अन्न व औषध प्रशासने केली मोठी कारवाही - Food and Drugs

अन्न व औषध प्रशासने केली मोठी कारवाही


सोलापूर -


 मा. आयुक्त, अन्न व औषध प्रशासन यांना सोलापुर येथे रासायनिक ताडी विक्री होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्याअनुषंगे मा. आयुक्त यांनी सह आयुक्त, पुणे यांना सोलापूर सहित सातारा व सांगली येथील अधिका-यांची टिम घेऊन कार्यवाही करण्याचे निर्देंश दिलेत. मा. आयुक्त यांचेकडून मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे दिनांक 19/11/2020 रोजी सोलापूर येथे खालील ठिकाणी धाड टाकून ताडी तसेच रासायनिक पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला. तसेच सदर पेढींना व्यासाय बंदीच्या नोटीस देऊन त्यांच्या पेढ्या सिल करण्यात आल्या. जप्त करण्यात आलेल्या ताडीचा साठा नष्ट करण्यात आला.

१) श्रीमती सत्यमा सुभाष कोकोंडा,

निलम नगर, आकाशवाणी रोड, सोलापूर

ताडी -298 लिटर - 5960 /-

क्लोरल हायड्रेट – 3075 किलो - 275 /-


2)कौशल्या मारुती गुजराती, जय हॉस्पीटलच्या मागे, रविवार पेठ, सोलापूर

ताडी 3 लिटर - 150 /-

3)श्री. रामलु कनकय्य भंडारी, मालक मे. गोल्डन ड्रिक्स, विडी घरकुल, सोलापुर

पांढरी रासायनिक पावडर नं.1-8.8 किलो- 640/-

पांढरी रासायनिक पावडर नं.2 - पोस्टर कलर

4)श्री. विठ्ठल भंडारी जोडभावी पेठ, शिंदी खाना, सोलापुर

तयार ताडी, पाऊच – 567 पाऊच 283.5 लिटर ताडी

11340/-

5)तिमक्का मंजुळे यांचे घर, वडार गल्ली, रविवार पेठ, सोलापुर

सर्वेक्षण ताडी नमुना – 500 मिली.

एकुण किंमत रुपये

18365 /-

 उपरोक्त ताडी विक्रेत्यांकडून नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविणेकरीता सिलबंद करण्यात आलेले आहेत. अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधीतांविरुध्द कारवाई घेण्यात येईल. याबाबत प्रथम खबरी अहवाल दाखल करण्यात आला असून, अन्न व औषध प्रशासनामार्फत यापुढेही भेसळ युक्त ताडीसंदर्भात तपासण्या व धाडींचे आयोजन करण्यात येणार आहे.

 यातून राज्यातील सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याशी निगडीत गोष्टीमध्ये कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा / गुन्हेगारी कृत्य खपवून घेतले जाणार नसल्याबाबत मा. आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, म. राज्य यांनी निर्देश दिलेत.

 अन्न व औषध प्रशासनामार्फत ताडीच्या संदर्भात पहिल्यांदाच अश्या प्रकारची कारवाई करून प्रथम खबरी अहवाल दाखल करण्यात आला आहे.

 सदरची कारवाई मा. अन्न सुरक्षा आयुक्त, श्री. अभिमन्यु काळे, भा.प्र.से., अन्न व औषध प्रशासन, म. राज्य, मुंबई, श्री. एस. एस. देसाई, सह आयुक्त (अन्न), पुणे विभाग, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. सु. आ. चौगुले, सहायक आयुक्त (अन्न), सांगली अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती न. त. मुजावर, श्री, एम. एम. लवटे, श्री. पी. एस. कुचेकर, श्री. यो. रो. देशमुख, श्री. यु. एस. भुसे, अन्न व औषध प्रशासन, सोलापूर. अन्न सुरक्षा अधिकारी श्री. द. ह. कोळी, श्री. चन्नवीर स्वामी, अन्न व औषध प्रशासन, सांगली. अन्न सुरक्षा अधिकारी श्री. रोहन शहा व श्री. अनिल पवार, अन्न व औषध प्रशासन, सातारा यांनी पार पाडली.

वाचा -

धर्मनिरपेक्ष, सहिष्णू, अमर शहिद टीपू सुलतान (रह.) - ....

मुस्लिम आरक्षणाचे वास्तव.


No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा

  सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा            अनुसूचित जाती जमाती. इतर मागासवर्गीय जाती जमाती. भटक्या विमुक्त...

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या