घरचा चोर ?
कोरोना महामारी महाभयंकर संकट २०२० मध्ये आपल्याला हालवून सोडले. कोरोंना सारख्या महाभयंकर संकटापासून जनता गोरगरीब लोक. अशे सर्वजण वाचावे जगण्याचा आनंद घेण्यासाठी आज जगणं गरजेचे आहे यासाठी शासनाने. गाव. वाडी वस्ती तालुका जिल्हा राज्य देश यामध्ये कडक टाळेबंदी जारी केली. यामुळे सर्वजण आपले जीवन वाचावे कोरोना पासून संरक्षण व्हावे यासाठी घरातच अडकून पडली. हाताला काम नाही त्यामुळे हातात पैसा नाही त्यामुळे त्यांच्या वर व त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली. ही वेळ काही लोकांना ही वेळ सोसली नाही त्यांनी आत्महत्या सारखें मार्ग निवडले आणि आपली जीवनयात्रा संपवली किती वाईट बघा
केंद्र शासनाने लोकांच्या या सर्व परस्थितीचा विचार करून जनता जगावी प्रत्येकाला व कुटुंबाला पोटभर अन्न मिळावे यासाठी विविध योजनां चालू करण्यात आल्या. त्यात प्रामुख्याने # प्रधानमंत्री गरिब कल्याण अन्न योजना आणि आत्मनिर्भर भारत. # अंत्योदय अन्न योजना # बीपीएल शिधापत्रिका धारक # केशरी शिधापत्रिका धारक # यापेक्षा टाळेबंदी काळात परगावाहून परराज्यातून परजिलहयातून कामासाठी आलेले कामगार मजूर टाळेबंदी काळात अडकून पडले त्यामुळे त्यांचा पोटाचा प्रश्न मिटावा यासाठी # केंद्र शासनाच्या आत्मनिर्भर भारत वित्तीय सहाय योजना याअंतर्गत प्रति व्यक्ती प्रति महिना पाच किलो तांदूळ किंवा गहू हरभरा डाळ चणा असे वाटप करण्यासाठी शासनाकडून आदेश देण्यात आले होते # यासाठी आधारकार्ड महत्वाचा पुरावा मानला जात होता. याच वाटप कोणाला झाल कोणाला नाही रेशन दुकानदार यांनी बर्याच पळवाटा काढल्या आणि गोरगरीब जनतेचा हक्क मारला. केशरी शिधापत्रिका धारकांना एक महिन्याचे प्रति महिना प्रति किलो १/२ असे वाटप करण्यात आले हेसुद्धा कोणाला मिळाले कोणाला नाही. यावेळी फक्त एक गट अंत्योदय अन्न सुरक्षा योजनेत सहभागी असणारे यांना महिन्यांचा मिळणारा रेशन अन्न धान्य सोडून प्रति व्यक्ती प्रति ५ किलो तांदूळ मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला पण याचा उपयोग झाला नाही कारणं या माजूरया लोकांना तांदूळ जास्त झाला त्यांनी तो मार्केट मध्ये विकला आणि एका बाजूला जनता उपाशी मरत होती आणि जिल्ह्यात जागोजागी टनात रेशन तांदूळ राईस मिल मध्ये सापडला म्हणजे रेशनचा तांदूळ धारकापेक्षा तालुक्याच्या गोदामातून आला नसेल कशावरून म्हणजे घरचा चोर सापडत नाही
प्रधान मंत्री गरिब कल्याण योजना १ व २ आणि आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत माहे एप्रिल २०२० ते नोव्हेंबर २०२० या कालावधीमध्ये केंद्र शासनाची अभिकरता संस्था असलेल्या नाफेडमारफत लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील लाभार्थ्यांना तसेच स्थलांतरित कुटुंबीयांना वाटप करण्याकरिता प्रत्येक जिल्ह्यासाठी. तूरडाळ. चणाडाळ. व चणा. पुरवठा करण्यात आला होता. उपरोक्त योजनेअंतर्गत त्याचे वाटप झाल्यानंतर जिल्ह्यातील गोदामांमध्ये व रास्त भाव दुकानांमध्ये काही प्रमाणात. चणाडाळ. व चणा शिल्लक असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे. सदर कडधान्यांची विल्हेवाट कशाप्रकारे लावावी याबाबत केंद्र शासनाकडे विचारणा करण्यात आली होती त्यावेळी केंद सरकारने त्यांच्याकडून जारी करण्यात आलेल्या दिनांक. १५/४/२०२१ चे पत्रानुसार सदर कडधान्यांचे वाटप राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमान्वये पात्र असलेल्या लाभार्थ्यांना राज्य शासनामार्फत करण्याचे निर्देश दिले आहेत
आपल्या जिल्ह्यामधील शासकीय गोदामामध्ये तसेच रास्त भाव दुकानांमध्ये शिल्लक असलेल्या तूरडाळ. चणाडाळ. व चणा. वाटप राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम २०१३ अंतर्गत पात्र असलेल्या लक्षयानिरधारित. सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील # अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य लाभार्थी कुटुंब # लाभार्थी लोकांना प्रतिमहा प्रतिशिधापत्रिका १ किलो या प्रमाणे #. मोफत # वाटप करावयाचे होते क्षेत्रीय कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार प्रधान मंत्री गरिब कल्याण अन्न योजना १ व २ आणि आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत प्रत्येक जिल्ह्यात शिल्लक असलेल्या प्रमाणात तुरडाळ. व चणाडाळ व चणा वाटप करण्यात यावे. सदर तूरडाळ. चणाडाळ व चणा वाटप करताना प्रति शिधापत्रिका प्रतिमहा १ किलो या प्रमाणात. #मोफत # राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना वाटप करण्यात यावे. सदर तूरडाळ चणाडाळ व चणा वाटप करताना प्रथम मागणी करणार्या कुटुंबास प्राधान्य देण्यात यावे. परंतु प्राधान्याने अंत्योदय अन्न योजनांच्या लाभार्थींना वाटप करण्यात यावे. त्यानंतर प्राधान्य लाभार्थी कुटुंब या लाभार्थ्यांना वाटप करण्यात यावे.
वाटप करण्यात येणारी तूरडाळ चणाडाळ व चणा वाटपापूरवी. तपासणी करण्यात यावी. कोणत्याही परिस्थितीत खराब किंवा मानवास खाण्यास अखाद्य डाळींचे वितरण होणार नाही याची उपनियंत्रक शिधावाटप/ जिल्हा पुरवठा अधिकारी / अन्न धान्य वितरण अधिकारी यांनी दक्षता घ्यावी. व तशा स्पष्ट रास्त भाव दुकानदार यांना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील ज्या गोदामांमध्ये सदर डाळी साठवणूक केल्या आहेत त्याच तालुक्यांमध्ये तसेच ज्या रास्त भाव दुकानांमध्ये सदर डाळी शिल्लक आहेत त्याच. रास्त भाव दुकानांमध्ये डाळींचे वाटप करावे तालुक्याच्या गोदामांमधील शिल्लक डाळी इतर तालुक्यांमध्ये वाटपासाठी वाहतूक करून अनावश्यक अतिरिक्त वाहतुकिचा खर्च आर्थिक भार शासनावर येणार नाही याची उपनियंत्रक शिधावाटप/ जिल्हा पुरवठा अधिकारी / अन्न धान्य वितरण अधिकारी यांनी दक्षता घ्यावी. तालुक्यातील गोदामांमध्ये तसेच रास्त भाव दुकानांमध्ये शिल्लक असलेल्या डाळींचे प्रमाण त्या त्या तालुक्यातील किती कालावधीसाठी. Pos मशीनवर परिमाण दरशवायचे आहे. याबाबतची माहिती सदर परिपत्रक निर्गमित झाल्यापासून २ दिवसांच्या आत संगणक कक्ष. अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग मंत्रालय मुंबई यांना लेखी स्वरूपात कळविण्यात यावे सोबतच्या विवरणपत्रातील तूरडाळ चणाडाळ व चणा शिललकीची आकडेवारी नुसार वाटप करावयाचे आहे. प्रत्यक्ष. वाटप करताना त्या आकडेवारी मध्ये तफावत आढळल्यास जेवढी प्रत्यक्ष शिल्लक आहे. तेवढे वाटप करावे संपूर्ण वाटप झाल्यानंतर शिललकीची सुधारीत आकडेवारी नमूद करून त्याचे उपयोगिता प्रमाणपत्र शासनास तात्काळ सादर करावे.
अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांचेकडून संबंधित जिल्हाधिकारी सर्व. नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा. जिल्हा पुरवठा अधिकारी. अन्न धान्य वितरण अधिकारी. यांना देण्यात आल्या होत्या. पण खरोखरच या शासनाच्या आदेशांचे पालन झाले नाही आजसुद्धा गोरगरीब जनतेच्या हक्कांची. तूरडाळ चणाडाळ व चणा शिल्लक आहे. आणि आजसुद्धा रेशनला गव्हाच्या चार जाती. तांदूळ ११ प्रकारचा खाद्यतेल पामतेल. कडधान्ये डाळी. गूळ व शेंगदाणे रवा मैदा. चणा पिठ. हे स्वच्छ व सकस देणे बंधनकारक आहे पण आज रेशनला कीडलेला. कुजलेला. वास येणारा. भुंगे घाण असणारे अन्न धान्य वितरण केले जात आहे असे कोठेही रेशन दुकानत आढळल्यास त्या रेशन दुकानदार यांच्या विरोधात संबंधित. तहसिलदार कार्यालय येथे तक्रार दाखल करा.
(१) सांगली / तूरडाळ ०-७८२ गरिब कल्याण योजना
चणाडाळ ३५.०००
चणा. ०.२०१ आत्मनिर्भर भारत अंतर्गत
(२) सातारा. गरिब कल्याण योजना तूरडाळ. १.३८९
चणाडाळ. ०.०००
चणा. ०.००० आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत
(३) सोलापूर ग्रामीण. गरिब कल्याण योजना. तूरडाळ. २०.५५०
चणाडाळ. ०.०००
आत्मनिर्भर भारत अंतर्गत चणा ६.४९०
(४) कोल्हापूर गरिब कल्याण योजना अंतर्गत तूरडाळ ०.०००
चणाडाळ. ०.०००
आत्मनिर्भर भारत अंतर्गत ०.०००
असा आपल्या हककाचा रेशन तूरडाळ चणाडाळ व चणा अजून २०२० पासून शिल्लक आहे आजच आपल्या विभागातील तहसिलदार कार्यालय पुरवठा विभागांशी संपर्क साधा आणि चौकशी करा नाहीतर घरचा चोर सापडणार नाही
समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार जाहिरात प्रसिद्ध वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी
बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर
रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा
रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा
मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा
माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा
संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे
९८९०८२५८५९
No comments:
Post a Comment