ती सहा महिन्यांची गरोदर बेवारस मनोरुग्ण महिला मानवसेवा प्रकल्पात...
••••••••••••••••••••••••••••••••••••••एक ३५ वर्षाची गरोदर बेवारस मनोरुग्ण महिला ही अर्ध नग्न अवस्थेत बीड जिल्ह्यातील उमापूर गावामध्ये फिरत होती. त्या बेवारस गरोदर मनोरुग्ण महिलेला अहमदनगर येथील श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाच्या *'मानवसेवा प्रकल्प'* येथे आश्रय देण्यात आला.
काही नराधमांच्या वासनेला बळी ठरलेली ही महिला अंदाजित सहा महिन्यांची गरोदर आहे. या बेवारस महिलेचे खाणेपिणे पासून सर्व हाल सुरू होते त्यामुळे तिच्या पोटातील बाळाचेही हाल होते. मनोरुग्ण असल्यामुळे कोणीही आधार दिला नाही. मानवसेवा प्रकल्पाने या गरोदर महिलेची जबाबदारी घेत महिला व तिच्या पोटातील बाळाचे हाल थांबविले. स्नेहालय संस्थेच्या स्नेहांकुर दत्तक विधान केंद्राचे संतोष धर्माधिकारी यांनी आणि चकलांबा पोलीस स्टेशन ता. गेवराई जिल्हा बीड यांनी श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाचे संस्थापक दिलीप गुंजाळ यांना या गरोदर मनोरुग्ण महिलेची माहिती देत दाखल करुन घेण्याची विनंती केली. दि.५/०२/२०२२ रोजी मध्यरात्री १२:४५ वा. सहा महिन्यांच्या गरोदर मनोरुग्ण महिलेला श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाच्या मानवसेवा प्रकल्पात दाखल करण्यात आले.
*मानवसेवा हीच ईश्वर सेवा!*
*मानवसेवा प्रकल्प*
📱९०११७७२२३३