सर्वनाश आणि केवळ सर्वनाश

 


सर्वनाश आणि केवळ सर्वनाश

                आपला मागील काही वर्षाचा काळ बघितला तर आपल्या असे ध्यानात येते की आपले पूर्वज होते ते सर्वसामान्य होते त्या काळात एवढ्या सुखसोयी उपलब्ध नव्हत्या साधी राहणी होती खाण्यास चटनी भाकरी होती दुध फळे सकस असे विना केमिकल खतांचा वापर न केलेलें असे अन्न धान्य खाण्यास होते त्यावेळी कोणतेही व्यसन नव्हतं त्यामुळे लोकांच्या प्रकृती शरिर यष्टी जोरात असायची नंतर काळ बदलला आणि विविध व्यसनाचे प्रकार अंमलात आले राहणीमान बदलले लोकांच्या आवडीनिवडी बदलल्या आणि मग सुरवात झाली तरुण पिढी सर्वनाश होण्याला याच कारण आहे 

                तरुणांमध्ये तंबाखू सेवनाचे वाढते प्रमाण हा एक कळीचा मुद्दा ठरला आहे १ जानेवारी हा जागतिक धूम्रपान विरोधी दिन म्हणून पाळला जातो या दिनाचे महत्त्व आहे आजची पिढी तंबाखू सारख्या अन्य व्यसनापासून दूर करणे तंबाखू विरोधी दिनानिमित्त जागोजागी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येतात त्यात तंबाखू पासून होणारे दुष्परिणाम याची माहिती दिली जाते आपले कर्तव्य म्हणून समजातील प्रतिष्ठित व्यक्ती भाषणे देतात पण खरोखर कोणतीही कारवाई शासनाकडून तंबाखू विक्री रोखण्यासाठी केली जात नाही तंबाखू बंदी साठी कारवाई करायची असल्यास तंबाखू विक्री करणारे यांना टार्गेट केले जाते आणि तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ तयार करणार्या कंपन्या यांना पाठिसी घातले जाते 

              तंबाखू सेवनामुळे तोंडाचा कर्करोग होण्याची शक्यता जास्त असते आणि अन्य आजारही बळावत आहेत याबाबत जनजागृती होत असताना देशात २४"३ टक्के पुरुष तंबाखू सेवनाने तोंडाचा कर्करोग होण्याच्या दाट शक्यतेसह इतर आजार बळावत आहेत तंबाखूचे. चैनी. गट्टू. गुटखा. गुडाकू. जर्दा. सनफ. इत्यादी रुपात सेवन केले जाते तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ खाण्याचा इतरांना फारसा त्रास होत नाही मात्र सिगारेट. विडी. सिगार. पाईप्स. हुक्का. चिलीम. हुकलीस. चुटटा. चिरुट. इत्यादी मुळे आपल्या परिसरातील व आपल्या कुटुंबातील लोक आपले मित्र. संगे समंधी. व इतर व्यक्तिंना त्रास होतो आपल्या शरिरात धूम्रपान करतेवेळी धूराने प्रवेश केल्याने तंबाखू न खाणारे व धूम्रपान न करणारे अप्रतक्ष पणे धूम्रपानाचे बळी पडतात तंबाखू मध्ये जवळपास चार हजार रसायणे आढळतात त्यातील कमीतकमी २००/विषारी घटक आहेत जे निकोटिन. कार्बन मोनोकसाइड. टार. आर्सेनिक. फाॅरमॅलडेहाईड. इत्यादी अंत्यंत विषारी घटकांचा समावेश होतो

                  तंबाखू खाण्यास कुटुंबातील वडील धारी व्यक्ती खाते त्यांचे अनुसरण करून त्यांचे जवळची मुल तंबाखू व्यसनाकडे गेलेली आहेत. याशिवाय मित्र तंबाखू खातो म्हणून त्यांचे अनुकरण करणारे. खाऊन बघूया काय होतंय. मतांचा प्रभाव. आणि तंबाखू खाणयाबधदल एक प्रकारची उत्सुकता. आणि आपला आवडता अभिनेता त्याचे अनुकरण म्हणून तंबाखू व्यसन. व आपले उत्पादन विकण्यासाठी तंबाखू विक्री करणाऱ्या कंपन्या करत असलेल्या जाहिराती यांना बळि पडून. मनाची शांतता. जागरण करणारी मंडळी तंबाखू खाण्यामुळे जागरण करण्यास मदत होते असे मत असणारे. कामातील उत्साह वाढतो असी समजूत असणारे आणि माणसिक आरोग्यासाठी तसेच आपला निष्काळजीपणा. प्रवृती असल्यास तंबाखू सेवन केले जाते. सार्वजनिक ठिकाणी. सार्वजनिक वाहनातून ये-जा करताना. कामाच्या ठिकाणी. घरातील सदसयाजवळ धूम्रपान केल्यास त्यांच्यातील विषारी रासायनिक घटकांमुळे घरच्यांना कर्क रोग होण्याचा संभव अधिक असतो प्रतक्ष आणि अप्रतक्ष तंबाखू सेवनामुळे ह्रदय विकार. फुफ्फुसाचा कर्करोग. गुंतागुंतीचे फुफ्फुसाचे आजार क्षयरोग. श्वसन संस्था चे आजार यापैकी ४०/टक्के आजार हे धूमरपानाशी संबंधित आहेत महिलांच्या धूम्रपानामुळे वेगवेगळी गुंतागुंत निर्माण होते गर्भधारणा संबंधित गुंतागुंत. अपुऱ्या दिवसांची प्रसतूती कमी वजनाच्या बाळाचा जन्म इत्यादी. तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम माहित असूनही व कंपन्यांनी तंबाखू पुडीवर कॅन्सर चित्र दाखवून आपली जबाबदारी झटकली आहे तरी आपण व आपल्या भारतात तंबाखू सेवनाकडे तरुण पिढी मोठ्याप्रमाणात आकर्षित होत आहे हि खरोखरच चिंताजनक बाब आहे

(१) तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम

तंबाखू सेवनामुळे तोंडाचा कर्करोग घशाचा. फुफ्फुसाचा. पोटाचा. किडनीचा किंवा ‌मुत्रशयाचा कॅन्सर होऊ शकतो

(अ ) भारतात तंबाखू सेवनामुळे तोंडाचा कॅन्सर. कर्करोग. असणार्या रुग्णांची संख्या. सर्वात मोठी आहे

(आ) भारतात. 56.4% महिला 44.9% पुरुषांना तंबाखू खाण्यामुळे कर्करोग झाल्याचे आढळून आले

( 2) तथ्य आधार

( अ) भारतात 82% फुफ्फुसाचा दिर्घकाळाचा कर्करोग कारणं धूम्रपान आहे

(आ ) तंबाखू हे क्षयरोग होण्याचे अप्रतक्ष कारण आहे कधी कधी धूम्रपान करणाऱ्या मध्ये देखील टीबी. 3पट अधिक आढळतो सिगरेट किंवा बीडीचे. धूम्रपान जितकें अधिक तितके अधिक

 टीबीचे प्रचलन वाढू शकते

(इ) धूम्रपान व तंबाखू सेवनामुळे अचानक रक्तदाब वाढतो ह्रदय याकडे जाणारा रक्तपुरवठा कमी करते

( ई ) ह्यामुळे पायाकडे सुध्दा रक्तपुरवठा कमी येतो आणि पायात संक्रमण होण्याचा धोकाही संभवतो

(उ ) तंबाखू शरिरातील सर्व धमन्याना नुकसान पोहोचवते

(ए ) मुलांच्या आरोग्यावर धूम्रपानाचा वाईट परिणाम होतो आणि कुटुंबातील सर्व सदस्य यांवर देखील. धूम्रपान धुरामुळे त्रास होतो धूम्रपान न करणारा पण २ पाकिट रोज धूम्रपान करणाऱ्या बरोबर राहिल्यास धूम्रपान न करणार्या व्यक्तिला 3 पाकिट धूम्रपान करणाऱ्या इतका त्रास होतो हे लघवीच्या निकोटिन पातळीचा अभ्यास करता आढळून आले आहे

( ऐ ) तंबाखू सेवनामुळे मधुमेह होण्याची शक्यता जास्त असते

(ओ ) तंबाखू सेवनामुळे रक्तातील कोलेस्टेरॉल कमी होते

(औ ) धूम्रपान करणारे / तंबाखू (सेवन करणारे यांच्यात धूम्रपान न करणारयाचया तुलनेत ह्रदय रोग व पक्षघात होण्याचा धोका २/३ पट जास्त असतो

( ३) तंबाखू सेवनामुळे दर 8 सेंकदाला एक मृत्यू घडतो

( अ ) भारतात तंबाखू संबंधित मृत्युची एकूण संख्या दरवर्षी. 800000ते 900000 इतकी असेल

(आ ) तंबाखू सेवनापासून दूर राहिल्यास एक किशोर / एक किशोरीचा जीवनकाळ 20 वर्षांनी वाढू शकतो

तंबाखू व सेवनकरणारे किशोर/ किशोरी अंततः यामुळे मृत्युमुखी पडतील ( घराजवळ एक चतुर्थांश मध्य आयुष्यात किंवा एक चतुर्थांश म्हातारपण )

( इ ) भारतात इतर देशांच्या तुलनेत तंबाखू सेवनामुळे मृत्युमुखी पडणाऱ्या लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे

(४) धूम्रपान / तंबाखू सेवनामुळे महिला व पुरुष यांचेवर दुष्परिणाम

तंबाखू सेवनामुळे पुरुषात नपुंसकत्व येते

धूम्रपान / तंबाखू सेवनामुळे महिलांमध्ये इसटोजन पातळीकमी. रजोनिवृत्ती लवकर होते

धूम्रपान व तंबाखू सेवनामुळे शारीरिक ताकद कमी होते त्यामुळे सहनशीलता ढासळते

ज्या महिला धूम्रपान करतात व गर्भनिरोधक गोळ्या घेतात त्यांच्यात सटोरक धोका वाढतो

ज्या गरोदर महिला धूम्रपान करतात त्यांच्यात गर्भपाताची शक्यता वाढते. किंवा मुलं कमी वजनाचे जन्माला येते. किंवा बाळाच्या विकासात्मक समस्या वाढतात. किंवा बाळाच्या अचानक मृत्यू देखील होतों

 (५ ) तंबाखू सेवन बंद करण्याचे फायदे

कॅन्सर व हरदयरोगाचा धोका कमी होतो

ह्रदयविकाराचा झटका व येणारा ह्रदयावर दाब कमी होतो

तुमच्या धूम्रपान करतेवेळी सोडलेल्या धुराच्या त्रास तुमच्या आपल्यावर होणार नाही

तुम्हाला धूम्रपानामुळे खोकला कफ यांचा त्रास होणार नाही

तुमचे दात स्वच्छ व शुभ्र होतील

(६) तंबाखू सेवन बंद केल्यामुळे सामाजिक फायदे

तुम्ही स्वतःला नियंत्रित करू शकाल धूम्रपान व तंबाखू खाणे तुमच्यावर नियंत्रण ठेवणार नाही

तुमची आत्मविश्वास व आत्मशक्ती वाढेल तंबाखू सेवन बंद केल्यामुळे

आज व या नंतर भविष्यात तुमच्या मुलांसाठी एक निरोगी पालक व माता/पिता बनाल

तंबाखू व धूम्रपान बंद केल्यामुळे इतर गोष्टींवर खर्च करण्यासाठी तुमच्याकडे पैसा असेल

(७) धूम्रपान व तंबाखू खाणे बंद करण्यासाठी कधीही उशीर झालेला नसतो

धूम्रपान व तंबाखू सेवन हे वयाच्या मध्यान्ह कर्करोग होण्यापूर्वी होऊ किंवा तंबाखू मुळे इतर भयंकर रोग बळावण्याची आधी जेणेकरून भविष्यातील मरणाची भीती नाहीशी होईल

किशोर अवस्थेत धूम्रपान व तंबाखू सेवन बंद केल्यास आपणास त्याचे फायदे जास्त मिळतात

धूम्रपान व तंबाखू सेवन बंद केल्यावर ह्रदयविकाराचा धोका ३ वर्षात तंबाखू सेवन न करणार्या सारखा असतो सामान्य होतों

(८) धूम्रपान व तंबाखू सोडण्यासाठी काही उपाय

सिगरेट. पान. जर्दा. आपल्यापासून व आपल्या नजरेपासून लांब ठेवा आपणास घेणे अवघड होईल असे ठेवा धूम्रपान करण्यास उत्तेजन करणार्या कारणाना ओळखा पान खा तंबाखू सेवन व धूम्रपान करणाऱ्या मित्रापासूंन दूर रहा धूम्रपान विचार आल्यास दिर्घ श्वास घ्या एक ग्लास पाणी प्या स्वताच्या बद्दल सकारात्मक विचार करा व्यायाम योग चालणे ध्यानधारणा नृत्य संगीत सक्रिय बना सकस आहार घ्यावा तोंडात चुइंगम. चाॅकलेट. पेपरमिंट. 

       तुझ आहे तुझं पासी पण तु जागा चुकलाशी याचा अर्थ असा होतो की देवाने आपणास सदृढ शरिर दिलें आहे त्याला विविध व्यसनाच्या आहारी जाऊन खराब करु नका कारण आपण एकटे नाही आपल्यावर जीवापाड प्रेम करणारी आपली हक्काची माणसं या जगात आहेत कोणतेही व्यसन तंबाखू सेवन. धूम्रपान करण्याअगोदर एक वेळ विचार अवश्य करा 

             आमचे बांधकाम कामगार बांधवाना नम्र विनंती आहे की आपल्या क्षेत्रात कष्टाचे काम जास्त आहे व्यसन केल्यामुळे शीण कंटाळा जातो अशी समजूत आहे त्यामुळे आजच निश्चय करा आणि तंबाखू दारू धूम्रपान यापासून मुक्ती मिळवा 

     समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

९८९०८२५८५९

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा

  सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा            अनुसूचित जाती जमाती. इतर मागासवर्गीय जाती जमाती. भटक्या विमुक्त...

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या