Showing posts with label पत्रकार. Show all posts
Showing posts with label पत्रकार. Show all posts

पत्रकार अहमद नबीलाल यांचे सत्कार

 


सांगली येथे पत्रकार दिनानिमित्त आयोजित सांगली जिल्हा इंडियन प्रेस क्लबच्या वतीने पत्रकार सन्मान व पुरस्कार पदवीप्रदान करण्यासाठी पत्रकार दिनाचा कार्यक्रम आयोजित केला होता

          सिंहसतभातील चौथ स्तंभ म्हणजे पत्रकार होय आपण समाजाचं काही तरी देण लागतो ही भावना मनात घेऊन गावात तालुका जिल्हा राज्य देश यामध्ये कानाकोपऱ्यात घडणारया सर्व सुखाच्या दुःखाच्या घटना राजकीय सामाजिक संघटना पक्ष यामधील सर्व बातम्या सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचविण्याचे काम मग काळ कोणताही असो कोरोना. पुर ओला दुष्काळ. कोरडा दुष्काळ. जळीत. आत्महत्या. खुन. अशा एक नाही अनेक घटनांसाठी आपल्या व आपल्या कुटुंबाची काळजी न करता रांत्र दिवस काम करणारा आमचा पत्रकार समाजांचा एक अविभाज्य घटक आहे 

      केंद्रीय सल्लागार पदाधिकारी व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते

                 इस्लामपूर शहरातील रहिवासी व कामगार चळवळ जीवंत ठेवणारे. वास्तववादी लेखन करणारे. जनजागृती जनसंबोधन जनप्रबोधन यासाठी अहोरात्र प्रयत्न करणारे. बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर व मुंबई डेज चे पत्रकार अहमद नबीलाल मुंडे यांचा वास्तववादी लेखक म्हणून फुलगुचछ देवून सन्मान करण्यात आला. 

       त्यावेळी बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन चे सांगली जिल्हा अध्यक्ष चाॅद गफूर शेख व आमचे सहकारी हिरकणी न्युज वार्ताहर मोहन सताळकर उपस्थित होते लेखक आणि लेखण करणारे यांची आज समाजाला गरज आहे असे मत हाजी अब्दुल भाई शेख यांनी मांडले

प्रसारमाध्यमातील व्यक्ती

 


प्रसारमाध्यमातील व्यक्ती

                 सन २०१९ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २९

                महाराष्ट्र राज्यातील प्रसारमाध्यमातील व्यक्ती आपली कर्तव्य पार पाडत असताना त्यांच्यावर होणारे हिंसक कृत्यांना प्रतिबंध आणि प्रसारमाध्यमांतील व्यक्ती. किंवा प्रसारमाध्यम संस्था यांच्या मालमत्तेचे नुकसान किंवा हानी होण्यास प्रतिबंध करण्यासाठी तसेच तत्संबंधी व तदानुषंगिक बाबींसाठी शासनाने तरतूद केली आहे

              प्रसारमाध्यमातील व्यक्ती यांच्या जीवीतास धोका होणे किंवा प्रसारमाध्यम संस्था यांची मालमत्ता हेतुपुरस्सर नुकसान करणे. वार्ताहर. संपादक यांच्यावर प्राणघातक हल्ले आपण रोजच वाचतो बघतो महाराष्ट्र प्रसारमाध्यमातील व्यक्ती आणि प्रसारमाध्यम संस्था ( हिंसक कृत्ये व मालमत्ता नुकसान करणे किंवा हाणी यांना प्रतिबंध घालण्यासाठी अधिनियम २०१७ हा अधिनियम संपूर्ण महाराष्ट्र राज्यास लागू असेल. या अधिनियमात संदर्भानुसार दुसरा अर्थ अभिप्रेत नसेल.  

* प्रसारमाध्यम संस्था. यात कोणताही नोंदणीकृत वृत्तपत्र आस्थापना. वृत्तवाहिनी आस्थापना. वृत्तांकन आधारित इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यम. आस्थापना किंवा वृतकेंदर यांचा समावेश असेल

* प्रसारमाध्यमातील व्यक्ती. याचा अर्थ ज्या व्यक्तिचा प्रमुख व्यवसाय पत्रकाराचा असेल आणि जी एक किंवा अधिक प्रसारमाध्यम संस्थेमध्ये किंवा संस्थेच्या संबंधात एकतर नियमित किंवा कंत्राटी तत्वावर पत्रकार म्हणून नियुक्ती केली गेली असेल अशी व्यक्ती. असा होतो. आणि त्यामध्ये संपादक. वृत्तसंपादक. उपसंपादक. वार्ताहर. प्रतिनिधी. व्यंगचित्रकार. वृतछायाचित्रकार. दूरचित्रवाणी कॉमेरोमन. अग्रलेख. प्रसंगविशेष लेखन. संहिता तपासणी आणि मुद्रित शोधक यांचा समावेश होतो

* मुख्यत्वेकरून व्यवस्थापकीय किंवा प्रशासकीय नात्याने नेमणूक

*. पर्यवेक्षक नात्याने नेमलेली असून एकतर तिच्या पदाशी संलग्न असलेल्या कर्तव्याचा स्वरूपामुळे किंवा तिच्या ठायी निहित असलेल्या अधिकारामुळे मुख्यत्वेकरून व्यवस्थापकीय स्वरुपाची कार्य पार पाडणारा अशा कोणत्याही व्यक्तिचा त्यामध्ये समावेश होणार नाही

* वृत्तपत्र. याच अर्थ लोक वार्ता. किंवा लोक वारतेवरिल टिकाटिपपणी अंतर्भूत असलेलें कोणतेही मुद्रित किंवा आॅनलाइन नियतकालिक असा होतो. आणि त्यामध्ये केंद्र सरकार याबाबतीत श्रमिक पत्रकार अन्य वृत्तपत्र कर्मचारी ( सेवाशर्ती ) आणि संकिरण उपबंध अधिनियम १९५५ अन्वये वेळोवेळी राजपत्रात अधिसूचित करील अशा अन्य वर्गाच्या मुद्रित किंवा आॅनलाइन नियतकालिक कामांचा समावेश होतो

* वृतवाहिनी. याचा अर्थ जिची भारत सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालय यांचेकडे वृतवाहिनी म्हणून नोंदणी केलेली असेल अशी वृत्तवाहिनी.  

* वृत्तपत्र आस्थापना. एकादी व्यक्ती किंवा व्यक्तिचा निकाय मग तो एक किंवा अधिक वृत्तपत्रांच्या कोणत्याही निर्मितीसाठी किंवा प्रकाशनासाठी अथवा कोणतीही वृत्तसंस्था किंवा माध्यम संस्था चालविण्यासाठी विधिसंसथापित झालेला असो किंवा नसो यांच्या नियंत्रणाखाली आस्थापना असा होतो

* वृत्तपत्रांच्या आसथापनाचे भिन्न विभाग. शाखा आणि केंद्रे यांना त्यांचे भाग समजले जातात

* वृत्तपत्र संस्था. जर एखाद्या छापखान्याचे मुख्य काम हे वृत्तपत्र छपाई करणे हे असेल तर त्या छापखान्यास एक वृत्तपत्र आस्थापना असल्याचे मानतात

* वृत्तांकन आधारित इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यम. याचा अर्थ वृतसूचक आशय उपभोक्ता प्रत पोहचविण्यासाठी इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर करणारे कोणतेही वृत्तांकन आधारित इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यम असा होतो

* वृत केंद्र. याचा अर्थ वृतविषयक कार्यक्रमाची निर्मिती आणि प्रसारण करणारे एखादे दूरचित्रवाणी किंवा नभोवाणी केंद्र

*अपराधी. जी व्यक्ती एकतर स्वता किंवा व्यक्तिच्या गटांचा किंवा संघटनेचा एक सदस्य किंवा प्रमुख या नात्याने या अधिनियमाखाली. हिंसाचार कृत्य करील ते करण्याचा प्रयत्न करील किंवा ते करण्यास अपप्रेरणा देईल किंवा चेतावणी देईल किंवा त्यासाठी प्रक्षोभीत करील अशी कोणतीही व्यक्ती

* मालमत्ता. प्रसारमाध्यमातील व्यक्तिच्या किंवा प्रसारमाध्यमांच्या मालकीची किंवा त्यांच्या ताब्यात असलेली कोणतीही जंगम किंवा स्थावर मालमत्ता किंवा साधनसामग्री किंवा यंत्रसामग्री

* हिंसाचार. ज्या कृत्यामुळे प्रसारमाधयमातील व्यक्ति. आपले कर्तव्य बजावित असताना कोणत्याही प्रसारमाध्यमातील व्यक्तिचया जीवीतास कोणतीही अपहानि. क्षती किंवा धोका पोलचेल किंवा पोहचवू शकेल किंवा कोणत्याही प्रसार माध्यमातील व्यक्तिच्या किंवा प्रसारमाध्यम संस्थांच्या मालकीच्या मालमत्तेला नुकसान किंवा हानी पोहोचेल किंवा पोहचवू शकेल असे कृत्य

* एखाद्या प्रसारमाधयातील व्यक्तिवर हिंसाचाराच्या कृतयास किंवा प्रसारमाधयमातील व्यक्तिच्या किंवा प्रसारमाध्यम संस्थेच्या मालमत्तेच्या नुकसानीस किंवा हानीस प्रतिबंध करण्यात येईल

* कलम. ३ ‌चे तरतुदीचे उल्लंघन करून हिंसाचाराचे कोणतेही कृत्य करील किंवा शास्ती करण्याचा प्रयत्न करील किंवा ते करण्यास अपप्रेरणा किंवा चिथावणी देईल किंवा त्यास प्रक्षोभित करील अशा कोणत्याही अपरधास. तीन वर्षे सजा. कारावासाची शिक्षा. पन्नास हजार पर्यंत दंड किंवा दोन्ही

* फौजदारी संहिता १९७३ यामध्ये काहीही अंतर्भूत असेल तरी पोलिस उप अधीक्षक पदाच्या दर्जा पेक्षा खालच्या दर्जाच्या पदांवर नसलेला कोणताही पोलिस अधिकारी या अधिनियमाखाली अपराधाचा तपास करण्याचा अधिकार

* अधिनियमात केलेला कोणताही अपराध हा दखल पात्र व अजामीनपात्र असेल आणि तो प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयाकडून न्याय चौकशी करण्यायोग्य

* कलम ४ मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या शिक्षेवयतिरिकत अपराधी. कलम ६ मध्ये नोंद केल्याप्रकरणी न्यायालयाने निर्धारित केली असेल. प्रसारमाध्यम. व्यक्ती किंवा प्रसारमाध्यम संस्था यांच्या मालमत्तेच्या झालेल्या नुकसानीसाठी किंवा हानीसाठी नुकसानभरपाई रक्कम देण्यास पात्र असेल आणि तो प्रसारमाधयमातील व्यक्तिने केलेल्या वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती करण्यासाठी देखील पात्र

*. जर अधिनियमाखाली सिधदपराधी ठरलेल्या व्यक्तिने पोट कलम (१) अन्वये त्यांच्यावर लादलेली नुकसानभरपाई आणि वैद्यकीय खर्च दिला नसेल तर ती रक्कम जणू काही ती जमीन महसूलाची थकबाकी होती म्हणून वसूल करण्यात येईल

* जर कोणी प्रसारमाधयमातील व्यक्ति या अधिनियमाचा हेतूपुरस्सर गैरवापर करील किंवा दुष्ट प्रयोजणासाठी त्याचा वापर करील किंवा या अधिनियमाखाली एकादी खोटी तक्रार करील अशा व्यक्तिस तीन वर्ष कारावासाची शिक्षा व पन्नास हजार दंड किंवा दोन्ही

* ‌ प्रसारमाधयमातील व्यक्ति पोट कलम (१) खाली अपराध सिध्द झाल्यानंतर. प्रसारमाधयमातील व्यक्ति म्हणून. कोणतेही शासकीय लाभ मिळण्यास हक्कदार नसेल आणि त्याची अधिसविकृती पत्रिका. कोणताही असल्यास कायमस्वरूपी रद्द करण्यात येईल

* या अधिनियमाच्या तरतुदी ह्या त्या त्यावेळी अमलात असलेल्या इतर कोणत्याही कायद्याच्या तरतुदी व्यतिरिक्त असतील आणि त्यांचे नयुनीकरण करणार्या नसतील

        समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार जाहिरात प्रसिद्ध वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

चौथा स्तंभ - पत्रकारीता

 


चौथा स्तंभ - पत्रकारीता

                    आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना राजकारण आपल्यापर्यंत आणून पोहचविण्यासाठी वर्तमानपत्र. आकाशवाणी. दूरचित्रवाणी. पत्रकार. वार्ताहर यांचाही मोठा वाटा आहे. या साधनाप्रमाणे एकाच वेळी खूप मोठ्या संख्येने लोकाशी संपर्क साधला जातो. म्हणूनच त्यांना * सामूहिक संपर्क माध्यमे * असं म्हणलं जातं 

         आपणं जर रोज वर्तमानपत्र उघडून पाहिले की त्यात देशातील राजकीय. सामाजिक. आर्थिक. धार्मिक. जातीय. घडामोडींची माहिती मिळते. एकाच घटनेबद्दल वेगवेगळ्या नेत्या पुढारी. यांची वेगवेगळी मतें. कशी वेगळी आहेत हे आपणांस समजावून सांगण्यासाठी संपर्क माध्यमांचा वापर केला जातो. शिवाय ह्या अशा विविध बातम्या प्रकाशित करणार्या वर्तमानपत्राला स्वताच्या एक दृष्टिकोन असतो. त्याचा प्रभाव वर्तमानपत्राला बातम्यांवर अप्रत्यक्षपणे पडतोच. कोणत्या व घटनेची किती माहिती द्यायची तिला किती महत्व द्यायचे. हे त्या त्या वर्तमानपत्राचया धोरणाप्रमाणे ठरते त्यामुळे आपण जे वृत्तपत्र वाचतो त्याचा धोरणांचा आपल्यावरही थोडाफार परिणाम होतोच वेगवेगळ्या विश्लेषण. करणारे लेख त्या घडामोडींवर भाष्य करणारे लेख. अग्रलेख. हे वर्तमानपत्रे आणखी एक वैशिष्ट्य या लेखांमधून अधिक तपशीलवार माहिती आपल्याला मिळते. लेख आणि अग्रलेख यामधून अधिक स्पष्टपणे विशिष्ट मतांचा आणि दृष्टीकोणाचा पुरस्कार केला जातो. त्यामुळे लोकांना एखाद्या विशिष्ट विचारांकडे आकर्षित करण्यात किंवा राजकीय कृतीला उधुकत करण्यात काही वेळेला वर्तमानपत्राचा मोठा वाटा असतो. वर्तमानपत्रातील काही बातम्या वाचून आपण अस्वस्थ होतो. किंवा आपल्याला राग येतो वेगवेगळे पक्ष यांच्या बद्दल आपल्या मनात ठराविक प्रतिभा तयार होतात कित्येक वेळा आपल्या मनातील काही मतांना वर्तमानपत्रामुळे पुष्टि मिळून आपले मत विचार पक्के होण्यास मदत होते. वर्तमानपत्राप्रमाणे मत प्रसाराचे कार्य छोट्या पुस्तिका. पत्रके यांच्याद्वारे केलं जातं. एखाद्या विशिष्ट विषयांची थोडक्यात आणि सोप्या भाषेत ओळख करून देण्यासाठी चळवळीत काम करणारे कार्यकर्ते अशा पुस्तिका पत्रके. तयार करतात. एखाद्या कार्यक्रम किंवा आंदोलन यांचीही माहिती करून देण्यासाठी पत्रकाचा वापर केला जातो

        अर्थात वरिल सर्व माध्यमांचा उपयोग फक्त वाचण्यासाठी होतो. त्यामानाने आकाशवाणी दूरदर्शन ही माध्यमे जास्त लोकांपर्यंत पोहचू शकतात. दूरचित्रवाणी याचा फारसा प्रसार झाला नव्हता त्या काळी आकाशवाणी हेच मोठं आणि प्रभावशाली माध्यम होतें. बातम्या आणि इतर कार्यक्रम या प्रसार माध्यमांद्वारे लोकांपर्यंत पोहोचविले जात. दूरदर्शनच्या प्रसारामुळे आता माहिती ऐकत असतानाच संबंधित तपशील आपण पाहूसुधदा शकतो. त्यामुळेच दूरदर्शन हे संपर्काचे सर्वाधिक प्रभावी माध्यम मानलें जाते दूरदर्शन आणि आकाशवाणी या माध्यमाचा नुसत्या बातम्या देण्यासाठीच उपयोग होतो असे नाही. इतर रंजक कार्यक्रमा. मार्फत विचार माहिती लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जातो. वेगवेगळ्या विषयांवर चर्चा. माहिती पट. किंवा लघुपट अशा मार्गांनी प्रतयक्ष दृश्याचा मदतीने आपण अनेक घडामोडी समजून घेऊ शकतो. तंत्रज्ञान जसजशी प्रगती होते. स्वातंत्र्य पूर्व काळात लोकसंपर्क पद्धत बदलत जाते. स्वातंत्र्य पूर्व ध्वनी क्षेपनासारखया सोयी जिथे नसतील तिथे वक्त्याला मोठ्याने ओरडून बोलणयाऐवजी. गत्यंतर नसते. त्याउलट आत्ता आधुनिक तंत्रज्ञान मुळे मोठ्या नेत्यांचे भाषण ध्वनिफिती रिक्षातून वाजवून सुध्दा प्रचार केला जातो. अलिकडच्या काळात याबाबतीत झालेला आणखी एक बदल म्हणजे चित्रफितीचा/ व्हिडिओ कॅसेट्स/ प्रचारासाठी उपयोग या नव्या साधनांमुळे मोठे नेते ज्या गावांना भेटी देऊ शकत नाहीत तेथें त्यांच्या भाषणाच्या चित्रफिती परिणामकारक उपयोग केला जातो आणि जास्तीत जास्त जनसमुदायाला प्रभावित करण्याचा प्रयत्न केला जातो

              सामाजिक किंवा राजकीय समस्यांची. चर्चा करणारी नाटके तसेच चित्रपट हे सुद्धा आपल्या राजकीय सामाजिकरणाला चालना देत असतात. रंजक पध्दतीने मांडणी केल्यामुळे आपण अशा माध्यमाकडे ओढले जातो आणि अधिक तन्मयतेने त्यातील आशय समजवून घेण्याचा प्रयत्न करतो. अलिकडच्या काळात मुद्दाम राजकीय सामाजिक जागृती करण्याच्या हेतूने देशाच्या विविध भागात पथनाटयाची चळवळ उभी राहत आहे. एखाद्या विषयांबाबत सरकारवर दडपण आणण्यापेक्षा लोकांना जागे करणे ज्यांना अधिक महत्वाचे वाटते. असे आंदोलक पथनाटयाचया मार्गाचा वापर लोकांच्या भाषेत सुटसुटीत स्वरूपात. चौका चौकात नाट्य विषकार सादर करून पथनाट्य द्वारे लोकांना समस्यांची जाणीव करून दिली जाते तसेच राजकीय कृतीला उधुकतही केले जाते

          आपल्या गावात तालुका जिल्हा राज्य देश यामध्ये चालणारे चांगलें वाईट बातम्या काम सर्वसामान्य माणसाला कानाकोपऱ्यात संपर्क माध्यमांच्या माध्यमातून कळावया यासाठी संपर्क माध्यमांचा उगम झाला पण आज समाजातील सर्वच प्रसार माध्यमे. बोगस आहेत असे नाही. यातील काही माध्यमाच्या संपर्क माध्यमांचे काम. अजून सुद्धा गर्व निर्माण करणारे आहे. पण काही संपर्क माध्यमांच्या नावाखाली फक्त पैसा मिळविण्याचे साधनं मानलं जातं आहे हे वाईट आहे. 

                  समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा 2013 रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

9890825859

सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा

  सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा            अनुसूचित जाती जमाती. इतर मागासवर्गीय जाती जमाती. भटक्या विमुक्त...

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या