Showing posts with label इस्लाम. Show all posts
Showing posts with label इस्लाम. Show all posts

बीजगणित आणी इस्लाम

 



इस्लामची बीजगणित (Algebra)अंकगणित (Mathematics)त्रिकोणमिति(Trigonometry) वर चर्चा.


अल - ख्वरिजमी (इ. स. ७९५ ते ८४७) याला जगभरात बीजगणित (Algebra) याचा जनक मानले गेले आहे अबू जफर मोहम्मद बिन मुसा अल ख्वरिजमीने अंकगणित (Mathematics) बीजगणित भूमिती आणि त्रिकोणमिति(Trigonometry) वर भरपूर लिखाण केले.जगात पहिल्यांदाच या गणित आणि भूगोल शास्त्रज्ञाने एक-दोन-तीन.... दहा, अशा शब्दात लिहिल्या जाणाऱ्या संख्यांना अंकाचे म्हणजे 1,2,3,4,5.......10 चे रूप दिले. हे अंक अरेबिक अंक(Arabic Numerals) म्हणून ओळखले जातात जगातील सर्व भाषिकांनी थोडेफार बदल करून याच अंकाचा आपल्या भाषेत समावेश करून घेतला आहे.


काही भाषांतर सर्रासपणे अरबिकचे वर दिलेल्या अंकप्रमाणे त्यांचे इंग्रजी रुपांतर वापरतात व त्यांना असे वाटते की हे अंक आकडे ब्रिटिशांनीच योजिले आहे.अल खवारीजमी संख्या शास्त्र संशोधन करताना दिलेल्या संख्या मिळवण्यासाठी विशिष्ट संख्येला तिनेच कितीदा गुनावे लागले तर अपेक्षित संख्या मिळेल याची माहिती दिली. ह्या प्रक्रियेला गणिताच्या भाषेत लोगरीदम(Logarithm) म्हणतात. लोग रिदम हे  अल खवारिजमी यांच्या नावानेच इंग्रजीकरण आहे. या गणित प्रक्रियेचे उदाहरण म्हणजे १०= १०×१०×१० = १००० म्हणून १००० चा ३ हा लोग होय.अल ख्वारिजमिने अनेक पुस्तके लिहिली भूगोल आकारिक "सूरतुल अर्द", खगोल विज्ञान कविता "किताबूल जिज़" इतिहासा कविता "किताबुत तारीख" वगैरे त्याच्या अनमोल ग्रंथांची नावे आहेत.


त्यांच्या सर्वात महत्त्वाचा ग्रंथ म्हणजे " किताबुल मुख्तसर फिल हिसाब वल जब्र" हा होय. 

ह्या ग्रंथात त्यांनी बीजगणिताची जगाला ओळख करून दिली आहे. या शास्त्राचे संपूर्ण नाव त्यांनी "अल जब्र वल मुकाबला " असे आयोजिले आहे.जब्र म्हणजे अंकाचे पून: स्थापनेच्या सहाय्याने हिशोब लावणे किंवा विस्कळीत अंकांना सुसंगत करणे आणि जमा - बाकीवर नजर ठेवणे हे होय. त्यांनी प्रथमच अंकाचे मूल्य व त्यांचे स्थान ठरविले.व्याख्येत नाम भारतीय संगणक तज्ञ पद्मश्री डॉक्टर विजय भटकर यांच्या मते अल खावरिजमी ने जर संख्यांचे अंगी आणखी करण केले नसते तर आज संगणक, इंटरनेट, मोबाईल फोन, डिजिटल साहित्य इत्यादी यासारखी उपकरणे अस्तित्वात च आलीच नसती.


पुस्तक संदर्भ : मोहम्मद पैगंबर साहेबांनी मानव समाजाला काय दिले?

लेखक : अनिस चिस्ती

पोस्ट : फिरोज शेख (अहमदनगर)

इस्लामची सामाजिक राजनैतिक चर्चा.

 



मदिनेत आगमन (१६ सप्टेंबर ६२२)


पैगंबर साहेब मदिनेत दाखल झाले तेव्हा तेथे एक प्रकारची सामाजिक आणि राजनैतिक चर्चा सुरू झाली मदिने चे आर्थिक नेतृत्व ज्यू लोकांच्या हातात होते तेथील दोन कबिले ' औस ' व ' खजरिज ' यांच्यामध्ये वर्षानुवर्षे टोळीयुद्ध चालायचे तसेच दांभिकांचा सरदार अब्दुल्ला बिन उबै बिन सलूल मदिने चा बादशा बनण्याचे स्वप्न पाहत होता अशावेळी प्रेषित आणि त्यांच्या अनुयायांच्या मदिनेत आगमन तेथील सामाजिक आणि राजनेतिक वातावरणात खूप बदल घडून आणणारे होते मदिने तील जनतेची विचारसरणी एकदम बदलली आणि अनेक शिष्टमंडळे पैगंबर साहेबांना येऊन भेटू लागली.

त्यांना प्रेषित साहेबांचा एकच प्रश्न होता आणि त्यांचे एकच उत्तर होते आम्हास मदिनेत शांतता हवी आहे पैगंबर साहेबांनी त्यांना सुचविले की तमाम कबिले यांच्या सरदारांना एकत्रित करा आपापसात सल्लामसलत करून समस्येचे निराकरण केले जाईल मदिने तील सर्व धर्मीय लोकांचे धर्मगुरु आणि कबीर यांचे सरदार 'सखीफा बनू सअदा' येथे एकत्रित आले त्या लोकांमध्ये ज्यू, ख्रिस्ती मूर्तिपूजक, निर्वासित, नास्तिक, मदिने तील अन्सार मक्के तील मुहाजिर तसेच इब्राहिम व सुद्धा उपस्थित होते तेथे प्रत्येक व्यक्तीला आपले विचार मांडण्याचे स्वातंत्र्य होते प्रत्येक व्यक्ती प्रकटपणे बोलली पैगंबर साहेब म्हणाले एका व्यक्तीने बोलावे आणि ते एकाने लिहून काढावे लोक स्वयंस्फूर्तपणे म्हणाले येथे आपल्यापेक्षा बेहतर व श्रेष्ठ कोणीच नाही आपण म्हना आणि आम्ही त्याला अक्षरबद्ध करीत आहोत हेच लिखाण नंतरच्या इतिहासात जगातले सर्वप्रथम लिखित संविधान म्हणून ओळखले गेले.

  इस्लामी इतिहासात या सनद ( charter) ची तपशीलवार माहिती देण्यात आली आहे ज्याला 'मिसाके मदिना' मदिने चा करार म्हणून संबोधिले जाते. विविध पश्चिमात्य विद्वानांनी आणि इतिहासकारांनी या चे मनःपूर्वक कौतुक केले आहेत. काही विद्वानांनी याला जगातील पहिली मानवाधिकार सनद म्हणून संबोधिले आहे, जी मागील शतकात राष्ट्रकुल (Common wealth) आणि संयुक्त राष्ट्रसंघाचा *(UNO)* जाहीरनामा तयार होण्यास आधारभूत ठरले प्रसिद्ध इंग्रजी इतिहासकार सर विलियम या करा नाम्याचे अनुवाद करताना लिहित आहेत की हे सनद मोहम्मद (स)च्या वतीने मुसलमानांच्या दरम्यान म्हणजे कुरेश आणि मदिना (यसरिब) चे मुसलमान आणि त्या प्रत्येक व्यक्तीच्या दरम्यान ज्याचा संबंध कोणतेही जमातीशी असो जो कोणी आमच्याबरोबर एकनिष्ठ आणि हे सर्व मिळून उर्वरित (जगाच्या) तुलनेत एक राष्ट्रकुल आहेत मुसलमानां करिता युद्ध आणि युद्ध बंदीच्या काळात काही विशेष अधिकार प्रदान करण्यात येणार नाहीत.त्यांच्यापैकी कोणालाही या गोष्टीची परवानगी नसेल की ते या करारात सामील असलेल्या इतर धर्मीय अनुयायांच्या शत्रू बरोबर युद्ध अथवा तह करू शकतील जे ज्यू आमच्या राष्ट्रकुल सोबत निगडित आहे ते सर्व शारीरिक अथवा मानसिक मानहानी पासून सुरक्षित राहतील. त्यांना स्वतः आमच्या लोकांसारखे अधिकार प्राप्त असतील आणि त्यांना सर्व प्रकरणात बरोबरीचा दर्जा प्राप्त असेल ते सर्व यहुदी जे मदिनेत राहतात मुस्लिमांन सोबत संयुक्त राष्ट्रकुल स्थापनेत सहभागी होतील आणि ते सर्व आपापल्या धार्मिक विधींची तशाच प्रकारे उपासना करतील ज्याप्रकारे मुस्लिम करतात ज्यू सोबत ज्या कबिल्यांचा करार झाला असेल त्यांना सुद्धा संरक्षण आणि स्वातंत्र्य प्राप्त असेल. जे कोणी राज्यात बंडखोरी करील किंवा राष्ट्र कुलातील राज्याविरुद् शत्रुत्व द्रोह पसरविण्याचा प्रयत्न करेल मग तो अगदी प्रेषित पुत्र असला तरी संयुक्त राष्ट्र कुलातील सर्व नागरिक त्याच्याविरुद्ध एक होतील. ही सनद लागू होणाऱ्यांसाठी मदीना हे एक पवित्र हिंसा मुक्त (हरम: आश्रयस्थान) आहे की या राष्ट्रकुलआ मध्ये एखादा वाद किंवा मतभेद निर्माण झाला असेल तर तो निर्णयासाठी अल्लाहकडे अल्लाह च्या प्रेषितकडे सोपविला जाईल."(The religion of Islam : by A.Galwash p. p. 50)


मोहम्मद पैगंबर साहेबांनी मानव समाजाला काय दिले?

लेखक : अनिस चिस्ती

पोस्ट : फिरोज शेख (अहमदनगर)

सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा

  सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा            अनुसूचित जाती जमाती. इतर मागासवर्गीय जाती जमाती. भटक्या विमुक्त...

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या