थुंकी एक विष -A.Munde

https://shooterconsultationcart.com/azp33ctwgz?key=f5e461ccbeb850c3df0b07f34593b0c2

थुंकी एक विष



                 व्यसनाचे विविध प्रकार आहेत त्यातच प्रामुख्याने तंबाखू. खैनी. जर्दा. पान मसाला. गुटखा. असे विविध प्रकारचे माणसाला मरणापर्यंत नेणारी नशेची उत्पादने रोज बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होत आहेत शासन नियमानुसार शाळा व सार्वजनिक ठिकाणी असे नशेचे पदार्थ विक्री करण्यास परवानगी नाही तरी सुद्धा मोठ्याप्रमाणात असे पदार्थ विक्री केले जात आहेत

        तंबाखू. पान गुटखा जर्दा असे विनाशकारी पदार्थ खाण्यात येत असलेमुळे माझ्या असे पाहण्यात आले आहे की सर्व शासकीय इमारती. मंदिराचा परिसर. सिनेमा थिएटर. चौकाचौकात. रस्त्यावर इमारती कोपरयात. गटार. सार्वजनिक संडास मुतारी. सार्वजनिक वाहने. अशा एक नाही अनेक ठिकाणी लोक थुंकताना आपण पाहतो पण आपण विचार करत नाही वरिल ठिकाणी रस्त्यालगत उघड्यावर खाद्य पदार्थ विकणारे जसे वडापाव चायनीज गाडे फळे. व अन्य माणसाच्या रोजच्या खाण्यात येणाऱ्या खाद्य मटन चिकन मासे विकणारे असतात आपण थुंकताना विचार करत नाही आपण थुंकतो आणि त्यावर माशा बसतात त्याच माशा व अन्य किटक रस्त्यावर उघड्यावर खाद्य पदार्थ असतात त्यावर बसतात आणि मग काय रोगांचे थैमान चालू होते संसर्गजन्य आजार टि बी. काविळ मलेरिया हिवताप डेंग्यू तापाची लक्षणे. मतीमंद पणा ह्रदय विकार झटका अर्ध अंग वायु. असे विविध आजार आपणच आपल्या निष्काळजीपणा व खोटा मोठेपणा टिकवण्यासाठी करत असलेल्या विविध व्यसनाच्या आहारी जाऊन रस्त्यावर व अन्य ठिकाणी थुंकणयामुळे असे घातक आजार येतात आणि माणसाला आपला जीव गमावावा लागतो याचे कारणं आहे थुंकणे 

अजून एक वाईट आहे ते म्हणजे थुंकणे आपणास कोणत्या थराला घेवून जाते ते बघा आपल्या गावात तालुका जिल्हा राज्य देश येथे शासन आपल्या सेवेसाठी विविध शासकीय इमारती कोट्यवधी रुपये खर्च करून बांधते पण माझ्या असे पाहण्यात आले की आपण अशा इमारतींचे कोपरे छत थुंकून घाण करत असतो आपणास काहिच गांभीर्य नसते वाईट आहे एवढेंच काय आपणं मंदिर परिसर स्वच्छ व सुंदर असणारा आपण थुंकून घाण करत असतो सफाई कामगार पहाटे पासून आपले गाव शहर तालुका जिल्हा साफ सफाई करण्यासाठी प्रयत्न करतात पण आपण हे कामगार सफाई करत पुढे जातात आणि आपण चालत चालत रस्त्यावर आजूबाजूला पानांच्या गुटख्याचा तंबाखू पिचकाऱ्या मारत असतो आपणास आपल्या जवळच्या परिसराचे काहीच देणंघेणं नसतं ही सर्वात मोठी शोकांतिका आहे 

              थुंकणयाचा अजून एक आणि महत्वाचा विषय सांगतो आपण एकामेकाकडे बघून थुंकतो. म्हणजे हा प्रकार एखाद्या व्यक्तीला हिन लेखण्याचा प्रकार असतो यातून आपल्याकडे खून मारामाऱ्या झालेल्या आपण रोज वृतमानपत्रात वाचतो म्हणजे थुंकणे किती घातक आहे यांचा विचार करा आपण सार्वजनिक वाहनातून प्रवास करताना खिडकी कडे बसतो मग आपण तंबाखू जर्दा मावा गुटखा खाऊन बसलेलो असतो आणि मग जेव्हा आपल्या तोंडात थुंकी गोळा होते थुंकणयास जागा नाही मग आपण खिडकीतून बाहेर न बघता थुंकतो आणि मग जर एखाद्या व्यक्तीच्या अंगावर थुंकी उठल्यास मारामाऱ्या होतात असे होत असेल तर मग व्यसन कशासाठी करायच आहे त्यापासून चार हात दूर राहणेच योग्यय

>

      आपल्या धर्म ग्रंथात लिहून ठेवले आहे की जमीन आपली धरती माता आहे त्यावर थुंकू नका पण आम्हाला याच काहीच नसतं तंबाखू खैनी गुटखा मावा असे अन्य विनाशकारी पदार्थांवर रोक लावला पाहिजे आज सुध्दा जागोजागी आंदोलन होतात माणसाला व्यसनापासून दूर करण्यासाठी मेळावे संबोधन प्रबोधन केले जाते आणि उत्पादन करणाऱ्या कंपन्या विरोधात आंदोलन न करता केवळ आपल्या पोटासाठी लहान लहान पानटपरी घालणारे व अन्य विक्रेते यांचेवर बडगा उगारला जातो उत्पादन थांबवा विक्री थांबेल म्हणजे थुंकणयास कारणीभूत असणारे तंबाखूजन्य पदार्थ तयार करणार्या कंपन्या बंद करा म्हणून आंदोलन करणे गरजेचे आहे

      थुंकणयाचे सर्वात मोठें तोटे आपणास सहन करावे लागतात ते म्हणजे आपण खाल्लेले अन्न पचविणयाचे काम आपली लाळग्रंथी करत असते पण अनाठायी व चैनी म्हणून खात असलेल्या विविध तंबाखू गुटखा खैनी जर्दा मावा आपल्या दिवसभर तोंडात असतो आणि दिवसांत असंख्य वेळा आपण थुंकत असतो त्यामुळे आपल्या शरीरातील लाळग्रंथी थुंकी वाटे बाहेर फेकली जाते आणि आपणास काही दिवसात अशक्त पणा नपुंसकत्व. हृदयरोग झटका मधुमेह रक्तदाब हृदयविकार कॅन्सर अशा विविध आजाराने ग्रस्त होतो काहीजणांना मतीमंद बहिरेपणा. अशा महाभयंकर महामारी आजारांचे आपण व्यापून जातो आणि एक वेळ आपला मृत्यू आणि आपले कुटुंब रस्त्यावर आपण काय मिळविले विचार करा व्यसन थांबवा मग थुंकणयाची गरज राहणार नाही 

          पर्वाचे कोरोना सारखें महाभयंकर महामारी संकटावेळी शासनाने गाव वाडी गल्ली तालुका जिल्हा राज्य देश टाळेबंदी करण्यात आली होती त्यावेळी व आत्ता आपणांस नाक व तोंड मास्क ने झाकणे बंधनकारक करण्यात आले होते त्याचे कारण म्हणजे आपणं रस्त्यावर थुंकू नये कारण रोग प्रसारचे कारणं आहे ते म्हणजे जागा सापडेल तेथें थुंकणे आपण जास्त भोगले आहे आत्ता नको 

    व्यसनापासून दूर रहा आरोग्य मिळवा व्यसन टाळा. असे जनहित वाक्य नुसतेच म्हणू नका अंमलात आणा 

समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

९८९०८२५८५९


वाचा -

नगरसेवक झोपले आयुक्तचा दालनात- Ahmednagar Corporation...

वासिम रिझवी विरोधात कोपरगावात एम आय एम तर्फे निवेदन - AIMIM...

ओबीसी जनगणना काळाची गरज...

फायनान्स कंपन्या एक षडयंत्र....

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा

  सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा            अनुसूचित जाती जमाती. इतर मागासवर्गीय जाती जमाती. भटक्या विमुक्त...

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या