मोफत मुळव्याध महिलांसाठीच्या शिबीरास प्रतिसाद
अहमदनगर - संसारासाठी पती-पत्नी दोघेही आज नोकरी-व्यवसायामध्ये काम करुन हातभार लावत आहेत. यात पत्नीची गृहिणीची भुमिकाही महत्वाचे असल्याने अनेक जबाबदार्या या स्त्रीयांवर पडत असतात. नोकरी, व्यवसाय, घर, मुले अशा विविध जबाबदार्या सांभाळतांना महिलांचे स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत असते. त्यामुळे सुरुवातीच्या छोट्या-छोट्या दुखण्याचे कालांताराने मोठ्या आजारात रुपांतर होत असते. त्यासाठी महिलांनी आपल्या आरोग्याबाबत जागरुक राहून आपल्या आरोग्याची नियमित तपासणी केली पाहिजे. नियमित आहार, विहार आणि व्यायाम या त्रिसुत्रीचा अवलंब केल्यास महिलांचे आरोग्य सुदृढ राहू शकते. फास्ट फूड, अवेळी जेवण, ताण-ताणव यामुळे मुळव्याधाची समस्या उद्भवत असते. सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही, अशा प्रकारे वेळकाढूपणाने नंतर जास्त त्रास होतो. त्यासाठी सुरुवातीपासून उपचार घेतल्यास मुळव्याध बरा होऊ शकतो. मुळव्याध उद्भवू नये यासाठी काही पथ्य पाळल्यास त्याचा त्रास कधीच जाणवणार नाही, असे प्रतिपादन डॉ.रेश्मा चेडे यांनी केले.
सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त चेडे अॅक्सिडंट अॅण्ड सर्जिकल हॉस्पिटलच्यावतीने व मखदुम सोसायटीच्या सहकार्याने मोफत मूळव्याध, हिमोग्लोबिन व शुगर तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करुन शिबीरास प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी डॉ.रेश्मा चेडे, डॉ.संतोष चेडे, रुग्णमित्र नादीर खान, आरिफ सय्यद, मुस्कान असोसिएशनचे शफाकत सय्यद, संगीतप्रेमी अमिन धाराणी, मखदुम सोसायटीचे आबीद दुलेखान, डॉ.वाजिद अली, बाळकृष्ण सुरकुटला, अमिर अली धाराणी आदि उपस्थित होते.
याप्रसंगी डॉ.संतोष चेडे म्हणाले, स्त्री शिक्षणातील सावित्रीबाई फुले यांचे योगदान महिलांसाठी वरदान ठरले आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त महिलांसाठी मोफत तपासणी शिबीराचे आयोजन करुन कृतज्ञता व्यक्त करण्याचा प्रयत्न केला असल्याचे सांगितले.
प्रास्तविकात आबीद दुलेखान यांनी मखदुम सोसायटीच्या उपक्रमांची माहिती देऊन या शिबीराचा उद्देश स्पष्ट केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारती गायकवाड यांनी केले तर आभार निकिता वाबळे यांनी मानले. शिबीर यशस्वीतेसाठी कोमल म्हस्के, शैला समुद्रे, राजेंद्र अडागळे, रजिया सय्यद, सुशिला धोंडे, अनिता कदम आदिंनी परिश्रम घेतले.
No comments:
Post a Comment