अन् त्याला कुटुंब मिळाले...! - Manavseva Project

 हरवलेला सतीश ‘मानवसेवा’ च्या उपचारानंतर कुटुंबात



अहमदनगर, मंगळवार दि.२३ मार्च २०२१

वयाच्या १२ वर्षी मुलाच्या मनावर आघात झाला. परिस्थितीचे गुलाम होवून जगण्याची वेळ आली होती. उपचारासाठी हातात पैसे नाही. मानसिक विकलांग मुलावर उपचार आणि पोटाची खळगी भरता येईल म्हणुन एक बाप मुलाला घेवून ऑगस्ट २०१९ मधे गावसोडून निघाले होते. रेल्वेच्या प्रवासादरम्यान मुलगा सतीश हरवला. संपुर्ण रेल्वेत शोधले, शोधून सापडला नाही. आणि दि.८ ऑगस्ट २०१९ रोजी औरंगाबाद रेल्वे पोलीस स्टेशन येथे सतीश हरवल्याची नोंद केली.

मन हरवलेला सतीश अनवाणी पायाने अहमदनगर कडे चालतच आला. रस्त्यात मिळेल ते खाऊन चालतच थेट अहमदनगर शहरात पोहचला. संपुर्ण जग कोरोनाने हदरलेले असतांना सतीश मात्र अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालय परिसरात कोपरा धरुन बसलेला होता. जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकिय समाजसेवा अधिक्षक मा. श्री सुरेश कदम सर यांनी श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाचे संस्थापक दिलीप गुंजाळ यांना या निराधार बेघर मानसिक विकलांगाला मानवसेवा प्रकल्पामधे आधार मिळणेकरीता कळविले. या बेघर मानसिक विकलांग व्यक्तीला दि. ६ मे २०२० रोजी मानवसेवा प्रकल्पात आधार दिला. मानवसेवा प्रकल्पाच्या समुपदेशन, उपचारानंतर सतिश बोलू लागला. मानवसेवा प्रकल्पाचे स्वयंसेवक प्रसाद माळी यांनी सतिशचे समुपदेशन केले. सतिशने समुपदेशना दरम्यान फक्त शाळेचे नाव सांगितले. सरदार वल्लभाई पटेल विद्यालय रायगाव यावरुन इंटरनेटच्या मदतीने मुख्याध्यापक श्री जाधव सर यांचा भ्रमणध्वनी क्रमांक मिळाला. श्री जाधव सर यांनी धाड गावातील असल्याचे सांगितले आणि त्यांनी तेथील जि. प. शाळेचे मुख्याध्यापकांचा मोबाईल नंबर दिला. त्यांच्याशी संपर्क करताच सतिश हा बुलढाणा जिल्ह्यातील धाड या गावातील असल्याची खात्री झाली. सतिशचे वडील श्री पंढरीनाथ जुमडे व भाऊ यांना कळताच दि २३ मार्च २०२१ रोजी मानवसेवा प्रकल्पात पोहचले. मानवसेवा प्रकल्पाच्या मायेच्या उपचाराने सतिशला त्याचे कुटुंब मिळाले. हरवलेला मुलगा दोन वर्षानंतर मिळताच वडील व भावाला अश्रू अनावर झाले. मानवसेवा प्रकल्पाचे स्वयंसेवकांनी सतिशला वडील व भाऊ यांच्या ताब्यात देवून शुभेच्छा दिल्या. 

सतिशच्या उपचार व पुनर्वसनासाठी मानसोपचार तज्ञ डॉ.अनय क्षीरसागर, डॉ. सुरेश घोलप, संस्थेचे मार्गदर्शक मा. श्री संजय शिंगवी, मा. श्री शशिकांत चेंगेडे, प्रा. श्री अविनाश मुंडके, प्रा.डॉ. प्रीतमकुमार बेदरकर, सौ.शारदाताई होशिंग, मा. अतिक शेख, श्री महेश पवार यांचे मार्गदर्शन मिळाले. आणि मानवसेवा प्रकल्पाचे स्वयंसेवक राहुल साबळे, अजय दळवी, प्रसाद माळी, कृष्णा बर्डे, अशोक मदणे, सुशांत गायकवाड, स्वप्नील मधे, अनिता मदणे, सिराज शेख, अंबादास गुंजाळ, नितीन बर्डे, सोमनाथ बर्डे यांनी परिश्रम घेतले. 

*मानवसेवा हीच, ईश्वर सेवा!*

•••••••••••••••••••••••••••

*मानवसेवा प्रकल्प*

(मन व घर हरवलेल्या मानसांच हक्काचं घर)

द्वारा - *श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळ*

☎ ०२४१ २४२९९४२

📱 ९०११७७२२३३ / ९११२०५९१९१ /९११२०४९१९१

वाचा -

एम आय एम विद्यार्थी राहुरी कारखाना अध्यक्ष पदी साहिल पठाण तर उपाध्यक्ष पदी संजय सांगळे - AIMIM Rahuri ...

बॅंक खाजगीकरण - Bank privatiazation.....

थुंकी एक विष -A.Munde...

ओबीसी जनगणना काळाची गरज..

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा

  सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा            अनुसूचित जाती जमाती. इतर मागासवर्गीय जाती जमाती. भटक्या विमुक्त...

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या