कर्मचाऱ्यांचे पगारासाठी जामखेड नगरपरिषद समोर केले बोंबा बोंब आंदोलन- Andolan jamkhed

जामखेड नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांचे दोन महिन्याचे थकीत पगार देणेबाबत करण्यात आलेल्या बोंबा बोंब आंदोलनाला मिळाले यश.


नगर परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या लेखीआश्‍वासनानंतर कर्मचाऱ्यांचे आंदोलन मागे

जामखेड -

          जामखेड नगर परिषदेतील कर्मचाऱ्यांचे ऑक्टोबर व सप्टेंबर या दोन महिन्याचे पगार देण्यात आले नव्हते. या महाभयंकर कोरोना व लॉकडाऊनच्या काळामध्ये या नगर परिषदेच्या वर्ग 2, 3 व 4 यामधील सफाई कर्मचारी व आरोग्य कर्मचारी यांनी या जामखेड शहराची साफसफाई करून शहरातील जनतेच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या गोरगरीब हातावर पोट असणाऱ्या या कर्मचाऱ्यांचे 2 महिन्यापासून पासून नगरपरिषदेने पगार थकविले आहेत.

        हे कर्मचारी सकाळी पहाटे 5 वाजल्यापासून हातात झाडू घेऊन गाव स्वच्छ करतात आणि या सणासुदीच्या काळामध्ये दिवाळी 4 दिवसांवर आली आहे. तरी देखील या कर्मचाऱ्यांच्या पगाराची नगरपरिषद दखल घेत नव्हते, त्यामुळे या कर्मचाऱ्यांचे तात्काळ थकीत दोन महिन्याचे वेतन देण्यात यावे म्हणून आज दिनांक 10 नोव्हेंबर 2020 रोजी ठीक 11 वाजता नगर परिषदेच्या समोर *बोंबा बोंब आंदोलन* करण्यात आले,

           नगर परिषदेचे सर्व कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले होते व त्यांच्या जीवांची आकांत करून बोंबा मारत होते की आम्हाला दिवाळीच्या सणासाठीआम्हाला आमच्या मुला बाळांची कपडे व कुटुंबाची गोड दिवाळी करण्यासाठी आमचा दोन महिन्याचा थकीत पगार देण्यात यावा.

         हे आंदोलन लोकाधिकार आंदोलन व वंचित बहुजन आघाडीच्या संयुक्त विद्यमाने पुकारलेल्या आंदोलनाचे नेतृत्व आदिवासी भटके-विमुक्त आघाडीचे राज्य समन्वयक अॅड.डॉ. अरुण जाधव यांनी केले,

              यावेळी लोकाधिकार आंदोलनाचे प्रवक्ते बापू ओहोळ,लोकाधिकार आंदोलनाच्या महिला जिल्हाअध्यक्षा द्वारका ताई पवार, लोकाधिकार आंदोलनाचे तालुकाअध्यक्ष विशाल पवार, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाअध्यक्ष आतिश पारवे, मुकुंद घायतडक व नगर परिषदेचे कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले होते.

      या कर्मचाऱ्यांच्या व्यथा मांडताना अॅड. डॉ. अरुण जाधव म्हणाले की ही नगरपरिषद सांगते की आमच्याकडे कर्मचाऱ्यांना देण्यासाठी पैसे नाहीत परंतु नगरच्या कचरा कॉन्ट्रॅक्टदार यांना महिन्याला वीस लाख रुपये देण्यासाठी कोठून पैसे येतात. या गोरगरीब कर्मचाऱ्यांना तुम्ही अस्पृश्य समजून नका. त्यांना दिवाळी गोड खाऊ द्या. नाहीतर मी तुम्हाला दिवाळी सुखाने खाऊ देणार नाही आम्ही या तालुक्याचे लोकप्रतिनिधी मा. आमदार रोहित दादा पवार व जिल्ह्याचे खासदार मा. सुजय विखे पाटील यांच्या दारात जाऊन दिवाळी मागणार आहोत.

        या आंदोलनास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष प्रदिप टापरे प्रहार संघटनेचे तालुका अध्यक्ष जयसिंग उगले, नयुम शेख, एम.आय. एम चे जिल्हा उपाध्यक्ष सय्यद परवेज, माजी नगराध्यक्ष सोमनाथ राळेभात, नगरसेवक दिगंबर चव्हाण व माजी सरपंच सुरेश जाधव यांनी पाठिंबा दिला.

            या आंदोलनाचे यश म्हणून नगरपरिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भिसे साहेब यांनी लेखी पत्र देऊन तात्काळ सर्व कर्मचाऱ्यांचे सप्टेंबर महिन्याचे मानधन त्यांच्या बँक खात्यात जमा केले व ऑक्टोबर महिन्याचे मानधन 25 नोव्हेंबर पर्यंत कर्मचाऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात येतील असे लेखी पत्र देण्यात आले,

        या आंदोलनाच्या यशस्वीतेसाठी लोकाधिकार आंदोलनाचे सामाजिक कार्यकर्ते सचिन भिंगारदिवे ,वैजीनाथ केसकर, सागर भांगरे ,संतोष चव्हाण, राकेश साळवे , बाबासाहेब फुलमाळी,योगेश सदाफुले पप्पू सदाफुले रवी सदाफुले बाबाराजे जाधव, अविनाश काळे, शहानुर काळे आदींनी परिश्रम घेतले


वाचा -

मोफत नेत्र, रक्तगट सर्व रोग तपासणी व अल्पदरात मोतीबिंदू शास्त्क्रिया शिबीर ....

चिराग पासवान का क्या था गेम प्लान ?....

अमेरिका की वोट गिनती ..

असदुद्दिन ओवेसी ने किया विरोधियो को चॅलेंज...

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा

  सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा            अनुसूचित जाती जमाती. इतर मागासवर्गीय जाती जमाती. भटक्या विमुक्त...

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या