अर्जदाराने जिल्हा अधिकारी अथवा संबंधित महसूल अधिकारी यांच्याकडे बांधकाम परवानगीसाठी व बिगर शेती आकारणी करून मिळावी यासाठी दोन प्रतीत अर्ज करावा अर्जासोबत खालील प्रमाणे कागदपत्रे दाखल करावी
(१) मालकी हक्काचे पुरावे म्हणून चालू सातबारा किंवा मिळकत पत्रिका व त्यांच्याशी संबंधित. फेरफार. प्रतिज्ञापत्र. व. क्षतिपत्र.
(२) बिगर शेती आकारणी करावयाच्या जमीनीच्या चतुसिमा दाखवणारा नकाशा
(३) वैयक्तिक वापरासाठी बांधकाम परवानगी मागणाऱ्या अर्जदाराने संबंधित जागेचा सर्वे नंबर. गट नंबरचा नकाशा
(४) इंजिनिअर तयार करून स्वाक्षरीने केलेल्या बांधकाम आराखडा ब्ल्यु प्रिंट. ( निल प्रत ) प्रती. जमीनीत जाण्यासाठी अधिकृत पोच रस्ता असल्याचे बांधकाम आराखड्यात उल्लेख असणे बंधनकारक आहे
(अ ) व्यवसायिक कारणांसाठी भुखंड रेखांकन आराखडा मान्यतेसाठी सादर करताना त्यासोबत मोजणी नकाशाची प्रत जोडणे आवश्यक आहे
कालापव्यय होऊ नये म्हणून अर्जदाराने अर्जाची एक प्रत जिल्हा अधिकारी अथवा संबंधित महसूल अधिकारी यांचेकडे अर्ज केल्याची पोचसह संबंधित सहाय्यक संचालक. नगररचना. यांचेकडे दाखल करावा अर्जदाराने अगाऊ दाखल केलेल्या अर्जाच्या आधारे सहायक संचालक. नगररचना यांनी तत्पर पुढील कार्यवाही करावी
(आ ) बांधकाम परवानगी साठी दाखल केलेल्या जागे संदर्भात भविष्यात धारणा अधिकाराच्या अनुषंगाने बदल झाल्यास त्यासाठी प्रचलित तरतुदीनुसार शासनास देय आसणारी नजराणयाची व अन्य कोणतीही रक्कम रितसर भरण्यास अथवा कोणत्याही न्यायालयात वाद उद्भवला किंवा नागरी जमीन कमाल व धारणा कायद्याखाली नियुक्त केलेल्या सक्षम प्राधिकारी अथवा कोणत्याही सक्षम प्राधिकारयाकडे वाद उत्पन्न झाल्यास त्यास अर्जदार जबाबदार राहतील असे क्षतिपत्र करून घ्यावे
(इ ) बांधकाम परवानगी मागणी केलेली जागा इतर कोणास हस्तांतरित करून दीलेली नाही त्या क्षेत्रसंबधी इतर अधिकाराने पाॅवर आॅफ अॅटरनी. अथवा इतर कोणत्याही प्रकारे निर्माण होणा-या त्रिपक्षीय हितसंबंधास अथवा हस्तांतर अर्जदार वैयक्तिक जबाबदार राहतील याबाबत आणि बिगर शेती रुपांतरण करताना आवश्यक असलेल्या संबंधित सर्व कायद्यातील तरतुदींचा भंग होणार नाही याबाबत अर्जदाराने द्यावयाच्या प्रतिज्ञापत्र त्याचा उल्लेख करून प्रतिज्ञापत्र घ्यावे
(ई ) मालकी हक्क बाबत अर्जदाराने सादर केलेल्या कागदपत्रांशिवाय इतर अधिक पुरावे तपासणी करावयाचे असल्यास किंवा धारणा प्रकाराबाबत माहिती हवी असल्यास कार्यालयात उपलब्ध असलेलें अभिलेख ( स्कॅन डाटा ) कार्यालयीन स्तरावर संबंधित अधिकारी यांनी तपासणी करावेत त्या आधारें मालकी हक्काची खात्री करावी
(इ ) सहाय्यक संचालक. नगररचना. अथवा त्यांचा प्रतिनिधी यांनी अर्जदाराने पुरविलेल्या आराखडयाप्रमाणे वस्तू स्थिती प्रतक्ष जागेवर जाऊन स्थळ पाहणी करावी सथळपाहणी वेळी सहायक संचालक. नगररचना. यांनी भौगोलिक स्थिती नदि नाले. / राष्ट्रीय महामार्ग/ राज्य महामार्ग / किंवा प्रमुख जिल्हा मार्ग / उच्च दाब विधुत वाहिनी / जमीनी खालून जाणारे पाणी / गॅस / डेरनेज.पाईप लाईन यांची पाहणी करून त्याबाबतची वस्तू स्थिती व अभिप्राय नमुना करावा त्याचा अहवाल जिल्हाधिकारी किंवा संबंधित महसूल अधिकारी यांना पंधरा दिवसांत द्यावा त्यांनी दिलेला. नाहरकत दाखला. / अहवालाशीवाय इतर नाहरकत दाखले घेण्याची गरज नाही
(उ ) सहयाक संचालक नगररचना यांना. आवश्यक वाटल्यास. त्यांनी रिबन डेव्हलपमेंट रुल्स अनुषंगाने सार्वजनिक बांधकाम खात्याची त्याचप्रमाणे महावितरण कंपनीची उचचदाबाची अथवा कमी दाबाची विधुत लाईन याबाबत महावितरण कंपनीकडून ना हरकत दाखला घेण्याची अट घालावी त्यांची ही अट विचारात घेऊन संबंधित महसूल अधिकारी यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग खात्याच्या किंवा महावितरण कंपनीच्या अधिकारांचा ना हरकत दाखला घ्यावा
(ऊ ) बांधकाम परवानगी मागितलेल्या जागेवर अनाधिकृत बिगर शेती वापर अधिच चालू असलेल्या चे सहाय्यक संचालक. नगररचना. यांच्या पाहणीत आढळून आल्यास किती क्षेत्रावर अनाधिकृत बिगर शेती वापर झाला आहे याचा क्षेत्रासह स्पष्ट उल्लेख त्यांनी त्यांच्या अहवालात करावा
( ए ) सहाय्यक संचालक. नगररचना यांचे अभिप्राय प्राप्त झाल्यानंतर भरणा करावयाचा रूपांतरण कर. बिगर शेती आणि भोगवटदार. वर्ग. दोन म्हणून धारण केलेल्या जमीनीच्या बाबतीत अशा रुपांतरणासाठी आकारलेला नजराणा किंवा अधिमुलय आणि इतर शासकीय देणी भरण्याबाबत जिल्हाधिकारी अथवा संबंधित महसूल अधिकारी यांनी अर्जदारास सात दिवसांत कळवावे संबंधित अर्जदारांनी शासनास प्रदान करावयाच्या रक्कमा भरल्या व दिवसांपासून सात दिवसांत जिल्हाधिकारी किंवा महसूल अधिकारी यांनी सहाय्यक संचालक नगररचना यांचेकडून विहित केलेल्या बांधकाम आदेशाचा नमुना बांधकाम परवानगी देण्यात येते
(ऐ ) मंजूर रेखांकन मधील भूखंडामधये अर्जदाराने बांधकाम परवानगी मागितल्यास अर्ज केल्यापासून पंधरा दिवसांत बांधकाम परवानगी देणे बंधनकारक आहे
(ओ ) बांधकाम परवानगी मागितलेल्या जागेवर अनाधिकृत बिनशेती वापर कधिच सुरू असेल आणि तसे सहायक संचालक व नगररचना यांच्या अहवालात नमूद असल्यास जमीन महसूल अधिनियम १९६६ मधील कलम ४५ नुसार संबंधित महसूल अधिकारी यांनी संबंधितांवर दंडनिय कारवाई करावी सदरची दंडनिय कारवाई बांधकाम परवानगी देतानाच करावी
( औ ) वैयक्तिक वापरासाठी परवानगी देताना मोजणी नकाशा ऐवजी सर्वे नंबर. / गट नंबर चया नकाशावरून स्थानिक इंजिनिअर तयार केलेला नकाशा विचारांत घेवून बांधकाम परवानगी द्यावी मात्र बांधकाम परवानगी दिलेल्या जागेची मोजणी नंतर करून घेण्याची अट आदेशात नमूद करावी
(क ) महसूल अधिकारी त्यांनी बांधकामाची परवानगी देण्याच्या आदेशात क्षतिप्रत व प्रतिज्ञापत्रातील अटी बंधनकारक असल्याची शर्त नमुद करावी
(२) गावठाण गावातील गावठाण क्षेत्रात बांधकामासाठी ग्रामपंचायतींची परवानगी आवश्यक आहे
(३) गावठाण लगतच्या परीघ क्षेत्रातून अधि मुल्य भरून घेवून बांधकाम परवानगी देणे
गावठाण लगतच्या परिघक्षेत्रात. प्रादेशिक योजनेत नमुद केलेल्या अंतरापर्यंत प्रादेशिक योजनेत नमुद केल्या प्रमाणे अधि मुल्य आकारणी करून बांधकाम परवानगी देता येईल त्याकरिता जिल्हाधिकारी अथवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या तहसिलदार पेक्षा कमी दर्जा नसलेला अधिकारयानी अधि मुल्य आकारून आणि सहाय्यक संचालक व नगररचना यांचे अभिप्राय विचारात घेऊन बांधकाम परवानगी दिली पाहिजे
(४) प्रमाणभूत बांधकाम नकाशाच्या विविध नमुन्यात परवाना देणे
नगरविकास विभागाकडील दि ३ जानेवारी २०१५ आणि ग्रामविकास विभागाकडील दि ११ डिसेंबर २०१५ या शासन निर्णयानुसार पत्रकात नमूद केले प्रमाणे लहान भूखंडासाठी. भूखंड क्षेत्रासापेक्ष. प्रमाणभूत बांधकाम नकाशाचे विविध नमुने. अर्जदाराने सादर करावयाचा अर्ज इत्यादी. नगरविकास विभागाकडून दि. ३/जानेवारी २०१५ चया परिपत्रकासोबत जोडून पाठविले आहेत अर्जदाराने मंजूर रेखांकनातील भूखंड किंवा महाराष्ट्र गुंठेवारी विकास अधिनियम २००१ सह अन्य कोणत्याही अधिनियमानुसार अनाधिकृत अथवा नियमित केलेल्या भूखंडांवर नगरविकास विभागाच्या दि ०३/०१/२०१५ चया परिपत्रकातील प्रमाणभूत बांधकाम आराखड्यानुसार बांधकाम नकाशा मंजूरी मागितल्यास विकास नियंत्रण नियमावलीत तरतुदीनुसार अर्ज प्राप्त झाल्यानंतर सात दिवसांच्या आत परवानगी मंजूरी जिल्हाधिकारी अथवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या अधिका-यांनी द्यावी
वरील सर्व परिपत्रकातील सूचना इकोसेनसेटीवह झोन किंवा शासनाचे विशिष्ट निर्बंध असलेल्या क्षेत्रासाठी लागू असणार नाही याची नोंद घ्यावी
वरील शासन निर्णयानुसार आपण आपल्या जागेसाठी बिगर शेती प्रस्ताव दाखल करतो आपणास विनाकारण हेलपाटे मारावे लागतात बिगर शेती नावाखाली बेमाफी आर्थिक लूट केली जाते शासनाने आपली कागदपत्रे बरोबर असल्यास लवकरात लवकर बांधकाम परवानगी व बिगरशेती प्रस्तावाला मंजुरी द्या असे सांगून सुध्दा कोणतेच काम शासन निर्णयानुसार होत नाही
समाजसेवा उठाव बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार जाहिरात प्रसिद्ध वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी
बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर
रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा
रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा
मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा
माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा
संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे
वाचा -
अन् त्याला कुटुंब मिळाले...! - Manavseva Project...
सर्वनाश आणि केवळ सर्वनाश - ...