामध्ये काही ब्रिटिश अधिकारी मृत झाले व अनेक जखमी झाले.


हबीब खान हे मिलिटरी दवाखान्यात असल्याने आलेल्या ऍम्ब्युलन्स मधून हे दोघे जखमींना घेऊन दवाखान्यात गेले.त्यामुळे कोणाला संशय आला नाही.


त्यावेळेच्या गुजरात-महाराष्ट्र व मुबई इलाख्याचा पहिला बॉम्बस्फोट हा झाला नंतर पुणे व इतर ठिकाणी हि मालिका सुरु झाली.


या घटनेची दाखल नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी घेतली होती.त्यावेळच्या रेडिओ वर शाबास इंडिया असे उदगार काढले होते.अहमदनगरचे स्वातंत्रसैनिक भाई सथ्था यांनी बॅरिस्टर नरिमन यांना मुबईहुन बोलावून याची केस चालविण्यास सांगितले.बॅरिस्टर नरिमन यांनी युक्तिवाद करताना ऐकीव गोष्टीवर खटला आहे.प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नाही असा युक्तिवाद केला.त्यामुळे चौघांना निर्दोष सोडण्यात आले.पण हे परत बॉम्बस्फोट करतील म्हणून त्यांना ब्रिटिशांनी ३ वर्षे तुरुंगात डांबले.स्वातंत्र मिळाल्यावर त्याची सुटका झाली.


फिरोज़ शेख 

(अहमदनगर महाराष्ट्र)



वाचा -

उर्दू साहित्यात कमर कोकणी व प्रा. खलील मुजफ्फर यांचे मोठे योगदान- सलीम खान....

१८५७ च्या उठावमध्ये भारतीय मुस्लीम स्त्रियांचा योगदान भाग ३ - Indian Muslim Freedom Fighter....

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा

  सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा            अनुसूचित जाती जमाती. इतर मागासवर्गीय जाती जमाती. भटक्या विमुक्त...

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या