राहुरी- अहमदनगर
ए.आय.एम.आए.एम.विद्यार्थी आघाडीची बैठक राहुरी येथे पक्ष कार्यालयात घेण्यात आली. यावेळी राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथील विद्यार्थी आघाडी च्या राहुरी फॅक्टरी शाखा प्रमुख पदी साहिल मुश्ताक पठाण आणि उपशाखा प्रमुख पदी अक्षय संजय सांगळे यांची निवड करण्यात आली.
सदर निवड ए.आय.एम.आय.एम विद्यार्थी आघाडीचे प्रदेशअध्यक्ष महाराष्ट्र राज्य मा.डाॅ.कुणाल खरात साहेब व ए.आय.एम.आय.एम जिल्हा अध्यक्ष डॉ परवेज़ अशरफी साहेब व विद्यार्थी जिल्हा अध्यक्ष शाहनवाज शेख यांच्या मान्यतेनुसार देण्यात आले.
ए.आए.एम.आए.एम. राहुरी तालुकाअध्यक्ष नवीदभाई बागवान हे बैठकीच्या अध्यक्ष स्थानी होते व ए.आए.एम.आए.एम.विद्यार्थी आघाडीचे राहुरी तालुकाअध्यक्ष साहिल भाई शेख यांनी नियुक्ती पत्र दिले. यावेळी त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की ए. आए. एम आय एम ला मानणारा वर्ग दिवसान दिवस वाढत आहे राहुरी तालुक्यात ए.आए.एम आय एम बरोबर युवा पिढी जुडत आहे व ए.आए.एम आय एम चे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार बैरीस्टर असदुद्दीन ओवैसी याच्या विचाराशी सहमत असणारा व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष खासदार इम्तियाज जलील साहेब व कार्यअध्यक्ष डॉ गफ्फार कादरी साहेब यांच्या नेतृत्वात व अहमदनगर जिल्ह्यात डॉ परवेज अशरफी यांच्या अध्यक्षतेत कार्यरत आहे. राहुरीतालुक्यात पक्ष झपाट्याने वाळत असून नवीन लोक जुडत आहे.
या वेळी राहुरी तालुका उपाध्यक्ष मुद्दसर पटेल तालुका सचीव अतीक भाई बागवान,ए.आय.एम.आय.एम विद्यार्थी आघाडी तालुका सचिव साद अत्तार,विद्यार्थी आघाडी सोहेल पठाण,अलफेज शेख ,आबीद शेख,फरदिन खान, मुस्ताक शेख,फरान खान ,सचीन सोनवणे,सौरब पाटोळे,बागुल प्रणव ,कोटुले सुरज,गाढे पवन,राऊत विशाल,निकम सौरभ, पुडं ओम,निखील सांगळे अदी कार्यकर्ते उपस्थीत होते.
वाचा -
No comments:
Post a Comment