वक्फ बोर्डाचे कार्यालय मुंबईत हलवण्यासाठी इम्तियाज जलील यांनी पत्र दिले- नवाब मलिक
        वक्फ बोर्डाचे कामकाज गतिमान करण्यासाठी डिजीटलायजेशन करण्याची केली घोषणा, खा. इम्तियाज जलील व राज्यसभा सदस्य फौजिया खान यांची वक्फ बोर्डाच्या सदस्यपदी निवड होणार…औरंगाबाद, 24 ऑक्टोबर(डि-24 न्यूज) गेली 60 वर्षांपासून महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाचे कार्यालय औरंगाबाद शहरात आहे. सर्व कामकाज येथूनच चालते. मुख्य कार्यालय मुंबईत हलवण्यासाठी शासनाच्या हालचाली सुरू आहे यास मराठवाड्यातील जनतेचा विरोध आहे. वक्फ बोर्डाचे कार्यालय मुंबईत हलवण्यासाठी खासदार इम्तियाज जलील यांनी पत्र दिलेले आहे असा गौप्यस्फोट आज आयोजित पत्रकार परिषदेत अल्पसंख्याक विकास तथा वक्फ मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.
        पुढे बोलताना त्यांनी सांगितले वक्फ बोर्डाचे काम गतीमान करण्यासाठी बोर्डाची कार्यकारीणी पुर्णत्वास येण्यास तीन महीने लागतील. सहा महीन्यात सर्व कामकाज व मालमत्तेचे डिजीटलायजेशन करण्यात येईल. जमीनीसंबंधीत तक्रारी, नोंदणी करण्यासाठी कार्यालयात येण्याची गरज भासणार नाही असे हायटेक कार्यालय बणवले जाणार आहे. तक्रारींचे निवारण करुन ज्या मालमत्तांवर अवैध कब्जे झालेले आहे ते हटवून भूमाफीयांवर कार्यवाई करण्यात येणार आहे. भूखंडाचे श्रीखंड खाणा-यांची गय केली जाणार नाही. अनेकांच्या चौकशी सुरू आहे. जे दोषी असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येईल. भाजपाच्या सरकारचे वेळी सदस्य झालेले खालेद बाबू कुरेशी यांनी सहा फायली गहाळ केल्या प्रकरणी नोटीस बजावण्यात आली आहे. त्यांची भाजपाने अनधिकृतपणे नियुक्ती केली होती. वेळ पडल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा इशारा नवाब मलिक यांनी दाला आहे. केंद्रीय वक्फ कायदा 1995 महाराष्ट्रात 1999 पासून लागू करण्यात आला त्याची अंमलबजावणी प्रत्यक्षपणे 2002 पासून सुरु झाली. नवीन कायद्यानुसार धर्मादाय कडे नोंद असलेल्या 5 हजार 970 मालमत्ता वक्फ बोर्डाकडे हस्तांतरित करण्याचे काम केले. उर्वरित मालमत्ता लवकरच हस्तांतरित करण्यात येतील. अनेक प्रकरणे न्यायालयात सुरु आहे. वक्फ बोर्डाकडून संतगतीने पाठपुरावा केला जात असल्याचे त्यांनी कबूल केले. न्यायालयात निवाडा लवकर व्हावे यासाठी बाजू मांडण्यासाठी तज्ञ वकीलांची नियुक्ती करण्यात येणार आहे. असे मलिक यांनी सांगितले. यावेळी बोर्डाचे सदस्य फारुख अहेमद, वक्फ बोर्डाचे सिईओ शेख आनिस उपस्थित होते.
https://janmatanchaprahar.blogspot.com






