निराधार मानसिक विकलांग मातेला "मानवसेवा" प्रकल्पात मायेचा आधार
अहमदनगर- दि. २०/११/२०२० रात्री १०:१२ वा. तारकपुर परिसरात आठ दिवसांपासून एक निराधार मानसिक विकलांग महिला (अंदाजित वय ३५ वर्ष) फिरतांना सामाजिक कार्यकर्त्या मा. संध्याताई मेढे यांच्या नजरेस पडली. या निराधार मातेला आधार मिळण्याकरीता संध्याताई यांनी अरणगाव येथे मनोरुग्णांना जगण्याची नवी उर्मी देणारे श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाच्या *'मानवसेवा'* प्रकल्पाचे संस्थापक दिलीप गुंजाळ यांना कळविले. दिलीप गुंजाळ स्वयंसेवकांसह तारकपुर परिसरात पोहचले आणि पिडीत महिलेशी चर्चा केली. दररोजच्या वेदना सहन करुन मिळेल ते खाऊन जगणं...! सर्व भान हरवून बसलेल्या या मातेला वैयक्तिक स्वच्छतेचही भान नव्हतं. काही दुकानांच्या पायरीवर रात्र काढतांना एका माणसांकडून दररोजचं शोषणही व्हायचं. हे ऐकून काळजात चर्रर्र...झालं. संस्थेचे दिलीप गुंजाळ व संध्याताई मेढे यांनी लागलीच या सर्व परिस्थितीची माहिती तोफखाना पोलीस स्टेशनला दिली. या निराधार मातेचं दु:ख जाणून घेवून दिलीप गुंजाळ, अनिता मदणे, विकास बर्डे, ऋतिक बर्डे यांनी निराधार मनोरुग्ण मातेला *"मानवसेवा"* प्रकल्पात दाखल करीत मायेचा आधार दिला. अखेर या मातेच्या सुरक्षिततेचा प्रश्न सुटला. मानसोपचार तज्ञ डॉ. अनय क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाने उपचार सुरु केले आहे. मानवसेवा प्रकल्पामुळे या निराधार मातेच्या आयुष्याची नवी वाट निर्माण झाल्याची भावना सामाजिक कार्यकर्त्या संध्याताई मेढे यांनी व्यक्त केली.
*मानवसेवा प्रकल्प*
(मन व घर हरवलेल्या मानसांच हक्काच घर)
द्वारा- *श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळ*
☎ (०२४१) २४२९९४२
📱 ९०११७७२२३३
वाचा -
विद्यापीठाची स्थापना व टिपूंचे ग्रंथालय....
No comments:
Post a Comment